बाबाराव सावरकर हे वि दा सावरकरांचे ज्येष्ठ बंधु. त्यांचे स्वतंत्र्य लढ्यातील योगदान महत्वाचे आहे.
बाबाराव सावरकर हे वि दा सावरकरांचे ज्येष्ठ बंधु. त्यांचे स्वतंत्र्य लढ्यातील योगदान महत्वाचे आहे.
बाबाराव यांनी ख्रिस्ताचे हिंदुत्व नामक पुस्तक पूर्वी लिहिले होते. सध्या ते पुन्हा प्रकाशित होते आहे . येशु ख्रिस्त हा तामिळी ब्राम्हण होता आणि त्याची मुंज झाली होती असे बाबाराव सावरकरांचे मत आहे. ख्रिस्त हा भारतात जन्मलेला हिंदु होता असे सिद्ध करणारे बरेच पुरावे (!) या पुस्तकात आहेत.
प्रकाशन हा एक मुद्दा . पण त्यातला विचार सावरकर वाद्यांना मान्य आहे काय ? मान्य असेल तर पुढील प्रश्न निर्माण होतात
१) ख्रिस्त हा देशी भारतीय ठरतो. त्यामुळे ख्रिस्ती धर्म हा पण भारतीय ठरतो. हा देश पितृभूमी आणि पुण्यभूमी " असलेले" लोक म्हणजे हिंदु अशी वि दा सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या आहे. त्यानुसार भारतातील ख्रिश्चन हे हिंदु ठरतात काय ?
२) मग ख्रिस्ती धर्मांतराला विरोध का ?
३) मक्केत शिवलिंग आहे , इस्लाम चे प्रेषित मुहम्मद यांचा संस्कृत भाषेत समास विग्रह महान मद: यस्य असा होतो . (मुसळ मानव = मुसलमान ) - कारण श्रीकृष्णाच्या यादव कुळाला मुसळाचा शाप मिळाल्याचे दाखले पुराणात आहेत . = श्रीकृष्णाचे यदुकुलीन वंशज म्हणजे मुसलमान होय …. अशा अनेक गोष्टी विद्वान इतिहासकार पु ना ओक यांनी सिद्ध केल्या आहेत . त्या मान्य आहेत काय ?
४) मान्य असतील तर इस्लाम ला अराष्ट्रीय का म्हणता ? कृष्णाच्या वंशजांना (= मुस्लिमांना) देशद्रोही का म्हणता ?
५) बाबाराव आणि विनायकराव यांचे विचार एकच होते काय ?

ख्रिस्ती धर्मांतराला विरोध करण्याचे प्रयोजन काय ?
---------------------------------------------------
जाता जाता थोडी गंमत -
जाता जाता थोडी गंमत -
कथा : जय सीता रोमैय्या
बरका मुलानो- रोम म्हणजे राम . सोनिया म्हणजे सीता . आज आपण राजीव लोचन राम आणि (सोनिया ) सितामैया यांची हिंदु गोष्ट ऐकायची आहे.
तर मुलानो (रोम ) रामनगरीत एक पराक्रमी योद्धा राहत असे . (Stefano Maino) स्तवनमान्य असे त्याचे नाव होते . (Benito Mussolini) बंतोमुसलि राजाचा स्तवनमान्य हा एकनिष्ठ सेनापती होता . स्तवनमान्य सेनापतीस कन्यारत्न झाले. हत्तीवरून पेढे वाटण्यात आले . काही पेढे हत्तीच्या पायाखाली चिरडून चप्पट झाले. त्यासच हल्लीच्या रामनगरीत पास्ता असे म्हणतात. स्तवनमान्य सेनापतीने आपल्या कन्येचे नाव Edvige = (इ)द्विजे असे ठेवले होते.

द्विज म्हणजे ब्राम्हण- द्विजे म्हणजे ब्राम्हण कन्या - तर (इ)द्विजे म्हणजे संगणक शास्त्रात पारंगत अशी ब्राम्हण कन्या होय. यावरून हे सिद्ध होते कि, प्राचीन हिंदु संस्कृती इटाली पर्यंत पसरली होती व तेथील ब्राम्हण कन्या संगणक तज्ञ होत्या.
तर (इ)द्विजे ची पहिल्यापासून सीतेवर फार भक्ती त्यामुळे लोक तिला सितामैया असेच म्हणू लागले. या सितामैया चा अपभ्रंश सोनिया असा झाला . पुढे राजीवलोचन रामाने तिच्याशी विवाह केला . प्रभू राजीव लोचन राम व (बोफोर्स ) बर्फ़ासुर क्वात्रोची यांची कथा उद्या सांगेन बरका !! जय सीता रोमैय्या !!
---------------------------------------------------
याने जग जिंकता येत नाही .
सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणून एक वाक्प्रचार आहे. कृष्ण आणि ख्रिस्त या नावात काही साम्य आहे . निरनिराळ्या भाषात काही शब्द सारखे असतात . मानवी मेंदूची जडण - घडण मिळती जुळती असल्याने असे समान शब्द तयार होतात . त्याचा अर्थ कृष्ण वरून ख्रिस्त आला असा घेता येतो . त्यासाठी अफ़ाट धर्म वाङ्ग्मयातुन काही मिळते जुळते उतारे आणि श्लोक काढता येतात . या वर्णनात कृष्ण आणि ख्रिस्ता बरोबर - बराक ओबामा सुद्धा बसवता येतो. मानवी भाषा मानवी इतिहास , मानवी देह यष्टी आणि माणसाचे मन सर्वत्र सारखे असते . त्यामुळे ख्रिस्त म्हणजेच कृष्ण असे सिद्ध करता येते - ख्रिस्ती धर्मप्रचारक तसे करत असतात . हा प्रकार उलट्या बाजूनेही करता येतो. असे काही मौलिक इतिहास संशोधन आम्हीही करू शकतो - उदाहरणार्थ वरील मौलिक इतिहास संशोधन - कथा : जय सीता रोमैय्या .
याने जग जिंकता येत नाही .
---------------------------------------------------
---------------------------------------------------
Eagerly waiting for बर्फासुर
उत्तर द्याहटवाएक चांगला मुद्दा ! हे पुस्तक प्रकाशित करण्यामागे काहीही हेतू नव्हता, बाबांचे संपूर्ण साहित्य प्रकाशित करावे हीच इच्छा होती. बाबा आणि तात्या यांचे अनेक प्रश्नावर मतभेद होते, अनेक बाबतीत संपूर्ण विरोधी मते होती. आता ख्रिस्ती धर्माबद्दल.
उत्तर द्याहटवासध्या प्रचारात आलेला ख्रिस्ती धर्म ख्रिस्तानंतर ३५० वर्षांनी अस्तित्वात आला. ख्रिस्ताने आपले रक्त सांडून (प्राण देऊन) मनुष्याची पापाचे प्रायश्चित्त भोगण्यापासून सुटका केली हा यांचा मुख्य गाभा. याच आधारावर ख्रिस्ती व्हा आणि स्वर्ग मिळवा असा प्रचार सुरु असतो. चर्च मधील wine आणि वेफर हे ख्रिस्ताच्या रक्त आणि मासाचे प्रतिक आहेत. तेव्हा जर ख्रिस्त सुळावर मृत्यू न पावता जिवंत राहिला असे सिद्ध झाले तर यांची पापे कोण फेडणार असा मुलभूत प्रश्न निर्माण होतो आणि ख्रिस्ती धर्माचे अस्तित्वच धोक्यात येते.
आज विज्ञान युग सुरु असून सर्व धर्मग्रंथातील स्वर्ग/नरक यांची रंगवलेली चित्रे आणि ठिकाणे खोटी ठरली आहेत आणि म्हणूनच दैववादाचा त्याग करून बुद्धिवादाचा स्वीकार करणे हीच आजची मुख्य गरज आहे.