२४ फेब्रु, २०१५

दयाळू मदर तेरेसा


लेन्सेट नावाचे एक ब्रिटिश मेडिकल जरनल आहे . हे जरनल वैद्यकीय जगतात अतिशय विश्वसनीय आणि अद्ययावत मानले जाते . १९९० च्या दशकात लेन्सेट चे मान्यवर संपादक डॉ . रॉबिन फॉक्स यांनी कलकत्ता येथील मदर तेरेसांच्या संस्थेस भेट दिली . या तज्ञाने मदर तेरेसांच्या कार्याचे वर्णन करताना पुढील विशेषणे वापरली आहेत " अशास्त्रीय , अव्यवस्थित, अज्ञानी , आभावग्रस्त , भीषण आणि चिंताजनक "




१७ सप्टेंबर १९९४ , डॉ . रॉबिन फॉक्स लेन्सेट या वैद्यकीय शोधमासिकात लिहितात - " मदर तेरेसांनि चालवलेले मृत्युगृह किमान वैद्यकीय सेवांपासुनहि वंचित आहे. रुग्णांची काळजी घेण्यास डॉक्टर उपलब्ध नाहीत . रुग्णसेवा करणार्या मिशनरी स्वयंसेवकांना वैद्यक शास्त्राबद्दल प्रचंड अज्ञान आहे.…. जगू शकतील आणि मृत्युपंथाला लागलेले रोगी हि विभागणी सुद्धा त्यांना करता येत नाही . कलकत्याच्या सरकारी रुग्णालयातील उपलब्ध औषधाने ज्यांचे जीव वाचू शकले असते … असे रुग्ण मरत आहेत . मदर तेरेसांच्या रुग्णोपचाराचि पद्धत अशास्त्रीय , अव्यवस्थित आहे. अनेक रुग्णांची परिस्थिती भीषण आहे . त्यांना वैद्यक उपचारापासून आभावग्रस्त ठेवले जात आहे. साधी वेदनाशामक औषधे सुद्धा पेशंटला दिली जात नाहीत . पेशंट केअर चींताजनक…. " (संदर्भ : तळटीप १)

मानवता वादि समाजसेवक  कि  ख्रिस्ती धर्मसेवक ? 


मदर तेरेसा ह्या मानवता वादि समाजसेवक नसून ख्रिस्ती धर्मसेवक होत्या . त्यांनी पेशंट वर कधीही इलाज केला नाही फक्त त्यांची शुश्रुषा केली . ट्रिट्मेंट आणि पेलिएटिव्ह नर्सिंग केअर यात फरक आहे . केथेलिक श्रद्धेनुसार .......मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णास मरणोत्तर स्वर्ग मिळावा म्हणुन..... धर्मांतरीत केले जाते . पापी हिदन - पेगन आणी येशु कृपेपासून वंचित असलेल्या भारतीयांस मृत्युनंतर स्वर्ग मिळावा म्हणुन मदर तेरेसा मृत्युगार / मृत्युगृह चालवत असे.(ख्रिस्ती संकल्पना = होस्पिस ) . त्यात मृत्युपंथास लागलेल्यांना बाप्तिस्मा देऊन येशूच्या स्वर्गात जागा बुक करणे हा उद्देश असतो .
मदर तेरेसा दयाळू होत्या यात शंका नाही! गरीब भारतीय लोकांच्या मृत्यू पश्चात कल्याण्यासाठी त्यांचा जीव तळमळत असे. मृत्युनंतर स्वर्ग मिळावा यासाठी बाप्तिस्मा देण्यावर मदर ची श्रद्धा होती . आपले श्रद्धा पालन त्यांनी प्रामाणिकपणे केले . केथेलिक मिश्नर्यांच्या जीवनश्रद्धेत वैद्यकीय उपचार बसत नाही . येशु बाप्पाने ठरवलेले प्रारब्ध बदलणे त्यांना चूक वाटते .
लसिकरण करण्यास विरोध असतो . कुटुंबनियोजन आणि गर्भपात यानाही मिश्नर्यांचा विरोध असतो . अनेकदा वैद्यकीय कारणांसाठी गर्भपात आवश्यक असतो . गर्भपात केला नाही तर आई आणि मुल दोघेही दगावतात . गर्भपाताने निदान आईचा जीव वाचू शकतो . या वैद्यकीय कारणांसाठी केल्या जाणार्या गर्भपातास देखील केथेलिक मिशनर्यांचा विरोध असतो. काही युरोपीय देशात आजही हा धार्मिक कायदा आहे . त्यामुळे अनेक मातांचे दुर्दैवी मृत्यू घडत आहेत .




नोबेल पारितोषिक


मदर तेरेसांना नोबेल पारितोषिक दिले गेले . ते पारितोषिक स्वीकारतानाच्या भाषणात मदर म्हणाल्या " कुटुंबनियोजन आणि गर्भपात हा सैतान आहे. " हि मदरची विज्ञान निष्ठा आणि माणुसकी होय.
त्यांच्या श्रद्धेनुसार त्या प्रमाणिक पणे बोलल्या .मृत्युपंथाला कोण लागले आहे? आणि उपचारांनी कोण वाचू शकेल ? हे मदर ला कळत नव्हते . हा त्यांचा दुष्टपणा नाही तर वैद्यकशास्त्राचे "अज्ञान" आहे . त्याबद्दल मी त्यांना दोष देणार नाही .
पण ज्यांना मृत्युपंथाला लागलेले रोगी या "अज्ञानातून" मृत्युगारात भरती केले गेले …. त्यांना परिणामकारक वेदनाशामक औषधे का दिली नाहीत ? रोग क्युअर करणारा उपचार देता येत नसेल… तर निदान वेदनाशमन करणे …. माणुसकीला - दयाळुपणाला धरून नाही का ? नेमका हाच प्रश्न डॉ रोबिन फॉक्स ला हि पडला होता .


दयाबुद्धिचा मिशनरी अर्थ 


युनिव्हर्सिटी ऑफ ओटावा च्या सर्ज आणि करॉल या दोन संशोधकांनि मदर तेरेसाचे चरित्र , भाषणे आणि लिखाण यांचा समग्र अभ्यास केला आहे . त्यांनी मदरच्या दयाळुपणाचे मर्म अभ्यासले आहे. दयाळुपणाचि मुळे मदरच्या धर्मश्रद्धेत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहेत .
ती श्रद्धा होती " पतितांनि- वंचितांनि प्रारब्धाचे भोग भोगण्यात एक आगळेच सौंदर्य आहे. देवपुत्र येशूने क्रुसावर जे छळ , ज्या वेदना आणि जे दु:ख भोगले त्याच मार्गाने त्याची लेकरे चालली आहेत . त्या लेकरांनी दु:ख , झीज आणि वेदना भोगल्या कि जगतिचा पुण्यसंचय वाढत असतो".............
(संदर्भ : तळटिप २)




भारताचे प्रारब्ध 


मदरच्या धर्म प्रसाराचा मुद्दा गौण मानला तरी त्यांची श्रद्धा दयाबुद्धी……… आणि पेशंट्च्या वेदनेतून त्याना मिळणारे समाधान आपण समजून घेतले पाहिजे . त्यासाठी केथेलिकांच्या काही मुलभुत धर्मश्रद्धा समजून घ्याव्या लागणार आहेत........ क्रूसावरील येशुबाळा प्रमाणे … पेशंट वेदनेने तळमळला तर पुण्यसंचय वाढतो हे मदरने स्वत:च लिहून ठेवले आहे . आपण वाचत नाही . ती नेहमी खरेच बोलत असे .मृत्युशय्येवर औषध नाही तर बाप्तिस्मा देणे हि तिला दयाबुद्धी वाटत असे.
मोहन भागवतांच्या विधानाने मदर चर्चेत आल्या आहेत .युरोपातले सेक्युलर बुद्धिवादी जग मिशनर्यांच्या आणी मदर तेरेसाच्या विरोधात उभे आहे . आज प्रारब्ध आणि पारलौकिक आयुष्यावर श्रद्धा ठेवणारे हिंदुबांधव मदरच्या विरोधात दंड थोपटून उभे राहतील आणि .......भारतीय सेक्युलर बुद्धिवादी दयाळू मदरच्या बाजूने मुद्दे मांडतील . हेच भारतीय वैचारीकतेचे प्रारब्ध आहे.


मदर तेरेसा हि प्रतिगामी व्हेटिकन ची प्रतिनिधी आहे. हे कोणीही ध्यानात घेतलेले नाही . युरोप आणि पाश्चात्य जगातले ख्रिस्ती बुद्धिवादी , पुरोगामी , सेक्युलर यांनी सुद्धा मदार तेरेसा आणि व्हेतीकन चर्च वर टीकेचे कठोर आसूड ओढलेले आहेत . एखादा विषय संघाने चर्चेत आणला तरी पुरोगामी भूमिका सोडून विरोधासाठी विरोध करणे राजकीय शहाणपण नाही , तत्वनिष्ठा नाही आणि नैतिक तर बिलकुलच नाही 


- डॉ अभिराम दिक्षित
.
तळटिपा आणि संदर्भ : -

संदर्भ १) Robin Fox, CALCUTTA PERSPECTIVE: Mother Theresa's care for the dying, The Lancet, Volume 344, Issue 8925, 17 September 1994, Pages 807-808
संदर्भ २) Serge Larivée, Carole Sénéchal, and Geneviève Chénard. Studies in Religion/Sciences Religieuses, September 2013; vol. 42, 3: pp. 319-345. … आणि (…. ://www.nouvelles.umontreal.ca/.../20130301-mother-teresa...)
संदर्भ 3) मदर तेरेसांचे चरित्र ख्रिस्ती मिशन नेच प्रसिद्ध केले आहे जिज्ञासुंनि तेही अवश्य वाचावे (by the Vatican: …://www.vatican.va/.../ns_lit_doc_20031019_madre-teresa_en...)
.

३ टिप्पण्या:

  1. मदर तेरेसाचे काम म्हणजे तिने चालवलेले मृत्युगृह - (होस्पिस) म्हणजे कलकत्ता शहरातील दोन खोल्या - त्यात पन्नास शंभर माणसे वेदनांनी तळमळत असत … आपल्याकडची जैन लोक यापेक्षा कितीतरी मोठी च्यारिटि करत असतात . दुसरी गोष्ट म्हणजे मदर नि हैतीच्या हिंसक हुकुमशहाकडुन लाच घेऊन त्याला निष्पाप असण्याचे सर्टिफ़िकेट दिले होते.
    कुटुंबनियोजनाला विरोध आणि इतर विज्ञान विरोधी गोष्टी पाहिल्या कि , मदर चे तौलनिक मुल्यमापन करावे लागते . ज्ञानाला विरोध मग पुढे मरणार्या व्यक्तीला आधुनिक औषधोपचार द्यायलाही विरोध ! त्यांना वेदनात तसेच ठेवणे - जेणेकरुन त्यांनाही येशूच्या वेदनादायी म्रुत्युच्या मार्गाने स्वर्गात दाखल होता येईल.
    मदरचे जे लहानसे ख्रिस्ती होस्पिस होते - त्या मध्ये उपचार केले जात नसत. कलकत्याच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये जे वैद्यकीय उपचार फुकट उपलब्ध होते . ते हि मदर देत नसे. ल्यान्सेट या प्रसिद्ध ब्रिटिश मेडिकल जर्नल ने रोग्यांचा छळ केल्याबद्दल , मदर वर भरपूर टिका केली आहे .
    क्याथालिक चर्चच्या सनातनी पार्श्वभूमीवर हे समजून घ्यावे लागते . बाइंना भारतातून हद्दपार करायला हवे होते . हिंदु मूर्ख आहेत त्यांनी तिला भारतरत्न दिले.
    आता मदर तेरेसाचे दोन चमत्कार सिद्ध झाले म्हणून क्याथालिक चर्च तिला संतत्व देते आहे . याची चेष्टा पाश्च्यात्य जगातील युरोपियन बुद्धिवादी नक्की करतील . पण त्याहून अधिक आत्मविश्वासाने सांगतो कि भारतीय फुरोगामी जग यावर मुग गिळून गप्प बसणार आहे.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *