तुझा एकेरी उल्लेख केला तरी समर्थक अंगावर येणार नाहीत असा तू पहिला मुख्यमंत्रि असशील … लोकांनी लई आशा लावल्यात तुझ्यावर … पण प्रेषित हि संकल्पना मला मान्य नाही . आणि राजकीय - सामाजिक चमत्कारावरही मी अंध विश्वास ठेवत नाही . तुझे लोकपाल मला समजलेले नाही आणि राइट टू रिकोल मला मान्य नाही . दर पाच वर्षांनी राईट टु रिकोल असतोच . त्याला निवडणूक म्हणतात . भारताच्या राजकीय बजबजपुरीत राईट टु रिकोल वेड्यासारखे वापरले जाइल आणि त्यावर अनावश्यक खर्चही होईल . असे सगळे असले तरीही तुझ्या दणकून निवडुन येण्यामुळे मला आनंदान भांगडा करावासा वाटला होता .
मुस्लिमांच्या धर्माला मान द्या आणि हिंदुनि पाच पन्नास पोरे पैदा कराच्या भम्पक राजकारणाला वैतागलो होतो. या सिनेमावर बंदि घाला , त्या पुस्तकान भावना दुखावल्या , आमच्या नेत्याचे स्मारक झालेच पाहिजे , अमुक गावाचे नामांतर झाले पाहिजे , देशीवाद आणि समाजवाद आणि शेक्युलरवाद आणि राष्ट्रवाद आणि भाषाद्वेष असल्या इझम - अस्मितांच्या चुत्यागीरीत……. लोकांच्या थपडा खात तू उभा राहिलास आणि अन्न , वीज पाण्याचे खरे राजकारण केलेस . आणि सप्पटुन जिंकुन आलास . दादा अरविंद या देशाच्या राजकारणाचा मनु बदलतो आहे . आता भारताची जनता लोकशाहीचे प्रयोग करणार आहे … त्याचा नवा मास्तर तू झालास .
आता दिल्ली विधान सभेत केजरीवाल मास्तरांची शाळा भरेल . पोरे भाभिंनि बनवलेले पराठे , दह्याचे रायते , कालि दाल आणि पाण्याच्या वाटरब्यागा घेऊन वर्गात उपस्थिती लावतील . हजेरी सक्तीची असेल . विरोधक नावाचा प्राणि शिल्लक न उरल्याने . विधान सभेत चर्चा होणार नाही. अरविंद मास्तरांची शाळा भरेल . त्याची सुरस आणि चमत्कारिक वर्णने ऐकण्यासाठी आतुर झालो आहे ….
या इथे फेसबुकावर ....बघ काही लोक तुला घटना विरोधी आणि दलितविरोधी म्हणत आहेत , काहिंच्या मते तू मुस्लिमांचा हस्तक आणि हिंदुंचा दुश्मन आहेस , काही तुला आर एस एस ची टिम बी आणि अल्प्संख्यविरोधि अराजकवादी म्हणत आहेत . …… तू नक्षल्वादी , पाकी आय एस आय चा हस्तक , हिंदु अतिरेकी सगळे काही आहेस अशा पोस्ट वेगवेगळ्या विचारसरणीचे कट्टर समर्थक फेसबुक - व्हाटस एप वर पसरवत आहेत . त्या समद्यांच्या नानाची टांग !
एकाच वेळी हिदुविरोधी , मुस्लिमांचे कर्दनकाळ , दलितांचे दुश्मन आणि ब्रिटिशांचे हस्तक होण्याचे महाभाग्य या आधी फक्त महात्मा गांधीना मिळाले होते रे । भाग्यवान आहेस तू … . बा अरविंदा भिड पट्ठ्या ! या देशात पहिल्यांदा हसरा माणुस मुख्यमंत्रि होतो आहे - ज्याची व्यक्तिष: कोणालाही कधी भीती वाटणार नाही ……… पण तुझ्या राजकीय वादळाने भल्या कट्टर इझम वाल्यांची दरदरून तंतरलि आहे . तुझी आंधळि भक्ती करणार नाही … पण तुझा द्वेष करणार्यांची दया येते …… अरविंदा कूच भला करो इस देस का …. अशा अमर आहे भावा !
आता जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला वंदन ! भारतीय लोकशाही केवळ आकारानेच मोठी आहे असे नाही . ती लवचिक आणि सामुहिक भान ( कलेक्टिव्ह कोन्शस / कनसेनसेस ) असणारी आहे …. सामुहिक भान निर्माण होणे -- इतक्या झटकन बदलणे -- कदाचित फ़ुडार्लेल्या युरोपियन राष्ट्रात हि घडणार नाही … यापुढे कधी भाजप निवडून येईल कधी आप कधी इतर कोणि …. विजय लोकशाहीचा हे निश्चित ! भारतीय नागरिकाला त्याच्या अधिकाराची आणि शक्तीची जाणिव करून देणार्या इलेक्ट्रोनिक आणि सोशल मिडियाचे हे उत्तुंग यश आहे . लोकशाहीच्या निर्मात्यांना आणि रक्षकांना विनम्र अभिवादन ! लोकशाही जगेल - अशीच सशक्त बनेल - तर भारत निश्चित महासत्ता बनेल .
यानिमित्ताने कॉंग्रेसचे दिल्लीत पुरते विसर्जन झाले . ते एक बरे झाले . म्हातारी मेली ! काळ धावायला स्वतंत्र झाला ! पुढची राष्ट्रीय निवडणुकही कदाचित आप विरुद्ध भाजपा अशी असेल . भाजपाच्या राष्ट्रवादी आणि विकास वादि हिदुत्वासमोर कोन्ग्रेस चितपट झाली . आता या प्रश्नावर अरविंदाला भूमिका घ्याव्या लागतील तरच राष्ट्रीय राजकारणात तो टिकेल .जामा मशिदीच्या शाही इमामाचा पाठिंबा नाकारून आप ने दमदार सुरवात केली आहे. भाजपाला अडचणीत आणण्यासाठी सनातनी साधू संत बाबा पुरेसे आहेत . या देशात पुन्हा एकदा सेक्युलारीझम ची चर्चा घडेल . या वेळी भाजपा समोर मुस्लिम मतपेटीत अडकलेली आणि सर्व धर्म लोचट कोन्ग्रेस नसेल .
सर्व भाजपविरोधी मतांचे केंद्रीकरण करताना कोंग्रेसच्या सर्व धर्म लोचट मार्गाने जायचे नाही हि सर्वंकष सर्कस आहे . यात तोल गेला तर आप्चा कपाळ मोक्ष ठरलेला आहे.
जे एन यु च्या इडियट डाव्या टोळक्याच्या नादाने कोन्ग्रेस ची पार वाताहात झाली . या पोथिनिश्ठ इझम वाल्या डाव्या टोळक्याहुन - आप चे योगेंन्द्र यादव अधिक मुरलेले आणि चाणाक्ष आहेत. भाजपाच्या थिंक टेंक समोर उद्या - तुल्यबळ नसला तरी - मातब्बर प्रतिस्पर्धी उभा राहणार आहे.
त्याचवेळी आपला अतिउत्साह आणि भिडाभिडिचि खुमखुमी ताब्यात ठेवून काही तरी सरकारी कामही करावे लागणार आहे . मागच्या वेळी आप पक्षाला काहीही सरकारी काम जमले नव्हते. आता दिल्लीकर बाबू ना एक माजी बाबू किती धक्क्याला लावू शकतो यावर आपचे भविष्य ठरेल . नरेंद्र मोदि त्यांच्या रिझल्ट ओरिएण्टेड कामासाठी प्रसिद्ध आहेत. महापालीकेसारखी सत्ता असणारी दिल्ली राजवट संभाळता संभाळता अरविंदाचि तुलना थेट प्रधानमंत्र्यांशि होईल . दिल्लीकर हिंदि - इंग्रजी प्रसार माध्यमे हा नवा प्रतीनायक उभा करतील . हि संधि आहे अणि अवघड परिक्षाहि . सध्याच्या परिस्थितीवरून पाच वर्षांनी आप हा राष्ट्रीय विरोधी पक्ष बनेल आणि कॉंग्रेसचे राष्ट्रव्यापी विसर्जन सुफळ संपुर्ण होईल असा अंदाज बांधता येतो . आपने टीव्हीवर चर्चा करायचे खूळ पाच वर्ष केले नाही आणि बाह्या दुमडून दिल्लीतले रस्ते वस्त्या ठिकठाक केल्या ……. तर …
सध्याचे आप चे प्रदर्शन या वर पण लिहा
उत्तर द्याहटवाखरं आहे. आपने केलेला भ्रमनिरास यावर पण लिहा. काही चुकत गेलंय की मुळात उद्देशच फसवणुकीचा होता हे कळू दे.
उत्तर द्याहटवा