#_E_सापनीती कथा पहिली - वटवाघुळ #
वाघ , सिंह , गाय , डुक्कर याना प्राणि म्हणतात . कावळे , गरुड , पोपट , चिमणी याना पक्षी म्हणतात . प्राणि आणि पक्षी यात कायम भांडणे असतात . त्यांची जमीन एक नाही. हवा एक नाही. पाणि एक नाही. अन्न एक नाही. भक्ष्य एक नाही. लक्ष एक नाही. तरीही ते कायम भांडतात . प्राणि विरुद्ध पक्षी हा सनातन व नित्यनूतन व सार्वकालीन व निष्कारण असा झगडा आहे .
प्राणि विरुद्ध पक्षी या महान संघर्षात वटवाघुळाने कोणाची बाजू घ्यावी ? कधी प्राण्याच्या विरुद्ध तर कधी पक्ष्यांच्या विरुद्ध वटवाघुळ प्रतिध्वनी काढत बसते . कोणत्याच गटात जात नाही .
वटवाघुळे म्हणजे पंख असलेले सस्तन प्राणि . किंवा स्तन उगवलेले पक्षी . किंवा पंख फुटलेले प्राणि . किंवा चोच नसलेले पक्षी . किंवा जमिनीवर न रहाणारे प्राणि . किवा घरटे न बांधणारे पक्षी .
या - पण - किंवा - किंतु - परंतु - मध्ये वटवाघुळ अडकते . त्याला उगीचच वाटते आपण फार फार विचारी आणि तटस्थ आणि साक्षेपि आणि सम्यक आहोत .
" खरेतर ते गंडलेले असते "
त्याला आप्तजन नाहीत .
त्याला मानसन्मान नाही .
त्याला प्राण्यात जागा नाही .
.पक्षात स्थान नाही .
तात्पर्य : वट्वाघुळास निद्रानाश जडतो . ते रात्री बेरात्री जागे राहते . अस्वस्थपणे .
********************************************************
#_E_सापनीती कथा दुसरी - वाघोबाची शिकार
वाघोबा : ए हरिण मी तुला खाणार . तू माझ्या पुर्वाजाना शिव्या देतोस
हरिण : मी कधी दिल्या ? काहीतरी काय ? मला काय वेड लागले आहे ?
वाघोबा : तू हरिणांच्या भाषेत शिव्या देतोस . त्या आम्हाला समजत नाहीत . म्हणून मी तुला खाणार. तू पन्नास वर्षापूर्वी शीव्या दिल्या होत्यास .
हरिण : अहो जी गोष्ट तुम्हाला ५० वर्षे समजली नव्हती आता कशी समजली ?
वाघोबा : मी आताही तुझ्या तोंडुन काही ऐकले नाही. दोन कोल्हे बोलत असताना मी ऐकले त्यावरून मला तुझ्या वृत्तीचा अंदाज आला . आता मी तुला खाणार .
हरिण : ठीक आहे . खा .
वाघ : आज मला वेळ नाही नंतर खातो . तूच ये माझ्या गुहेत . मग मी तुला खातो .
हरिण : ठीक आहे . तुझी गुहा कुठे आहे ?
वाघ : नाही नाही गुहेत नको येऊ … तू नदीपाशी ये मग मी तुला खातो . हरिण : ठीक आहे येतो .
वाघ : एकटाच ये हा .
हरिण : ठीक आहे.
तात्पर्य : काही नाही
********************************************************
#_E_सापनीती कथा तिसरी - किटक मम्मी
पिल्लू : आई मला भूक लागली
आई : गप जरा . आपल्याकडे अजून ज्ञान नाही .
पिल्लू : पण आई मला भूक खूप खूप लागलीय .
आई : मग शेजारच्या नाकतोडे आंटी कडे जा .
पिल्लू : नाय नाय नाय
आई : बघ तुझे सहा भाऊ आणि पाच बहिणी. जे मिळेल ते खातात . बेशिस्तपणे ज्ञान मागत नाहीत .
पिल्लू : आय मी - मी वेगळा आहे .
आई : ये रे माझा कुक्कुला बाळ - त्या तिकडच्या कोपर्यात मी तुला गम्मत सांगते.
पिल्लू : जम्माडी जम्मत भंबाडि गम्मत
आई : लाप्प लप्प ल्प्प लप्प लाप्प लप्प ल्प्प लप्प
बाबा : काही किटक स्वत:ची पिल्ले खातात . इतर अकरा भाऊ बहिण किटकांचि वंशावळ वाढावी म्हणून. जिवंत पिल्ले हि गोष्ट पुढच्या पिढ्यांना सांगतात . म्हणून किटक वंश वाढतो .
तात्पर्य : विचित्र अन्न मागणारा एकही किडा जगता कामा नये .
********************************************************
होली काऊ आणि पुरोगामी चिऊ ची गोष्ट
एक होती काऊ आणि एक होती चिऊ . काउच घर होत तिच्याच शेणाच , चिउच घर होत रशियन मेणाच. एकदा काय झाल कि - मतांचा मोठ्ठा पाउस पडला त्यात शेण कालवून काऊ न तिच्यासाठी टुमदार गोठा बांधला . वासरांच्या गळ्यात घंटा बांधल्या. बैलोबांचि शिंगे रंगवली आणि होली काऊ तिच्या गोठ्यात परिवारासह राहू लागली . त्यात माजलेले वळू होते , उत्साही वासरे होती आणि हंबरणार्या वात्सल्य पुर्ण गायी सुद्धा होत्या . होली काऊ चे प्रेमळ डोळे भरून आले.
मग काय झाल पुरोगामी चिउचा उन्हाळा सुरु झाला. अंगाची लाही लाही होऊ लागली . तीन डोक्यात राख घालून घेतली होती . त्यामुळे विचार सुचेना . अक्कल चालेना . मग पुरोगामी चिउताइने काऊ च्या घरी धडक मारली …
चिऊ : होलि काऊ … होली काऊ दार उघड .
काऊ : थांब मी माझ्या बाळाला संस्कार करते .
चिऊ : होलि काऊ … होली काऊ दार उघड - होलि काऊ … होली काऊ दार उघड -
काऊ : थांब मी माझ्या बाळाला संस्कार करते.
चिऊ : होलि काऊ … होली काऊ दार उघड - "नायतर " - मी माझ्या पुरस्काराला परत करते !
काऊ : बर मग ?
चिऊ चिडून चिडून उडुन जाते . गोष्ट संपली .
तात्पर्य : चिमण्या कामाच्या नाहीत . गरुड हवेत .
********************************************************
तील इतर कथा वाचण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा : http://drabhiram.blogspot.in/p/e.html
********************************************************
#_E_सापनीती कथा चौथी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा