फेसबुक पोस्ट

लेखांपेक्षा लहान असलेल्या फेसबुक वरील पोस्ट/ कोमेंटा  येथे  संकलित केल्या आहेत. पुढेमागे हे मुद्दे अधिक स्पष्ट करून  लेख रुपात मांडता येती .

(  यातील एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल कुतूहल असल्यास खाली कोमेट मध्ये प्रकटावे.)  


भगतसिंग यांनी वयाच्या २१ व्या वर्षी पुढील लेख लिहिलेला आहे . अप्रतिम ! या एकाच शब्दात त्याचे वर्णन करता येईल . भारताचा राष्ट्रवाद आणि धर्म निरपेक्षता यावर अतिशय सुंदर भाष्य प्रस्तुत लेखात आलेले आहे. २१ वर्षाच्या तरुणाची राजकीय प्रगल्भता त्यातून दिसते .  अशा नास्तिक तरीही राष्ट्रवादी भूमिका घेऊन राजकारण करता येते . लोकप्रिय सुद्धा होता येते हे हि सिद्ध होते .

भगतसिंग प्रस्तुत लेखात सुभाष चंद्र बोस आणि पंडित नेहरू यांची डोळस  तुलना करतात. सुभाषबाबू देशभक्त असले तरी ते भावुक आणि अध्यात्मिक आहेत धार्म वादी  आहेत … म्हणून त्यांच्यापेक्षा सुधारणावादी पंडित नेहरू अधिक सरस ठरतात असा निष्कर्ष भगतसिंग यांनी काढला आहे . भगतसिंग यांनी पंडित नेहरूंची दोन वचने आपल्या लेखात कोट केलेली आहेत . ती नेहरू वचने अशी :

" प्रत्येक युवकाने क्रांतिकारी असले पाहिजे. पण केवळ राजकीय क्रांतीचा उपयोग नाही. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सुद्धा क्रांतिकारी असले पाहिजे. फलाणि गोष्ट कुराणात सांगितली आहे अशी धार्मिक  वकिली करणारे  आपल्या उपयोगाचे नाहीत. बुद्धीला न पटणार्या सर्व गोष्टी फेकून दिल्या पाहिजेत , मग त्या कुराणात असो वा वेदात ! "

भगतसिंग यांनी उधृत केलेले पंडित नेहरुंचे दुसरे वाक्य असे : -

"वे कहते हैं कि जो अब भी कुरान के जमाने के अर्थात् 1300 बरस पीछे के अरब की स्थितियाँ पैदा करना चाहते हैं, जो पीछे वेदों के जमाने की ओर देख रहे हैं उनसे मेरा यह कहना है कि यह तो सोचा भी नहीं जा सकता कि वह युग वापस लौट आएगा, वास्तविक दुनिया पीछे नहीं लौट सकती, काल्पनिक दुनिया को चाहे कुछ दिन यहीं स्थिर रखो। और इसीलिए वे विद्रोह की आवश्यकता महसूस करते हैं।"

भगतसिंग यांच्या संपूर्ण लेखाची लिंक खाली पहिल्या कोमेंट मध्ये दिली आहे.


https://www.marxists.org/hindi/bhagat-singh/1928/naye-netaon.htm
--------------------------------------------------------------------------------

  लेखकांनी पुरस्कार परत केले वगैरे फालतू बडबड कोणि करू नये म्हणून…. थोडी अधिक माहिती पुरवत आहोत : पुरस्काराचा त्याग करणारे फक्त लेखक आहेत ? कि कोणत्या तरी राजकीय विचाराचे लेखक आहेत ?

(संदर्भ खाली पहिल्या कोमेंटित )
१) पंजाबी लेखिका दिलीप कौर तिवाना : समाजवादी विचाराच्या लेखिका : २००४ साली पद्मभूषण : कार्ल मार्क्स चे नाव घेत आणि रशियन रक्तक्रांतिचे उच्चार करत पुरस्काराचा त्याग.
२) मराठी कवयित्री प्रज्ञा पवार : पुरोगामि विचार आणि भाजपविरोधी भूमिका : कवी केशवसुत पुरस्कार (२०१४)
३) हिंदि लेखक उदय प्रकाश : मार्क्सवादी विचारवंत : साहित्य अकादमी पुरस्कार (२०१० )
४) अशोक वाजपेयी : मनमोहन युपिए २ काळ - ललित कला अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष : साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४)
५) गणेश देवी : गांधीवादी समाजवादी भूमिका , रामचंद्र गुहांचे मित्र : साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२)
६) एन शिवदास : (गोवा राज्य कोन्ग्रेस उपाध्यक्ष पद - काही विशिष्ट कारणाने राजकीय विजनवास ): साहित्य अकादमी पुरस्कार (२००५)
७) नयनतारा सहगल - (पंडित नेहरूंची नात. कोन्ग्रेस ) साहित्य अकादमी पुरस्कार ( १९८५ )
८) सारा जोसेफ: (आम आदमी पार्टीच्या तिकिटावर २०१४ सालची निवडणूक ) … पुरस्कार : साहित्य अकादमी पुरस्कार (२००१)
-----------------------------------------------------------------------
खैरलांजी हत्याकांड २००६ साली घडले - त्यावेळी वरील आठ पैकी सहा लोकांजवळ हे पुरस्कार होतेच .
दादरी हत्याकांडा इतकीच भयानक हत्याकांड् ते हि होते . त्यावेळी या सहा लोकांनी राजीनामा का दिला नाही ?
( कवयित्री प्रज्ञा पवार यांचा सन्मानिय अपवाद त्यांना अणि उदय प्रकाश यांना २००६ नंतर पारितोषिक मिळाले )
-------------------------------------------------------------------------
जाती आणि धर्मानुसार क्रौर्याच्या व्याख्या ठरतात काय ? कोणत्या पक्षाचे सरकार आहे ते पाहून तुमचा निषेध ठरणार आहे काय ? नाय तर मग कोङ्ग्रेसच्या आणि सपा च्या राज्यातल्या हिंसे साठी तुम्ही केंद्र सरकारला जवाबदार ठरणार काय ?
मुहम्मद नेयाज अजगर यांनी मुस्लिम मिरर मध्ये जुन्या दंगलिंचा लेखा जोखा काढलाच आहे … भाजपाच्या शंभर पट अधिक धार्मिक दंगली कोंग्रेसच्या राज्यात होत आल्या आहेत … (संदर्भ खाली पहिल्या कोमेंटित )
तेंव्हा तुम्ही काय केले …. लोक आता या लेफ़्टिस्ट नाटकाला पकले आहेत - अस करू नका … यानेच भाजपा मजबूत झाला आहे । डाव्यांनो खोटार्डेपणा सोडा …. आमच्या साठी नव्हे - तुमच्याच भल्या साठी ….

पुरोगामी लॉजिक 

१३ ओक्टोबर २०१४ 

( दादरी येथे झालेला दु:खद खून , पानसरे , कलबुर्गी आणि दाभोलकर इत्यादी नावे घेत पुरोगामी म्ह्णवणार्या लेखकांनी स्वत:ला मिळालेले पुरस्कार सरकारला वापस देण्याचा सपाटा लावला ) 

खैरलांजित दलित कुटुंबाची निर्घुण हत्या झाली तेंव्हा पुरस्कार का परत केले नाहीत ?

 हे ढोंग खपायला लोकांना मूर्ख समजून राहिले काय राव ?

आणि मग दोन चार साहित्यिक मोदिंचा निषेध म्हणून साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करतात - मग त्यावर डावे पुरोगामी नेहमिचे मंत्र जपत कामाला लागतात ! त्यावेळी हे भंपक लोक दाभोळकर , कलबुर्गी, दादरी खून खून फेसिझम.....सरकारचे अपयश अशी नावे घेत रडत असतात !

१) दादरी ची घटना युपीत घडली … बरे युपीत कोणाचे सरकार आहे ? समाजवादी मुलायम सिंग !
२) कलबुर्गिंचा खून कर्नाटकात झाला . तिथे कोन्ग्रेस चे सरकार आहे . आरोपी पकडलेले नाहीत .
3) दाभोळकरांचा खून झाला तेंव्हा महाराष्ट्रात कोन्ग्रेस चे सरकार होते - आरोपी पकडलेले नाहीत .

पानसरेंच्या खुन्यांना कोणि अटक केली ? 
पुरावे मिळाले तर सनातन वर बंदि घालू असे कोण म्हणाले ? 
भाजपाचे मुख्यमंत्रि असे म्ह्टले आहेत  !

आणि निषेध कोणाचा ? तर भाजपाचा ?? म्हणुन पुरस्कार परत केला ? कोणाला ?? तर साहित्य अकादमीला - - - साहित्य अकादमी आणि युपी चे गृहखाते याचा काय संबंध ? अरे काय टाइम पास लावला आहे हा ??

आता हि पोस्ट लिहिली म्हणून अभिराम हा भाजपाचा माणुस आहे अशी अटकळ आणि कोन्स्पिरसि थेअरी मांडायला डाव्या मेंदुस एक मिनिट सुद्धा लागणार नाही .

डाव्या कम्युनिस्टांनि भारताच्या इतिहासाची , राजकारणाची , समाजकारणाची आणि विचार विश्वाची पुरती वाट लावली आहे . यांच्या भंपक थेअर्या सार्या पुरोगाम्यांनी मम म्हणून स्वीकारल्या आहेत … डाव्या विचारात घटना महत्वाच्या नसतात - फ़्याक्ट महत्वाचे नसतात - त्यांच्या फालतू थेअर्या महत्वाच्या असतात … यांच्या या मुर्खपणाने भाजपा तहहयात सत्तेत राहणार आहे …

 कारण सर्वसामान्य ... अल्पशिक्षित भारतीयास.... पुरोगाम्यां हुन अधिक बुद्धी आहे . डाव्या हुन जास्त अक्कल आहे … उपलब्ध पर्यायातला शहाणा पर्याय ते निवडतात .

--------------------------------------------------------

.... लॉजिक 


१) कायदा आणि सुव्यवस्थे बद्दल कधी राज्य सरकार जवाबदार असते / तर कधी केंद्र सरकार जवाबदार असते ! गुजरात मध्ये दंगे घडतात तेंव्हा राज्य सरकार जवाबदार असते ! आणि दादारीत दंगे घडतात तेंव्हा केंद्र सरकार जवाबदार असते !! (कारण्कि समाजवादी मुलायम आहे ना तिथे !)

२) पानसरेंचा खून भाजपाच्या राजवटीत झाला … पोलिसांनी मारेकरी पकडला . गृहखाते देवेंद्र फडणविसांकडे आहे . मुख्यमंत्र्यांनि पुरावे मिळाल्यास सनातन वर बंदि घालू असेही म्ह्टले …. दाभोळकरांचा खून झाला तेंव्हा कोङ्ग्रेसचि राजवट होती . खुनी मिळाले नाहीत …. मग फुरोगामी लॉजिक म्हणते भाजपाचा निषेध करा !!

३) अरे पुरस्कार कसले परत करताय ? ते काही तुम्हाला मोदीने दिलेले नाहीत ! म्हणजे घ्यायच कोन्ग्रेस कडुन आणि परत द्यायचं मोदिला ?

हे लोक्स लय भारी आहेत राव !!
--------------------------------------------------------
(पोस्ट हिट्ट - ७२२ लाइक आणि २८१ शेअर हून अधिक  ---
आता तरी पुरोगामी विचार करतील काय ? काहीतरी चुकते आहे काय ? मला वाटत नाही तसे. धर्म शास्त्राला बुद्धिवादाच्या कसोटीवर मोजले पाहिजे …हा पुरोगामी विज्ञान निष्ठ विचार मान्य आहे …।
पण हे तर्क विज्ञान राज्यशास्त्र आणि समाज शास्त्र हे विषय आले कि कोमात जाते … कि पुरोगामी देवदूत असून त्यांना अत्मचींतनाचि काही गरजच नाही ? …. कि मोदिविरुद्ध काहीहि बोलले कि ते पुरोगामी असते ?
हा शब्द आज शिविसारखा बनला आहे …आणी त्याला पुरोगाम्यांचे बेजवाबदार वर्तन कारणीभूत आहे … तुमच्या स्वप्नातला गोबेल्स नव्हे !)






********************************************************

 बुतशिकन

 आंबेडकरांनि राष्ट्रवादाच्या प्रभावात लिखाण केले आहे . ठीक आहे . तुमचे म्हणणे मान्य करू आणि पुढे जाऊ . कुराणात दिलेल्या मुर्तिभंजनाच्या आज्ञे चे काय ?

१ ) सच्चा मुसलमान कोण हे त्याना ठरवता येत नाही हे खरेच . पण काफिर मूर्तिपूजक कोण ? हे अगदी निश्चित पणे ठरवता येते . या काफ़िरांचि कोर्टातलि साक्ष मुस्लिमा पेक्षा हलक्या दर्जाची मानली जाते . कारण सैतानाच्या उपासकाना सद्बुद्धि असत नाही . सर्व मुस्लिम देशात हा कायदा आहे . त्याचे काय ?
बाकी अहमदिया नवा प्रेषित मानतात त्यामुळे त्याना कोणीच मुसलमान मानत नाही .जगातील बहुसंख्य मुसलमान हे सुन्नी आहेत . त्यांच्या इस्ल्मित्वाशी ते स्वत: कधीही शंका घेत नाहीत . दर्ग्या सारख्या गैर इस्लामी मूर्तीपूजा घालवणे आणि त्याना शुद्ध मुस्लिम बनवणे यासाठी जमाते इस्लामी वगैरे संस्था काम करतच आहेत. भारतातले बरेचसे मुस्लिम दर्गा वाले आहेत . त्यांनाही हे काफारच समजतात . पण मूर्तिपूजक काफ़िरांबद्दल कोणताही संदेह नाही ,. साध्य चर्चा मुर्तीपुजेशी संबधित चालू आहे . त्यामुळे अहंमदिया मुद्दा इथे गैरलागू आहे .

२) जात संप्र्दायाचे ब्रिटिश उत्तर राजकाराण हा मोठा विषय . सध्या चर्चा मुर्तिभंजना च्या प्रेरणेशी निगडित आहे त्यामुळे गैरलागू

३) मंदिरांचे सरकारी करण व्हायला हवे आणि त्यातली सर्व संपत्ती सरकारजमा व्हायला हवी या तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. मुर्तिभंजकाना आर्थिक पापमुक्ती देऊन त्याच्या दिशेने योग्य पाउल पडेल काय ? आज कोण लुटणार आहे मंदिरे कि भिउन हिंदु सरकारीकरण करतील ? मंदिरेच हिंदुना लुटत आहेत.

४) हिंदुची मंदिरे हिंदुनि लुटली आणि त्यामागे आर्थिक प्रेरणा असणे सहज शक्य आहे . त्याचा इस्लामी मुर्तिभंजनाशी काय संबंध ?

५) आंबेडकरांनी उधृत केलेला तैमुरच्या तोंडचे वाक्य वर दिलेले आहे . मुर्तिभंज्ञाचा धार्मिक हेतू तो अतिशय स्पष्टपणे सांगतो .

६) कुराणात मूर्ती भंजनाचे स्पष्ट आदेश आहेत त्याचे काय ? कुराण सुरह ३७ आयत ९१ ते १००
http://www.bayt-al-hikma.com/Quran.aspx?q=37:93

कुराणात मुर्ति तोडण्या चे आदेश आहेत, मुसलीम शासकांनी स्वत : भारतावरील हल्ल्याचा हेतू विशद करताना मुर्तिभंज्ञाचा धार्मिक हेतू सांगितला आहे. तरीही कुराण आणि मूर्ति तोडणारे बादशाहा यांच्यावर विश्वास न ठेवता तुमच्या आर्थिक थेअरिवर का ठेवावा ?

 १) खुद्द मुहम्मद पैगंबराने मक्केतील साडे तीनशे मूर्ती स्वहस्ते फोडल्या होत्या . कोणाला सांगताय आर्थिक प्रेरणा ? मूर्ती फ़ोडण्यामागे आर्थिक कारण असे असू शकत नाही हे तुम्ही उत्तम प्रकारे जाणता . मध्ययुगातील राज्य्कर्त्यांच्या प्रेरणा धार्मिक असत - आजही असतात हे आपणास चांगलेच ठाउक आहे
२) तुम्ही मत बदलणार नाही तुम्ही कारण तुमच मत तस नाहीच मुळी ! इस्लामची स्तुती करून त्याना पापमुक्त करणे हा तुमच्या राजकीय धोरणाचा भाग आहे . इतिहासाचे आकलन नाही

धर्मांध संखेने कमी असतात . धर्माला सोज्वळतेचे सर्टिफ़िकेट देणारे मात्र भरपूर असतात . धर्म नावाची विषवल्ली वाढली ती अशा सर्टिफ़िकेट वाल्यांमुळे .
सर्टिफ़िकेट कंपुला बडवणे हे माझे नास्तिक राजकारण आहे ! म्हणुन मी तुम्हाला कोंडीत पकडायचा प्रयत्न करतो आहे . मत बदलायला सांगत नाही.

आता सांगा बौद्धांचि मंदिर फ़ोडण्यामागे बुतशिकन च्या प्रेरणा आणि हिंदूची मंदिर फोडण्या मागे आर्थिक प्रेरणा असे तुमचे मत आहे का ? कि बुद्ध मंदिरे आणि मुर्त्या फोडण्याची कारणे हि आर्थिक होती ? मग तिथे पैसा कोणि भरला ? कोणाचा ? सांगा फ़टाफ़ट


-------------

२५ वे कलम 

 हिंदू धर्म व संस्कृती विषयी त्यांना (बाबासाहेबांना) प्रेम होतं ... उत्तम विनोदाबद्दल धन्यवाद . प्रेम असलेली गोष्ट सोडायची प्रतिद्न्या करणे म्हणजे जरा गंमतच नाही का ? असो घटनेतल्या कलम २५ ब मध्ये बुद्धाला हिंदुचा पंथ म्हटले आहे . हा विनोद तर सुपरच आहे.

२५ वे कलम धर्म स्वतंत्र्य देते. हे स्वातंत्र्य मर्यादित करण्यासाठी २५ (अ) घटनेत येते. आणि सामाजिक आर्थिक आणि राक्कीया बाबतीत धर्माविरुद्ध कायदे करण्याचे अधिकार सरकारला देते . २५ ब कलम सामाजिक सुधारणा आणि सर्व वर्गाच्या हिंदुना संस्थात्म्क धार्मिक संरचनेची तरतूद करते .

त्याचा विस्तार करताना घटनाकार लिहितात कि या २५ अ, ब कायद्या बाबत हिंदुचा अर्थ हिंदु, जैन , शीख आणि बौद्ध असे सर्व (वेगवेगळे) धर्म मानणारे असा घ्यावा . घटनेत अतिशय स्पष्टपणे Sikh, Jaina or Buddhist " religion" असा उल्लेख येतो . पंथ बिंथ हि संघाची थेअरी आहे . घट्नाकारांनि सामाजिक सुधारणा करण्यासाठी हिंदु धर्मात हस्तक्षेप करायचे हाक्क राखीव ठेवताना हा उल्लेख आहे . त्यात शीख जैन बौद्ध या "धर्मानाहि" हा कायदा लागू आहे असा अतिशय स्पष्टपणे -- बौद्ध धर्म असा उल्लेख आहे . हि पंथाची भानगड कुठून काढली ? या लिंकवर ते कलम पाहता येईल : http://indiankanoon.org/doc/631708/




हे इस्लामला मान्य नाही हो SSS …
.
शे - दिडशे बच्चु गोळ्या घालून ठार मारले . ...चला तालिबान्यांचा अजुनेक हल्ला … मलाला युसुफ्झाई च्या नोबेल बद्दल आनंद व्यक्त करणार्या धर्मद्रोह्यांना इस्लामी तालिबानने धडा शिकवला … भारताविरुद्ध पुकारलेला जिहाद असो कि अल कायदा च्या धमक्या …आता लगेच चोराच्या उलट्या बोंबा सुरु …. दहशतवाद, युद्ध हे कसे इस्लामला नामंजूर आहे याबद्दल दाखले काढले जातील …. इस्लाम हा किती पाप भीरु, सज्जन, पुरोगामी आणि शांततामय धर्म आहे त्याचे पवाडे ऐकू येतील …. कुराणातल्या भाइचार्याच्या काही मोजक्या आयतीही प्रसृत केल्या जातील … ठीक आहे ।
पण अल कायदाला हे पटत नाही….तालिबान ला पटत नाही आणि धर्मद्रोही / काफिरांची कत्तल करायची प्रेरणा कुराणातुनच मिळते असे त्यांचे म्हणणे आहे . तालिबानच्या छापील पत्रकातून कुराणातल्या काफिर कत्तलीच्या आयातीही येतात … कोणाचे खरे मानायचे ? अल कायदाच्या अरब अफ़्गाणाना इस्लामचे धर्म ज्ञान नाही ? कि त्या अफगाण - अरबाना कुराणाची अरबी भाषा समजत नाही ? कि तालिबानी कुराण वाचतच नाहीत ?
समजा तालिबानचे मत कुराण नुसार योग्य असेल तर ? … मुळात इहलोकात आचरण कसे असावे ? यासाठी कुराणाचे दाखले काढायची गरजच काय ? जर धर्मग्रंथ प्रमाण मानायचा असेल .......तर मग .......कुणाचे कुराण इण्टर्प्रिटेशन योग्य? ... याची आम्ही वाट पहात बसायची काय ? इस्लाम इस पीस होईल ? कि इस्लाम इस जिहाद होईल ? त्यावर आम्ही आमच्या मुलाबाळाचे भविष्य अवलंबून …. इस्लामी न्यायाकडे डोळे आसुसून वाट पहात रहायचे काय ? कि मुस्लिमांनी बुरखा / तलाकचा कुराणधर्म निर्णय काय ? याची डोळे आसुसून वाट पहायची ??
.
.
…. कि धर्म ग्रंथाचे पान मिटुन....... विज्ञान ग्रंथाचे पान उघडायचे ?
.
सर्वसाधारण पुरोगामी बांधव यावेळी इस्लाम धर्म रक्षणाचि भूमिका घेतात । आणि इस्लामचे गोग्गोड अर्थ सांगु लागतात . . ते चूक आहे .
मुस्लिम बांधावा वरचे प्रेम प्रदर्शित करण्यासाठी त्यांच्या धर्म रक्षणार्थ धावण्याची गरज नाही …
माणुस महत्वाचा। धर्म नाही …
रिलिजन पासून रिजन ( Reason ) पर्यंत जाणार … कि नाही ?
.
धर्माच्या जंजाळातून बाहेर पडुन बुद्धिवादाच्या दिशेने वाटचाल व्हायला हवी ….
इस्लामला काय मान्य आहे .. आणि काय अमान्य आहे ... हे अजिबात महत्त्वाचे नाही .. धर्म हि एक फालतू गोष्ट आहे …. नैतिकदृष्ट्या - माणुसकीच्या आणि शहाणपणाच्या आधुनिक चष्म्यातून काय योग्य आहे ? विज्ञान निष्ठ बुद्धिवाद ...रिसन Reason ते खरे....
.

- अभिराम दीक्षित

If astrology is a science .. then I am the Batman ...





गाढवांची मते 

गाढवांची मते नेहमीच ठाम असतात. ती बदलण्याची गरज त्यांना वाटतच नाही !

--------------------------------------------------------------------------
प्राकृतकन्या संस्कृत 
--------------------------------------------------------------------

प्राकृत चा अर्थ प्रकृतीत असलेली नैसर्गिक भाषा . आणि संस्कृत  म्हणजे संस्कार करून बनवलेली कृत्रिम भाषा . निसर्गातल्या कच्च्या मालापासून कृत्रिम गोष्टी बनतात. नैसर्गिक मातीवर संस्कार करून त्याच्या विटा बनवल्या जातात .   त्याचप्रमाणे  प्राकृतातून संस्कृत बनते. प्राकृत आणि संस्कृत हि त्या भाषांची नावेच इतकी स्पष्टवक्ती आहेत . 

भाषा तद्न्य विश्वनाथ खैरे यांच्या म्हणण्यानुसार - संस्कृत हि भारतीय भाषांची जननी नाही. तर सर्व भारतीय भाषा ह्या संस्कृतच्या पितृभाषा आहेत. संस्कृत चे व्याकरण आदी साचेबद्ध नियम पाहिले. त्या भाषेतली यांत्रिकता पाहिली ... तर सहजच लक्षात येते कि हि एक हेतुपूर्वक बनवलेली भाषा आहे. जागातील दुसरी कोणतीही भाषा इतकी नियमबद्ध नाही . त्यामुळे संस्कृत कळणे अवघड पण इतर भाषांच्या मानाने शिकणे सोपे असते . काही नियम पाठ केले  कि संस्कृत शिकता येते. 

संस्कृत भाषेचे गणिती नियम तिला स्थिर ठेवतात त्यामुळे हजारो वर्ष त्यातले श्लोक जसेच्या तसे राहतात - त्यात काना मात्रेचाहि  फरक पडत नाही . संस्कृत मधील शब्द मात्र विविध धातू पासून बनवले आहेत . हे धातू प्राकृत भाषातून उधार घेतले आहेत.   

द्रविड म्हणून वेगळी मानली गेलेली तामिळ भाषा उदाहरणार्थ घेऊ . 

हि भाषा संस्कृत पेक्षा अधिक पुरातन असल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत . 

तामिळ भाषेतला पेरू / पेरियार - संस्कृत मध्ये येताना पितृ झाला. आगायम  / आकाशं हा शब्द तामिळ मध्ये आकाश याच अर्थाने येतो . पाण्यासाठी संस्कृत आणि तामिळ मध्ये तंतोतंत एकच शब्द आहे तो म्हणजे 'नीर ' . भूमी हा शब्द तामिळ मध्ये भूमी/पृथ्वी  याच अर्थाने येतो . रक्त / रत्त हा शब्द या दोन्ही भाषात रक्त याचा अर्थाने येतो . 

ज्या दोन भाषातले जमीन , आकाश , पाणि, रक्त आणि पिता हे शब्द विलक्षण साम्य  दाखवतात - त्या दोन भाषा फार लांबच्या नातेवाइक असू शकत नाहीत . विश्वनाथ खैरे नि पुराव्या सकट शास्त्रीय पद्धतीने याचे मंडन केले आहे. आणि प्राकृत भाषांकडे संस्कृतचे सामाइक मातृत्व दिले आहे .

--------------------------------------------------------------------------
 एक्स्चेंज सेंटर :  संस्कृत 
--------------------------------------------------------------------------

कालौघात अनेक भारतीय भाषातले धातू संस्कृत मध्ये आयात करण्यात आले. त्यांची धातुसाधिते बनविण्यात आली. शब्द बनवण्याचे काटेकोर नियम पाणिनीय व्याकरणात आले. काळाच्या ओघात असा प्रचार झाला कि हि जननी भाषा ! मग इतर   भारतीय  भाषांनिहि  संस्कृतातून काही शब्द उचलले ...

त्यामुळे संस्क्रुत हि एक एक्स्चेंज सेंटर ठरली .

संस्कृत मधील साचे बद्ध  नियमाचा अजून एक फायदा आहे . तो म्हणजे यात नवे शब्द बनवणे सोपे जाते . कोम्प्युटर , केल्क्युलेटर ला मराठीत शब्द नाहीत . असूही शकत नाहीत . संगणक आणि गणकयंत्र हे आपण बनवलेले दोन शब्द इतके रूढ झाले आहेत कि ३० वर्षापुर्वीच्या मराठीत संगणक हा शब्दच नव्हता हे कोणास आज सांगूनही पटणार नाही.

वर्तमान पत्र , यष्टी रक्षक ,  टंकलेखक हे सारे शब्द सहज वापरत मराठीचा उलटा प्रवास संस्कृतच्या दिशेने चालू आहे काय ? असा प्रश्न पडतो . ज्ञानेश्वरीचा अध्याय आणि उद्याच्या वर्तमान पत्रातील आग्रलेख (हा हि  संस्कृत शब्द !) एकत्र पाहिले तर सहजच लक्षात येते कि मराठीत आधी कमी (तत्सम -तद्भव ) संस्कृत शब्द होते. आज जास्त आहेत .

 आजच्या बोली मराठीत सुद्धा संस्कृत शब्दांची टक्केवारी ज्ञानेश्वर कालीन भाषे पेक्षा अधिक आहे.

सर्वच प्राकृत भाषांनी नवे शब्द बनवण्यासाठी संस्कृतचा आधार घेतलेला दिसतो . त्यामुळे भारतीय प्रमाण भाषात कमालीचे साधर्म्य आले आहे .

लाऊड स्पीकर हा नवा शोध होता . त्यास देशी प्राकृत भाषात काही प्रतिशब्दच नव्हता. प्राकृत भाषात  आज सर्वार्थाने रूढ झालेले लाउड स्पीकरचे भाषांतर पाहू

१) मराठी =  ध्वनिवर्धक
२) मल्ल्याळम =  उच्च भासिनी
३) कानडी = ध्वनिवर्धक
४) बंगाली = शब्द  (बी) विवर्धक

प्राचीन भारतात छापण्याची कला अवगत झाली नव्हती . ज्ञान मुख्यत: मौखिक असे. पाठ करावे लागत असल्याने ते गाण्याच्या रुपात श्लोकबद्ध स्वरूपात संचित सोपे  होते.  त्यासाठी आखीव रेखीव गणितासारखी भाषा आवश्यक होती . समास - संधिविग्रहाचे काटेकोर नियम या गेयतेसाठी येतात.

सर्वच प्राकृत भारतीय भाषातले शब्द संस्क्रुत बनवताना धातू म्हणून उचलले गेले. याला लबाडी म्हणता येईल किंवा याकडे राष्ट्रीय एकात्मते  चे प्रतिक म्हणून पाहता येईल .पण तेंव्हाच असेही  लक्षात येईल कि देश असा कृत्रिम मार्गाने बनवावा लागतो .

संस्कृत हि ज्ञानभाषा ठरली याची कारणेही स्पष्ट आहेत . ज्ञान पाठ करण्यासाठीच संस्कृत चा जन्म झाला होता. पण पाठांतर घोकमपट्टी हि ज्ञानाची प्राथमिक अवस्था आहे . त्यानंतर विवाद - विचार - प्रयोग - नवनिर्मिती  असे बुद्धीला खुलवत न्यावे लागते. छापण्याच्या तंत्राचा उदय झाल्यानंतर संस्कृतचे महत्व कमी होऊ लागलेले दिसते. 

 तात्पर्य -

प्राकृत भाषा निसर्गाने   केली !
संस्कृत मानवे प्रयत्ने  निर्मिली !!

संस्कृत विरोधक आणि समर्थक या दोघांनीही हे  तथ्य समजून घेतले पाहिजे. 



http://www.aisiakshare.com/node/1351

 बुद्धिमापन 


शाळेतले मार्क म्हणजे बुद्धिमत्ता निश्चीत नाही . बुद्धिमापन चाचण्यातुन बुद्धिमत्ता मोजता येते का ? या चाचण्या कितपत विश्वासाहार्य असतात ? मनुष्याचे वजन, उंची, शारीरिक शक्ती (वेट लिफ़्टिग ) मोजणे शक्य आहे . दोन माणसांच्या वजनाची तुलना शक्य आहे . दोन माणसांच्या बुद्धिमत्तेची तुलना शक्य आहे काय ? आय क्यू चाचण्यातुन बुद्धिमत्तेचे मापन आणि तुलना करता येते का ? बुद्धिमत्तेची मापन आणि वर्गीकरण यापैकी कोणते साधन अधिक उपयुक्त आहे ?

सनातन प्रभात 

हे चातुर्वणाचे समर्थक आहे … मागच्या जन्मीचे गुण आणि कर्म पाहून या जन्मी काहीना (कर्म विपाक सिद्धंंतानुसार ) शुद्र बनवले जाणार आणि आणि या शुद्रांनी तथाकथित हुच्च जातींची सेवा करायची आहे . खालच्या जातींनी आमची सेवा करावी डोक्यावरून मैला वाहून न्यावा … इत्यादी ब्राह्मणी मनोराज्ये सनातनचे पप्पू आठवले २० १ ३ सालीही पहात आहेत … मागच्या जन्मीचा हिशोब या जन्मी चुकता करण्यासाठी किती बहुजन तयार आहेत ? सनातन च्या तालावर डुलणार्यांना हि गुलामगिरी मान्य आहे काय ? सनातन बिनडोक आहे पण त्यांची ताकद वाढते आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . त्याना जे धर्मराज्य आणायचे आहे. त्यात ज्या धर्माचे राज्य येणार आहे त्यानुसार हे भोग भोगायला किती लोक तयार आहेत … आणि याला प्रतिक्रिया म्हणुन जर कडवी हिंदुविरोधी लाट आली तरीही हिंदुत्व वादि सनातनच्या या पप्पू ला पाठीशी घालणार आहेत काय ? पप्पूच्या पिवळ्या सनातनी बेनर खाली बसणार आहेत काय ? तसे असेल तर सनातन बरोबर त्याचे पाठिराखेहि भविष्यात मार खातील हे असा माझा अंदाज आहे

या गोष्टीना केथोलिक चर्च एक्ष्सोर्सिसम म्हणते . कोणत्याहि भारतीय दर्शनात आणि तत्वद्न्यानात भूत उतरवणे वगैरे गोष्टी नाहीत … सनातन प्रभात एक विकृत पंथ आहे आणि त्याचा हिंदु धर्माशी कोणताही संबंध नाही . हे सहाव्या पातळीचे मांत्रिक वगैरे गोष्टी कोठून आणल्या ??? हा विकृत वेडाचार्यांना अनिस चा का राग आहे हे तरी समजून घ्या . या विकृताना हिंदु धर्माच्या रक्षणाचा वगैरे आव आणताना आणि त्यामुळे सगळे हिंदुत्व वाडी एका मिशनरी संस्थेच्या मागे उभे राहतान मजा वाटते आहे …
भूत मांत्रिक वगैरे गीतेच्या कोणत्या अध्यायात आहेत ? पण पप्पू आठवलेच्या घरात आणि व्हिडियोत भूतेच भुते !
सहाव्या पाताळातून पप्पू आठवले वर हल्ला करणारी मांत्रिक या व्हिडियोत प्रत्यक्ष पहा (वेळ २:३ ० मिनिटे यु ट्युब लिंक क्लिक करा )


सरकारचे अभिनंदन ! जादुटोणा विरोधी बिल पास झाले … आता या पप्पू आठवलेला , कोल्हापूर पोलिस स्टेशनात टायर द्या … हे हलकट खुनाचा आनंद व्यक्त करत आहेत । हे तर त्यांच्या वेब साइट वर दिसतेच . बाकी गोळ्या झाडणारे कुणीतरी फालतू भाडोत्री असतात । त्यामागचे सडके मेंदु शोधून काढायला हवेत … दाभोळकरांबद्दल खोटा द्वेष पसरवायचे काम कोण करत होते … त्यांचा खून होईल अशी परिस्थिती कोणि निर्माण केली ??? दाभोळकरांच्या विरुद्ध विषारी गरळ ओकणारे त्यांचे खरे मारेकरी ठरतात . त्या द्वेषाची रोपटी लावणार्या सनातन प्रभात आणि त्यांचा पप्पू गुरुजी पण अटक झाला पाहिजे .भिकारड्यांचा मस्तवाल पणा पाहाच … एका सज्जन माणसाचा खून झाल्यानंतर - या हलकट संताला कशा आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत ते पहा . पप्पू आठवले हा सनातनचा मुख्य गुरु आहे . यांची विकृती आता निषेधाच्या पलिकडे गेलेली आहे . सनातनचा बिमोड झाला पाहिजे .



अमेरिकन राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते ?

यावर एका गुंड मुलाचे हे उत्तर - (युट्युब विडियो )
"मी एक भणंग टपोरी पुंड आहे. अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा तसाच पुंड असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आमच्यासारखे बुद्धीमान नसलेले पुंडच काही तरी करतात. ते कधी बरे असते तर कधी वाईट असते. पण आम्ही काही तरी करतो. तुम्ही नाकर्ते नपुंसक असता. तुम्हाला काहीच करता येत नाही. जे काही आमच्यासारखे लोक करतात, त्याचा अर्थ लावण्यातच तुमचे भाकड आयुष्य संपून जाते. राहिली गोष्ट अमेरिकन राज्यघटनेची. ती कधीच परिपुर्ण नव्हती. ज्यांनी ती घटना बनवली, त्यांनाही ती परिपुर्ण नाही याची कल्पना होती. म्हणूनच त्यांनी त्यात काळ व गरजेनुसार बदल, दुरुस्ती करण्याची तरतुद करून ठेवली आहे. तेच तर त्या घटनेचे वैशिष्ठ्य आहे."

http://www.youtube.com/watch?v=KljW_U2122U





देवालयाकडून शौचालयाकडे - 


मोदींचे विधान धक्कादायक नाहीच ! मोदींच्या सह जे नव हिंदुत्व जन्माला आले आहे त्याची नाळ फार काळ मंदिराशि जुळलेली राहणार नव्हती . राहणार नाही .
मुस्लिम विरोध आणि वैद्न्यानिक विकास याकडे मोदित्व जाणार हे उघड आहे . हिंदुत्वाची लाट उसळली ती यज्ञ यागासाठी खचितच नव्हती . राजीव गांधिंनि सेक्युलर ढोंगिपणा करत शहाबानो केले नसते तर हिंदुत्व जन्म्लेच नसते . हिंदुत्वाचे पालन पोषण कोणि केले ? सेक्युलर ढोंगिपणा संपत नाही तो पर्यंत मोदीत्व वाढत जाणार …
मोदिनी सत्तेत आल्या आल्या गुजरात मध्ये विश्व हिंदु परिषद बंद पाडली हि तर नुसती सुरवात आहे !
शौचालय तो झाकी है … बहुत कुछ बाकी है … मंदिरापेक्षा शौचालय लय भारी म्हणणारा माणुस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो ! आणि हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होऊन बनू शकतो ! विरोधकांना हिंदुत्व चळवळीची शक्तिस्थाने अजून तरी समजलेली दिसत नाहीत .

http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2013/10/blog-post_3351.html


स्वातंत्र्य नव्हे सत्तांतर

इथे भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमके काय झाले ते समजून घेतले पाहिजे. सहसा स्वातंत्र्य कसे मिळते ? जुन्या राज्य कर्त्याचे मुंडके उडवले जाते आणि त्याचा राजवाडा जाळून नवा राजा किंवा सत्ता येते . शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोर्याला खतम केल्यानंतर त्याच्या सिंहासनाला लाथ मारली होती .American / French Democracy ... How it established ? After Killing the Previous Rulers only ! ब्रिटिश व्होइसरोय भारतातून गेला तेंव्हा बिगुल वाजत होते आणि भारतीय सैन्य त्याला सलामी देत होते . भारताला करार करून स्वातंत्र्य मिळाले आणि त्याला सत्तांतर ( Transfer Of Power) असे म्हणतात . बरे हे करार करणे कधीपासून सुरु होते ? गोलमेज परिषदा भरत होत्या . ब्रिटिश भारतीयांनाच विचारत होते - तुम्ही एकमुखी मागणी करा आम्ही मान्य करतो.
ब्रिटिश लायब्ररीने या सत्तांतरा सबंधित सर्व कागद पत्रे प्रकाशित केलेलि आहेत .

http://www.bl.uk/reshelp/findhelpregion/asia/india/indianindependence/transfer/transfer1/

ब्रिटिशांचा युक्तिवाद असा होता कि , भारत हे एक राष्ट्र नाही त्यात अनेक संस्थाने, जाती, धर्म यांची स्वतंत्र राष्ट्रके आहेत . एकतर या सर्वांनाच वेगवेगळे स्वतंत्र करावे किंवा सर्वांनी एकत्र एकमुखी मागणी करावी.
हिंदु - मुस्लिम , दलित - सवर्ण , संस्थाने - ब्रिटिश इंडिया कोणाचेच एकमेकात पटत नव्हते - स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना कशी असावी ? स्वतंत्र मतदार संघ असावेत का ? असल्यास कोणाला ? अल्पसंख्य - दलित यांना जादा हक्क असावेत का ? कोणाचेच एकमत होता होत नव्हते . म्हणुन स्वातंत्र्य लांबणीवर पडत होते.
स्वातंत्र्य मिळवणे याचा भारता संदर्भात अर्थ होता - सर्व जन समूहांनी एकत्र टेबलावर बसून वाटाघाटी करून भावी स्वातंत्र्याचि योजना बनवणे . सत्तांतर ( Transfer Of Power) च्या योजनेबाबत जनासामुहात ऐक्य होत नव्हते हि खरी रड होती .

 

आम्हा नास्तिकांच जगण साल लई अवघड आहे ।

श्रद्धाळुंना सावरायला ग्रह तारे आहेत । त्यांना भविष्य जाणता येतं । श्रद्धांना आधार द्यायला फलज्योतिष आहे । फारच झाल । तर एखाद्या अंगठितल्या पिवळ्या ग्रहाचा खडा किंवा याद्निक कर्मकांड किंवा सहस्त्र ब्राह्मण भोजनाची लाच चालून जाते आणि भविष्य बदलाता हि येतं ।
नारायणाचा नागबली काही म्हटलं तरी वरडुन सांगतो … भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे । त्याना सगळीकडून कोन्फ़िडन्स मिळत असतो । नोकरी गेली कारण शनि पेटला , छोकरी पटली कारण गुरुवारचा नारळ । पोरगी झाली तर पूर्वजन्मीच पाप आणि बढती पाहिजे असेल तेल शनीला वाहा एक माप ।
भूतकालाची कारणमिमांसा आणि भविष्याचा अंदाज आस्तिकाला पक्का असतो । लफडा नास्तिकाचा आहे । जगायच का ? आणि कोणासाठी ? समाजासाठी ? देशासाठी ? माणुसकीसाठी ? हि तर सगळ्यात मोठ्ठी अंध श्रद्धा आहे !



मी नास्तिक नाहीच ,मी " कुस्तिक" आहे


 सायबाची इंग्रजी भाषा लई भारी आहे . त्यात तीन शब्द आहेत . तिन्ही शब्दांचे अर्थ चढत्या भाजणीने अधिकाधिक वर जातात ,, गुड , बेटर ,,बेस्ट सारखे ..... Agnosticism , Atheism , Anti - theism …… Agnosticism (अज्ञेयवादी )म्हंजी माहित नाय बुवा देव हाय का नाही ? ...... , Atheism ( नास्तिक ) देव अस्तित्वात नाही ... Anti - theism (धर्मद्रोही - देव विरोधी ) देव नाही आणि तो नाही हे मी पटवून सांगणार …. आपल्याकडे मात्र एकच। नास्तिक । साला आम्ही भारतीय लोक चार्वाकाचे सुपुत्र आणी आमचे शब्दभांडार नास्तिक वरच अडकावे ??? . सपष्ट सांगतो ....नास्तिक हा शब्द पुरेसा नाही … मी नवा शब्द सुचवतो …. .... ... " कुस्तिक " ( Anti-theist ) म्हणजे देवाचा - धर्माचा कट्टर विरोधक … मी धर्माशी कोल्हापुरी कुस्ती खेळणारा धर्मद्रोही ......... " कुस्तिक "( Anti-theist ) आहे ! मी नास्तिक नाहीच ,मी " कुस्तिक" आहे…


जाती


ते आणि आम्ही अशा जगात एव्हढ्याच दोनच जाती नसतात
प्रती पुरो गामी पेक्षा जास्त कंगोरे सामाजिक संघर्षाला असतात


सध्या जाती संघटनांचा बराच बोलबाला आहे . लहान उपजाती मोडुन एक मोठ्ठी जात निर्माण करण्याचे हे प्रयत्न असतात . म्हणजे देशस्थ - कर्हाडे - कोकणस्थ असे वाद मिटवून ब्राह्मण सारा एक म्हणणे किंवा धनगरांच्या पोटजाती मोडुन धनगर एकता करणे . कुणबी मराठा एकच म्हणणे . हि एक राजकीय जातीय ध्रुविकरणाचि पद्धती आहे . आणि टोळी - जात अवस्थेकडुन वर्णव्यव्स्थे कडे होणारे संक्रमण आहे .

पूर्वी गुणकर्मानुसार वर्ण देणारी आदर्श वर्ण व्यवस्था होती …. आणि चार वर्णांच्या फुटून चार हजार जाती झाल्या असे बहुसंख्य लोकांना वाटते. ........निदान मला तरी ते खरे वाटत नाही . कारण महाभारत किंवा रामायणात वर्णांचे उल्लेख असले तरी प्रत्य्क्षात दिसतात त्या जातीचा . कर्ण वैश्य नव्हता , शुद्र नव्हता - तो सूतपुत्र च होता . मनुस्मृती मारे कितीही दामटुन वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करो . प्रत्यक्षात मनुस्मृतीत उल्लेख आहे तो चांडाल , परिट अशा जातिंचाच .

म्हणजे जात हे हिंदु समाजाचे वास्तव होते आणि आहे . चार वर्णातुन चार हजार जाती निर्माण झालेल्या नाहीत …. चार हजार जातींचे चार वर्णात वर्गीकरण करण्याचा तो एक कृत्रिम आणि अनाहूत प्रयत्न दिसतो . कोणि त्या प्रयत्नाकडे :

१) चार हजार टोळ्यांचे संघटन म्हणुन पाहिल

२) तर कोणि सुखासुखी जगणार्या चार हजार टोळ्यांत विषमता निर्माण करण्याचा मनुवादी प्रयत्न म्हणुन पाहिलं .

म्हणजे वर्ण निर्माण करणे हे रचलेले कारस्थान आहे … नैसर्गिक आहेत त्या लहान - लहान टोळी वजा जाती . पण मतांच्या लोब्यांसाठि लहान जातींचे संघटन करून मोठ्या जाती निर्माण करणे राजकारणात क्रमप्राप्त बनले आहे . लहान जाती एक करून त्यांच्या मोठ्ठ्या जाती बनणे … पुढे या मोठ्ठ्या जाती एका करण्यासाठी …वर्ण ?

असो मुद्दा असा आहे कि सध्याची राजकीय जातीय ध्रुवीकरण पद्धती हा लोकशाहीचा साइड इफ़ेक्ट आहे . आपण विकृत बनवलेली हि जातीय लोकशाही …. जातिसंघटनेकडुन … वर्णव्यव्स्थे कडे पाउले टाकते आहे काय ?





कोंग्रेस एक शोध - 

दिनांक : ८ - १ब - ३०४०
(नेमाडे गुरुजींची क्षमा मागून . )
फार फार वर्षापूर्वी आपल्या देशात एक कॉंग्रेस नावाचा पक्ष होता. आता तुम्ही विचाराल कि कोग्रेस म्हणजे काय ? - तर अशा नावांचे बरेच पक्ष प्रागैतिहासिक भारतात आणि भारताबाहेरही होऊन गेल्याची नोंद आहे . मात्र हा सर्व मिळुन एकच पक्ष होता का ? तृणमूल , राष्ट्रवादी , एस , आय असे वेगवेगळे पक्ष होते ते ध्यानात येत नाही . मात्र त्या काळच्या एका निरुपयोगी गवतालाही हा शब्द वापरला जात असे.
तर हा कोङ्ग्रेस पक्ष राजकारण करत असे . त्यासाठी निवडणुका इत्यादी लढवत असे . तर निवडणुका म्हणजे गोरगरिबात पैसा , अन्न धान्य, धान्य आंबवून केलेले आंबट पदार्थ वगैरे वाटणे. नंतर असे वाटप कार्य वगैरे झाल्यावर कॉग्रेस लोकसभा नावाच्या इमारतीत वर्षातले काही दिवस बसून इत्यादी राहत असे . मग कोंग्रेस बाहेर पडुन देशभर भटके. यात किती लोक सामील होते ? ते मात्र सांगता येत नाही . पण त्याना आतला आवाज नावाचा काहीतरी वेशिट्य पुर्ण अवयव वगैरे होता . पुढे मानवी उत्क्रांतीत तो अवयव नष्ट झाला . मग त्यातल्या काही लोकांनी भाषणे देणे कागद फाडणे वगैरे कृत्ये केल्याची नोंद आहे . त्यामुळे चिडून जाउन कोणीतरी त्यांना झाडूने हाणले अशा अर्थाच्या कविता आणि व्हिडिओ जुन्या कोम्पुटर चीप वगैरे मध्ये मिळाल्या आहेत . त्या काळात सुनामी लाटा थांबवण्याचे कोणतेहि तंत्र विज्ञान मानवाजवळ वगैरे नव्हते . तरी एका चाहाच्या लाटेत पक्ष कसा बुडाला हे सांगु शकत नाही . हे कोंग्रेस लोक विचारवंत इत्यादी नावाच्या त्यांच्या टोळीच्या पुजार्यांना फार मान वगैरे देत असावेत . आणि त्या काळचे बरेचसे पुजारी वगैरे या कोंग्रेस चे सदस्य इत्यादी असावेत असे अनेक जुन्या अभ्यासकांचे इत्यादी म्हणणे आहे . हे सर्व पुजारी चहाची लाट वगैरे थांबवण्यासाठी काही तत्कालीन कर्मकांडे इत्यादी करत असावेत .
तर तुम्ही विचाराला तर कोङ्ग्रेस हे सर्व का करत असे ? कारण ते सेक्युलर , पुरोगामी इत्यादी होते वगैरे म्हणून . आता तुम्ही विचाराल कि म्हणजे काय ? तर हा निवडणुकीपूर्वी वाटायचा गोड - कडु आंबलेला पदार्थ इत्यादी असावा , जुने अभ्यासक याला कर्मकांड मानतात … पण काही अभ्यासकांच्या मते हि एक सुंदर वगैरे स्त्री होती । अटारी पती न मिळाल्याने जन्मभर ब्रम्हचारी वगैरे राहिली , तर तुम्ही विचाराल कि ब्रम्हचारी म्हणजे काय … तर … (अपुर्ण )





जादुटोणाविरोधि सचित्र कायदा

जादुटोणा कायद्या विरुद्ध भंपक खोटा प्रचार सनातन्यांनि केला . हिंदु हिंदूची माळ जपत त्यांनी राष्ट्रभक्त राजकीय पक्षांना आकर्षून घेतले. ह्या सनातन्यांना स्त्रियांचे शोषण करणार्या देशी बुवा बाबांकडून पैसे मिळतात . जातिभेदाला उत्तेजन देऊन हिंदुस्थान खलास करण्यासाठी ह्यांना परदेशातून पैसे मिळतात . म्हणुनच हे हलकट एकविसाव्या शतकात जन्माधिष्ठित चातुर्वण्याचा प्रचार करतात . आणि आधीच दुभंगलेला - हिदू समाज अजून फोडतात . जादू टोणा विरोधी कायद्यावर केलेले सर्व आरोप साधार खोडून काढण्यासाठी अवश्य वाचा - जादुटोणाविरोधि सचित्र कायदा . संपादन युवराज मोहिते .

या पुस्तकात सर्व संत राष्ट्रभक्त यांची वचने आहेत . या पुस्तकात नरेंद्र दाभोलकरांनि केलेले आक्षेप खंडनही आहे . मुल्य १० रुपये ( मला व्यक्तिगत मेसेज केल्यास पुस्तकाच्या हव्या तितक्या प्रती मोफत पाठवल्या जातील)


ऐका हो ऐका -- अबू आझमी आणि सनातन प्रभात यांच्यात एकमत झाले आहे . --

मातम आणि कुर्बानी यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला, तर ते समाजाला पटणार नाही ! - अबू आझमी, समाजवादी पक्ष
संसदही दिवस आणि तारिख पाहून चालू केली जाते. काही चमत्कारांचा तर मी स्वतः साक्षी आहे. कुराणमध्ये 'जीन' अर्थात भूताचा त्रास असेल, तर जीनतला जाण्यास सांगितले आहे. कुराणमध्ये जे काही सांगितले आहे, ते खोटे असूच शकत नाही. ताबीजमध्ये कुराणच्या आयता असतात. उद्या या कायद्यानुसार मातम आणि कुर्बानी यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला, तर समाजाला (मुसलमानांना) ते पटणार नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील रेष काढणे अत्यंत अवघड आहे. बंगाली बाबांसारख्यांचा जाहिरातींच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांच्यावर जरूर कारवाई व्हायला हवी. मोक्का, पोटा लावल्यामुळे निर्दोष अनेक वर्षे कारागृहात खितपत पडले. या कायद्यामुळे असे होऊ नये, यासाठी निर्दोषांवर कारवाई करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्याचे कलम यात असावे आणि अत्यंत सूक्ष्मतेने अभ्यास केल्यानंतर हे विधेयक संमत केले जावे
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2013/12/blog-post_5172.html


आणखी एक : हिदु मुस्लिम सनातन्यांचि युती : http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2013/12/blog-post_3878.html#more

डाव्यांची उजवी बाजू


अतिशय सभ्य पणे बौद्धिक वाद विवाद करण्याचे सामर्थ्य कोणाकडे आहे ? निदान महाराष्ट्रात तरी ? हे कोण करू शकतो ? लोकशाहीचा पप्पा आणी पुरोगामिपणाचा फादर म्हणजे व्हॉल्टेर हा फ्रेंच विचारवंत. तो म्हणाला होता. "I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it" . तुझे विचार मला अजिबात मान्य नाहित. पण वेगळे विचार बाळगण्याच्या - तुझ्या हक्काच्या - रक्षणासाठी - मी मरण पत्करायला तयार आहे. याला म्हणतात पुरोगामीपणा ! माणूस विचार करणारा प्राणी आहे यावर श्रद्धा बाळगणार्‍याला मी पुरोगामी म्हणेन. चर्चा करून समोरच्याचे विचार बदलता येतात हा पायाच आहे आहे पुरोगामीपणाचा. आणि या चर्चेत स्वत:चेही विचार बदलतात । बदलायचे असतात । याला लर्निंग प्रोसेस । किवा मर्हाटीत शहाणपणा म्हणतात । । अशा प्रकारे ज्ञानाचे आदान प्रदान करत समाज प्रगतीच्या दिशेने पुढे न्यायचा. गामी म्हणजे जाणारा पण जायच कुठे ? पुरो - प्रगतीच्या दिशेला. पुरो - गामी.

उभ्या महाराष्ट्रात … हमरीतुमरीवर - हाणा मारीवर न येता … चर्चा करण्याचे सामर्थ्य आणि तेव्हढि बौद्धिक संपदा फक्त समाज वाद्यांकडे आहे … बाकी जाती धर्माचा उद्धार न करता कोणती विचारधारा बोलते ? समाजवादी असा चेष्टेचा विषय म्हणून मला अनेकांनी अनेकदा हिणवले आहे . मी समाजवादी नाही . पण समाज वाद्यांच्या बौद्धिक संपदेपुढे नम्र आहे . आणि समाज वाद्यांच्या प्रामाणिक भाबडे पणाचा मला नेहमीच हेवा वाटत आला आहे …

आणि या चर्चेत स्वत:चेही विचार बदलतात । बदलायचे असतात । याला लर्निंग प्रोसेस । किवा मर्हाटीत शहाणपणा म्हणतात । ।


धूम पाहिला :


 अमिर खान हा एक गुणी आणि चोखंदळ कलावंत आहे या अंधश्रद्धेचे निर्मुलन झाले . पट्ठ्याने थेट रुक रुक खान सारखा तोतरा अभिनय (?) केला आहे . त्यापेक्षा फेस मास्क खात्रीना कैफ आणि मंदबुद्धि उदय चोप्राने अभिनय बरा केला आहे . बाकी बच्च्नांचा अभिषेक अजून दोस्ताना च्या 377 भूमिकेतून बाहेर आलेला नाही …। एव्हढ्या मोठ्या तगड्या स्टार कास्ट वर कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहे …. अजून थोडा खर्च करून गीतकार , संगितकार , आणि लेखक यांना थोडे पैसे दिले असते … तर त्यांनी काही काम तरी केले असते . … दिग्दर्शनाच्या नावाने बोंब … प्रत्येक फालतू Twist फ़्लेश्बेक मंदि बाळबोधपणे उलगडण्यात लई वेळ घालवलाय … असो । फिजिक्स चे नियम तोडण्याचा मक्ता फकस्त सिंघम्करांचा राहिलेला नाही … धूम कारांनी गाड्या हवेत उडवण्यात त्यांना मागे टाकले आहे. … खत्रिना चे एक कपडे उतारू गाणे बर्यापैकी प्रेक्षणिय आहे । पण ती बिकिनीत आलेली नाही हे मंड्ळाच्या सदस्यांनी लक्षात ठेवावे .

अग्रलेख 


अमेरिकेचे राश्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा याना मी सांगू इच्छितो कि … असे लेख नाशिक कोल्हापुरच्या स्थानिक वृत्तपत्रातून संपादकीय म्हणुन येत असतात त्याची आठवण झाली



माझ्या आयुश्यावर प्रभाव टाकलेली दहा पुस्तके :

१) अकरा कोटि गेलन पाणि : अनिल बर्वे
२)फ़ास्टर फेणे : भा रा भागवत
३) अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज : Jules Verne
४) महाराष्ट्राची शोकांतिका : अरुण सारथी
५) गांधी आणि कोन्ग्रेस ने अखंड भारत का नाकारला ? शेषराव मोरे
६) मुस्लिम मनाचा शोध : शेषराव मोरे
७) लोकमान्य ते महात्मा : सदानंद मोरे
८) मनुस्मृती समीक्षा : नरहर कुरुन्दकर
९) कोसला : भालचंद्र नेमाडे
१० ) आंबेडकरांचे अंतरंग : द न गोखले

धडा पहिला : शाळेतली दूरचित्रवाणी

शरद शाळेत जा . छगन टीव्ही लाव . बबन भाषण ऐक .
अजित करंगळी खाली कर . नारायण एका जागी बसून निट लक्ष दे. जितेंद्र मागून दिसत नसेल तर दहीहंडी करून पहा .
किरीट बोंबलु नकोस...उद्धव फोटो काढ
राज सिगरेट ओढू नको
आबा लक्ष देवून ऐक

  शाळेचा ड्रेस खाकी चड्डी अन पांढरा शर्ट -अमित तू हे काय घातले आहेस? गळ्यातून मफलर काढ - छगन मफलर नीट बांध. राहुल शेंबूड पूस अन तुझे मित्र बाकीचे कुठे लपून बसले आहेत. कपिल , सलमान , शीला , कोणत्या सिनेमाला गेले आहेत . केजरीवाल किती दिवस आजारी आहे

उद्धव राज मारामार्या बंद करा..! देवेंद्र लाकडाच्या घोड्यावरुन उतर खाली..विनोद बस तू दोन मिनिट घोड्यावर..! घड्याळ फोडायचय का ना तुला?

 किरिट शाळेत का नाही येत .?
अभिराम सर ! त्यानं ना पोलीसालाच दगड मारला..
तवापास्न मामाच्या गावाला पळालाय त्यो..!!

अमित शर्टाच्या वरच्या गुंड्या लाव.
भांडणं लावू नकोस.

उद्या आपल्या शाळेचे संस्थाचालक आदरणीय माेहन भागवत गुरुजी येणार आहेत तरी सर्व विद्यार्थ्यानी� उपस्थित रहावे
उपस्थिती बंधनकारक :
उद्याचा कार्यक्रम :- आपल्या शाळेचा गुणी विद्यार्थी नंरेद् माेदी चा राष्ट्रीय वकृत्व स्पर्धेत प्रथम कृंमाक मिळविल्याबद्ल भागवत गुरुजी यांच्या हस्ते सत्कार व शेवटी सहभागी विद्यार्थी्या्चां सत्कार व बषिस वितरन साेहळा
(सेवाभावी उद्योगपती आंबानी व आडानी यांच्या संयुक्त विद्यमाने)
लालकृष्ण घरी रडतोय,
सरांनी त्याचं नाव शाळेतून काढलं.
राजनाथ, वर्गाबाहेर जा आणि ओणवा होऊन अंगठे पकड..
 दिग्विजय .. अमृता...
हे असले धंदे वर्गाबाहेर करा...

नितीन हि डबा खायची वेळ नाही . मधल्या सुटीत खा . स्मृती केमेरा उचल . तू मोनिटर आहेस . उमा भांडू नको . सुषमा रुसू नको . नरेंद्र भाषणाला सुरवात कर … " मित्रो...
चला पोट्टिपोट्ट्यानो बजाव ताली .

 (पोस्ट आणी त्यावरील मित्रांच्या कोमेंटा )

" महापुरुष आणि सामान्य स्त्री "

डाव्या उजव्या लाल भगव्या निळ्या अशा हरेक चळवळीत " महापुरुष " या शब्दाचे सध्या फार स्तोम आहे . हि काय भानगड आहे ? हा शुद्ध माजोरडा शब्द आहे … महापुरुष का ? त्यांकडे असे कोणते पौरुष "महा " प्रमाणात असते ? आणि ते पौरुषत्व मोजले कसे ? बहुसंख्य चळवळ लोक्स "इतर" स्त्रियांबद्दल कमालीची अनुदार भूमिकाही घेताना दिसतात । हा "महापुरुष" शब्द हे सडके अपत्य अशा पुरुषी मनोवृत्तीची पैदास आहे … आदर्श , महात्मे हे सर्व शब्द विसरून - " महापुरुष " हा शब्द रूढ बनत चालला आहे .
बर एकदा पुरुषाचे "महा" त्व प्रस्थापित झाले … कि त्याचे खरे - खोटे अपमान … भावना दुखावणे वगैरे रेग्युलरली सुरु होते … रेडिक्युलस । Male chauvinist pigs ...माजोरडि पुरषी डुकरे


आज मला कोणि तरी ब्लोक केले … 


पहिल्यांदाच … त्या वेळी एक सुभाषित आठवले :
गच्छ सूकर भद्रं ते वद सिंहो मया हृतः ।
पण्डिता एव जानन्ति सिंह सूकरयो र्बलम् ॥
अर्थ :
अरे जा डुकरा । जा । । तुझे भले होवो … सिंहाला मी हरवले अशी तुझी दर्पोक्ती आहे… पण डुकराचे बळ सिंहासमोर ते काय ? हे विद्वान जाणतातच !

सत्तेची नाव

रया गेलेलं सरकार , निस्तेज चेहेरे ,पूर्णपणे खचलेला आत्मविश्वास आणि म्हणे : सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा … हाहा

सत्तेची नाव बुडायला लागली कि काय होते ? हुशार उंदीर जहाजाबाहेर पळतात ... दुसरे मजबूत जहाज शोधायला … भनजाळलेले उंदीर एकमेकाच्या शेपट्या चावतात आणि अतिशहाणे उंदीर उद्धटपणे विचारतात की .... बोट बुडतिय कुठे ?

पवार भक्तो ….


 तो साई बाबावर टिका करणारा शंकराचार्य कोङ्ग्रेसचा आहे हो … त्याने संघाच्या राम जन्मभूमी आंदोलनालाही उघड विरोध केला होता …. मोदीविरोधी वक्तव्येही केली होती … पवार आणि त्यांचे भक्त कोंग्रेसच्या शन्कराचार्याचे विधान घेऊन भाजपवर टिका करत आहेत..... … हाहाहाहा …फेकुगिरी केली तरच सत्ता मिळते असे काही नाही … अजून बर्याच गोष्टी कराव्या लागतात … शिकतील हळु हळु … फेसाबुकी प्रचारात … नये है वह ! The Shankaracharya of Dwarka is reportedly close to the Congress and has made adverse comments regarding the Gujarat CM in the past. http://zeenews.india.com/…/swami-swaroopanands-answer-to-na

थॉट क्राईम

लोकशाहीच्या विरोधकांचा मताधिकार काढून घ्या
स्वातंत्र्य विरोधकांना तुरुंगात डांबा
धर्मांधते विरुद्ध लढण्यासाठी नवा धर्म काढा
जातीयवादी जातीना धडा शिकवा
समतेच्या विरोधकाना गुलाम बनवा
हिंसेच्या समर्थकांची मुंडकी उडवा
असत्याशी सामना असत्यानेच करता येतो
प्रेमात आणि युद्धात सार क्षम्य असत रे बाबा !
पटतय ना पोट्ट्यानो !!

कवी - जारज अभिराम्वेल

उमा भारती म्येडम


 यांचे बुद्धिमत्तेविषयी मला आज लई आदर दाटुन आला न भाऊ ! मागे उत्तराखंडात पूर येउन हजारो माणसे मरण पावली होती । अशा जल आपत्तींचे निराकरण करण्याची जवाबदारी स्वीकारलेल्या नदी मंत्रीमहोदय … उमा भारती मेडम ज्याम हुश्शार दिसतात . नास्तिक लोकांनी शी - शी करून पवित्र नदी बाटवलि आणि त्यामुळे केदार नाथ चा पूर आला म्हणाताहेत …. हायला चुकलाच कि … सनातन हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे पवित्र असलेल गोमुत्र पयलेच शिपडुन समद्या नद्या शुद्ध करायला पायजेल ! मग पूर येणार नाही आणि अजित दादाची नोकरी बी जाणार मंग ! चला रे पोट्ट्यानो बोला सनातन हिंदू धर्म कि जय !!
http://www.hindustantimes.com/…/uma-b…/article1-1264697.aspx

हस्तलल्ल

लहानपणापासून मी चायनीज फ़ुडचा उपभोक्ता ग्राहक आहे . हातगाडीवरच्या नेपाळी आचार्याने मुठभर लसुण तेलात चरचरवत आणि त्यावर लाल रंगाच्या सोसचि उधळण करत तयार केलेले कोबियुक्त चायनीज म्हणजे जबराटच प्रकार … आधी त्यातले चिकनचे तुकडे वेचून खायचे मग उरलेला ट्रिपल राइस … मी आणि आमचे धाकटे बंधू यास कोडवर्ड मध्ये हस्तलल्ल्ल म्हणत असू . लहानपणी शाळकरी वयात घरातच जेवणे सक्तीचे होते आणि बाहेरचे खाणे निषिद्ध …. तरीही आम्ही दोघ बंधू चोरून - मारून बाहेरच्या - विकतच्या चिन्यान्नाचे नियमित सेवन करत असू …. बाहेर चायनीज खाल्लाय का ? हे तापासण्यासाठि आई हातावरचा लाल रंग चेक करत असे … घरात येण्याआधी तो लाल रंग चोळून चोळून नाहीसा करावा लागे म्हणुन नाव ठेवले हस्तलल्ल… तेव्हा हे हस्तलल्ल करण्यासाठी धडपडायचो ……. आता खर्याखुर्या चीन मध्ये आहे ; आणि त्यांचे खरेखरे जेवण असह्य होते आहे … बेचव , दुर्गंधीयुक्त तर आहेच परत कांदा लसुण तेल तूप दुध दही पनीर गहू लोणी मिरची .आणि लाल रंग .....यातला एकही पदार्थ या जेवणात नाही …. साला आपल्या कडच्या चायनीज गाड्या शांघाय मध्ये लावल्या तर लई भारी बिजनेस करतील …. इथल्या चीनी आचा

राष्ट्रीय हिंदुत्व


दाभोळकरांचा निषेध करायला एकजूट झालेले राष्ट्रीय हिंदुत्व ऐहिक जागावाटप आणि मुख्य मंत्री पदासाठी चक्काचूर झाले आहे …. हाय रे देवा …. छत्रपतींच्या आशीर्वादाने , पेशवाईच्या पराक्रमाने आणि क्रांतीकारकांच्या रक्ताने पावन झालेल्या धारोष्ण हिंदुत्वावर हि गायाळ वेळ यावी ? घायाळ झालेले राष्ट्रभक्त रक्त उकळते आहे . …। उत्तुंग ध्येयाची हंड्या झुंबर उभारत सूर्यावर स्वारी करणारे वायुपुत्र असे दोन चार जागांसाठी आपसातच लढून खच्ची व्हावेत ? मुंग्यांनी मेरुपर्वत गिळला कि गीलच्यांनी बाबरी चे भूमिपूजन केले …. हन्त हन्त … लक्ष लक्ष नक्षत्रान च्या रांगोळ्या कालाच्या अवकाशावर उधळणारा प्रज्वलंत हिंदू इतिहास असा पालटला जावा … अरेरे … हन्त हंत …. दक्ष दक्ष कार्यकर्त्यांचे हिंदू मोहोळ आता गलितगात्र होत आपसातच लढून मारणार … भौबंद्कीची तप्तमुद्रा इतिहासाने कायमची मराठ्यांच्या कपाळावर अंकित केलेलि आहे …. ज्वलज्जहाल सांस्कृतिक राष्ट्रवाद खच्ची झाला तो मात्र फुर्रोगाम्यांमुळे …. हिंदू धर्मात फुट पाडली ती मात्र नास्तीकानि …. धर्मप्रेमी राजकारणाचा विजय असो …




जुन्या आठवणी …



मेडिकल पास झाल्यावर आम्ही सरळ श्रीलंकेत दाखल झालो . लोखंडी बुट … चिलखत , बंदुका रायफल बोंब ...वोकी- टोकि आणि भूसुरुंग पेरलेल्या युद्ध क्षेत्रात आमची मोडकी अम्ब्युलन्स घेउन … युनिसेफ चे मिशन होते … भूसुरुंगाताल्या जखमीना वाचवायचे …Worked as Medical officer in HORIZON, an international NGO, run by the Indian Army officers, engaged in Humanitarian De-mining Operations in Sri-Lanka.http://horizon-groupindia.com/index.php



काय आहे सेक्युलारिजम ? त्याचा घटनेतला अर्थ काय ?

सेक्युलारिजम आणी सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला. आणी प्रचंड घोळ घातला. सभ्य स्त्री - पुरुष हो - आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही. घटनेत सेक्यूलारिझम आहे. सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत. सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती - ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही.तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात. कारण प्रेमात पडायचं वय कधीही संपत नाही आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील. पणमनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात. तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल !भारताच्या राज्यघतनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता हे पहिले ध्यानात घ्या । . प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल.तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल. धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही.सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे.या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमाच्या फायद्यासाठी नाही नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक चष्म्यातून घेतले जातील . दही हंडीचे किती थर रचावेत ? किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत .देशातला सेक्युलारीझम हा सर्व धर्माच्या सुधारणेसाठी आहे । आणि ज्या धर्माचा समाज या सुधारणेच्या सुवर्ण संधीचा फायदा घेणार नाही … तो चिखलातच मागास आणि दरिद्री राहणार आहे … पण हे कोणि बोलायचे ?

शंकराचार्य पुन्हा काहीतरी बरळलाय 

तो वेडा शंकराचार्य पुन्हा काहीतरी बरळलाय … अरे बाबा तूझा पगार किती आणि तू बोलतो किती … हे दोन कवडीचे फुटकळ शंकराचार्य … मंदिरात दलिताना प्रवेश नाही असे बकत आहेत … या देशात धार्मिक कायदा नाही..... आणि शंकराचार्य असले काहीही ठरवू शकत नाही … बाकी ह्या असल्या आचार्याच्या आणि त्या मंदिराच्या धार्मिक बजबजपुरीत ...... न गेलेलेच बरे !माणसाला माणुसकीची वागणुक नाकारणारा धर्म नाही तो अधर्म आहे ..................................
पण खरा विरोधाभास असा कि हिंदू एकता वगैरे ..........सतत रटणारे लोक्स ह्या विषमतावादी आणि जातीय शन्कराचार्याविरुद्ध "ब्र " उच्चारात नाहीत । हिंदू समाजाची १/५ संख्या असलेला दलित समाज तुच्छ लेखून वेगळा पाडणारा शंकराचार्य यांचा धर्मगुरू आहे। आणि त्याच वेळी......... जाती पंचायत मोडणारा दाभोळकर धर्मद्रोही आहे … जयतु जयथू : चालुद्या

http://naidunia.jagran.com/national-ban-on-dalit-entrance-in-temple-is-fine-says-shankaracharya-206811


प्रमानभाशा म्हंजी काय र भाव ?

प्रमाणभाषा म्हणजे काहीतरी शुद्ध, सात्विक , पवित्र आणि योग्य आहे असा काही जणांचा समज आहे. महाराष्ट्राला (एकदाचा! ) "न" चा उच्चार "न" आणि "ण" चा उच्चार "ण" करणारा मुख्यमंत्री मिळाला अशा अर्थाच्या पोस्ट फेसबुकावर फिरत आहेत . वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांचे उच्चार प्रमाण (तथाकथित शुद्ध) नाहीत. ते नागपूर कडचे असल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना " इश्वरर्शाक्ष , स्तापित , निष्टा , कोनतीही , किम्हां " असे उच्चार केलेले आहेत प्रमाणभाषेत हे उच्चार " ईश्वरसाक्ष , स्थापित , निष्ठा , कोणतीही , किंवा " असे असायला हवेत . हा नागपूर इफ़ेक्ट आहे काय ? ते मला माहित नाही . पण नागपूर कडची बोली ही प्रमाण भाषे पेक्षा वेगळी आहे हे सहज पडताळून पाहण्यासाठी गडकरी किंवा फडणवीसांची भाषणे यु ट्युब वर पहावीत.
बोलीभाषा आणि उच्चार दर बारा कोसावर बदलतात . माझा एक हिंदी भाषक मित्र मराठि हे हिंदीचे अशुद्ध व्हर्जन आहे असे समजत असे ! मराठीत वृत्तपत्रे सर्वप्रथम पुण्या - मुंबईकडे निघाली त्यामुळे तिथली बोली हि प्रमाण मराठि म्हणुन रूढ झाली . इतर भौगोलिक ठिकाणाचे उच्चार अशुद्ध होते असा त्याचा अर्थ नाही.… ज्ञानेश्वरांची भाषा अशुद्ध म्हणणार काय ? कानडाऊ विट्ठ्लु कर कर्नाटकु हे वाक्य प्रमाणभाषेत आहे ??? पसायदानातले - वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां … या वाक्यातले भेटतु , सकळमंगळी हे शब्द प्रमाण भाषेनुसार योग्य आहेत काय ?? पाणिनीने संस्कृतचे नियम तयार करण्यापूर्वी वेद लिहिले गेले त्यामुळे वेद शुद्ध संस्कृत भाषेत नाहीत ते "आर्ष " नावाच्या बोली भाषेत आहेत
भूगोल आणि काळ यानुसार भाषेचे उच्चार बदलतात त्यात शुद्ध अशुद्ध काहीही नसते . अतिअनुनासिक उच्चार हि प्रमाण भाषेशी विसंगतच आहेत . अशा पोस्टचा फ़डणविसाना तोटा होणार हे हि मूर्खांच्या लक्षात आलेले नाही . तेव्हा फेसबुकावर फिरणार्या प्रस्तुत "न" आणि "ण" च्या पोस्ट शुद्ध अशुद्ध याच्याशी संबधित नसून स्वत:चा माजुर्डा मूर्ख जातीय कंडू शमविण्यासाठी फिरवलेली भाकरी आहे .

https://www.youtube.com/watch?v=uRFuWpnVK00



धर्म तत्वज्ञान आणि विज्ञान


खरी भीती अज्ञानाची । जे आपल्याला माहित नाही त्याची आपल्याला भीती वाटते !
धर्म हि गोष्ट काही काळ मानवाला गरजेची होती …. गणित आणि लॉजिक याचा पूर्ण विकास तेंव्हा झालेला नव्हता . … चोरी करावी का ? खरे बोलावे का ? कोणाशी ? असे नैतिक प्रश्न त्याकाळी धर्म सोडवत असे … त्याबद्दल धर्माचे आभार …. जीवशास्त्र , उत्क्रांती शास्त्र यातील वेगवान प्रगती नंतर डोकींन्स सारखा शास्त्रज्ञ आता तत्वज्ञ म्हणून हि ओळखला जाऊ लागला आहे … जीवसृष्टी का निर्माण झाली ? कशी निर्माण झाली याचे विश्लेषण विज्ञान उत्तम प्रकारे करू लागले आहे . तत्वज्ञान आणि नीती हे विषय आता धर्म मार्तंडाचे राहणार नाहीत . …। येणारा काळ हे विषय वैज्ञानिकांच्या हातात अलगद पणे सोपविणार आहे …… समाजाचे धारण दोन पुठ्ठयात मावाणार्या ज्ञानाने होऊ शकत नाही । नीती आणि समाज धारणेचे नियम आता विज्ञान ठरवेल . धर्माच्या स्मृती फक्त वाचनालयात बर्या ! मनुस्मृती कुराण आणि बायबल मधल्या आज्ञांचे पालन करणे आज अशक्य आहे. फक्त तेव्हढे उघडपणे कबुल करणे अस्मितांमुळे शक्य होत नाही .
जे धर्माबाबत खरे आहे तेच तत्वज्ञाना बाबत हि खरे आहे. सांख्य , बौद्ध , जैन , अद्वैत , वेदांत , योग, पूर्वमीमांसा वगैरे तात्विक दर्शने माणसाच्या वागण्याचा शोध घेतात . मानवी जीवनाला काही हेतू आहे का ? डोळ्याना दिसते म्हणजे काय ? दु:खनाश हे मानवी जीवनाचे ध्येय आहे काय ? दु:खाचे कारण काय ? वगैरे गोष्टीची तत्व चर्चा प्राचीन कालापासून सुरु आहे . मेदुतले कुठले न्युरोन उद्दीपित झाले कि दु:ख होते याचे नेमके विश्लेषण विज्ञान करू शकते . मानवी जीवनाचा हेतू आणि मानवी वर्तणुकीचे रहस्य बिहेव्हिअरल सायन्स , जेनेटिक्स अलगद उलगडते . तत्व चिंतनाचि गरज आता संपली. हे कामही विज्ञानाचेच .
…… मानवी उत्क्रांतीतला धर्म हा टप्पा मागे पडत आहे …. येणारा काळ जीवशास्त्राचा ! धर्माचे - तत्वज्ञानाचे स्थान आता म्युझियम !!

मिम आणि भाजपा

रब ने बनाई जोडी नावाचा शाहरुख खानाचा एक सिनुमा आहे त्यात तो मिशी लावून येतो . मग मिशी वाला गृहस्त मणजे शाहरुख खान आहे हे त्याच्या सक्ख्या बायकोला बी कळत नाही । पण केजीतली शेंबडी पोरगिही शालुख म्हणुन थेटरात वरडते …

"मिम आणि भाजप दोघेही सारखेच जमातवादी आहेत" हा अतिशय बोर आणि घिसापिट्टा युक्तिवाद करून कोणाला स्वत:च्या तटस्थतेचा बाजार मांडायचा असेल तर अवश्य मांडा. पण हे वस्तुस्थितीला धरून नाही . (मिम) मजलिस इत्तेहाद्दुल मुसलमीन हे रझाकारांच्या संघट्नेचे नाव होते . त्याचेच पुनरुज्जीवन ओवेसी बंधूनी केलेलं आहे . या राझाकरानि मराठवाड्यात काय केले आहे ते सर्वश्रुत आहे । आजही ओवेसी बंधूंची तीच भाषा आहे . . बाकी भाजपाच्या गुण दोषावर चर्चा झाली पाहिजे . आणि त्यांवर सडकून टीकाही…. पण भाजपाची तुलना मिम शी करणे हि भ्याड हिंदू मानसिकता आहे . अशा भीरु - खोट्या सेक्युलर बाण्याने फ़कस्त भाजपाची शक्ती वाढेल । आणि भित्रे पुरोगामी समाजात अप्रिय होत राहतिल.

कारण मिम आणि भाजपात फरक आहे हे चौथीतल्या शेंबड्या पोरालाही सहज समजते आहे … मिम आणि भाजपाची तुलना करून आपल्या अकलेचा बालिश बाजार पुरोगाम्यांनी अशाप्रकारे मांडू नये असे कळकळीने वाटते …

अश्वत्थाम्याचे तेल !

सप्त चिरंजीवांपैकी एक म्हणजे अश्वत्थामा. पण त्याचे चिरंजीवि तत्व हे शाप आणि वरदान यांच्या सीमारेषेवर उभे आहे . त्याच्या चिरंजिव पणाला मिळालेला निद्रानाशाचा आणि भटकंतीचा शाप , त्याच्या डोक्यावरची भळ्भळति जखम…. त्या जखमेवर लावण्यासाठी तेल मागात तो प्रत्येक मर्त्य मानवाच्या दारात भिकाऱ्या सारखा उभा राहतो . आणि डोक्यातल्या जखमेची वेदना त्याला झोपू देत नाही, त्याला सुखाने जगू देत नाही शिवाय त्याचे चिरंजीवत्व त्याला मरूही देत नाही .
बुद्धिवादी आणि नीतिमान पुरुषास अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व नियतीने बहाल केलेले आहे. मेंदूत जखम झाली आहे त्याचा… पण केवळ बुद्धीरंजनाने त्याचा मेंदू शांत होत नाही … त्याला सामान्य मर्त्य मानवाच्या दारात याचकाप्रमाणे उभे रहावे लागते. बुद्धिवाद आणि नैतिकता अनुभवांच्या बेरजेतून तयार होत असल्याने ती हर एक पिढीत जन्म घेत चिरंजीव राहते …. भळभळत्या जखमेसारखी याचक म्हणुन …या महा मूर्ख स्वार्थी आणि अल्पमती मर्त्य मानवाच्या दारात बुद्धिवादी मृत्युंजय अश्वत्थामा दरिद्री भिकाऱ्या सारखा उभा राहतो. पुन:पुन्हा ! पण त्याची याचना , जखम , निद्रानाश, तगमग आणि तीव्र वेदना याला शाप म्हणता येत नाही. कारण या वेदनेच्या चीरंजीवत्वाची सुखद जाणिव त्याला प्रत्येक क्षणि सुखावते आहे . हा भविष्यवेत्त्या ज्ञान संपादनाचा चिरंजीव आनंद आहे …। आणि या सुखासमोर मेंदूतल्या भळ्भळत्या जखमेचे दु:ख तुच्छ आहे ! मर्त्य आहे !!

 कीस ऑफ कालिदास


हे महाकवी कालिदासा तुझ्या मेघदूत काव्यातला तो विरहमग्न यक्ष आज हळहळला असेल रे …… त्याची सखी दूरदेशी …. तिच्या चुंबनाच्या ओढीने तो कासावीस झाला होता …. मग त्याने ढगांचे मेघदूत आळवले आणि त्या मेघादुतास यक्ष म्हणतो… माझ्या सखीचे उत्कठ चुंबन न व्हावे व्हावे … पण मेघदूता तू अवनीचे चुंबन घे … तुझ्या सावलीने ……. छायारुपें मुखास्वाद घे त्यांचा तूं क्षणभर

हे महाकवी तू मयुर पक्षा सारखी दमदार आणि आत्मविश्वास पूर्ण पावले टाकत तिच्या दिशेने आलास …. ती बावरली चटकन तुझ्या स्वागताला जणू उभी राहिलि …… तिची गौरकाया थरारली आणि तिच्या खांद्यावरचे रेशमी केशरी वस्त्र तिच्या नितळ कान्तीवरून निसटले …… अस्ताला जाणार्या सूर्य् देवतेने तिची हंसिणी सारखी कमनीय मान आणि डौलदार खांदे पाहिले .तू तिच्या इतक्या समीप आलास कि तिचे कस्तुरी श्वास तुझ्या सह्याद्रीसम छातीवर वार्याप्रमाणे खेळले . त्या रूपगर्वितेच्या कोमल सुंगधी सहवासात छातीचे बुरुज विरघळले आणि मग कालिदासाने हृदयाच्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेला एक अलंकार बाहेर काढला. कोणीही पाहता क्षणी प्रेमात पडावे असाच तो अलंकार होता . त्या मानिनी ऋषी कन्येने आपली हरिणी सारखी नजर त्या अलंकारावर नेण्यासाठी मान किंचित झुकवली ……. आणि नेमक्या याच संधीचा फायदा घेत कालिदासा …………… तू सरळ तो अलंकार त्या लावण्यवतिच्या सुंदर मानेला बांधलास … त्यावेळी ती रुपगर्विता तुझ्याकडे डबडबलेल्या कृतार्थ डोळ्यांनी पहात होती ……. त्या अप्सरेचे नाव ? तो अलंकार तरी होता काय ? महाकवी ऐक आता …. ती सुंदरी होती भाषासाम्राज्ञी संस्कृत …। आणि तो अलंकार होता शृंगार ……।

हे महाकवी कालिदासा तुम्हारा चुक्याच …. पितृसत्ताक जात व्यवस्था शाबूत ठेवायची असेल आणि रक्त भेसळीच्या वर्णसंकराला पायबंद घालायचा असेल …. तर शृंगार नावाचा भिकारडां अलंकार मोरीत टाकून दिला पाहिजे . व्यक्तीच्या सहज अभिव्यक्तिपेक्षा योनिशुचिता आणि उसन्या परंपरा अधिक महत्वाच्या आहेत ……. हे महाकवी या देशात वर्ण संकाराची गटारगंगा आणि व्यक्ती स्वातन्त्र्याचा व्रात्यपणा बंद करायचा असेल संस्कृतच्या कोमल माने वरून तो शृंगार अलंकार हिसडून टाकण्यात येईल …… महाकवी कालिदासा सन्स्क्रुतिरक्षकाच्या या पवित्र भारतभूमीत मोठेच पाप करून बसलास रे



सनातन प्रभातची नतद्रष्ट पिल्लावळ गरीब आणि देवभोळ्या वारकऱ्याला जिहादी बनवत आहे


 . जादुटोणा निर्मुलन कायद्याला विरोध आणि त्याच वेळी मरतुकड्या सनातन वरच्या फुटकळ हल्ल्याचा निषेध ?? वारकरी संमेलनात हे काय चालले आहे ? ठाम भूमिका घ्यायची हीच वेळ आहे . नाहीतर या सनातनी औलादिचि उठ सुट धर्मासाठी रस्त्यावर उतरायची भाषा ज्ञानेश्वर माउलिच्या महाराष्ट्राला परवडणारी नाही . धर्माचे स्थान परलोक त्याने इहलोकात ढवळाढवळ करू नये … सिनेमा कोणता लागावा हे सेन्सोर बोर्ड ठरवेल … बांडगूळ धर्मसंसद नाही । अजिबात नाही … बाकी मदरसे आणि वेद पाठशाळाना कोट्यावधिची अनुदाने देणारा छद्म सेक्यूलरीझम - खोटा सर्वधर्मसमभाव वारकरीही हाती घेऊ लागतील तर …. नाठाळाचे माथी हाणू काठी ! - ... ....... . ............. .मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ गांडीची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। -तुकोबा...........
. . .(वारकरी संमेलनातल्या सनातनी अधर्माची बातमी लिंक खाली पहिल्या कोमेण्ट मध्ये दिली आहे )
 http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-west-maharashtra/elizabeth-ekadashi-warkari/articleshow/45217256.cms



संविधान प्रतिज्ञा 

26th November या संविधानदिनी आपण एक प्रतिज्ञा करू. - भारताच्या संविधाना प्रती सर्वोच्च निष्टा हा माझा राष्ट्रधर्म आहे. संविधानातील सामजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणी इहवाद यांचे मी सामाजिक जिवनात पालन करेन. माझा धर्म व संविधान यात विसंवाद असेल तर मी संविधानाला अंतिम मानेन. परंपरा, कुळाचार, रूढी, धर्मग्रंथ यात संविधानाशी न जुळणार्‍या गोष्टी आढळल्या तर मी त्यांचा त्याग करेन. माझा देश आणी संविधान यांच्या रक्षणासाठी मी कटिबद्ध आहे. N.B: जे संविधानाचे सार्वभौमत्व मानत नाहीत त्यांना दुय्यम नागरिकत्व द्यावे आणी मतदानाचा अधिकार काढून घ्यावा


अनिस हिंदू विरोधी आहे …


अनिस हिंदू विरोधी आहे … असा खोटा प्रचार सतत चाललेला असतो . मग कोण्यातरी ख्रिस्ती पोप किंवा मुस्लिम बाबाचा चमत्कार घेऊन... अनिस याविरुद्ध का नाही बोलत ? म्हणजे अनिस ढोंगी... इथपासून …अनिस ला ख्रिस्ती मिशनरी परदेशातून पैसे पुरवतात... इथपर्यंत अकलेचे तारे तोडले जातात …. वास्तविक पाहता अनिस हि एक विज्ञान वादि संस्था आहे आणि आपल्या """शक्तीनुसार""" ती कार्य करत असते … जगातले सर्व हिंदू बाबा अनिस उघडे करू शकत नाही किवा जगातल्या सर्व मुस्लिम ख्रिस्ती बाबांना नागडे करू शकत नाही … पण अनिस ने आजपर्यंत अनेक मुस्लिम आणि ख्रिस्ती बाबांवर कारवाई केलेली आहे . त्याचप्रमाणे विद्वेषाची राळ उडवलेल्या …. जादुटोणा कायद्याखाली सर्वच धर्माच्या बाबांवर कारवाई झालेली आहे . त्यात काही ख्रिस्ती मिशनरी आहेत जे अंधश्रद्धा वापरून धर्मांतर करत होते … वास्तविक पाहता सर्व प्रकारचे चालू ख्रिस्ती धर्मांतर हे वैद्यकीय अंधश्रद्धा पसरवून होते (टच हिलिंग: रोग बरे करण्यासाठी मिशनरी स्पर्श करतो ) आणि त्यावर जादुटोणा कायद्याखाली कारवाई होऊ शकते … खरे तर हा कायदा हे बेकायदा ख्रिस्ती धर्मातर विरोधातले एक शस्त्र आहे …दाभोलकरांच्या बलिदानाने मूर्त झालेल्या अनिस कायद्याने हे अन्यायी ख्रिस्ती धर्मांतर पूर्णपणे थांबवता येईल … पण सनातनच्या बाटलीने दुदु पिणार्या अंध: हिंदुना त्याचे काय ? आणि पळी पंचपात्रात अक्कल गहाण टाकलेल्या धर्म भक्तांना त्याचे काय ? हिंदुत्व वाद्यांना त्याचे काय ?

१) 


२) अशा प्रकाराचा गुन्हा दाखल करण्याची राज्यातली ही पहिलीच घटना आहे. ऍडिशनल एस.पी. तानाजी चिखले यांनी तसा आदेशच काढलाय. त्यानुसार डी.वाय. एस.पी. विजय कबाडे यांनी हा गुन्हा दाखल केलाय. या सर्व प्रकाराचा अंनिसचे कार्यकर्ते आणि पत्रकार धर्मराज हल्लाळे यांनी पाठपुरावा केला. मुळचे उत्तर प्रदेशातले असलेले साहिल खान आणि अमीरूद्दीन अशी या भोंदुबाबांची नावं आहेत. http://www.ibnlokmat.tv/?p=99906

04 सप्टेंबर : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर राज्य सरकारने
IBNLOKMAT.TV
३) डॉ नरेंद्र दाभोळकरांनी केलेला अस्लम बाबा या ढोंगी बुवाचा पर्दाफाश : - http://antisuperstition.org/index.php?option=com_content&view=article&id=110%3Aaslam-baba&catid=63%3Avideo&Itemid=100

तुकोबा : गांधिंचा आणि सावरकरांचा 


गांधीना त्यांची तीन माकडे तुकोबांच्या या अभंगावरून सुचली आहेत :
पापांची वासना नको दांवू डोळा l त्याहुनि आंधळा बराच मी ll
निंदेचे श्रवण नको माझे कानी l बधिर करोनि ठेवी देवा ll
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा l त्याजहुनि मुका बराच मी ll
नको मज कधी परस्त्रिसंगती l जनांतुन मातीं उठता भली ll
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा l तू एक गोपाळा आवडसी ll
- तुकोबा

सावरकरांच्या "हिंदुत्व" या पुस्तकातली शेवटची ओळ - त्या हिंदुत्व पुस्तकाचा अंत - तुकोबांचा एक अभंग आहे . तो हा :
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥ ….
नाहीं निपराद । कोणां आम्हांमध्यें भेद ॥२॥
तुका म्हणे मान । अवघें आमचें हें धन ॥३॥ १७०८ - ९


देशीदारुवाद‬ 


युरोपातल्या अनेक देशात इंग्लिश इल्ला आहे. ......ती वेळ माझ्या पहिल्या परदेश प्रवासाची होती. . युरोपचा प्रवास होता . . हा भल्ला मोट्ठाला एयरपोर्ट आणि त्यातून बाहेर पडायची अक्षरश: शेकडो दारे . आम्हाला तिथे रिसीव्ह करायला येणार्या हॉटेल ने मेल पाठवली होती … अमुक क्रमांकाच्या दारातून बाहेर पडायचे होते । बाहेर पडले कि तमुक ठिकाणी " जोन स्मिथ " नावाची पाटी घेऊन ड्रायव्हर रिसीव्ह करायला उभा असेल …. अशी ती मेल होती . एयर र्पोर्ट च्या बाहेर मी दिड तास त्या "जॉन स्मिथ" ला शोधत होतो . दिड दोन तास शोधाशोध केल्यावर ... .. मिळाला नाही . पण " Abhiram Dixit " अशी पाटी घेऊन एक गोरा ड्रायव्हर उभा होता . विचाराव का त्याला ? हा कोणीतरी दुसराच प्रवासी " Abhiram Dixit " असावा अशा सुज्ञ विचाराने मी तिथेच ताटकळत उभा राहिलो . कटकट झाली … शेवटी कंटाळून शिव्या द्यायला त्या हॉटेलला फोन केला … खडसावून विचारले कि " जोन स्मिथ " कुठे आहे ? Where is that bloody John Smith ???? .....तिथल्या रिसेप्श्निस्ट ला बिलकुल इंग्लिश येत नव्हते ! मला तरी कुठे फार येत होते म्हणा !! ती बया फ्रेंच मधून बोलायाची आणि मग मी हिंग्लिश मधून ! मग बराच वेळ अगम्य संवाद केल्या नंतर मला समजले कि "जॉन स्मिथ" हे उदाहरणार्थ वगैरे सारखे एक सामान्य नाम आहे …नाव माहित नसल्यास उदाहरण म्हणुन - रामा, शिवा, गोविंदा - सारखे जॉन स्मिथ वापरतात तिथे ! म्हणजे नावाचे उदाहरण वगैरे द्यायला जोन स्मिथ वापरतात …. तो "दिक्षित" विशेषनाम पाटिवाला गोरा माझ्यासाठीच उभा होता ! त्या मेल मधले जोन स्मिथ हे नावाचे उदाहरण वगैरे होते ......आम्ही लोक्स गरीब सरकारी मराठी माध्यमात शिकलेलो आहोत . " केचर इन द रे " मी वाचली नव्हती त्यावेळी …. फकस्त तिचे मराठी रुपांतर " कोसला " वाचले होते ! जय मराठी वगैरे मिडियम ! ! बंद करा इंग्लिश माध्यम !! जय नेमाडे !!! उदाहरणार्थ फिलिंग लैच देशी दारुवाद !!! ‪#‎देशीदारुवाद‬

६ डिसेंबर १९५६ : महानिर्वाण

दांडगेश्वर , उर्जेचा धो धो वाहणारा धबधबा
सतत प्रतिकूल परिस्थितीला टकरा देणारा
ग्रंथसंग्रहाचा नादि ; ग्रंथलेखनाचा छंदी
जळत्या भावना , अफ़ाट माहितगारी नि बिनतोड युक्तिवाद
यांनी कोणतीही सभा जिंकणारा
गल्लीपासून दिल्लिपर्यंत चमकणारा
राजयोगी , पण प्रसंगी नुसत्या पापडावर भूक भागवणारा
अनागर भाषा बेदर्कार पणे वापरणारा ;
आपल्या भाव विश्वात द्वेषालाहि स्थान आहे
हे निर्भय पणे सांगणारा
अर्थशास्त्रप्रविण , निर्बंधशास्त्रज्ञ, राज्यघटना पंडित
अतृप्त अधीर असीम महात्वाकांक्षि , बलदंड
सुशिक्षित सुंदर अशा प्रेमविद्ध स्त्रियांना योग्य अंतरावर ठेवणारा
पण घरच्या एकनिष्ठ अशिक्षित पतीव्रतेवर निस्सीम प्रेम करणारा
जुना धर्म मोडणारा , नवा धर्म काढणारा
मोठ्मोठ्या महात्म्यांना न जुमानणारा
पण हरणाच्या पाडसावर जीव जडवणारा
अस्पृश्य माणसाला दलदलीतून सचिवालयात नेणारा
भारताच्या भविष्यावर कायमचा ठसा उमटवून
हा अनेक रुपी जीव एकरूप अनंतात विरून गेला
एक जीव आदर्शनातून आला आणि अदर्शनात लुप्त झाला
.
त्यांचे महानिर्वाण झाले
.
.


हे इस्लामला मान्य नाही हो SSS …

.
शे - दिडशे बच्चु गोळ्या घालून ठार मारले . ...चला तालिबान्यांचा अजुनेक हल्ला … मलाला युसुफ्झाई च्या नोबेल बद्दल आनंद व्यक्त करणार्या धर्मद्रोह्यांना इस्लामी तालिबानने धडा शिकवला … भारताविरुद्ध पुकारलेला जिहाद असो कि अल कायदा च्या धमक्या …आता लगेच चोराच्या उलट्या बोंबा सुरु …. दहशतवाद, युद्ध हे कसे इस्लामला नामंजूर आहे याबद्दल दाखले काढले जातील …. इस्लाम हा किती पाप भीरु, सज्जन, पुरोगामी आणि शांततामय धर्म आहे त्याचे पवाडे ऐकू येतील …. कुराणातल्या भाइचार्याच्या काही मोजक्या आयतीही प्रसृत केल्या जातील … ठीक आहे ।
पण अल कायदाला हे पटत नाही….तालिबान ला पटत नाही आणि धर्मद्रोही / काफिरांची कत्तल करायची प्रेरणा कुराणातुनच मिळते असे त्यांचे म्हणणे आहे . तालिबानच्या छापील पत्रकातून कुराणातल्या काफिर कत्तलीच्या आयातीही येतात … कोणाचे खरे मानायचे ? अल कायदाच्या अरब अफ़्गाणाना इस्लामचे धर्म ज्ञान नाही ? कि त्या अफगाण - अरबाना कुराणाची अरबी भाषा समजत नाही ? कि तालिबानी कुराण वाचतच नाहीत ?
समजा तालिबानचे मत कुराण नुसार योग्य असेल तर ? … मुळात इहलोकात आचरण कसे असावे ? यासाठी कुराणाचे दाखले काढायची गरजच काय ? जर धर्मग्रंथ प्रमाण मानायचा असेल .......तर मग .......कुणाचे कुराण इण्टर्प्रिटेशन योग्य? ... याची आम्ही वाट पहात बसायची काय ? इस्लाम इस पीस होईल ? कि इस्लाम इस जिहाद होईल ? त्यावर आम्ही आमच्या मुलाबाळाचे भविष्य अवलंबून …. इस्लामी न्यायाकडे डोळे आसुसून वाट पहात रहायचे काय ? कि मुस्लिमांनी बुरखा / तलाकचा कुराणधर्म निर्णय काय ? याची डोळे आसुसून वाट पहायची ??
.
.
…. कि धर्म ग्रंथाचे पान मिटुन....... विज्ञान ग्रंथाचे पान उघडायचे ?
.
सर्वसाधारण पुरोगामी बांधव यावेळी इस्लाम धर्म रक्षणाचि भूमिका घेतात । आणि इस्लामचे गोग्गोड अर्थ सांगु लागतात . . ते चूक आहे .
मुस्लिम बांधावा वरचे प्रेम प्रदर्शित करण्यासाठी त्यांच्या धर्म रक्षणार्थ धावण्याची गरज नाही …
माणुस महत्वाचा। धर्म नाही …
रिलिजन पासून रिजन ( Reason ) पर्यंत जाणार … कि नाही ?
.
धर्माच्या जंजाळातून बाहेर पडुन बुद्धिवादाच्या दिशेने वाटचाल व्हायला हवी ….
इस्लामला काय मान्य आहे .. आणि काय अमान्य आहे ... हे अजिबात महत्त्वाचे नाही .. धर्म हि एक फालतू गोष्ट आहे …. नैतिकदृष्ट्या - माणुसकीच्या आणि शहाणपणाच्या आधुनिक चष्म्यातून काय योग्य आहे ? विज्ञान निष्ठ बुद्धिवाद ...रिसन Reason ते खरे....

.

धर्मावरची expiry date 


औषधावरची expiry date संपली कि तेच औषध विष बनते. तसेच धर्माचे झाले आहे. धर्मावरची expiry date केव्हाच संपली आहे त्यामुळे त्यातून शांती नव्हे तर विष पेरण्याचे काम होत आहे.
-- गुलजार ( पाकिस्तानात विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबाराबद्दल औरंगाबाद मध्ये बोलताना.. )

 

गोमुत्र आणि गोमय 


सर्व प्रकारचे मूत्र कसे बनते ? त्याचे घटक कोणते ? या सर्वासंबधि अतिशय सखोल आणि रेण्वीय पातळीवर संशोधन झाले आहे । गाय , माकड, डुक्कर माणुस या सस्तन प्राण्यांच्या मूत्रात रसायन शास्त्राच्या दृष्टीने काही हि फरक नाही … स्वत:चे किंवा दुसर्या प्राण्याचे (गो इत्यादी ) मूत्र पिणे हे आरोग्याला हानिकारक आहे . जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र सारे काही सिद्ध करून चुकले आहे … धार्मिकाच्या डोक्यातला केमिकल लोच्या मात्र शास्त्राच्या आवाक्याबाहेर आहे !
. (हानिकारक घटक बाहेर काढून टाकण्यासाठी शरीर मल मुत्र विसर्जन करते । त्यातले सर्वच घटक घातक असतात । कृपया गोमुत्र आणि गोमय खाऊ वा पिऊ नये)

गाय कोणाची माता असेल तर ती बैलाची , हिंदूची नाही ।गाय हा असलाच तर एक उपयुक्त पशु .. गाय पूज्य नव्हे , माता नव्हे । देवता तर नव्हेच नव्हे … गोहत्या थांबवू पाहणारे श्रद्धेचा खेळ मांडत .........................हिंदू समाजाची बुद्धीहत्या करत आहेत हि आमची खरी खंत आहे ! - विनायक दामोदर सावरकर


लवकरच येत आहे : बोडसांचे अधांतरी विमान

मुद्दा फक्त बोडसांनि अधांतरी सोडलेल्या विमानाचा नाही . मुद्दा वेगळा आहे . आमच्या पुराणात , वेदात आणि श्रुती स्मृतीत अत्याधुनिक सर्व ज्ञान सामावले आहे . धर्मशास्त्रे आणि भारताची पुरातन संस्कृती ह्यातच ज्ञानाचे मर्म आहे असे जर मत असेल तर … भारताची प्रगतीविषयक धोरणे श्रुती स्मृती पुराणाना अनुसरून बनवली जाणार का ? त्यांची च्छाप भारताच्या संरक्षण , परराष्ट्र , शिक्षण आदी महत्व पुर्ण धोरणावर प्रभाव टाकणार का ? खरा मुद्दा हा आहे . विज्ञाननिष्ठा हा तर्काचा प्रांत आहे . बुद्धिवाद हे विचारसरणीचे नाव आहे . पाकिस्तानी हुकुमशहांकडे अण्वस्त्रे आहेत. विज्ञान तंत्रज्ञान आहे पण विज्ञान निष्ठा नाही . पाकिस्तानातले कायदे अजूनही शरियत नावाच्या विकृत आणि पुरातन इस्लामी धार्मिक विचारावर आधारित आहेत . आपल्याला काय हवे आहे ? पाकिस्तान ?? स्मृती आणि पुराणावर आधारित धोरणे ?? विज्ञान कि विज्ञान निष्ठा ? हे आपणच ठरवायचे आहे . पुराणातली प्लास्टिक सर्जरी , कर्णाचे जेनेटिक सायन्स आणि वेदातल्या आगगाड्या - विमाने वगैरे धार्मिक मुलतत्व-वादाची पहिली चाहूल आहे.
लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. . गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर मनुष्याची झालेली प्रगतीच दिसून येते. हाच नियम गेल्या दहा शंभर आणी हजार वर्षालाही लागू पडतो. मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते… आणि आपले वंदनिय - पूजनीय पूर्वज आप्ल्यापेक्षा कमी ज्ञानी होते हेही समजून घ्यावे लागेल .
भारतीय असल्याचा मला अभिमान आहे . सांख्य , अद्वैत वेदांत , चार्वाक अशी महान दर्शने उभी करणार्या पुर्वजांबद्दल आदर आणि प्रेम असणे वेगळे आणि त्यांनी केलेल्या कवी कल्पनांना सत्य समजणे वेगळे .कार्य कारण भाव आणि प्रयोगसिद्ध गोष्टींवर विश्वास ठेवणे म्हणजे विज्ञान निष्ठा … यात सुतावरून स्वर्ग गाठायचा नसून प्रयोगाने सत्य सिद्ध करायचे असते . कविकल्पना वरून थापा मारणारे आणि शब्द साधर्म्याला संशोधन समजणारे ---- पुना ओक किंवा बोडस हे लोक खरेतर दखल घ्यायच्या पात्रतेचेही नाहीत … पण आता सायन्स कोन्ग्रेस जर यांच्या तालाने जाऊ लागली तर त्यांच्या पुस्तकांची चिकित्सा करणे अपरिहार्य ठरणार आहे .

च्यायला थांबवा हे । धार्मिकांचे छद्मविज्ञान म्हणजे विकासाला लावलेला सुरुंग ! या महाशयांनी आधी पौराणिक / वैदिक विमाने तयार करून दाखवावीत आणि मग त्यावर भाषणे ठोकावीत …. सायन्स कोन्ग्रेस मधला धर्माचा राजकीय हस्त्क्षेप असह्य आहे …

जर चिकित्सेला विरोध असेल तर विज्ञानाच्या गप्पा न मारता सरळ त्यांची आरती करावी 

जय देव जय देव जय बोडसदेवा ।
आरती ओवाळू तुज केप्टनदादा ।। धृ० ।।
धडधडती विमाने ब्रह्मांडी धाडा ।
पोथीत वसती यंत्र तंत्र शाखा ।
धर्मग्रंथ भक्ती मस्तकी घाला ।
दिसती मग वेदात अगीनगाड्या ।। १ ।।
जय देव जय देव जय बोडसदेवा ।
आरती ओवाळू तुज केप्टनदादा ।। धृ० ।।
केप्टनदादा भोळा धर्माची शाळा ।
इनोदी पर्वत शब्द जंजाळा ।
स्वार मानेवर न्युनगंड काळा ।
ऐसा बोडस शोभे विक्रम वेताळा ।। २ ।।
देवीं दैत्यीं शब्दांचे मंथन पै केले ।
द्राविडी प्राणायाम अर्थहीन केले ।
सुता वरून स्वर्ग कथन केले ।
देशाचे नाम बदनाम केले ।। ३ ।।
व्याघ्रांबर धनुष्य धरी राम पुराणी ।
वल्कले नेसती मुनिजनसुखकारी ।
विमाने मात्र बिनधास्त उडवी ।
आनंद बोडस विद्न्याना मारी ।। ४ ।।
- अभिरामस्वामी
.
(एकिकडे धनुष्यबाण , बोरूने लिखाण दुसरीकडे विमान … एकाच काळात माझे राष्ट्र महान
सदर आरती दररोज पठण करणार्याला विमानाची तिकिटे मोफत मिळतील. शिवाय घर शोकेस मध्ये ठेवायला एक ब्रम्हास्त्र , एक कमंड्लु आणि त्रिशूल मिळेल)



थोडीशी गंमत … दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल

साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
हे गाण ऐकल नाही असा कार्टा / कार्टी मी आजवर पाहिलेली नाही . हे माझ अतिशय आवडत गाण आहे. मला सगळ्यात आवडतो ते तो गाण गाणारा गोबरा गुंड्याभाऊ पोट्ट्या … जिस दिन तेरी चिता जली रोया था महा काल ! हे वाक्य म्हणताना त्या बेट्याने असा काही अभिनय केला आहे कि हृदय अक्षरश: वाशिंग मशीन मध्ये पिळवटुन निघावे … या गाण्याची पाकिस्तानी नक्कल (बौद्धिक दारिद्र्य ) आज पाहिली आणि गडबडून लोळून लोळून हसलो..... तुम्ही लोक्स नाय हसलात तर मी अर्धे टक्कल करेन…
ताजा कलम : या पाकिस्तानी गाण्यात जिथे इस्लामचा दुश्मन असा शब्द येतो तिथे गांधिजिंचा व्हिडियो दिसतो … भारतातले पांडु गोडसे भक्त गांधीना हिदुत्वाचा दुश्मन आणि मुस्लिमांचा मित्र समजतात … … महात्म्या तू लैच उंडो !
पाकिस्तानी गाण्यातल्या भाबड्या पोराच्या डोळ्यातही तितकेच निरागस भाव आहेत … गाण्याचे शब्द आहेत …
युं दी हमे आजादी कि दुनिया हुई हैराण
ए कायदे आजम तेरा एहसान है एहसान
हर डून पे मुसलमान पे छाई थी तबाही
इस्लाम का झंडा लिये आया सारे मैदान
ए कायदे आजम तेरा एहसान है एहसान




https://www.youtube.com/watch?v=Hi2UwPxU30A




भारतीय राष्ट्रवादाचा आजचा पाया


बुद्ध , महावीर , गांधी आणि बॉलीवूड हि भारताने जगाला दिलेली देणगी आहे . ज्याना हे समजत नाही त्याना आजचा भारत समजत नाही..... जगही समजत नाही . भारतीय राष्ट्रवादाचा आजचा पाया हा ख्रिकेट आणि बॉलीवूड आहे हेही समजून घ्यावे लागणार आहे .

हिंदूची लोकसंख्या

नरेंद मोदिना पुन्हा प्रधानमन्त्री बनवायचे असेल तर हिंदुनो १० मुले जन्माला घातली पायजेल असे एक शंकराचार्य आज बोलला . बरे साधारण १८ व्या वर्षी मताधिकार मिळतो . धा मुले जन्माला घालायला कमीत कमी दहा वर्षे त्यापुढे १८ वर्षे शेवटच्या मुलाला मताधिकार मिळायला लागतील …. म्हणजे अजून अठ्ठावीस वर्षे … आज मोदि ६४ वर्षाचे आहेत …. या शंकराचार्याच्या आदेशानुसार सर्व काही अलबेल घडले तर मोदींची पुढची वेळ ९२व्या वर्षी येईल …. महान हिदुधर्माच्या या महान धर्मपीठाचे अध्यक्ष खरोखर किती किती हुश्शार असतात नै !!


हिंदूची लोकसंख्या वाढ कमी होण्याचे एक कारण स्त्री भ्रुण हत्या हे आहे … मुस्लिमात स्त्री भ्रुण हत्येचे प्रमाण नगण्य आहे…। हिंदूची लोकसंख्या घटतेय म्हणुन अहोरात्र बोंब ठोकणारे धर्म मार्तंड …. स्त्री भ्रुण हत्येविरुद्ध काही बोलतील का ? त्यांची एकंदर अक्कल पाहता अशक्य आहे.
.
आजच एका हुश्शार शंकराचार्याने हिंदुनि धा पोरे पैदा करावीत असा फतवा काढला आहे. हे धर्मपुरुष स्त्रियांना पोरे पैदा करणारी मशीन समजतात काय ? . मुस्लिम ज्या चुका करतात त्या हिंदुनिहि कराव्यात हि मागणीच आचरटपणाचि आहे. (या उलट ) हिंदु, मुस्लिम, बौद्ध, ख्रिस्ती इत्यादी सर्वच धर्मियांनी दोन पेक्षा अधिक मुले पैदा करू नयेत… केल्यास (कर वजावट, रेशन कार्ड असे )सरकारी फायदे मिळणार नाहीत… असा कायदा करणे शहाणपणाचे ठरेल … पण शहाणपणाची मागणी केली तर त्यास धर्मगुरू कोण म्हणेल ?

समस्त धर्माच्या समस्त धर्म गुरुंचा णीषेध !! 


हायला … आज कुनीबी कायबी येड्यासारखा नाय बोल्ला … म्हणुन स्टेटस नाय आज । दुनियेतले समदे साधू बैरागी मौलवी पाद्री सुधरले कि काय ? ...आयच्यान अशान आमच्या लायका आणि शेअरचा फेसाबुक्की धंदा बंदच पडल कि मंग ?? समस्त फेसबुक डिड शहाण्यांच्या पोटावर पाय दिल्याबद्दल … समस्त धर्माच्या समस्त धर्म गुरुंचा णीषेध !! - वाढीवराम बिस्किट

 तुकोबांच्या नावावर खपवलेले अभंग 


चित्रलेखाच्या पहिल्या पानावर प्रा J B शिंदे काही अभंग लिहित असतात … २१ व्या शतकातल्या आधुनिक मराठीतले हे अभंग फेसबुकावर तुकोबांच्या नावे प्रसिद्ध केले जातात ! सध्या घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || असा एक अभंग तुकोबांच्या नावे फिरत आहे । या आधी अनेकदा अध्यक्ष , अंधश्रद्धा , दैनंदिनि असे आधुनिक मराठीतले शब्द असलेले अभंग तुकोबांच्या नावावर खपवलेले मी पाहिले आहेत . फ़िलिंग लैच इरिटेटेड

मी आणि आमचा अश्लील - अश्लाघ्य (AIB) एआयबी Show

********************************************************
टीव्ही बघण्याच्या भानगडीत मी सहसा पडत नाही .
फेसबुकावर एआयबी AIB (ओल इंडिया बकचोत ) च्या एका कार्यक्रमाचा निषेध करणार्या भरपूर पोस्ट पाहिल्या…. मग माझे कुतूहल जागृत होऊ लागले .
१) माझ्या संस्कृतीरक्षक देशप्रेमी हिंदु बांधवांनी नेहमीप्रमाणे पाश्चात्य संस्कृतीचे मलनी:सारण करण्यासाठी " स्वच्छ भारताचे " अभियान पुनरारंभ केले.कंबरेचा झाडू उपसून सारे देशभक्त या इस्लामी आणि पाश्चात्य (दोनीबी एकत्र !) बॉलीवूड च्या राई-राई एवढ्या चिंधड्या उडवण्यासाठी
सिद्ध झाले . मौके पे चौका मारत भाऊ तोरसेकरांनि आपला ठाकरी भाषेवरचा लेख पुन्हा शेअर केला !
२) सरळ सज्जन पापभिरू ( म्हणवणार्या ) बाया बापड्यांनि नाके मुरडली . विनोदी कार्यक्रमात सगळे विनोदी असते … तिथे सभ्यतेचे / संस्कृतीचे / शहाणपणाचे / समतेचे निकष लावणारे महामुर्ख आहेत
३) अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे श्वास म्हणवणार्या पुरोगामी - डाव्या वगैरे मंडळिंनि लाजत काजत निषेध केला . त्या कार्यक्रमात कातडीचा रंग , अल्पसंख्यांचा धर्म यांच्यावरून झालेली चेष्टा सेक्युलरांना सहन झाली नाही . ढिगभर बेकार पोरांना बाइक वाटणारा मुस्लिम सांताक्लोज , ख्रिस्तांचि अक्षतयोनी माता वगैरे ... झालेले ज्योक .... सिक्युलरांनि बी निषेध केला.

आदरार्थी बहुवचन , म्हणजे अहो जाहो करत एकाच व्यक्तीचा उल्लेख जणु काही अनेक व्यक्ती असल्यासारखा करायची खोड मराठी आणि हिंदि भाषात आहे ( इग्लिश किंवा तत्संम अनेक भाषात नाही ) … त्याचा फारसा उपयोग नाही आणि कित्येकदा एका व्यक्तीविशयीच बोलणे चालले आहे? का अनेक? यावरून घोळ होतो … … नवी पिढी बहुदा हि आदरार्थी बहुवचनाची भानगड स्वर्गवासी करणार उदाहराणार्थ आमचा हा कार्टा । मला ए अभिराम म्हणुनच हाक मारतो । फालतू कृत्रिम आदर देण्याने काय संस्कृती जपली जाते ?

मग माझ्या मनात या AIB कार्यक्रमा बद्दल कुतूहल वाढत गेले .
मग यु-ट्युब वर जाउन अक्खा एक तासाचा व्हिडिओ पाहिला .
लैगिक अवयव , हस्तमैथुन , समलिंगी या संस्क्रुत शब्दांना वापरलेले प्राकृत शब्द असभ्य कधीपासून ठरले ?

AIB एआयबी व्हिडिओ जबराट आहे ( पोट ) हलवून - हलवून हसलो . आपण सारेच............... किती ढोंगी (भोकाचे ) आहोत याचा पुन्हा प्रत्यय आला . आमच्या शाळेत या ए आयबी ला ( रात्री ).... त्यांची आई भैन आठवेल एवढे बीभत्स आम्ही बोलत असू . तेंव्हा मी आठवी - नववीत असेन .
--------------------------------------------------------------------------------
पौगंडावस्थेतले कुतूहल मिश्रित हार्मोनल जीवशास्त्र असेच बोलते .
त्या जब्राट दिवसांची पुन्हा आठवण झाली .
त्या वयात - शीवी शिवाय वाक्य संपत नव्हते . लैंगिक अवयवा शिवाय दुसर्या उपमा सुचत नव्हत्या .. संभोगाचे क्रियाविशेषण आणि गुप्तांगाचे क्रियापद लावल्याशिवाय वाक्य पुर्ण होत नाही असा व्याकरणाचा नियम सर्वमान्य होता . शारीरिक व्यंग , कातडीचा काळा/ पिवळा रंग , बाप , जात , धर्म यांचा तुच्छ उल्लेख नसेल असे एकही टोपणनाव एकाही सवंगड्याला नव्हते . आमच्या मित्रांची टोपणनावे कायमच ढूंगन्या , लांडुकलि , बामण्या , फ़ेंगड्या, कुन्बटा ,काळूराम , मोटू बीसी ... अशी वा तत्सम राहिली . कुणाला कधी राग आला नाही . कारण हा लई भारी विनोदाचा भाग आहे हे - त्या आठवी नववीत सुद्धा कळत होते .
(AIB) एआयबी वर पोलिसांनी केस दाखल केली आहे. कायदेशीर कारवाई आणि अटकही होऊ शकते . सार्या विचारसरणीचे सारे विचारजंत ए आय बी चा ढोंगी विरोध करतच राहतील .
कारण एका जाहीर - विनोदी कार्यक्रमाकडे खिलाडू चष्म्यातून पाहणे आपण विसरून गेलो आहोत . आठवी नववीतल्या मुलांकडे असते तेव्ह्ढिहि सारासार विवेकबुद्धी हरवली आहे .
----------------------------------------------------------------------------------
त्या AIB च्या कार्यक्रमात - ज्यांनी विनोद केला ते हसत होते . ज्यांच्यावर विनोद केला ते हसत होते . ज्या स्त्री - पुरुष प्रेक्षकांसमोर विनोद चालू होते । तेही हसत होते …. तत्वनिष्ठ भूमिका बाळगणारे पुरो - प्रती - अधोगामी जळफ़ळत आहेत …
-----------------------------------------------------------------------------------
लहान मुलावर संस्कार करायचे असतील तर मुलाना कंट्रोल करा … कार्यक्रमाना नाही …
हसू न शकणारे ....भाचोड ....तत्वनिष्ठ इझम वाले ... फक्त रडु किवा रड्वुच शकतात .
-----------------------------------------------------------------------------------
विनोदी कार्यक्रमात सगळे विनोदी असते … तिथे सभ्यतेचे / संस्कृतीचे / शहाणपणाचे / समतेचे निकष लावणारे महामुर्ख आहेत .
AIB = ओल इंडिया बकचोत
हिंदित - बकचोदि म्हणजे टाइम पास मौज मजा . मौज मजा पहावत नसलेले लोक ए आयबी हा जाहीर केलेला विनोदी कार्यक्रम आहे हे समजू शकणार नाहीत . आणि विनोदाचा अर्थ जोवर आपल्या स्वत:ला समजत नाही तोवर चार्ली हेब्डो साठी गळे काढणे हाच एक मोठा विनोद आहे .

हे प्रभू शिवराजा


नोबेल पारितोषिक विजेते । पहिले भारतीय कवी …
रवींद्रनाथ टागोर...... शिवाजी महाराजांवर लिहितात : -
कोण्या एका गावात … कोण्या एका देशांत …
कोण्या तरी काळात । अंधुक आणि धुसर दिवशी …। 
काळ आजचा नाही … असणे शक्यही नाही
मला ठाउक आहे । महाराष्ट्रातल्या एका अनाम जंगलात
हे प्रभू शिवराजा
तुझ्या मस्तकात … विजेचा कडकडाट झाला
झगमग कल्लोळ उडाला
अन प्रकाशमान विचार
पिढ्यात पसरला
एका नीतिमान सम्यक राज्यात
हा खण्ड खंडित विभागलेला आणि
मत मतात तुटलेला माझा देश
भारत
मी एकत्र बांधेन
(Translation : Abhiram Dixit)
---------------------------------------------------------------------------------------------
Nobel laureate Rabindranath Tagore wrote a poem:
In what far-off country, upon what obscure day
I know not now,
Seated in the gloom of some Mahratta mountain-wood
O King Shivaji,
Lighting thy brow, like a lightning flash,
This thought descended,
"Into one virtuous rule, this divided broken distracted India,
I shall bind."

कोम्रेड पानसरे , कम्युनिस्ट आणि हिंसा 


कोम्रेड पानसरे गेले । अतिशय सज्जन सुसंस्क्रुत मनुष्य आणि आमचे कोल्हापूरचे शेजारी . हताश …निराश आणि उद्विग्न ...... .... एका विचारवंताला आज संरक्षण नाही देऊ शकलो . म्हणुन उभ्या महाराष्ट्राने स्वत:च्या हाताने स्वत:चे थोबाड फोडून घ्यावे .

आधी दाभोळकर आता कॉम्रेड पानसरे सरांवर हल्ला . महाराष्ट्राची सोमालिया बनण्याच्या दिशेने वाटचाल . विचारहीन आणि बुद्धिहीन .... गुंडराज्याच्या दिशेने वाटचाल . .... आता वाट पहायची …. पूर्ण अध:पतनाची .....भ्याड आणि विकृत हल्ल्याचा तीव्र निषेध ..... पण काही कारवाई होईल का ? .... दाभोळकर केसचे काहीही झालेले नाही . महाराष्ट्राला पुरोगामी म्हणण्याचे धाडस कोण करेल आता ?

आताच काही मार्क्सवादी कम्युनिस्ट टीव्हीवर हिंसेचे समर्थन करताना पाहिले . मार्क्सने हिंसेला सुइणिचि उपमा दिली आहे. हिंसक युद्धाशिवाय लाल क्रांतीच्या नवजात बालकाचा जन्म होत नाही ; अशी मार्क्स धर्मीयांची अंधश्रद्धा आहे. हिंसा समर्थनीय नाही . देशात कायद्याचे राज्य आहे. लोकशाहीत अशा कृत्यांचे स्थान हे निश्चितपणे तुरुंग आहे .

कम्युनिस्ट हा एक धर्मच आहे । त्याचे दास केपिटल नावचे कुराण आहे … बुर्झ्वा नावाचे काफिर आहेत । मार्क्स नावाचा प्रेषित आहे … क्रांती नावाचा जिहाद आहे । कम्युनिझम ची शरियत स्थापन करण्यासाठी रक्तरंजित क्रांती करायची आहे मग पृथ्वीवर जन्नत - स्वर्ग अवतरणार आहे ! कम्युनिझम वर शंका घेणारे सैतान आहेत !

खरि चिंता अनागर असहिष्णुते विषयी आहे ... आधुनिकता , बुद्धिवाद , विज्ञान निष्ठा , अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि …. व्यक्तिवाद यासाठीही जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.

ज्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि धर्मनेते - व्यक्तिवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य याला तुच्छ मानतात ...त्याचप्रमाणे काल्पनिक वर्ग लढ्याचे स्वयंघोषित सेनापती .........व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे दमन, हिंसा आणि हुकुमशाहीवर विश्वास ठेवतात . सर्व डाव्यांची गणना पुरोगाम्यात करणे हे धाडसाचे ठरेल .

मुळात अहिंसा हा षंढपणा नाही . सध्या शहाण्यासारखे बोलणे म्हणजे षंढपणा आणि मवालीगिरी म्हणजे मर्दपण असे काहीसे वातावरण महाराष्ट्रात तरी तयार होते आहे. सत्य अनेक चष्म्यातून पाहता येते . त्यामुळे दुसर्याच्या मताचा आदर केला पाहिजे. यातूनच अहिंसा आणि परमत सहिष्णुता जन्माला येतात .कठिण समय येता खरी सत्व परिक्षा होते . आपल्या कोम्रेड वरील भ्याड हल्ल्याचा निषेध योग्यच आहे , पण त्यावेळीहि हिंसेचे समर्थन हे निषेधार्ह. .

तत्व म्हणुन कायमच अहिंसक राहणे हा काही शहाणपणाचा निकष नाही . पण हिंसा हे साध्य - ध्येय आणि समाज परिवर्तनातला अपरिहार्य टप्पा असे कोणि समजत असेल तर तो विचार रानटी आहे … पुढे घेऊन जाणारा … पुरोगामी नाही .


  अलीकडे जमीयत उलेमा या मुस्लिम संघटनेचे मुफ्ती मोहम्मद इलियास ह्यांनी "भगवान शंकराला पैगंबर मानण्यास मुस्लिमांची काहीच हरकत नाही.त्या मुफ्ती मोहम्मद इलियासला खालीलपैकी कोणत्या वर्गात बसवायचं?

सदर मौलवी जमियते इस्लामी चा प्रतिनिधी आहे . तो इस्लामचीच भूमिका सांगतो आहे. हि अतिशय मूलतत्ववादी भूमिका आहे. मुहम्मदा पूर्वी हजारो प्रेषित होऊन गेले त्यांनी इस्लामच सांगितला . मोझेस - येशु ख्रिस्त , आदम सारे इस्लामाचेच प्रेषित आहेत पुजार्यांनी मुळ इस्लाम विकृत केला . मुहम्मद शेवटचे प्रेषित आहेत आणि त्यांचे शुद्ध संदेश कुराणात असल्यामुळे सार्या मानवजातीने मुसलमान झाले पाहिजे असे कुराणात म्हटले आहे . मुसलमान येशु ख्रिस्ताला प्रेषित म्हणुन मानतातच पण ख्रिस्ती धर्माला पापयुक्त भेसळयुक्त इस्लाम म्हणतात . …। सदर भाषणात जमियत् चा मौलवी ------- शंकर हाही इस्लामचा प्रेषित होता आणि सनातन धर्म हा इस्लामच आहे असा दावा करत आहे . खरे पाहता तो हिंदुना मुस्लिम व्हायची दावत देत आहे . त्यात खुश होण्यासारखे काहीही नाही . 

काही मौलविंनि या मुहम्मद इलियास विरुद्ध फतवे काढले आहेत . खरा इस्लाम काय ? यावर एकमत नाही . काफर नरकात जाणार यावर मात्र एकमत आहे.  शिया सुन्निविरुद्ध आणि  देवबंद कादियानिविरुद्ध  फतवे काढताच असतात . इस्लाम मधील अंतर्गत संघर्ष  आहे हा.

राहिली बात राष्ट्रीयत्वाची … तर मुस्लिमांचे हिंदुस्थान वर प्रेम आहेच . या देशावर आम्ही राज्य केले हा आमचाच देश अशी ती भूमिका आहे. १८५७ च्या उठावापासून मोपल्यांच्या बंडापर्यंत काफिर ब्रिटिश आणि काफिर हिंदुशि लढताना मुस्लिमांचे भारतावरील प्रेम उतू चालले होते हे विसरता कामा नये . जगात इतर श्रद्धा असतात आणि त्यांनाही गैरमुस्लिम राहायचा अधिकार आहे हे जमियतचा कोणताही मौलवी म्हटलेला नाही . म्हणणार नाही .

"पूर्वज सबके हिंदु है " असे म्हणुन आपण फार स्मार्ट्पणे घर वापसीचे आवाहन करत आहोत असे संघाला वाटते . वस्तुत: काफिर पूर्वज आणि पूर्वजांची जात यावर मुस्लिम मुळीच प्रेम करतच नाहीत . प्रत्यक्ष मुहम्मदाच्या गैरमुस्लिम आईचे स्थान नरक आहे असे कुराणातच म्हटले आहे . इस्लामचे घोर अज्ञान हा हिंदुंचा गुण आहे … त्यामुळेच या मौलवीच्या वक्तव्याचा अर्थ त्याना कळत नाही . शंकर मुसलमान होता आता तुम्हीही व्हा असे ते आवाहन आहे . त्यात खुश होण्यासारखे काय आहे ?



 टिळकांच्या ' स्वराज्य ' संकल्पनेचा नेमका अर्थ काय होता ? 

 ' स्वराज्य ' = वसाहती अंतर्गतचे राज्य = स्थानिक महापालिका आणि मर्यादित अधिकाराचे राज्य शासन ……. संपुर्ण देशाचे स्वायत्त केंद्र सरकार नव्हे...... . अर्थात त्या काळी हिंदुचिहि राजकीय एकजुट झाली नव्हती आणि हिंदु मुस्लिम प्रश्नाची धार कमी करायला टिळकांना लखनौ करार करून दोन मुस्लिमाना पाच मताचा अधिकार आणि स्वतंत्र मतदार संघ द्यावे लागले होते . त्याकाळी पूर्ण स्वातंत्र्याचि मागणी करणे अशक्य होते . पुढे गांधिकाळात ळात हिंदु लोक कोंग्रेसच्या झेंड्याखालि एकत्र आल्यावर मग नेहरुंनी संपुर्ण स्वातंत्र्याचि मागणी केली


 व्यक्ति हिंदू झाल्यावर इथल्या जातिंच्या उतरंडीत त्याचे स्थान काय असेल ?


हिंदु हा धर्म नाही . तो स्वीकारता येत नाही . हिंदु हे लोक आहेत . त्यांचे अनेक धर्म आहेत . जाते जाते कुलाचार: असे संस्क्रुत वचन आहे . प्रत्यक्षात जातीचा कुळाचार हाच धर्म असतो . हिंदुंचे सहा हजार धर्म आहेत . आणि त्यापैकी एकाही धर्मात धर्मांतराचा विधी नाही . हिंदुमध्ये एक व्यक्ती येऊ शकत नाही . अक्खी जमात घ्यावी लागते . या आधी शक आणि हून जमातींना क्षत्रिय करून घेतले होते . बहुतेक राजपूत हे शक वा हूण आहेत. अगदी आत्ता आत्ता गोव्यातील काही सारस्वत ख्रिस्त्यांना हिंदू केले गेले .

पाण एकूणच हिंदूची धर्म श्रद्धा हि सर्व देव नमस्कार: केशवं प्रती गच्छती अशी आहे . मुळात उपनिशिदातले तत्वज्ञान हे सत्याकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात असे मानते . त्यामुळे अनेकांतवाद एकदा तत्व म्हणून स्वीकारला कि धर्मांतराला काही अर्थच उरत नाही. त्यामुळे प्र्याक्तीकली हिंदु धर्माचा प्रसार होऊ शकत नाही .

हिंदुचा धर्म समाजाबरोबर विकसित होत गेला . वेगवेगळ्या टोळ्यांचा गावगाड्यात समावेश होत असताना सर्व श्रद्धा एकच म्हणुन स्वीकारल्या गेल्या . आणि सामाजिक विषमताही धर्माचे अंग बनली .

एकिकडे विषम अशी जातीव्यवस्था आणि दुसरीकडे उदार असा सर्वधर्म समभाव  . ह्या धर्माचे एकुणाच कठीण दिसते !








पंढरपूरला साने गुरुजींनी उपोषण केले होते आणि दलितांना त्याचा हक्क मिळाला । त्याच मंदिरात प्रवेश मिळाला . तर सावरकरांनी वेगळे मंदिर बांधले पतित----पावन मंदिराची उभारले काय फरक आहे ?




या पतित पावन मंदिरा खेरिज आणिखी अनेक जुनी मंदिरे सुद्धा सावरकरांनी सर्वांना मुक्त केली होती . त्यापैकी महत्वाचे म्हणजे रत्नागिरीतील विट्ठल मंदिर . हे मंदिर २०० वर्षे पुरातन मंदिर होते. सावरकरांनी एकुण ४५० पेक्षा जास्त लहान मोठी मंदिरे सर्वांना मुक्त केली होती . हे काम त्यांनी रत्नागिरी च्या स्थानबद्धतेत जवळ जवळ १२ वर्षे नेटाने चालवले होते . धनंजय कीर लिखित सावरकर चरित्रात याचा उल्लेख आला आहे.

दुसरे म्हणजे साने गुरुजी हे आस्तिक धर्मश्रद्ध होते आणि सावरकर नास्तिक तर्कट बुद्धिवादी होते हे आपण समजून घेतले पाहिजे . सावरकरांचे विज्ञान निष्ठ निबंध आणि जात्युच्चेदक निबंध हि दोन पुस्तके अवश्य वाचनीय आणि विचारांची दिशा बदलणारी आहेत . अनुवंश ते शब्द्प्रामाण्य , ग्रंथ प्रामाण्य या सार्याचे खंडन या पुस्तकातून आढळेल . याच काळात सावरकरांनि रोटिबंदि पासून बेटिबंदि पर्यंत सात स्वदेशी बेड्या तोडण्याचे आवाहन हिंदुना केलेले दिसते. सावरकरांनी या काळात काही आंतरजातीय विवाह लावून दिल्याचे उल्लेख हि येतात .

पुढे हिंदु महासभेत जाउन सावरकरांनी सनातन्यांशि युती केल्याने त्यांना फारशा सुधारणा करता आल्या नाहीत . आणि त्यांनी उत्तर आयुष्यात विज्ञान निष्ठा या प्रकारावरही फारसा जोर दिला नाहि. हिंदु कोड बिलाबद्दल सावरकरांनी बाळगलेले सूचक मौन बरेच काही सांगु शकेल. .



एक गोष्ट सोडून...














वसूने डाव्या कोपराने स्टेरलियम च्या बाटलीचे बटण दाबले. ते निळे द्रावण उजव्या हातात घेतले. प्रथम दोन्ही हातांची बोटे चोळली मग तळहात. मागची बाजू. आधीच उघडून ठेवलेले निर्जंतुक ग्लोव्ह्ज चिमटीने उचलून हातांवर चढवले. अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. पहिला दरवाजा उघडला.

मग दुसरा दरवाजा उघडण्यासठी तिने पुन्हा अ‍ॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. ती तिच्या कॅबिनेट मधे दाखल झाली. डॉ. वसुंधरा सुब्रमण्यम वय वर्षे ४३. अविवाहित. ती एम. बी. बी. एस. ला होती तेंव्हा तिच्या टप्पोर्‍या बोलक्या डोळ्यात भरपूर पोट्टी बुडाली होती. विजय त्यातलाच एक. ज्या डोळ्यात तो तासन तास हरवून जायचा त्याखाली आता काळी वर्तुळे येउ लागली होती. वसुने मेकअप चे सहाय्य कधीच घेतले नाही ती वर्तुळ लपवायला. विजयने परदेशी उच्च्शिक्षणासाठी त्याच्या प्रेमाचा त्याग केला; तेंव्हाच तिचा पुरुष जमातिवरचा विश्वास उडायला हवा होता. पण तस झाल नाही. मायक्रोबायोलॉजि - एम डी च्या शेवटच्या वर्षाला होती ती... तेंव्हा एका देखण्या प्राध्यापकाच्या प्रेमात पडली. बाहुपाशात विसावली. मनालिच्या हवेचा कैफ अन केरळच्या समुद्राची नशा आकंठ प्यायली दोघ एकत्र. पण प्राध्यापक महाशय आणखी बर्‍याच विद्यार्थीनिंबरोबर भारत दर्शन करून आले होते. अन त्यांचा प्रवासी बाणा मोठा चिवट होता. तेही जहाज एका दुसर्‍या बंदराला लागलं. माकडीण मेली. वसू रडली नाही त्यादिवशी. नंतर कधीच रडली नाही ती. अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतून पी एच डी पूर्ण केलं आणी तिथेच रिसर्च असिस्टंट म्हणून काम करू लागली. जिद्दीच्या, कष्टाच्या आणी अंगभूत हुषारीच्या जोरावर अतिशय कमी वेळात तिथल्या मयक्रोबायोलॉजी विभागाची प्रमुख बनली ती. तेही एव्हढ्या कमी वयात .... ४३ म्हणजे कमीच वय हो त्या पोस्ट साठी.
वसून आत पाउल टाकताच डॉ जॉन तिच्याकडे पहात मान हलवता झाला. हसायची सोय न्हवती कारण बायोहजार्ड चेंबरमधे तोंडावर मास्क घालून बसला होता तो. आता मास्क च्या आड हसलं काय ? किंवा जिभ दाखवून वेडावल काय ? दिसणार कसं समोरच्याला ? पण वसू कधीच हसण्याला प्रतिसाद द्यायची नाही. चेंबरबाहेरही नाही. कोणाच्याच नाही. वसू ची एक ज्युनियर अमेरिकन मुलगी हॉस्पिटल मधून आलेली सँपल्स चेक करत होती. युरिन, स्टूल, स्पुटम ची रूटीन सँपल तिन बाजुला काढली. टीबी ची , एंडोस्कोपी करून काढलेली वगैरे स्पेशलाइस्ड सँपल्स वेगळी केली. अत्ता मुद्दा असा की. युरिन इंन्फेक्षन झालय म्हणजे कुठल्यातरी जंतूचा संसर्ग झालाय. पण कोणत्या जंतूचा ? ते कस ओळखणार ? त्यासाठी ते सँपल एका क्ल्चर प्लेट वर लावायच ती ३७ डिग्री सेल्सियसला उबवायची. त्या क्ल्चर प्लेट मधलं अन्न खाउन जंतू वाढतात. आणी सुरेख अशा कॉलोन्या बनतात त्यांच्या.

त्या कॉलोन्यांचे गुणधर्म प्रत्येक जंतुसाठी वेगवेगळे असतात. म्हणजे प्स्यूडोमोनास ह्या बॅक्टेरियाची कॉलोनी हिरवी असते. इ कोलाय नावाच्या जंतूची कॉलोनी लाल रंगाची बनते.

कॉलोन्यांच्या रंगावरून, त्यांच्या रासायनिक गुणधर्मावरून, आणी मायक्रोस्कोपखाली त्या जंतूचे निरिक्षण करून त्याची बिनचुक प्रजात ओळखता येते.
त्या जंतूंची प्रजात ओळखण आता फारच महत्वाच बनत चालल होत. कारण अँटीबायोटीक्सना (प्रतिजैविक औषधे) हे रोगजंतू प्रतिकारशक्ती डेव्हलप करू लागले होते. प्रत्येक प्रजातीसाठी वेगळं अँटीबायोटीक् आवश्यक बनलं होतं. त्यामुळे जंतूची प्रजाती ओळखण हे औषधोपचारासाठी अतिशय आवश्यक बनल होतं. आणी वसू या शास्त्रातल्या सर्वश्रेश्ठ तज्ञांपैकी एक होती.
ती काम करायची जीव तोडून, विद्यार्थ्यांना शिकवायची जीव तोडून, पण जीव कोणालाही लावत न्हवती. बॅक्टेरियांच्या कॉलन्यात रमत होती. पण मनुश्याच्या कॉलन्यातून - समाजातून तिचा जिव उठला होता.
तिन सगळ्यांसाठीच रेसिस्टन्स तयार केला होता.
एक गोष्ट सोडून...
(क्रमशः)


इतरांच्या आवडलेल्या पोस्ट 


स ह देशपांडे या साक्षेपि विचारवंतामुळे पु ग सहस्त्रबुद्धे समजले … भारताच्या राष्ट्रवादावर चिंतनीय विचार : -
https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/



१)नास्तिक जाहीरनामा

हे जग निसर्गनियमांप्रमाणे चालत आहे. जगावर आणि मानवावर कुठल्याही प्रकारच्या अलौकिक शक्तीचा वा ईश्वराचा प्रभाव नाही. असे म्हणताना आम्ही कुठल्याही प्रकारचा धार्मिक वा राजकीय अभिनिवेश बाळगत नाही. ‘माझे नास्तिक्य विचारपूर्वक आहे त्यात आढ्यता वा राग नाही’ असे शहीद भगतसिंग म्हणतात. त्यास आमचा दुजोरा आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 25नुसार प्रत्येकास सदसद्विवेकबुद्धीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य आहे आणि सदसद्विवेकबुद्धीमध्ये नास्तिकता समाविष्ट आहे.
नास्तिक म्हणून आमची सर्वसाधारण ओळख आहे. तरी आम्ही विचारांच्या विविधतेमुळे स्वतः:स नास्तिक, विवेकवादी, संशयवादी, अज्ञेयवादी, बुद्धिप्रामाण्यवादी,मुक्तचिंतक, मानवतावादी इत्यादी नावांनी संबोधतो.
प्राचीन काळापासून अनेक थोर नास्तिक होऊन गेले ज्यांची नोंद इतिहासाने नेहमीच घेतली आहे. या नास्तिक विचारवंतांचे मानवी विकासात महत्त्वाचे योगदान आहे. आजही अनेक नास्तिक समाजकारण, कला, शिक्षण, विज्ञान, राजकारण या विविध विभागात आघाडीवर काम करताना दिसतात.
अशा सर्व नास्तिकांसोबत आम्ही आपले ऐक्य घोषित करीत आहोत.



२)  पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्म - प्रवास . 

.अलिकडे पौराणिक विमाने, लिंगदेहाने केलेला मंगळग्रहाचा प्रवास इ. विषयी वाचून आमच्या मनाने घेतले, की आपणही असा प्रवास करावा, आणि प्राचीन काळचे जग कसे होते, ते बघावे... अमेरिकेच्या स्थूलदेहाने केलेल्या प्रवासात आम्हाला सर्वत्र एकसारखी शहरे, बाजारादि दिसले होते, परंतु आमची प्राचीनत्वाची हौस त्यातून भागली नव्हती...सूक्ष्म देहाने जावे ???
परन्तु कसे? आपण काही त्या थोर नर्तकांसारखे ब्रम्हर्षी वा प्रज्ञाब्रम्ह वगैरे नव्हे, मग हे जमायचे कसे?
तेवढ्यात आठवले की मागे एकदा एका कठीण प्रसंगी आपण आपल्या दिवंगत माता-पित्यांना आवाहन केले होते, मग त्यांनी आवाहनास साद देउन मार्गदर्शन केले होते ... असे आत्मे भल्या पहाटे पिंगळावेळेस पिंगळ्याच्या रूपात आपल्या घरासमोर बसून आपल्याला साद देतात, हे अनुभवाने ठाऊक झालेले होतेच, मग रात्री झोपताना अगदी उत्कट इच्छा केली, की उदईक पहाटे त्यांनी पुन्हा एकदा दर्शन द्यावे.

दुसरे दिवशी पहाटे पिंगळा बोलला, आणि अर्धवट जाग आली. आत्मे पिंगळ्यामार्फत आपल्याला संदेश देतात, आपण डोळे न उघडता, हालचाल न करता मन एकाग्र करायचे, म्हणजे आत्म्यांशी संपर्क होतो...
...समोर अनेक वर्षांपूर्वी दिवंगत झालेले माता-पिता सुहास्य वदनाने उभे होते.... त्यांना साष्टांग दंडवत घालून मी कश्यासाठी पाचारण केले, ते सांगितले, तेंव्हा ते म्हणाले की अरे, यासाठी तुला पुरुषोत्तम चांगली मदत करील, थांब त्याला बोलावितो ... असे म्हणण्याचा अवकाश, की लगेचच समोर 'ताजमहाल म्हणजे तेजोमहाआलय' इत्यादि ग्रंथांचे कर्ते, सुप्रसिद्ध पु.ना. ओक प्रकट झाले, . मी त्यांना वंदन करून म्हटले, की मला अमेरिका देश फार पूर्वी कसा होता, हे बघायचे आहे, त्यावर ते म्हणाले, की चल, आताच जाउया आपण.
त्यांनी मला " ओम र्‍हीम र्‍हूम काल भैरवाय नमः ओम र्‍हीम र्‍हूम कालप्रवासार्थ सज्यामि" असा मंत्र म्हणायला सांगितले..... मी मंत्रजाप सुरु करताच एकदम भोवतालचे वातावरण बदलत गेले, सोसाट्याचा वारा सुटल्यागत आवाज येऊ लागला आणि मी पुनांसह एका नवीनच जागी होतो, असे आढळले.

"हे बघ, आपण अनेक शतकांपूर्वीच्या अमेरिकेत आलेलो आहोत... पुना म्हणाले... त्याकाळी यास 'आम्रविका' असे नाव होते,
आणि आपल्या भारतास "इंदुस्थान" म्हणत....
हे ऐकून मला वाटलेले आश्चर्य ताडून ते म्हणाले, ..."ज्यास सांप्रत काळी अमेरिका म्हणण्याचा प्रघात आहे, त्याचे मूळ नाव 'आम्रविका' होय. याची उपपत्ती अशी, की प्राचीन काळी अपरांतक अथवा कोकण प्रदेशातून उत्तम प्रतीचे हापूस आम्र या आम्रविका देशात जहाजे भरभरून पाठविले जात. चितळे, आपटे, केळकर आदी चित्पावनांची मोठमोठी जहाजे असत. 'अमेरिका खंड' हा शब्द प्रयोग देखील 'आम्रखंड' वरून प्रचलित झालेला आहे.
या खेरीज ओक घराण्यातील व्युत्पन्न ब्राम्हण आम्रविकेतील बहुत लोकांच्या ताडपट्टीवरील नाड्या इकडे पाठवून त्यांना त्यांच्या पूर्व-जन्मांतील पापांचे स्मरण करवून देत, व त्यावरील उपाययोजना सांगत. ओक घराण्याचा दबदबा एवढा, की आज देखील 'शर्मन ओक' 'ओकल्यांड', 'सिल्व्हर ओक' इत्यादी जागा प्रसिद्ध आहेत. ओकांनी लाविलेले हजारो 'ओक वृक्ष' अमेरिकेत आहेत.... बघ तिकडे पलीकडे आहेत ओक वृक्ष...

पुना पुढे म्हणाले :"आंब्याखेरीज हिंदुस्थानातून इतर अनेक जिन्नस पाठवले जात. उदाहरणार्थ हिंग. हा त्याकाळी हिंदुस्थानाचाच एक भाग असलेल्या अफगाणी लोकांचे प्रदेशातून येई. ( 'अफगाणी' या शब्दाची उपपत्ती अशी, की तेथे अफूचे उत्पादन फार, सबब तेथील लोक अफूची निशा करून गाणी म्हणत हिंडत, त्यांस 'अफुगाणी' म्हणत). हिंगाचा व्यापार एवढा चाले, की हा व्यापार करणार्‍या लोकांचे अंगास अहोरात्र हिंगाचा वास येई. त्यावरून त्या लोकांचे आडनाव 'वास-हिंग-तन' असे पडिले, ते आजमितीस 'वॉशिंगटन' म्हणून प्रचलित आहे. या नावाचे एक गाव पूर्वी असे, ते पुढे आम्रविकेची राजधानी झाले.
त्याकाळचे पुरुषांस बटकी, कुळंबिणी, अंगवस्त्रे इत्यादिंचा सोस फार. याकारणे जारज प्रजाही अमाप. सबब तेथील पुरूषांचे 'जारज' हे नाव बहुत प्रचलित असे, उदाहरणार्थ 'जारज वास- हिंग- तन' ह्यास हल्ली 'जॉर्ज वाशिंगटन' असे म्हणतात....
हे सर्व ऐकून मी थक्कच झालो, मी त्यांना सांगितले, की मी पूर्वी अमेरिकेतील पिट्सबर्ग, न्यूयॉर्क वगैरे शहरे बघितलेली आहेत, त्यावर ते म्हणाले, अरे, पिट्सबर्ग म्हणजे पीतस-दुर्ग, इथे भारतातून वारेमाप हळद येई, त्यामुळे इथला किल्ला अगदी पिवळाजर्द झाला होता, आणि ज्याला आता न्यूयॉर्क म्हणतात, त्याचे मूळ नाव 'नऊअर्क' इथे इंदुस्थानातून नऊ प्रकारचे आयुर्वेदिक अर्क मोठ्या प्रमाणावर येत.... ते बघ नव-अर्क बंदर.
मला हे सर्व काही खरे वाटे ना, तेंव्हा ते म्हणाले, चल तुला प्रत्यक्षच दाखवतो... ते बघ आंबे घेउन येणारे जहाज, आणि माल उतरून घेण्यास नावेतून चाललेले आम्राविकन लोक.
हे बघून मात्र माझी खात्री पटली....
...परंतु भारत देशास 'इंदूस्थान' म्हणत, हे काय गौडबंगाल ? या माझ्या प्रश्नावर पुना म्हणाले " अरे, प्राचीनकाळी भारतातून नियमित पणे चंद्रावर आपली अंतराळयाने जात. त्यांना "इंदुयान" म्हणत. त्यामुळे ज्या देशात अशी 'इंदुयाने' असत, तो देश 'इंदूस्थान' म्हणून विख्यात झाला. ते बघ आकाशात उडणारे इंदुयान ...
आणि ते बघ खुद्द आम्रविकेत आलेले एक लहान इंदुयान...
तेवढ्यात, " अरे, आता मला जायला हवे, कारण इंद्र देवाने माझ्यावर त्या अल्ला आणि गॉड च्या प्रदेशातील बित्तंबातमी काढून आणण्याची गुप्त कामगिरी सोपवलेली आहे, तिथे जाणे मला आता भाग आहे, तू पुन्हा ये, मग तुला आणखी गोष्टी दाखवेन...." असे म्हणोन पुना अंतर्धान पावले, आणि मला पण पूर्ण जाग आली... मग मी ठरवले, की आता पुढल्या वेळी आपण रोम, फ्रान्स -वगैरेची काल-यात्रा करायची.... - प्रेषक, चित्रगुप्त

३) पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. 

एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या अस तात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भयसापळा असे म्हणता येईल.
जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. "हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही!
माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे. एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्‍यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.
आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय?
एक जण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट करतोय, हातांनी पाणी खळबळवतोय. या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय, असं त्याचं म्हणणं. "अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल!' कोणीतरी समजावत आहे. पण हा ऐकूनच घ्यायला तयार नाही. हौदाचा तळ रिकामाच आहे आणि आपण केलेला थयथयाट व्यर्थ होता, हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल?
पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा. हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.
भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.
--- डॉ. विकास आमटे



४) उठा हथौड़ा जब,
उसने तोड़नी चाही,
गुलामी की जंजीरे तो,
सारे गुलाम खड़े हो गए
खिलाफ उसके। 
तर्क दिया ये गुलामी,
हमारे जीवन का आधार है,
त्याग है, समर्पण है, प्रेम है,
आदर्श है, परंपरा है, रीति है,
रिवाज है, संस्कृति है, सभ्यता है,
हमें रहने दो इनका गुलाम,
तुम्हे कोई हक़ नही इन्हे तोड़ने का,
ये हमारा धर्म है,
और अगर एक बार धर्म खतरे में आया,
तो बह जाएँगी खून की नदियां,
और तब से आज तक जब भी कोई,
तोडना चाहता है गुलामी,
बहती है खून की नदियां..
-अनीसा अंजुम


५) रिचर्ड डोकिंस केंन्सर 
https://www.facebook.com/RichardDawkinsFoundation/photos/a.496176595154.294030.8798180154/10152685908090155/?type=1

६) पाड सिंहासने दुष्ट हीं पालथीं, 
ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती, 
मुकुट रंकास दे, करटी भूपाप्रती,
झाड खटखट तुझें खड़ग क्षुद्रां !
कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका, 
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका, 
मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका 
खवळवीं चहुंकडे या समुद्रां !
- भा. रा. तांबे


७) त्रिखंडाला लगाम घालून स्वार होणार्‍या अरबी तुमानी
हिंदुभूमीच्या कर्कवृत्तावर वाळत घातल्या गंगेत धुऊन
ठुमर्‍या गझला गात विटक्या होउन फाटल्या
भक्कम स्थिरावून ठेवलेल्या उंच मशिदींच्या गिर्रेबाज घुमटांवर 
गिरकी घेऊन मऊ होणार्‍या हिंदवी वार्‍यांना कोणी चाहता नाही
दिमाखात हिंदुभूमीच्या पोटावर खूर रोवून बसलेल्या इराणी मनोर्‍यांना
उलथून टाकले तर सावरायला शहेनशहा नाही
डबेऽ छाते ऽ दुरूस्त करून लटांबर पोसणार्‍या
किरट्या छात्यांत गुरमरणार्‍या रूहूला कुराणाला कुबड्या नाहीत
बहुमताचा धूर ओकू लागली हिंदुमहासागरातली बेटं तर
हजार वर्षांच्या इतिहासाची सुरळी होऊन शिरू पहाते काजीमुल्लांच्या तुमानीत
गल्लीबाजारात मोकाटणार्‍या मरतुकड्या गायींच्या
नुस्त्या हुंबरण्यानं कोलमडतात
अल्पसंख्यांक अरबी घोडे खिंकाळत गावोगाव
आणि तोफखाने चालवीत दख्खन बेचिराख करून
मोहल्ले पक्के रोवून बसलेला मुसलमान हाज उकरीत बसतो-
शिल्लक सांभाळीत जळक्या शेवचिवड्याच्या परातीत
त्याच्या दुकानात विस्तव फक्त धुमसती राख
बंबाशिवाय विझलेली. मागचं उद्ध्वस्त दुकान
करंट्या इतिहासाचं आठ शतकांच्या
न किसी की आँख का नूर हूँ म्हणत पंचनाम्याचा वैताग सोसत.
- भालचंद्र नेमाडे.(देखणी, पृष्ठ 24, प.आ.1991, पॉप्युलर प्रकाशन)

८) भैय्याजी काणे
ही गोष्ट आहे एका भैय्याजी काणे या अप्रसिद्ध माणसाची. हा अविवाहित माणूस, काम करी शिक्षकाचे. पण एके ठिकाणी रहाणे अंगातच नाही. दोन तीन वर्ष झाली की या गृहस्थाला त्या जागेचा कंटाळा यायचा, की निघाला पुढच्या कुठल्या तरी ठिकाणी. असे करत करत हे पोहोचले एके दिवशी थेट नागालॅंडमधे. अशा भ्रमंतीतून त्यांना भारतातील जवळजवळ सर्व भाषा येत होत्या.
तीन चार वर्षे नागभूमीतील उख्रूल या जिल्ह्याच्या ठिकाणी राहिले, शिक्षक म्हणून. या ठिकाणी पोचायचे म्हण्जेच दिमापूरपासून एक आठवडा चालत जावे लागे. असे हे ठिकाण. त्या काळी बाहेरील माणूस आला की "खेतमें ले जाओ".. म्हणजे मारून टाका हे नागभूमीतील परवलीचे वाक्य होते. पण तरी शिक्षकाबद्दल आदर होता, त्यामुळे त्यांच्यावर बळी जाण्याची वेळ नाही आली. अशा या दुर्गम ठिकाणीही आधीच ख्रिस्ती पोचलेले होते. मुलांन शिक्षण देता देता तिथली भाषा तांखूल शिकले. (बहुधा या भाषेचे नावही इथल्या सहसा कोणी ऐकले नसेल)
तीन चार वर्षे झाली, आणि यांना आला तिथे रहायचा कंटाळा. त्यांनी निरोपाची बोलणी सुरू केली.
पन तिथल्या मुलांना त्यांचा इतका लळा लागला होता की मुले त्यांना सोडेनात. दोन मुले तर फारच हटून बसली..तुम्ही जायचे नाही, नाहीतर आम्हाला घेऊन चला. मोठ्या कष्टाने त्यांनी दोन मुलांना बरोबर नेण्याचे मान्य केले. त्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांनी स्पष्ट कल्पना दिली की आता या मुलांना घरची कितीही आठवण आली तरी आता १ वर्षाच्या आत येणे शक्य नाही. 
अशा रितीने ते त्या दोन मुलांना घेऊन थेट सांगलीत आले. आणि तेथेच माझा त्यांचा संबंध आला. या दोघांना आणताना त्यांच्या पालकांकडून काहीही पैसे घेतले नव्हते, पण दोन मुलांचा संसार चालवणे काही भैयाजींना कठीण गेले नाही.
स्थानिक शाळेत औपचारिक आणि स्वत:च्या संगतीत अनौपचारिक शिक्षण देणे चालू होते.
एक वर्षानी त्या मुलांना परत त्यांच्या घरी सोडावे या विचाराने, भैय्याजी परत नागालॅंडमधे गेले. परंतू या दोघांची प्रगती पाहून, त्यांच्या पालकांनी त्यांना परत घेऊन जाण्याची विनंती केलीच, परंतू आणखीही ४ मुलांच्या पालकांनी त्यांच्याही मुलांना घेऊन जाण्याची गळ घातली. परंतू आता, नवीन मुलांच्या पालकांनी पैसेही देऊ केले. आता भैय्याजी परतले ते सहा मुलांना सोबत घेऊन. पालकांनी दिले तेवढे पैसे घेतले, आणि निघाले. त्या नव्या सहा जणांमध्ये एक होता ऍमॉस, तेथील चर्चच्या पाद्र्याचा मुलगा. मोठ्या विश्वासाने त्याने आपल्या मुलालाही भैय्याजींच्या सोबत पाठवले होते, कारण त्यालाही विश्वास होता की भैय्याजी मुलाचे कोणतेही धर्मांतर वगैरे करणार नाहीत.
आता भैय्याजी सहा मुलांसह पुन्हा सांगलीत संघाच्या जागेतच राहू लागले. भैय्याजी स्वत: साती जणांचा स्वयंपाक करत, मुलांच्या मदतीने.
जरी मुलांच्या पालकांनी काही पैसे दिले असले तरी, आता या कामासाठी पैसे कमी पडू लागले. मग सुरू झाला शहरातील कारखानदार, डॉक्टर अशा धनवान लोकांना संपर्क. एक रकमी मदती पेक्षा दरमहा सर्वांकडून ठराविक रक्कम गोळा करून हा उदरनिर्वाह सुरू झाला, आणि येथे माझा त्या कामात थेट सहभाग सुरू झाला.
भैय्याजी रोज संध्याकाळी सर्व मुलांची एकत्र प्रार्थना घेत. त्यात हिंदू प्रार्थना असे, अशीच ख्रिश्चन प्रार्थनाही असे. आणि इथेच त्यांचे संघाशी पटेनासे झाले. संघाच्या बऱ्याच स्थानिक उच्चपदस्थांचा (नक्की नांवे नकोत घ्यायला) आग्रह सुरू झाला की या मुलांचे हिंदुधर्मांतर करावे. या आग्रहाला भैय्याजी अजिबात दाद देत नव्हते.
पुढील वर्षी, आमच्याही मुलांना घेऊन जा म्हणणाऱ्यांची संख्या १५ झाली. आधीच संघाच्या लोकांचा धर्मांतराचा तगादा, आणि आता वाढलेली मुलांची संख्या, यामुळे आता सांगलीत रहाणे कठीण होऊन बसले. मग भैय्याजींनी सांगली सोडले, आणि ते गेले म्हैसूरला. तेथे त्यांना अशा कोणत्याही अटीशिवाय जागाही मिळाली आणि आर्थिक मदतही मिळाली.
यावेळी आधी सांगलीत शिकत असलेल्या ६ मुलांना म्हैसूरमध्ये शाळेत प्रवेश मिळेना (कारण लक्षात नाही). त्यामुळे या सहा मुलांना माझ्याकडे सोपवून भैय्याजी म्हैसूरला रवाना झाले. पुढील वर्षभर या ६ जणांसाठी वर्गणी जमा करणे, त्यांच्या अभ्यासाकडे पाहणे, त्यांच्यात भारताचे प्रेम जागृत ठेवणे, त्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था करणे ही कामे भैय्याजीनी माझ्यावर सोपविली होती. या काळात वरील धर्मांतरच्या मुद्द्यावर संघाची जागाही सोडावी लागली आणि ही मुले सांगलीच्या जुन्या राजवाड्यातील एका भागात रहात होती.
पुढील काही वर्षात म्हैसूरमध्ये या मुलांची संख्या सुमारे १०० पेक्षाही वर गेली होती.
याच काळात डोंबिवलीचा जयवंत पवार हा नागभूमीत शिक्षक म्हणून राहिला.
सांगलीतील ती सहा मुले पुढील वर्षी सांगलीतून (बहुधा) म्हैसूरला गेली आणि त्यानंतर माझा भैय्याजींचा संपर्क कमी झाला.
या ५/७ वर्षात या मुलांच्यात आणि त्यांच्या गावातील लोकांत, एवढेच नव्हे तर एकूणच नागालॅंडमध्ये निश्चितच भारतातील लोकांबद्दल एक ममत्व वाटू लागले. याचीच परिणीती म्हणजे, त्या काळचा नागा बंडखोर नेता लालडेंगा हा पुण्यापर्यंत येऊन या कामाबद्दल माहिती घेऊन गेला. त्यानंतर त्याच्या विरोधाची धारही बोथट होत गेली.
आज आपण जे नागालॅंडमध्ये जाऊन सुखरूप परतू शकतो, त्याचे मोठे श्रेय भैय्याजींच्या या कामाला निश्चितच आहे.
शारिरिक रित्या थकल्यानंतर भैय्याजींनी विजनवास पत्करला आणि कोकणातील एका खेड्यात एका स्नेह्यांच्या शेतावर, पण तरीही एका झोपडीत एकट्याने काळ व्यतीत केला.
आजही भैय्याजी काणे यांच्या नावाने नागभुमीत एक शाळा चालू आहे. 
ठामपणे त्यांनी तेथे मोठे काम केले. By Suhas Gurjar

९) Will you Kill the Fat Man ? त्या ढोल्या ला तुम्ही ठार मारणार काय ? नैतिकते चा मुलगामी वेध घेणारी एक विलक्षण TEST !
या चाचणीची पार्श्वभुमी
नैतिकते च्या तत्वाचा शोध घेणारी ही Test सर्वप्रथम बनविली ती Philippa Foot या तत्ववेत्ती ने आणि १९६७ मध्ये आपल्या Abortion and Doctrine of Double Effect या रीसर्च पेपर मध्ये प्रकाशीत केली. पुढे Judith Thomson या दुसरया एका तत्ववेत्तीने त्यात Fat Man चा अंतर्भाव करुन त्याला एक नविन कलाटणी दिली. आता या Test चे भरपुर variations तयार झालेले आहेत आणि ही वेगवेगळ्या तज्ञांनी यात भर घालुन अतिशय उत्क्रांत झालेली अशी चाचणी आहे. ही अतिशय समर्थपणे नैतिकतेच्या प्रश्नाचा मुलगामी असा वेध घेते. ही तुम्हाला अतिशय विचारप्रवृत्त करुन तुमचा नैतिक निर्णय तुम्हाला तपासण्यास भाग पाडते.तत्वज्ञान मानसशास्त्र आणि न्युरोसायन्स याचा वेगवेगळ्या कोनातुन वेध घेतात. भरपुर discussion झालेली अशी ही एक जबरदस्त चाचणी आहे. आता यातील वेगवेगळ्या एकुण ४ सिच्युएशन्स बघुयात.
[FIRST SITUATION]
first
1st Situation
कल्पना करा की चित्रातील या Trolley चा ब्रेक फ़ेल झाला आहे ती जाउन समोरील पाच माणसांना धडकुन ते सर्व मरणार आहे. तुमच्या हातात एक पर्याय आहे हीला एक switch दाबुन दुसरया ट्रॅक वर वळवुन तुम्ही या पाचही माणसांचे जीव वाचवु शकतात मात्र यात एका माणसाचा जीव जाईल. आता तुम्ही समजा या परीस्थितीत आहात तर काय निर्णय घ्याल? पाच जणांना मारुन एकाचा जीव वाचविणार की एक जणाला मारुन पाच माणस वाचविणांर? आणि तुमचा कुठला निर्णय नैतिक असेल आणि त्या निर्णयाला काय नैतिक आधार असेल ?
परीणामवादी ( consequentialist) आणि उपयुक्ततावाद (utilitarianism ) ही भुमिका घेउन दिलेली उत्तर
– परीणांमाचा विचार करता जर आपल्या कृतीने एक एवजी पाच जीव वाचणार असतील तर एकाला मरु देउन पाच वाचविणे ही योग्य नैतीक कृती ठरते. हा प्रथमदर्शनी फ़ार सोपा निष्कर्ष निघतो आणि बहुसंख्य लोक याचे उत्तर एकाला मरु दिले जाउन पाच वाचवु असा नैतिक निर्णय देतात.उपयुक्ततावाद (utilitarianism) ही म्हणतो की एका पेक्षा पाच वाचविणे अधिक उपयोगी आहे. उपयुक्तततावादा चे greater good चे तत्व याने साध्य होते.
[ SECOND SITUATION ] 
second
2nd Situation
आता कल्पना करा की सर्व Situation अगदी 1st Situation प्रमाणेच आहे फ़क्त थोडासा फ़रक आहे.तो असा की आता तुम्ही Foot Bridge वर खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे उभे आहात तुमच्या समोर एक जाडा माणुस बेसावधपणे उभा आहे. तुम्ही स्वत: बारीक आहात आता तुम्हाला सगळी परीस्थिती असे समजा की कळलेली आहे. आणि जर तुम्ही जाड माणसाला जर स्वत:च्या हाताने ढकलले तर तो Trolley समोर पडेल आणि त्याच्या अवाढव्य शरीरा आणि वजनामुळे Trolley थांबुन पाच लोकांचे जीव निश्चीत वाचु शकतात अशी परीस्थिती आहे आणि हे सर्व तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेले आहे. तर प्रश्न असा की तुमचा सर्वात योग्य नैतीक निर्णय काय असेल? तुम्ही जाड माणसाला Trolley पुढे ढकलुन चिरडु दिले जाउन बाकी पाच जणांचे जीव वाचविणार का ?
वरती 1st Situation मध्ये एका माणसाला ५ माणसांसाठी मारण्यास तयार होणारे बहुसंख्य लोकं जाड माणसाला ढकलायला का तयार होत नाहीत ?
यातील ही बहुसंख्य ज्यांनी 1st Situation पाचाच्या बदल्यात एक मारण्याची तयारी दाखविली होती ते जाड माणसाला ढकलायला हमखास नकार देतात असे सतत च्या Test Results च्या common pattern ने लक्षात आलेले आहे पण का? काय फ़रक आहे ? इथेही एकाच्या बदल्यात पाच जीव वाचताहेत ? मग काय अडचण आहे जाड माणसाला ढकलण्यात ? निव्वळ तर्काचा विचार केला उपयुक्तततावाद आणि परीणामवाद ही बघितला तर पाचाच्या एवजी एक माणुस मरु देणे कधीही नैतिकच आहे असे वाटते तरीही.......असे का होते जाड माणसाला ढकलुन मारायला माणुस का कचरतो ? याची वेगवेगळी स्पष्टीकरणे देण्यात आलेली आहेत ती काय आहेत एक एक करुन ते बघुयात.
तात्विक स्पष्टीकरण
Thomas Acquina ने निर्माण केलेली Doctrine of Double Effect असे सांगते की जर एखादे चांगल्या हेतु ने प्रेरीत होउन एखादे कृत्य केले आणि मात्र त्याच्यामुळे काही वाईट परीणाम ही झाला आणि मुख्य म्हणजे तो जर हेतुत: नव्हता आणि चांगल्या च्या तुलनेने कमी होता तर ते जे काही वाईट होत आहे तो जो काय डबल इफ़ेक्ट पैकी जो थोडा/ कमी वाईट इफ़ेक्ट झाला आहे तो क्षम्य च आहे. ही विचारसरणी ( जीनीव्हा वॉर कन्व्हेशन्स चा एक आधार आहे ) या आधाराने 1st Situation बघितली तर त्या माणसाला मारण हा हेतु कधीच नव्हता पाच माणस वाचविण हा चांगला हेतु होता. आणि जर योगायोगाने त्या माणसाने वेळेवर स्वत: पळुन जाउन स्वत:ला वाचविले असते तर याचा तुम्हाला ला आनंदच वाटला असता. पण इथे 2nd Situation मध्ये या जाड माणसाला मारण हाच तुमचा हेतु बनतो कारण तुम्ही ढकलल आणि त्याने स्वत:ला सावरुन जर तो पुढे ट्रॅक बाहेर सरकला तर बाकीच्या पाचांचे प्राण जातील आणि ते तुम्हाला अजिबात आवडणार नाही म्हणुन तुम्हाला त्याला मारण भाग आहे. तर आता हाच तुमचा हेतु झाला आणि हा वाईट हेतु आहे हे तुम्हाला माहीत आहे. इथे तुमचा हेतु स्प्ष्ट झालेला आहे तो एक साइड इफ़ेक्ट अथवा डबल इफ़ेक्ट असा नाही आहे. हा तुमचा प्रायमरी हेतु आहे.आता जाड माणुस मरण भाग आहे . तर मग याने गिल्ट फ़िलींग येत. आतंकवाद्यांना मारण्यासाठी नागरी वस्ती वर बॉम्बींग करतांना जर साईड इफ़ेक्ट मध्ये काही नागरीक मरत असतील तर त्याच काही वाटत नाही तो एक परीणाम असतो एक नेसेसरी एव्हिल असत तो हेतु कधीही नव्हता इथे जाड माणसाला मारण आणि तेही स्वत:हुन हे अडचणीच ठरत.

मानसशास्त्रिय स्पष्टीकरण
जेव्हा जीवन-मृत्यु चा प्रश्न निर्माण होतो तेव्हा माणसाला लीव्हर दाबुन एखाद्याला मारण जास्त अबघड वाटणार नाही पण जीवंत माणसाला स्पर्श करुन ढकलण त्याला भावनिक द्रुष्ट्या जड जाईल.याच दुसर उदाहरण मानवविरहीत ड्रोन विमाने संचालित करुन माणस मारणारया ऑपरेटर पेक्षा जास्त Guilt Feeling फ़ायटर प्लेन मध्ये बसुन (मरणारया माणसांना ऑपरेटर च्या त्तुलनेने अधिक जवळुन बघणारया) वैमानिकाला वाटेल. आणि अशा वैमानिकाहुन अधिक Guilt तलवारीने समोरच्याच्या नजरेत बघुन त्याला मारणारया सैनिकाला अधिक वाटेल.तर Closeness of Act makes a difference .आणि दुसर त्याहुन महत्वाच म्हणजे इथे नैतिक निर्णय अत्यंत व्यक्तीगत होउन जातो तुम्हाला त्यात पुर्णपणे वैयक्तीकरीत्या उतरावे लागते तुम्ही परीस्थितीबद्ध न राहता स्व वर तुमचा निर्णय येतो. अशा compulsory निर्णय घ्यावा लागणारया मानवी असहायतेला संबोधुन च Jean Paul Sartre हा तत्वज्ञ म्हणतो की Man is condemned to be free (हे निर्णय घेण्याच स्वातंत्र्य हेच माणसांच मोठ दुर्देव आहे तो कोणावर विसंबु शकला असता तर चांगल झाल असत या अर्थाने ) तर या ठिकाणी जाड माणसाला ढकलण ही Guilt आणि स्व निर्णयाची व्यक्तीगत करावी लागणारी अंमलबजावणी अवघड होत जाते.
Neuroscience चे स्पष्टीकरण
Joshua Green हा न्युरोसायंटीस्ट ने हाच प्रश्न विचारलेल्या लोकांचे यावर उत्तर देतांना त्यांच्या मेंदुचे M.R.I. Scans काढले या उत्तर देतांना होणारे मेंदुच्या विवीध भागातील बदल अभ्यासुन त्याने याचे असे स्पष्टीकरण दिले की. 1st Situation मध्ये प्रश्न डायरेक्ट व्यक्तीगत नसल्याने लोकांचा मेंदु चा रॅशनल पार्ट Dorsolateral prefrontal Cortex सक्रीय होतो. 2nd Situation मध्ये जेव्हा कृती अधिक personal व्यक्तीगत ( जाड माणसाला हाताने ढकलणे) तेव्हा हा प्रश्न माणसांची superior temporal sulcus ,posterior cingulate आणि medial frontal gyrus या भागांना सक्रिय करतो. हे भाग इतरांवीषयीच्या भावना समजुन घेण्याचे, सहानुभुती व्यक्त करण्याचे काम करतात.म्हणुन या 2nd Situation मध्ये लोकांना जाड माणसाला ढकलणे अनैतिक वाटत असते.याच कारण ग्रीन सांगतो की आपले जे Primates पुर्वज जे होते त्यांची उत्क्रांती ने विकसीत झालेली एक Basic प्रायमरी नैतिकता आहे, एक Innate Moral Sense आहे जीला भलेही करचुकवेगिरी चांगली की वाईट हे ठरविता येत नसेल मात्र पण तुमच्याच सारख्या एकाला Track वर ढकलण हे चुक आहे इतक त्याला नक्कीच कळत असत.आणि म्हणुन जेव्हा माणुस अशा नैतिक प्रसंगांना सामोरा जातो तेव्हा त्याचा हा Innate Moral Sense त्याच्या मेंदुच्या सहानुभुती संबंधीत भागाला सक्रीय करतो. ही उत्क्रांतीने दिलेली देणगी आहे. याचा एक अर्थ कुठल्याही धर्मापुर्वी धर्माने केलेल्या नैतिक संस्कारापुर्वीही ( टेन कमांडमेंट्स सारखे नैतिक नियम येण्याअगोदर पासुन) माणसामध्ये एक मुलभुत नैतीक अंगभुत जाणिव निर्माण झाली आहे असा ही निघतो जो की कुठल्याही धर्मधुरीणांना अर्थातच अजिबात पचण्यासारखा नाही.कारण धर्म हाच एकमेव नैतिकतेचा स्त्रोत मानला जातो.
3 rd Situation
सर्व काही अगदी पहील्या सिच्युएशन सारखेच आहे एका ट्रॅक वर ५ माणस , तुमच्या हातात Switch फ़क्त दुसरया ट्रॅक वर एक प्राणी आहे जो एका नामशेष होत असलेल्या Species पैकी एक आहे व हा अगदी शेवटचा समजा आणी तुम्ही प्राणीशास्त्रज्ञ आहात मग मग आता तुम्ही काय करणार ? काय निर्णय घ्याल आणि तो नैतिक असेल का ?
बहुतांश उपयुक्तततावादा च greater good च समर्थन करणारे पर्यावरणाच्या एकुण greater good च्या साठी जरी ती species तो प्राणी जगण महत्वाच असेल उपयुक्त असेल तरीही ते बहुतांशी ते प्राणी मारुन माणसच वाचवायचा निर्णय देतात.
पहीली भुमिका
अरे वा हे तर फ़ार च सोप झाल की अर्थातच एक प्राणी मारणार आणि पाच माणसं वाचविणार .कारण की जगात जी सर्वश्रेष्ठ जात आहे ती माणसांची च जात ना . आणि Humanism सर्वात महत्वाचा. हा तर फ़ार च सोपा नैतिक निर्णय झाला. आता समजा ? अरे माणसाची जात जगण महत्वाच तेच एक माणुस म्हणुन आमच नैतिक कर्तव्य आहे तर त्या प्राण्याला मरु देउन पाच चांगली धडधाकट माणस वाचविणार.
दुसरी भुमिका
याचा प्रतिवाद करणारा जी.ए.कुलकर्णिंचा एक परीच्छेद देण्याचा मोह आवरत नाही वरील निर्णयाची दुसरी बाजु अथवा दुसरा पर्याय म्हणुन हा देत आहे. “ मानवाच्याच मापाने. संदर्भाने सारे जग पाहणारे Humanism मला फ़ार सवंग वाटते ” Man is the measure of all things “ हे वाक्य अगदी करडे व गावठी आहे. पाउस चांगला कारण तो आमच्या शेतीला मदत करतो, आणि नदी भव्य, कारण ती आपल्याला पाणी देते, हे विवेचन अगदी भोळसर आहे. मानवेतर सृष्टीतुन प्रत्येक वस्तुला आपल्या कीरकोळ गरजांना जुंपुन तिला आकसुन ठेवायचे यात तर्कशास्त्र नाही की सौंदर्यपुजन नाही” किंवा एका Animal Activist च्या वाक्यात ती म्हणते it is not at all clear to me that human life has some intrinsically higher worth . When I see as the earth’s environment changes , the demise of one species alters the next , so even the algae in the ocean we must respect , for it keeps us quite literally afloat
4th Situation
सर्व काही अगदी पहील्या सिच्युएशन सारखेच आहे एका ट्रॅक वर ५ माणस , तुमच्या हातात switch फ़क्त दुसरया ट्रॅक वर तो जो १ माणुस आहे तो तुमचा मुलगा आहे.आता तुम्ही काय निर्णय घेणार ? आणि तो नैतिक च असेल काय? पहील्या मध्ये जे जे एका ला वाचविण्याचा विरोध करतात त्याला मरु देउन बाकी पाच वाचविण्यातील उपयुक्तता वाद आणि परीणाम वादा च समर्थन करतात ते बहुतांशी सर्व लोक आता आपला मुलगा वाचवुन बाकी पाच मारायला तात्काळ तयार होतात.
आता पहील्या व चौथ्या सिच्युएशन वर जनरली घेतलेल्या निर्णयांवरुन अजुन एक मुददा स्पष्ट होत जातो. तो असा की नैतिक निर्णय हे फ़कत रॅशनल माईंड ने बुध्दी ने नाही घेतले जात तर बहुतांश नैतिक निर्णयांमध्ये Passions चा सब्जेक्टीव्हीटी चा भाग ही असतो.
आत्मबलीदान self -sacrifice नेहमीच नैतिक ठरतो का ?
कुणालाही मारण्याएवजी आणि उदासिन राहुन इतरांच्या मरणाला कारणीभुत होण्याऐवजी स्वत: आत्मबलीदान करणे तर केव्हा ही चांगले .परंतु काही सिच्युएशन्स मध्ये तुमचा त्यागच मुळात अर्थशुन्य होउन जात असतो. हा ट्रॉली हुन ही अधिक भिषण Dilemma बघा कल्पना करा एक ज्यु स्त्रि आहे एका घरात तिच्या लहान बाळासोबत लपलेली आहे. आता नाझी सैनिक तिला शोधत घरात फ़िरत आहेत तिच बाळ अचानक जोरजोरात रडु लागलयं आता त्याच तोंड दाबुन मारल्याशिवाय तिला दुसरा पर्याय नाही कारण त्याच्या आवाजाने सैनिकांना दोघांचा ठावठिकाणा सापडेल आणि ते दोघांना आई आणि बाळाला मारुन टाकतील. आईने त्याला मारलत तर कीमान आईचा जीव तरी वाचेलं, यावर आई म्हणेल पण मी माझ्या हाताने माझ्या बाळाला नाही मारणार त्याएवजी मीच मरुन जाईल पण मग काय फ़रक पडतो पाच मिनीटांत त्याच्या रडण्याने ती आणि तिच बाळ असेही दोन्ही तर मरणार च आहेत मग त्या त्यागाला काय अर्थ उरतो ? ती काय करणार या सिच्युएशन मध्ये आत्मबलीदान ? (ती स्वत: जगली तर एका नविन जीवनाची शक्यता तरी शिल्लक राहील की , इतर बाळांना वाचवु शकेल, बरेच काही करु शकेल) की स्वत:ला वाचविण्यासाठी बाळाला मारणार ? ती कुठला निर्णय घेणार ? आणि तो नैतिक असेल काय ?
शेवटी या TEST ने काय साध्य होते ?
१-अमुर्त तत्वांना प्रत्यक्ष जीवनाच्या मैदानात अंमलबजावणीसाठी आणल्यावर त्याचा काय आणि कसा परीणाम होतो हे दाखविते. आणि नैतिकतेचा प्रश्न कीती Complex आणि गंभीर आहे हे ही दाखवुन देते.
२-यातुन झालेले आत्मपरीक्षण एकीकडे तुमच्या नैतिक निर्णयामागील दांभिकता उघड करीत जाते त्याकडे तुमचे प्रत्ययकारकरीत्या लक्ष वेधुन घेते. मात्र त्याचबरोबर ही चिंतनाची प्रक्रिया तुम्हाला अधिका अधिक प्रगल्भ करीत जाते. आणि पुढच्या वेळेस जेव्हा एखादा नैतिक निर्णय घेण्याचा प्रसंग येतो तेव्हा तुमची प्रगल्भ नैतिक जाणीव अधिक योग्य नैतिक निर्णय घेण्यास सक्षम होते .
३-दुसरया लोकांनी त्यांच्या जीवनात घेतलेल्या निर्णयांवर Moral Judgment पास करण्यापुर्वी तुम्हाला थोडा ब्रेक लावुन त्यावीषयी अधिक संवेदनशीलतेने विचार करावयास भाग पाडते.


१० ) नरहर कुरुंदकरांचा हमीद दलवाई यांवरील लेख :
हमीद दलवाई

हमीद दलवाई यांच्या निधनाला ३ मे १९७८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ३ मेला त्यांची प्रथम पुण्यतिथी येत आहे. या योगाचे निमित्त करून मुस्लिम राजकारणाचे विवेचन करणारी दलवाईंची एक जुनी पुस्तिका व अगदी शेवटच्या दिवसांतील त्यांची एक मुलाखत पुन्हा एकत्र करून पुनर्मुद्रित करण्यात येत आहे. दलवाई हे नानाविध कारणांनी आपली कर्मठ धर्मश्रद्धा टिकवून ठेवणाऱ्या मुस्लिम समाजात उदयाला आलेले लोकविलक्षण धडाडीचे आणि आपल्या लोकप्रियतेचा कोणत्याही क्षणी होम करण्यास तयार असलेले कार्यकर्ते होते. आधुनिक भारतीय राजकारणाच्या इतिहासात दलवाईंच्या इतका मूलगामी चिंतन करणारा निर्भय विचारवंत दुसरा नाही. महात्मा फुले यांच्या काळात त्यांचे कार्य जितके अवघड होते, त्यापेक्षाही दलवाईंचे काम काही बाबतीत अधिक कठीण होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली तर दलवाईंना त्यांच्या समाजातून फार मोठा प्रतिसाद कधीच का मिळू शकला नाही, यावर थोडासा प्रकाश पडेल. महात्मा फुले आणि हमीद दलवाई यांना समोरासमोर ठेवून विचार करताना माझ्यासमोर त्यांची तुलना करणे हा हेतू नाही. माझा हेतू अगदी मर्यादित आहे. आणि तो म्हणजे, मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजात दलवाईंना पाठिंबा मिळण्यास अडचण कोणती आली, या बाबींकडे लक्ष वेधणे. तेवढ्या सीमित प्रश्नापुरताच हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे.
महात्मा फुले यांचा काळ कितीतरी जुना. जवळजवळ एका शतकाचे अंतर दोघांच्यामध्ये आहे. फुले यांच्या काळी हिंदू समाज आजच्या मानाने कितीतरी रूढीप्रिय, अंधश्रद्ध आणि परंपरावादी होता. पण हिंदू समाजाची रचना व जडण-घडण पुष्कळशी विस्कळित आणि विविधतेला वाव देणारी अशी आहे. वेगवेगळ्या जातीजमाती, चालीरीती, परस्परविरोधी (भिन्नभिन्न) विचार हिंदू समाजात नेहमीच वावरत आले. सुसंघटित व एक ग्रंथाचे प्रामाण्य मानणारा असा हिंदू समाज नव्हता; आजही नाही. विचार मांडण्याच्या बाबतीत खूप मोठे स्वातंत्र्य हिंदू समाजात राहत आले आणि सर्व विचारांना माना डोलवीत त्याच वेळी चिवटपणे आपला परंपरावाद जतन करण्याची हिंदू मनाची शक्तीही फार अफाट आहे. आजही महात्मा फुले यांचा पुरस्कार व जयजयकार करीत परंपरावाद जतन करण्याची मनोवृत्ती हिंदूंच्यामध्ये दिसते. महात्मा फुल्यांचे पुतळे उभे करणे, आपले महान नेते म्हणून त्यांना लक्ष अभिवादन करणे आणि आपले बुरसटलेले मन तसेच जतन करून ठेवणे, हे हिंदूंना अजिबात कठीण वाटत नाही. मुस्लिम समाज यापेक्षा निराळा आहे.
मुस्लिम समाजातही शिया-सुन्नींच्यासारखे मतभेद आहेत. त्याहून थोडे दूर असणारे अहमदियाही आहेत. पण हा फरक फारसा नाही. एक प्रेषित, एक धर्मग्रंथ यांमुळे आणि जवळपास एक असणाऱ्या कायद्यामुळे मुस्लिम धर्माचे स्वरूप हिंदूंच्या मानाने कितीतरी सुसंघटित आहे, आणि विचारस्वातंत्र्याची त्यांची परंपराही मर्यादित आहे. प्रेषित, कुराण आणि परंपरा यांचा मला परिपूर्ण पाठिंबा आहे असे मानणाऱ्या दोन माणसांत जितका मतभेद असू शकतो, तितकेच विचारस्वातंत्र्य मुस्लिम समाजात असे. एक विचार जाहीर रीतीने मान्य करायचा, तो विचार मांडणारा आपला नेता समजायचा व तरीही परंपरावादी मन जतन करायचे, असा दुटप्पीपणा मुस्लिम समाज फारसा पेलू शकत नाही. आचार-विचारस्वातंत्र्य यांची परंपरा नसणाऱ्या या समाजात दलवाई उदयाला आले होते. त्यामुळे फुले यांच्यापेक्षा त्यांच्या समोरच्या अडचणींचे स्वरूप उग्र होते, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
दुसरी बाब अशी की, आपला पराभव झाला, आपले राज्य गेले त्या अर्थी आपल्या परंपरेतच काही मूलभूत चूक आहे, असे मानण्यास हिंदू समाज क्रमाने शिकत होते. आपल्या धर्माची, परंपरेची कठोर चिकित्सा करणारे लोक फुले यांच्या शेजारी होते. लोकहितवादी या मंडळींत सर्वांत महत्त्वाचे. आपला पराभव झाला, कारण आपल्या धर्मात, आपल्या परंपरेत, आपल्या समाजरचनेत काहीतरी उणिवा आहेत, असे मानण्याकडे हिंदू विचारवंतांचा कल दिसतो. म्हणून परंपरेच्या चुका दाखवणारा विचारवंत हिंदू समाजात आचारांचा मार्गदर्शक होत नसला तरी सभ्य ठरतो. मुस्लिम समाजालासुद्धा इंग्रजी राजवट आल्यामुळे आपला पराभव झाला, असे वाटतच होते. पण या पराभवाचे कारण आपल्या धर्मात अगर परंपरेत काही चूक आहे असे त्यांना वाटत नसे. आपला धर्म व परंपरा निर्दोष आहेत; पण या धर्मावर मुसलमानांची श्रद्धा पुरेशी बळकट नाही म्हणून आपला पराभव होतो असे या समाजातील नेत्यांना वाटे. इंग्रजी विद्या व ज्ञान यांविषयी आस्था असणारे सर सय्यद अहमदखानसुद्धा आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार करतात; स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार करतात, पण यापुढे जाऊन इस्लामची चिकित्सा ते करत नाहीत. ग्रंथप्रामाण्य झुगारून देऊन चिकित्सा करणारे पहिले मुस्लिम हमीद दलवाई हेच होत. दलवाईंची चिकित्सा ही नेहमीच मुसलमानांच्या हिताला बाधक आहे, असे त्यांच्या समाजाला वाटत आले. मुस्लिम समाजातील विचारवंतांचे मनच धर्माच्या चिकित्सेला फारसे तयार नसते. आजही ते तयार नाही. मुस्लिम समाजात राजकीय पराभव विचारवंतांना अधिक कर्मठ आणि परंपरावादी होण्याची प्रेरणा देतो, ही दलवाईंच्यासमोर दुसरी अडचण होती.
आमच्या देशातील पुरोगामी राजकारणाची एक शोकांतिका आहे. महात्मा फुले यांच्या काळी फुले यांच्या प्रयत्नाला इंग्रजांनी फार मोठा पाठिंबा दिला नसला तरी त्यांचे शाब्दिक कौतुक केले. त्यांच्या उपक्रमास गौरवपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्यावर इतरांना सरळसरळ आक्रमण करता येऊ नये याची शासनाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काळजी घेतली. दलवाईंच्या बाबतीत असे घडले नाही. पारतंत्र्याच्या काळात, इंग्रजांनी हिंदू-मुस्लिम मतभेदाचा फायदा घेऊ नये म्हणून मुसलमानांच्याविषयी फारसे बोलायचे नाही, होता होईतो त्यांच्या कर्मठपणाला पाठिंबाच द्यायचा, अशी आमच्या नेत्यांची पद्धत राहिली. पुरोगामी राजकीय नेता हिंदू समाजातील असेल तर तो हिंदू समाजातील परंपरावादावर कडाडून हल्ला करी; पण मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद मात्र सांभाळून घेई. मुस्लिम समाजातील कोणताही पुरोगामी नेता आपल्या धर्मपरंपरेवर काही टीका करण्यास धजावतच नसे. इस्लाममध्ये लोकशाही आहेच, इस्लाममध्ये समाजवाद आहेच, असे काहीतरी बोलून आपण इस्लामच सांगतो आहोत, असा आव हे नेते आणीत. स्वातंत्र्योत्तर काळात मते फुटू नयेत म्हणून मुसलमान समाजातील सर्व परंपरावाद जतन करण्याची चढाओढ आपल्या राजकीय पक्षांत सुरू झाली. काँग्रेस तर सोडाच, पण ज्या राजकीय पक्षाशी दलवाईंचा निकट संबंध होतो, तो समाजवादी पक्षसुद्धा दलवाईंना निवडून येण्यासाठी तर सोडा, पण पडण्यासाठीसुद्धा तिकीट देण्याची हिंमत दाखवू शकला नाही!
भारतीय कम्युनिस्ट पक्ष हमीद दलवाईंना हिंदू जातीयवादी आणि अमेरिकन साम्राज्यवादी यांचा हस्तक समजत असे. त्यामुळे 'धर्म ही अफूची गोळी' मानणाऱ्या त्या पुरोगामी क्रांतिकारक पक्षाला दलवाईंच्या निषेध करण्यापलीकडे कधी विचार करावासा वाटला नाही! काँग्रेस पक्षाचा पाडाव झाल्यामुळे गेल्या वर्षापासून ही परिस्थिती बदलली आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद जिव्हाळ्याने जतन करण्याचे काम जनता पक्ष अतिशय चोखपणे व काँग्रेसइतक्याच उत्साहाने पार पाडीत आहे! शासन प्रतिकूल, राजकीय पक्ष प्रतिकूल, यांमुळे तर दलवाईंचे कार्य अधिकच बिकट झाले.
महात्मा फुले यांच्यापेक्षा दलवाईंचे कार्य अधिक बिकट होते, तरीही त्यांना मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्त्यांचा एक गट आपल्या अल्पशा आयुष्यात स्वतःभोवती गोळा करता आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून तीन-चारशे स्त्री-पुरुष तरुण कार्यकर्ते पाहता पाहता दलवाईंभोवती गोळा झाले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत इतके कार्यकर्ते दलवाईंना मिळाले, हेच आश्चर्य आहे. हा प्रपंच मुद्दाम नोंदवण्याचे कारण हे की, हमीद दलवाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मित्रांनीसुद्धा त्यांच्याविषयी लिहिताना दोन गोष्टींचा वारंवार उल्लेख केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे, दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच मिळाला नाही! आणि दुसरे म्हणजे, आयुष्याच्या अखेरीला दलवाई मुस्लिम समाजापासून तुटून पडलेले होते. दलवाईंच्या कार्यातील अडचणी लक्षात घेता खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहे. पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना आजारी पडून मरण्याची संधी मिळाली; त्यांना हुतात्मा व्हावे लागले नाही. त्याहून अधिक आश्चर्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या या बंडखोराला पाहता पाहता तीनशे-चारशे अनुयायी मिळाले!
दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच नव्हता; तो असणारही नव्हता, हे अगदी उघड आहे. मुस्लिम समाजातील सर्व राजकीय नेते प्रामुख्याने दलवाईंना विरोध करत होते. दलवाईंनी अतिरेकी भूमिका घेतलेली होती, म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या मागे गेला नाही, हे म्हणणे खरे नाही. दलवाईंनासुद्धा महान विचारवंत म्हणून किर्ती मिळवण्याची इच्छा नव्हती. त्यांना समाजपरिवर्तनाचे आंदोलन अधिक प्रिय होते. महंमद पैगंबर आणि कुराण यांबाबत चर्चा करून दररोज समाजाचे मन दुखवावे आणि पुरुषार्थ मिरवावा असे त्यांनाही वाटत नव्हते. दलवाई स्वतः नास्तिक आणि अश्रद्ध होते; पण मुस्लिम समाजाने नास्तिक व अश्रद्ध असलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह नव्हता. समाजाचे आमूलाग्र परिवर्तन होणे आवश्यक आहे, इतके मान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आरंभ म्हणून कोणताही एक छोटासा कार्यक्रम घ्यावा आणि सुधारणेसाठी समाज तयार करावा हे दलवाईंना मान्य होते.
इस्लामवरील श्रद्धा, पैगंबरांवरील श्रद्धा, इस्लामच्या धार्मिक व राजकीय इतिहासावरील श्रद्धा या सर्व चर्चा बाजूला सारून तलाकपीडित महिलांचा प्रश्न हाती घेऊन सामाजिक आंदोलन करायला ते तयार होते. पण दलवाई अतिरेकी जरी नसले तरी सुधारणेचा लहान अगर मोठा कोणताच कार्यक्रम स्वीकारून मुस्लिम मन ढवळण्यास त्या समाजातील कार्यकर्ते तयार नव्हते. कोणत्याही प्रकारचा बदल मान्य न करता आपला परंपरावाद जतन करीतच आपण राहू; तेच आपल्या सोयीचे आहे, असे नेते समजत आणि या सेक्युलॅरिझमच्या सर्वद्रोही नेत्यांना हिंदू पुरोगामी नेते नेटाने पाठिंबा देत. मग दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा मिळू नये ही परिस्थिती बदलणार कशी?
माझा आणि दलवाईंचा अगदी आरंभापासून म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन करण्याच्या काही वर्षे आधीपासून संबंध होता. दलवाईंनी मुस्लिम तरुणांना व कार्यकर्त्यांना पुनःपुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न केला की, आपण एखाद्या छोट्या प्रश्नापासून आरंभ करू. एकदा तर ते असे म्हणाले की, बाकी सगळे सोडा, आपल्या सर्व सभा जन-गण-मन या राष्ट्रगीताने संपल्या पाहिजेत, इतक्या मुद्द्यावर तरी तुम्ही आंदोलन करायला तयार आहात काय? पण त्यालाही कुणी फारसा प्रतिसाद दिला नाही. आपल्या विजयाचा एके काळचा इतिहास सदैव स्मरणात जागता ठेवणाऱ्या परंपरावाद्यांना परिवर्तनाच्या कार्यक्रमाचा प्रत्यक्षात उतरू शकेल असा कोणताही प्रामाणिक आरंभच नको होता.
तरीही दलवाईंना आरंभाला दहा-वीस कार्यकर्ते मिळालेच. दरसाल हे कार्यकर्ते वाढतच जात होते. तलाकपीडित महिलांच्या परिषदा हळूहळू सर्वत्र भरू लागल्या. आरंभी या परिषदांना पंधरा-वीस मुस्लिम महिला जमणे कठीण होते; पण गेल्या डिसेंबरात अमरावती येथे भरलेल्या तलाकपीडित महिलांच्या परिषदेला संचालकांच्या अपेक्षेच्या बाहेर इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की पुरुष प्रेक्षकांना हॉल रिकामा करून द्यावा लागला! हे चित्र क्रमाने प्रतिसाद वाढत आहे, याचे आहे.. दलवाईंचा विचार क्रमाने समाजात रुजतो, पाझरतो आहे, याचे चित्र आहे. दलवाई समाजातून तुटून बाजूला गेले याचे हे चित्र नाही.
आपण स्वतःच्या मनाशी विचार करतो त्या वेळी सतत एक प्रश्न विचारला पाहिजे की, गुलाम राष्ट्रातील स्वातंत्र्यलढे पुनःपुन्हा पराभूत होतात म्हणून गुलामगिरी अमर राहील असे आपण मानणार आहोत काय? दहा उठाव फसतील, पण शेवटी संपणार आहे ती गुलामगिरी. स्वातंत्र्याची आकांक्षा संपत नसते. आज बोहरी समाजात धर्मगुरूंच्या विरुद्ध आंदोलन चालू आहे. अजून धर्मगुरूंचीच अधिसत्ता समाजावर चालते. पण उद्याचा विजय दाउदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचा असणार नाही; तो स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा राहील. अतिशय अजिंक्य आणि बलवान असणाऱ्या तटबंद्या कितीही बलवान असोत, त्या शेवटी कोसळत चाललेल्या मावळत्या शक्ती आहेत. या मावळत्या शक्तींचा विजय फार काळ टिकणारा नसतो. मुस्लिम समाजही बदलतच जाणार आहे. तोंडाने 'नाही नाही' म्हणत गोषा सोडून बाहेर येणाऱ्या स्त्रियांची संख्या सारखी वाढतच आहे, तिथून वाढतच जाणार आहे. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत.
थोडा उशीर लागेल हे मान्य केले तरी अंधश्रद्धा, जळमटलेली मने कायमची गुलाम राहणार नाही. सगळेच हमीद दलवाईंप्रमाणे बंडखोर नसतील; पण कालमानानुसार 'मुस्लिम पर्सनल लॉ'मध्ये, मुस्लिम समाजात परिवर्तनाची भूक वाढवून दमादमाने बदल घडवून आणावा लागेल, असे म्हणणारे लोक त्याही समाजात तयार होत आहेत. परंपरावाद्यांचे बळ हे शेवटी मावळत्या शक्तींचे बळ असते. दलवाई हा नवा उगवता विचार आहे. दलवाईंच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी दलवाईंचा विचार वेगाने पसरत कसा जाईल, याची काळजी घ्यावी. दलवाईंचे चाहते व अनुयायी तो विचार करतीलही, करीतही आहेत. पण उरलेल्यांनी हे लक्षात ठेवावे की पराजय दलवाईंचा होणार नसून परंपरावाद्यांचा होणार आहे. वर्षांची संख्या थोडी वाढेल; पण भवितव्याच्या या दिशेत बदल होण्याची शक्यता अजिबात नाही. ज्या शक्ती कदाचित दहा-वीस वर्षांत विजयी होणार नाहीत, ज्यांना विजयी व्हायला कदाचित शंभर वर्षे लागतील, त्या शक्तीचा पराभव झालेला आहे, असे समजत बसण्यात आपण आत्मवंचनेशिवाय दुसरे काही मिळवत नसतो.
- नरहर कुरुंदकर


१२) गल्लत , गफलत , गहजब ! 
अटेनबरोने वगळलेले आंबेडकर
http://www.loksatta.com/sampadkiya-news/richard-attenborough-neglack-ambedkar-in-gandhi-movies-97993/
१३) या वांझ भूमीत काहीच उगवणार नाही हाही निर्णय खरा नव्हे...

मित्रा
अंत:करणात तुझ्या घोंगावणारे वादळ
आणि दांभिकांच्या अविरत कोसळणा-या
झुंडीबद्दलचा उद्वेग
पाहिला कि मलाही आठवतो 
तो संतप्त उद्वेगी पावसाळा
जो कोसळु पहात असलेल्या सरी उरी आवरत
घेत आकुंचुन आपले विराट रूप नि
कसा सहज जातो निघून
या क्षितिजाकडुन दुस-या क्षितिजाकडे
बेपर्वा असा कि जसे
कशाकशाशीच घेणे नाही!
(एवढा संतप्त?)
पण मित्रा-
तुझ्या वर्षण्यानेच हे अद्न्य जन
आणि वर्षेची मुळात गरजच काय असे विचारणारे
वांझ भूमीपुत्र
अखेर तुझ्या कोसळण्यातच संतोष पावणार असतील...
तर जा एकदाचा कोसळुन...
त्यांना अखेर मिळू देत एक समाधान...
नाहीतरी
कोठे ना कोठे कोसळायचे तर आहेच ना तुला?
रिते करायचेच आहे ना तुझे आस्तित्व
त्या जलभरल्या मेघांप्रमाणे?
(पावूस एका भुमीवर उद्वेगला तरी तो थांबणार आहे?
दुर्दैव हे कि मित्रा ही भुमी आपली आहे...वांझ असली...अनुत्पादक असली तरी...)
हे बघ...
जशी जगाला गरज आहे
नियमित येणा-या सर्जक पावसाळ्याची
नि पावसाला गरजच कि
वाट मिळेल तेथे
आपले पान्हे सोडायची
पण तो पान्हा
सुफल भुमीवर पडेल
कि खडकाळ रानोमाळावर
जेथे
कदाचित होणार नाही कसले नवनिर्माण...
पण त्याची पर्वा पावसाने जर कधी केली नाही
तर तुच तुझा वर्षाव
का बरे रोखतो आहेस?
(या वांझ भूमीत काहीच उगवणार नाही हाही निर्णय खरा नव्हे...
किमान उगवेल एक त्रुणांकुर
सावळया आभाळाला इवल्या पात्यांत
दिठीत घेणारा?)

१५)  रामटेके निळे तालिबानी 
http://mdramteke.blogspot.in/2012/10/blog-post.html 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *