१७ डिसें, २०१३

कॉन्सपिरसी थिअरि : होऊ दे खर्च !


कॉन्सपिरसी थिअरि : होऊ दे खर्च !


आपल्या आजूबाजूला भयंकर कट आणि कारस्थाने सुरु आहेत . आपल्याला उल्लू बनवले जात आहे .फसवले जात आहे. खरे वास्तव वेगळे आहे . आणि दाखवल जातय काहीतरी भलतच ! हे मिडियात येत नाही कारण मिडिया हाच एका महाभयंकर कटाचा भाग आहे

हि अतिशय लाडकी आणि झटक्यात लोकप्रिय ठरणारी थेअरी आहे . अमेरिकेतल्या टोप टेन कोन्स्पिरसी थेअरी खालच्या व्हिडियो लिंक मध्ये पहायला मिळतील . यात औषध कंपन्या पैसे कमावण्यासाठी आजारांचे विषाणू पसरवतात , लोकांचे मेंदु नष्ट - भ्रमिष्ट करून त्यांच्यावर राज्य करण्यासाठी सरकार पाण्यात फ़्लोराइड मिसळते , इल्युमिनाटि नावाचा धर्मगट जगावर राज्य करण्यासाठी - युद्धे , माइंड कंट्रोल रसायने वगैरे वापरत असतो. 








शिवाय पर्ल हार्बर अमेरिकन सरकारने मुद्दामच घडू दिले - अमेरिकन राश्ट्राध्यक्ष रूझवेल्ट ते रोखू शकला असता पण त्याला युद्धात उतरायचे होते । म्हणुन त्याने गुप्तचर यंत्रणेच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले , ९ -११ ची घटना अमेरिकन सरकारनेच घडवली कारण त्यांना मध्यपूर्वेतल्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध करायचे होते ! अमेरिकन स्वभावाल अनुसरून सर्व कोन्स्पिरसि थेअरी मांडल्या गेल्या आहेत - सर्वच्या सर्व पैशाशी नायतर पेट्रोल च्या भावाशी संबधित आहेत !!

अशीच एक गाजलेली थेअरी होती चंद्रावर माणुस उतरलाच नाही । आणि सामन्य माणसाला पटतील असे त्याचे खोटेच व्हिडिओ नासा ने तयार केले आहेत .त्याबाजुचे आणि विरुद्ध असे हजारो व्हिडियो आणि लेख इंटर्नेट वर प्रसिद्ध आहेत .

भारतातही अशा अनेक कोन्स्पिरसि थेअरी आहेत . 


१ ) नेहरू मुसलमान होता , इंदिरेचा नवरा फिरोझ मुसलमान होता , आणि राजीव आणि त्याच्या मुलांचा ख्रिस्ती बात्मिस्मा सोनियाने घडवला .

२) नथूरामने दंगल घडवण्यासाठी गांधिजिंना मारण्या आगोदर स्वत:ची सुंता केली होती .

३) मक्केत शिवलिंग आहे . ते चादरीखाली लपवले आहे .


हिंदु स्वभावानुसार या सार्या कोन्स्पिरसी थेअरी मुसलमानांशि निगडित आहेत . मुसलमान एडस पसरवतात (गर्दीत सुया टोचून) म्हणुन कर्नाटकात उडपी जिल्ह्यात एक दंगलहि झालेली आहे .


बाम्सेफी मंडळिंनि त्यांच्या स्वभावानुसार काही कोन्स्पिरसि थेअरी स्वीकारल्या आहेत … यात प्रामुख्याने शेटजी - भटजिंचे एक गुप्त मंडळ सतत भारताचा इतिहास , भूगोल , नागरिकशास्त्र इत्यादी बदलत असते . आंबेडकरांचा मतदार संघ पाकिस्तानात जावा म्हणुन गांधीने फाळणी केली. अशा प्रकारच्या थेअरी प्रसूत केल्या आहेत .


या कटकारस्थानाच्या थेअर्यांवर अनेकांचा मनापासून विश्वासही असतो .
आणि हे जगात सर्वत्र चालते .




त्याची कारणे :


१) आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहून निष्कर्ष काढणे हि माणसाच्या मेंदूची पद्धत आहे .

२) पण त्याच वेळी काही महत्वाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे आपण उत्क्रांतीत शिकलो आहोत . आपल्या आजू बाजूला रेडिओचा आवाज चालू आहे , कावळा ओरडतो आहे , कुत्रा भुंकतो आहे … पण रस्ता क्रोस करताना आपल्याला फक्त ट्रकचा हॉर्नच ऐकू येतो । . बाकी काही नाही .। बिन महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे वरदान मानवी उत्क्रांतीत आपण निसर्गाकडून शिकलो आहोत . जगण्यासाठी ते आवश्यकही आहे .

३) महत्वाचे काय ? आणि बिन महत्वाचे काय ? हे आपण - संस्कार , वाचन , नातेवाइक - मित्र यांकडून मिळणारी माहिती यावरून ठरवतो.

४) मग महत्वाच्या तेव्हढ्याच गोष्टी लक्षात ठेवतो (तथाकथित बिन महत्वाच्या विसरून जातो ).

५) मग आपल्या संस्कारानुसार महत्वाच्या वाटणार्या गोष्टींची एक तर्क संगति आपला मेंदु आपोआप लावतो - आणि त्यातून आपला स्वभाव म्हणा किंवा अनेकांचे सारखे स्वभाव एकत्र येउन जन्माला येणार्या विचारधारा (इझम ) म्हणा - जन्माला येतात आणि वाढतात .

६) पण आपण अनेक तथाकथित बिन महत्वाच्या गोष्टी विसरून गेलेलो असतो . त्यामुळे आपल्या स्वभावाला किंवा विचारधारेला (इझम) ला न मानवणार्या गोष्टी आपल्याला दिसतच असतात .

उदाहरणार्थ अमेरिका हा महाचोर भांडव्लदरांचा देश आहे हे लाडके डावे गृहीतक आहे . मग रशिया सारख्या महान देशा आधी ते कसे काय चंद्रावर पोचतील ? पण त्यांचे चंद्रावर्चे फ़ोटो तर दिसतायत खरे !

७) यावेळी आली हुक्की मारली बुक्की च्या आवेशात एखाद्या कोन्स्पिरसि थेअरी चा जन्म होतो . नासा ने खोटेच व्हिडियो बनवले ! - नवे सत्य स्विकारण्यापेक्षा - कोन्स्पिरसि थेअरी वर विश्वास ठेवणे मानवी मेंदुला अधिक सोपे असते .

८) हे पूर्णत: नैसर्गिक आहे … प्राणि नुसतेच आकलन करत बसला तर मारूनच जाइल त्याला काही निश्कर्ष काढावेच लागतात आणि त्यावर विश्वास ठेवून निर्णय करावे लागतात . 

या उत्क्रांतीच्या देणगितच या थिअर्यांचे मर्म आहे .







१६ डिसें, २०१३

जमाते इस्लामीचा भाईचारा

 जमाते इस्लामीचा भाईचारा 


जमाते इस्लामी हिंद ने - अब्दुल कादिर मौला यांच्या फाशीचा निषेध केलेला आहे. अब्दुल कादिर मौला हे बांग्लादेश जमाते इस्लामीचे नेते . त्यांच्यावर खून , आणि स्त्रिया आणि मुले यांसकट सामुहिक कत्तलिंचे आरोप सिद्ध झालेले आहेत . मिरपुरचा खाटिक या नावाने ते कुप्रसिद्ध होते . त्यावर सिद्ध झालेले आरोप १) एका कवीचा स्वहस्ते शिरछेद . २) ११ वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार . ३) ३४४ जणांच्या गोळ्या घालून केलेल्या सामुहिक हत्याकांडात सहभाग .  .भारतातली जमाते इस्लामी या बांगलादेशी मौलानाच्या समर्थनार्थ उतरली आहे .





बांग्लादेशात ... तसे खून करणे योग्यच आहे म्हणत  समर्थकांनी  फाशीचा निषेध म्हणुन अल्पसंख्य हिंदुंचि घरे पेटवली आहेत .  गंम्मत म्हणजे भारतातल्या जमाते इस्लामी ने सुद्धा त्यांच्या फाशीचा निषेध केला आहे . त्यांना शहीद म्हटले आहे. आणि "" देश "" एकत्र ठेवण्यासाठी अब्दुल कादिरचे कृत्य योग्यच होते अशीही पुस्ती जोडली आहे . हा देश म्हणजे कोणता देश ? एकत्र म्हणजे काय ? आणि जमाते इस्लामीचा भाईचारा म्हणजे काय ?  हे सविस्तरपणे माहित करून घेणे आवश्यक ठरले आहे .



http://jamaateislamihind.org/eng/jih-chief-strongly-condemns-execution-of-bangladesh-jamat-islami-leader/



जमात चा इतिहास 


मौलाना मौदुदि  हे जमाते इस्लामी चे जन्मदाते . मौदुदि चा  जन्म महाराष्ट्रातला . १९४१ साली त्यांनी जमाते इस्लामीची स्थापना केली . जमाते इस्लामीचा मुस्लिम लीग ला विरोध होता . मुस्लिम बहुल पाकिस्तान बनवण्यात जमाते इस्लामीला स्वारस्य नव्हते. त्यांना अखंड भारतात कुराण , हदीस आणि शरिया कायद्यानुसार चालणारी इस्लामी धर्माची राजवट आणायची होति. मौदुदिंच्या दुर्दैवाने देशाची फाळणी झाली . अखंड भारतात अल्ल्लहचा दिन (इस्लाम ) नुसार चालणारी राजवट आणण्याचे स्वप्न भंगले.   मग मौदुदि त्यातल्या त्यात इस्लामी असलेल्या पाकिस्तानात गेले .





पाकिस्तानात दाखल होताच त्यांनी अहमदिया विरुद्ध प्रचार सुरु केला . अहमदिया हा मुस्लीमातला एक अल्प्संख्य गट आहे . त्यांवर मैत्रेय बुद्ध , क्रुश्णादि अवतार यांचा प्रभाव आहे.  नव्या युगात जिहाद बा सैफ (तलवारीचा रक्तरंजित  जिहाद ) लागू पडत नाही असे अह्मदियांचे धार्मिक मत आहे . मौलाना मौदुदिंनि  अहमदिया हे मुस्लिम नसून  " काफर"  आहेत असा विचार मांडला .  विशुद्ध इस्लामी राजसत्ता स्थापना करण्यासाठीच मौदुदि पाकिस्तानात गेले होते . अहमदिया मुस्लिमांविरुद्ध प्रचार हे त्याकडेच टाकलेले एक पाउल होते. . त्याची परिणती १९५३ सालच्या अहमदिया विरोधी दंगलीत झाली . कत्लेआम घडले -  आणि पाकीतानात त्या ठिकाणी मार्शल लो पुकारला गेला .  आजही त्यांची जमाते इस्लामी हि संघटना पाकिस्तानातील प्रमुख राजकीय मूलतत्व वादि पक्ष आहे.


तर फाळणी झाल्यावर जमाते इस्लामीचे जन्मदाते पाकिस्तानात गेले आणि तिथल्या अहमदिया मुस्लिम सारख्या काफ़िरांचा पाडाव करू लागले . फाळणी झाल्याने भारतात उरलेल्या जमातचे  काय होणार ? देशाचे दोन तुकडे झाल्याने जमाते इस्लामी चे दोन तुकडे होणे अपरिहार्य होते.    पण प्रत्यक्षात  जमाते इस्लामीचे तीन तुकडे झाले - एक जमाते इस्लामी हिंद ,दुसरा जमाते इस्लामी  पाकिस्तान आणि तिसरा म्हणजे काश्मीर .  काश्मीर मधलि जमाते इस्लामी ही भारत विरोधी संघटना आहे .  

अशाप्रकारे वेगवेगळ्या भू राजकीय परिस्थितीशी जमात ने जुळवून घेतले ! आणि मुळात एकाच असणारी संघटना तीन वेगवेगळ्या नावांनी काम करू लागली … लवकरच या संघटनेला आणखी एक चौथी उपशाखा काढावी लागणार होती.


बांग्लादेश युद्ध 


इंदिरा गांधिंनि पाकिस्तानशी युद्ध करून त्याचे दोन तुकडे केले . लाखभर पाकि सैन्य डोक्यावर हात ठेवून शरण आले .  याच पाकि सैन्या बरोबर अब्दुल कादिर मौला काम करीत होता .  हे पाकि सैन्य जे अनन्वित अत्याचार स्थानिक बांगलादेशी वर करत होते त्यात अब्दुल कादिर सामील होता .  या युद्धाच्या दरम्यान हजारो  हिंदु, मुस्लिम विचारवंतांचि  कत्तल करण्यात आली . यात डोक्टर , संगितकार , विचारवंत , कवी , तत्वज्ञ यांचा समावेश होता . पाकि सैन्याकडून हि कत्तल झाली त्यात जमाते इस्लामीचे लोक सामील होते . त्यांनि मुख्यत: माहिती पुरवण्याचे काम केले .  कादिर मौला वर एका कवीचे मुंडके स्वहस्ते उडवल्याचा आरोप   सिद्ध झाला आहे. ह्या कत्तल झालेल्या विचारवंतांचे स्मारक आजही बांग्लादेशची राजधानी ढाका येथे आहे .





हे विचारवंत स्वतंत्र बांग्लादेश मागत होते हा त्यांचा गुन्हा होता . कादिर मौला ला पाकिस्तान नावाचा देश एक ठेवायचा होता . त्याचे हे ""देश "" एकत्र ठेवण्याचे प्रयत्न भारतातल्या जमाते ते इस्लामीने वाखाणले आहेत .

मुळात हे बांगलादेशी विचारवंत पाकिस्तान पासून फुटून वेगळा देश का मागत होते ? हेच मुळी  जमाते इस्लामिला समजलेले नव्हते . आजही समजलेले  नाही.  १९७१ पूर्वीच्या अखंड पाकिस्तानात (पाक + बांग्लादेश ) बंगाली भाषिक संख्येने बहुसंख्य होते .  पण देशाची अधिकृत भाषा उर्दू होती . मुठभर पंजाबी मुस्लिमांची दादागिरी सर्वत्र चालू होती . बंगाली अस्मिता इस्लामी भाइचार्याहुन अधिक टोकदार बनली आणि बांग्लादेशाचा जन्म झाला . धर्माच्या आधारावरची राष्ट्रे ठिसुळ तर असतातच पण प्रतिगामी विचारधारा फक्त खड्ड्यात च घेऊन जात असते .


जमाते इस्लामी हिंद 


तर जमाते इस्लामी हिंद या जमाते इस्लामीच्या भारतीय तुकड्याने आपला भाईचारा प्रकट केला आहे . हा भाईचारा बांगलादेशी मुस्लिमांसाठी नाही . बांग्लादेश चा गद्दार जमाती नेता कादिर मौला यासाठी आहे . त्याने पाकिस्तान एक ठेवण्यासाठी केलेले प्रयत्नहि  वाखाणले आहेत . हि सर्व कृत्ये जमातच्या इतिहासाशी सुसंगत अशीच आहेत . अहमदिया असो कि बंगाली भाषिक ,लहान - लहान मायनोरिटि चिरडत पेन इस्लामचे स्वप्न पहाणे हा जमात ए इस्लामीचा मुळ स्वभाव आणि धोरण आहे .  जमाते इस्लामीचा अभ्यास करताना - त्यांच्या परिभाषा समजून घ्याव्या लागतील . अल्प्संख्य , अन्याय , न्याय , देश , जिनोसाइड या बाबतच्या त्यांच्या इस्लामी संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे . आणि कोणत्या परिप्रेक्षातुन त्या बदलतात हे हि लक्षात ठेवले पाहिजे .

८ डिसें, २०१३

धर्म आणि धम्म या संपुर्ण वेगळ्या गोष्टी आहेत

इस्पश्ट बोलू का ? बोलतोच आता … बुद्ध हा एक चांगला धर्म वाटतो मला … 

इस्लाम , ख्रिस्चन , वैदिक किवा इतर कुठल्याही धर्मापेक्ष बुद्ध बरा . हिंदु धर्म नावाची काही चीज अस्तित्वात नाही . हिदु हा लोकसमुह आहे आणि त्याचे अनेक धर्म आहेत. आणि पारंपारिक बुद्ध हा वैदिकांचेच एक्स्टेनशन आहे असे सोनावणि सरांचे म्हणणे आहे . बाकी बाबासाहेबांचे नवयान - भिमयान जवळ जवळ निधर्मी आधुनिक माणसाचे बायबल वाटले . त्यात धर्म गिरी काही नाही . (भाईगिरी च्या चालीवरची ! )

पण जर धर्मगिरी संपवायचीच असेल तर … धर्मांतर हा शब्द का ? धर्म आणि धम्म या संपुर्ण वेगळ्या गोष्टी आहेत असे बाबासाहेब स्पष्ट म्हणतात . एक तर धम्म स्वीकार म्हणावे - किंवा धर्म नकार म्हणावे . धर्मांतर हा शब्द चुक आहे .

धरमगिरी नाकारण्यासाठी जरा वेगळ एप्रोच पाहिजे .

धर्मगिरी (भाईगिरी ) म्हणजे राजकारणात धर्म आणणे . उपरे सर यांचा हेतू राजकारण आहे ? धर्मगिरी आहे ? समाजकारण आहे ? कि अध्यात्मिक ?

हनुमंत उपरे सर विपश्यनेच्या मार्गाने बौद्ध झालेले नाहीत. त्यांचे हेतू अध्यात्मिक नाहीत हे स्पष्ट आहे. त्यांच्या धर्मांतराच्या हेतुमागे राजकारण नाही …. असे सप्रमाण सिद्ध करावे लागेल . त्यासाठी त्यांच्या धम्म स्वीकाराचा हेतूही स्पष्ट करावा लागेल . तसे झाले तर Sanjay Sonawani सर त्यांना पाठिंबा देतील असे वाटते . आपला माझा अंदाज .

बाबासाहेबांनी मी भारत बुद्धमय करेन अशी सिंह गर्जना केली होती . त्या काळी भारताचे समाजकारण बदलून टाकण्यासाठी त्यांना ते अत्यावाश्यक वाटले होते. आता काळ भरपूर बदललेला आहे … अणि यापुढे त्याहून झपाट्याने बदलणार आहे . धर्म आणि धर्मांतराचे संदर्भ बदलत चालले आहेत . . आज भारतात फार मोठ्या प्रमाणावर बुद्ध धम्माचा प्रचार चालू आहे . विपश्यनेच्या मार्गातून हे काम चालू आहे . माझ्या अंदाजाप्रमाणे हे फार मोठे अभियान चालू आहे . आणि त्याची फळे काही वर्शातच दिसतील . फकस्त वैचारिक हाणामारीचा
रोमांन्स त्यात मिळणार नाही . तो बुद्धाचा मार्गही नव्हे . आणि विपश्यनेचे विरोधक कोण आहेत हेही माहित करून घेतले पाहिजेच .

आजचे धार्मिक सनातनी - विज्ञान विद्यार्थ्यांच्या खुनाला दात विचकून हसत हिडिस समर्थन करतात … तेंव्हा हि धर्म भाईगिरी नाकारणे हि एक स्वाभाविक प्रतिक्रिया बनते .

पण धरमगिरी नाकारण्यासाठी दुसरी धरमगिरी उभी करायची का बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म आजमवायचा . त्याहून महत्वाचे म्हणजे आपल्या सेक्युलर संविधानाला आजचा धर्म ग्रंथ का मानु नये ?

भारत बुद्धमय करायचा हेच अंतिम ध्येय ठेवून आपण चालू . हे मुस्लिमांना आणि ख्रिस्चनांना आधी विश्वासात घेऊन का सांगितले जात नाही ? कि बहुजन हिंदु समाज बुद्ध झाला कि मुस्लिम ,ख्रिस्चन आणि नास्तिक धर्महिनांना सरप्राइज द्यायचे आहे ? कि भारतात इतर धर्म अस्तित्वातच नाहीत ? भारत हे काय हिंदुराश्ट्रा आहे ? आणि त्याचे बुद्ध राष्ट्र बनवायचे आहे ?

आपला देश सेक्युलर राहिला पाहिजे आणि ते धर्मराष्ट्र बनता कामा नये . मग तो धर्म कोणताही असो . धरमगिरी चालणार नाही . आपल्या देशाचे संविधान हीच आपली स्मृती आहे , कुराण आहे , बायबल आहे . आणि ते तसेच राहिले पाहिजे .

असो मला या वितंडवादात पडायची इच्छा नाही . धर्म म्हण्जे काय ? त्याची व्याख्या काय ? धर्माचे इंटर्प्रिटेशन कसे करावे ? यापेक्षा अनेक महत्वाची कामे अजून बाकी आहेत .

पण एक मात्र नक्की नास्तिक अभिरामला देव मान्य नाहित. धर्म हि नाही . (कम्युनिझम हा पण एक धर्मच आहे ). माझा देश हा माझ्यासाठी देव आहे . आणि भारताचे संविधान हा धर्म ग्रंथ .

परंपरेच्या जोखडातून मुक्ती मिळाली पाहिजे . आणि बौद्ध होऊन जर ती मिळणार असेल तर ते समर्थनीय ठरते . मात्र तो धम्मस्वीकार आहे का ?

७ डिसें, २०१३

चैत्यभूमी - शिवाजी पार्क . बाबासाहेबांना वंदन करायला

आज दादरला गेलो होतो . रमलो तिथे .

 चैत्यभूमी - शिवाजी पार्क . ६ डिसेंबर  

 बाबासाहेबांना वंदन करायला जनसागर लोटला होता . लाखोंचा . फ़ोटो विकले जात होतेच पण त्याहून महत्वाच म्हणजे शाहिरी जलसे करणार्या पाच दहा उत्साह मुर्तिंचे अनेक ग्रुप प्रबोधन जलसा - पथनाट्य करत हिंडत होते . यात बहुसंख्येने नवबौद्ध आणि मराठि असले तरी तामिलनाड , मध्य प्रदेश , गुजराथ आणि ऊत्तर प्रदेशातूनही सर्व जातीचे  लोक आले होते . पाहून बर वाटल . बाबासाहेबांचे व्यक्तित्व  आणि लहान  प्रमाणात का होईना पण  त्यांचा विचार भारतभर पसरतोय हे चित्र आशादायी आहे . भरपूर भटकलो . फेसबुकवरचे अनेक दोस्त प्रत्यक्षात भेटले … थोडेथोडके नाही … कमीत कमी साठ - सत्तर लोकांनी अभिराम म्हणुन हाक मारून बोलावलं . मी पण पाच पन्नास लोकाना हाक घातली . युवकांची पथनाट्य आणि गाणी ऐकली , सोबत आमचे बडे भाय मोहिते सर होतेच .

मी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेऊ शकलो नाही. खच्चाखच जाम लाइन प्लाझा च्या पुढे होती म्हणे … युवराज सरांचा शिवसैनिक दोस्त आतपर्यंत व्ही आयपी गाडी ऑफर करत होता … पण स्मृतीशिल्पे पहाण्यात रस नव्हताच मला . तिथे तर लई वेळा गेलोय . पुन्हा जायला हा काही मुहूर्त नव्हता . आलेल्या जनासागाराच दर्शन अधिक महत्वाचे वाटत . 

व्ही आयपी गाडीतून दर्शनाला काही गेलो नाही . 

शाहिरी जलसे , गाणी , आलेली माणस पहात आणि त्यांचे संवाद ऐकत गर्दीतच रेंगाळत बसलो .बाबासाहेबांचे खरे दर्शन किंवा खरी भेट … खरी गळा भेट या गर्दीत असते . 




वैभव आमचा  जिगरी दोस्त मात्र गावला नाही कारण त्याची तब्येत बरी नव्हती . पण सिद्धार्थ भेटला - दाभोळकरांवर मस्त पथनाट्य बसवलं होत त्यांनी . एका चुणचुणीत पोरानि तर धमाल उडवून दिली . त्या आंबेडकरी गर्दीत अनेक ठिकाणी दाभोळकर - त्यांचे फ़ोटो दिसले … पण दाभोळकरांचे विरोधकही दिसले . सिद्धार्थ मोकळेच्या पथनाट्यावर टिका करायला     बामसेफी  आले होते . भट दाभोळकरांचे  नाव आंबेडकरांबरोबर घेणे हा त्यांना बाबासाहेबांचा अपमान वाटत असावा ! सिद्धार्थ ने सडेतोड समारोप केला ………… बाबासाहेब आंबेडकरांनि जातिअंताचा विचार दिला , विज्ञान निष्ठेचा विचार दिला …. या मार्गावर जे असतील ते आमचे आहेत .

महाराष्ट्रात घडलेल्या जातीय अत्याचारांचे -  एत्रोसिटिचे प्रदर्शन हि लावले गेले होते . आमचे  मित्र सुनील गजाकोशानी पोस्टर डिझाईन बनवले होते. पांढर्या पोस्टरवर काळी अक्षरे . बस्स … चाळिस  सनातनी खुनांचा आणि सरंजामी बलात्कारांचा पोस्टरवर उल्लेख होता . त्यात खैरलांजी असेल … वाल्मिकी समाजाच्या तीन तरुणांची केलेली हत्या असेल . 

का ? का? का? 

तर हुच्च वर्णिय मराठ्याच्या पोरीशी लग्न केले म्हणुन …कार्यकर्ते सगळीकडे भेट देऊन आलेले . आयटीत काम करणारे उच्च शिक्षित . त्यांच्या स्मार्ट फोन मध्ये घडलेल्या घटनांचे फ़ोटो होते. वर्तमान पत्रातील कात्रणे होती . 

मी विचारले " पोस्टर पांढर्या वर काळे का ? फोटो का नाही टाकले ?

उत्तर मिळाले…. त्या कार्यकर्त्यांनी दिलेले उत्तर होते …. .
भावना भडकावून काही होणार नाही . हे फ़ोटो प्रदर्शनात टाकायच्या लायकीचे नाहीत . आम्ही अत्याचारांचे फ़ोटो टाकणार नाही । पण त्याबाद्दल जागृती करूच करू … आम्हाला समाजाचा फ़ोटो बदलायचा आहे…आणि तेव्हा । त्यावेळी … तिथेच । मला बुद्ध दिसला .






शिवाजी पार्क ची स्थानिक हुच्चभ्रू जनता बहुतेक १ २ ते ३ … ३ ते ६ … ६ ते ९ चे पिक्चर बघायला गायब झाली होती . घरे आणि उरलेली रिकामी माणसे …हिंदु कोलनी  जराशी उजाड वाटत होती . शिवशक्ती - भीमशक्तीची  टेबली राजकीय घोषणा करणारे नेतागण फिरकले हि नाहीत

काही शिव सैनिक पण बाबा साहेबांचे पोस्टर आणि विचार बोलत होते .  कवीमित्र  तांबे डोक्क्टर , उकळता गणेश चव्हाण , गायकवाड , धमाल कांबळे आणि… ज्यांची मते पटत नाहीत अजाबात पण… माणुस म्हणुन दिलदार असलेले जमाते इस्लामीचे भाइजान … आमचे जुने दोस्त नौशाद उस्मान सुद्धा भेटले . ते त्यांना उपयुक्त ठरतील ती पुस्तके खरेदी करायला आले होते . गळाभेट घेतली. बाबासाहेब मेल्यानंतरहि अनेकांची गळाभेट मिठी घडवून आणतात .

 महामानवास अभिवादन श्रद्धांजली पुण्यस्मरण वगैरे म्हणणार नाही .
 कारण भीमराव माझ्यासाठी सुपर मेन नाही . रियल मेन आहे . 

बाबासाहेबांना गळाभेट . जय भीम !


.
अभिराम दीक्षित

२६ नोव्हें, २०१३

तटस्थ पणा भूमिकेत असतो बच्चमजी … प्राण्यांच्या संख्येत नाही ।

१० वि ११ वि एवढेही सामन्य ज्ञान नसणार्या पोट्ट्यानि ट्याग मारावा … खाली पिली काय पिन फालतू प्रश्न विचारावा आणि आम्ही त्यांचे प्रामाणिकपणे शंका निरसन करावे … एव्हढे सारे झाले कि आमचे हेतूच मुळात भ्रष्ट आहेत असेही ऐकून घ्यावे … इस्स्कू बोलते फेसबुक . आम्हाला ट्याग मारून अशाप्रकारे प्रश्न विचाराले जातात 

पोट्टा : काय बे तू शेकुलर ना मंग जिराफ़ांबद्दल च का बोलतोस ? झेब्र्यांबद्दल का नाई बोलत ?







आम्ही : त्याच काय हाय कि झेब्रे जरा मोठे असत्यात म्हून त्यांच्याबद्दल आधी लिवलय

पोट्टा: मंग हि घे उदाहरण … झेब्र्यान मांजि गाजर खाल्ली , मुळे खाल्ले इ इ
आम्ही : असेल मंग

पोट्टा : एकाचवेलि सर्व प्राण्यांबद्दल बोलला पायजेल मंगच तू शेकुलर
आम्ही : एकाच वेळी सर्वांबद्दल कसा बोलता यील ?

पोट्टा : नाय नाय - काय पिन चालणार नाई … कुटल् बी वाक्य बोलण्या अगुदर मुंगी पासून दाय्नोसोर पर्यंत सर्व प्राण्यांची नाव घ्याय्ले पायजेल
आम्ही : कसा शक्य आहे ?

पोट्टा : मंग कसला रे तू शेकुलर ! मंग कसला रे तू तटस्थ ! ( मनात : कशी जिरवली बच्चमजी !)

आम्ही : सगल्या प्राणी लोकांबद्दल एकदम बोललो तर तटस्थ होय रे ? एकाच प्राण्याबद्दल तटस्थ भूमिका घेऊ शकत नाही ?

तटस्थ पणा भूमिकेत असतो बच्चमजी … प्राण्यांच्या संख्येत नाही ।

नाय तर उद्या बोलशिला कि मंगल ग्राहवरल्या प्राण्यांचे अपराध तुला दिसे नाय … अहो हि मानवी भाषेची पाद्धत आहे। तर्क संगतीची पद्धत आहे .


पोट्टा : आता कसा धरला …. बघ मी म्हनलो व्हतो कि नाय … तुले झेब्र्यांचे अपराध दिसत नायत … साला आंधला खविस ।

आम्ही : अहो मी मागे म्हटलो होतो ना … कि प्राणि संग्रहालयच बंद करून टाका … आणि सगळ्यांनी माणुसकीचा धर्म पाळा

पोट्टा : हे तू जिराफ़ांनाच का सांगतोस ?

आम्ही : अहो मी प्राणिसंग्रहालय हा शब्द्द वापरला होता . त्यात सगळे येतात

पोट्टा : त्यावेळी पण तुमच्या मनात जिराफच असतात… कसा पकडला चोराला

आम्ही: ठिक आहे यापुढे मी प्राण्यांबद्दल बोलणारच नाय … हाय काय आणि नाय काय । चल आपण नदी बद्दल बोलू

पोट्टा : बघ मी म्हणालो व्हतो कि नाय । तू झेब्र्यांच्या बाजूचा हायस … झेब्रे नदीवर पाणी पित्यात म्हून तू नदीबद्दल बोलतो … कसा पकडला भामट्याला …

आम्ही : होऊ दे खर्च

७ ऑक्टो, २०१३

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?
 (मला समजलेले गांधीजी  भाग २ )

******************************************************************************************************************************************************************
संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची  दहावी  आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत  या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे  वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे.  द न गोखले यांचे डॉ आंबेडकरांचे अंतरंग हे हि पुस्तक संदर्भ म्हणून वापरले आहे .
******************************************************************************************************************************************************************


गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष अटळ होता . एक दलितांचा नेता आणि दुसरा सवर्ण हिंदुंचा पुढारी यात गुलुगुलु गुलाबी  ऐक्य शक्य नव्हते . त्याला सामाजिक कारणे जवाबदार होती .  हा संघर्ष कधी निर्माण झाला ? कसा निर्माण झाला ? कसा वाढत गेला ? आणि कधी संपला ? हे आपण प्रस्तुत लेखात पहायचे आहे .
 आजच्या दलितांनी गांधिंचा द्वेष करण्याचे कारण नाही आणि सवर्णांनी आंबेडकरांचा किंवा आजच्या दलितांचा राग धरू नये .म्हणुन हि धडपड.

  हिंदु महासभा हा हिंदुंचा पक्ष म्हणणे तत्व म्हणुन ठिक आहे . पण लोकशाहीच्या राजकारणात हा एक जोक ठरत असतो  . ज्याला लोक मते देतात तो पक्ष त्या समाजाचा असतो .   सवर्ण हिंदुंनि फ़ाळणिपुर्वि आणि फ़ाळणिनंतरहि गांधिबाबाच्या कोग्रेसला मते टाकलि होती. तत्कालीन सवर्ण हिंदुंचा पुढारी - लोकनियुक्त पुढारी गांधी होता .


आंबेडकर गांधिंकडे सवर्ण हिंदुंचा नेता म्हणुनच पहात होते . तत्कालीन हिंदुंच्या हृदयावर गांधीच राज्य करत होते.  हे सत्य एकदा मान्य केले कि पुढे जाता येईल . आंबेडकरांचा प्रश्न वेगळा होता. दलित समाजातल्या एका घटकाने त्याकाळी त्यांना पुढारी मानले होते    . त्या काळाचा विचार आंबेडकरांनि राजकारणात प्रवेश करण्या आधीपासून केला पाहिजे. आणि त्या आधी परिस्थिती,  अनुभव,  वाचन आणि  विचार करून माणुस सतत बदलत जात असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे .



महाडचा धर्म संगर : फक्त गांधिजिंचि तसबीर 

चवदार तळ्यासाठी केलेला सत्याग्रह हि बाबासाहेबांच्या संघर्षातलि पहिली मोठी लढाई . २५ डिसेंबर १९२७ रोजी ह्या लढ्याला आरंभ झाला. ७ - ८ हजार माणसे जमली होती . मंडपात येताना शिवाजी महाराज कि जय ! आणि गांधीजी कि जय ! अशा घोषणा देण्यात येत होत्या .  यावेळी मंडपात फक्त एकाच नेत्याची तसबीर विराजमान होती - गांधीजी ! (खैरमोडे ३ - १५९ )




आपल्या तडाखेबंद भाषणात बाबासाहेब म्हणतात -

 " चवदार तळ्याचे पाणि प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही . आजपर्यंत ते प्यायलो नव्हतो तेंव्हा काही मेलो नव्हतो . इथे आम्ही पाणि पिण्यासाठी जमलेलो नाही . आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी जमलो आहोत. हि सभा समतेची आहे ...

हिदू समाज समर्थ करायचा असेल तर चातुर्वण्य व असमता यांचे उच्चाटन करून हिंदु समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारण्याचा मार्ग हा हिंदु समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणुन मी म्हणतो - कि आपले कार्य जितके स्वहिताचे आहे , तितकेच राष्ट्र हिताचे   आहे . ….  हि सभा हिंदु समाजाचे संघटन करण्यासाठी बोलावली आहे. "  (बहिष्कृत भारत ३-२ - २ ७ )

या काळात बाबासाहेब गांधी आणि गांधिविचार दोन्हीही मानत असलेले दिसतात.  माहाडच्या धर्म संगराला बाबासाहेबांनी सत्याग्रह म्हटले होते . हे हि ध्यानात ठेवले पाहिजे . " सत्याग्रह हि विचारसरणी आम्ही गीतेतून घेतली असून . गीता हा धर्म ग्रंथ म्हणुन आम्हाला मान्य आहे " - बाबासाहेब (बहिष्कृत भारत - २५ - ११ - २ ७ ). याच परिषदेत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली .

१९ २ ७  सालीच बाबासाहेबांनी दादरच्या गणेशोत्सवात भाषण केले होते . आणि विरोधकांच्या बंदोबस्तासाठि खिशात पिस्तुल बाळगले होते! (खैरमोडे २ - १ ४ ९ )

हिंदु राहून समता प्राप्त करणे आणि त्यासाठी लढा देणे हे आंबेडकरांचे धोरण १९ २ ७ साल पर्यंत स्पष्ट दिसते आणि हिंदु पुढारी - गांधी हे आपले विरोधक आहेत असे आंबेडकरांना त्याकाळी वाटत नव्हते हे हि स्पष्ट होते .

हिंदु समाज समर्थ आणि संघटित करण्याची मनीषा आंबेडकरांनि या काळात अनेकदा बोलून दाखवली आहे.


काळाराम ते सायमन : ठिणगी पेटली  

काळा राम मंदिर प्रवेशासाठी अस्प्रुश्यांचा संघर्ष चालू होता. त्यावेळी आंबेडकरांनि गांधिंना सवाल केला होता - " मंदिर प्रवेशाचा प्रश्न मिटल्या नंतर जेंव्हा अस्पृश्य लोक जातीच्या आणि चातुर्वणाच्या उच्चाटनाचा प्रश्न हाती घेतील . तेंव्हा महात्माजी कोणाच्या बाजूने उभे राहतील ? "

हा सवाल फक्त गांधीना नव्हता. पुर्या हिंदु समाजाला होता.

गांधीजी उत्तरले - " मी मानत असलेल्या हिंदु धर्मात उच्च नीचता नाही पण डॉ आंबेडकरांना वर्णाश्रमाशि झगडा करायचा असल्याने मी त्यांच्या पक्षाला राहू इच्छित नाही. कारण वर्णाश्रम हा हिंदु धर्माचा अभिन्न भाग आहे, अशी माझी श्रद्धा आहे . "  (कीर - २ ३ ९ )


गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष इथून सुरु होतो.





(सनातनी हिंदु धर्माला डांबर फासत आहेत . गांधीजी ते कष्टाने   पुसू पाहत आहेत आणि आंबेडकर त्याचा पाया असलेल्या वर्ण व्यवस्थेवर हातोड्याने घाव घालत आहेत.  ब्रिटीश लांबून मजा बघत आहेत- तत्कालीन व्यंगचित्र ) 



सायमन आयोग : 

 हा आयोग भारताला कोणत्या बाबतीत स्वायतत्ता द्यावी याचा विचार करण्यासाठी होता . बहुतेक सर्व राजकीय पक्षांनि त्याला अनेक मर्यादा आहेत म्हणुन विरोध केला . बहिष्कार घातला . आंबेडकरांनि मात्र सायमन आयोगाला सहकार्य केले आणि त्याला एक लांबलचक निवेदन नेउन  दिले . का ? हा आंबेडकरांचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी द्रोह होता का ? काय होते त्या निवेदनात ?  या प्रश्नांचि  उत्तरे  पहाण्या आधी एका घटनेची नोंद केली पाहिजे .




सायमन गो ब्याक ! म्हणत आंदोलन करताना लाला लजपत राय यांच्या छातीवर ब्रिटिश पोलिसी दंडुके बसले. त्याबद्दल ७ डिसेंबर १ ९ २ ८  च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात श्रद्धांजली वाहताना बाबासाहेब म्हणतात - " लाला लजपत राय यांनी राजकारण आणि समाजकारण यात फारकत करून  आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही .त्याकाळी  लालाजिंचा आर्य समाज मुस्लिमांच्या आक्रमणापेक्षा जातीभेदादि हिंदु समाजाच्या अंतर्गत दोषांकडे अधिक लक्ष पुरवत असे . अस्पृश्यांच्या चळवळीबद्दल लालाजिंचि सहानुभूती कळकळीची होती  "

१ ९ २ ७  ते ३ ०  या काळात बाबासाहेबांच्या विचारात बदल घडू लागलेला दिसतो . त्यांना अजून हिदू समाजाकडून आशा आहे पण गांधिविरुद्ध मत बनू लागले आहे . ठिणगी पेटली आहे .



******************************************************************************************************************************************************************
विभक्त  मतदार संघ म्हणजे काय ?

भारातात सध्या जी लोकशाही आहे त्यात संयुक्त भौगोलिक मतदार संघ   आहेत . काही जागा मागास उमेदवारांना राखीव आहेत . पण प्रत्येक उमेदवारासाठी सर्व जाती धर्माचे लोक मत देतात . त्यामुळे निवडणुकीतल्या उमेदवाराला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. 

विभक्त  मतदार संघ म्हणजे काही जातीना वेगळे मतदार संघ . आजच्या पदवीधर  मतदार संघात  ज्याप्रमाणे पदवीधर उमेद्वरांसाठि  केवळ पदवीधर च  मतदान करतात त्याप्रमाणे - दलित उमेदवारासाठी केवळ दलितांनी मतदान करणे म्हणजे - विभक्त मतदार संघ. 
******************************************************************************************************************************************************************


ब्रिटिशांना दिलेल्या सायमन कमिशनच्या निवेदनात बाबासाहेब लिहितात  -

" १ ) आज अस्पृश्य समाजाच्या समस्या वेगळ्या असल्याने ते हिंदु समाजापासून वेगळे आहेत
२) मात्र अस्पृश्यांसाठी मागितलेल्या मागितलेल्या सवलती तात्पुरत्या आहेत . सर्व भारत शेवटी एका व्हावा . " (गोखले १ १ ८ )
या काळात आंबेडकरांनि विभक्त  मतदार संघाला कडाडून विरोध केलेला आहे. आणि राखीव जागा मागितलेल्या आहेत .   

निवेदनात बाबासाहेब म्हणतात - विभक्त मतदार संघ हे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. विभक्त मतदार संघात निवडुन गेलेले उमेदवार सभागृहात सर्वांसाठीच कायदे करतात . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांबद्दल कायदे करण्याचा हक्क विभक्त मतदार संघातल्या उमेदवारांना मिळतो . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांवर राज्य करणे हि कुठली लोकशाही ?  ( Dr Ambedkar Writings and Speeches. Vol 2 pg 344 - 366, 1982)


ह्या निवेदनात बाबासाहेबांचा लोकशाहीवाद आणि राष्ट्रवाद अनेकवार व्यक्त झाला आहे . पण सायमन शी सहकार्य केले म्हणुन त्याकाळी बाबासाहेब देशद्रोही असल्याची चुकीची   टिका कोंग्रेसि वर्तमान पत्रांनी केली होती .






गोलमेज परिषद : वणवा पेटला 


सायमन आयोगापुढे ३७ दलित संघटना गेल्या होत्या.  त्यापैकी ३५ संघटनांनि विभक्त मतदार संघांचि मागणी केली होती .  आंबेडकरांनि आपले वैयक्तिक मत बाजूला ठेवत पुढे लोकमताला मान दिला . (खैरमोडे ४ - १ ४ १ . १ ४ २ ) आणि गोलमेज परिषदेत  बाबासाहेबांनी दलितांना विभक्त मतदार संघ मागितले .  लोकमताच्या रेट्यात बाबासाहेबांनी बदललेला हा निर्णय आहे . 

इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत . जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधीबाबा बद्दल हि खरे आहे.




******************************************************************************************************************************************************************

प्रौढ सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय ?

ब्रिटिश राजवटीत हि निवडणुका होतच होत्या पण मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता. ठराविक जमीन ठराविक शिक्षण असलेलेच लोक मतदान करू शकत .  या गाळण्यांमूळे बहुसंख्य दलितांना मतदानाचा हक्क मिळत नव्हता आणि त्यामुळे राखीव जागांवरुन निवडुन जाणारे दलित उमेदवारही सवर्णांचे  चमचे असत. 

प्रौढ मताधिकार म्हणजे १८ / २१  वर्षे वयाच्या सर्व भारतियांना मतदानाचा अधिकार असणे .  प्रौढ माताधीकारात सर्व दलितांनाहि  मतदानाचा हक्क मिळतो आणि अस्पृश्य  हिताबद्दल जागरूक असणारे उमेदवार निवडुन जाणे सोपे होते , असे आंबेडकरांचे मत होते .

******************************************************************************************************************************************************************


स्वत:चे विभक्त मतदार संघाबद्दलचे प्रतिकूल मत राजकारणी आंबेडकरांनि बदलले . गांधिंमधल्या अट्टल राजकारणी पुरुषा बद्दल तर कोणालाच शंका नाही !  राजकारणात स्वत:च्या लोकांचा अनुनय करावा लागतो . हा लोकशाहीचा साइड इफ़ेक्ट आहे !

गांधीनी सवर्णांच्या भावना बोलून दाखवत दलितांच्या विभक्त मतदार संघाला विरोध केला असे काहिंना वाटते.  प्रौढ मतदानाचे नाव सुद्धा नसताना केवळ उच्चशिक्षिताना मतदानाचा अधिकार असताना - आंबेडकरांची नवी  मागणी चुकीची  होती असे म्हणता येणार नाही. पण जर दलितांना विभक्त मतदार संघ दिले तर उद्या सर्वच जाती स्वत:चे वेगळे मतदार संघ मागतील -प्रत्येक जात स्वत:चे उमेदवार निवडुन देऊ लागली तर - उमेदवारांना सर्वसमावेशक भूमिका घेण्याची काहीच गरज उरत नाही  त्यामुळे जातीवादी  उमेदवारच निवडुन येतील आणि ते देशाचे तुकडे पाडतील हि गांधिजिंचि भीती हि अनाठाई  नव्हती.

गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष पेटु लागला आणि त्यातच उभयतांचि भेट ठरली.




वादळी भेट आणि जळते उद्गार  


इथे एका विनोदी गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे . हि भेट संपेस्तवर आंबेडकर हे अस्पृश्य समाजातले आहेत हेच गांधीना माहित नव्हते. (कीर १८०)  गांधीजी आंबेडकरांना पुण्याचे पुरोगामी ब्राह्मण समजत असत ! आंबेडकरांच्या शैक्षणिक डिग्र्यांकडे पाहून गांधिंनि हा ग्रह करून घेतला होता कि आंबेडकर या ब्राह्मण आडनावामुळे गांधिंचा तसा ग्रह झाला होता ते सांगता येत नाही . ( आं - बा -व -डे -क -  र हे मुळ नाव बदलून त्यांच्या एका प्रेमळ ब्राह्मण गुरुजीने आंबेडकर असे स्वत:चे नाव दफ्तरी लावले होते. आंबेडकरांनि तेच पुढे कायम ठेवले)

पण गांधिंचा समज आंबेडकर हे एक पुरोगामी ब्राह्मण गृहस्थ आहेत असा होता! आणि पुरोगामी ब्राह्मण हा प्राणि राजकारणात फारशी किंमत द्यायच्या लायकीचा नसतो ! कदाचित यामुळेच या भेटीत गांधिंच्या अजब पुर्वग्रहामुळे मोठे नुकसान झाले असे मानायला जागा आहे ! आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांनी गांधी भानावर आले आणि ते अस्पृश्य समाजातले आहेत काय ? अशी सहकार्यांकडे विचारणा केली .


कादाचित हा  -  पुरोगामी ब्राह्मण कशापाई नसती उठाठेव करतो आहे ? कशासाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या लष्कराच्या भाकरी भाजतो आहे ?    अशा भावनेतून गांधीनी भेटीची सुरवातच थोडी कडक केली. आंबेडकरांचि पार्श्वभूमी माहित नसल्याने  - कोणत्या परीस्थित आणि दबावात हा निर्णय घेतला हे गांधिंना कळलेले नसणार . सुरवातीला  त्यांनी आंबेडकरांकडे चक्क दुर्लक्ष केले आणि दुसर्याच कोणाशीतरी सुत कताइबद्दल बोलू लागले. थोड्या वेळाने गांधी  म्हणाले " आंबेडकर तुमचा जन्म व्हायच्या आधीपासून मी अस्पृश्यांसाठी काम करतो आहे . (तेंव्हा मला शहाणपणा शिकवू नये ! ) कोग्रेसने अस्पृश्यांसाठी विस लाख रुपये खर्च केलेले आहेत.

अशाप्रकारच्या बोलण्याने आंबेडकर चांगलेच व्यथित झाले असणार.  त्यांनी चिडून गांधिंना खडे बोल सुनावले शेवटी म्हणाले " ज्या देशात आमच्या समाजाला कुत्र्यापेक्षा वाइट वागणुक मिळते त्या देशाला मी मायभूमी म्हणु शकत नाही , गांधीजी मी पुन्हा सांगतो - मला मायभूमी नाही !"

या वादळी भेटीमुळे - गांधिंच्या दुर्लक्ष करण्यामुळे आणि आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांमुळे या दोनही महान नेत्यात तयार झालेला व्यक्तिगत दुरावा बराच काळ टिकला.





पुणे करार : कौन जिता … कौन हारा 


आंबेडकरांनि  विभक्त मतदार संघांचि मागणी सोडुन द्यावी म्हणुन गांधिजिंनि उपोषण सुरु केले. ज्याच्या मागे जवळजवळ सारा सवर्ण समाज आहे त्याचा मृत्यू झाला तर गावोगावच्या अस्पृश्यांना काय झेलावे लागले असते ? आंबेडकरांसमोर पुणे करारावर  सही करण्याशिवाय कोणता पर्याय होता ?

ताणलेले दोर 

पण त्या आधी एका भानगडिचा वेध घेणे आवश्यक आहे. ती भानगड म्हणजे राजा - मुंजे करार होय . एम सी राजा हे एक अस्पृश्य पुढारी होते . राजा आणि त्याच्या सारख्या इतर अस्पृश्य पुढार्यांच्या दबावामुळेच आंबेडकरांना आपली मुळातली सायमन कमिशन समोरची भूमिका बदलत विभक्त मतदार संघाना पाठिंबा द्यावा लागला होता . हेच राजा आता गटबाजीचे राजकारण खेळले . आणि स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी त्यांनी डॉ मुंजे या हिंदु महासभेच्या पुढार्याबरोबर एक करार केला. या करानुसार अस्पृश्यांना विभक्त मतदार संघ नको . वाढीव राखीव जागा हव्या अशी मागणी केली !

आता आंबेडकरांसमोर मोठा पेचप्रसंग होता . महाराष्ट्रातल्या महार समाजाचा पुर्ण पाठिंबा आणि मराठि दलीतात बर्यापैकी वजन या  आंबेडकरांच्या जमेच्या बाजू असल्या तरी अखिल भारतीय पातळीवर त्या क्षणापर्यंत तरी  आबेडकर हे सर्व दलितांचे एकमुखी नेते नव्हते .  अखिल भारतीय पातळीवर दलितांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना राजा सारख्या अंतर्गत गटबाजांबरोबर हि राजकाराण भोगावे लागत होते . पंचाइत अशी कि राजा मुंजे करार मान्य केला तर आंबेडकरांनि राजाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य केलेले आहे आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व अधिकार राजा कडे आहेत असा सरळ अर्थ निघत होता . राजा आणि मुंजेंचि तीच राजकीय चाल होती . आता आबेडकरांना चटकन विभक्त मतदार संघाची मागणी सोडणे अशक्य झाले . राजा सारख्या गटबाज व्यक्ती च्या हाती राष्ट्रीय दलित चळवळीची सूत्रे देण्याचा गलथान पणा आंबेडकर करणे शक्य नव्हते.

त्यामुळे आंबेडकरांनिहि विभक्त मतदार संघाचा मुद्दा ताणून धरला आणि गांधिंना प्राणांतिक उपोषण करण्या पर्यंत परिस्थिती ताणावी लागली.






 तुटलेले बंध 

परिस्थिती विकोपाला जाऊ लागली . गांधिजिंना कोणत्याहि परीस्थित जातीय तत्वावर विभक्त मतदार संघ नको होते . आणि आंबेडकर एका विचित्र राजकीय परिस्थितीमुळे झटकन निर्णय फिरवू शकत नव्हते. गांधिंचि तब्येत खालावू लागली . परिस्थिती स्फोटक बनू लागली. गांधिंचा मृत्यू ओढवला असता तर गावोगाव सवर्ण दलित दंगली पेटल्या असत्या . बाबासाहेबांसारख्या लोकशाहीवादी   नेत्याला  दंगली होणे कदापि मंजुर नव्हते त्यामुळे त्यांनी पुणे करारावर सही केली .

व्यथित होऊन आंबेडकर म्हणाले होते " हे कोंग्रेस वाले माझे राजकीय जीवन संपुष्टात आणतील आणि मग तेच दलितांचे पुढारी होतील " ( खैरमोडे ५ - ३१ )

  पुणे करारावर सही -  हा आंबेडकरांचा राजकीय पराभव होता काय ? त्यांच्या सहकार्यांना तेंव्हा तसेच वाटले आजही आंबेडकर वाद्यांच्या हृदयातली ती एक भळभळति जखम आहे . त्यामुळे मने तुटली आहेत . पण सत्य काय आहे ?


अंतिम विजय कोणाचा ? 

पुणे करारामुळे विभक्त मतदार संघ रद्द झाले आणि संयुक्त मतदार संघ आले असा बर्याच लोकांचा भ्रम असतो . ते खरे नाही . पुणे करारा मुळे संयुक्त आणि विभक्त मतदार संघाचे एक आगळेच फ्युजन जन्माला आले . त्यानुसार -

१) दोन स्तरीय निवडणुक पद्धती आली . अस्पृश्यांनी स्वत:चे चार उमेदवार निवडायचे (विभक्तपणे) आणि त्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या चारपैकी एक उमेदवार (संयुक्तपणे ) निवडायचा. या कलमामुळे सवर्णांचे चमचे निवडुन जाण्याचा धोका आंबेडकरांनि टाळला. आणि खरे पाहता आंबेडकरांचा मुलभुत विचार गांधिंनि मान्य केला. 

२) या करानुसार अस्पृश्यांना १ ८ टक्के राखीव जागा मिळाल्या . (त्या पूर्वीच्या मेकडोनल्ड निवाड्यापेक्षा खूपच जास्त होत्या )

३) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठि वेगळी काढुन ठेवायची रक्कम ठरली यातही आंबेडकरांनि ठरवलेला आकडा ग्राह्य धरण्यात आला .




डॉ  बाबासाहेब आंबेडकर हेच दलितांचे एकमेव राष्ट्रीय नेते आहेत आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व हक्क एकट्या आंबेडकरांना आहेत हि गोष्ट सिद्ध झाली . पुणे करारा नंतर आंबेडकर हे एकमेव  राष्ट्रीय दलित नेते असून एम सी राजा सारखे लोक  केवळ उपट्सुंभ आहेत हे सिद्ध झाले. 

पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा हक्क दलितांसकट सर्वांना मिळाला . शीक्षण , जमीन इत्यादी चाळण्या गेल्या .   त्यामुळे घटना परिषदेचे सदस्य  असलेल्या आंबेडकरांनि स्वतंत्र भारतात एकदाही विभक्त मतदार संघ मागितले नाही .  प्रौढ सार्वत्रिक मतदान आल्याने विभक्त कि संयुक्त हा मुद्दाच उरला नाही . 

गांधिंना जे साध्य करायचे होते ते हि घडलेच -  द्विस्तरीय गुंतागुंतीची निवडणुक प्रक्रिया झाल्याने इतर जाती विभक्त मतदार संघ मागाण्याचा धोका टळला . कारण इतकी गुंता गुंतिचि प्रक्रिया सर्व जातींसाठी लागू करणे अशक्यच होते . त्यातून जातीय फायद्याची गणिते बांधणेहि दुरापास्त होते .

थोडक्यात पुणे करार बरोबरीत सुटला किंवा थोड्या प्रमाणात आंबेडकरांच्याच बाजूला झुकला असे म्हणावे लागते.  स्वातंत्र्यानंतर तर तो प्रश्न पुर्णपणेच आउट डेट बनलेला आहे . कारण सार्वत्रिक प्रौढ मतदान !





 सम्यक पणे विचार बदलणारा - झपाटलेला अभ्यासक : डॉ  आंबेडकर 

बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि विद्वान गृहस्थ होते .  राजकारण - समाजकारण - धर्म कारण याबद्दल ते सतत अभ्यास करत आणि नव्या अभ्यासानुसार - मते बदलत असत  . उदाहरण घायचे झाले तर भगवत गीता या हिंदु धर्म ग्रंथाबद्दल लिहिता येईल .


१) १९ २ ७  सालच्या महाडच्या   संगरात   त्यांनी मनुस्मृती जाळली पण गीता हा धर्मग्रंथ स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही लोकांना मान्य आहे असे ते त्याकाळी  म्हणत असत  .
२)  पुढे धर्मांतराच्या घोषणे नंतर गिता हा पुर्णपणे  मूर्खपणे आणि बाष्कळ पणे लिहिलेला ग्रंथ आहे असे ते म्हणत .
३) धर्मांतरानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले - गीतेत ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बुद्ध धर्मातून उसन्या घेतल्या आहेत . (म्हणजे गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत !)


एकाच ग्रंथाबद्दल व्यक्त केलेली हि मते आहेत . प्रा शेषराव मोरे यांनी त्यांच्या आंबेडकरांवरिल ग्रंथात राजकारण , समाजकारण , इतिहास मिमांसा  या सर्वच बाबतीतल्या बदलत जाणार्या मतांचा आढावा घेतला आहे .






अभ्यासक नवीन माहितीनुसार मते बदलत जातोच . पण आंबेडकरांचे सामाजिक धोरणही त्यांची धर्म मिमांसा आणि इतिहास मिमांसा बदलते. जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत ते गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना   परिषदेत  दाखल   झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड  बिल  पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी त्यांनी गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले .

समता आणणे आणि लोकशाही रुजवणे  हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी धर्म मिमांसा आणि इतिहास मीमांसा लिहिली , त्यात वेळोवेळी बदल केले , कारण त्यांना इतिहास केवळ लिहायचा नव्हता तर घडवायचाहि होता .


स्वत:ची मते बदलण्याचे स्वातंत्र्य जर आंबेडकरांना आहे तर गांधिंना का नाही ?



परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी 

परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी

गांधीजी हे आंबेडकरांप्रमाणे विद्वान , अभ्यासक किंवा संशोधक निश्चितच नव्हते . पण त्यांना उभ्या देशाबद्दल कळकळ प्रेम आणि जिव्हाळा होता . दलितांचे भले करणे हा गांधिंसमोरचा एकमेव कार्यक्रम कधीच नव्हता पण उच्च निचतेला आणि मुख्यत: अस्पृश्यतेला त्यांचा विरोध पहिल्या पासून होता . त्याला गांधिंनि कमी महत्व दिल-  हा आरोप खोटा म्हणता येणार नाही . पण गांधी म्हणजे अस्पृश्यांच्या जिवावर उठलेला सैतान निश्चितच नव्हे.

गांधीही स्वत:ची मते अगणित वेळा बदलत आलेले आहेत . मी हिमालया  एव्हढ्या चुका केल्या आहेत असे गांधिंनि अनेकदा म्हटले आहे .







कधीकाळचा चातुर्वणाचा समर्थक गांधी । यापुढे मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच हजार राहीन अशी अट ठेवतो .। आणि राउंड टेबलाची नीती पुढे घटनाकारांना सन्मान देण्यापर्यंतही बदलते । बाकी गांधिंचि मते बदलत गेली आणि बाबासाहेब कायदामंत्रि (पहिल्या) मंत्रिमंडळात होण्यामागे गांधी होते   ।  पहिल्या घटनेपरिषदेवर बाबासाहेब लीग च्या पाठिंब्यावर गेले होते । ती परिषद पुढे रद्द झाली आणि फ़ाळणिनंतर जी नवी घटनापरिषद आली त्यावर बाबासाहेब जाताना गांधिंनि पाठिंबाच दिला होता . कोग्रेसच्या पाठिंब्या  शिवाय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होणे शक्य नव्हते … आणि आंबेडकरांसरखा विद्वान कायदा पंडित हातचा घालवायला गांधिजिहि मूर्ख नव्हते .

सुरवातीला गांधी सनातनी आणि चातुर्वणाचे समर्थक आहेत असा अर्थ निघू शकेल अशी पुष्कळ वचने गांधिंच्याच साहित्यातून काढुन दाखवता येतील . पुढे मात्र . गांधिंनि त्यांचे विचार बदलले आणि हिंदु धर्माच्या सर्व स्मृतींचे आणि धर्म ग्रंथांचे पुनर्लेखन करावे आणि स्त्रिया आणि शुद्र यांवर अन्याय करणारा भाग त्यातून काढुन टाकावा असे स्पष्ट मत गांधिंनि व्यक्त केले . ( म. गांधी आणि समाजसुधारणा - आकलन . नरहर कुरुंदकर)

हिंदु राहून समता प्राप्त करण्याचा हा  गांधी विचार आहे . हा विचार १ ९ २ ७  सालच्या आंबेडकरांच्या विचारासारखाच आहे.







गांधीच्या अर्धनग्न धार्मिक फ़किरिपेक्षा आंबेडकरांचे सुटा बुटात राहणे आणि त्यांचा आधुनिक विचार मला अधिक भावतो पण ....

सुस्पष्ट , लोजिकल , तर्कशुद्ध विचार करणारा माणुस उभ्या भारताचा नेता बनणे अशक्यच होते. या देशाची विविधता समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरिपणा जितका संकिर्ण (Complex ) होता तितकेच गांधिंचे व्यक्तिमत्व हि संकिर्ण होते.

 भारतासारख्या अनेकपदरी देशात राजकारण करायचे झाले तर मायावतिलाहि शेवटी सर्वजन हिताय अशी घोषणा द्यावी लागते हे विसरून चालणार नाही . गांधीना सर्वोदय हवा होता . पण अंत्योदय हे त्याचे सूत्र होते . सर्वांच्याच डोळ्यातले अश्रू पुसण्याची गांधिंचि महत्वकांक्षा आहे . पण अंत्यजाच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हि त्याची पहिली पायरी आहे .  गांधी हे मुख्यत: राजकीय नेते आहेत पण त्यांनी समाजकारण झटकून टाकलेले नाही . त्यांची धर्माची परिभाषा , हरिजन वगैरे संकल्पना माझ्यासारख्या नास्तिकाला पचणार्या नाहीत पण गांधिंचा उदारमत वाद भारताला थोड्या बहुत प्रमाणात का होईना जोडू शकला हे नाकारता येत नाही .




समारोप 

घटनेचा साचा बनवून बाबासाहेबांनी ह्या देशाचा मनु  पालटला . गांधिच्या पाठिंब्या शिवाय हे शक्य नव्हते . देशाचे भविष्य कसे चालावे याचा ढाचा आंबेडकर तयार करतात आणि त्यांच्या नियुक्तीला गांधिंचा पाठिंबा असतो . तेंव्हा मुख्य वाद मिटलेला असतो. हा देश सनातनी विचारांनी चालणार नाही … आधुनिक राज्यघटनेनुसार चालेल अशी ग्वाही मिळालेली असते .   . बाकी थोडेबहुत मतभेद सगळ्याच माणसात असणार आणि ते नैसर्गीकही आहे .

गांधी आंबेडकर मुख्य वाद आणि संघर्ष इथे संपतो .

तरीही या दोन महान भारतीय नेत्यांत कधीही मनोमिलन झाले नाही हि भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे .

गांधी सवर्ण हिंदुचे नेते होते पण अस्पृश्यांचे दुश्मन नाही . आंबेडकर दलित समाजाचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे घटना परिषदेतील काम , हिंदु कोड बिल , कायदा मंत्रि म्हणुन केलेले काम हे सर्व देशासाठी होते . एक अर्थशास्त्री म्हणुन आंबेडकरांचा रिझर्व बेंक ऑफ इंडिया च्या पायाभरणीत मोठा वाटा आहे . हे काम सर्वच देशासाठी आहे . त्या अर्थाने आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत .

स्पृश्य - अस्प्रुश्यांचा संघर्ष जटिल होता . अस्पृश्यांची अस्मिता जागी करणे - अन्याया विरुद्ध लढणे - स्वत:चे न्याय्य हक्क मागणे आवश्यक होते. हे काम आंबेडकरांनी केले . त्याचवेळी अस्पृश्यांना त्यांचे हक्क देऊन टाकण्यासाठी सवर्णांचि मानसिकता तयार करणे आवश्यक होते . गांधिंनि तेच काम टप्प्या टप्प्याने केले . हे कामही अतिशय अवघड होते आणि आवश्यकही होते .

त्या दोघात एकमत दुर्दैवाने  झाले नाही म्हणुन आजही तो भांडण  वारसा चालू ठेवणे वेडेपणाचे आहे .

(क्रमश:)

-------------------------------------------------------------------------------------------------------------
मला समजलेले गांधिजी या मालिकेतील पुढील भाग : - 

भाग ३) पुस्तकांपलिकडचे गांधी : (आगामी )   



५ सप्टें, २०१३

मुसलमान विकणे आहे : सहा रुपये साठ पैशाला एक

मुसलमान विकणे आहे : सहा  रुपये साठ पैशाला एक

दोन्ही कोंग्रेस ने एकत्र येउन मदरशांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे . त्याविरुद्ध हिंदुत्व वादि भगवी टोपी घालून आंदोलन करणार हे उघड आहे . हिंदुत्व वादि उग्र आंदोलनाची भीती अल्प्संख्यकांना वाटणार , आणि  त्यामुळे घाबरलेले मुसलमान आपल्याला मत टाकणार असा सरळ साधा कोंग्रेसि हिशेब आहे .




बर हे अनुदान किती आहे ? चक्क  नऊ  कोटि नव्वद लाख रुपये ! दहा कोटीच्या महाराष्ट्रात दिड कोटि मुसलमान आहेत . म्हणजे प्रत्येक मुस्लीमावर झालेला कोंग्रेसि खर्च आहे सहा रुपये साठ पैशे !


   मुस्लिम मतदार बहुल भागातल्या   शाळा निवडुन ,  हे अनुदान दोनशे शाळांना , देण्याची दयाबुद्धी कोंग्रेस ने दाखवली आहे .  मदरशात शिकवले जाणारे कुराणपठण , अरबी भाषा आणि इस्लामी इतिहास हे विषय शिकलेल्यांना नोकरी मिळु शकत नाही , त्यांच्या नोकरीची सोय लावायला म्हणे कोंग्रेस त्याना धर्माच्या जोडीने आधुनिक शिक्षण देऊ इछिते .


दिड कोटि लोकांसाठी हि कल्याणकारी योजना आहे . आणि कोंग्रेसच्या सहिष्णू सेक्युलरपणाचा हा पुरावा आहे.

दाभोलकरांच्या हत्येनंतर विकृत टिप्पणी करणार्या पप्पू आठवलेवर कारवाई नाही , आणि मुल्ला मौलविंच्या लांगुलचालनासाठि नौ कोटि नव्वद लाख !

असहिष्णू धर्मांधांचा बिमोड करण्याला सेक्यालारीझाम म्हणतात हे कोणीतरी ठोकून सांगितले पाहिजे !




मदरशे चावणार्या धर्मांध   मौलविंना दिलेले कोम्प्युटर शिक्षण … याने सामान्य गरीब मुस्लिमाचा काय विकास होणार आहे ? बरे शिया सुन्नी बरेलवी अहमदिया यापैकी कोणाच्या मदरशाला मदत मिळणार आहे ? अर्थात ज्या पंथाची मते जास्त आहेत त्यालाच ! मदरशातून शिकून भले होते आणि तिथे फार सेक्युलर शिक्षण दिले जाते असे कोणाला म्हणायचे आहे का ?

त्यातून दहशतवादी तयार होतात असे मला वाटत नाही . कारण दहशत वादि  होण्यासाठी सुद्धा काही किमान अकलेचि गरज असते. मदरशात शिकलेल्या धर्मविरांचे ज्ञान अल्लाच्या कयामत पुढे जात नाही ! अलिफ बे पे पुढे गणितातले ज्ञान जात नाही . त्यांना बॉम्ब टायमरचे  क्लिष्ट गणित आणि स्फ़ोटकांच्या मिश्रणाचे रसायन शास्त्र कसे जमावे ? मदरशातून मुर्ख तयार होतात असा माझा आक्षेप आहे .

मदरशात तयार झालेला एकतरी भारतीय दहशतवादी दाखवा असे फुसकुले कोंग्रेसि तर्कशास्त्र आहे . मी म्हणतो मदरशातून तयार झालेला एक तरी डोक्टर दाखवा … इंजिनियर दाखवा … शास्त्रज्ञ दाखवा …नट ,कलावंत -  संगितकार दाखवा…



संगित गैरीस्लामी आहे . जीन्स टी  शर्ट गैर इस्लामी आहे . कोका कोला मुस्लिमांच्या विरुद्ध आहे. बुरखा घातलाच पाहिजे  . इत्यादी बाष्कळ बडबड करणारी पिढी मदरशातून तयार होते . असले नामी मुर्ख तयार करून मुस्लिम समाजाचे भले होणार आहे काय ?

 मुस्लिम समाजाचे जर भले झाले.  त्यातून भरपूर डोक्टर,  इंजिनियर, संगीतकार , शिल्पकार , शास्त्रज्ञ तयार झाले तर सहा रुपये साठ पैशात त्यांची मते विकत मिळणार नाहीत .

त्यांनी मदरशांत कोम्प्युटर शिकून बुरख्याची मूर्ख बडबड इंटर्नेट वर करावी पण आजन्म सहा रुपयात विकले जावे असे कोंग्रेसि अर्थशास्त्र  यामागे आहे .


सनातनी असोत किंवा इस्लामी मुलतत्व वादि  यांसमोर झुकणे म्हणजे सहिष्णुता नव्हे . सनातन बंद झाले तर अनेक हीदुंचे कोटकल्याण होईल . आणि मदरसे बंद झाले तर आधुनिक विचार आणि आचार मुस्लिमात हि येईल … भले करणे आणि झुकणे यात फ़रक आहे . मुस्लिम समाजाचे हित आणि लांगुलचालन यातही फरक आहे . पण खरोखर हित केले तर मात्र त्यांचे रेट वाढतील अशी भीती कोंग्रेसि अर्थ तज्ञांना वाटत असावी !





 " बुरखे घालून , नमाज पढून आणि धर्म शिक्षण घेऊन मुस्लिमांचे भले होईल । जगावर इस्लामचे राज्य आणण्यासाठी इस्लामी मुलतत्व वादाचा स्वीकार केला पाहिजे . तसे केल्याने इस्लामचे  जगावर राज्य येईल .मुलतत्व वादाने  मुस्लिमांचे भले होईल" असे बडबडणारे मूर्ख मौलवी कमी नाहीत . मदरशांना अनुदान देऊन या मुर्खांचि संख्या वाढवायचा सरकारच विचार असावा ! मुस्लिम जितके मूर्ख राहतील तितक्या स्वस्तात विकले जातील हे उघड आहे ! 


.
.
Dr Abhiram Dixit

२५ ऑग, २०१३

मोडलेला कणा



.




कार्यमग्न  , निस्पृह , विवेकी दाभोलकर सरांचा पाशवी खून … आणि त्यानंतर माध्यमात आलेल्या उद्दाम सनातनी प्रतिक्रिया ऐकून प्रतिकाराची  शक्ती सुद्धा संपुन गेल्यासारखं वाटल होत. लहानपणापासून ज्या काही कल्पना डोक्यात होत्या - अपेक्षा होत्या - आकांक्षा होत्या त्या सार्या उन्मळून पडल्या होत्या. मराठी माणसाने कणा ताठ ठेवावा असे काही अभिजात या  संस्क्रुतित आहे . इथे तुकोबा आहेत  - आगरकर आहेत - विवेक आहे या सार्या समजुती मोडुन पडल्या. सतत प्रेरणा  देणारी  कुसुमाग्रजांची कविता सुद्धा मोडुन पडली होती … 





मोडलेला कणा 



ओळखतो मी सर तुम्हाला , मनाशी बोललो आम्ही 

तुमचे कपडे होते चुरगळलेले , पण डोक्यामध्ये गांधी 


कधी न बसलात , नाही हसलात , बोललात डोळ्यात पाहून 

 " गंगामाई अस्वच्छ झाली , घर गेले वाहून 


माहेरवाशीण पोरिंनाहि जाळणारा हा समाज आपला

मोकळ्या हाती दलिताला बुकलणारा माज आपला


 देश खचला , मने विझली , होते न्हवते गेले

 प्रसाद म्हणुन गोमुत्राचे आचमन तेव्हढे राहिले


खिशामध्ये हात रोज बाबा बुवा घालत आहेत

पैसे सोडा , मन आणि माणुसकीही विकत आहेत


मोडुन पडला समाज , तरी तुम्ही हरू नका

विज्ञानाच्या वेगाने बुद्धीवादाला लढ म्हणा "



कालेवार आज पाहिले तुमचे मी नदीकाठी

आशा मेली , बुद्धी विझली , डोळ्यामधे उरले पाणी








२१ ऑग, २०१३

दाभोळकर : शहाणपण मेले आणि पुरोगामित्वाचा खून झाला .




आज महाराष्ट्रातल्या सुजाण पणाची हत्या झाली . शहाणपण मेले आणि पुरोगामित्वाचा खून झाला . या मागचे धर्मांध सनातनी आता चेष्टेचे विषय वाटत नाहीत . त्यांची खरोखर भीती वाटते . या पुढे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी काही बोलायचे नाही . पाशवी सनातन्यांचे राज्य भारतावर येणार आहे .… जर हे थांबवायचे असेल तर … डॉ नरेंद्र दाभोळकरांचे काम आता आपल्या सर्वांना मिळुन पुढे न्यायचे आहे . तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल !

अंधश्रद्धा निर्मुलन कायदा हेच दाभोळकरांचे ध्येय होते . त्यासाठीच त्याना विरोधही होत होता . मारायच्या धमक्या येत होत्या .सनातन प्रभात नावाच्या वर्तमान पत्रात विष ओकले जात होते .  सनातन्यांना घाबरून सरकारही नांगी टाकत होते . बिल पास होत नव्हते . त्याचा निषेध म्हणुन दाभोळकरांनि स्वत:च्याच थोबाडीत मारून घ्यायचे आंदोलन केले होते . एखादा सच्चा गांधीवादी अजून काय करू शकतो ? एका विचारवंताला आज संरक्षण नाही देऊ शकलो . म्हणुन उभ्या महाराष्ट्राने स्वत:च्या हाताने स्वत:चे थोबाड फोडून घ्यावे .

ज्या कायद्यासाठी दाभोळकर लढत होते । तो कायदा आजच्या आज अध्यादेश काढुन लागू करावा . नाहीतर सनातनी मोकाट सुटतील . आणि कायदे थांबवण्यासाठी बंदुका वापरल्या जातील . खुन्यांना पोलिस अवश्य पकडतील . पण दाभोळकरांच्या विरुद्ध विषारी गरळ ओकणारे त्यांचे खरे मारेकरी ठरतात . त्या द्वेषाची रोपटी लावणार्या सनातन प्रभात आणि त्यांचा पप्पू गुरुजी पण अटक झाला पाहिजे .

आणि सरकारी अद्ध्यादेश काढुन आजच्या आज - अंधश्रद्धा निर्मुलन बिल पास झाले पाहिजे …











बावळट हिंदुत्ववादि बरळु लागले - दाभोळकर ख्रिश्चन - मुस्लीमाताल्या अंधश्रद्धाबद्दल बोलत नसत म्हणे ! अस्लमबाबाचा पर्दाफाश कुणि केला ? दाभोळकरांचे ख्रिस्ती अंधश्रद्धेबद्दल्ची भाषणे मी ऐकली आहेत . सनातन प्राभातच्या आरड्याओर्ड्याने कान किटले कि काहीच ऐकू येत नाही … असो ……मी म्हणतो हींदुत्व वादि साहेब तुमच ख्रिश्चनांवर , मुस्लिमांवर लैच प्रेम दिसतंय … त्याना अंधश्रद्धेतून बाहेर काढून त्यांचं भल करायचं काम तुम्हीच हातात घ्या … दाभोळकर आमच - हिंदुंच भल करण्यासाठी जगले त्यातच गेले !

विनोदाचा भाग वगळा पण दाभोळकरांना मारणारे , खुन्यांचे समर्थन करणारे आणि सनातन ला पाठीशी घालणारे राजकीय - सामाजिक पटलावरून अदृश्य होणार आहेत … समाज त्यांना नाकारणार आहे

मग पुन्हा म्हणाले … हे काम सनातनचे कशावरून … मग काय तुमचे आहे । दाभोळकरांचा खून पैशाच्या किंवा जमिनीच्या वादातून झालेला नाही . ते त्यांच्याकडे नव्हतेच .दाभोळकरांनि खाप स्टाइल जात पंचायति , सनातन प्रभात आणि बाबा बुवांचा रोष ओढवून घेतला होता . पोलिसांच्या प्राथमिक तर्कानुसार संशयाचि सुई तिघांवर आहे : - १.सनातन संस्था,२.पोल खोलले गेलेले बुवा,३.जात पंचायती.

तिघांची युती झालेली असणे हि अशक्य नाही . या तिघांवर कारवाई झाली पाहिजे. चौकशी झाली पाहिजे .
उद्या म्हणतिल कोंग्रेस ने सुपारी दिली ….
परवा म्हणतिल कि सनातनचे दोन साधक नदीकिनारी नेमबाजी खेळत होते । दाभोळकर मध्ये तडमडला म्हणुन मेला …
.

अरे जरा शरम वाटु द्या । लाजा वाटु द्या … इतके दिवस हि सनातन्यांचि पिल्लावळ पोसली । दुध पाजून वाढवली … त्यांच्या हिंदु हिंदु हिंदु हिंदु च्या ऐतिहासिक किण्किणाटात … तुम्ही कॉमन सेन्स तर घालवलाच आहे पण तुमची माणुसकीही संपलीय । दु:ख त्याचे आहे ।


काही सुचत नाही . लेखणी बंद पडली . संताप । उद्वेग . हताशपणा … आणखी काही नाही ………


जनावरे मोकाट सुटली आहेत
लवलवत्या जिभांचि टोकदार नखांची आणि
रक्ताळलेल्या डोळ्यांची

जनावर आधी रेटून खोटं बोलली
धर्मद्रोही म्हणुन भुंकलि
धर्म रक्षक म्हणुन नाचली
आम्ही काही केले नाही
कारण आम्ही धर्म स्वातंत्र्य मानतो


जनावरे मग लिहू लागली
टीव्हीवर सडेतोड चर्चा करू लागली
आम्हाला आनंद झाला
कारण आम्ही संवादप्रिय आहोत


जनावरे विष ओकू लागली
मारा ठोका चित्कारू लागली
भरसभेत याचा गांधी करू म्हणाली
काही झाले नाही
कारण पुरावा नव्हता


जनावरांनी मग जिभा पारजल्या
नखांना धार केली , स्नायू बळकट केले
आणि माणसाला फाडून खाल्ला
जीवो जीवस्य जीवन्ति !


माणुस मेल्यानंतर तर अजून हाइट झाली
एका विवेकावाद्या साठि जनावरांनिच शहर बंद पुकारला
उद्या एका लोकशाहिवाद्यासाठि जनजीवन विस्कळित होईल
कदाचित खळ खट्या क होईल
नास्तिकाच्या  आत्म्याला शांति लाभो असे ढेरपोटे बरळतिल


ती मोकाट सुटली होती तेंव्हाच
काहीतरी करायला हव होत बॉस 

२९ जुलै, २०१३

सावरकर समजून घेताना





 सावरकर समजून घेताना ……. 


 सावरकर : स्वातंत्र्यवीर आणि सामजिक सुधारणा : महत्वाचे काय ? 



(तीन लेख)


प्रस्तुत भागात तीन लेखात विषयाची मांडणी केली आहे 

पहिला लेख सावरकरांच्या बोटीतील उडीला १०० वर्षे झाल्याबद्दल 

'सकाळ'  वृत्तपत्रासाठी लिहिलेला आहे .

दुसरा लेख प्रतिगामी सावरकर भक्तांची झडाझडती घेण्यासाठी लिहिला आहे . 

तिसरा लेख सर्वात महत्वाचा आणि  शेवटचा निष्कर्ष काढण्यासाठी आहे . 






लेख पहिला 


'उडी विसरलात तरी चालेल...'
सकाळ वृत्तसेवा
Thursday, July 08, 2010 AT 12:00 AM (IST)

(डॉ. अभिराम दीक्षित)

स्वा. सावरकरांच्या समुद्रातील उडीला १०० वर्षे पूर्ण होत आहे. उडीचे स्मरण तर करायचेच आहे, त्याचबरोबर त्यांच्या "इच्छे'चेही!

स्वा. विनायक दामोदर सावरकरांना १९१० सालच्या मार्च महिन्यात इंग्लंडमधील व्हिक्‍टोरिया स्थानकावर अटक करण्यात आली. फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स ऍक्‍ट या कायद्याखाली ब्रिटिश सरकारने सावरकरांना पकडले आणि त्यांच्यावर पुढील चार आरोप ठेवले. १) ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे आणि तशा युद्धाला साह्य करणे. २) ब्रिटिश साम्राज्याचे भारतावरील सार्वभौमत्व नष्ट करण्याचा कट करणे. ३) शस्त्रास्त्रे मिळवणे; ती ठिकठिकाणी वाटणे. कलेक्‍टर जॅक्‍सनच्या खुनाला प्रोत्साहन देणे. ४) हिंदुस्थानात आणि लंडनमध्ये ब्रिटिशांविरोधी भाषणे देणे.

अटक झाल्यावर पुढे काय होणार? याचे चित्र सावरकरांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होते. त्यांनी आपल्या क्रांतिकारी मित्रांना लिहिले, ""नेमून दिलेली भूमिका पार पाडत असताना प्रसंगी कीर्तीच्या लाटांवर स्वार होता येईल, तर प्रसंगी अंधारकोठडीतल्या जळत्या खडकांना बांधून कोंडले जाऊ... माझ्या अस्थी आणि रक्षा कोठे पडतील याचा नेम नाही. त्या कोठेही पडलेल्या असोत. हौतात्म्य गाजवणाऱ्या विचारवंतांनो! आणि कृतिविरांनो!! तुम्ही ज्या संग्रामात लढलात आणि पडलात तो संग्राम यशस्वी झाला. उठा! अशी घोषणा झाली की माझ्या कोठेतरी पडून राहिलेल्या अस्थी आणि राखेतून पुन्हा तेज आणि चैतन्य सळसळू लागेल! ...तोपर्यंत मित्रांनो राम राम!!''


खटला चालवण्यासाठी सावरकरांना भारतात पाठवायचे ब्रिटिशांनी ठरवले. १ जुलै १९१० रोजी अतिशय गुप्तपणे या राजबंद्याला "मोरिया' बोटीवर चढवण्यात आले. त्या आधीच सावकरांनी पॅरिसमधील आपल्या क्रांतिकारक मित्रांना एक गुप्त पत्र  पाठवले होते आणि फ्रान्सच्या किनाऱ्यावर सज्ज राहण्यास सांगितले होते, असे शि. ल. करंदीकरांनी चरित्रात लिहिले आहे.





""साप विषारी देशभूमीचा येई घ्याया चावा... अवचित गाठुनि, ठकवुनि, भुलवुनी कसाही ठेचावा!'' अशी सावरकरांची विचारसरणी होती.


 ब्रिटिशांना ठकवून, भुलवून, फसवून कसेही करून पळून जायचे असा त्यांचा निश्‍चय होता. बोट फ्रान्सच्या मोर्सेलिस बंदराजवळ आली तेव्हा त्यांनी आपला निर्णय अमलात आणण्यास सुरवात केली. शौचाच्या बहाण्याने ते संडासात गेले. तेथील काचेवर आपल्या अंगातील गाऊन टाकला. आता विचाराला वेळ नव्हता. वेळ कृतीची होती, कृती विचारापुढे धावत होती. अंगावरील बहुतेक कपडे झटक्‍याने काढून टाकून त्यांनी पोटहोलच्या दिशेने उडी टाकली. पहिल्या उडीत पोटहोल हाती आले नाही. दुसऱ्या उडीत त्यांनी पोटहोल गाठले. आपल्या  बाहूंनी उघडले. शरीर आक्रसून बाहेर काढताना रक्तबंबाळ झाले. "स्वातंत्र्यलक्ष्मी की जय' अशी गर्जना केली आणि खवळत्या सागरात उडी ठोकून दिली.  

तात्याराव सावरकरांनी पोहत मार्सेलिस बंदर गाठले आणि वाट फुटेल तेथे पळायला सुरवात केली. ते आपल्या सहकाऱ्यांना शोधत होते, पण दुर्दैवाने ते दिसले नाहीत. सहकारी योग्य वेळी पोचले असते, तर कदाचित  इतिहास बदलला असता. सावरकरांची ऐन तारुण्याची पंचवीसेक वर्षे अंदमानच्या काळकोठडीत आणि स्थानबद्धतेत फुकट गेली नसती.

सावरकरांना ब्रिटिशांनी पुन्हा अटक केली, पण मॅडम भिकाजी रुस्तुम कामा आणि व्ही.व्ही.एस.अय्यर या दोन सहकाऱ्यांनी हे प्रकरण लावून धरले. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यास भाग पाडले. या उडीचा जगभर गाजावाजा झाला. 

बॅ. निर्मलचंद्र चटर्जींनी लिहिले आहे, (मार्क्सवादी नेते सोमनाथ चटर्जिचे बंधु )
 "८ जुलै १९१०च्या या घटनेची बातमी जगभर पसरली. भारताच्या स्वातंत्र्याचे निनाद आकाश कोंदटून टाकू लागले. भारतमातेच्या किंकाळ्या साऱ्या मानवजातीच्या कर्णपथावर आदळू लागल्या. हिंदी माणसाचा पराक्रम आणि व्यक्तित्व याबद्दल नेहमीच हिनगंडाची भावना बाळगणाऱ्या परकीयांचे डोळे दिपले."

आज या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. लौकिकार्थाने सावरकरांचे हे साहस फसले, पण त्यावेळी जे पलायन जमले नाही ते पुढे सावरकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्याने करून दाखवले. या लेखणीच्या फटकाऱ्यालाच काही लोक "माफीनामा - माफीनामा' असे म्हणत असतात. शत्रूला भुलवून, ठकवून, फसवून कसेही सुटायचेच, अशी सावरकरांची विचारसरणी होते. कधी शस्त्राने तर कधी लेखणीने! हा माफीचा तपशील कोणी विशेष संशोधन करून पुढे आणलेला नाही . त्याची गरजही नाही . सावरकरांनी  त्यांच्या माझी जन्मठेप या आत्मचरित्रात माफी पत्राचे  वर्णन अतिशय उघडपणे केले आहे. तुरुंगात सडून मरणे हि त्यांच्या देशभक्तीची व्याख्या कधीच नव्हती.  त्याकाळी हि सावरकरांवर  माफी मागितल्याची टिका झाली होती . त्याला उत्तर द्यायला तेंव्हाच सावरकरांनि एक लेख लिहिला होता - 

 हुतात्मे अंदमानात मेले का नाहीत ? असे विचारणारा हा नर (सिंह) पुंगव आहे तरी कोण ? त्याने असे कोणते पराक्रम केले आहेत ? त्याच्या  शेपटीची (पृच्छाचि) लांबी तरी किती ? 






सावरकरांच्या या उडीबद्दल बरेच समज- अपसमज पसरले आहेत . ते तीन तास / तीन दिवस पोहत होते - ब्रिटिशांनि हजारो गोळ्या झाडल्या- त्या चुकवून सावरकर पोहत होते . वगैरे वर्णन त्यांच्या भक्तांनी केले आहे. (सिनेमातही आले आहे) ना सं बापटांच्या चरित्रात याचा विस्तृत तपशील येतो. उडी मारणारा वीर म्हणून अनेक लोक सावरकरांचे " दर्शन " घ्यायला रत्नागिरीत येत. सावरकर त्याना हसून सांगत " अरे दहा मिनिटे सुद्धा पोहलो नसेन मी ! मोरिया बोट आधीच मार्स्साय (मोर्सेलीस ) बंदराच्या धक्क्याला आधीच लागली होती. गोळ्या बिळ्या कोणि काही झाडल्या नाहीत .( इतक्या जवळचा कैदी पकडायला गोळ्यांची गरज पण नव्हती.) सावरकरांचे सत्यकथन ऐकून भक्त हिरमुसून परत जात !  
काळानुसार आपले विचार बदलण्याचे तारतम्यही तात्यारावांजवळ होते. "अभिनव भारत' या सावरकरांच्या क्रांतिकारी संघटनेने बॉंब आणि पिस्तुलांनी ब्रिटिशांचा विरोध केला. स्वातंत्र्यानंतर सावरकरांनी ही गुप्त संस्था जाहीरपणे विसर्जित केली व स्वतंत्र भारतात निर्बंधाचे (कायद्याचे) राज्य चालेल अशी घोषणा केली.


सावरकर कारागृहात असताना भारतातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत होती. गोलमेज परिषदा सुरू झाल्या होत्या. ब्रिटिश टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देऊन टाकतील, अशी आशा भारतातील सर्वच राजकीय पक्षातील धुरिणांना वाटत होती. 


या वेळी ब्रिटिश विरोधापेक्षा जन्माधिष्ठित जातिव्यवस्था, हिंदू समाजातील अंधश्रद्धा आणि मुस्लिम लीगचे धर्मांध राजकारण याच भारतापुढील खऱ्या समस्या आहेत असे सावरकरांना वाटले. तरुणांनी तळहातावरच्या रेषांपेक्षा मनगटावर अधिक विश्‍वास ठेवावा, जातिव्यवस्था नष्ट व्हावी, विज्ञान हाच राष्ट्राचा वेद व्हावा, असे सावरकरांना वाटले. त्यासाठी त्यांनी रत्नागिरीतील सुमारे साडेपाचशे मंदिरे पूर्वास्पृश्‍यांना उघडी करून देण्यासाठी यशस्वी आंदोलने केली. सुमारे १५ ते २० आंतरजातीय विवाह लावून दिले, असे ना. सं. बापटांनी त्यांच्या सावरकर चरित्रात लिहिले आहे.

या सामाजिक कामांना आणि जतिअंताच्या चळवळीला सावरकर हिंदू संघटन असे म्हणत असत.

समाजास विज्ञाननिष्ठ, पुरोगामी एकसंघ बनवले पाहिजे, असे सावरकरांना उत्तर आयुष्यात अधिकाधिक तळमळीने वाटू लागले.


"माझी समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल... पण माझे सामाजिक काम विसरू नका... ते अधिक महत्त्वाचे आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्‍यक आहे,'' अशी "इच्छा' सावरकरांनी व्यक्त केली होती.


(डॉ. अभिराम दीक्षित)


दैनिक सकाळ ची लिंक पहाण्यासाठी येथे क्लिक करा 

----------------------------------------------------------------------------------------------------------- 







लेख दुसरा 


(सावरकरांवर अतिशय हीन भाषेत आणि चुकीची टिका अनेकदा होते … पण त्यामुळे आत्म परिक्षण बंद करण्याचे प्रयोजन नाही . जर सावरकरांच्या बुद्धिवादाचा आणि राष्ट्रवादाचा वारसा सांगायचा असेल तर हृदयावर दगड ठेवा आणि मेंदूची दारे उघडा ) 



सावरकरांवर  पातळी सोडुन केली जाणारी टिका निश्चितच निषेधार्य आहे . पण सावरकर भक्तांचे काय ? देशप्रेमाने ओथंबलेल्या सावरकरांच्या कवितेवर ज्यांचे कविमन पोसले आहे त्यांना सावरकरांना वापरलेली शेलकी विशेषणे बेचैन करून जावीत यात आश्चर्य नाही . अंदमानच्या अंधेरीत दहा वर्षाहून अधिक काळ बंद रहात अनेक तरुणांच्या रक्ताला कढ आणणारी साहित्य रत्ने प्रसविणारा हा क्रांतिकारकांचा मुकुटमणि (सरोजनी नायडुंचे विशेषण ) कंठस्थ कराणारे सावरकरभक्त अजून काही नागड्या सत्यांचा विचार करतील काय ?







सावरकरांचे स्मरण रक्ताला कढ आणणारे आहे . पण भावनेच्या गहीवारात विचारांची समिक्षा हरवून चालणार नाही . राष्ट्रीय अस्मितेच्या विटंबनेतुन उठलेला संतापी हुंकार आणि चिपळुणकरि परंपरा गौरवाची हाक ह्या एवढाच सावरकरवाद्यांच्या हिंदुत्वाचा आवाका राहणार आहे काय ? रक्षणाचा विचार पोषणाच्या चिंतनातुन सकस बनत जातो . हिंदु परंपरेने दु:ख आणि दैन्य मिटवण्यासाठी सामाजिक परिवर्तनाचा विचार का केला नाही ? दारिद्र्य , विषमता , अज्ञान, शोषण आणि त्यामुळे कुजून करपून गेलेली कोत्यावधिंचि आयुष्ये मनाला पाझर फोडत नसतील तर … …. तर … राष्ट्र आणि संस्कृती हि कोणत्या डुकरिणिचि नावे ?? असा तळतळाटि सवाल गावकुसाबाहेर फेकलेली माणसे करणारच. केवळ दलित नव्हेत तर दारिद्र्य्पिडित कष्टकरी जगच हिंदु परंपरेविरुद्ध दात ओठ खात का उभे राहते ??

अयोध्येच्या राम मंदिरात दुधातुपाच्या आरामाची स्थापना होणार कि श्रम रामाची चिंताहि कोण्या देशभक्ताला पडली आहे । हनुमान मंदिराच्या दाराशी दलित लाथा बुक्क्यांनी चेचला जातो । पण बजरंग दलाचा प्रातापी बाहू उन्मत्त आक्रमकांवर तुटुन पडत नाही . मलबार मधील हिंदु स्त्रियांवर मुस्लिमांनी बलात्कार केले कि सावरकर कृत्येला मशाल आणायला पाठवतात . पण दलित स्त्री भर गावातून नागव्याने फिरवली जाते - ती हिंदु नसते का ? आता कोणि अग्नी आणायचा ? हुंड्यासाठी हिंदु राष्ट्रातील पुरुष हिंदु स्त्रियांना जाळतात . पण या दुर्गुण विकृती विरुद्ध एकही सावरकरवादी दंड थोपटून उभा राहत नाही .


सावरकरांनी दलितांना मोकळी केलेली पाच पन्नास मंदिरा वाद विवादात तोंडी लावायला घ्यायची . आणि सनातन प्रभात च्या जेवणावळीत लाडु हादडायचे हा दुटप्पिपणा किती वेळ चालणार ? जन्माधारित वर्ण व्यवस्था आणण्यासाठी शेंडीला गाठ मारणार्या सनातन प्रभात शी दोन हात करायला कोण सावरकरवादी तयार आहे ? मुस्लिमां समोरचे वाघाचे दात सनातन समोर कवळ्या होतात . आणि त्या म्हातार्यांच्या श्रीमुखातून आमचे सावरकर समानतावादी होते हो चे रडगाणे आळवले जाते.


हिंदुत्ववादि मंडळि केवळ मुद्दा सिद्ध करण्यासाठी सावरकरांचे उतारे दावणार कि जातीयतेची झोटिंगशाहि मोडुन काढायला मैदानात उतरणार ? हिंदुत्व मंडळ हिंदु समाजाचा विचारच का बरे करत नाही ? सगळे लक्ष मुस्लिमांवर खिळलेले । मुसलमान धर्म पिसाटांच्या कारवायांबद्दल न बोलता हिंदुत्वावर बोलता येईल का ? ते टाळून कोणि धर्म बोलू लागला त्याने हिंदू समाज फ़ुटण्याचाच धोका जास्त ! मनुची लक्तरे सोडवत नाहीत आणि वेदा पलिकडे संस्कृती माही नाही !


गेल्या पन्नास वर्षात जी दलित मुक्ती , स्त्री मुक्ती , शोषित मुक्ती ची आंदोलने झाली त्यात हिंदुत्व वादि सावरकर भक्त कोठे होते ? एक गाव म्हटले कि एक पाणवठा असावा. त्याने हिंदु समाज एकरस होईल . हा विचार बाबा आढावांना सुचला . भिडे गुरुजींना नाहि.


सावर्करांच्या विद्न्यानानिष्ठेचे पोवाडे त्यांचे अंधश्रद्धा निर्मुलाक निबंध वगैरे साहित्य शाम मानव वाचून दाखवतात . नरेंद्र दाभोळकर प्रकाशित करतात ,नरेंद्र महाराज नाही .


देवदासिचा आचार आणि पंढरपुरच्या बडव्याचा अनाचार बंद केला तर कोणाचे कल्याण होणार ? हिंदु समाजाचेच ना ? राष्ट्राभावानेने मने पेटवण्यापेक्षा मने जोडणे अधिक महत्वाचे आहे । हे कोणाला कळणार . हिंदु समाजाच्या एकतेसाठी मनुस्मृतीला काडी लावणारा शंकराचार्य आणि जमाते इस्लामिपेक्षा सनातन प्रभात वर तुटुन पडणारा हिंदु हृदय सम्राट ह्या हिंदू समाजाचे एक राष्ट्र बनवू शकतो  


(दुसरा लेख आधारित ) --------------------------------------------------------------------------------------------------------------------



सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *