सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ।। असे एक समर्थवचन आहे. बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते तसेच - ह्या समर्थवचनाचा अर्थ (संस्कृती रक्षक) धर्मप्रेमी कसा लावतात? हे मला देखील माहित नाही. मी मात्र माझ्या परीने ह्या ओळीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांची कीर्ती सांगणारा माणूस मूर्ख म्हटला पाहिजे असा त्याचा अर्थ. पुरा श्लोक असा आहे -
आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||१२||
" क्ष " नावाचं येडं स्वतः संकटात आहे तरी स्वतःच स्वतःची स्तुती करतो आहे. वडलांची कीर्ती सांगतो आहे तो क्ष मूर्ख म्ह्टला पाहिजे. मूर्खलक्षणात हे येते. हे मूर्खलक्षण त्रिकालाबाधित असल्याने क्ष च्या बापाला, त्याच्या आज्याला आणि पणज्यालाही लागू होते. म्हणजे पूर्वजांची कीर्ती सांगत बसू नये - स्वतःच्या हाताने काहितरी करून दाखवावे असा ह्या श्लोकाचा अर्थ घेता यील. रामदास प्रयत्नवादी असल्याने त्यांनी स्वतःच्या हाताने काहितरी करण्यावर भर द्यावा हे ठीकच. पण बापजाद्यांचा उदोउदो करत सुद्धा प्रयत्नवादी रहाता यीलच की ! खरी गोम इथेच आहे.
किंबहूना बापजाद्यांचा उदोउदो करण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत असेही बहुत समर्थभक्त वदतील. पण असे केल्याने संकटाचा नायनाट, विपत्तीचे हरण होत नाही हा मुद्दा आहे. मानवांचे पूर्वज माकड होते हे शास्त्रीय सत्य आहे. त्यानंतर आपल्या रानटी पूर्वजांची निर्मिती झाली. आजच्या मानवजातीचे पूर्वज रानटी होते. हा मुद्दा आहे.
गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर मनुष्याची झालेली प्रगतीच दिसून येते. हाच नियम गेल्या दहा शंभर आणी हजार वर्षालाही लागू पडतो. मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. नातू जेंव्हा आजा होतो तेंव्हा त्यालाही हा नियम लागू होतो.
हा नियम खुद्द समर्थ रामदास स्वामींनाही लागू होतो. त्यांना वंशपरंपरेने जे ज्ञान मिळाले होते त्यात त्यानी दासबोध रचून भरच टाकली असे म्हणावे लागते. आणी त्यानंतरच्या पिढ्यांनी समर्थांचाच कित्ता गिरवत त्यात अधिकाधिक भर टाकली हे ओघानेच येते. बटाट्याच्या किसाचा उल्लेख म्हणुनच केला. बटाटा हे अन्न युरोपियनांनी भारतात आणले. त्या आधी ते भारतात न्हवते त्यामुळे ते उपवासासाठी धर्म्य असण्याचा प्रश्नच न्हवता. धर्म आणी संस्क्रुती काळबरोबर बदलत जातात. बदलले पाहिजे आणी मग समर्थशिष्य कल्याण आणि उद्धवाच्या नशिबात नसलेली चमचमीत साबुदाण्याची खिचडी मला खायला मिळते. साबुदाणा ही पोर्तुगीजांनी आणलेली गोष्ट आहे हे ही लक्षात ठेवावे लागेल.
http://en.wikipedia.org/wiki/Tapioca
हल्लीची पिढी एकदम चुकार म्हणत बोटे मोडणे सोपे आहे - पण पूर्वीच्या पिढीतहि असेच म्ह्टले जायचे हे एकदम सत्य आहे . खरी गोष्ट अशी आहे की - बापाचे ऐकायचे असे आपण ठरवले असते तर आपण आजही गुहेत राहत असतो. जी गोष्ट विज्ञान आणी तंत्रज्ञानाबाबत खरी आहे. तीच गोष्ट नीती आणि सदाचाराबाबतही खरी आहे. हिंदुधर्म जर परिपूर्ण असता - तर दासबोध लिहिण्याची गरज काय होती ? जुन्याच एखाद्या ग्रंथाच्या प्रती समर्थानी काढल्या असत्या तर चालले असते की. कष्ट करोनी घसरावे म्लेंच्छावरी असे आधी कुणी म्हटले न्हवते. रामदासाने ते म्हटले. त्यात आपण पूर्वजांचा अपमान करत आहोत असे त्यांना वाटले नाही. नवनिर्मीती हा निसर्गनियम आहे. रामदासांचे मला पटत नाही. माझे जातिव्यवस्थेबद्दलचे विचार वेगळे आहेत असे म्हणणे हा रामदासाचा अपमान नाही. कलियुग होउन गेले आहे आणि सत्ययुग आता आणायचे आहे .
समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही.
हे जेव्हढ्या लवकर कळेल तितके उत्तम !
आपणासी जे ठावे | ते इतरांसी सांगावे |
शहाणे करूण सोङावे अवघेजण - रामदास
- डॉ. अभिराम दीक्षित, पुणे
thanx
उत्तर द्याहटवा>> बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना <<
उत्तर द्याहटवाहा हा हा आवडले. अंध भक्ती ही विज्ञानाच्या दृष्टीकोनातुन घातक तर आहेच तसेच अध्यात्मिक दृष्टीकोणातुनही घातक आहे. अपला समाज हा व्यक्तीप्रधान आहे त्यामुळे मागे जी काही थोर व्यक्ती होऊन गेले त्यांचे गोडवे गाणे, त्यांची मुर्ती बनवुन पूजा करणे यातच आपले समाधान मानतो परंतु त्याच थोराचे काही गुण अंगी यावेय यासाठी काही करत नाही. जसे यम आनि नियमांचा एखादा फोरम काढला तर त्यावर आपापले यम-नियमांवरचे ज्ञान दाखवण्याची आणि आपले पांडीत्व सिद्ध करण्याची जणू स्पर्धा लागेल पण तेच यम नियम पाळायचा कोणी विचारही करत नाही.
बटाटा जमिनीतच उगवतो , नसेल पूर्वीच्या काळी तरी त्याला एका दृष्टीने कंदमूळ म्हणावं लागेल आणि उप्व्साला जमिनीच्या आतली फळ चालतात . नंतर आल म्हणून खावू नये हा AXUALLY मागासलेला विचार आहे .
हटवाChhan, Atishay chaan. Thor purushanvishayi, mahamanava vishayi aadar thevala pahije. Pan andhanookaran nakoy, ani to aadar manat thevun mhanavese vatatey ki ti suddha pratham manase hoti ani nantar vicharane ani kartrutavane mahamanv zale. Evolution is always in Nature.... We have to follow this..... Batata, Sabudana yani dharmik upvasat ani Tobacco ne Bhartiya samajat geli 300 varshe dhumakool ghatalay.... Kay karanr??? European lokanche nako tithe Andhanookaran
उत्तर द्याहटवाछान आहे........
उत्तर द्याहटवाWhatever Samartha Ramdas swami wrote 350 years ago was his reflection of his time. To judge it by applying today's knowledge (your advantage of 350) and proving it wrong doesn't make sense. His greatness is most of the volume of his literature is still applicable word to word even after 350 years. To pick out some stray piece and criticize it can be done to prove one's intelligence ... Beyond that it tells you nothing..
उत्तर द्याहटवालेखात नेमक्या कोणत्या समस्येवर बोट ठेवायचे आहे ? समर्थांना बटाटे मिळाले नाही तर मग ते आम्हीही खायचे नाहीत का ? उपवासाचे दिवशी फलाहार / कंदमुळे( जी जमिनी खाली तयार होतात ) खावी असा समाज आहे , तर मग बटाटे खायचे नाहीत का ?
उत्तर द्याहटवागुरुजी तुम्हाला आज कोणीतरी बटाटा मारून फेकला की काय ?
उत्तर द्याहटवाएकंदरीत लेख ठीक आहे. पण बटाट्याचं प्रयोजन कळलं नाही.
उत्तर द्याहटवानक्की काय म्हणायचे आहे तेच कळत नाही… राग कुणावर आहे…रामदासांवर का आणखी कुणावर…?
उत्तर द्याहटवाबटाट्याचा किसाचे उदाहरण ठीक आहे. आणि मागील पिढी पेक्षा पुढील पिढी कडे ज्ञान अधिक असते हे ही मान्य. पण ह्यात रामदास स्वामींना आणण्याचे कारण काय ?
उत्तर द्याहटवारामदासांचा मूर्ख असे नाव दिले तर - ते आदरार्थी बहुवचन मुर्खासाठि वापरले जाइल …। लेखात इतरत्र आदरार्थी बहुवाचानात उल्लेख आहे. रामदासांची मुर्ख्लक्षणे त्रिकालाबाधित कशी आहेत - हेच वरील लेखातून दिसते. आणि लेख केवळ रामदासांच्या अनुयायांची अंधभक्ति दाखवत नाहि. लेखाचा शेवट असा आहे. - लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही.
उत्तर द्याहटवाKonya Abhiram Dixit namak manushyane Samartha Ramdasancha ekri ullekh kelyane kay farak padto.Suryavat thunkle thunki kethe padel.
उत्तर द्याहटवाअभिराम तुमचे पूर्वज माकड असतील आमचे नाही
उत्तर द्याहटवाबटाट्याचे ठीक आहे पण रताळ्याचे काय करावे? असा नावाचप्रश्न आम्हा क्षुद्र्बुद्धी अस्मादिकास पडला आहे .
उत्तर द्याहटवाआपले विचार समतावादी दिसत आहेत. उत्तम.
उत्तर द्याहटवापण लेख , काही शब्दयोजनेतील गफलतीमुळे आणि काही उल्लेखांमुळे विवाद्य ठरणे स्वाभाविक वाटते.
लेखात नक्की काय म्हणायचे हे कळत नाही कारण अनेक अप्रायोजक उदाहरणे यात आली आहेत. लेखातल्या काही गोष्टी विवादास्पद होऊ शकतात. उदा. तत्वज्ञान असे म्हणते कि प्रत्येक तत्वज्ञ हा आधीच्या एक किंवा जास्त तत्वज्ञांच्या खांद्यावर उभे असते.नविन तत्ववेत्ता जुन्या गोष्टी संपूर्ण डावलतोच असे नसून कालानुरुप त्यात बदल घडवतो. दुसर म्हणजे आपण प्रगती करत आहोत का दुर्गती हे निश्चित ठरवता येत नाही. अनेक विषयात अधिक र्हास होताना दिसतो. नुसते वैज्ञानिक शोध म्हणजेच प्रगती असे ठरवुन टाकणे धाडसाचे आहे. हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे आदर्शाकडून ढळलेले जग पुन: आदर्शाकडे आणायचे आहे. मुळात सत्ययुग होते ते कलियुगाकडे ढळले आहे ते पुन: सत्ययुगाकडे न्यायचे आहे. हि भूमिका बरोब्बर विरुद्ध आहे. कलियुगात सर्वजण स्वत:च्या हक्कांविषयी बोलत आहेत या हक्कांच्या आधी जे कर्तव्यपालन म्हणजे धर्मपालन हवे त्याविषयी सर्व उदासिन आहेत. कर्तव्य पालन कशासाठी तर कर्तव्यासाठी अशी स्थिती म्हणजे सत्ययुग.केवळ वैज्ञानिक प्रगती किंवा शोध याला प्रगती म्हणता येत नाही.
उत्तर द्याहटवाबटाटा ,साबुदाणा यांचा संदर्भ नेमका काय आहे? विहिरित पाव टाकून ज्या पोर्तुगीझांनी गोवे भागात बरिच बाटवाबाटवी करु शकले त्यातून हिंदू समाज जर बाहेर पडला असताना पोर्तुगीझांनी साबुदाणा आणला होता बरका असे खिजवण्यात काय अर्थ आहे कळत नाही.हिंदू-मुस्लीम संस्कृती संगम कसा झाला आहे यासाठी जिलबीचे उदाहरण देण्यासारखा हा प्रकार असावा? कोणे एके काळी धर्माचे स्थान हृदय ,पोट नव्हे हे सांगणार्या सावरकरांचा आदर्श बाळगणारे आपण,हिंदूसमाजाने रोटीबंदी तोडली असेल तर त्याचा आनंद मानायचा का दु:ख? अर्थात बकरीचे दूध आणि हातसडीचे तांदूळ हे नवे आदर्श झाल्यावर असा विरोधभास लेखनात येणे आश्चर्याचे नाही पणं खेदजनक मात्र आहे.
उत्तर द्याहटवाuttam lekh
उत्तर द्याहटवाखूप छान अभिराम जी !!!
उत्तर द्याहटवाWhat about MacDonalds french fries 🍟.r worthy for fasting.what are your thoughts on halal food in mcd.
उत्तर द्याहटवाhttp://www.misalpav.com/node/21679
उत्तर द्याहटवाहा लेख आधी प्रसिध्द झाला आहे.
अभिराम लेख छानच. सत्य आहे. " परिवर्तन निसर्ग नियम आहे " बुध्दानी सांगितले आहेच.उपवास आहे त्याला खाल्लेच पाहिजे असे नाही.मग उपवास कसला? साबुदाणा कसा तयार करण्यात येतो त्याची प्रक्रिया जाणून घ्या. साबुदाणा खाणारच नाही.
उत्तर द्याहटवाcopy paste karayche aani kuthun kele te pan sangayche nahi waa waa.
उत्तर द्याहटवाकोल्ह्याला द्राक्षे आंबट
उत्तर द्याहटवा