चालू घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चालू घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४ फेब्रु, २०१५

अरविंद तुला खुले पत्र


तुझा एकेरी उल्लेख केला तरी समर्थक अंगावर येणार नाहीत असा तू पहिला मुख्यमंत्रि असशील … लोकांनी लई आशा लावल्यात तुझ्यावर … पण प्रेषित हि संकल्पना मला मान्य नाही . आणि राजकीय - सामाजिक चमत्कारावरही मी अंध विश्वास ठेवत नाही . तुझे लोकपाल मला समजलेले नाही आणि राइट टू रिकोल मला मान्य नाही . दर पाच वर्षांनी राईट टु रिकोल असतोच . त्याला निवडणूक म्हणतात . भारताच्या राजकीय बजबजपुरीत राईट टु रिकोल वेड्यासारखे वापरले जाइल आणि त्यावर अनावश्यक खर्चही होईल . असे सगळे असले तरीही तुझ्या दणकून निवडुन येण्यामुळे मला आनंदान भांगडा करावासा वाटला होता .
मुस्लिमांच्या धर्माला मान द्या आणि हिंदुनि पाच पन्नास पोरे पैदा कराच्या भम्पक राजकारणाला वैतागलो होतो. या सिनेमावर बंदि घाला , त्या पुस्तकान भावना दुखावल्या , आमच्या नेत्याचे स्मारक झालेच पाहिजे , अमुक गावाचे नामांतर झाले पाहिजे , देशीवाद आणि समाजवाद आणि शेक्युलरवाद आणि राष्ट्रवाद आणि भाषाद्वेष असल्या इझम - अस्मितांच्या चुत्यागीरीत……. लोकांच्या थपडा खात तू उभा राहिलास आणि अन्न , वीज पाण्याचे खरे राजकारण केलेस . आणि सप्पटुन जिंकुन आलास . दादा अरविंद या देशाच्या राजकारणाचा मनु बदलतो आहे . आता भारताची जनता लोकशाहीचे प्रयोग करणार आहे … त्याचा नवा मास्तर तू झालास .


आता दिल्ली विधान सभेत केजरीवाल मास्तरांची शाळा भरेल . पोरे भाभिंनि बनवलेले पराठे , दह्याचे रायते , कालि दाल आणि पाण्याच्या वाटरब्यागा घेऊन वर्गात उपस्थिती लावतील . हजेरी सक्तीची असेल . विरोधक नावाचा प्राणि शिल्लक न उरल्याने . विधान सभेत चर्चा होणार नाही. अरविंद मास्तरांची शाळा भरेल . त्याची सुरस आणि चमत्कारिक वर्णने ऐकण्यासाठी आतुर झालो आहे ….
या इथे फेसबुकावर ....बघ काही लोक तुला घटना विरोधी आणि दलितविरोधी म्हणत आहेत , काहिंच्या मते तू मुस्लिमांचा हस्तक आणि हिंदुंचा दुश्मन आहेस , काही तुला आर एस एस ची टिम बी आणि अल्प्संख्यविरोधि अराजकवादी म्हणत आहेत . …… तू नक्षल्वादी , पाकी आय एस आय चा हस्तक , हिंदु अतिरेकी सगळे काही आहेस अशा पोस्ट वेगवेगळ्या विचारसरणीचे कट्टर समर्थक फेसबुक - व्हाटस एप वर पसरवत आहेत . त्या समद्यांच्या नानाची टांग !
एकाच वेळी हिदुविरोधी , मुस्लिमांचे कर्दनकाळ , दलितांचे दुश्मन आणि ब्रिटिशांचे हस्तक होण्याचे महाभाग्य या आधी फक्त महात्मा गांधीना मिळाले होते रे । भाग्यवान आहेस तू … . बा अरविंदा भिड पट्ठ्या ! या देशात पहिल्यांदा हसरा माणुस मुख्यमंत्रि होतो आहे - ज्याची व्यक्तिष: कोणालाही कधी भीती वाटणार नाही ……… पण तुझ्या राजकीय वादळाने भल्या कट्टर इझम वाल्यांची दरदरून तंतरलि आहे . तुझी आंधळि भक्ती करणार नाही … पण तुझा द्वेष करणार्यांची दया येते …… अरविंदा कूच भला करो इस देस का …. अशा अमर आहे भावा !



आता जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला वंदन ! भारतीय लोकशाही केवळ आकारानेच मोठी आहे असे नाही . ती लवचिक आणि सामुहिक भान ( कलेक्टिव्ह कोन्शस / कनसेनसेस ) असणारी आहे …. सामुहिक भान निर्माण होणे -- इतक्या झटकन बदलणे -- कदाचित फ़ुडार्लेल्या युरोपियन राष्ट्रात हि घडणार नाही … यापुढे कधी भाजप निवडून येईल कधी आप कधी इतर कोणि …. विजय लोकशाहीचा हे निश्चित ! भारतीय नागरिकाला त्याच्या अधिकाराची आणि शक्तीची जाणिव करून देणार्या इलेक्ट्रोनिक आणि सोशल मिडियाचे हे उत्तुंग यश आहे . लोकशाहीच्या निर्मात्यांना आणि रक्षकांना विनम्र अभिवादन ! लोकशाही जगेल - अशीच सशक्त बनेल - तर भारत निश्चित महासत्ता बनेल .
यानिमित्ताने कॉंग्रेसचे दिल्लीत पुरते विसर्जन झाले . ते एक बरे झाले . म्हातारी मेली ! काळ धावायला स्वतंत्र झाला ! पुढची राष्ट्रीय निवडणुकही कदाचित आप विरुद्ध भाजपा अशी असेल . भाजपाच्या राष्ट्रवादी आणि विकास वादि हिदुत्वासमोर कोन्ग्रेस चितपट झाली . आता या प्रश्नावर अरविंदाला भूमिका घ्याव्या लागतील तरच राष्ट्रीय राजकारणात तो टिकेल .जामा मशिदीच्या शाही इमामाचा पाठिंबा नाकारून आप ने दमदार सुरवात केली आहे. भाजपाला अडचणीत आणण्यासाठी सनातनी साधू संत बाबा पुरेसे आहेत . या देशात पुन्हा एकदा सेक्युलारीझम ची चर्चा घडेल . या वेळी भाजपा समोर मुस्लिम मतपेटीत अडकलेली आणि सर्व धर्म लोचट कोन्ग्रेस नसेल .
सर्व भाजपविरोधी मतांचे केंद्रीकरण करताना कोंग्रेसच्या सर्व धर्म लोचट मार्गाने जायचे नाही हि सर्वंकष सर्कस आहे . यात तोल गेला तर आप्चा कपाळ मोक्ष ठरलेला आहे.



जे एन यु च्या इडियट डाव्या टोळक्याच्या नादाने कोन्ग्रेस ची पार वाताहात झाली . या पोथिनिश्ठ इझम वाल्या डाव्या टोळक्याहुन - आप चे योगेंन्द्र यादव अधिक मुरलेले आणि चाणाक्ष आहेत. भाजपाच्या थिंक टेंक समोर उद्या - तुल्यबळ नसला तरी - मातब्बर प्रतिस्पर्धी उभा राहणार आहे.
त्याचवेळी आपला अतिउत्साह आणि भिडाभिडिचि खुमखुमी ताब्यात ठेवून काही तरी सरकारी कामही करावे लागणार आहे . मागच्या वेळी आप पक्षाला काहीही सरकारी काम जमले नव्हते. आता दिल्लीकर बाबू ना एक माजी बाबू किती धक्क्याला लावू शकतो यावर आपचे भविष्य ठरेल . नरेंद्र मोदि त्यांच्या रिझल्ट ओरिएण्टेड कामासाठी प्रसिद्ध आहेत. महापालीकेसारखी सत्ता असणारी दिल्ली राजवट संभाळता संभाळता अरविंदाचि तुलना थेट प्रधानमंत्र्यांशि होईल . दिल्लीकर हिंदि - इंग्रजी प्रसार माध्यमे हा नवा प्रतीनायक उभा करतील . हि संधि आहे अणि अवघड परिक्षाहि . सध्याच्या परिस्थितीवरून पाच वर्षांनी आप हा राष्ट्रीय विरोधी पक्ष बनेल आणि कॉंग्रेसचे राष्ट्रव्यापी विसर्जन सुफळ संपुर्ण होईल असा अंदाज बांधता येतो . आपने टीव्हीवर चर्चा करायचे खूळ पाच वर्ष केले नाही आणि बाह्या दुमडून दिल्लीतले रस्ते वस्त्या ठिकठाक केल्या ……. तर …


१७ एप्रि, २०१४

नरेंद्र मोदि : सामान्य माणसांचा सामान्य नेता

 सामान्य माणसे 

मोदींना सामान्य माणसाने निवडून दिलेले आहे . मोदिना कोन्ग्रेस पेक्षा सात कोटि मते जास्त मिळाली आहेत . कोंग्रेस आघाडीच्या च्या दहा कोटि समोर भाजपाच्या आघाडीचा सतरा कोटींचा आकडा टरटरून फुगीर आहे. भाजपाला स्वत:ला हि अनपेक्षित असे संपूर्ण बहुमत मिळवुन देताना जुन्या वाजपेयी सरकारपेक्षा कोट्यावधि अधिक मते मोदिनी खेचून आणली आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपाची आघाडी २/३ बहुमतापासून फक्त २७ सिटान्नि दूर आहे. भाजपाचे हे कोटकल्याण कसे घडले ? असे कोट्यावधि मतदार कोणत्याहि रंगाचे नाहीत. समिक्षक विद्वानांचे जातीधर्माचे रंग इथे फिके पडले. ८१ कोटि मतदारांपैकी प्रत्यक्षात ५३ कोटींनी मतदान केले . त्यातले नोटा वाले , प्रादेशिक पक्ष वाले वगैरे बाजूला काढले तर सात कोटीचा विजय आणि सतरा कोटि मते हि आजच्या काळात दणदणित म्हणावीत अशीच आहेत . हि कोटीच्या कोटि मोदि उड्डाणे कशी घडली ? मोदि उत्तरेच्या सत्तेकडे कसे झेपावले ? कोट्यावधी सर्व सामान्य भारतीयाने मोदित काय पाहिले ?




मोदि महान नाहीत .


मोदि महान नाहीत . त्यांचा इतिहास बर्याच वेळेला चुकतो .सनावळी चुकते . समाजशास्त्र , पोस्ट मोर्ड्निझम आणि बाकीचे राज्यशास्त्र…. शिवाय त्याच्या आधुनिक परिभाषा मोदिना फारशा अवगत नाहित. त्याना साधे जातीचे राजकारणही फारसे समजत नाही. बर विकास म्हणाल तर तो थोडा बहुत आहे जरूर ........पण फारसा नेत्रदीपक वगैरे अजिबात काही नाही गुजरातेत..... . मोदिना सफाईदार इंग्लिश बोलता येत नाही . त्यांचे दिसणे जवाहरलाल नेहरु प्रमाणे राजबिंडे - रुबाबदार नाही . इंदिरा गांधी सारखा कामाचा झपाटा आणि नेत्रुत्व गुणही मोदीने अजून दाखवलेले नाहीत . . अटल बिहारी वाजपेयी प्रमाणे " झुलासाता जेठ मास । शरद चांदनी उदास । अंतर्घट रीत गया । एक बरस बीत गया । । " अशी तरल काव्य रचना मोदिना जमणे शक्य नाही . फार काय ? मनमोहन सिंग यासारखे अर्थ शास्त्राचे सखोल ज्ञानहि मोदींकडे अजिबात नाही . 



नरेंद्र मोदि हा एक अतिशय सामान्य माणुस आहे . 

मोदि विरोधक तिखट मिठ लावून सांगतात त्याप्रमाणे मोदि खाटिक नाहित. आणि समर्थक सांगतात त्याप्रमाणे जादुगार हि नाहीत . 

मोदि झोकून देऊन - घाम गाळून काम करतो . सुट्टी घेत नाही . स्वत:च्या विशिष्ट पुर्व् ग्रहा सकट सामान्य भारतीयाप्रमाणे देशावर प्रेम करतो . सामान्य माणसाप्रमाणे , मोदी मनापासून हसतो . कधी खोटे खोटे रडतो . त्याला राग येतो . मोदि द्वेष करतो . डूख धरतो. पाळत ठेवतो . सूड घेतो . मोदि बिनधास्त आहे . मोदि दिगविजयात इतर अनेक गोष्टी सहित त्यांच्या सर्व सामान्य व्यक्तिमत्वाचा मोठा सहभाग आहे. 

मोदि मुस्लिम टोपी नाकारतो . माफी - बाफी मागायला मोदि अति संवेदना शील नाहीत . मोदि विकास बोलतो . विरोधक हिंदुत्वाचे आरोप करत राहतात . माजी मनमोहन सिंग… भारतीय साधन संपत्तीवर दलित आणि अल्पसंख्य (मुस्लिमाचा ) पहिला अधिकार आहे असे म्हणाले होते. मोदिनि दलित , शोषित आणि गरीब हे शब्द कायम ठेवले परवाच्या भाषणात . पुढचा धार्मिक शब्द वगळला … मोडी खाकडु आहेत 








मोदिंचे सेक्युलर प्रचारक 

ह्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदीने एकदाही… चुकुनही …संघिष्ट वा सनातनी हिंदू , हिंदुत्व आणि हिन्दुराश्ट्राचा जयघोष केला नाही . आपल्या देशाचा कायदा आणि घटना मोदिना अशा हिंदुत्वाचा प्रचार करण्याची परवानगी देत नाही. आणि कायद्याच्या कचाट्यात न अडकण्या एव्हढे शहाणपण मोदिकडे निश्चित आहे. भारतातल्या ८५ % मतदारांना धार्मिक हाक देऊन मोदींकडे आकर्षित करण्याचे काम आमच्या सेक्युलर बांधवांनी केलेले आहे . मोदि हा हिंदुचा पक्षपाति आहे… हिंदुच्या बाजूचा आहे … हा विचार सेक्युलर माध्यमांनी पसरवला …… बदलत्या काळात । इण्टर्नेटच्या युगात …इतर देशातल्या अनेक इतर लोकांशी आणि इतर धर्मांशी संपर्क वाढत असताना भारतात देशीवाद किंवा स्वत्व वाद किंवा एत्तद्देशिय स्थानिक जाणीव हि जन्म घेणार …आणि तीला हिंदू हि आयडेण्टिटि आपोआप प्राप्त होणार हे आपण लक्षातच घेतलेले नाहि. 




विकास , राष्ट्रवाद आणि बहुजन वाद 

स्पष्ट बोलायचे झाले तर ... काही मोजके आणि सन्माननीय अपवाद वगळता …. बरेचसे पुरोगामी, बहुजन वादि , कथित समाज वादि हे हिंदुत्व वाद्या इतकेच जातीवादी आहेत . ते त्यांचे विचारवंत वगैरे मंडळी स्वजातीचे प्रेमी आहेत . अथवा भाडोत्री … किंवा तद्दन महा मूर्ख …… आणि एक बहुजन समाजातला पहिला प्रधान मंत्रीपदाचा उमेदवार घोषित करून भाजप संघाने सर्वावर मात केली आहे . आजवर भारतात १४ प्रधानमंत्री झाले . त्यातले ६ ब्राहम्ण, कायस्थ वगैरे भद्रलोक अथवा उरलेले ७ खत्री , राजपूत , ठाकूर वगैरे क्षत्रिय हुच्चवर्णिय . बिचारा एकटा देवेगौडा अपघाताचा अल्पकाळ प्रधानमंत्री पण तोही गरीब घरातला नाही तर जमीनदारच !







मोदि नावाच्या दरिद्री घरातल्या चहावाल्या ओबिसिला भाजपाने प्रधान मंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले आहे. निदान जातीची पुरोगामी गणिते इथे ढिल्ल्ली पडली आहेत . आणि सदोसदि बहुजन वाद आणि प्रतिनिधित्व आणि ओबीसी आणि इतर गोष्टी करणारे लोक मोदिला पुन्हा बहुजन वादाचेच निमित्त करून जेंव्हा झोडपू लागतात तेंव्हा त्यांवर पोट धरून सामान्य जनता हसत असते !

विकासाबद्दल बोलायचे झाले तर मोदि हा माणुस , भाजप हा पक्ष कोन्ग्रेस च्या कितीतरी पुढे आहे .असे सामान्य माणसाला वाटते. 





उदारमतवादाची सद्दी 


उदारमत वाद हा खरा नाही . असू शकत नाही . त्यामागे ढोंग आहे. फसवणूक आहे. असे सामान्य माणसाचे ( प्रामाणिक !!) मत असतेच . मोदिनी सर्व सामन्य माणसाची भूमिका मांडत उदार मतवादाची सद्दी संपवली . 

सामान्य पण शक्तिशाली मोदि 

१) आत्मौप्य , आत्म्परिक्षण आणि सहिष्णुता ह्या आपल्या जुन्या महान परंपरा आहेत असे एक मत आहे . 

२) दुसरे मत ह्या सर्व भाकड गायी निरुपयोगी असून फालतू आहेत असे आहे . 

पहिले मत गांधीचे दुसरे सावरकरांचे . असे म्हणण्याचा वैचारिक इझम संघर्ष आहे . 

मोदि आणि सर्व सामान्य भारतीय दुसर्या मताकडे झुकले आहेत हे मान्य केले पाहिजे . हा विजय माध्यमांचा नाही . प्रचाराचा आणि ब्रेण्डिग चा नाही . हा विजय सर्व सामान्य माणसाच्या बदललेल्या मताचा आहे . सर्व सामन्यांचे मत कायमच शक्तिशाली राहणार आहे . हा शाप नाही . हे भारतीय लोकशाहीचे वरदान आहे . सत्य स्वीकारून … हि मते का बदलली ? हा खरा अभ्यासाचा विषय व्हायला हवा . त्यासाठी आपापल्या पूर्वग्रहांचे चष्मे उतरवून पाहिले तर ठीक … अन्यथा …सर्व सामान्य माणसाची शक्ती ..... . लोकशाहीत सर्व सामान्य माणसाचे विचार जिंकणार आहेत . हे पहिले समजून घेतले पाहिजे . इझमचे चष्मे आणि विचारधारांच्या सद्दी संपलेल्या आहेत . इलेक्ट्रोनिक आणि सोशल मिडिया चा उदय झाला आहे . लोकशाहीला नाके मुरडून किती दिवस आत्ममग्न राहता येईल ? नवे युग सर्व सामान्य माणसाचे असेल . 


बाकी आता पुढचे काळावर सोपवू . 


पण मोदि महा विजयाचे तटस्थ विश्लेषण… समर्थक आणि विरोधक करणार का ? हा माझ्या पुढचा प्रश्न आहे . 
या निवडणुकीत धार्मिक विषय कोणि चघळले ? त्याचा कोणाला फायदा झाला ? मोदींवर तीच तीच जुनी पुराणी टिका केल्याने कोणाचा फायदा झाला ? बदलता भारत समजून घेण्यात कोण कमी पडले ? आणि का ? हा चिंतनाचा खरा विषय ! बाकी जर उदार मतवादाची सद्दी संपली तर ते खरेच चिंतनीय आहे . 




१ जाने, २०१४

मैन ऑफ द इयर - केजरीवाल !

मैन ऑफ द इयर - केजरीवाल !

हे वर्ष गाजवले  ते अरविंद केजरीवाल ने ! भारतीय राजकारणाचे डायनामिक्स बदलू शकते हे पट्ठ्याने सिद्ध केले . जात , धर्म , पैसे , दबाव , ताकद या सर्वाच्या पेकाटात लाथ घालूनही भारतीय मतदार मत टाकू शकतो  हे त्याने सिद्ध केले . मुस्लिमांना भगवा बागुलबुवा दाखवून मते मागणारे कोन्ग्रेसी आणि  साधन शुचितेच्या गप्पा मारणारा भाजप या दोघांनीही आता आत्म परिक्षण करावे . नाही तर -  या नाही तर - पुढच्या लोकसभेत दुसरा एखादा झाडू पुन्हा चालेल. आज आप चा चेहरा शहरी आणि उत्तर भारतीय आहे . चार पाच वर्षात असे अनेक आप तयार होतील .आणि इझम ने आंधळे बनलेले वाहून जातील .  कडवे हिंदु , कट्टर दलित आणि सनातनी मुस्लिम आजही फेसबुकावर आपचा निषेध करण्यात धन्यता   मानताना दिसतात .

आप च्या अट्ठाविस जागंपैकि नउ जागा या राखीव मतदार संघातुन आलेल्या आहेत. म्हणजे १/३ जागा ! दिल्लीत १२ जागा राखीव आहेत . कोन्ग्रेस ने २००८ च्या निवडणुकीत या बारा पैकी ९ जागा जिंकल्या होत्या. या राखीव जागात वाल्मिकी या दलित समाजाचे बर्यापैकी प्राबल्य  आहे.  या निवडणुकीत या बारापैकी  कोन्ग्रेस ला " शुन्य "  जागा मिळाल्या .  ९ राखीव जागांवर आप विजयी झाली आणि ३ जागांवर भाजप . मोदींचे इतर मागासवर्गीय असणे भाजप ला लाभदायक  ठरले असणार . याहून मोठा फटका बसला तो बसप या मायावती पक्षाला . गेल्या निवडणुकीत या पक्षाने दलित प्राबल्य असलेल्या २० मतदार संघात २०% मते मिळवली होती . यावेळी पाच टक्के मते मिळाली आणि शून्य जागा मिळाल्या  . दलित मतदार नेहमीच जातीच्या नावाने मत टाकेल आणि  …. आप हा शहरी उच्च मध्यम वर्गियांचा पक्ष आहे……  या दोन्ही प्रकारच्या अंधश्रद्धेतून लवकर बाहेर पडले पाहिजे . ज्या पक्षाचे १/३ आमदार राखीव जागातले आहेत त्यांना उच्च जातीय वगैरे म्हणणे हा शुद्ध वेडेपणा आहे . आणि असे पक्ष लोकशाहीच्या राजकारणात राखीव जागाविरोधी वगैरे ठरू  शकतात -- असे मानणार्यांना लोकशाही निवडणूक प्रक्रियेचे मुलभूत ज्ञानही नाही असे खेदाने म्हणावे लागेल .

मुस्लिम मतदान आजपर्यंत एकट्ठा आणि धार्मिक मुद्द्यांभोवती फिरत राहिलेले आपण पाहिलेले आहे. कोन्ग्रेसाने  मुस्लिमांची मते मागताना कायम धर्माची जपमाळ ओढुन राजकारणात धर्म आणला. शहाबानो केस मध्ये मुस्लिम सनातन्यांसमोर शेपुट हलवणार्या राजीवच्या कोन्ग्रेस ने त्यांचा भंगार प्स्युडो सेक्युलारीझम  पाळण्यासाठी बाबरीचे कुलूप उघडुन आम्ही हिंदु कट्टर वाद्यांसमोरहि कसे नतमस्तक आहोत हे दाखवून दिले. अंधश्रद्धा विरोधी कायदा होण्यासाठीही महाराष्ट्रात एक नरबळी जावा लागला. कोन्ग्रेस चा भित्रा सेक्युलारीझम यावेळी बर्याच  मुस्लिम मतदारांनी नाकारला आणि आप ला भरभरून मते दिली. पुरानि  दिल्लीतल्या  मुस्लिम बहुसंख्य भागात आप ला भरपूर मते मिळाली आहेत.  केजरीवाल मुस्लिमांच्या धार्मिक नेत्यांना जरूर भेटले पण या निवडणुकीत त्यांनी एकही धर्मिक मुद्दा घेतला नव्हता.  मुस्लिम आरक्षण , हिंदुत्व वाद्यांची भीती , मोदिंवर विशिष्ट टिका - यापैकी काहीही अरविंद केजरीवाल याने केले नाही. मुस्लिम मतदारांना भय किंवा धार्मिक लांगुलचालन या दोनच प्रकारे मतदान करता येते या अंधश्रद्धेचेहि निर्मुलन केलेले बरे. अरविंद केजरीवाल आणि कंपनिने तिरंगा हातात घेऊन भारत माता कि जय ! आणि वंदे मातरम ! अशा घोषणा देत प्रचार केला आणि त्यांच्या या सेक्युलर वंदे मातरम ला मुस्लिमांनी साथ दिली हे समजून घेतले पाहिजे . विशेषत: हिंदुत्व वाद्यांनी !

बहु संख्य / जन  हिंदु  समाज सहसा जात धर्म न पाहता मत देतो. भारतात याच कारणाने सेक्युलारीझाम टिकला आहे. निवडणुका सेक्युलर मुद्द्यांवर लढवल्या गेल्या पाहिजेत. वीज, पाणि , रोजगार , अन्न , शिक्षण असे सेक्युलर मुद्दे निवडणुकी दरम्यान चर्चिले गेले पाहिजेत. या मुद्द्यांवर निवडणुका जिंकता येतात. पैसे ,  दारू न वाटता आणि हिंदु धर्म कि जय न करताही निवडणुका जिंकता येतात . अरविंद केजरीवाल ने कोणत्याही मंदिराचे नाव न घेता - प्रशासन , देशभक्ती ,  भ्रष्टाचार अश्या सेक्युलर मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या.  मेणबत्ती वाले म्हणुन   सुशिक्षित वर्गाला माजोरडेपणे हिणवले जाते . हा माजोरडेपणा भयानक राजकीय चूक म्हणुन सिद्ध झाला आहे .


कोन्ग्रेस चे   तुश्टिकरणाचे धार्मिक , जातीय  नाटक किंवा भाजपाचा कडवा उजवा  राष्ट्रवाद या दिल्लीच्या  निवडणुकीत तरी प्रभावी ठरला नाही . जरी केजरीवाल ने भाजप पेक्षा कमी जागा मिळवल्या…।  तरी हे यश २ वर्षातले आहे . आणि निवडणुकीत केवळ २० कोट रुपयात मिळाले आहे . बाकी दोन्ही पक्षांचा अधिकृत खर्चच हजारो कोटीत आहे. अनधिकृत खर्च न विचारलेला बरा !

आप चा भर सोशल मिडियातल्या प्रचारावर होता आणि कोन्ग्रेसाला त्याचे महत्व समजले नाही . हे खरे आहे . पण केवळ सोशल मिडियावर निवडणुक जिंकता येत नाही . मुंबईत शिवसेना का आणि कशी पसरली ? वीज , पाणि , रेशन कार्ड असे जिव्हाळ्याचे मुद्दे त्या काळचे शाखाप्रमुख जातीने लक्ष घालून सोडवत असत . कोणती हि अडचण आली तर चाळीतला मुंबैकर सेनेच्या  शाखाप्रमुखाकडे तक्रार घेऊन जात असे . आणि त्या काळी शाखाप्रमुखाही इरेला पेटुन छोट्या छोट्या अडचणी सोडवत असत . आप चे  कार्यकर्ते गेली दोन वर्षे अशी स्थानिक    छोटी कामे प्रामाणिक पणाच्या इरेला पेटुन करत आहेत .


पैशाच्या मोहजालात अडकलेले कोन्ग्रेस , राष्ट्रवादी सारखे सरंजामदारांचे पक्ष हे समजू शकत नाहीत . पण बाकीच्यांना केजरीवाल राज्याची निवडणूक महापालिकेच्या मुद्द्यांवर जिंकला एव्हढे समजले तरी पुरे !

कदाचित आप दिल्लीबाहेर वाढणार नाही . पण भारताचे राजकारण , समाजकारण , प्रचार कारण बदलते आहे . एव्हढे समजले तरी पुरे !

बाकी केजरीवाल अमेरिकेचे हस्तक आहेत , मुस्लिमांचे हस्तक आहेत , राखीव जागा विरोधी आहेत वगैरे प्रचार चालू आहे … त्या सर्वांना  येत्या दहा वर्षात  झाडून काढले जाणार आहे . भारत बदलतो आहे . इतिहास कुस पालटतो आहे . हे चलन वळण न समजणारे इझम   पंडित  बाराच्या भावात जाणार आहेत . निदान गेले तरी पाहिजेत !

२२ सप्टें, २०१२

सैतानाचे वरदान



 मनमोहन सरकारने रिटेल बाजारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. त्याविरुद्ध कम्युनिस्ट, मंदिरनिष्ठ; वंगव्यस्त, आणी द्रविड्स्त मंडळींनी अनुक्रमे क्रांती, धर्मयुद्ध,  थयथयाट  आणी तांडव सुरू केलेला आहे. राजकारणातल्या अवघड प्रश्नांना हातच घालायचा नाही. वास्तव समजूनच घ्यायचे नाही. महागाई, महागाई च्या भंपक बांगा ठोकत स्वस्त प्रसिद्धीची पायवाट वारंवार तुडवण्याचे कारण काय ?

आज शेतीमालाचे मार्केट कसे आहे ? शेतकरी माल पिकवतो. ट्रक ट्रान्सपोर्ट वाले तो माल -  कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृ उ बा स) आणून टाकतात. कृ उ बा स शिवाय शेतकरी कोणालाही माल विकू शकत नाही. मोनोपली आहे. मराष्ट्रात  झाडून सगळ्या कृ उ बा स राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याला अशी समिती आहे. ही समिती निवडतो कोण ? तर मार्केट मधले व्यापारी. इथे लायसन्स राज आहे. नव्या व्यापार्यांना ह्या उद्योगात यायचे असेल तर कृ उ बा स (कृषी उत्पन्न बाजार समिती) चा परवाना लागतो. आतले व्यापारीच ही समिती निवडत असल्याने त्यांच्या बगलबच्च्यांशिवाय कुणालाही लायसन्स मिळत नाही. सरकारचे ह्यावर नियंत्रण असते.. अतिशय सभ्य भाषेत कृ उ बा स  चे वर्णन -  सरंजामशाहीचे हलकट अपत्य - असे मी करेन. अनेक कृ उ बा स वर सरकारी प्रशासक आहेत. वर्षानुवर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. उरलेल्या  कृ उ बा स मधे नकली लोकशाहीचा ढोंगी तमाशा चालतो. उमेदवार आणी विजेते फिक्स असतात. मार्केट यार्डात पिढिजात दुकानांचे गाळे राखणार्यां - मोजक्या कुटुंबांचे अनिर्बंध साम्राज्य कृ उ बा स वर असते. हे पिढिजात सरंजामी मालक शेतकर्याला हवे तसे पिळतात. शेतमालाचा भाव कसा ठरतो ? याच्या काही पारंपारिक पद्धती आहेत.

हत्ता पद्धत ही सर्वात किळसवाणी पद्धत. दलाल  भाव ठरवताना एकमेकांच्या समोर बसून एकमेकाचे हात हातात घेतात, हातांवर मोठा हातरुमाल टाकतात आणि काही न बोलता एकमेकांची बोटे धरतात. त्या बोटधरणीतून मालाचे भाव ठरतात. त्या बोटधरणीतून एकमेकांना भाव पटला तर सौदा होतो, नाहीतर सौदा बिघडतो. इतरांना काय झालेय ते काही कळत नाही.या हाताच्या बोटधरणीतून होणार्‍या सौद्यास म्हणतात हत्ता. हस्त - हात - हत्ता.  गुप्त लिलाव. हत्ता पद्धत ही दलालांचे पोट भरण्याची आणि शेतकर्‍यांना लुटण्याची गुप्त लिलाव पद्धती. अशा अनेक पारंपारिक गुप्त लिलाव पद्धती आहेत. १०० मधून चालू रेट वजा करून गुप्त भाषेत बोलणे वगैरे. मुंबईच्या मार्केट यार्डात ( कृ उ बा स ) हत्ता पद्धती सर्रास वापरतात. इतर अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या गुप्त पद्धती चालतात. बेकायदेशीरपणे चालतात.  पुण्यासारख्या शहरात रेट फोडले जातात. पण भाव किती असावा ? हे  मर्केट यार्ड मधले सरंजामदारच ठरवतात. शेतकरी भावासाठी आंदोलन करतात तेंव्हा हमीभावाची भीक सरकारकडून तोंडावर मारली जाते.

हा हमीभाव काय आहे ?  शेतमालाची किमान किंमत म्हणजे हमीभाव. ही सरकार जाहिर करते.अनेकदा ही तूट करदात्यांच्या पैशातून भरली जाते. कृ उ बा स मधल्या व्यापार्‍यांना त्याची झळ बसत नाही. शेतकर्‍याना सबसिड्या मिळतात हमीभाव मिळतो वगैरे वगैरे शहरी मध्यवर्गियांना माहित असते. भारतातला खूप मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे. पण खरे पाहता शेतीला निगेटिव्ह सबसिडी आहे. हे संतापजनक आहे. कोका कोला आणी बिसलेरी किती रुपयाला विकावी यावर सरकारी बंधन नाही. कारण ह्या वस्तू जिवनावश्यक गरजेच्या नाहीत. गहू, तांदूळ, भाज्या ह्या वस्तू जिवनावश्यक. मग ह्याचा दर सरकार ठरवते. कसा ? तर साखर महागली की साखर आयात करते. मागणी पुरवठा नात्याने भाव पडतात.म्हणजे बहुसंख्य शेतमालाची कमाल किंमतही सरकार ठरवते.  जेंव्हा भाव चढतात तेंव्हा तोटा शेतकर्याचा होतो. जेंव्हा भाव पडतात तेंव्हाही तोटा शेतकर्‍याचा होतो. हत्ता सारख्या गुप्त पद्धती,    कृ उ बा स वर मोजक्या कुटुंबांचे अनिर्बंध साम्राज्य, नकली निवडणुका,  घोषित / कुठे अघोषित मक्तेदारी - मोनोपली. तोटा शेतकर्‍याचा होतो.


त्या शेतकर्‍याकडून त्याच्या घरी जाउन माल उचलणार्‍या वेगवेगळ्या कंपन्या आल्या तर? बाजारात स्पर्धा निर्माण होईल-  भाव चढतील. मुख्य म्हणजे बाजार खुला होईल. पारदर्शकता यील. भ्रष्ट आणी गुप्त मक्तेदारीला आळा बसेल. बाजारात व्यावसायीकता यील.  शेतकर्‍याला फायदा होईल.




हजारो शेतकर्यांच्या आत्महत्या घडून गेलेल्या आहेत. कर्जामुळे . का बरे ? शेतीवर अतिशय कमी फायदा मिळतो. किंवा तोटा होतो. शेतकर्‍याचा फायदा कसा वाढवता यील? एकतर शेतमलाचे वेस्टेज थांबवता येईल. लाखो किलो गहू सडून गेल्याच्या बातम्या आपण वाचतो आणी हळहळतो. का सडतो गहू ? का सडतात आणी फुकट जातात भाज्या ? शीतग्रुहे कुठे आहेत ? उत्तम प्रतीचा ट्रान्सपोर्ट कुठे आहे.? चांगली गोदामे कुठे आहेत ?  हे सर्व उभे करण्यासाठी जे प्रचंड भांडवल लागते ते कुठे आहे ? आता पररदेशी कंपन्यांचे महाप्रचंड भांडवल गुंतणार आहे ते शेतकर्‍याच्या हिताचे आहे. एव्हढी साधी गोष्ट समजण्यासाठी अर्थतज्ञ असण्याची गरज नाही.


कृ उ बा स आज मूठभर दलालांच्या हातात आहे. ग्राहकाला किती दराने माल विकायचा ? हेही मुठभर लोकच ठरवतात. खरेदी आणी विक्रीत किती फरक असावा ? दलालाने किती कमवावे? हे लोकशाहीत सरकार ठरवू शकत नाही. मग हमिभाव आणी आयात निर्यात धोरणातून सरकार जिवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित करते. हे बसते शेतकर्‍याच्या बोकांडी. दलालांना कायदा नाही; नफ्याची मर्यादा नाही; आणी सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धा नाही.      कृ उ बा स वर मोजक्या लोकांचेच नियंत्रण राहते. नव्या लोकांना त्यात प्रवेशच  नाही. अडत्यांचे - दलालांचे राज्य आहे.

आज कोका कोला आणी पेप्सीच्या किमती फार चढताना दिसत नाहीत. कारण मार्केट मधे टिकण्यासाठी या दोघांना स्पर्धा करावी लागते. किमती कमी ठेवाव्या लागतात. हे स्पर्धेचे तत्व शेतमालाला लागू होईल तेंव्हा त्याचा फायदा ग्राहकांना होईल. फायदा शहरी मध्यमवर्गियांना ही होईल. शेतकरी संघटनेने एफ डी आय चे स्वागत केलेले आहे.


विरोधकांचे काय चालले आहे ?

वंगव्यस्त अक्रस्ताळी ममतादीदी ची - मा, मिट्टी आणी मानुष -  ही घोषणा -  बंगाली माणुशचे राजकारण, बंगालची मिट्टी आणी दुर्गा मा. एव्हढीच मर्यादित आहे. दीदीला कोणताही राष्ट्रीय अजेंडा नाही. आर्थिक अजेंडा नाही. बंगालच्या स्थानिक निवडणुकांसाठी ह्याला पाड त्याला गाडचे राष्ट्रीय (?) राजकारण चालू आहे. दिखाउपणा. नाटकी भाषणे आणी अनभ्यस्त भावनीक राजाकारण यावर दीदींची ममता आहे. द्रमुक चे ही तसेच.

 मार्क्सबाबाचे धर्मांध अनुयायी मेनिफेस्टोच्या कॅपिटलात जे नसेल - ते सर्व काफिर मानणार हे उघड आहे. "भारत देश हा खरे राष्ट्रच न्हवे. त्याचे कैक तुकडे पडल्याशिवाय गरिबांचे शोषण थांबणार नाही." असे कम्युनिस्टांचे म्हणणे जाहीर आहे. त्यांना झालेला अमेरिकाफोबिया नावाचा मानसिक आजार आधिच डयग्नोस झालेला आहे. कम्युनिस्टांच्या  मागे भाजपाने लागावे हीच खरी धमाल आहे. ज्या कम्युनिस्टाना लाल  माकडे म्हणून आजपर्यंत शाखा शाखात हिणवले - त्यांचीच वैचारिक शेपूट का धरताय ?   गणपतीच्या वर्गणीपलिकडे सेना मनसेला अर्थकारणातले गम्य नाही. भाजपेयींना तर सव्वा रुपये दक्षिणेची परंपरागत सवय मोडवत नाहीसे दिसते. कम्यनिस्टांच्या विरुद्ध  भूमिका घेणे म्हणजे राष्ट्रवाद. अशी नवी हिंदुत्वाची व्याख्या त्यांना शिकावी लागेल असेही वाटते. नाहितर भट्टीतल्या अणूपासून शेतमातीच्या ब्रम्हांडापर्यंत. कम्युनिस्टांच्या लाल मारुतीपुढे  - भीमरूपी महारुद्रा म्हणणारा पक्ष  - अशी कायमची हिंदू ओळख मिळेल.


बरे रिटेल क्षेत्रात परदेशी कंपन्या आल्या तर देशातला पैसा बाहेर जाईल हो.. अशी देशभक्तीची करूण  किंकाळीही ऐकू येते आहे. पैसा म्हणजे काय वाटलं तुम्हाला ? नोटा ? का सोनं ? तसे असते तर सरकारी टाकसाळीत भरपूर नोटा छापाव्या आणी गरिबांना त्या मोफत वाटाव्यात. गरिबी हटाव चा  रामबाण उपाय. नाही का ? पूर्वी युरोपातल्या एका देशाला आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींचा शोध लागला. भरपूर सोन आणल खणून. तेंव्हा सोन्याच्या मोहोरा प्रचारात होत्या. पाडली नाणी. बाजारात भरपूर सोन्याची नाणी आली. त्यामुळे सोन्याची किंमत कमी झाली अन वाढत्या चलनफुगवट्याने  - महागाईने देश बुडाला. रशियाच्या बाबतीत एक जोक सांगितला जातो. सोव्हीएत रशियाच्या पडत्या काळात एक बाई ब्रेड आणायला गेली होती.चलनफुगवटा - महागाई प्रचंड. तिच्याजवळ टोपलीभर रुबल होते.ब्रेड खरेदीसाठी तेव्हडे आवश्यक होते.  वाटेत चोराने टोपली पळवली. पण आतले रूबल फेकून दिले. कारण टोपलीची किंमत कितीतरी पटीने जास्त होती.


पैसा म्हणजे उत्पादनक्षमता. त्या देशातली अर्थव्यवस्था, पायाभूत सोयी. आर्थिक व्यवहारांची संख्या. जनतेचा काम करण्यातला उत्साह. उत्पादन क्षमता म्हणजे पैसा. नोटेतून तो फक्त व्यक्त होतो. नोट म्हणजे पैसा न्हवे. नवे भांडवल नवे तंत्रज्ञान देशात आले तर उत्पादन क्षमता वाढेल का कमी होईल ? स्पर्धा आली तर आपली उत्पादन क्षमता वाढेल का कमी होईल ?

इतर अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे.  आयटी मधे परदेशी गुंतवणुक आहे. १०० % पर्यंत परवानगी आहे.  त्या क्षेत्रात देशी उद्योग झोपले का ? देशातला पैसा बाहेर गेला का ? नव्या उभारीने भारतीय उद्योग परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करते झाले. नवे तंत्रज्ञान आपण शिकलो. आपली उत्पादन क्षमता वाढली. पैसा वाढला.


मूल्यवर्धन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. स्पर्धेशिवाय क्वालिटी कशी सुधारेल. वर्षानुवर्ष तेच दलाल - तोच बाजार - तोच शेतकरी. बदल शून्य. स्पर्धा शून्य. परिवर्तन हाच प्रक्रुतीचा नियम आहे. कायदा पाळा गतीचा . काळ मागे लागला. थांबला तो संपला.ईर्षा , स्पर्धा आणी मुक्त बाजारपेठ हा नव्या जगाचा मंत्र आहे. तो न म्हणणारे डब्यात जाणार आहेत.

भारत देश हजारो वर्षे परकीयांच्या गुलामीत पिचला आहे. जातीव्यवस्थेमूळे अशक्त, भ्याड आणी अनुत्पादक झालेला हिंदू समाज हे त्याचे एक प्रमूख कारण आहे. सावरकरांनीही जातीभेदाच्या सात स्वदेशी बेड्या तोडा असे म्हटले आहे. जातीभेद केवळ मानीव आणी पुस्तकी (ग्रंथप्रामाण्य) आहेत असे ही सावरकर म्हणतात. वस्तुस्थिती काय आहे ? जातीव्यस्था ही एक उत्पादन व्यवस्था आहे. लोहाराची, सुताराची, कुणब्याची, अन दलालाची कामेही वंशपरंपरा चालत येतात. त्यात स्पर्धेला वाव नसतो. लोहाराच्या घरात उत्तम दलाल जन्मला तर ? याच्या उलटे झाले तर ? व्यक्तीची उत्पादन क्षमता ही व्यवस्था ठेचून टाकते. निकोप स्पर्धेला वाव देत नाही. त्याला भणंग तत्वज्ञानाचा मुलामा देत तोंड वर करत म्हणते - पहा पहा, आमच्या महान संस्क्रुतीत स्पर्धा नाही ! ईर्षा (साहस) नाही. सहकार्य आहे. कसल डोंबलाच सहकार्य ?

शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली न्हवती. ती त्यानी पोर्तुगाल वरून मागवली होती. स्वदेशाचे स्वातंत्र्य म्हणून आले. स्वदेशीच्या भक्तांना एव्हढेही समजू नये ?
















भारतातली शेती पावसावर अवलंबून आहे. दुष्काळाचे अस्मानी संकट शेतकऱ्याच्या डोक्यावर असतेच. ज्येष्ठ विचारवंत अमर हबीब म्हणतात बंद बाजारपेठेचे सुलतानी संकट त्याहून मोठे आहे.  सुलतानी संकटापासून कोण वाचवेल?





साहस, स्पर्धा, मुक्त - पारदर्शक - भ्रष्टाचारमुक्त - खुली बाजरपेठ हे भारतदेशासाठी वरदान आहे.



स्वतःची कोळश्याहून काळी पापे झाकण्यासाठी ते काँग्रेसने दिले. म्हणून वरदान आपण नाकारणार आहोत काय ?

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *