ललित - विनोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित - विनोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२ मे, २०१४

समस्त लग्नाळु तरुण बंडू आणि बबलिसाठि कानमंत्र

समस्त लग्नाळु तरुण बंडू आणि बबलिसाठि कानमंत्र 



लग्ने न जमणे आणि जमली तर फार उशिरा जमणे हा एक कॉमन प्रोब्लेम झाला आहे. परवा चेन्नैला आमची एक वय वर्षे तीस वर्षाची जुनी मैत्रिण भेटली . अजून लग्न झालेले नाही . मी यकदम विचारले का ग ? मुद्दा असा कि ती गेल्या जवळ जवळ ८ ते १० वर्षापासून मुलगे पाहत आहे . पण लग्न जमत नाही . शिक्षणाने डोक्टर , आर्थिक द्रुश्ट्या उत्तम स्वयं पुर्ण , दिसायला बरी तरीही नाही जमत लग्न … मी विचारल का ग ?

तर म्हणे… कोणि पोट्टा क्लिक झाला नाही ना ! यश राज चोप्रा , शारुख खान आणि कोई ना कोई … कही ना कही। हर किसीके लिये बना है । ला साष्टांग दंडवत…. पण हे क्लिक होणे म्हणजे काय ? हृदयाने हृदयाला आणि हार्मोनने हार्मोनाला - जीवशास्त्रीय संप्रेराकाने घातलेली साद म्हणजे क्लिक ! हि जीवशास्त्राची हाक आहे पुनरुत्पादनासाठी …

जगातली दोनच खरी नाती … दोनच खर्या जाती म्हणजे …. स्त्री आणि पुरुष ! मग मी तिला विज्ञान आणि संख्याशास्त्र पुन्हा समजावून सांगू लागलो …










परतीच्या विमान प्रवासात एक जुना खास बुद्धिमान मित्र बरोबर होता त्याच्याशी मन मोकळेपणे गप्पा हाणायला गेल्या कित्येक महिन्यात मोकळा वेळच नव्हता मिळाला …. तो हि अविवाहित वय वर्ष ३२ …. सध्या उत्तम… आर्थिक द्रुश्ट्या सुस्थापित… दिसायलाही बरा … पण लग्न नाही केलेले … त्याच्या बौद्धिक अभिरुचीशी सुसंगत अशी बायको न मिळणे हि त्याची तक्रार होती … लग्न करण्या आधी विचार जुळले पाहिजेत हा हेका … मी विचारले विचार जुळणे म्हणजे काय ? मग मी त्याला विज्ञान आणि संख्याशास्त्र पुन्हा समजावून सांगू लागलो ……

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आमचे एक दूरचे चुलत मावस बंधू सध्या फ़्रस्ट्रेट झाले आहेत . वय वर्षे ३६ . आत्ताच फोनवर त्याच्याशी बोललो . म्हटला ना माझा एरेंज मेरेज जमला ना लव्ह मेरेज …. आता काय पुढे ? मग मी त्याला विज्ञान आणि संख्याशास्त्र पुन्हा समजावून सांगू लागलो ……
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुद्दा फकस्त लोजिकचा आणि स्टेटीक्स - संख्याशास्त्राचा आहे . लव्ह आणि एरेंज आणि बौद्धिक मेरेज एकाच वेळेला करायचे आहे . सगळ्याच लग्नाळू बंटी आणि बबलिचा हा मुद्दा त्याना अविवाहित ठेवतो आहे .










बर आता थोडसे संख्याशास्त्राविषयी बोलूयात . समजा तुम्हाला प्रेम विवाह करायचा आहे . तर पहिली अट अशी प्रेम उत्पन्न झाले पाहिजे . प्रेमात हार्मोन आहे तेस्तोस्तेरोन , इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्तेरोन नावाच्या स्त्री - पुरुष हार्मोनाची नाळ, वेळ आणि उद्दिपनाचा काळ जुळाला कि प्रेम होते. या दोन्ही बाजूच्या हार्मोनच्या एकत्रित उद्दिपानाची शक्यता किती ? बर ते जीवशास्त्र गेल तेल लावत ! मला एक सांगा प्रेम बसणे हि एक सिलेक्षन ची क्रिया आहे . इथे कोई ना कोई … कही ना कही। हर किसीके लिये बना है । मग त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीवर प्रेम बसू शकत नाही . कमीत कमी … दहातली एक व्यक्ती प्रेमासाठी योग्य वाटते ।

म्हणजे स्टेटीक्स - संख्याशास्त्रा नुसार प्रेमात पडायची शक्यता दहात एक ! पण प्रेम फक्त तुला वाटुन उपयोग नाही ... तिलाही वाटले पाहिजे !!

बरे हे प्रेम दोन्ही बाजूने झाले पाहिजे … स्त्री पुरुष अशा दोन्ही बाजूनी विचार केला तर या दोन्ही शक्यतांचा गुणाकार करावा लागतो. प्रत्येक पुरुषाला दहातल्या एका स्त्री विषयी प्रेम वाढणार आणि प्रत्येक स्त्री ला दहात्ला एकच पुरुष स्वप्नातला राजकुमार वाटणार .

प्रेम हि दोन्ही बाजूनी घडणारी क्रिया असल्याने १० गुणिले १० = १०० … १०० शक्यतातून एकदाच दोन व्यक्तींचे प्रेम जुळू शकते . म्हण्जे १०० मध्ये एक हा भिन्नलिंगी प्रेमाचा संख्याशास्त्रीय गुणक आहे .





  







बरे एरेंज मेरेजाचे काय ? एरेंज मेरेज च्या अटी कोणत्या ?

१) त्यात जात जुळली पाहिजे .
२) सांपत्तिक स्थिती जुळली पाहिजे
३) शिक्षण जुळले पाहिजे
४) परत जोतीशी पत्रिका जुळली पाहिजे
५) उमेदवार आपल्याच गावातला असावा

आपण ह्या सगळ्या शक्यता दहात एक लग्नाळू लोकांच्या जुळतील असे गृहीत धरू . त्याही पाचही शक्यातात बसणारे उमेदवार किती ? भारतात जर १०० उम्मेदवार लग्नाळू असतील तर त्यात तुमच्या जातीत दहात एक यापुढे मजल जात नाही . सांपत्तिक स्थिती जुळणारे किती ? त्यात पुन्हा दहात एक हेच कमीत कमी गुणोत्तर घेऊ … उरलेल्या अटीत सुद्धा दहात एक यापुढे जात नाहीत . ५ गुणिले १० = ५०… पन्नास्सातला एक उमेदवार लग्नासाठी योग्य ठरेल . म्हणजे एरेंज मेरेजचा संख्याशास्त्रीय गुणक ५० मध्ये एक असा आहे .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बरे विचार जुळण्याचे काय ?

कोणत्याहि दोन व्यक्तींचे विचार तंतोतंत जुळू शकत नाहीत , पण आपण सोयीसाठी दहात एक व्यक्तीचे विचार जुळतात असे गृहीत धरू मग … विचार जुळून लग्न करण्याचा योग दाहात एक असा होईल .

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता मुद्दा असा आहे कि आई वडिलांनी (एरेंज मेरेज) निवडलेला उमेदवार क्लिक झाला ( प्रेम विवाह) कि मग त्याच्याशी विचार जुळले पाहिजेत . लव्ह आणि एरेंज आणि बौद्धिक मेरेज एकाच वेळेला करायचे आहे .

संख्याशास्त्रानुसार १०० गुणिले ५० गुणिले १० = ५०००० उमेदवारातून एक उमेदवार तुम्हाला निवडायचा आहे . याचा साधा सरळ अर्थ असा कि या -एरेंज मेरेज । प्रेम विवाह । विचार विवाह असे तिन्ही एकाच वेळेला करायचे असेल तर पन्नास हजार उमेदवारांची छाननी करणे आवश्यक आहे …
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता त्यातला एकच करायचा कि त्यापैकी एकच अट घालायची ?एरेंज मेरेज? प्रेम विवाह? विचार विवाह ?? हे तुम्हीच ठरवायचे आहे . समस्त तरुण बंडू आणि बबलिसाठि कानमंत्र असा कि प्रेम करा आणि मजा करा …




१० मार्च, २०१४

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )


कारट्या ची शाळा एडमिशन .  (ललित लेख )


आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते.  आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु  केली . फार माहिती नेट  वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो .  शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ  पश्चिम येथील  एका प्रथित यश शाळेकडे काल  मोर्चा वळवला .




पूर्ण रस्ता भर आमची पत्नी पढवत होती . हो शाळेत प्रवेशासाठी इंटरव्हू असतो . त्याला तसे म्हणत नाहीत . पण एडमिशन साठी आई बाप पोर या तिघांनी येउन भेटायचे असते आणि शिक्षक मुलाला प्रश्न विचारतात आणि मुख्याध्यापक पालकाना विचारतात  . आमचा कार्टा तसा वाइच बडबड्या आणि चण्ट  आहे . गाणी , कविता सगळ्या तालात म्हणतो . ए टु झेड ,  एक ते दहा सगळे तोंडपाठ आहे . त्यामुळे आमची पत्नी पोराला पढवत नसून दस्तुरखुद्द आम्हालाच पढवत होती . निट  बोल उगीच वाद विवाद नकोत वगैरे . म्हणजे त्या पोराच्या शाळा एडमिशन वेळीही मी काही तात्विक खुसपट काढून शाळा मेनेजमेंट  शी वाद उकरून काढेन … इतका दुर्दम्य विश्वास आमच्याबद्दल तिकडून आहे . असो .


शेवटी एकदाचे त्या  शाळेत पोहोचलो .  तिथे एक रीसेप्शनिस्ट. बयेला विचारल शाळा आतून बघता येईल का ? अतिशय मंद असे प्रोफेशनल मंदस्मित करत तिने नकार दिला . मग विचारल बर फी किती ? (हा मुद्द्याचा प्रश्न ) . यु नीड टु गो थ्रू अवर एडमिशन फोर्म , फोर डीटेल्स . म्हटलं वोक्के . दे बाई तुझा फार्म . यु नीड तू पे एट द काउण्टर एण्ड कलेक्ट युर फोर्म फ्रोम देअर . बर बाई मग तू कशाला बसलीस इथे ? असो तर फोरम ची किंमत रुपये सहा हजार फक्त . च्यामारी आणि नाई पटली शाळा तर ? गेले का फुकट ? मग थोडा तात्विक वाद विवाद करून तिच्याकडून फी विषयी माहिती काढलीच . या विवाद्समयी आमचे कुटुंब आमच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत आहे असा भास झाला .  तर वर्षाची फी रुपये दोन लाख फक्त . हि मेडिकल वा इंजिनिअरइंग  ची फी नाही हो . बालवाडी शाळेची आहे . शेवटी आम्ही तिघेही विजयी मुद्रेने शाळेबाहेर पडलो तेंव्हा दोन लक्ष सहा सहस्त्र होन वाचवल्याचा आनंद आमच्या मुखमंडलांवर झळकत होता .





कालच्या अशा अनुभवांमुळे आज शाळा शोधताना फी हा मुद्दा प्रथम ठेवला आणि त्यातल्या त्यात स्वस्त अशी इण्टर्नेशनल शाळा हुडकून काढली. तरी फी साठ हजार वर्षाला . ठीक आहे म्हटलं होऊ दे खर्च . शिक्षणात तडजोड नको . मग  रविवारच्या भल्या पहाटे नौ वाजता उठून आमची तीक्कल नव्या शाळेचा इण्टरव्ह्यू देण्यासाठी निघाली . वाटेत अर्धांग यावेळी मात्र मुलाची उजळणी करून घेत  होते . ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणा पाहू असे उच्चारायचा अवकाश . आमचे पिल्लू स अभिनय गाणे सुरु करते आणि दहा पंधरा कविता नाचासकट म्हणून झाल्या कीच थांबते. एक ते दहा म्हण म्हटले कि एक ते वीस म्हणते . ए  2 झेड  तर ऐपाल , बोल , कॅट अशी उदाहरणे देत घडा घडा म्हणते . आमही दोन्हीही सुजाण पालकांनी अभिमानाने या आमच्या छोट्या बुद्धिमान सिंघम कडे प्रेमान पाहिलं .

आणि बाल सिंघम सकट नव्या शाळेत दाखल झालो . प्रशस्त शाळा . सर्व वर्ग एसी . रिसेप्शन सुद्धा एयर कंडीशन . आणि रखवालदार पण इंग्लिश बोलणारा . मग रिसेप्श्निस्ट ने हसून स्वागत केले . चार वर्षापूर्वीच उघडलेली नवी शाळा असल्याने--- गिर्हाइके हवी होती वाटत त्याना . चला कालच्या मानानं आज सुरवात बरी झाली होती . एकदम पॉश आणि भारी होती शाळा .  …. मग त्या सुंदर आणि हसतमुख रिसेप्शनिस्ट न सर्व माहिती सांगितली . प्लीज वेट फोर फ़ाइव्ह मिनिटस असे लाडीकपणे म्हटली  . चला म्हणजे पाच मिनिटातच इण्टर व्ह्यू सुरु होणार होता तर . एव्हढ्यातच-- आईच्या गावात-- आमच्या बाल  सिंगम ची सटकली. तो सोफ्यावर उभा राहिला आणि स्वत:ची चड्डी काढु लागला .


मी भर्रकन त्याची चड्डी पुन्हा वर केली आणि त्याला नजरेने दटावण्याचा व्यर्थ   प्रयत्न करू लागलो .  पण तो कसला ऐकतो ? मला हि चड्डी नको …. लाल वाली पायजेल … म्हणून त्यान भोकाड पसरला . रडण्याचे तार सप्तक सुरु जाहले . प्रत्येक आलाप पहिल्यापेक्षा चढ्या सुरात आणि मोठ्ठ्या आवाजात . परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले . मग त्यांच्या मातोश्रींनी एक धपाटा घातला . सिंघम ला हा अपमान फार जिव्हारी लागला असावा . त्याने रडे बंद केले . आणि स्वारी गाल फुगवून चिडून रुसून बसली .

मग मी बायको आणि रुसलेला बालक  असे तिघे . एका केबिनमध्ये दाखल झालो . स्वारी चिडक्या नजरेने मातोश्रींकडे पहात होती . शेट्टी पिता पुत्र हि शाळा चालवतात .  त्यापैकी हा पुत्र शेट्टी . तो शाळेचा एडमिन हेड म्हणे . त्याने सर्व कागदी सोपस्कार पार पाडले . पॉवर  पोइण्ट प्रेझेन्टेशन मध्ये शाळेची माहिती सांगितली . केंब्रीज युनिव्हर्सिटिचे प्रमाणपत्र दाखवले वगैरे . तर पुढचा मुद्दा असा होता कि मी फी भरणे  वगैरे सोपस्कार पार पाडायचे आणि आईने मुलाला घेऊन जायचे इंटरव्हू साठी . मी चेक बुक काढून सही करू लागलो . आणि सौ ने बाळाला उचलले . सिंघमाची पुन्हा सटकली … आई मारते मी नाई जाणार तिच्याबरोबर … बाबा तू घे … आणि त्याने बाबा बाबा बाबा बाबा चे तारसप्तक सुरु केले . तो बिचारा पुत्र शेट्टी पोराची समजूत काढायला त्याला पेन दाखवू लागला . कार्ट्याने पेन हिसकावले …. पुत्र शेट्टी च्या तोंडावर फेकून मारले …… आणि तार सप्तक खर्ज्यात नेत तो हट्टाने जमिनीवर झोपला . आता अजून तमाशा नको म्हणून मी त्याला उचलले …. आणि इंटरव्हू साठी नेले . कागदी सोपस्कार महिला दिनानिमित्त पत्नीला करावे लागले .


मी इंटरव्हू साठी सिंगम सकट एका सुस्वभावी शिक्षिकेसमोर उभा होतो . ती चाईल्ड साकोलोजी वगैरे शिकली होती म्हणे . अगदी गोड हसून ती सिंगम कडे पाहिले . त्याचा राग बराचसा निवळला असावा . रडला नाही अजिबात . मग तिने त्याला त्याच्या कलाने प्रश्न विचारायला सुरवात केली. व्होट इस युवर नेम ? स्वारी मक्ख ! आपण मुकबधीर असल्याप्रमाणे राजेंनी शून्यात नजर लावली . आणि ती बाई जणू पारदर्शक आहे असे समजून तिच्याकडे शून्यात पाहू लागला . मग तिने काय काय विचारले , प्राणि सांग , पक्षि सांग , बाबाच नाव सांग , इंग्लिश,  हिंदी,  मराठी अशा सर्व भाषेत विचारले . आमचे राजपुत्र ढिम्म बसलेले . चेहर्यावरची माशी हलत नव्हती . मग म्हणाली कविता म्हण , ट्विंकल ट्विंकल म्हण …. सिंघम ढिम्म ! एक शब्द बोलायला तय्यार नाही पट्ठ्या .


शेवटी कंटाळून ती निघून गेली . शाळा प्रवेश हुकलाच होता . पोराने साठ  हजारही वाचवले होते बहुतेक !. मी प्रेमाने आमच्या सुपुत्राकडे पाहिले . जशी ती बाहेर गेली तसा कार्टा बोलला मला गाणी म्हणायचीत . त्याला बकोट  धरून उचलला आणि टिचर्स रुम  मध्ये घेऊन गेलो . तिथे पट्ठ्या जो सुरु झाला ..... साग्रसंगीत गाणी आणि नाचासकट ! शेवटच्या नाच रे मोरा गाण्याला तर टिचर्स रूम चे टेबल खालून तबल्या सारखे वाजवून दाखवले .....  हुश्श ! शेवटी  या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अंत  झाला आणि मी विजयी मुद्रेने चिरंजीवांना कडेवर घेऊन बाहेर पडलो .

चला मुलाचे उज्ज्वल भविष्य आम्ही इंटरनेशनल शाळेत सुरक्षित केले होते. आता शेवटची भेट . ती म्हणजे शाळेचे ट्रस्टी पिता शेट्टी यांच्याशी . एकंदर माणूस सभ्य . आत जाण्याआधी पोराला लालूच दाखवली . गुड बोय सारखा वाग ह ! तुला चोकलेट देईन मी ! झाल … जसा पिता शेट्टिशि संवाद सुरु झाला तसा पोरान घोषा लावला । बाबा चोकलेट दे ना ! चोकेत दे !  शेट्टी अथवा मी एक जरी वाक्य बोललो -- कि हा चोकेतचा गजर !





शेट्टी ला सवय असावी तो दयार्द नजरेने पहात होता . मग शेट्टी शाळेत फकस्त इंटरनेशनल अभ्यासक्रम नाही आपली महान भारतीय संस्कृती वगैरे बोलू लागला . आमच्या पोराला संस्कृतीत फारसा इंटरेस्ट नसावा . त्याचे आपले चोकेत दे चे पालुपद सुरु होते. मग शेट्टी म्हणाला शाळेत नोंव्हेज चिकन मटन वगैरे आणायचे नाही . असा नियम आहे बरेच विद्यार्थी जैन आहेत वगैरे .  आमच्या पोराने चिकन हा शब्द जसा ऐकला तशी त्याची भुक जागृत झाली … त्याने चोकेत चा घोष बदलला . आई चिकन दे …चिकन दे….  चिकन दे …। नवा घोष सुरु केला .


इतका वेळ मोठ्या प्रयत्नाने दाबून ठेवलेले हसू भळ्ळ दिशि माझ्या थोबाडातुन बाहेर पडले . बायकोही फुटली - आम्ही दोघे खो खो हसू लागलो . आम्हाला हसताना पाहून सिंघम अजून जोराने खोटा नकली हसू लागला . शेट्टी पिता पुत्र आमच्या चक्रम तिक्कलिकडे आश्चर्याने पहात राहिले …।


२८ डिसें, २०१२

गुंठा मंत्र्यास पत्र लिहिणेस कारण की,




गुंठा मंत्र्यास पत्र लिहिणेस कारण की,






राजश्रिया विराजित, अखंडित लक्ष्मी अलंकृत, सकल राजकार्य धुरंधर, प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर, सकल गुणऐश्वर्यसंपन्न, मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ,सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न, राष्ट्रवादी विश्वासनिधि श्री श्री श्री भाउ यांस,

साष्टांग दंडवत,


पत्र लिहिणेस कारण की,

गेले काही दिवस आपली सुहास्य राष्ट्रवादी वदन भित्तिचित्रे पुण्यनगरीच्या कानाकोपर्‍यात झळकत आहेत. परंतु चित्रे पाहून आंम्हास भित्ती न वाटता अंमळ आनंद जाहला. पुण्यपत्तनास योग्य कारभारी मिळणार, मिळेल, मिळाला पाहिजे अशी चर्चा कैक दिवसांपासोन तारिके अहकामे सकाळगिरी मध्ये चालू होती. त्यामुळे पुण्यनगरीतील प्रत्येक चावडीवर आणी कित्येक ब्राह्मणभोजनातून कारभारी बदलाची गप्पाष्टके आणी खलबते चालू होती. आपल्या प्रकटनाने पुण्यनगरीची अवस्था अजि म्या ब्रह्म पाहिले ऐसी जाहली. पेशवाईचा सुवर्णकाळ पुन्हा येणार येणार ऐशी जोरदार चर्चा सुरू जाहली.


दुसर्‍या रावबाजीचा काळ ! काय तो वर्णावा ! मनगट बुडेल इतका भात पंगतीत वाढला जात असे. सकाळ सायंकाळ सोमरसाची आचमने चालत असत. नायकिणी, नाटकशाळा यांना उदार राजाश्रय असे. दक्षिणा गोळा करण्यासाठी दूर - दूर वरून ब्रह्मवृंद गोळा होत असे. टोपीकर आला आणी धर्म बुडाला. दक्षिणा मागावी तर लालतोंड्या टोपीकर म्हणतो कसा ? - फक्त विद्वान ब्रह्मणास दक्षिणा मिळेल. आता ब्राह्मण हा जन्मजात विद्वान अस्तोच ! हे त्या विलायती टोपीकरास कसे कळावे ? ब्राह्मणभोजने बंद झाली. पुण्यनगरीचा सत्यानाश झालान.





पुढे टोपीकर बुडाला. स्वकीयांचे राज्य आले. पुण्यपत्तन आनंदले. याव्वचंद्रदिवाकरौ नेहरूबाबाचे राज्य चालो ऐश्या गर्जना पेठा पेठातून घुमू लागल्या. पण चांडाळ नेहरू बिल्कूलच जातीला जागेना. स्वकीयांस ऐतखाउ म्हणू लागला. ब्राह्मणभोजनांस फुकट्चे देणार नाही म्हणून धिक्कारू लागला. त्यानंतर पुण्यनगरीची कळाच गेली. कोणी वाढपी झाला. कोणी कारकून झाला. कोणी दूरदेशी कळा बडवू लागला.

आज आपले ऐश्वर्य पाहिले; अन चौका चौकात उभे राहून ताम्बूलभक्षण करणारे पुण्यनगरीचे नवे राष्ट्रवादी कार्यकर्ते आनंदले. आपला राजबिंडा थाट आपल्या उमद्या स्वभावाची साक्ष देतो आहे. आपणास मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ऐसे म्हटले ते त्यामुळेच. पुण्यनगरीची सांस्क्रुतिक संम्मेलने काव्य - शास्त्र - विनोद, सध्या पान टपरी या राष्ट्रवादी संगमस्थानी भरतात. भाउ आज तेथे आपल्या उदार आश्रयाला जाण्याची भावना सध्या रंगते आहे. रिकामटेकड्या कार्यकर्त्यांस आपुल्याकडे सढळ हाताने राष्ट्रवादी दक्षिणा मिळते ऐसी वदंता आहे.






पुण्यपत्तनाच्या आसपास धाकले राजे दादा साहेब ( जे की मंत्री महाराष्टर राज्य); यांनी सोन्याचा नांगर फिरवला. जमिनीचे भाव वाढले. त्यास आज गुंठा मंत्री नामक गोमटी फळे आली आहेत. ह्या मंत्रीगणांनी सैन्य जमविण्यासाठी पुनश्च ढाबाभोजनांस सुरवात केली आहे. आता ऐतखाउंचे काही चालत नाही. चौका चौकात सांस्क्रुतिक संगमस्थानी जमून काव्य - शास्त्र - विनोद करणार्या सकल विद्यालंकृत कार्यकर्त्यांसाठी ढाबाभोजने राखिव आहेत. येथेच सकाळ सायंकाळ विलायती सोमरसाची आचमने चालतात. आणी जुन्या पेशवाईच्या आठवणींनी आमुचे डोळे पाणावतात.

सोमरसाच्या कैफात काही प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर कार्यकर्त्यांकडून तुरळक घटना घडतात, पण आपल्यासारख्यांचे न्यायशास्त्रसंपन्न आशिर्वाद असताना कुणाची भिती ?
आपणास पुण्यनगरीच्या नूतन जाणत्या राजाचे आशिर्वाद अवश्य मिळोत; दादामहाराजांची क्रुपा आपल्यावर अखंड राहो; पेशवाईचे दिवस पुन्हा येवोत ही विघ्नकर्त्या गणेशचरणी प्रार्थना.
आपला क्रुपाभिलाशी,


वैद्यबुवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *