१२ डिसें, २०१४

संघाचे धर्मांतर …. विरोधी पक्षांचा गदारोळ आणि काही मूलभूत प्रश्न


७ प्रश्न कोकुमम्मा च्या विचारासाठी  आणि   प्रश्न हिंदुत्व वाद्यांच्या विचारासाठी 
 .
पार्श्वभूमी : लोकसत्ताच्या ११ डिसेंबर २०१४ च्या बातमिनुसार २०० मुस्लिमाना संघाने हिंदु करून घेतले. दोन्ही (को)न्ग्रेस ,(क)म्युनिस्ट, बंगालची (म)मता आणि (मा)यावती कोकुममा यांच्या पक्षांनि लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला . या पक्षाना एकत्रित रित्या कोकुममा म्हणुया . विरोध करताना कोकुममा कारणे देत होते कि या हिंदु धर्मांतरामुळे ताणाव वाढेल , संघाने आधार कार्डाची लालूच दाखवली इत्यादी.

भारताची घटना त्यातला सेक्युलारीझम आणि धर्म् - स्वातंत्र्य हे सर्व भारताच्या  हिताचे आहे । हे तुम्हाला कधी कळणार ? हा बौद्धिक दुबळेपणा कधी सोडणार ?
.
यातून काही मुलभूत धार्मिक -राजकीय - सामजिक प्रश्न उभे राहतात . त्यांचा अतिशय तटस्थ पणे विचार करुया .
७ प्रश्न कोकुमम्मा च्या विचारासाठी : 

१) धर्मांतर हा घटनेने दिलेला हक्क आहे . मुस्लिमांना हा घटनादत्त मूलभूत अधिकार नाकारणारे कोकुममा कोण ?
.
२) यावेळी संघाने केवळ २०० लोकाना हिंदु केले आहे । या आधी लाखोंच्या संख्येने ख्रिश्चन आणि मुस्लिमांनी हिंदुचे धर्मांतर केलेले आहे . त्यावेळी कोकुममा चे प्रश्न आणि गोंधळ कोठे गुप्त झाला होता ?
.
३) आधार कार्ड देतो अशी लालूच दाखवून संघाने धर्मांतर घडवले असा या पक्षांचा आक्रोश आहे . या आधी जी हिंदुंचि धर्मांतरे ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात झाली ती सर्वच्या सर्व तौलनिक धर्म शास्त्रांचा विद्यापीठीय अभ्यास करून झाली होती काय ? रेव्हरंड टिळ्कांसार्खे अपवाद वगळता ९९.९९९% धर्मातारे हि भीती किंवा लालुच यामुळेच होतात. पाद्र्यांचि पाव भिस्कुटे आणि मौलविंचा (लग्नाळू लव्ह ) दबाव राहिला एका बाजूला . मुळात सारे धर्मच लालूच दाखवतात . जन्नतची लालूच . जहन्नुमची भीती . स्वर्ग - नर्क - मोक्ष - पुनर्जन्म - दु:खमुक्ती यांची भीती किवा लालूच दाखवल्याशिवाय कोण्यातरी धर्माचे दुकान चालेल काय ?
.
४) जमाते इसलामीचे दावत आणि इस्लाम सर्वांसाठी असे धर्मांतर अभियान सध्या चालू आहे. मागे जॉनी लिव्हर आणि नगमाने मुंबईभर मोठमोठाली पोस्टर लावून ख्रिस्ती धर्मप्रचार चालवला होता . तेव्हा कोकुममा आणि त्यांचे भाडोत्री विचारवंत काय करत होते ?
.
५) यात खरे विवस्त्र झाले ते कम्युनिस्ट . धर्म हि जर अफूची गोळी आहे तर अफूचा ब्रेंड बदलल्याने तुम्हाला काय फरक पडतो ? अल्प्संख्यकांच्या सहान्भूतीचे हे फ्लोप नाटक कोकुममा किती वेळ करणार ?
.
६)हिंदुनि भारतीय धर्मात केलेले धर्मांतर आणि उपरोक्त धर्मांतर यातला फरक   आहे   ?   हिंदु - मुस्लिम - ख्रिस्ती धर्मांतराचा संबध बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म स्वीकाराशी करण्याचा मुर्खपणा कोकुममा करणार आहेत काय ? सामाजिक न्यायासाठी बाबासाहेबांनी केलेले योग्य कृत्य आणि उपरोक्त राजकीय वशिलेबाजीतला फरक कोकुममा ला कळणार काय ?
.
७ )अशा प्रकारे सतत हिंदु जन विरोधी आणि इस्लाम धर्म धार्जिणी भूमिका घेतली तर कोकुममा पैकी एखाद्याला… निदान विरोधी पक्षनेता होण्याएव्हढ्या सीटा तरी भारतीय लोकसभेत मिळतील काय ?


--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी इथे धर्म सुधारणाबद्दल बोलत नसून …. कोकुमम्मा च्या दुटप्पी धर्मांधतेबद्दल बोलत आहे . मुस्लिमाना धर्मांतराचा मुलभुत हक्क नाकारणार्या कोकुमम्मा फेसिझम बद्दल बोलत आहे … बाकी तणाव दबाव हे अपवाद आहेत …इथेहि आणि तिथेही … धर्म हि एक अतिशय सामान्य आणि फालतू गोष्ट आहे आणि ती दिवसातून पाच वेळा बदलली तरी चालते . सोडली तरी चालते . किंबहुना हिंदु समाजाच्या हितासाठी त्यांनी मनुस्मृती जाळली पाहिजे असेच आमचे मत आहे. हिंदू समाजाचे हित …… आणि ……. सनातनी हिंदु धर्मवाद यातला फरक स्पष्ट करण्यात पुरोगामी अपयशी ठरले आहेत . कारण हिंदु या शब्दाचाच वांझोटा " कुत्सित " द्वेष करणारी   विचारसरणी त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी अतिशय काळजीपूर्वक वरील प्रश्न विचारले आहे . सहसा असे प्रश्न सनातनी विचारतात पण त्यांचा मुद्दा असतो कि … हिंदु धर्मातच सुधारणा का ? हिंदुचेच अंधश्रद्धा निर्मुलन का ? सानातन्यांचे विक्षिप्त म्हणने आहे कि " … जो तो उठतो तो हिंदूंनाच शहाणपण काय म्हणुन शिकवतो ? हिंदूच्याच सुधारणा काय म्हणुन ? अंधश्रद्धा निर्मुलन फक्त हिंदुचेच का ? विकास फक्त हिंदुचाच का ? प्रगती फक्त हिंदुचीच का ? प्रगतिपथावर फक्त हिंदूच का ? हिन्दुनाहि बहुपत्नित्वाचा , धर्माधतेचा , अस्पृश्यतेचा , मागासलेपणाचा, दारिद्र्याचा , भोळसट्पणाचा आणि गरिबिचा पुर्ण हक्क आहे ! आणि तो आम्ही हिन्दु मिळवणारच"
.--------------------------------------------------------------------------------------------------------------------


७ प्रश्न हिंदुत्व वाद्यांच्या विचारासाठी :


हिदुत्व वादि लोक्स धर्मांतर बंदी कायद्याचा पुनरुच्चार करत आहेत । तसे झाले तर हा घटनेने दिलेल्या मुलभुत धर्म स्वातंत्र्यावर घाला असेल।  ७ प्रश्न हिंदुत्व वाद्यांच्या विचारासाठी :

हिंदु सबलिकरणाचि भाषा करणार्यांना संख्या हे एक बळ हे समजत नाही ? जर समजत असेल तर मग हिंदु पर्सेंटेज आहे तेव्हढेच ठेवण्याचा धर्मांतर बंदी कायदा का ?
.
१)श्रद्धा हि डोक्यात असते कागदी सर्टिफ़िकेटात नाही । आणि विचारावर बंदि घालता येत नाहि. बौद्धिक चर्चा करून स्वधर्माची महती पटवून द्यायला काय अडचण आहे ? कि काही विशिष्ट मुद्द्यावर चर्चा आणि आत्म्परिक्षण कठीण जाते आहे ?
.
२) आज हिंदुत्व वादि पुर्ण बहुमताने सत्तेत आहेत . हा देश शत प्रतिशत हिंदु बनवायची सुवर्णसंधी चालून आलेली आहे . हिंदु लोक सत्ता संपत्ति साधने आणि माध्यमे या बाबतीत इसाई आणि मुस्लिमांपेक्षा कितीतरी अधिक सरस आहेत . मग हि भित्रट वृत्ती का ? धर्मप्रसार करणे हा हिंदुचाहि मुलभूत घटनादत्त हक्क आहे … तो तुम्हाला का गमवायचा आहे ? सारी सत्ता हातात असताना मिश्नर्यांसमोर का गुढगे टेकताय ? हे क्लैब्य आहे … आणि हि मानसिक कमजोरी हिंदुचा सर्वनाश घडवण्यास पुरेशी आहे . बाहेरच्या शत्रुंची गरज नाही .
.
३) धर्मांतर केले कि नव्या धर्मांतरीत व्यक्तिस कोणती जात द्यावी ? कर्मविपाक सिद्धांताने गेल्या जन्मीचे फळ म्हणुन मिळणारी जात कशी शोधावी ? सर्व धर्म सारखीच शिकवण देतात ? अशा भाकड प्रश्नातून हिंदुनि यापूर्वी कधीही धर्मप्रसार केला नाही । त्यात सहिष्णुतेचा भाग कमी आणि मानसिक क्लैब्याचा भाग अधिक आहे . या मानसिक कमजोरीतून बाहेर पडल्याशिवाय हिंदू समाज , त्याचे समाजकारण आणि राजकारण कधीही बलवान होऊ शकत नाही .
.
४) हम पाच हमारे पच्चीस वरून मुस्लिमांविरुद्ध बोंब ठोकायची आणि हिंदुनि दहा मुले जन्माला घालावीत असे आदेश काढायचे … यापेक्षा बरे उपाय संख्या वाढवायला मिळत नाहीत का ? कुटुंबाची लोकसंख्या लग्नाच्या संख्येवर अवलंबुन असते-- समाजाची नाही . एव्हढे साधे सत्य समजत नाही ? निसर्गात: स्त्रीपुरुष प्रमाण समान असते … एकाने पाच लग्ने केली तर उरलेले चार पुरुष विधुर राहतात हे तरी समजते का ? समाजाची लोकसंख्या त्या समाजातील स्त्रियांच्या लोकसंख्येवर अवलंबुन असते … लग्नावर नाही …। हिंदुतलि स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे हा लोकसंख्या वाढवायचा शास्त्रीय मार्ग आहे. पर हजारी स्त्रियांची संख्या मुस्लिमात जास्त आहे…कारण त्यांत स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण नगण्य आहे …। या बाबतीत त्यांची बरोबरी करायला कधी आदेश का नाही आला ?
.
५) स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे यासारखे हिंदु सबलीकरणाचे साधे सोपे शास्त्रीय मार्ग सोडुन द्यायचे आणि … कुटुंबनियोजन नको म्हणुन रडायचे … धर्मांतर बंदी कायद्याची वकिली करायची आणि मग हिंदुराश्ट्र म्हणुन रडायचे … हा बौद्धिक भित्रेपणा कधी सोडणार ?
6) आपला धर्म इतरांना सामावून घेण्याची शक्ती गमावून चुकला आहे … मठ मंदिराच्या आवारात आणि बाबा बुवांच्या परसात धर्माची वाढ खुंटली आहे … वाढ करायची नाही … या भ्याडपणातुन सर्वच धर्म सारखी शिकवण देतात … हि बुळचट विचारसरणी हिंदुत जन्माला आली . धर्मांतर केले तरी ते किती वेळ टिकेल याची ग्यारेंटि नाही … म्हणुन कायद्याची नाटके चालू आहेत… सध्याच्या हिंदु सरकारला एक कायदा करून मंदिरातले हजारो कोटींचे धन त्यांच्या घर वाप्सिला वापरता येईल … हिंदुचा पैसा हिदुधर्माच्या वाढीसाठीच वापरल्याचे पुण्य पण मिळेल . असे होईल का ?
.
7) बहुसंख्य ख्रिस्ती धर्मांतर हे रोग बरे करणारे येशूचे पाणि वाटुन होते . अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचा योग्य वापर केला तर ख्रिस्ती धर्मांतर पूर्णपणे थांबवता येईल हे सनातनी बाल्बुद्धीना सुचेल काय ? त्याच कायद्याचा वापर करून शौर्य दाखवणार कि भित्र्या भागुबाई प्रमाणे अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या नावाने रडत बसणार ?

.जर एखाद्याने मनातून हिंदु धर्म सोडला तर कागदी सर्टिफ़िकेटला कोण विचारतो ? कागदोपत्री हिंदु असलेले लोक्स हिदुत्व वादि असतात काय ? नव्या युगात आत्मपरिक्षण धर्मसुधारणा हि टिकण्याची साधने आहेत …. भ्याड कायदे नाही … इव्होल्युशन आणि नास्तिकता अंशत: तरी मान्य करणार्या ख्रिस्ती पोप ला हे कळले …भारताची घटना त्यातला सेक्युलारीझम आणि धर्म् - स्वातंत्र्य हे सर्व हिंदु हिताचे आहे । हे तुम्हाला कधी कळणार ? हा बौद्धिक दुबळेपणा कधी सोडणार ?


. Dr Abhiram Dixit
.

५ ऑग, २०१४

मौलाना नदविचा शांतता धर्म

मौलाना नदविचा शांतता धर्म 
मौलाना नदवी ने खुल्या पत्रात "इसीस" नावाच्या इस्लामी दहशत वादि संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे . "इसीस" साठी भारतातून पन्नास हजार मुजाहीदांची (धर्मयोद्धे ) फौज पाठवण्याच्या वल्गनाही केलेल्या आहेत. आणि त्या "इसीस" साठी आर्थिक मदतीचे आवाहनही केलेलं आहे . कोण आहे हा मौलाना नदवी ? हा भारतीय मौलाना आहे . 

भारतात एक दार उल उलुम नावाची सुन्नी मुस्लिमांची शिखर संघटना आहे . त्याच्याच पिल्लू संघटनेत नदवी आहेत . बरे नुसती संघटना महान आणि मुस्लिम मनावर प्रभाव असणारी आहे एव्हढेच नव्हे तर नदवीचे कुळहि हुच्च आहे . अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि दारुल उलुमचे रेक्टर अली मियाँ यांचे हे मौलाना नातू आहेत. या महान मौलवीने "इसीस " साठी जिहाद चे आव्हान केले आहे .
-----

काय आहे इसीस ?


सुन्नी आणि शिया असे मुस्लिमांचे दोन पंथ / जमाती आहेत . मुहमद पैगंबराच्या मृत्यनंतर काही वर्षातच खलिफा (इस्लामचा सार्वभौम राजा ) कोणि व्हावे ? यावरून वाद झाला . खून पडले . रक्तपात झाला . आणि मग शिया सुन्नी असे दोन गट पडले . इसीस हि कडवी सुन्नी मुस्लिम दहशतवादी संघटना .

इसीस = ISIS = इस्लामिक स्टेट ऑफ इराक एण्ड सिरिया . 


"इसीस" ने हजारो परजातीय शिया मुस्लिमांची कत्तल केली आहे. इराक मधील स्त्री वादि कार्यकर्त्या बासमा-अल-खातीब यांच्या मुलाखतीनुसार इसीस ने शेकडो शिया स्त्रियांवर बलात्कार केले आहेत . गंमत म्हणजे संस्कृती रक्षणाचि बांग ठोकत , ह्याच इसीस ने बुरख्याची सक्ती केलेली आहे . बुरखा न घालणार्या स्त्री ला शरियत या मध्ययुगीन कायद्यानुसार शिक्षा देण्यासाठी "इसीस" कटिबद्ध आहे . बुरखा - बलात्कार आणि शरीयतची अशी गुंफण "इसीस" ने घातली आहे. एव्हढेच काय ? कपड्याच्या दुकानातील जाहिरात करणार्या प्लास्टिकच्या बाहुल्या "पुर्ण कपड्यात " असल्या पाहिजेत असाही इसीस चा नियम आहे . प्लास्टिकच्या बाहुल्यांनी चेकाळणार्या ह्या इस्लामी महाभागांचा चक्रमपणा एव्हढ्यावरच थांबलेला नाही .…. कत्तली , खून आणि बलात्काराच्या शिरावर त्यांनी खिलाफ़तिचा मुकुट चढवला आहे .

इसीस ने नवा खलिफा जाहीर केला असून भारतीय मौलाना नदविने सकल जगातील मुस्लिमांच्या या नव्या - राजास - खलिफ़ास सलाम ठोकत त्यासाठी भारतिय मुस्लिमांची फौज उभारण्याचा संकल्प सोडला आहे . कळवा - मुंब्रा - ठाणे येथील काही तरुण ह्या इस्लामी खिलाफ़तिसाठि जिहाद करायला इराक मध्ये डेरेदाखल झाल्याच्या बातम्या वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत.
------
त्यामुळे नदवीचे पत्र हा हसून सोडुन द्यायचा विषय नाही . इसीस आणि दारुल उलुम यांच्या पैन इस्लामिक कनेक्षनकडे पुरोगामी मुस्लिमांनी दुर्लक्ष करता कामा नये . मुख्यत: भारतातील मुस्लिम स्त्रियांनी , शिया मुस्लिमांनी विचार करायची वेळ आलेली आहे . इतर धर्माचे लोक तर तो करतीलच.

-----------------------------------------------------------------------

१२ मे, २०१४

ॲरिस्टोटल च्या चश्म्यातुन - तर्कदोष (fallacy)

  


ॲरिस्टोटल च्या चश्म्यातुन - तर्कदोष (fallacy)


इग्लंड  मधल्या एका रेल्वे गाडीत दोन प्रवासी सामोरा समोर बसले होते . पेपर वाचत होते. दोघे स्कोटिश होते . पहिल्या पानावर एका तरुणीच्या खून आणि बलात्काराची बातमी होती. बातमीचा मथळा पाहताच दोन्ही स्कोटिशान्नि नाके मुरडली. असले रानटी  काम कोणताच स्कोटिश करू शकत नाही  हे त्यांच्या मनात क्षणात चमकून गेले . बातमी पुढे वाचतात… तो हि घटना स्कोटलन्ड मध्येच घडलेली असते.  दोन्ही स्कोटिशाना आश्चर्याचा धक्का बसतो. पुढे वाचतात तर तो खुनी आणि बलात्कारी माणुस चक्क एक स्कॉटिश निघतो  ! दोघे स्कोटिश मान हलवत म्हणतात …. मग तो " खरा " स्कोटिश नसणार !


अशा प्रकारे विचार करण्याला तर्कदोष  - फेलसि असे म्हणतात. इथे आपले स्कोटीश जातभाई वाईट कृत्य करूच शकत नाहीत असे गृहीत धरलेले आहे.  पण नवा अनुभव आल्यानंतर जुने निष्कर्ष बदलले पाहिजेत . पण तसे न करता … स्कोटीश असण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे . स्कोटीश च्या आधी  "खरा"  हा शब्द जोडून …. आपल्या निष्कर्षात बसतील तेव्हढेच स्कोटीश " खरे " म्हणायचे असतात ! हा तर्कदोष "खरा"  हिंदू दहशतवादी नसतो किंवा "खरा" मुसलमान शांतता प्रिय असतो असाही वापरता येईल . इथे जो शांतात प्रिय नसेल त्याला "खोटा" म्हटले कि आपला तर्कदुष्ट युक्तीवाद पूर्ण होतो.  


फेलसि - तर्कदोषांचे वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न ॲरिस्टॉटलने (इ. स. पू. ३८४–३२२) केला. हे वर्गीकरण अजूनही बरेचसे रूढ आहे व तर्कदोषांचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात येणारी बरीचशी परिभाषाही ॲरिस्टॉटलच्या वर्गीकरणावर आधारलेली  आहे.

ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचा गुरू होता. प्रस्तुत लेखात ॲरिस्टॉटल ने केलेले तेरा तर्कदोष पहायचे आहेत . इथे हे समजून घ्यायला हवे कि जगभरातल्या सर्व माणसात हे तर्कदोष कमी अधिक प्रमाणात आढळतात . मानवाची उत्क्रांती होत असताना प्रतिकूल नैसर्गिक स्थितीत टिकून राहताना फार विचार करत बसायला मानवी मेदुकडे वेळच नव्हता . फटकन निष्कर्ष काढण्यासाठी तर्कदोष उपयुक्त आहे त्यामुळे उत्क्रांतीत तो सिलेक्ट झाला आहे पण योग्य निष्कर्ष काढण्यासाठी या नैसर्गिक तर्क दोषातून मुक्त व्हावे लागते . त्यासाठी लोजिकल - तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायला मेदुला शिकवायला लागते .
प्रस्तुत लेखात तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्यासाठी कोणते तर्कदोष (फेलसि ) टाळायला हव्या ? त्या बद्दल ॲरिस्टॉटल चे मत पाहू .

ॲरिस्टॉटल ने चुकीच्या भाषेमुळे निर्माण होणारे (भाषिक ) आणि चुकीच्या विचार पद्धतीमुळे निर्माण होणारे तर्कदोष म्हणजे आशयिक अशी विभागणी केलेली आहे.


भाषिक तर्कदोष :


१) शब्दच्छल : 

एका शब्दाचे अनेक अर्थ भाषेत असतात . शब्दाच्या मुळ अर्थाचा छळ करून वेगळाच अर्थ  युक्तिवादात वापरला जातो . कायद्याच्या कचाट्यातुन सुटण्यासाठी सुद्धा हा तर्कदोष मुद्दाम वापरला जातो . नरो वा  ? कुंजरो वा ??  अश्वत्थामा मेला आहे असे धर्मराज सांगतो . त्यावेळी तो अश्वत्थामा या हत्तीचा उल्लेख करत असतो . पण त्यावरून अश्वत्थामा ह्या द्रोणाचार्यांच्या मुलाचा वध झाला आहे असे सुचित होते .

नरेंद्र मोदींना तुम्ही हिंदू राष्ट्रवादी आहात काय ? असा प्रश्न विचारला गेला होता . त्यावर मोदिनी मी हिंदू आहे आणि राष्ट्रवादी आहे असे उत्तर दिले होते . त्यामुळे त्यांचे समर्थक हि खुश होणार  आणि कुणि मोदिना त्यावर विरोधही करू शकत नाही . कारण हिंदू असणे पाप नाही . राष्ट्रवादी असणे तर त्याहून नाही . मुळातला प्रश्न तुम्हाला हिंदू धर्माचे राज्य आणायचे आहे काय ? घटना बदलायची आहे काय ?  सेक्युलर घटना मोडुन धार्मिक हिंदुराष्ट्र हवे आहे का ? असा आहे . पण मोदिनी शब्दाची फोड करून शब्दच्छल या तर्कदोषाचा युधिष्ठीर  - धर्मराजाप्रमाणे वापर केलेला आहे !

२) वाक्य छळ : 


हा तर्कदोष युक्तिवादात एक वाक्य दोन अर्थांनी घेतल्यामुळे घडतो. उदा., हे वाक्य पहा :

आई आणि ती मुलगी खेळत होत्या  - मेंदी लावलेल्या हाताने .

नेमकी मेंदी कोणि लावली आहे ? आईने ? मुलीने ? कि दोघांनी ? काहीच अर्थबोध होत नाही . प्रस्तुत उदाहरण जरी साधारण वाटले तरी वाक्य छळ हा तर्कदोष उजून गंभिर वळण घेऊ शकतो  . जसे की : -

तू    माझी बायको   मी    तुझी बायको    सिनेमाला जाऊ ! या वाक्यात योग्य ठिकाणी स्वल्पविराम दिले नाहीत तर गंभिर परिस्थिती उद्भवू शकते .


३ / ४ )  गुणाकार आणि भागाकार (समाहार आणि विभाजन ) :   


या  एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . फारच कमी निरिक्षणातुन निष्कर्ष काढण्याची सवय सर्व प्राणिमात्राना आहे . माणुस हि त्याला अपवाद नाही .  वाद विवादात हा तर्कदोष खूप वेळा वापरला जातो .

उदाहरणार्थ : पुणे हे कंजूष  माणसांचे गाव आहे . स्वत:ला आलेल्या थोड्याश्या अनुभवांना येथे कल्पनेने गुणले आहे आणि एका अक्ख्या शहराविषयी विधान केलेले आहे .

तसा कल्पनेतला भागाकारही (विभाजन ) चुकीच्या निष्कर्षांना जन्म देतो . उदाहरणार्थ : बिहार हे गरीब राज्य आहे म्हणून सर्व बिहारी गरीब आहेत म्हणुन लालू हा एक गरीब मनुष्य आहे . सर धोपटिकरण किंवा जनरलायझेशन करायच्या मानवी प्रवृत्तीमुळे हा तर्कदोष निर्माण होतो .५) आघात

वाक्य उच्चारताना किंवा वाचताना चुकीच्या शब्दावर जोर दिला तर हा तर्कदोष निर्माण होतो .
"तो काल संध्याकाळि येणार होता . " या वाक्यातल्या  वेगवेगळ्या  शब्दावर जोर देऊन अनेक अर्थ काढता येतात . उदा : -

"तो काल संध्याकाळि येणार होता . " - तू का आलास ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . "  - आज का आला ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . "  - सकाळी का आला ?
"तो काल संध्याकाळि येणार होता . "  - आलाच नाही !

चुकीच्या शब्दावर जोर दिला कि तर्कदोष तयार होतो . 

 तू शेजार्या विरुद्ध खोटी "साक्ष" देऊ नको . इथे साक्ष ऐवजी " शेजार्याविरुद्ध " या शब्दावर जास्त जोर दिला तर शेजारी सोडुन इतर लोकाविरुद्ध खोटी साक्ष द्यायला हरकत नाही . असा चुकीचा अर्थ निघू शकतो.

६) व्युत्पत्तीदोष : 


ज्या अर्थाने शब्द बनला त्या अर्थाने वापरला पाहिजे . शब्दाआधी अ प्रत्यय लावला तर विरुद्धार्थी शब्द बनतो . अ + स्वीकार = स्वीकार न करणे . उदाहरणार्थ अमुल्य चा अर्थ आहे ज्याचे मुल्य (किंमत ) करता येत नाही असे  . पण तुमचे मत अ + मुल्य (फुकट ) आहे असे त्याचा अर्थ लावला तर तो तर्कदोष ठरेल .


आशयिक तर्कदोष :


१) गृहीत प्रश्न दोष : 


तू बायकोला मारणे सोडलेस का ? तू दारू पिणे सोडलेस का ? भाजपा लोकशाही मानणार  का ? या प्रश्नात एक तर्कदोष आहे . समोरचा माणुस दारू पितो, बायकोला मारतो, लोकशाही धिक्कारतो  हे आधीच  गृहीत धरण्यात आलेले आहे . पहिले गृहीत सिद्ध न करताच हा प्रश्न विचारणे तर्कदोष ठरते  .


२) विवाद अज्ञान तर्कदोष :

हा असंबद्ध युक्तिवाद करणार्यांचा तर्कदोष आहे .   वाद विवाद करण्याचे सामन्य नियम माहित नसणारी माणसे हा तर्कदोष वारंवार करतात. आपण युक्तीने मुळ प्रश्नाला बगल दिली ! असे त्याना वाटत असते . वस्तुत: हा तर्कदोष आहे . हि युक्ती तर्कशास्त्राच्या अज्ञानातून सुचलेली असते . याचे ४ उपभाग आहेत
२अ ) व्यक्तीयुक्ती  / हेत्वारोप :  


यात विरोधकाच्या मताचे खंडन केले जात नाही . सरळ हेतूवर शंका घेतली जाते . उदाहरणार्थ आमच्या विरुद्ध लिहिण्यासाठी तुला पैसे मिळतात असे म्हणणे . किंवा तुझ्या मनातला सुप्त जातिवाद हे बोलतो आहे …. असे म्हणुन विरोधकाच्या व्यक्तिमत्वावर / हेतूवर / चारित्र्यावर शितोडे उडवले जातात . मग त्याच्या मतांचे खंडन करण्याची गरजच उरत नाही .  हा तर्कदोष सर्व राजकारण्यांकडून वापरला जातो . मोदींच्या जुन्या विवाहावर टिका करणे किंवा सोनिया गांधींच्या परदेशी मुळाचा उल्लेख  करून त्यांच्या विचारांचे खंडन टाळणे हा तर्कदोष व्यक्तीयुक्ती / हेत्वारोप म्हणुन गणला जाइल .


२ब ) भीती युक्ती : 


आपले मत पुराव्याच्या आधारावर सिद्ध करायचे नाही . ताकदीची  किंवा नुकसानीची भीती वारून युक्तिवाद टाळणे याला भीती युक्तीचा  तर्कदोष म्हणता येईल . समान नागरी कायदा करू नका . मुस्लिम  चिडतील . दंगल होईल . हा  तर्कदोष आहे . अंधश्रद्धा विरोधी कायद्याने हिंदू चिडतील म्हणुन तो करू नका हा ही तर्कदोष आहे . हि भितीयुक्ती हा भारतीय राजकारणाचा पाया बनला आहे . भीती दाखवली कि युक्तिवाद संपला आपण जिंकलो असे वाटणे हा ॲरिस्टोटल ने तर्कदोष ठरवला आहे .
२क ) लोकभावना युक्ती : 


आपला मुद्दा युक्तिवादाने सिद्ध न करता लोकांच्या भावनेचा हवाला देण्यात येतो . जगातले इतके कोट्यावधि लोक हजारो वर्षे धर्मावर श्रद्धा ठेवतात . मग धर्म चूक कसा असेल ? हा तर्कदोष आहे . नेक लोक अनेक वर्षे मुर्खपणाहि करू शकतात .


२ड ) आदर युक्ती : 

एखाद्या महान माणसाचा हवाला देऊन स्वत:चे मत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो . उदाहरणार्थ : गांधीजी धार्मिक होते. महान माणसाची सर्वच मते योग्यच  असतील असे नाही .  पैगंबराने अनेक विवाह केले . ज्ञानेश्वरांनी चातुर्वण्यावर आघात केले नाहीत . तुकोबा वैष्णव होते .  शिवाजी महाराजांनी आठ लग्ने  केली होती . आंबेडकरांचा फाळणीला पाठिंबा होता  .  समजा  हे सर्व खरे आहे . पण केवळ ह्या दाखल्यांवरून . आजचे युक्तिवाद करता येत नाहित.  अगदी आजच्या काळातल्या इस्रोच्या वैद्न्यानिकांनी बालाजीला साकडे घातले यावरून धर्माची आवश्यकता सिद्ध होत नाही . महान आणि आदरणीय व्यक्तीमत्वांचे हवाले देत युक्तिवाद करणे हि युक्ती समोरच्याला गप्प करायला ठीक असली तरी  तो तर्कदोष आहे. पण व्यक्तीपुजेने बद्ध समाजात हा तर्कदोष सहजच चालून जातो .


३) चक्रविचार : 

यात अ ने ब सिद्ध केले जाते आणि मग पुन्हा   ब ने अ सिद्ध केले जाते . येशु प्रेषित आहे कारण बायबलात तसे लिहिले आहे आणि बायबल दैवी ग्रंथ आहे कारण येशु देव तसे म्हणतो . खरे पाहता या दोन्ही गोष्टी स्वतंत्र पणे सिद्ध केल्या पाहिजेत.  चक्रविचार हा तर्कदोष सर्वच इझंम वाल्या मंडळींकडून थोडाबहुत वापरला जातो . वेद हि ईश्वरी वाणी अपौरुषेय आहे कारण वेदातच  तसे म्हटले आहे किंवा आंबेडकरांनी म्हटले कि जेव्हढा बुद्धधर्म विज्ञान निष्ठ असेल तोच खरा बुद्धधर्म ! हि दोन्ही आर्ग्युमेण्ट यातच मोडतात .४) छद्म कारण दोष : 


यात वेगळ्याच कारणाचे खण्डन करून भलताच परिणाम चूक ठरवला जातो . पक्षि उडतात मग गुरुत्वाकर्षण कसे काय अस्तित्वात असू शकेल  ?  वास्तविक पाहता पक्षि किंवा विमाने उड्ण्याचा आणि गुरुत्वाकर्ष्णाच्या सिद्धांताचा काहीच संबध नाही .
 राजचे आडनाव ठाकरे आहे मग तो हिंदुत्व वादिच  असणार हा हि तर्क दोषच.  कारण आडनावाचा आणि विचारसरणिचा काहीच संबध नसतो !

५) उपाधी तर्कदोष: 


 याचं अॅरिस्टॉटलने दिलेलं उदाहरण सांगतो. हा कुत्रा बाप आहे, हा कुत्रा तुझा आहे. म्हणून हा कुत्रा तुझा बाप आहे. हे विधान उघडच तर्कसंगत नाही.

६) सामान्य-विशेष-संभ्रम : 


 सामान्य नियम जेव्हा आपण विशिष्ट वस्तुंना किंवा घटनांना उद्देशून लावतो, तेव्हा त्याचं हे उपयोजन काही अटींनी मर्यादित झालेलं असतं असं आपण मानतो. पण अनेकदा आपण या अटी स्पष्टपणे नमूद करत नाही. उदाहरणार्थ, ‘प्रत्येक माणसाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असतो,’ हे सामान्य तत्त्व जर आपण घेतलं, तर माणसाला वेड लागलेलं नाही, तो शुद्धीवर आहे इत्यादी अध्याहृत अटी त्याचं उपयोजन मर्यादित करतात. अशा सामान्य तत्त्वाच्या उपयोजनावर मर्यादा घालणार्या अटी लक्षात न घेता, जर ते तत्त्व एका विशिष्ट वस्तुला लावलं, तर तो सामान्य-विशेष-संभ्रम तर्कदोष होय. उदाहरणार्थ, दारूच्या धुंदीत असलेल्या माणसाला आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असतो असा निष्कर्ष मी काढला, तर हा तर्कदोष घडेल.आता आपण पुढे नव्याने वापरात आलेले तर्कदोष पाहू. आपल्याला हवी तेवढी माहिती गोळा करायची नको त्या माहितीकडे दुर्लक्ष करायचं. मग आपोआपच आपल्याला हवे ते निष्कर्ष निघतात. फोर्टमध्ये राहणार्या माणसांची स्थानिक स्थिती पाहून सगळी मुंबई श्रीमंत आहे असा निष्कर्ष काढणं यास चेरी पिकिंग फेलसी असं नाव आहे.

वदतोव्याघात हा एक अजून   तर्क दोष . यात आपण आपले म्हणने आपणच खोडून काढत असतो . उदाहरणार्थ ती म्हातारी बाई फार तरुणपणिच मरून गेली किंवा ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या . म्हातारी बाई तरुणपणिच मरू शकत नाही कारण ती म्हातारी आहे असे आपण आधीच म्हटले आहे . ब्राह्मण हि एक जात आहे . आणि जर भुतकाळात इतिहासात जाती नसलेली व्यवस्था अस्तित्वात असेल तर जाती निर्माण करायला … ब्राह्मण हि जात कोठून उत्पन्न झाली  ?


सगळ्यात शेवटचं म्हणजे ः स्ट्रो मेन फेलसी ः यामध्ये दुसर्याचं मुख्य म्हणणं ऐकून घ्यायचं नाही आणि निरर्थक लहान मुद्यावर वाद घालत वेळ काढायचा याला स्ट्रो मेन फेलसी असं म्हणतात. स्ट्रो मेन म्हणजे बुजगावणं. शत्रुच्या सैन्यावर हल्ला न करता शत्रुच्या बुजगावण्यावर हल्ला करायचा आणि मग विजयाचा डंका पिटायचा… प्रस्तुत लेखातल्या मुख्य विषयाकडे दुर्लक्ष करून लहानसहान नजरचुकीवर हल्ला करून बुजगावणं मारल्याचा आनंद व्यक्त करता येईलच की! त्यालाच म्हणायचं स्ट्रो मेन फेलसी!(संदर्भ स्रोत : मराठि विश्वकोश , तत्वज्ञान कोश , गुगल ! )

.

२ मे, २०१४

समस्त लग्नाळु तरुण बंडू आणि बबलिसाठि कानमंत्र

समस्त लग्नाळु तरुण बंडू आणि बबलिसाठि कानमंत्र लग्ने न जमणे आणि जमली तर फार उशिरा जमणे हा एक कॉमन प्रोब्लेम झाला आहे. परवा चेन्नैला आमची एक वय वर्षे तीस वर्षाची जुनी मैत्रिण भेटली . अजून लग्न झालेले नाही . मी यकदम विचारले का ग ? मुद्दा असा कि ती गेल्या जवळ जवळ ८ ते १० वर्षापासून मुलगे पाहत आहे . पण लग्न जमत नाही . शिक्षणाने डोक्टर , आर्थिक द्रुश्ट्या उत्तम स्वयं पुर्ण , दिसायला बरी तरीही नाही जमत लग्न … मी विचारल का ग ?

तर म्हणे… कोणि पोट्टा क्लिक झाला नाही ना ! यश राज चोप्रा , शारुख खान आणि कोई ना कोई … कही ना कही। हर किसीके लिये बना है । ला साष्टांग दंडवत…. पण हे क्लिक होणे म्हणजे काय ? हृदयाने हृदयाला आणि हार्मोनने हार्मोनाला - जीवशास्त्रीय संप्रेराकाने घातलेली साद म्हणजे क्लिक ! हि जीवशास्त्राची हाक आहे पुनरुत्पादनासाठी …

जगातली दोनच खरी नाती … दोनच खर्या जाती म्हणजे …. स्त्री आणि पुरुष ! मग मी तिला विज्ञान आणि संख्याशास्त्र पुन्हा समजावून सांगू लागलो …


परतीच्या विमान प्रवासात एक जुना खास बुद्धिमान मित्र बरोबर होता त्याच्याशी मन मोकळेपणे गप्पा हाणायला गेल्या कित्येक महिन्यात मोकळा वेळच नव्हता मिळाला …. तो हि अविवाहित वय वर्ष ३२ …. सध्या उत्तम… आर्थिक द्रुश्ट्या सुस्थापित… दिसायलाही बरा … पण लग्न नाही केलेले … त्याच्या बौद्धिक अभिरुचीशी सुसंगत अशी बायको न मिळणे हि त्याची तक्रार होती … लग्न करण्या आधी विचार जुळले पाहिजेत हा हेका … मी विचारले विचार जुळणे म्हणजे काय ? मग मी त्याला विज्ञान आणि संख्याशास्त्र पुन्हा समजावून सांगू लागलो ……

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आमचे एक दूरचे चुलत मावस बंधू सध्या फ़्रस्ट्रेट झाले आहेत . वय वर्षे ३६ . आत्ताच फोनवर त्याच्याशी बोललो . म्हटला ना माझा एरेंज मेरेज जमला ना लव्ह मेरेज …. आता काय पुढे ? मग मी त्याला विज्ञान आणि संख्याशास्त्र पुन्हा समजावून सांगू लागलो ……
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुद्दा फकस्त लोजिकचा आणि स्टेटीक्स - संख्याशास्त्राचा आहे . लव्ह आणि एरेंज आणि बौद्धिक मेरेज एकाच वेळेला करायचे आहे . सगळ्याच लग्नाळू बंटी आणि बबलिचा हा मुद्दा त्याना अविवाहित ठेवतो आहे .


बर आता थोडसे संख्याशास्त्राविषयी बोलूयात . समजा तुम्हाला प्रेम विवाह करायचा आहे . तर पहिली अट अशी प्रेम उत्पन्न झाले पाहिजे . प्रेमात हार्मोन आहे तेस्तोस्तेरोन , इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्तेरोन नावाच्या स्त्री - पुरुष हार्मोनाची नाळ, वेळ आणि उद्दिपनाचा काळ जुळाला कि प्रेम होते. या दोन्ही बाजूच्या हार्मोनच्या एकत्रित उद्दिपानाची शक्यता किती ? बर ते जीवशास्त्र गेल तेल लावत ! मला एक सांगा प्रेम बसणे हि एक सिलेक्षन ची क्रिया आहे . इथे कोई ना कोई … कही ना कही। हर किसीके लिये बना है । मग त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीवर प्रेम बसू शकत नाही . कमीत कमी … दहातली एक व्यक्ती प्रेमासाठी योग्य वाटते ।

म्हणजे स्टेटीक्स - संख्याशास्त्रा नुसार प्रेमात पडायची शक्यता दहात एक ! पण प्रेम फक्त तुला वाटुन उपयोग नाही ... तिलाही वाटले पाहिजे !!

बरे हे प्रेम दोन्ही बाजूने झाले पाहिजे … स्त्री पुरुष अशा दोन्ही बाजूनी विचार केला तर या दोन्ही शक्यतांचा गुणाकार करावा लागतो. प्रत्येक पुरुषाला दहातल्या एका स्त्री विषयी प्रेम वाढणार आणि प्रत्येक स्त्री ला दहात्ला एकच पुरुष स्वप्नातला राजकुमार वाटणार .

प्रेम हि दोन्ही बाजूनी घडणारी क्रिया असल्याने १० गुणिले १० = १०० … १०० शक्यतातून एकदाच दोन व्यक्तींचे प्रेम जुळू शकते . म्हण्जे १०० मध्ये एक हा भिन्नलिंगी प्रेमाचा संख्याशास्त्रीय गुणक आहे .

  बरे एरेंज मेरेजाचे काय ? एरेंज मेरेज च्या अटी कोणत्या ?

१) त्यात जात जुळली पाहिजे .
२) सांपत्तिक स्थिती जुळली पाहिजे
३) शिक्षण जुळले पाहिजे
४) परत जोतीशी पत्रिका जुळली पाहिजे
५) उमेदवार आपल्याच गावातला असावा

आपण ह्या सगळ्या शक्यता दहात एक लग्नाळू लोकांच्या जुळतील असे गृहीत धरू . त्याही पाचही शक्यातात बसणारे उमेदवार किती ? भारतात जर १०० उम्मेदवार लग्नाळू असतील तर त्यात तुमच्या जातीत दहात एक यापुढे मजल जात नाही . सांपत्तिक स्थिती जुळणारे किती ? त्यात पुन्हा दहात एक हेच कमीत कमी गुणोत्तर घेऊ … उरलेल्या अटीत सुद्धा दहात एक यापुढे जात नाहीत . ५ गुणिले १० = ५०… पन्नास्सातला एक उमेदवार लग्नासाठी योग्य ठरेल . म्हणजे एरेंज मेरेजचा संख्याशास्त्रीय गुणक ५० मध्ये एक असा आहे .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बरे विचार जुळण्याचे काय ?

कोणत्याहि दोन व्यक्तींचे विचार तंतोतंत जुळू शकत नाहीत , पण आपण सोयीसाठी दहात एक व्यक्तीचे विचार जुळतात असे गृहीत धरू मग … विचार जुळून लग्न करण्याचा योग दाहात एक असा होईल .

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता मुद्दा असा आहे कि आई वडिलांनी (एरेंज मेरेज) निवडलेला उमेदवार क्लिक झाला ( प्रेम विवाह) कि मग त्याच्याशी विचार जुळले पाहिजेत . लव्ह आणि एरेंज आणि बौद्धिक मेरेज एकाच वेळेला करायचे आहे .

संख्याशास्त्रानुसार १०० गुणिले ५० गुणिले १० = ५०००० उमेदवारातून एक उमेदवार तुम्हाला निवडायचा आहे . याचा साधा सरळ अर्थ असा कि या -एरेंज मेरेज । प्रेम विवाह । विचार विवाह असे तिन्ही एकाच वेळेला करायचे असेल तर पन्नास हजार उमेदवारांची छाननी करणे आवश्यक आहे …
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता त्यातला एकच करायचा कि त्यापैकी एकच अट घालायची ?एरेंज मेरेज? प्रेम विवाह? विचार विवाह ?? हे तुम्हीच ठरवायचे आहे . समस्त तरुण बंडू आणि बबलिसाठि कानमंत्र असा कि प्रेम करा आणि मजा करा …
१७ एप्रि, २०१४

नरेंद्र मोदि : सामान्य माणसांचा सामान्य नेता

 सामान्य माणसे 

मोदींना सामान्य माणसाने निवडून दिलेले आहे . मोदिना कोन्ग्रेस पेक्षा सात कोटि मते जास्त मिळाली आहेत . कोंग्रेस आघाडीच्या च्या दहा कोटि समोर भाजपाच्या आघाडीचा सतरा कोटींचा आकडा टरटरून फुगीर आहे. भाजपाला स्वत:ला हि अनपेक्षित असे संपूर्ण बहुमत मिळवुन देताना जुन्या वाजपेयी सरकारपेक्षा कोट्यावधि अधिक मते मोदिनी खेचून आणली आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपाची आघाडी २/३ बहुमतापासून फक्त २७ सिटान्नि दूर आहे. भाजपाचे हे कोटकल्याण कसे घडले ? असे कोट्यावधि मतदार कोणत्याहि रंगाचे नाहीत. समिक्षक विद्वानांचे जातीधर्माचे रंग इथे फिके पडले. ८१ कोटि मतदारांपैकी प्रत्यक्षात ५३ कोटींनी मतदान केले . त्यातले नोटा वाले , प्रादेशिक पक्ष वाले वगैरे बाजूला काढले तर सात कोटीचा विजय आणि सतरा कोटि मते हि आजच्या काळात दणदणित म्हणावीत अशीच आहेत . हि कोटीच्या कोटि मोदि उड्डाणे कशी घडली ? मोदि उत्तरेच्या सत्तेकडे कसे झेपावले ? कोट्यावधी सर्व सामान्य भारतीयाने मोदित काय पाहिले ?
मोदि महान नाहीत .


मोदि महान नाहीत . त्यांचा इतिहास बर्याच वेळेला चुकतो .सनावळी चुकते . समाजशास्त्र , पोस्ट मोर्ड्निझम आणि बाकीचे राज्यशास्त्र…. शिवाय त्याच्या आधुनिक परिभाषा मोदिना फारशा अवगत नाहित. त्याना साधे जातीचे राजकारणही फारसे समजत नाही. बर विकास म्हणाल तर तो थोडा बहुत आहे जरूर ........पण फारसा नेत्रदीपक वगैरे अजिबात काही नाही गुजरातेत..... . मोदिना सफाईदार इंग्लिश बोलता येत नाही . त्यांचे दिसणे जवाहरलाल नेहरु प्रमाणे राजबिंडे - रुबाबदार नाही . इंदिरा गांधी सारखा कामाचा झपाटा आणि नेत्रुत्व गुणही मोदीने अजून दाखवलेले नाहीत . . अटल बिहारी वाजपेयी प्रमाणे " झुलासाता जेठ मास । शरद चांदनी उदास । अंतर्घट रीत गया । एक बरस बीत गया । । " अशी तरल काव्य रचना मोदिना जमणे शक्य नाही . फार काय ? मनमोहन सिंग यासारखे अर्थ शास्त्राचे सखोल ज्ञानहि मोदींकडे अजिबात नाही . नरेंद्र मोदि हा एक अतिशय सामान्य माणुस आहे . 

मोदि विरोधक तिखट मिठ लावून सांगतात त्याप्रमाणे मोदि खाटिक नाहित. आणि समर्थक सांगतात त्याप्रमाणे जादुगार हि नाहीत . 

मोदि झोकून देऊन - घाम गाळून काम करतो . सुट्टी घेत नाही . स्वत:च्या विशिष्ट पुर्व् ग्रहा सकट सामान्य भारतीयाप्रमाणे देशावर प्रेम करतो . सामान्य माणसाप्रमाणे , मोदी मनापासून हसतो . कधी खोटे खोटे रडतो . त्याला राग येतो . मोदि द्वेष करतो . डूख धरतो. पाळत ठेवतो . सूड घेतो . मोदि बिनधास्त आहे . मोदि दिगविजयात इतर अनेक गोष्टी सहित त्यांच्या सर्व सामान्य व्यक्तिमत्वाचा मोठा सहभाग आहे. 

मोदि मुस्लिम टोपी नाकारतो . माफी - बाफी मागायला मोदि अति संवेदना शील नाहीत . मोदि विकास बोलतो . विरोधक हिंदुत्वाचे आरोप करत राहतात . माजी मनमोहन सिंग… भारतीय साधन संपत्तीवर दलित आणि अल्पसंख्य (मुस्लिमाचा ) पहिला अधिकार आहे असे म्हणाले होते. मोदिनि दलित , शोषित आणि गरीब हे शब्द कायम ठेवले परवाच्या भाषणात . पुढचा धार्मिक शब्द वगळला … मोडी खाकडु आहेत 
मोदिंचे सेक्युलर प्रचारक 

ह्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदीने एकदाही… चुकुनही …संघिष्ट वा सनातनी हिंदू , हिंदुत्व आणि हिन्दुराश्ट्राचा जयघोष केला नाही . आपल्या देशाचा कायदा आणि घटना मोदिना अशा हिंदुत्वाचा प्रचार करण्याची परवानगी देत नाही. आणि कायद्याच्या कचाट्यात न अडकण्या एव्हढे शहाणपण मोदिकडे निश्चित आहे. भारतातल्या ८५ % मतदारांना धार्मिक हाक देऊन मोदींकडे आकर्षित करण्याचे काम आमच्या सेक्युलर बांधवांनी केलेले आहे . मोदि हा हिंदुचा पक्षपाति आहे… हिंदुच्या बाजूचा आहे … हा विचार सेक्युलर माध्यमांनी पसरवला …… बदलत्या काळात । इण्टर्नेटच्या युगात …इतर देशातल्या अनेक इतर लोकांशी आणि इतर धर्मांशी संपर्क वाढत असताना भारतात देशीवाद किंवा स्वत्व वाद किंवा एत्तद्देशिय स्थानिक जाणीव हि जन्म घेणार …आणि तीला हिंदू हि आयडेण्टिटि आपोआप प्राप्त होणार हे आपण लक्षातच घेतलेले नाहि. 
विकास , राष्ट्रवाद आणि बहुजन वाद 

स्पष्ट बोलायचे झाले तर ... काही मोजके आणि सन्माननीय अपवाद वगळता …. बरेचसे पुरोगामी, बहुजन वादि , कथित समाज वादि हे हिंदुत्व वाद्या इतकेच जातीवादी आहेत . ते त्यांचे विचारवंत वगैरे मंडळी स्वजातीचे प्रेमी आहेत . अथवा भाडोत्री … किंवा तद्दन महा मूर्ख …… आणि एक बहुजन समाजातला पहिला प्रधान मंत्रीपदाचा उमेदवार घोषित करून भाजप संघाने सर्वावर मात केली आहे . आजवर भारतात १४ प्रधानमंत्री झाले . त्यातले ६ ब्राहम्ण, कायस्थ वगैरे भद्रलोक अथवा उरलेले ७ खत्री , राजपूत , ठाकूर वगैरे क्षत्रिय हुच्चवर्णिय . बिचारा एकटा देवेगौडा अपघाताचा अल्पकाळ प्रधानमंत्री पण तोही गरीब घरातला नाही तर जमीनदारच !मोदि नावाच्या दरिद्री घरातल्या चहावाल्या ओबिसिला भाजपाने प्रधान मंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले आहे. निदान जातीची पुरोगामी गणिते इथे ढिल्ल्ली पडली आहेत . आणि सदोसदि बहुजन वाद आणि प्रतिनिधित्व आणि ओबीसी आणि इतर गोष्टी करणारे लोक मोदिला पुन्हा बहुजन वादाचेच निमित्त करून जेंव्हा झोडपू लागतात तेंव्हा त्यांवर पोट धरून सामान्य जनता हसत असते !

विकासाबद्दल बोलायचे झाले तर मोदि हा माणुस , भाजप हा पक्ष कोन्ग्रेस च्या कितीतरी पुढे आहे .असे सामान्य माणसाला वाटते. 

उदारमतवादाची सद्दी 


उदारमत वाद हा खरा नाही . असू शकत नाही . त्यामागे ढोंग आहे. फसवणूक आहे. असे सामान्य माणसाचे ( प्रामाणिक !!) मत असतेच . मोदिनी सर्व सामन्य माणसाची भूमिका मांडत उदार मतवादाची सद्दी संपवली . 

सामान्य पण शक्तिशाली मोदि 

१) आत्मौप्य , आत्म्परिक्षण आणि सहिष्णुता ह्या आपल्या जुन्या महान परंपरा आहेत असे एक मत आहे . 

२) दुसरे मत ह्या सर्व भाकड गायी निरुपयोगी असून फालतू आहेत असे आहे . 

पहिले मत गांधीचे दुसरे सावरकरांचे . असे म्हणण्याचा वैचारिक इझम संघर्ष आहे . 

मोदि आणि सर्व सामान्य भारतीय दुसर्या मताकडे झुकले आहेत हे मान्य केले पाहिजे . हा विजय माध्यमांचा नाही . प्रचाराचा आणि ब्रेण्डिग चा नाही . हा विजय सर्व सामान्य माणसाच्या बदललेल्या मताचा आहे . सर्व सामन्यांचे मत कायमच शक्तिशाली राहणार आहे . हा शाप नाही . हे भारतीय लोकशाहीचे वरदान आहे . सत्य स्वीकारून … हि मते का बदलली ? हा खरा अभ्यासाचा विषय व्हायला हवा . त्यासाठी आपापल्या पूर्वग्रहांचे चष्मे उतरवून पाहिले तर ठीक … अन्यथा …सर्व सामान्य माणसाची शक्ती ..... . लोकशाहीत सर्व सामान्य माणसाचे विचार जिंकणार आहेत . हे पहिले समजून घेतले पाहिजे . इझमचे चष्मे आणि विचारधारांच्या सद्दी संपलेल्या आहेत . इलेक्ट्रोनिक आणि सोशल मिडिया चा उदय झाला आहे . लोकशाहीला नाके मुरडून किती दिवस आत्ममग्न राहता येईल ? नवे युग सर्व सामान्य माणसाचे असेल . 


बाकी आता पुढचे काळावर सोपवू . 


पण मोदि महा विजयाचे तटस्थ विश्लेषण… समर्थक आणि विरोधक करणार का ? हा माझ्या पुढचा प्रश्न आहे . 
या निवडणुकीत धार्मिक विषय कोणि चघळले ? त्याचा कोणाला फायदा झाला ? मोदींवर तीच तीच जुनी पुराणी टिका केल्याने कोणाचा फायदा झाला ? बदलता भारत समजून घेण्यात कोण कमी पडले ? आणि का ? हा चिंतनाचा खरा विषय ! बाकी जर उदार मतवादाची सद्दी संपली तर ते खरेच चिंतनीय आहे . 
९ एप्रि, २०१४

आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ?

आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ? 

विज्ञानाच्या चष्म्यातून आयुर्वेद :


 

सर्वप्रथम आयुर्वेदाला साष्टांग दंडवत :

आयुर्वेदाविषयी माझ्या मनात कुतूहल आहे . चरक आणि सुश्रुत या महान संशोधक पूर्वजांविषयी अतिशय आदर आहे . पण विज्ञान सतत बदलत जाते . गेलिलिओ चे भौतीकशास्त्र न्युटन ने खोडून काढले म्हणुन गेलिलिओ लहान ठरत नाही . … कि न्युटन महान ठरत नाही . …. हाच न्याय चरक , सुश्रुत आणि आजच्या आधुनिक विद्न्यानालाहि लागू आहे .


आयुर्वेदात साइड इफेक्ट नाही . जुन्या दुखण्यांवर आयुर्वेद उपयुक्त आहे अशी चर्चा आणि कुजबुज सतत चालू असते. छोट्या मोठ्या मासिकातून , वर्तमान पत्रातून आयुर्वेदाची स्तुती करणारे भरपूर लिखाण चालू असते .  सांधे दुखीपासून , डायबिटिस पर्यंत आणि केन्सर पासून एडस पर्यंत अनेक रोगावर आयुर्वेदात उपचार आहेत असे सांगितले जाते . हे खरे आहे काय ? मग आयुर्वेद फक्त भारतातच का ? अमेरिका युरोप आदी प्रगत देशात आयुर्वेदाला उपचाराची मान्यता का नाही ? प्रस्तुत लेखात आपण आयुर्वेदाची वेगवेगळ्या अंगाने चर्चा करायची आहे .


काय आहे आयुर्वेद ? 


मान्य ग्रंथानुसार आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. चरक आणि सुश्रुत या आचार्यांनी स्थापन केलेल्या विचारशाला यात महत्वाच्या आहेत . आणि प्राचीन काळी इतरही अनेक मान्यवरांनी यात भर टाकली आहे . पण आयुर्वेद हि केवळ उपचार पद्धती नाही . वात , पित्त आणि कफ हे तीन दोष संतुलित असले तर मनुष्य निरोगी राहतो आणि त्यांचे असंतुलन झाले तर रोग होतात असे आयुर्वेद मानतो . नाडी, मूत्र, मल , जिंव्हा , शब्द, स्पर्श , दृक, आकृती, या आठ गोष्टी बघून आयुर्वेदात निदान केले जाते. त्यास अष्टविध निदान पद्धती असे म्हणतात.
                    


सोप्पे शास्त्र 

आजचे आधुनिक वैद्यक शास्त्र शरीरातील केमिकल रेणूंची तपासणी करते , एक्स रे , सिटी स्केन , मायक्रोस्कोप खाली रक्त परिक्षा , डिएनए परिक्षा यापैकी कशाचाही भानगडीत आयुर्वेद पडत नाही . आयुर्वेदाच्या कोणत्याहि ग्रंथात कोणत्याहि आधुनिक टेस्ट चा उल्लेख नाही . पण निव्वळ नाडिपरिक्षेतुन इसीजी पेक्षा अधिक माहिती वैद्याला कळते असे दावे मात्र आज आहेत . तीन दोष आठ निदान पद्धती खेळ खल्लास . बरे आजच्या माणसाला होणारे बहुसंख्य रोग हे जीवाणू आणि विषाणू यांच्या संसर्गाने होत असतात . चरक आणि सुश्रुत संहितेत या बापड्या जीवांवर भाष्यच नाही !


सबब आयुर्वेद हि जीवनपद्धती आहे …. मुळात आयुर्वेदानुसार जीवन जगले कि रोग होतच नाहीत …त्यामुळे जीवाणू विशाणुच्या शेकडो प्रजातीन्बद्दल भाष्य करण्याची गरज आयुर्वेदाला वाटतच नाही ! त्यामुळे रोगनिदानाच्या कोणत्याहि आधुनिक पद्धती शिवाय आणि जीवाणूच्या इन्फेक्शन कडे संपूर्ण दुर्लक्ष करत आयुर्वेद भारतात दुमदुमत राहतो . त्याकाळी धर्म शास्त्रानुसार मानवी शरीराच्या डिसेक्शन ला परवानगी नव्हती . त्यामुळे आयुर्वेदाला मानवी शरीराची ( सखोल रचना ) एनाटोमि नीटपणे माहित नाही . जसे कि मेंदूचे निरनिराळे भाग आणि त्यांची कार्ये.... चरक आणि सुश्रुत संहितेत यावर भाष्यच नाही !


                                                    


आधुनिक परिभाषेचा द्वेष 


हे अणु , ते रेणू , हि टेस्ट ती पेस्ट , हे एक्स रे ते इसीजी हे सारे पाश्च्यात्य शब्दांचे बुडबुडे आहेत . आधुनीक विज्ञानाच्या चष्म्यातून आमच्या प्राचीन शास्त्राकडे पहाणे चूक . मात्र डायबेटीस आदी आधुनिक विकारांवर मात्र जालीम औषध आमच्याकडे आहे असे हे आयुर्वेदाचे तर्कशास्त्र आहे. बदलत्या जीवनपद्धतीनुसार रोग बदलत असतात . त्या आधुनिक रोगांवरचे जालीम इलाज सांगणार्या प्राचीन शास्त्राला आधुनिक परिभाषेचा मात्र राग करावा लागतो . 
इफ़ेक्ट आणि साईड इफ़ेक्ट 


खडूची पुड आणि लाकडाचा भूसा मेणात कुस्करून खाल्ला तर साइड इफेक्ट काही नाही . पण त्याचा इफ़ेक्टहि नाही हा मुद्दा आहे . आयुर्वेदाने केंन्सर बरा केल्याचे राणा भीमदेवी दावे मी वाचले आहेत . पिडलेली किडनी , बिघडलेले यकृत आणि गेलेली स्मृती परत आणणारी चूर्णे, भस्मे आणि आसवे आयुर्वेदापाशी आहेत असेही बिनबोभाट लिहिले जाते . आधुनिक वैद्यक शास्त्रातले एखादे औषध मान्य होण्यासाठी त्याला कठोर परिक्षेतुन - क्लिनिकल ट्रायल मधून पास व्हावे लागते . सुरवातीला औषधाचे प्रयोग प्राण्यांवर आणि मग माणसांवर केले जातात . रुग्ण आणि निरोगी अशा दोघान्वरही प्रयोग केले जातात . प्लासिबो इफ़ेक्ट ची शहानिश केली जाते . सर्व संख्याशास्त्रीय चाचण्यातुन पास झालेले औषधच मग रोग्याला दिले जाते . त्यावेळी त्या आधुनिक औषधाच्या सर्व इफ़ेक्ट आणि साइड इफ़ेक्ट ची माहिती डॉक्टरला असते . क्लिनिकल ट्रायल मध्ये ती माहिती डोक्युमेण्ट झालेली असते . आजवर आयुर्वेदाचे एकही राणा भीमदेवी औषध एकही क्लिनिकल ट्रायल पार करू शकलेले नाही . इच्छुकांनी क्लिनिकल ट्रायल बद्दल अधिक माहिती अवश्य करून घ्यावी . आणि आयुर्वेदातलि सर्व औषधे यात साफ नापास होतात हेही जाणुन घ्यावे . नापास होण्याच्या भीतीने क्लिनिकल ट्रायल साठि बहुतेक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधे उतरलीच नाहीत त्यामुळे त्यांचे दूरगामी साइड इफ़ेक्ट आपल्याला माहित नाहीत हे हि समजून घ्यावे .

http://en.wikipedia.org/wiki/Clinical_trial

http://www.openthemagazine.com/article/living/ayurveda-hoax-or-science

                               
आता थोडे अर्थशास्त्र 


एकेक गुणकारी औषधाचे पेटंट करोडो रुपयांना विकले जात असते . प्रोस्टेट केन्सरच्या एका औषधावर औषध कंपन्या डॉलरचा पाउस पाडत असतात . नवीन औषधांच्या संशोधनासाठी लाखो डॉलरचा अव्याहत खर्च चालू असतो . आयुर्वेदात एकजरी गुणकारी औषध असते तर या धंदेवाईक चालू कंपन्यांनी ते सोडले असते काय ? त्या औषधाचे स्वामित्व मिळवुन त्याचा जगभर व्यापार करण्याची संधी सोडुन द्यायला या कंपन्या मूर्ख आहेत काय ? आयुर्वेद फक्त भारतातच का ? अमेरिका युरोप आदी प्रगत देशात मेन्स्ट्रिम मध्ये  आयुर्वेदाला उपचाराची मान्यता का नाही ? 


दुर्बल मनाचे एकमेव आशास्थान : कोन्स्पिरसी थेअरी 

भाबड्या मनाचा काही गोश्टिवर ठाम विश्वास बसलेला असतो . पण हा विश्वास तर्कशास्त्राच्या आणि अर्थशास्त्राच्या सर्व पारड्यात गळून पडत असतो . बुद्धीला पटते पण मनाला पटत नाही मग …… आयुर्वेदाविरुद्ध या बहुराष्ट्रीय कंपन्यांची कारस्थाने सुरु आहेत …. आयुर्वेदाविरुद्ध अमेरिकेचा कट सुरु आहे अशा कोन्स्पिरसी थेअरिचा जन्म होत जातो . सशाविरुद्ध सिंह कट करत नसतात हे हि भाबड्या मनाला मग समाजात नाही


 . 
खरे दु:ख असे आहे :


मेडिकलच्या प्रवेश परिक्षेत अपघाताने दोन मार्क कमी पडले म्हणुन हुशार विद्यार्थी आयुर्वेद शाखेत प्रवेश करतो . मग स्वत:च्या व्यवसायाशी निष्ठा म्हणुन आयुष्यभर आयुर्वेदाची भलामण करत बसतो . जर दोन मार्क जास्त पडले असते तर ? आधुनिक वैद्यकाला प्रवेश मिळण्याएव्हढे मार्क मिळाले असते तर आयुर्वेदाला एडमिशन घेतली असती काय ? आणि तर आयुर्वेदाची भलामण केली असती काय ? 

मेडिकलची मिळणारी सीट नाकारून विश्वास म्हणुन आयुर्वेद स्वीकारलेले किती वैद्य मोजता येतील . कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात . जे त्या विद्यार्थांबाबत खरे आहे तेच भारतीय मानसिकतेबद्दल हि खरे आहे . वेदातल्या उडत्या तबकड्या , महाभारतातले एटम बोंब , रामायणातली विमाने आणि आयुर्वेदातले औषध ! पाश्चात्य सन्स्क्रुतिचा निषेध असो ! वेलीवर उंच लटकलेल्या द्राक्षाचां निषेध असो . 
प्लासिबू इफेक्ट 

पाद्र्याने हात लावला कि रोगी बरे होतात . मनाला बरे वाटले कि काही आजार बरे होतात . काही आजार मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती मुळे आपोआप बरे होतात . तसाच आयुर्वेदाच्या काही औषधांचा , काही लोकाना , काही वेळेला चांगला अनुभव येतो .
 हा व्यक्तिगत अनुभव म्हणजे विज्ञान नाही . 
क्लिनिकल ट्रायल् च्या संख्या शास्त्रीय मोजपट्टीवर पास झाले पाहिजे . दु:ख आयुर्वेदिक औषधे नापास होतात याचे नाही . दु:ख भारत सरकार नापास होते याचे आहे . एका अशास्त्रीय आणि परिणाम शून्य थेरपी चे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालये चालवली जातात . अनुदानात सरकारी पैशाची उधळपट्टी सुरु राहते . अनेक हुशार विद्यार्थ्याना आयुर्वेदिक कालबाह्य काढे शिकत पाच वर्षे फुकट घालवावी लागतात . त्यातले अनेक पुढे जाउन आयुर्वेदाची प्रेक्टिस करतच नाहीत . त्याना ओ कि ठो न समजणारी आधुनिक औषधे देत बसतात . पेशण्ट च्या जीवाशी खेळतात . या सर्व लबाडिला भारत सरकार अनुदान देते . वैद्यांनी काढे , आसवे देत जीवन व्यतीत केले असते तर फक्त एका हुशार विद्यार्थ्याचे करिअर बरबाद होईल . त्यांच्या आंधळ्या एलोपेथि प्रेक्टिसने लाखो पेशनटचे हाल होतात. काही प्राणाला हि मुकतात . सर्व आयुर्वेदिक / होमिओपाथिक कोलेजांचे रुपांतर आधुनिक वैद्यकीय महाविद्यालयात केले पाहिजे . आणि त्या हुशार विद्यार्थ्याना आणि रुग्णाना न्याय मिळवुन दिला पाहिजे . आपल्या भारत देशात डॉक्टरांची संख्या कमी आहे . वैद्यकीय सुविधा कोमात आहेत . बालमृत्यू , कुपोषण , साथीचे रोग भारत देश पोखरत आहेत . आणी सरकारने आपला आर्थिक सट्टा आयुर्वेदाच्या प्लेसिबू इफ़ेक्ट वर लावला आहे . 
विज्ञान होणे सोप्पे नसते 

ज्योतिष पाहून आजाराचे निदान करण्याचे उल्लेख आयुर्वेदात आहेत . सापाचे विष उतरवायचे मंत्र आहेत. औषध सिद्ध करण्यासाठी पाच कुमारिकांनी त्याचे  पूजन करण्याचा विधी आहे .      मानवी भावनांचे आणि विचाराचे स्थान मेंदू नव्हे तर हृदय असे पारंपारिक आयुर्वेद मानतो . त्याला जीवाणू, विषाणू , डी  एन ए कश्शा  कश्शाचा आता पता नाही . तरी आयुर्वेदाला स्वत:स विज्ञान / शास्त्र म्हणवून घ्यायचे आहे . ठीक आहे. पण विज्ञान होणे सोप्पे नसते. 

आधुनिक वैद्यक शास्त्रावर कायद्याचा कडक वचक आहे . ती एक चांगली गोष्ट आहे . आयुर्वेदावर हे बंधन का नाही ? प्रथम औषध आणि त्याची परिणाम कारकता सिद्ध  करायची , पुन्हा ते औषध कसे बनवायचे ? याचा निर्बंध् सिद्ध करायचा … आणि जर पेशंटला त्याचा उपयोग झाला नाही - तोटा झाला   तर कोर्टाची पायरी चढायला मुक्तद्वार ठेवायचे . हे सर्व नियम आणि कायदे आधुनिक वैद्यक शास्त्राला आहेत . ते योग्य आहे पण भारत सरकारने या सर्व नियमातून आयुर्वेद आणि होमिओ पाथी ला सुट दिली आहे ! आयुर्वेदाच्या समर्थकाना   जर विज्ञान युगात यायचे असेल तर प्रथम हा कायद्याचा अंकुश   आमंत्रित केला पाहिजे . मंत्रित बुवाबाजीचे दिवस आता संपले . 

अमेरिकेतल्या कुठल्यातरी राज्यात आयुर्वेदाचे एखाद दुसरे  कोलेज आहे.  मोजकी आयुर्वेदिक औषधे क्लिनिकल  ट्रायल मध्ये बाजी मारू शकली आहेत . पण पुन्हा क्रोस ट्रायल घेतली तर त्यातलीच कित्येक हरतात . कधी संख्याशास्त्रीय माहितीतच  लोचा आढळून येतो .  अमेरिकन एफ डी  ए ने आयुर्वेदिक औषधे आमच्यातर्फे सिद्ध झालेली नाहीत असे वॉर्निंग लेटर हि प्रसिद्ध केलेले आहे.  ती पेशंट ने स्वत:च्या जवाबदारीवर वापरावीत। दुश्परिणामाना  आम्ही जवाबदार नाही   असेही म्हटले आहे . खरे पाहता आयुर्वेदात हेवी मेटल ची अनेक विषारी संयुगे वापरलि जातात . ती घातक आहेत आरोग्याला । दुसरीकडे आयुर्वेदाचा दावा आहे कि -   लिंबा पासून तुळशी पर्यंत सर्व औषधे सर्दी पासून केंसार पर्यंत सर्वांवर जालीम छावा   इलाज आहेत !  पुन्हा क्लिनिकल ट्रायल इल्ला . राणा भीमदेवी दावे : 


आयुर्वेदाची उपयुक्तता आधुनिक विज्ञानाने मान्य केली आहे असे दडपून खोटे लिहिले जाते . त्यासाठी अनेक उदाहरणे दिली जातात . सर्पगंधा नावाच्या एका आयुर्वेदिक औषधाचे उदाहरण चर्चेला घेऊ . 

सर्पगंधा हि वनस्पती उच्च रक्तदाबावर (हायपर टेन्शन वर ) चांगले औषध आहे . खरे आहे . आधुनिक औषधशास्त्र ती वापरते . या गोष्टीतून भलते अर्थ काढले जातात . 

आयुर्वेदात सर्प गन्धेचा उल्लेख आहे पण हायपर टेन्शनचा नाही . आयुर्वेदानुसार सर्प गन्धेचा हा श्लोक पहा :  

 सर्पगन्धा अति तिक्त  उष्णा रुक्ष कटु विपकिनी .
पित्तवृद्धिकारि रुच्या शूल प्रशमनी सरा.
कफ़वातहरा निद्रप्रदा ह्रुद्रव्सादिनी.
कामवसदीनी चैव हन्ति शूल ज्वर् क्रिमिन.
अनिद्रा भूत उन्माद अपस्मरं भ्रमं तथा.
अगनिमान्द्यं विषं रक्तवातधिक्यं व्यपोहति.

आयुर्वेदात सर्पगंधा पेन किलर - वेदनाशामक म्हणुन येते . पुन्हा तसेही नाही ! …  नेमके शास्त्र शुद्ध बोलेल तर तो आयुर्वेद कसला ? आयुर्वेदानुसार सर्प गंधा हे औषध चक्कर येणे , विषबाधा , मंद अग्नी  , पोटातले जंत , फेफरे येणे आणि वेडेपणावरहि  उपयुक्त आहे .  

आयुर्वेदानुसार सर्पगंधा रक्त दाबावारचे औषध  नाही .  हिंग पुस्तक आणि तलवारीचा अन्योन्य संबध … असा सगळा इल्ला कारभार आहे. परत बघा बघा रक्त दाबावरचे आयुर्वेदिक औषध सिद्ध झाले म्हणुन बोंब आहेच . हे सारे विवाद तर्कदुष्ट आहेत . फेलसी आहेत. 


विज्ञान सतत बदलत प्रगती करत जात असते . धर्माप्रमाणे हाजारो वर्षा पूर्वीच्या ग्रंथात अडकलेले नसते हे समजून घेतले पाहिजे .  वात पित्त कफावर आज्ज्या, काकू,  मावशा आणि पार्कातले आजोबा चर्चा करू शकतात म्हणुन त्याचे कुजबुज मार्केटिंग चालू राहते . कुजबुज मार्केटिंग म्हम्हणजे  विज्ञान नाही . विज्ञान होणे सोप्पे नसते . 

आधुनिक वैद्यकशास्त्राची पुस्तके दर वर्षी अपडेट होतात . हजारो  वर्षापूर्वी लिहिलेलि चरक आणि सुश्रुत संहिता आजही आयुर्वेदाचा मुख्य अभ्यासक्रम आहे . साध्या विंडोजचे  नवे व्हर्जन दर वर्षी येत असते .जी  गोष्ट हजारो वर्ष बदलत नाही :


त्याला धर्म म्हणतात -  विज्ञान नाही. 


पुन्हा एकदा आयुर्वेदाला साष्टांग दंडवत :


आयुर्वेदाविषयी माझ्या मनात खरेच प्रेम  आहे . शिवाजी महाराजांचाही मी नितांत भक्त आहे म्हणून मी गाडी ऐवजी घोड्यावरून फिरावे काय ? 


चरक आणि सुश्रुत या महान संशोधक पूर्वजांविषयी  आदर आहे . पण विज्ञान सतत बदलत जाते . गेलिलिओ चे भौतीकाशास्त्र न्युटन ने खोडून काढले म्हणुन गेलिलिओ लहान ठरत नाही . … कि न्युटन महान ठरत नाही . 

मानवी बुद्धिमत्ता टप्प्या टप्प्याने आनि एकत्रितपणे काम करते . कालचे विज्ञान आज इतिहास ठरते . आयुर्वेद हा औषध शास्त्राचा महान इतिहास आहे . त्याचा जरूर अभ्यास व्हावा . 

इतिहासाच्या कला शाखेत आयुर्वेद शिकवला जावा . वैद्यकीय महाविद्यालयात नाही . आणि जर शिकवायचाच असेल तर अजून एक गोष्ट जरूर करावी . पाकिस्तानी सीमेवरील सैन्याच्या बंदुका, तोफा काढून घ्याव्यात आणि त्याना जिरेटोप , वाघनखे आणि ऐतिहासिक भाले बरच्या वाटण्यात याव्यात .

--------

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *