१६ नोव्हें, २०१६

अमेरिका डायरी (भाग १ ते भाग ३ )

क्यान्सर आणि रोगप्रतिकार शक्ती

माझा उत्तर अमेरिकेतील आधी ठरलेला मुक्काम काही महिने होता - तो आता काही वर्षे झालेला आहे . त्यामुळे मंडळाच्या सदस्यांना कळवण्यात येते कि , पुढील काही वर्षे कामानिमित्त मी अमेरिका आणि युरोप येथे असेन. भारतात पुढच्या वर्षी येईन . आधी ठरवलेले भारतातले काही कार्यक्रम नाईलाजाने रद्द करावे लागत आहेत.
इथे एका नवीन मोलेक्युल वर काम करणार आहे . हे नवे औषध शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला ट्रेन करते . आणि नैसर्गिक रीतीने क्यान्सर बरा होतो. कित्येक प्रकारच्या क्यान्सर मध्ये किमोथेरपी ची गरज सम्पते .
क्यान्सर होणे हे नैसर्गिक आहे . ती उत्क्रान्तीची देणगी आहे . शरीराची वाढ होताना म्हणा किंवा दररोज चे वेअर एन्ड टिअर म्हणून म्हणा - आपल्या शरीरातील पेशी सतत विभाजित होत असतात . पेशी विभाजनात डीएनए ची कॉपी होते . अशा असंख्य कॉप्या बनत असताना काही केमिकल चुका होतात . त्यामुळे काही पेशी गंडतात , आणि माजतात . स्वतः:ला वेगळा सजीव समजून स्वतः:च्या असंख्य कॉप्या बनवू लागतात . त्याची पुढे क्यान्सर ची गाठ बनते . एसबेसटॉस किंवा तंबाकू सारख्या पदार्थामुळे पेशी गंडायची शक्यता वाढते . पण हे पदार्थ जरी नसले तरीही विभाजन प्रक्रियेत पेशी गंडायची थोडी शक्यता असतेच . त्यामुळे तंबाखू खाणार्यात क्यान्सर ची शक्यता जास्त असते पण जे खात नाहीत त्यांनाही तोंडाचा क्यान्सर होण्याची थोडी शक्यता असतेच.
आपल्या शरीरातील अनेक पेशी अनेक कारणामुळे गंडत असतात . त्या अर्थाने तुम्हाला मला सर्वानाच दररोज क्यान्सर होत असतो . तो वाढत नाही कारण आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती त्याला मारून टाकते. क्यान्सर वाढून त्याची गाठ होते तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती गंडलेली तरी असते किंवा क्यान्सरच्या पेशी हुशार झालेल्या असतात . त्या आपण नॉर्मल असल्याचे ढोंग करतात . नॉर्मल पेशीसारखे कपडे घालतात - (सेल वोल प्रोटीन )
आपली रोगप्रतिकारशक्ती नॉर्मल पेशिंना मारत नाही . क्यान्सर च्या पेशी नॉर्मल असल्याचे ढोंग करतात म्हणून त्याची गाठ बनते . वाढते पसरते मग माणूस मरतो .
मी ज्या नव्या औषधावर काम करतो आहे - ते औषध ढोंगी क्यान्सर पेशिंचे नॉर्मल कपडे काढून टाकते . त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीला या लबाड पेशी ओळखू येतात . आणि क्यान्सर वर शरीर हल्ला बोल करते .इम्युनिटी चे अंतरंग

नैसर्गिक रोग प्रतिकार शक्तीला वापरून क्यान्सर वर उत्तर शोधता येते हे आपण मागील भागात पाहिले . आता रोग प्रतिकार शक्ती अधिक खोलात समजून घेऊ. सर्दी पडशासारखे अनेक रोग औषध न घेताही बरे होऊ शकतात . मानवी शरीराची रोग प्रतिकार शक्ती हे काम करते.
माणसाला दोन प्रकारच्या इम्युनिटी - प्रतिकार शक्ती असतात . एक अनुभवाने शरीर शिकते ती (Acquired) आणि दुसरी (Innate) जन्म सिद्ध रोगप्रतिकारक शक्ती . क्यान्सर बाबत विचार करताना (Acquired) अनुभवजन्य रोगप्रतिकार शक्ती अधिक महत्वाची आहे . ही अतिशय चलाख सिस्टीम आहे . जुन्या अनुभवातून ती अधिक शिकत शहाणी होत जात असते.
उदाहरणार्थ गालगुंड, कांजिण्या यासारखे आजार लहानपणी एकदाच होतात . पुन्हा होत नाहीत कारण त्याच्याशी लढायला इम्युनिटी प्रशिक्षित झालेली असते .
पोलियो ची लस म्हणजे काय असते ? पोलियोचे मेलेले किंवा बिनविषारी केलेले व्हायरस म्हणजे पोलियोची लस. हे पोलियोचे मरतुकडे व्हायरस आपण आपल्या पोरांना लसीकरण म्हणून खाऊ घालत असतो. बाळाची अल्पशिक्षित इम्युनिटी अशा मरतुकड्या व्हायरस चा फन्ना क्षणात उडवते . पण त्याहून महत्वाचे म्हणजे या व्हारसला कसे हाणायचे ? ते जन्मभर लक्षात ठेवत असते . लसीकरण हे एक प्रकारचे इम्युनिटी ला दिलेले प्रशिक्षण आहे .
रोग प्रतिकार शक्ती चा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तिचा आप - पर भाव . स्वत:चे कोण ? आणि परके कोण ? हे इम्युनिटी ओळखू शकते . लक्षात ठेऊ शकते. रेल्वेत जसा तिकीट तपासणारा टीसी असतो तसा टीसी प्रतिकारशक्ती कडे पण असतो . शरीरातील कोणती गोष्ट स्वकीय आहे ? कोणती परकीय आहे ? याची सतत तपासणी चालू असते . जे परकीय वाटेल त्याच्यावर हल्ला केला जातो . हा हल्ला केमिकल किंवा प्रत्यक्ष असतो . प्रत्यक्ष हल्ल्यात पोलीस पेशी जाऊन परकीय ब्याक्टेरिया खाऊन टाकतात . आणि पचवतात . मग ढेकर देतात .


टिसी आणि पोलीस हे रोगप्रतिकार शक्तीचे महत्वाचे भाग आहेत . काही पोलीस स्वतः जाऊन परकीयांना अक्षरश: खाऊन टाकतात . काही पोलीस गोळी मारतात . त्याला अँटीबॉडी असे म्हणतात . हा एक केमिकल रेणू आहे .कोणत्या प्रकारचा शत्रू कोणत्या गोळीने मरतो ? हे इम्युनिटी लक्षात ठेवत असते . हे लक्षात ठेवण्याचे काम एका कारकून पेशी कडे दिलेले असते . रोगावरचा उपाय लक्षात ठेवणारे कारकून , आपला कोण ? आणि घुसखोर कोण ? ते ठरवणारे टीसी , आणि प्रत्यक्ष हल्ला बोल करणारे पोलीस असे मानवी रोग प्रतिकार शक्तीचे महत्वाचे तीन भाग आहेत .


यातला टीसी हा गृहस्थ हल्लाबोल करण्याचे आदेश काढत असतो . क्यान्सर सेल नॉर्मल नसतात . त्यांच्या जवळ नॉर्मल पेशींचे तिकीट नसते तेव्हा टीसी हल्लाबोल करण्याच्या सूचना पोलीस पेशींना देतात . अनेकदा क्यान्सर च्या पेशी बनावट नॉर्मल तिकीट तयार करतात . आणि टीसी पेशींना उल्लू बनवून स्वतः:ची संख्या वाढवू लागतात .
यातली काही प्रकारची बनावट तिकिटे आपल्याला माहीत झाली आहेत. ही बनावट तिकीट फाडून टाकणारी औषधे मिळालेली आहेत . इथे एक लक्षात घेतले पाहिजे कि नॉर्मल सेल नॉर्मल असते त्याकडे रेल्वेचा पास असतो . भरपूर तिकिटे असणाऱ्या पासधारी नॉर्मल पेशींवर या औषधाचा परिणाम होत नाही.
विकृत क्यान्सर सेल मात्र एका तिकिटावर आपले काम भागवत असतात . त्यांच्या सेल वोल वरचे एक प्रोटीन म्हणजे हे बनावट तिकीट . ही बनावट तिकीट फाडून टाकणारी औषधे मिळालेली आहेत .
अशा बनावट तिकीटधारी सेल ओळखून काढायला प्याथॉलॉजी च्या काही टेस्ट विकसित करून त्या स्टयांडरडाइज कराव्या लागतात . वेगवेगळ्या औषधासाठी , क्यान्सर प्रकारासाठी आणि तिकिटासाठी वेगवेगळ्या टेस्ट असतात.
माझे काम तिकीट आणि औषध याची सांगड बसवण्याचे आहे . ते नेमके कसे केले जाते ? हे पुढच्या काही भागात पाहूया .
त्याचबरोबर अर्थकारण आणि राजकारण हे आरोग्य या विषयावर कसे प्रभाव पाडत असते ? तेही समजून घ्यायचे आहे - पुढचा भाग उत्तर अमेरिकेतील राजकारण आणि त्याचा जागतिक आरोग्य सुविधांवर पडणारा प्रभाव यावर असेल .

 सेकंड अमेंडमेंट

ही अमेरिकन राज्यघटनेतली दुसरी घटना दुरुस्ती - बंदूक वापरण्याच्या अधिकाराबद्दल आहे. सध्याच्या ट्रम्प विरुद्ध हिलरी लढतीत हा बंदुकीचा मुद्दा गाजतो आहे. अमेरिकेतले अंतर्गत राजकारण - जगभरातल्या सरंक्षण , उद्योग , अर्थ आणि आरोग्य व्यवस्थांवर परिणाम करत असते . अमेरिकेतले राजकारण समजून घेण्यासाठी " सेकंड अमेंडमेंट " हे चपखल उदाहरण आहे .
माझ्या एका नातेवाईक आणि मित्राला भेटायला पिट्सबर्ग नावाच्या शहरात गेलो होतो . त्याने हा बंदुकींचा खजिना दाखवला . या बंदुका वाण्याच्या दुकानात विकत मिळतात. विकत घ्यायला १५ - २० मिनिटे लागतात . बंदुका, गोळ्या ,मशिनगन याची ऑनलाईन खरेदी करता येते . सहज कोणतीही चौकशी न करता सैन्यदल वापरते त्या ऑटोम्याटिक मशीन गन कुणीही विकत घेऊ शकतो . मोठ्या क्यालिबरच्या शॉटगन हि एक लहान तोफ असते . अशा संहारक बंदुका अठरा वर्षे पूर्ण झालेला कोणीही अमेरिकन विकत घेऊ शकतो - घरी बाळगू शकतो. स्व सरंक्षण किंवा प्रॉपर्टी मध्ये घुसणाऱ्या विरुद्ध फायरिंग करू शकतो . (ट्रेस पासिंग )


फोटोग्राफी : अश्विन जोशी यांची 
वरील फोटोतल्या साऱ्या बंदुका एकाच व्यक्तीच्या कायदेशीर मालकीच्या आहेत . अमेरिकेतील अनेक भागात माणसापेक्षा दरडोई बंदुकीची संख्या जास्त आहे . उदाहरणार्थ एका टेक्सस राज्यातल्या सामान्य माणसांकडे जितक्या बंदुका आहेत - तितक्या बंदुका जगाच्या पाठीवरील अनेक देशांच्या अधिकृत सैन्यांकडे देखील नाहीत. ना संख्येने - ना संहारक क्षमतेने !
अमेरिकन राज्यघटनेत हि दुसरी घटना दुरुस्ती का झाली ? याचा इतिहास मोठा मजेशीर आहे. राज्यघटना हा देशातल्या नागरिकांनी एकमेकांशी केलेला करार असतो. १७८९ साली अमेरिकन राज्यघटनेने आकार घेतला . नंतर त्यावर चर्चा सुरूच होती ... त्यानंतर काही वर्षात झालेल्या घटना दुरुस्त्यांना घटने इतकेच महत्व आहे . बंदूक बाजीची घटना दुरुस्ती क्रमांक दोन वर आहे. (१७९१: सेकंड अमेंडमेंट )
युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका या नावात काही अर्थ आहे . हा स्टेट म्हणजे राज्यांचा संघ आहे. हि सर्व राज्ये काही करार मदार करून एकत्र आली आहेत .सुरुवातीला अमेरिका ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग होती . चार जुलै चा स्वातंत्र्य लढा देऊन ती ब्रिटिशापासून स्वतंत्र झाली हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे .
१६८९ सालच्या इंग्लिश कायद्या नुसार ब्रिटिश प्रजेला शस्त्र धारणेचा अधिकार आहे .. तत्कालीन ब्रिटन मध्ये अनेक पदरी संघर्ष सुरु आहे . राजा विरुद्ध पार्लमेंट , केथोलिक विरुद्ध प्रोटेस्टंट यापैकी कुणी कायमचा दादा बानू नये म्हणून - बंदूक बाळगायचा अधिकार सर्वाना देण्यात आला . हि एक तडजोड होती . त्याला विकसित होणाऱ्या लोकशाहीची , आधुनिकतेची आणि सत्त्तेच्या समान वाटपाची पार्शवभूमी आहे.
सशस्त्र लोक निःशस्त्रावर सत्ता गाजवतात . ... 
जर सर्वाकडे शस्त्रे असतील तर सत्तेचा आणि राजकारणाचा समतोल साधला जाईल असा हा प्र्याक्टीकल विचार आहे. १७९१ साली अमेरिकन राज्यघटनेत हा विचार पुन्हा आला . आता अमेरिका ब्रिटन पासून राजकीय अर्थाने स्वतंत्र आहे . पण अमेरिकेत सुद्धा सत्तेच्या समतोलाची गरज आहे .
१७९१ सालच्या बाळ अमेरिकेत - दक्षिणेतली राज्ये विरुद्ध उत्तरेतली राज्ये अशा मारामाऱ्या आहेत. प्रत्येक राज्याला स्वतः:चे काही स्वातंत्र्य अबाधित ठेऊन मगच अमेरिकन संघराज्यात सामील व्हायचे आहे . सत्तेचा समतोल साधण्यासाठी सेकंड अमेंडमेंट आहे असा एक विचार प्रवाह आहे . दक्षिणेतल्या राज्यात (काळ्या ) आफ्रिकन गुलामांची पद्धत रूढ आहे. गुलामांचे व्यवस्थित शोषण करता यावे म्हणून त्याना (militia) खाजगी सैन्याची आवश्यकता होती . बंदूक बाळगायचा अधिकार दक्षिणी राज्यांनी गुलामी टिकवायला मागितला असाही प्रवाह आहे . (पेट्रिक हेन्री )

एकूण पाहता लोकशाहीसाठी अथवा गुलामीसाठी ! असे बंदूक बाळगायचे अनेक मार्गानी समर्थन करण्यात आले . ट्रम्प बाबा बंदुकीच्या बाजूचे आहेत . हिलरी आज्जीला या कायद्यात बदल करायचे आहेत.
उत्तर अमेरिकेतली राजकीय व्यवस्था आणि हेल्थ सिस्टीम याचाही घनिष्ट संबंध आहे . त्याचा परिणाम जगभरातल्या हेल्थ सीस्टीम वर पडत असतो . तो कॅन्सर विषयक संशोधनावर सुद्धा पडतो . अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आपल्या पेक्षा बरीच वेगळी आहे. तिथे अध्यक्ष कोण असावा ? यासाठी सामान्य जनता प्रत्यक्ष मतदान करते .

प्रत्येक राज्याला काही हायपोथेटिकल सिटा दिलेल्या असतात . त्याची बेरीज होते आणि त्यानुसार अध्यक्ष ठरतो . भारतीय लोकशाहीत आपण निवडून दिलेले खासदार पंतप्रधान ठरवत असतात . अमेरिकेत मात्र राज्यांच्या हायपोथेटिकल वजना नुसार - त्यातली सामान्य जनता अध्यक्ष कोण असावा ? हे ठरवत असते . इथे एक महत्वाचा फरक असा कि खासदार खरेदी विक्रीची भारतात सोय आहे - अमेरिकेत तशी सोय नाही . कारण अध्यक्षा साठी प्रत्यक्ष जनता मतदान करते.
अमेरिकेत निवडणुकीतला भ्रष्टाचार सुद्धा नाही कारण-- इथे भ्रष्टाचारच कायदेशीर आहे !

उद्योगपती राजकीय पक्षांना पैशे देऊ शकतात .यात अट इतकीच आहे कि कोणी कोणत्या पक्षाला किती पैसे दिले ? ते जाहीर करायचे कायदेशीर बंधन आहे . याला भ्रष्टता म्हणणे अवघड आहे - कारण त्यातला लबाडीचा भाग वजा झालेला आहे - जे काही आहे ते खुल्लम खुल्ला आहे .
अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट अशा दोन पार्ट्या आहेत . त्यांच्या नावावर जाऊ नका - रिपब्लिकन हि इथे उजवी पार्टी आहे . डेमोक्रॅट - लोकशाहीवादी आघाडी हा डावा पक्ष आहे .नावाचा भाग अलहिदा ठेवला तरी भारतातल्या उजव्या डाव्या विचाराशी याची नाळ जोडणे जरा कठीण - परिस्थिती फार वेगळी आहे . अमेरिकेतले पेट्रोल - खाण आणि अवजड उद्योग वाले भांडवलदार ट्रम्प बाबा च्या रिपब्लिकन पार्टीचे असतात . फेसबुक मायक्रोसॉफ्ट सारखे नवश्रीमंत लोक्स डाव्या हिलरींच्या डेमोक्रेट पार्टीला पैशे देतात.
अमेरिकेत गन लॉबी आहे. बंदूक लॉबीचे धनाढ्य कारखानदार युद्धखोर राजकारणाला मदत करतात ...
 हे बुरजवा लोक्स - अमेरिकेतील राजकारण आणि पर्यायाने जगाचे युद्धकारण ठरवत असतात असेही काही जण म्हणतात . हे बोलणे फ्याषनेबल आहे ! पण वास्तविक जागतिक राजकारणाला अनेक पदर असतात . मानवी व्यवहार "फक्त" पैशावर चालतो - असते म्हणायचे असेल तर आपल्याला कम्युनिस्टां इतके हुश्शार  व्हावे लागेल ! तरीही जागतिक युद्धकारणावर "काही अंशी" प्रभाव - या गन लॉबीचा आहे - हे खरेच .
आपला मुद्दा बंदूक नाही . आरोग्य आहे. ..अमेरिकेचे आरोग्य विषयक धोरण त्यातील - "कशाच्या संशोधनाला चालना मिळेल ? हे ठरवते ". त्यानुसार जगभरातले आरोग्य विषयक व्यवहार ठरतात कारण मूलभूत संशोधन मुख्यत: अमेरिकेत होत असते...
आता  आपण अमेरिका  आणि आरोग्यव्यवस्था या विषया कडे वळूया  .....
क्लिव्हलॅन्ड ते वॉलस्ट्रीट
हि आमची क्लिव्हलॅन्ड क्लिनिक मधली मित्रमंडळी .वेगवेगळ्या देशातली आहेत - भाषा वेगळी वेगळी आहे - मी मराठी माध्यमात शिकलो. सरकारी शाळा . थोडक्यात इंग्लिश ची बोंब . चालणे - वॉक चा भूतकाळ वाकड . वर्क चा भूतकाळ वरकड ....


पुढे विज्ञान किंवा मेडिकल साठी कामापुरते इंग्लिश भागते . खर्या अर्थाने इंग्रजी साहित्य , भाषा, बोली , उच्चार हे शिकायची अजिबात गरज पडली नाही. महाराष्ट्रात चांगले शैलीदार मराठी लिहीणार्या किंवा बोलणार्या माणसाला नको तितका मान मिळतो . बाकी ठिकाणी हिंदीत भागते . मेडिकलची पुस्तके वाचता येतील इतपत इंग्लिश येत होते. खरी बोंब लागली माझी- ती कामा निमित्ताने परदेशी लोकांशी संबंध आल्या नंतर ...
दोन तीन वर्षांपूर्वीचा काळ आठवतो - जरनल क्लब मध्ये काहीतरी बोलायचे असायचे . बरेच मुद्दे मनात घोळायचे - समोर इंग्रज आला कि गप बसायचो . बोलण्यापुरते इंग्लिश येत होते . पण त्याने काही प्रश्न विचारला - तर तो प्रश्न काय आहे ? हेच समजायचे नाही . उच्चार सगळे डोक्यावरून जायचे .
हा जो एक्सेंट म्हणजे उच्चार नावाचा प्रकार आहे तो अजब आहे . त्याला सांस्कृतिक , ऐतिहासिक असे बरेच संदर्भ आहेत . म्हणजे गिलबर्ट या इंग्लिश नावाचा उच्चार फ्रेंच मध्ये जिब्राइल सारखा का होतो ? यावर एक निबंध लिहिता येईल. इंग्लड मध्ये बारा बोलीभाषा आहेत - कोकणी कोल्हापुरी भोजपुरी सारख्या . अमेरिकन, ब्रिटिश , पोर्तुगीज , फ्रेंच , चिनी, तुर्की हे सारे आपल्या आपल्या इंग्लिश मध्ये बोलू लागले तर तेला शिवाय भेजा फ्राय होतो . उच्चार सगळे डोक्यावरून जायचे . हा मुद्दा आहे .
गेली काही वर्ष अनेक युरोपियन - एशियन लोकांशी संबंध आला . त्यावेळी प्रत्यक्ष बोलताना अडखळायचो . समोरचा माणूस नेमका काय बोलतो आहे तेच कळायचे नाही . मग काही महिन्या पूर्वी ट्यूब पेटली ....
संभाषण म्हणजे शब्द नाहीत . ते त्याहून काहीतरी अधिक आहे . बहिऱ्या व्यक्ती सुद्धा ऐकू शकतात . त्याला लीप मुव्हमेंट म्हणतात . ओठाच्या हालचालीवरून नेमके कोण काय बोलतो आहे - ते कर्णबधिर व्यक्तीला ५०% बोलणे कळू शकते . ओठाची हालचाल - चेहर्यावरचे भाव - देहबोली - मान डोलावण्याची पद्धत हि सगळी भाषाच आहे. आणि गंमत अशी कि हि भाषा इंग्रजी नाही . ही स्थानिक आहे.
माझया टीम मध्ये क्यानडा , चिनी , पोर्तुगीज , तुर्की, अमेरिकन , ब्रिटिश , ऑस्ट्रलियन अशा सर्व देशाचं प्रतिनिधित्व आहे. ते सारे मेडिकल डॉक्टर किंवा बायोकेमिस्टरी चे पीएचडी आहेत . क्लिव्हलॅन्ड क्लिनिक सध्या क्लिनिकल रिसर्च च्या संख्येत अमेरिकेत प्रथम क्रमांकावर आहे. इतक्या चांगल्या इन्स्टिट्यूट मधल्या सहकार्यांना सुद्धा अनेकदा एकमेकांचे उच्चार कळत नाहीत हे पाहून बरे वाटले. च्यायला म्हणजे मी एकटाच "ढ" नाहीये इथे !
आपण उजवी डावीकडे मान हलवून (*नाही - नाही) असे म्हणतो - त्याचा अर्थ जगात अनेक ठिकाणी (हो- हो अवश्य ) असा होत असतो ! चेहर्यावरचे भाव, ओठ दुमडण्याची पद्धत हे सारे स्थानिक असते . आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी संभाषण करतो तेव्हा फक्त शब्द ऐकत नसतो - चेहर्यावरचे भाव , देहबोली , कानी ऐकू येणारे शब्द हि सारी भाषाच असते .
मग मी एक शक्कल काढली - कदाचित आपण देहबोली ला जास्त महत्व देतोय ... उच्चार आणि हावभाव याची गल्लत करता कामा नये . हावभावाकडे संपूर्ण डीफोकस - दुर्लक्ष करायचं - आणि फक्त शब्द ऐकायचे - खच्चून अंधाराने भरलेल्या खोलीत एक काडी पेटावी आणि सगळे उजळून जावे - तसे झाले - देहबोली कडे दुर्लक्ष केले तसे सारे उच्चार कळू लागले .

जे क्लिव्हलॅन्ड बाबत खरे आहे ते वॉलस्ट्रीट बाबत सुद्धा खरे आहे . वॉलस्ट्रीट ला फक्त पैशाची भाषा कळते . हि भाषा समजून घ्यायची असेल तर - देहबोली कडे दुर्लक्ष करावे लागेल - त्याचबरोबर अर्थकारण आणि राजकारण हे आरोग्य या विषयावर कसे प्रभाव पाडत असते ? तेही समजून घ्यायचे आहे -

(क्रमश:)


२ ऑग, २०१६

द इमिटेशन गेम : इतिहास बदलणारे प्राध्यापक

द इमिटेशन गेम : इतिहास बदलणारे प्राध्यापक
(चित्रपट परिक्षण )

प्रस्तुत गोष्ट हि केम्ब्रीज च्या एका होमो गणिती प्राध्यापकाची सत्यकथा आहे . दुसऱ्या  महायुद्धाचा समय आहे. युद्धखोर नाझी जर्मनीचा सर्व आघाड्यावर विजय होतो आहे . हुकुमशाही वंशवाद आणि हिट्लर शाही विरुद्ध उभी असलेली दोस्त राष्ट्रे हरणार बहुतेक ! इग्लंडच्या एम आय - ६ आणि इतर गुप्तहेर संस्थानि  विद्वान लोकांना पाचारण केले आहे . एक बुद्धिबळपटू ,  एक स्त्रेटिजिस्ट , अनेक बुद्धिमान आणि एक गणिती … प्राध्यापक

मुख्य मुद्दा कधी हाणा मारिचा नव्हताच … मूळ मुद्दा आहे रणनितिचा … शत्रूची जहाजे कोठे चालली आहेत ? रसद कोण -कोठे  रसद पुरवतो आहे …. हल्ला कोठे करायचा आहे ? हि सारी माहिती माहिती जर्मन रेडियो वर बोलत आहेत .  ती माहिती कोड केलेली आहे.   रेडिओ फ्रिक्वेन्सी हेक वगैरे करूनही    काही समाजात नाही . कारण जर्मन सांकेतिक बोलत आहेत . आता A  ला B म्हटले C ला D म्हटले तर ? ABCD  ला  BCDE म्हटले जाइल .  एक चे अंतर आहे ,(A+1)  हे झाले कोड चे सूत्र. (A+6, A-1, ) … या हजारो लाखो शक्यातातून  … जर्मन कोडचे रहस्य शोधून काढतोय तो गणिताचा प्राध्यापक .

जोपर्यंत जर्मन कोडचे रहस्य काळात नाही । तोपर्यंत गणिती प्राध्यापकाला चैन नाही … रात्रंदिवस जागून प्राध्यापक जर्मन नाझीचा कम्युनिकेशन कोड हुडकतो आहे . त्यासाठी प्राध्यापक टीम  बनवतो…  एक बुद्धिबळपटू ,  एक स्त्रेटिजिस्ट , अनेक बुद्धिमान आणि एक गणिती … प्राध्यापक
मग एक दिवस प्राध्यापकाच्या लक्षात  येते कि  , जर्मन  लोक मशिनच्या सहाय्याने कोड देत आहेत … त्या कोडचे कोडे डिकोड करून उलगडण्या साठी  मानवी बुद्धी अपुरी आहे … मग कारर कट्ट चालणार्या काट्यांचे आणि आर्यांचे ..एक प्रचंड अभिनव यंत्र तयार होते । त्यास गणीति प्राध्यापक ख्रिस्तोफर असे नाव देतो .

या यंत्राने रोज जर्मन कोड डिकोड झाल्याने दोस्त राष्ट्र दुसरे महायुद्ध जिंकतात . हि गोष्ट ब्रिटिश सरकारकडून गुप्त ठेवली जाते.

१) पुढे त्या गणिती प्राध्यापकास समलिंगी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अटक होते . त्यावेळच्या ब्रिटिश कायद्यानुसार प्राध्यापकास शिक्षा म्हणुन नपुंसक बनवले जाते . प्राध्यापक पुढे आत्महत्या करतो .

२) पन्नास वर्षांनी इंग्लंडचि राणी गुपित उघड करते आणि युद्ध जिंकण्यात प्राध्यापकाने शोधलेल्या यंत्राचा आणि तंत्राचा यथोचित गौरव होतो .

३) आज सर्व युरोपीय राष्ट्रात समलिंगी संबंधाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे .

४) गणिती प्राध्यापकाने शोधलेल्या यंत्राला आज कोम्प्युटर म्हणुन ओळखले जाते .

सदर चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे आणि अवश्य पहावा असाच आहे . अभिनय, दिग्दर्शन, एडिटिग केमेरा वगैरे तांत्रिक बाजू उत्तम असल्या तरी चित्रपटाची कथाच एव्हढी जबरदस्त आहे कि इतर गोष्टींकडे लक्षच जात नाही . ५/५ स्टार .२२ जुलै, २०१६

गेम थेअरी : सवाल नैतिकतेचा (भाग १)

 सवाल नास्तिकाच्या नैतिकतेचा (भाग १)

देवा धर्मा मुळे नैतिकता टिकून राहते असे मानले जाते.  नरक, स्वर्ग, कर्मफळ इत्यादी गोष्टींना घाबरून सामान्य माणसे खरे बोलतात, चोऱ्या, खून, लबाड्या, बलात्कार करत नाहीत असेही म्हणतात. ईश्वराच्या संकल्पाने प्रमाणे कायदा काही सर्व व्यापी - सर्व साक्षी  नाही . कायद्याच्या कचाट्यातून सुटणेही फार सोपे असते. त्यामुळे खरे खोटे कसेही असो - देव धर्म उपयुक्त आहेत - कारण त्यामुळे नीतिमत्ता आणि सचोटी टिकते असे  म्हटले जाते.  प्रस्तुत लेखात आपण विज्ञान, गणित आणि जीवशास्त्र नैतिकतेकडे कसे पाहते ? याची चर्चा करायची आहे.

दोन माणसांनी एकमेकांशी कसे वागावे ? याचे नियम म्हणजे नैतिकता . आपण येथे गेम थेअरीतले दोन कैद्यांचे प्रसिद्ध उदाहरण पाहायचे आहे. समजा....

गेम थेअरी

बबन  आणि मगन  असे दोन चोर आहेत. त्यांनी एक मोठा दरोडा घातला . हे दोन्ही चोर अतिशय बुद्धिवादी आणि नास्तिक आहेत असे आपण गृहीत धरायचे आहे. पोलिसांनी त्या चोरांना पकडले आहे. दोन वेगवेगळ्या कोठड्यात ठेवलेले आहे . बबन आणि मगन ची स्वतंत्र पोलीस चौकशी सुरू आहे. या दरोड्याला कोणीही साक्षीदार नाही . कोणताही पुरावा नाही . पण बबन आणि मगन पैकी एक जण माफीचा साक्षीदार बनू शकतो .

१) जो गुन्हा कबूल करेल तो माफीचा साक्षीदार ठरेल. त्याला कोणतीही शिक्षा नाही (शून्य  वर्षे ) - दुसर्याला २० वर्ष खडी फोडावी लागेल .

२) दोघांनी गुन्हा कबूल केला तर पोलीस हलकी कलमे लावून पाच वर्षात दोघांनाही  सोडून देतील.

३) मगन  आणि बबन या दोघांनीही गुन्हा मान्य केला नाही   - गप्प राहिले तर - केस चाले स्तवर एखादे वर्ष तुरुंगात काढावे लागेल . साक्षीदार नसल्याने दोघेही वर्षभरात सुटतील .

तिसरा पर्याय सरळच दोघांच्याही फायद्याचा आहे.  दोघे गप्प राहिले तर - वर्षभरात सुटतील . पण हे गणित इतके सोपे नाही . दुसरी बाजू काय निर्णय घेते ? हे दोघांनाही माहीत नाही .  संगनमत करायला पोलीस संधी देत नाहीत.

 एक वर्षाची माफक कैद सुद्धा टाळण्याचा मोह आपल्या सहकार्याला होऊ शकतो . त्यामुळे   मी गप्प राहिलो आणि समोरच्याने गुन्हा कबूल  केला तर ? वीस वर्ष मला तुरुंगाची हवा खावी लागेल - या भीतीने तो धोका कोणीही पत्करणार नाही.  मग  मगन  आणि बबन ने कोणता निर्णय घ्यावा  ? स्वतःचा तोटा कमीत कमी  कसा करावा ? तर्कशास्त्रा नुसार गुन्हा कबूल करणे हाच सेफ गेम आहे . यात फार तर पाच वर्ष शिक्सला होईल किंवा कदाचित लगेच सुटका !

बबन आणि मगन या दोघांनीही गुन्हा कबूल केला !

हा एक अतिशय नैतिक निर्णय दोन अनैतिक दरवडे खोरानी घेतला आहे . त्यांनी बुद्धिवाद वापरला ! तर्कशास्त्र वापरले ! हे अनैतिक स्वार्थीच होता - पण त्यापायी दोघांनीही नैतिक निर्णय घेतला !

पण हे थोडे तोट्याचे आहे - शिवाय मैत्री भावनेशी अनैतिक देखील आहे ... आता थोडे पुढे जाऊ ....


खेळ मांडीयेला 


मगन आणि बबन ला पोलिसांपुढे साक्ष देण्याची एकच संधी होती . नेहमीच्या जीवनात आपल्याला सतत नैतिक निर्णय घ्यायचे असतात. समोरची व्यक्ती कशी वागेल याचा आपण सतत अंदाज घेत असतो. त्यानुसार आपले धोरण ठरवत असतो . त्यातून आपला स्वभाव बनतो . व्यक्तिमत्व बनते . म्हणजे मानवी गेम थेअरीत सातत्य आहे. वारंवारता आहे . आता एक पत्त्याचा डाव मांडूया .....

समजा तुमच्या कडे दोन रंगाचे पत्ते आहेत - सहकार्य आणि विश्वासघात

हे दोन पत्ते म्हणजे तुमचे दोन निर्णय.  हे निर्णय तुम्हाला आयुष्यात वारंवार घ्यायचे आहेत. सहकार्य आणि विश्वासघात . तुम्ही कोणता पत्ता निवडणार ? इथेही समोरचा माणूस काय खेळी खेळणार आहे ते तुम्हाला माहीत नाही .निर्णय घेणारे दोन पक्ष हे निर्णय सतत घेताना तुम्ही काही धोरणे आखू शकता

१) सतत सहकार्य
२) सतत विश्वासघात
३) जशास तसे 
४) अनियमित (रॅन्डम ) चाली खेळायच्या 
५) अचानक केलेली फसवणूक
६) पश्चात्ताप धोरण - आपण फसलेल्या माणसाने सहकार्य केल्यास त्यास पुन्हा नाही फसवायचे
७) सूडाचे धोरण - जो एकदा फसवेल त्यास सतत फसवायचे

इत्यादी ....

पण या खेळात केवळ दोन पक्षी नाहीत . अनेक आहेत . खर्या आयुष्यातील निर्णय घेताना देखील अनेक पक्ष आहेत. कोण जिंकेल ?संगणकीय प्रयोग 

रॉबर्ट अक्सेलरॉड  या अमेरिकन शास्त्रज्ञाने कॉम्पुटर प्रोग्राम वापरून हा प्रयोग केला . त्याने एकूण पंधरा शास्त्रज्ञाना यात सहभागी केले . हे सर्व गेम थेअरी मधील तज्ञ होते .  सहकार्य की  विश्वासघात ? आणि त्यांचा क्रम काय असला तर अंतिम विजय प्राप्त होईल ? पंधरा वेगवेगळी धोरणे कॉम्प्युटर ला फीड केली. सर्व धोरणांना एकमेकांशी दोनशे वेळा खेळवले. 


-----------------------------------------------------------
प्रोग्रामचे नियम : - 

दोघांनी सहकार्य केले तर दोघांना १०० मार्क
एकाने दगा केला आणि समोरच्याने सहकार्य केले - तर पराभूतला शून्य  मार्क , विजेत्याला १०० मार्क
दोघांनी दगा केला तर दोघांनाही  ५० - ५० मार्क


या १५ धोरणांनी एकदा स्वतः:शी देखील खेळायचे होते - म्हणजे १५ X   १५ = २२५ लढती 
प्रत्येकी दोनशे वेळा ४५००० लढती  झाल्या 

या इतक्या शक्यतांत ज्या धोरणाला जास्त मार्क मिळतील ते विजेते धोरण 
----------------------------------------------------------
सतत विश्वासघात करणारे या खेळात टिकू शकत नाहीत . जशास तसे वाले जिंकू लागतात . त्यांचे परस्परांशी सहकार्य निर्माण होते - आणि मग सतत विश्वास घात  करणारे अल्पसंख्य बनून हरू लागतात . कारण ते कोणाशीच सहकार्य करत नाहीत . (इतर विश्वास घात  वाल्यांशी सुद्धा नाही )

रॉबर्ट च्या संगणकीय प्रयोगात प्रयोगात जशास तसे हे धोरण जिंकले . आणि गंमत म्हणजे या पंधरा पैकी जी लबाड धोरणे होती ती शेवटच्या नंबरात आली . सज्जन धोरणे पहिल्या सात मध्ये आली .दुसरा संगणकीय प्रयोग 

एक प्रयोग करून रॉबर्ट थाबला नाही. पहिल्या प्रयोगात एक त्रुटी राहून गेली होती . इतरांची धोरणे सहभागी शास्त्रज्ञाना माहीत नव्हती . साधारणतः कोणती धोरणे जिंकतात याचाही अंदाज नव्हता. हा अंदाज आल्यावर मग पुन्हा नवी धोरणे मागवली .

 त्यातले एक प्रसिद्ध धोरण , दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा - असे उदारमत वादी - दुसर्याला सुधारायची एक संधी देणारे - पण सतत बदमाशी करणार्यांना धडा शिकवणारे असे होते

सज्जन धोरणे जिंकतात या पहिल्या निकालाच्या अंदाजाने इतर लोक सज्जन धोरणेच पाठवतील असा अंदाज बहुतेक गेम थेअरी वाल्या सहभागी शास्त्रज्ञानी केला . आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून  यावेळी आलेली बरीच धोरणे ही लबाड आणि बदमाश होती . पुन्हा दोनशे वेळा खेळ मांडीयेला .... या प्रयोगाचा निर्णय अजूनच विचित्र लागला !

फसवणार्या लबाडाची संख्या फार जास्त होती . त्यामुळे .... 

१) जशास तसे वाले बर्याच वेळेस लबाडी करू लागले - सूड वाले सूड चक्रात अडकले -  लबाडाची संख्या अजूनच वाढली

२) सज्जन धोरणे हरली .

३) दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा वाल्याचे देखील काही चालेना . त्याला सतत बहुसंख्येकडून  फसवणूक झाल्याने हरावे लागले.

आजूबाजूच्या परिस्थिती वरून आणि समाजातील इतर धोरणावरून जय / पराजय ठरत होता . 
आता जीवशास्त्रीय प्रयोग 

मानवी व्यवहार म्हणजे कॉम्प्युटर चा प्रोग्राम नाही. मानवी व्यवहार अधिक जटील आहेत. याहून अधिक धक्कादायक निष्कर्ष  हाती लागणार आहेत .... त्यानंतर आपण ट्रेनचा प्रयोग पाहणार आहोत ...

(क्रमश:)
गेम थेअरी : सवाल नैतिकतेचा (भाग १)

 सवाल नास्तिकाच्या नैतिकतेचा (भाग १)

देवा धर्मा मुळे नैतिकता टिकून राहते असे मानले जाते.  नरक, स्वर्ग, कर्मफळ इत्यादी गोष्टींना घाबरून सामान्य माणसे खरे बोलतात, चोऱ्या, खून, लबाड्या, बलात्कार करत नाहीत असेही म्हणतात. ईश्वराच्या संकल्पाने प्रमाणे कायदा काही सर्व व्यापी - सर्व साक्षी  नाही . कायद्याच्या कचाट्यातून सुटणेही फार सोपे असते. त्यामुळे खरे खोटे कसेही असो - देव धर्म उपयुक्त आहेत - कारण त्यामुळे नीतिमत्ता आणि सचोटी टिकते असे  म्हटले जाते.  प्रस्तुत लेखात आपण विज्ञान, गणित आणि जीवशास्त्र नैतिकतेकडे कसे पाहते ? याची चर्चा करायची आहे.

दोन माणसांनी एकमेकांशी कसे वागावे ? याचे नियम म्हणजे नैतिकता . आपण येथे गेम थेअरीतले दोन कैद्यांचे प्रसिद्ध उदाहरण पाहायचे आहे. समजा....

गेम थेअरी

बबन  आणि मगन  असे दोन चोर आहेत. त्यांनी एक मोठा दरोडा घातला . हे दोन्ही चोर अतिशय बुद्धिवादी आणि नास्तिक आहेत असे आपण गृहीत धरायचे आहे. पोलिसांनी त्या चोरांना पकडले आहे. दोन वेगवेगळ्या कोठड्यात ठेवलेले आहे . बबन आणि मगन ची स्वतंत्र पोलीस चौकशी सुरू आहे. या दरोड्याला कोणीही साक्षीदार नाही . कोणताही पुरावा नाही . पण बबन आणि मगन पैकी एक जण माफीचा साक्षीदार बनू शकतो .

१) जो गुन्हा कबूल करेल तो माफीचा साक्षीदार ठरेल. त्याला कोणतीही शिक्षा नाही (शून्य  वर्षे ) - दुसर्याला २० वर्ष खडी फोडावी लागेल .

२) दोघांनी गुन्हा कबूल केला तर पोलीस हलकी कलमे लावून पाच वर्षात दोघांनाही  सोडून देतील.

३) मगन  आणि बबन या दोघांनीही गुन्हा मान्य केला नाही   - गप्प राहिले तर - केस चाले स्तवर एखादे वर्ष तुरुंगात काढावे लागेल . साक्षीदार नसल्याने दोघेही वर्षभरात सुटतील .

तिसरा पर्याय सरळच दोघांच्याही फायद्याचा आहे.  दोघे गप्प राहिले तर - वर्षभरात सुटतील . पण हे गणित इतके सोपे नाही . दुसरी बाजू काय निर्णय घेते ? हे दोघांनाही माहीत नाही .  संगनमत करायला पोलीस संधी देत नाहीत.

 एक वर्षाची माफक कैद सुद्धा टाळण्याचा मोह आपल्या सहकार्याला होऊ शकतो . त्यामुळे   मी गप्प राहिलो आणि समोरच्याने गुन्हा कबूल  केला तर ? वीस वर्ष मला तुरुंगाची हवा खावी लागेल - या भीतीने तो धोका कोणीही पत्करणार नाही.  मग  मगन  आणि बबन ने कोणता निर्णय घ्यावा  ? स्वतःचा तोटा कमीत कमी  कसा करावा ? तर्कशास्त्रा नुसार गुन्हा कबूल करणे हाच सेफ गेम आहे . यात फार तर पाच वर्ष शिक्सला होईल किंवा कदाचित लगेच सुटका !

बबन आणि मगन या दोघांनीही गुन्हा कबूल केला !

हा एक अतिशय नैतिक निर्णय दोन अनैतिक दरवडे खोरानी घेतला आहे . त्यांनी बुद्धिवाद वापरला ! तर्कशास्त्र वापरले ! हे अनैतिक स्वार्थीच होता - पण त्यापायी दोघांनीही नैतिक निर्णय घेतला !

पण हे थोडे तोट्याचे आहे - शिवाय मैत्री भावनेशी अनैतिक देखील आहे ... आता थोडे पुढे जाऊ ....


खेळ मांडीयेला 


मगन आणि बबन ला पोलिसांपुढे साक्ष देण्याची एकच संधी होती . नेहमीच्या जीवनात आपल्याला सतत नैतिक निर्णय घ्यायचे असतात. समोरची व्यक्ती कशी वागेल याचा आपण सतत अंदाज घेत असतो. त्यानुसार आपले धोरण ठरवत असतो . त्यातून आपला स्वभाव बनतो . व्यक्तिमत्व बनते . म्हणजे मानवी गेम थेअरीत सातत्य आहे. वारंवारता आहे . आता एक पत्त्याचा डाव मांडूया .....

समजा तुमच्या कडे दोन रंगाचे पत्ते आहेत - सहकार्य आणि विश्वासघात

हे दोन पत्ते म्हणजे तुमचे दोन निर्णय.  हे निर्णय तुम्हाला आयुष्यात वारंवार घ्यायचे आहेत. सहकार्य आणि विश्वासघात . तुम्ही कोणता पत्ता निवडणार ? इथेही समोरचा माणूस काय खेळी खेळणार आहे ते तुम्हाला माहीत नाही .निर्णय घेणारे दोन पक्ष हे निर्णय सतत घेताना तुम्ही काही धोरणे आखू शकता

१) सतत सहकार्य
२) सतत विश्वासघात
३) जशास तसे 
४) अनियमित (रॅन्डम ) चाली खेळायच्या 
५) अचानक केलेली फसवणूक
६) पश्चात्ताप धोरण - आपण फसलेल्या माणसाने सहकार्य केल्यास त्यास पुन्हा नाही फसवायचे
७) सूडाचे धोरण - जो एकदा फसवेल त्यास सतत फसवायचे

इत्यादी ....

पण या खेळात केवळ दोन पक्षी नाहीत . अनेक आहेत . खर्या आयुष्यातील निर्णय घेताना देखील अनेक पक्ष आहेत. कोण जिंकेल ?संगणकीय प्रयोग 

रॉबर्ट अक्सेलरॉड  या अमेरिकन शास्त्रज्ञाने कॉम्पुटर प्रोग्राम वापरून हा प्रयोग केला . त्याने एकूण पंधरा शास्त्रज्ञाना यात सहभागी केले . हे सर्व गेम थेअरी मधील तज्ञ होते .  सहकार्य की  विश्वासघात ? आणि त्यांचा क्रम काय असला तर अंतिम विजय प्राप्त होईल ? पंधरा वेगवेगळी धोरणे कॉम्प्युटर ला फीड केली. सर्व धोरणांना एकमेकांशी दोनशे वेळा खेळवले. 


-----------------------------------------------------------
प्रोग्रामचे नियम : - 

दोघांनी सहकार्य केले तर दोघांना १०० मार्क
एकाने दगा केला आणि समोरच्याने सहकार्य केले - तर पराभूतला शून्य  मार्क , विजेत्याला १०० मार्क
दोघांनी दगा केला तर दोघांनाही  ५० - ५० मार्क


या १५ धोरणांनी एकदा स्वतः:शी देखील खेळायचे होते - म्हणजे १५ X   १५ = २२५ लढती 
प्रत्येकी दोनशे वेळा ४५००० लढती  झाल्या 

या इतक्या शक्यतांत ज्या धोरणाला जास्त मार्क मिळतील ते विजेते धोरण 
----------------------------------------------------------
सतत विश्वासघात करणारे या खेळात टिकू शकत नाहीत . जशास तसे वाले जिंकू लागतात . त्यांचे परस्परांशी सहकार्य निर्माण होते - आणि मग सतत विश्वास घात  करणारे अल्पसंख्य बनून हरू लागतात . कारण ते कोणाशीच सहकार्य करत नाहीत . (इतर विश्वास घात  वाल्यांशी सुद्धा नाही )

रॉबर्ट च्या संगणकीय प्रयोगात प्रयोगात जशास तसे हे धोरण जिंकले . आणि गंमत म्हणजे या पंधरा पैकी जी लबाड धोरणे होती ती शेवटच्या नंबरात आली . सज्जन धोरणे पहिल्या सात मध्ये आली .दुसरा संगणकीय प्रयोग 

एक प्रयोग करून रॉबर्ट थाबला नाही. पहिल्या प्रयोगात एक त्रुटी राहून गेली होती . इतरांची धोरणे सहभागी शास्त्रज्ञाना माहीत नव्हती . साधारणतः कोणती धोरणे जिंकतात याचाही अंदाज नव्हता. हा अंदाज आल्यावर मग पुन्हा नवी धोरणे मागवली .

 त्यातले एक प्रसिद्ध धोरण , दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा - असे उदारमत वादी - दुसर्याला सुधारायची एक संधी देणारे - पण सतत बदमाशी करणार्यांना धडा शिकवणारे असे होते

सज्जन धोरणे जिंकतात या पहिल्या निकालाच्या अंदाजाने इतर लोक सज्जन धोरणेच पाठवतील असा अंदाज बहुतेक गेम थेअरी वाल्या सहभागी शास्त्रज्ञानी केला . आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून  यावेळी आलेली बरीच धोरणे ही लबाड आणि बदमाश होती . पुन्हा दोनशे वेळा खेळ मांडीयेला .... या प्रयोगाचा निर्णय अजूनच विचित्र लागला !

फसवणार्या लबाडाची संख्या फार जास्त होती . त्यामुळे .... 

१) जशास तसे वाले बर्याच वेळेस लबाडी करू लागले - सूड वाले सूड चक्रात अडकले -  लबाडाची संख्या अजूनच वाढली

२) सज्जन धोरणे हरली .

३) दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा वाल्याचे देखील काही चालेना . त्याला सतत बहुसंख्येकडून  फसवणूक झाल्याने हरावे लागले.

आजूबाजूच्या परिस्थिती वरून आणि समाजातील इतर धोरणावरून जय / पराजय ठरत होता . 
आता जीवशास्त्रीय प्रयोग 

मानवी व्यवहार म्हणजे कॉम्प्युटर चा प्रोग्राम नाही. मानवी व्यवहार अधिक जटील आहेत. याहून अधिक धक्कादायक निष्कर्ष  हाती लागणार आहेत .... त्यानंतर आपण ट्रेनचा प्रयोग पाहणार आहोत ...

(क्रमश:)
१९ जुलै, २०१६

विज्ञान विरुद्ध छद्म विज्ञान : Causation Vs Correlation

विज्ञान विरुद्ध छद्म विज्ञान :
छद्म म्हणजे खोटारडे . विज्ञान आहे असे सोंग आणते पण खरे पाहता जी एक अंधश्रद्धा असते त्याला छद्म विज्ञान म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील बहुसंख्य लोकांचा एलियन वर विश्वास आहे . अनेकांची श्रद्धा देखील आहे . परग्रहावरील जीव उडत्या तबकड्यातुन पृथिवीवर येतात असे त्यांना मनापासून पटले आहे. ते सर्व खोटे बोलतात काय ?.... नाही .

ललित साहित्य सिनेमे याचा मानवी मनावर परिणाम होत असतोच. त्याला काही विचित्र अनुभवाची जोड देऊन आपण आपली मते बनवतो. विज्ञानात ज्याप्रमाणे तर्क असतात त्याप्रमाणे तर्क छद्म विज्ञानात असतात . श्रद्धेत असतात आणि अंध श्रद्धेत सुद्धा तर्क असतातच . तर्क करण्याची पद्धत मात्र चुकलेली असते.
अमेरिकेत उडत्या तबकड्या दिसण्याचा एक काळ होता. १९८० सालच्या दहशकात अमेरिकेत एलियन येण्याचे प्रमाण वाढले होते. अनेक वर्तमानपत्रातून त्यावर लेख येत . उडत्या तबकड्यांचे फोटोही छापून येत. एलियन पाहिल्याचे दावे करणारे महापुरुष भाषणे करत . पुस्तके लिहीत पैसेही कमावत . त्यातले काही लोक्स लबाड धरले तरी सगळेच खोटारडे होते असे म्हणता येणार नाही. एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घावी लागेल , ती म्हणजे १९८० च्या दशकात एलियन ने गर्दी केली पुढे गायब झाले ! हे एलियन मुख्यतः अमेरिकेत येत .. इतर देशाचा व्हिजा त्यांकडे नसावा अथवा एलियन लोकांना अमेरिकन बर्गर आवडत असावेत ! कारण इतर देशात उडत्या तबकड्या अभावानेच दिसल्या !

१९८० च्या दशकात अमेरिकन संरक्षण संस्था - पेन्टयागोंन - एका नवीन प्रकारच्या विमानावर गुप्तपणे काम करत होती - स्टेल्थ विमान . हे विमान लांबून उडत्या तबकडी सारखे दिसते . हा कार्यक्रम पूर्ण झाला . विमाने लष्करात दाखल झाली . आणि एलियन नि अमेरिकेतून गाशा गुंडाळला ! त्यानंतर एकही उडत्या तबकडीच्या नोंद नाही ! ( संबंधित बातमी Click Here )

इथे अमेरिकन लोकांनी केलेला तर्क बरोबर आहे . एखादी विचित्र उडती वस्तू आकाशात दिसली की तिचा संबंध परग्रहावरील प्राण्यांशी लावणे यात तर्क आहेच ! तर्क करण्याची पद्धत चुकलेली आहे .
----------------------------------
Causation Vs Correlation : 

कार्यकारण भाव विरुद्ध सहसंबंध
----------------------------------

इथे कार्य कारण भाव आणि सहसंबंध यातील फरक समजावून घ्यावा लागेल. दोन घटना एका मागोमाग एक घडल्या की मानवी मन त्यात संबंध जोडते. मांजर आडवी गेल्यावर अपशकुन होतो हा असाच जोडलेला संबंध आहे . दिवसभरात काही बर्या वाईट घटना घडतातच . त्यातील वाईट घटना सकाळच्या रस्ता क्रॉस करणाऱ्या मांजरावर टाकता येतातच ! यात तर्क आहेच पण अमेरिकन एलियन प्रमाणेच तर्क करण्याची पद्धत चुकली आहे . चांगली तारीख , मुहूर्त , लकी कलर , लकी डे या सर्वात सहसंबंध (correlation) असते पण त्यामागे (causation) कार्य कारण भाव नसतो.

कार्य कारण भाव म्हणजे काय ?

अपशकुन नेमका मांजरा मुळेच झाला हे सिद्ध करावे लागते. त्यासाठीचे एक साधन गणित आणि संख्याशास्त्र आहे . शंभर मांजरे शंभर माणसापुढून गेली , शंभर माणसापुढून डुकरे , शंभरा पुढून गायी गेल्या ... कोणाचा दिवस कसा गेला ? किती वाईट घटना घडल्या ? किती चांगल्या घटना घडल्या ?
त्या सर्वांची निरीक्षणे घेतली पाहिजेत .
त्यातून मग मांजराचे अपशकुनी असणे किंवा नसणे सिद्ध होते . व्यक्तिगत अनुभवा वरून तर्क करणे चूक आहे . त्यासाठी गणिती किंवा सांख्यिकी पाद्धत वापरली पाहिजे .
अजून एक पद्धत म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये मुद्दाम मांजर सोडायची किंवा काढून घ्यायची ! म्हणजे रोज सकाळी उठल्यावर मांजर आडवी गेलीच पाहिजे याची व्यवस्था करायची - मग पाहायचे ! काय घडते दिवसभरात ? किंवा ज्या दिवशी काही वाईट घडणार आहे याची खात्री आहे - त्यादिवशी सोसायटीतल्या सर्व मांजरी जेल मध्ये टाकायच्या ! नेमके ठरवले पाहिजे अपशकुन नेमका मांजरा मुळे की अजून कशामुळे ?
अशाप्रकारे वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धती वापरून कार्य कारण भाव सिद्ध करावा लागतो .

--------------------------

श्रद्दा , अंधश्रद्धा , वेदातली विमाने आणि डाव्या लोकांच्या सोशल थेअर्या - या सार्या सहसंबंध - (correlation) वर आधारालेल्या आहेत . त्यामुळे ते छद्म विज्ञान आहे. विज्ञान नाही . कारण त्यात कार्य कारण भाव नाही .
विज्ञान ही विचार करायची पद्धती आहे . त्यातला प्रमुख भाग म्हणजे कार्य कारण भाव शोधणे आणि सतत तपासत राहणे.

१८ जुलै, २०१६

संस्कार की अनुवंश ? : नेचर विरुद्ध नर्चर

१२ जुलै, २०१६

इस्लामी दहशत वाद आणि भारतीय सेक्युलारीझम समोरील आव्हाने

होय इस्लाम खरोखरच खतरेमे आला आहे .


बांग्ला देशात इस्लामिस्टांनि २० लोक ठार केले . आधी त्यांचे धर्म विचारले , मग त्यांना कुराणातील आयती  म्हणून दाखवायला सांगितले . ज्यांना जमले नाही त्यांचे गेले चिरले . नुकताच एक काश्मिरी दहशत वादी मारला गेल्यावर हजारोंचे मोर्चे निघाले . कन्हैया कुमार कंपूतला उमर खालिद अतिरेक्यांना बाप बोलता झाला . 

या आधी पेरिस च्या 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिकावर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. मुहम्मद पैगंबर आणि इसीस च्या नेत्याची व्यंगचित्रे छापली म्हणुन कडव्या इस्लामिस्टांनि एक डझन लोकांना गोळ्या घालून ठार केले आहे. यावेळी ते अल्लाहू अकबर , आम्ही प्रेषित अपमानाचा सूड घेतला आणि धर्म्ररक्षण केले अशा अर्थाच्या घोषणा देत होते. यामुळे त्यांचा धर्म टिकेल, वाढेल आणि इस्लामला सन्मान मिळेल असे त्यांना वाटते .
वास्तवात जगभरात आधीच अस्तित्वात असलेल्या इस्लाम विरोधाला आता अजून धार येणार आहे .  

 विवेकवाद आणि सहिष्णुता यांच्याशी इस्लाम धर्माचे काहीही देणे घेणे नाही. मुळात इण्टोलरन्स आणि इतर विचाराशी / धर्माशी असहिष्णुता हा कुराण आणि हदीस या धर्मग्रंथांचा गाभा आहे . सर्वच धर्म मनुष्यकृत आहेत . मानवाच्या रानटी अवस्थेत धर्माची निर्मिती झाली असल्याने सर्वच जुन्या धर्मात थोडाबहुत रानटीपणा आढळतोच . इस्लाम मध्ये हे प्रमाण जास्त आहे कारण अरबांचा वाळवंटि प्रदेश , टोळीयुद्ध , सततचा कोरडा दुष्काळ  , वाळवंटि दुर्भिक्ष या सार्या घटकांचा परिणाम इस्लाम वर झाला आहे . त्याहून वाइट म्हणजे इस्लाम मध्ये धर्म सुधारणा चळवळीची वानवा आहे . मुद्दा असा कि या सार्याचा इस्लामला काहीही उपयोग होताना दिसत नाही . इस्लामची म्रुत्युघंटा वाजू लागली आहे .

सुबुद्ध आणि सुसंस्क्रुत मुस्लीमाला या इसीसशी किंवा अल कायदाशी माझा संबंध नाही असे म्हणणे आवश्यक ठरणार आहे . पण त्यातून सुधारणा चळवळ जन्म घेताना दिसत नाही याउलट "खरा" इस्लाम शांतता प्रिय आहे वगैरे अकलेचे तारे तोडले जातात . इस्लामचे असहिष्णू रूप कुराण आणि हदीसच्या पाना पानावर आहे. सत्य फार काळ लपत नसते . इस्लाम सुधारणा घडवू शकत नसल्यास तो संपणार आहे. जो वाकत नाही तो मोडतो . नव्या आधुनिक जगाशी ज्याना जुळवून घेता येणार नाही त्या सर्वच धर्मांची हि हालत होणार आहे .
 सेक्युलारीझम का हरतो ?


दहशत वादी   हल्ल्यानंतर भारतीय सेक्युलरांच्या प्रतिक्रिया पहाण्याजोग्या आहेत . एकिकडे दहशतवादाचा निषेध आणि दुसरीकडे  अमेरिका चुक्या - भारत तुम्हाराभी चुक्याच   ! असा अर्थ सेक्युलर प्रतिक्रियांच्या लसावितून निघतो …  

इस्लाम चिकित्सा नावाचा प्रकार भारतीय पुरोगामी हुंगत सुद्धा नाहीत . मुसलमानांनी दहशतवादी हल्ले केले की अमेरिकेला शिव्या दे भारत सरकारला शिव्या दे वाढीव म्हणून ज्यूनाच शिव्या दे - अशी बौद्धिक कसरत ते करतात !

मुस्लिम दहशत वादाचा संघ फायदा घेतो की काय ? या फालतू मानसिकतेतून जन्मलेली ही पुरोगामी तर्कटे आहेत. पुरोगाम्यांच्या इस्लामिक चाटूगिरीमुळे संघ फोफावला - संघाच्या वाढीला सर्वस्वी जवाबदार म्हणजे भ्याड पुरोगामी होत. हिंदू समाज बदलून गेला . पुरोगाम्यांची बौध्दिवाद गेल्या साठ वर्षात झालीच नाही . आणि त्याचेच हे परिणाम आहेत.  या कथित सेक्युलर पुरोगाम्यांकडे पिजर्यातील विनोदी माकडासारखे हिंदू समाज पाहतो .
भारतातल्या स्वत:ला सेक्युलर म्हणणार्यांनि इस्लाम धर्म रक्षणाचि भूमिका घ्यावी यात काहीच धक्कादायक नाही . आजवरचा इतिहास पाहता ,जमाते इस्लामी आणि भारतीय सेक्युलर यांच्या भूमिकात विलक्षण साम्य आहे . साम्यवादी विचारवंतांचे भारतीय बौद्धिक जगतावर साम्राज्य आहे .त्यातून हा   विचार  जन्मला आहे .. इस्लाम हा धर्म इथल्या वर्ण व्यवस्थेतून मुक्ती देणारा समतावादी धर्म आहे अशी जमाते इस्लामीची मांडणी आहे . सार्या भारताने इस्लाम स्वीकारून समतेच्या धर्मात सामील व्हावे यासाठी जमाते इस्लामी ने इस्लाम सर्वांसाठी असे अभियान चालवले आहे . भारतीय सेक्युलर या अभियानात जाणता / अजाणता सामील आहेत .
मुळात इस्लाम हा भारतीय धर्म नसल्याने त्यात वर्ण व्यवस्थेचे समर्थन नाही . वर्ण व्यवस्था वाइटच ... पण वर्ण व्यवस्थेचे समर्थन नसणे हा समतेचा एकमेव क्रायटेरिया आहे काय ? सर्व धर्म मानवनिर्मित आहेत . भारतातले धर्म इथल्या सामजिक गोष्टीवर भाष्य करतील … अरबी धर्म कसे करतील ?

इस्लाम मध्ये समता आहे हा साफ खोटा प्रचार आहे . तत्कालीन अरबांचि स्त्रियांकडे पाहण्याची                   " विशिष्ट "  दृष्टी इस्लाम मध्ये ओतप्रोत भरली आहे . बहुपत्नीत्व तलाक बुरखा या केवळ रूढी नाहीत .       " स्त्रिया म्हणजे पुरुषांची शेती " अशी वाक्ये कुराणातून अल्लाहनेच लिहून ठेवली आहेत . कुराणात गुलामांना चांगले वागवा असे उल्लेख येतात . गुलामगिरी प्रथा नष्ट करा असे कुराण म्हणत नाही . आजही मुस्लिम राष्ट्रात गुलामगिरी आहेच . चातुवर्ण नसले तरी विषमता विषमता असू शकतेच . काफिर आणि मोमीन अशी सार्या जगाचीच दोन भागात विभागणी करणारा इस्लाम हा समतावादी किंवा शांतता प्रिय धर्म आहे असे म्हणण्याचे धाडस फक्त भारतातले सेक्युलर आणि जमाते इस्लामीच करू शकतात . 


भारतातल्या मुस्लिमात असलेल्या जातिप्रथेचे, विषमतेचे, मुलतत्व वादाचे जनकत्व दरवेळी हिंदु धर्माकडे दिले तर बौद्धिक वावदुकीत जिंकता येईल अशी भाबडी आशा  सेक्युलर मनात वसते आहे . त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य याच भाबड्या आशेवर जगायला आमची ना नाही . पण बहुसांस्कृतिक वाद , सर्व धर्म समाभाव , अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे आधुनिक बुरखे पांघरुन तथाकथित सेक्युलरांनि इस्लाम धर्म रक्षणाचि बांग ठोकल्याने त्यांची चिकित्सा क्रमप्राप्त ठरली आहे .
सेक्युलरांना दुसर्याच्या धर्माचा आदर करणे हे योग्य मुल्य वाटते.


सेक्युलरांना दुसर्याच्या धर्माचा आदर करणे हे योग्य मुल्य वाटते. हीच मुळात भयंकर गोची आहे . धर्म हि एक कालबाह्य आणि घातक गोष्ट आहे . हिंदुधर्म घातक आहे . तो मुख्यत: आत्मघातक आहे . सती प्रथेपासुन अस्प्रुश्यते पर्यंत सारा हिंदु धर्म आत्म घातक आहे . त्यामुळे हिंदु समाजाच्या भल्यासाठी त्याला धर्म मुक्त करणे आणि हिंदु धर्माची कठोर चिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते . इस्लामची केस वेगळी आहे . बुरखा तलाक मुळे तो आत्म् घातक तर आहेच . पण दार उल इस्लाम - जिहाद - मुजाहिदीन अशा धार्मिक संकल्पनामुळे इस्लाम पर घातक हि आहे .


इस्लाम इतर  धर्म घातक असल्याने  इस्लामेतरांनाहि इस्लामची चिकित्सा करण्याचा नैतिक अधिकार आहे . पिके सिनेमातला हास्यास्पद शंकर योग्य आणि मुहम्मदाचे फ्रेंच कार्टुन अयोग्य हा कोणता उफराटा बुद्धिवाद ? इस्लामची चिकित्सा करण्याची परंपरा भारतीय बुद्धीवाद्यात आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर , कुरुंदकर , शहा , दलवाई या आधुनिक विचारवंतानि इस्लामची कठोर चिकित्सा केलेली दिसते . सध्या हि परंपरा खंडित झालेली दिसते . 

बहुसांस्कृतिक वाद आणि परधर्म सहिष्णुतेचे गोंडस बुरखे घेऊन कधी कन्हैय्या कंपूची तरफदारी कधी चार्ली हेब्दोचा विरोध भारतीय बुद्धिमंतानि चालवलेला दिसतो . व्यंगचित्र ते पण इस्लामच्या प्रेषिताच … काश्मीर चे वास्तव कधी तुम्ही समजून घेतले आहे काय ?

------------------------------------
तुमच्या मानवता वादि मागणी नुसार तिथे सार्वमत घेतले तर ? परिणाम काय होतील ?

भारत कश्मीरात सार्वमत का घेत नाही ? या प्रश्नाचे उत्तर त्याला या सार्वमताचा निकाल काय लागेल ?हे आधीच माहिती आहे यात दडलेले आहे ..सार्वमताचा निकाल तिथे काय लागेल? त्यातून पुढे काय होऊ शकते? त्याचे उर्वरित भारतावर काय परिणाम होतील? याचे योग्य आकलन नेहरु व तत्कालीन नेते यांना झाल्यामुळे त्यांनी ते घेण्यास नेहमीच टाळाटाळ केलेली आहे ..

भारतातील उर्वरित मुस्लीमांच्या हितासाठी शेख अब्दुलांने सार्वमताची मागणी सोडून द्यावी असा निरोपही नेहरुंनी एका सैन्यअधिकार्यामार्फत अब्दुला यांच्या कडे पाठवला होता ..कारण असे सार्वमत झालेच तर जम्मू मधील हिंदू,लडाख मधील बौद्ध तर भारताच्या बाजूने कौल देतील पण घाटीतील मुस्लीम हे पाकिस्तानकडे जाण्याचा कौल देतील..हे त्यांना कळत होते..अशा परिस्थितीत सार्वमत जर फुटीरवादी व पाकिस्तानवाद्यांनी जिंकले तर त्याचे परिणाम उर्वरित भारतातील मुस्लीम लोकांना भोगावे लागतील याची राजकीय दृष्टिकोनातून जागरुक असलेल्या कुणासही सहज कल्पना येईल...

एका फाळणीनंतरच त्यांच्या देशप्रेमाविषयी आजही शंका घेतली जाते..तिथे कश्मीरात अजून हेच घडल्यानंतर काय होईल? याची कल्पनाही करवत नाही ...भारतात आराजक माजेल..त्यापासून कुणीही वाचनार नाहीत ..त्यामुळे देशाच्या एका छोट्याशा भागातील आराजक मानवतावाद मिरविण्यासाठी सर्व भारतात पसरविणे शहाणपणाचे व देशहिताचेही नाही ... (शिवराज दत्तगोन्डे)
------------------------------------------------

जमाते इस्लामीशी सुसंगत भूमिका घेणार्या सेक्युलरांना आपण का हरतो आहोत हे समजणार नाहीच ! अल्लाहनेच त्यांच्या बुद्धीवर सील ठोकले आहे !


 

७ जून, २०१६

प्रेमा तुझा गंध कसा ?


प्रेमा तुझा गंध कसा ?

स्त्रीयांना आकर्षून घेणारे परफ्युम असतात काय ? एक्स चा बॉडी स्प्रे मारला तर तुमच्या मागे अप्सरांचा थवा धावत येईल काय ? मोगरा आणि प्रणय याचा काय संबंध ? वात्सायनाच्या काम सूत्रात अनेक सुगंधी तेले आणि सुवासिक फुलांचे कामक्रीडेतील महत्व सांगितले आहे. ते  वाचले नसले तरी अनुभवी सज्जनांस सुगंधाची महती पुरती ज्ञात असणार. प्रस्तुत लेखात जीवशास्त्र आणी उत्क्रांती विज्ञान प्रेमाचा गंध कसा शोधते ते पहायचे आहे.

जो कोणी असा आकर्षक परफ्युम शोधून काढेल तो अब्जो करोडपती होईल - जगातले सर्व पुरुष त्या अत्तराचे  ग्राहक असतील ! आता आपण हा परफ्युम शोधून काढूया ….स्त्रियांना नेमका कोणता वास आवडतो ? उद्दीपित करतो ? त्यावर सखोल संशोधन झालेले आहे . तिथपर्यंत जाण्या आधी आपण थोडे जीवशास्त्र हसत खेळत समजून घेऊ. खुर्चीत मस्त रेलून बसा . एक कप चहा मागवा ….

अनेक प्राण्यात फ़ेरोमोन्स असतात हे आपल्याला ठाउक आहे . फ़ेरोमोन्स म्हणजे विशिष्ट वास - गंध निर्माण करणारी हार्मोन -  द्रव्ये. फुलातील असे  (फ़ेरोमोन्स) प्रेमगंध म्हणजे त्यांचा सुवास . उदाहरणार्थ आंब्याचा मोहोर सुवासिक असतो .  या सुवासा मुळे मधमाशा किंवा इतर किडे त्या फुलांकडे आकर्षित होतात. मध खाताना त्यांच्या पायाला परागकण (पुरूषबीज ) लागतात … माशा दुसर्या फुलावर बसल्या की त्यांच्या पायाला लागलेले  पराग त्या  फुलाच्या स्त्री बीजा पर्यंत पोचतात - मीलन झाले -  झाला मग रसाळ आंबा तयार ! म्हणजे फुलाचा सुवास हा त्याला पुनरुत्पादन करण्यास मदत करतो.


पण केवळ फुलेच नव्हे तर फुलपाखरे सुद्धा असे फ़ेरोमोन्स - प्रेमगंध तयार करत असल्याचे दिसून आले आहे. पुरुष पाखरू आपल्या मिशांवर प्रेमगंध तयार करतो  आणि स्त्री फुलपाखरा च्या एंटीना वर आपल्या मिशा घासून मेसेज पोचवतो  - मुलाच्या मिशा आणि मिशांचा प्रेमगंध पसंद पडला तर मग शुभमंगल सावधान ! फुलपाखरातील  वधू पक्षाला फार लांबचा वास घेता येत नसल्याने- नराला पोरगी पटेस्तोवर   (अनेक ठिकाणी )  मिशा घासायचे कष्ट उचलावे लागतात.  पण काही सूरवंट , साप आणि बेडुक हे -- फुलपाखरा पेक्षा अधिक भाग्यवान आहेत. त्याच्या फ़ेरोमोन्स चा प्रेमगंध दूर दूर पर्यंत जाऊ शकतो.उंदिर जमात या फ़ेरोमोन्स प्रकरणात फारच प्रगत आहे. केवळ प्रेमगंधच नाही तर त्यांच्या जमातीत  भिती युक्त  गंध सुद्धा आढळून आलेले आहेत. याबद्दल विविध प्रयोग करण्यात आलेले आहेत.

 एक उंदिर मुद्दाम घाबरवायचा मग त्याला इतर न घाबरलेल्या उंदरांच्या पिंजर्यात टाकायचे . इतर उंदिर आपोआप घाबरतात आणि एक्साइट होऊन थयथयाट करू लागतात . घाबरलेला उंदिर एक भितिगंध हवेत सोडत असतो - तो गंध ज्या रसायनामुळे तयार होतो ते रसायन (4-methylpentanal and hexanal ) शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे आहे. (१) आता घाबरलेल्या उंदराची गरज नाही. नुसते ते रसायन हवेत फवारले तर प्रयोगशाळेतले  सारे उंदिर भीतीने थयथयाट करतात.

उंदिर मामांकडे अजून एक भारी फेरोमोन आहे. लहान वयाच्या उंदिर कन्यांच्या अश्रूत हे गंधद्रव्य असते .
मै तो अभी  बच्ची हूं । असे सांगणारे हे गंधद्रव्य आहे. त्याचा वास आला की  उंदिर मामा लहान उंदिर कन्ये वर वाईट नजर टाकत नाही - नव्या माम्या शोधतो !प्रेमगंधाचि देणगी किडे , पाखरे , पक्षी , बेडुक , उंदिर अशा निम्न स्तरीय प्राण्या पुरती मर्यादित नाही. सस्तन प्राण्यातले प्रेमगंध सुद्धा मिळाले आहेत.  दाढीधारी मस्तवाल बोकड एक विशिष्ट प्रकारचा प्रेमगंध तयार करत असतो  . बोकडाची ताकद आणि त्याचे तरुण वय याच्याशी हा प्रेमगंध संबंधित आहे. या प्रेमगंधाचि तीव्रता शेळीला लगेच जाणवते . नुसती जाणवते असे नाही तर मिस शेळीच्या जननेंद्रियाना उद्दीपित करणारी रसायने मेंदुतुन स्त्रवू लागतात - असे सिद्ध झाले आहे. हा प्रेमगंध बहरला की मग शुभमंगल सावधान ! (२)बाबा बोकड आपल्या कातडीतून हा मर्दानी प्रेमगंध सोडत असतो . शेळी ताईच्या नाकात तो वास शिरतो . मग नाकातले वासाचे सेन्सर एक्साइट होतात . हे उद्दीपीत सेन्सर म्हणजेच रिसेप्टार - (नर्व्ह)  नसांशी जोडलेले असतात . या नसा शेळीच्या मेंदुतल्या ओल्फ़्याक्ट्रि लोबला म्हणजेच वासाच्या विभागाला  जोडलेल्या असतात. शेळी ताइंच्या नाकातला वास अशाप्रकारे मेंदुतला वासाचा  भाग चेतवतो - हा भाग मग मेंदूतील इतर लैंगिक विभागांना पेटवतो - असे झाले की  शेळी पक्षाकडुन मधुचंद्रास परवानगी मिळते.

उत्क्रांती शास्त्रातील महत्वाची संकल्पना : निवड (सिलेक्षन) 

इथेच आपल्याला एक महत्वाची संकल्पना समजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर माणसाच्या  प्रेमगंधात नाक खुपसायचे आहे. ती संकल्पना  म्हणजे सर्व बोकड सारख्याच तीव्रतेचे मर्दानी गंध तयार करतील याची खात्री नाही . वासाची तीव्रता मोजण्यासाठी ऑडर युनिट हे एकक वापरतात . हे एकक मिथेन वायुला क्यालिब्रेट केलेले असते . (त्याबद्दल नंतर कधीतरी )

तर समाजा पहिला बोकड ५ ऑडर युनिट इतका मर्दानी वास तयार करतो , दुसरा बोकड १० युनिट आणि तिसरा १०० ऑडर युनिट इतका मर्दानी सुगंध तयार करू शकतो . असे बदल निसर्गात कायम होत असतात .
अतीनील किरणे, काही रसायने, काही विषाणू ,जीवाणू यामुळे बोकडाच्या (आणि सर्व सजीवांच्या ) डी एन ए मध्ये थोडे बहुत बदल (म्युटेशन ) दर पिढीत होतात . त्यामुळे वैविध्य हा जीवसृष्टीचा पहिला नियम आहे . अनियमितता  रैंण्डम आचार  आणि विविधता हि कोणत्याही हेतू शिवाय घडत असते . त्यामुळेच ५, १० आणि १०० असे वेगवेगळ्या तीव्रतेचे मर्दानी वास धारण करणारे बोकड तयार होतात .

जे बदल (म्युटेशन ) बोकडाबाबत खरे आहे तेच शेळी  बाबत हि खरे आहे . काही शेळ्यांना १०० युनिट वाले दणदणीत बोकड आवडणार - काही शेळ्या नाक मुरडत म्हणतिल "श्शी बाई कसला हा उग्र वास ?" आमचे ५ युनिट वाले  "हे"  कसे मंद मंद महकतात ! शेळी  शेळीची  वेगवेगळी आवड !

 रैंण्डम नेस - अनियमित पणा  हा जीवसृष्टीचा महत्वाचा  नियम आहे . 

बोकड बाबा आणि शेळिताइ या दोघांच्या  डी एन ए मध्ये असे अनियमित बदल सतत घडत राहणार . बोकडाला बोकडिण पटत राहणार …….  एक मिनिट आता दुसरा नियम !

जीवसृष्टी हा निसर्गाचाच एक भाग आहे.  निसर्गही अनियमित आहे . निसर्गात वादळे आहेत पूर आहेत दुष्काळ आहेत …. याचा बोकड समाजावर गंभीर परिणाम होणार आहे.

रैंण्डम नेस - अनियमित पणा हा निसर्गाचा सुद्धा नियम आहे . अनियमितता हाच नियम . 


आता कल्पना करा :-
  • समजा बोकडाचा वास आणी त्याची तब्येत याचा घनिष्ट संबंध आहे . १०० युनिट वास वाले बोकड धष्ट  पुष्ट माजलेले असणार आणि  ५ युनिट वाले हडकुळे असणार . 
  • दोघांची लाग्ने  जमत आहेत कारण शेळ्यांना सुद्धा स्वत:च्या  विविध आवडी निवडी  आहेत. 
  • बोकड राष्ट्रात सिंहाची संख्या वाढली तर ? आणि बोकड राष्ट्रात दुष्काळ पडला तर ? दोन्ही शक्यतात काय होऊ शकेल ? याचा आपण विचार करायचा आहे . 
-------------------

शक्यता पहिली : मत्स्य न्याय 


जर बोकड राष्ट्रात सिहांची संख्या वाढली तर दुबळे आणि हडकुळे बोकड लवकर मारतील . कारण त्यांना सिंहापासुन पळून जाता येणार नाही . शक्तिवान बोकड पाळण्यात अधिक भारी आहेत . त्यामुळे ते वाचायची शक्यता अधिक आहे . सबब १०० युनिट वास वाले तगडे मर्दानी बोकड जगतील आणि दुबळे बोकड मारून जातील .
 मंद वासाचे बोकड आवडणार्या शेळ्यांची स्थळे जुळणार नाहीत . सबब मंद वास वाले बोकड आणि त्यांच्या चाहत्या शेळ्या - प्रजनन थांबल्याने नष्ट होणार आहेत .
 बळी तो कान पिळी -  मोठा मासा लहान माशा खाई असा हा मत्स्य न्याय होय  . पण याच्या अगदी उलट दुसरी शक्यता आहे . आणि तीच अधिक प्रभावी आहे . 


शक्यता दुसरी : अनुरूप न्याय 

डास आणी डायनोसोर एकाच काळातले सजीव . डायनोसोर मेले -  डास जगले ! शक्तिवान कोण होते ?

 ज्वालामुखीच्या विस्तवात स्नायूची शक्ती  कामाची  नाही. तिथे डासाचे लहानपण देगा देवा - मला उडत ठेवा  अधिक कामाला  येत असते !


 

डास आणि डायनोसोर एकाच काळातील फ़ोसिल - अश्मीभूत स्तरात मिळतात . 

समजा बोकड राष्ट्रात दुष्काळ पडला . धष्ट पुष्ट बोकडाना भरपूर खायला लागते . त्यामुळे दुष्काळात ते प्रथम मरतील . याउलट कमी अन्नावर जगण्याची क्षमता  लुकड्या बोकडा जवळ आहे ! त्यामुळे दुष्काळी भागात दुबळे ५ युनिट वाले बोकड जगणार त्यांचा वंश वाढणार ….

आम्हाला शंभर युनिट वासाचाच बोकड पाहिजे  असा हट्ट धरणाऱ्या शेळ्या कुमारिका राहणार आहेत. आणि दुष्काळात दुबळ्यांचे राज्य येणार आहे.

याचा अर्थ असा कि

  • जीवशास्त्र आणि निसर्ग दोघेही अनियमित आहेत . 
  • दोन अनियमिततांचा संघर्ष झाला कि    नियोजित वाटणारे अनियमित निकाल लागतात 
  • त्यामुळे दर वेळी जगायला अनुरूप कोण ? हे बदलत राहते.   

सर्व्हायव्हल ऑफ द फ़िटेस्ट चा अर्थ असा आहे की , जो सर्व्हाइव्ह होतो त्याला फीट म्हणायचे असते .  

जो जगतो तो त्या परीस्थीतीला  अनुरूप असतो . आता बोकड प्रेमाचे काय ?

परिस्थिती जशी बदलेल तसे बोकड प्रेम बदलणार आहे. दुष्काळात ५ युनिट वाल्या शेळ्यांची चंगळ असली तरी सिंह वाढले तर मात्र लैंगिक उपासमार होणार आहे . १०० वाल्यांनाहि कधीतरी अशी परिस्थिती येइलच !

 निसर्गात सतत बदल होत असतात तसे शेळ्यांचा डीएनए मध्ये सुद्धा होतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. अनियमितता हाच नियम . बदल हेच सूत्र .  आता काही शेळ्या अशाही तयार होणार आहेत कि ज्यांना ५ ते ५०० युनिट यापैकी कोणताही वास असलेला बोकड चालतो ! त्यांची लैंगिक उपासमार कधीही होणार नाही .

 वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत हजारो पिढ्यात मला  अमुकच बोकडोबा हवा म्हणणार्या शेळ्या नामशेष होणार आहेत. कारण त्यांना लगीन नाही - हानिमून नाही - पोरे पण नाही - तो युनिट  हटवादी गुण पुढच्या पिढीत जाणारच नाही .

५ ते ५०० अशा कोणत्याहि रेंज चा बोकड आपला म्हणणाऱ्या शेळ्या जगणार वाढणार बहरणार!


-----------------------------------------------------------------------------------------------
 इथे एक लक्षात घेतले पाहिजे कि आपण फक्त तार्किक शक्यतांचि चर्चा करत आहोत .  नैसर्गिक प्रक्रीया  अधिक गुंतागुंतिच्या असतात . पण  त्याचे तर्कशास्त्र असेच असते
-----------------------------------------------------------------------------------------------

आता माणसाचे काय ? 

दुर्दैवाने माणसातली फ़ेरोमोन्स अजून तरी मिळालेली नाहीत. मिळणे अवघड सुद्धा आहे. कारण मानवी मेंदूतील वासाचा विभाग फारच लहान आहे. त्यात चेतना कमी आहे . इतर प्राण्यात तो भाग बराच अधिक विकसित असतो. पण इतक्यात निराश व्हायचे कारण नाही . एका  अचाट प्रयोगाची माहिती आपण घेणार आहोत .

पोलिसाचे कुत्रे वासावरून माणुस ओळखते हे तुम्हाला माहित आहे . याचाच अर्थ असा कि प्रत्येक माणसाला स्वत:चा असा एक विशिष्ट वास असतो. हा वास का असतो ? ते प्रथम जाणुन घेऊया - मग स्त्रियांना कोणते पुरुष आवडतात ते लगेचच लक्षात येईल .

माणसाचा गंध हा मुख्यत: त्याच्या घामाला येणारा वास आहे . आपल्या त्वचेवर बारीक बारीक केस असतात . कोणी अनिल कपूर असेल तर त्याला लैच केस असतात . हा केस जिथे त्वचेतून उगवतो . त्याच्या मुळाशी घाम तयार करणारी ग्रंथि असते .

पण या ग्रंथितुन शुद्ध पाणि बाहेर निघते . काही क्षार आणि पाणि बस्स ! मग प्रत्येकाच्या घामाचा वास वेगळा का ? उत्तर सोपे आहे . हा वास घामाचा नसून त्या घामात जे लहान लाहान जीवाणू (Bacteria) राहतात त्यांच्या उत्सर्जनाचा आहे . पण प्रत्येक माणसाच्या शरीरावर वेगवेगळे जीवाणू राहतात - त्यामुळे प्रत्येकाचा वास वेगळा असतो . आता हा अन्याव का म्हणून ?  सगळ्या माणसांचा घाम सारखा असला तरी त्यात वेगळे जीवाणू का ? त्यामुळे प्रत्येकाला वेगळा वास का ?


तुमच्या त्वचेवर कोणते जीवाणू राहतात ?

आपल्या त्वचेवर जे जीवाणू जगू शकतात ते तिथे राहतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती ज्यांना जगू देते ते जीवाणू तिथे राहतात . माणसाला दोन प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती असते . एक अनुभवाने शरीर शिकते ती (Acquired) आणि दुसरी (Innate) जन्म सिद्ध रोगप्रतिकारक शक्ती. हि जन्म सिद्ध रोग प्रतिकार शक्ती आनुवंशिक आहे . आणि मानवी त्वचेवर हि रोग प्रतिकार शक्ती असते . आपल्या डी एन ए मधला  एक महत्वाचा  कोड  ( MHC) हि जन्मजात रोग प्रतिकार शक्ती ठरवत असतो . त्या ( MHC) गुणसुत्रा नुसार रोगप्रतिकार शक्ती ठरते . त्यावर  त्वचेवरील जीवाणूची जात ठरते - आणि त्यानुसार माणसाचा वास ठरतो . अशाप्रकारे पुरुषाच्या वासाचा थेट संबंध त्याच्या जेनेटिक रोगप्रतिकार शक्तीशी आहे . 


घाम - प्रेम आणि प्रयोग 

१९९५ साली क्लोस वेडिकेण्ड  (Claus Wedekind) या स्विस शास्त्रज्ञाने एक अफलातून प्रयोग केला . (३,४) त्याने पन्नास फुटबॉल पटुंचे शर्ट मागवले . घामाने ओलेचिंब झालेले शर्ट . आणि मग त्याने काही तरुण स्त्रियांना बोलावले . आणि विचारले तुम्हाला कोणता टी  शर्ट  वाला आवडेल ?

गंमत अशी की , तो फुटबॉल पटू दिसतो कसा ? त्याचा रंग काय ? वंश काय ? याची कोणतीच माहिती त्या तरुण स्त्रियांना नव्हती . त्यांनी फक्त शर्ट च्या  वासावरून आपली निवड ठरवायची होती.

या प्रयोगातून अतिशय धक्कादायक निष्कर्ष हाती आले . 

प्रेमा तुझा गंध कसा ? एखाद्या स्त्रीला कोणता पुरुष आवडतो ? हे फार कोड्यात टाकणारे कोडे आहे ! लावण्यवती , अतिशय बुद्धिमान आणि सुंदर स्त्रियांनी बावळट आणि माकड चाप लेच्या पेच्या पुरुषांशी प्रेम - विवाह केल्याचे आपण सर्वानीच पाहिले असणार … तिने त्याच्यात काय पाहिले ?   एकुणात जीवाशास्त्राने त्याचे सहज साधे आणि सोपे उत्तर शोधले आहे … स्त्रिया प्रेमाची परिक्षा कशी करतात ?   - प्रेमा तुझा गंध कसा ?


प्रेमा तुझा गंध असा - 

आपले भाऊ वडिल आणि जवळचे नातेवाइक यांचे  टी  शर्ट  स्त्रियांनी नाकारले . आणि स्वत:च्या (MHC) गुणसुत्राहुन भिन्न असे टी  शर्ट धारी पुरुष त्यांना  आवडले . त्यांचे टी  शर्ट आकर्षक सुवासाचे आहेत असे उत्तर त्या तरुण स्त्रियांनी  दिले ! शास्त्रीय कारण अगदी उघड आहे .

आपले होणारे बाळ अधिक जगावे अशी कोणत्याहि आईची इच्छा असतेच . लाखो  वर्षाच्या उत्क्रांतीत अशाच स्त्रिया जगल्या आहेत ज्या  उत्तम रोग प्रतिकार शक्ती असलेल्या बाळाला जन्म देतात . त्यासाठी त्याना स्वत:हून वेगळी अशी जास्तीची रोग प्रतिकार शक्ती बाळाला द्यायची असते . जवळच्या नातेवाइकाशि लग्न केले तर आइपेक्षा वेगळी रोगप्रतिकार शक्ती कशी मिळणार ? आणि ज्या जवळच्या नातेवाइकाशि लग्न करणारी गुणसुत्रे बाळगतात त्या उत्क्रांतीत सिलेक्ट होणार नाही . त्यांचा वंश टिकणार नाहि.

त्यामुळे ज्या स्त्रियांना स्वत: हून दूरच्या जेनेटिक पुरुषाला हुंगता येते - त्या उत्क्रांतीत सिलेक्ट झाल्या आहेत . त्यांचीच बाळे जगली आहेत . आंतरजातीय विवाह करणे हि स्त्री ची जेनेटिक ओढ आहे हे लक्षात घ्या . त्यातून त्यांच्या बाळास अधिकचि इम्युनिटि असणारी गुणसुत्रे मिळणार आहेत.


प्रेमाचा गंध हा असा आहे . घामाचा वास - वासातले जीवाणू - त्यामागची वेगळी रोग प्रतिकारशक्ती - आणि  बाळाची-  जगण्याची  जास्तीची  शक्यता - मनुष्यमात्राच्या हजारो पिढ्यात प्रेमाला असा गंध गवसला आहे . सिलेक्ट झाला आहे.

शेळ्यांना बोकड गवसले तसाच ! स्वत:हून भिन्न  रोगप्रतिकार शक्तीचा पुरुष स्त्रियांना आवडणार आहे . ते स्त्रिया वासावरून ठरवणार आहेत . आपण सांस्कृतिक कारणे दाखवत हि नैसर्गिक उबळ मारून टाकतो …  आता कोणाला एक्स परफ्युम मारून नैसर्गिक आकर्षण असणारा वास ठार मारायचा असेल तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे ----- पण त्यामागे हि एक वैज्ञानिक  कारण आहे.

पुरुषाला अत्तर लावून नैसर्गिक वास लपवून - स्त्रीची जैविक दिशाभूल करता येते आणि आपल्या इतर गुणांवर तिला पटवता येते ! बाकी स्त्रिया त्यांचा हुंगायचा  उद्योग सोडणार नाहीत पुरुष त्यांचा लपवायचा  उद्योग सोडणार नाही . स्त्रियांचे परफ्युम मंद वासाचे असतात …… याउलट पुरुषांना वास लपवायला उग्र  अत्तरे लागतात - जगाच्या पाठीवर कुठेही अत्तराचा क्रम हाच आहे - आणि प्रेमाचा गंधहि असाच आहे !


संदर्भ

-----------------------------------------------------------------------

१) http://www.asianscientist.com/2015/01/in-the-lab/scent-anxiety/
२) http://www.u-tokyo.ac.jp/en/utokyo-research/research-news/discovery-of-male-effect-pheromone-in-mammals/
३) https://en.wikipedia.org/wiki/Claus_Wedekind
४) http://www.pbs.org/wgbh/evolution/library/01/6/l_016_08.html
५) http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-3451532/Dating-app-matches-SMELL-Service-analyses-sweaty-t-shirts-people-like-scent-not-showering.html

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *