६ सप्टें, २०१२

त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद







*********************************************************************************************************
पूर्वपिठीका



प्रा शेषराव मोरे हे शिक्षणाने इंजिनिअर आहेत. कुरुंदकरांच्या परंपरेतले आहेत. काही वर्ष इंजिनिअरिंग कॉलेज मधे नोकरी केल्या नंतर त्यांनी ती सोडली आणी नंतरचे आयुष्य इतिहास, धर्मचिकित्सा ह्या विषयांना वाहून घेतले. पुरोगामी राष्ट्रभक्त म्हणून त्याना संबोधता येइल. सावरकरांवरच्या सर्व आरोपांना उत्तरे देणारे त्यांचे २ ग्रंथ वाचनीय आहेत. सावरकरांचे हिंदुत्व - सत्य आणी विपर्यास आणी सावरकरांचे समाजकारण एक चिकित्सक अभ्यास अशी त्या ग्रंथांची नावे आहेत. यदी फडके , रावसाहेब कसबे वगैरे पुरोगामी विचारवंतांनी सावरकरांवर केलेल्या टीकेला मोरेंनी दिलेली सडेतोड उत्तरे या ग्रंथांतून मिळतील. दैनिक सामनातून १० वर्षापूर्वी प्रसिद्ध होणारे त्यांचे "अप्रिय पण" हे सदर अजूनही स्मरणात असेल. प्रा मोरेंना सावरकरांचे आंधळे अनुयायी मात्र म्हणता येणार नाही. १८५७ चा जिहाद हे मोरेंचे पुस्तक याची साक्ष आहे.४०० पानांचे हे पुस्तक तब्बल २०० इंग्रजी , मराठी ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेले आहे. ह्यातली एकही ओळ संदर्भाशिवाय लिहिलेली नाही. सावरकरांच्या २५ व्या वर्षी लिहिलेल्या स्वातंत्र्यसमर या ग्रंथात १८५७ मधे हिंदू मुस्लिम ऐक्य झालेले होते असे प्रतिपदित केलेले होते. त्यावेळी सावरकर हिंदुत्ववादी न्हवते. सावरकरांच्या पुस्तकात - दिन दिन च्या घोषणा, हिरवी निशाणे, जिहाद वगैरेंचे उल्लेख शंभराहून जास्त वेळा कौतुकाने आलेले आहेत. मोरेंचे निष्कर्श सावरकरांशी जुळणारे नाहित. मोरेंचे सर्व विचार पटोत अथवा न पटोत पण त्यांचे मुद्दे विचारार्ह आहेत यावर दुमत होण्याचे कारण नाही. भुमितीच्या प्रमेयाप्रमाणे त्यांनी सदर पुस्तक वाक्यावाक्याला मुस्लिम आणी इंग्रज अभ्यासकांचे पुरावे देत लिहिले आहे.




*********************************************************************************************************
१८५७ च्या घडामोडीत वहाबी मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. ख्रिश्चनांच्या विरुद्ध धर्मयुद्ध इस्लामच्या परंपरेत होतेच ते पुनरुज्जीवित करण्याचा वहाबींचा प्रयत्न होता. वहाबींची चळवळ ही भारतातील ईंग्रज राजवटीची शत्रू होती, यात वादच नाही. पण ती इंग्रज विरोधासाठी जन्मलेली चळवळ नाही. भारतातील मुस्लिमांचे राज्य अबाधित रहावे या प्रेरणेची ती चळवळ आहे. या मूळ प्रेरणेसाठी सुरवातीला मराठ्यांचा विरोध, शीखविरोध आणी नंतर इंग्रजविरोध हे टप्पे आपोआप निर्माण झाले.

नरहर कुरुंदकर (जागर,२४०)
*********************************************************************************************************





त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद
(संदर्भ : १८५७ चा जिहाद. प्रा शेषराव मोरे. राजहंस प्रकाशन. )


१. जिहादपूर्व दोनशे वर्ष वर्ष: मौलवींची गुरुशिष्य परंपरा

सम्राट अकबर खर्‍या इस्लामपासून मार्गभ्रष्ट झाला आहे. त्याला पदच्युत करण्यासाठी शेख सय्यद अहमद सरहिंदी या महान धर्मपंडिताचा उदय १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात होतो. राष्ट्रीय पुरुष म्हणून त्यांचा गौरव करताना मौलाना आझाद म्हणतात - "शेख सय्यदांमुळे अकबराच्या गैरस्लामी दिने इलाही चळवळीवर प्राणांतिक आघात झाला व ती कायमची नष्ट झाली". सरहिंदींचे महान विचार होते - राम व रहीम एकत्र मानणे हा मूर्खपणाचा कळस होय. इस्लामचा मान हा कफिरांचा अवमान करण्यात आहे. झिजियाचा खरा उद्देश काफरांची मानहानी करणे हा आहे. सत्यधर्माचा खरा मार्ग (शरा) हा तलवारीच्या धारेखाली असतो.मुजादिद अल सानि या नावाने इतिहास सरहिंदीना ओळखतो.

अकबराचा मुलगा (सलीम) जहांगीर हा बापाचेच धोरण पुढे चालवू पहात होता. त्याविरुद्ध सरहिंदीनी गर्जना केली- " सैन्याने आता बादशहाच्या आज्ञा पाळू नयेत. " आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी सरहिंदींनी शेकडो शिष्य देशभर पाठवून दिलेले होते. जहांगिर भडकला. त्याने सरहिंदींना सरळ बेड्या ठोकल्या. दिल्लीच्या उच्चासनावर बसलेल्या जहांगिराला आपल्या मांडीखाली काय जळतय याची कल्पना नसावी. सरहिंदींच्या शेकडो प्रचारकांनी आपले काम चोख बजावले होते. सैन्यावरील सरहिंदीची पकड असंतोष पैदा करू लागली. झक मारत जहांगिर सरहिंदीना सोडतो; एवढेच न्हवे तर सैन्याचे प्रमूख धर्मोपदेशक म्हणून त्यांची नियुक्ती करतो. इथुन सुरू होतो इतिहासाचा एक वेगळा अध्याय. मुल्ला मौलवींच्या सैन्यावरील पकडीची बखर. धर्मगुरूंच्या राजकीय उलाढालींचा इतिहास. सरहिंदीच्या शिकवणीला आलेले गोंडस फळ म्हणजे शिष्योत्तम औरंगजेब होय.






आजही अनेक अतिरेक्यांना जन्म देणार्या वहाबी चळवळीचा ऐतिहासिक आरंभ हिंदु काफ़िरांच्या विरोधासाठी नाही . सहिष्णू आणि सेक्युलर अकबराच्या विरोधासाठी मौलविंनि उभारलेल्या बंडाचि ती परिणती आहे . 



औरंगजेबाचे राज्य पुढे उताराला लागले. पुढ्चे शतक मुघल साम्राज्याच्या र्‍हासाचे होते. मराठे शिरजोर बनू लागले. सरहिंदींची विचारकूस जन्म देते शाह वलिउल्लाह यांना (१७०३ ते १७६२). पानिपतच्या तिसर्‍या युद्धासाठी अब्दालीला आमंत्रण देताना ते लिहितात - "... थोडक्यात येथील मुस्लिमांची स्थिती शोचनीय झाली आहे. राज्य व प्रशासनाचे सर्व नियंत्रण हिंदूंच्या हातात गेले आहे. श्रद्धाहीन काफरांच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी; हे अमीर ; अल्लाहच्या विनम्र सेवकाची प्रार्थना ऐका". १७६१ चे पानिपत मराठी भाषेत एक वाक् प्रचार बनून उरते पण त्या आधीच १७५७ सालीच प्लासीच्या लढाइत इंग्लंडचा युनियन जॅक डौलाने फडकलेला असतो. आता भारतभर तोच फडकणार असतो. १७६४ च्या बक्सारच्या लढाइनंतर हे चित्र अधिकच स्पष्ट होते. त्यावेळी शाह वलिउल्लाह पैगंबरवासी झालेले असतात. त्यांच्या विचारांचा झेंडा घेउन उभा ठाकतो त्यांचा सख्खा मुलगा. शाह अब्दुल अझीज.


१८०३ साली ब्रिटीश दिल्लीचे स्वामी झालेले असतात. शाह अब्दुल अझीज फतवा जारी करतो - भारत हा आता दार उल हरब (युद्धभूमी) झालेला आहे. त्याला दार उल इस्लाम करणे ओघाने फतव्यात येतेच! दक्षिण आशियाच्या मुस्लिम इतिहासातील सर्वात महत्वाचा व युगप्रवर्तक फतवा म्हणून याचा उल्लेख मुस्लीम अभ्यासक करतात. ह्या फतव्याच्या आधार केवळ १८५७ लाच घेतला गेला असे नाही; १९२१ मध्ये मौलाना आझादांनी याच फतव्याचा उल्लेख करत मुस्लीमांनी ब्रिटिश इंडियातून हिजरत करून अफगाणिस्तान मधे जावे असे म्हटले होते. ब्रिटीशांना हिदुस्थानातून हाकलून द्यावे यासाठी पुकारायचा जिहाद ह्याच फतव्यातून जन्म घेणार होता.


(सरहिंदी) मुजादिद अल सानि चे शिष्य वलिउल्लाह - वालिऊल्लाह पुत्र अब्दुल अझीज चे पटटशिष्य - सय्यद अहमद शहिद - त्यांचे पट्टशिष्य अलिबंधू आणी अलिबंधूंचा पट्टशिष्य म्हणजे बहादुरशहा जफर अशी थेट नाळ जोडता येते.पकिस्तानात ती जोडतात. १८५७ चा उठाव यशस्वी झाल्यास बहादुरशहा जफर हाच हिंदुस्थानचा घोषित सम्राट होता. खुल्क खुदाका, मुल्क बादशहा और अंमल झासी की रानी का अशा टाइपची घोषणा नानासाहेबांनीही दिली होती. १८५७ यशस्वी झाल्यास लोकशाही प्रस्थापित होणार न्हवती किंवा पेशवे हिंदुपदपादशाहीची द्वाही फिरवणार न्हवते. खुल्क कोणाचा ? मुल्क कोणाचा ? आणी अंमल कोणाचा हे आधीच ठरले होते ! मुस्लिम इतिहासकार ही गुरुशिष्य परंपरा फार महत्वाची मानतात. वलिउल्लह यांची चळवळ आज वहाबी म्हणून ओळखली जाते.

ही गुरुशिष्य परंपरा पाकिस्तानात मोगल राजवटी एव्हढीच महत्वाची मानली जाते.
http://storyofpakistan.com/the-mughal-empire/








२. उठावपूर्व स्थिती आणी कारणे :


१८५७ चा उठाव घडण्यासाठी तत्कालिक आणी ऐतिहासिक कारणे दिली जातात.
ब्रिटिशांनी संस्थाने खालसा करणे, आर्थिक पिळवणूक, ब्रिटिशांचा धर्मप्रसार अशी १८५७ ऐतिहासिक कारणे दिली जातात. काडतुसाला गाय आणी डुकराची चरबी लावल्याचे धार्मिक कारण दिले जाते. मुद्दा असा आहे की धार्मिक कारणांनी सर्वसामान्य हिंदू पेटून उठतो काय ? औरंगजेबाच्या सैन्यातले किती हिंदू शिवाजी महाराजांना येउन मिळाले ? अधिकतर संस्थाने कोणाची खालसा झाली होती ? ब्रिटीशांच्या धर्मप्रसाराने कोण अधिक चिडणार होते ? हिंदू की मुसलमान ?
शिवछत्रपतिंचा महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा का पडला होता? हा उठाव मुख्यतः उत्तर भारतात झाला.(झासी, कानपूर, मीरत, दिल्ली, आग्रा, अलाहाबाद). या ठीकाणी प्रामुख्याने कोणाची राज्ये होती ? ब्रिटीशांच्या सैन्याचे तीन विभाग होते. १)मुंबई २) मद्रास ३) बंगाल. सर्व मुख्य उठाव बंगाल तुकडीतच का झाले ? त्यातही त्यात घोडदळच का आघाडीवर होते ? बंगाल घोडदळात कोणाची संख्या लक्षणीय होती ? हिंदू की मुसलमान ?
या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मोरेंनी प्रस्तुत ग्रंथात लिहिलेली आहेत.




**********************************************************************************************************




१८५७ चा उठाव हा वस्तुतः ब्रिटीशांविरुद्ध मुस्लिमांनी घोषित केलेला जिहाद होता. .. हा उठाव सय्यद अहमदनी ब्रिटीश राजवटीमुळे भारत "दार उल हरब" झालेला आहे म्हणून जे आंदोलन सुरू केले होते त्याचे पुनुरुत्थान होय. हा उठाव म्हणजे भारताला "दार उल इस्लाम" करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला प्रयत्न होता.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(समग्र आंबेडकर वाङमय खंड ८ पृष्ठ २९५. महाराष्ट्र शासन)
*********************************************************************************************************










३. १८५७ घटना कशा घडत गेल्या. : सावरकर उवाच 





सावरकरांच्या १८५७ वरील ग्रंथातील काही वाक्ये आपण पाहू . ज्याला तात्याराव सावरकर स्वातंत्र्य युद्ध मानतात त्या १८५७ च्या पुस्तकात तात्यांनिच जिहाद हा शब्द अनेकदा वापरला आहे .  १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहितेवेळी सावरकर २५ वर्षांचे होते. त्यांनी त्यावेळी इस्लाम धर्माचा अभ्यास केला   न्हवता. जिहादचा नीट अर्थही त्यांना त्यावेळी उमगला न्हवता. सावरकर लिहितात : -

जानेवारी १८५७ : बातमी पसरली - गायीच्या आणी डुकराच्या चरबीची नवी काडतुसे येत आहेत. ती दातानी तोडावी लागणार आहेत.

जानेवारी ते मार्च १८५७: बातमीबरोबरच क्रांतीचा गुप्त संदेश देणार्‍या चपात्या फिरवल्या जातात.  १८५७ चे स्वातंत्र्यसमर मधे या चपात्यांना उद्देशून सावरकरांनी म्हटले आहे " जा ,हे क्रांतीच्या देवदूता, तसाच पुढे जा ! आपली प्रियतमा तिच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करण्यास तयार झालेली आहे....ही शुभवार्ता तिच्या लेकरांना कळवण्यासाठी दहादिशांना धावत जा ! तीरासारखा पुढे जा ! ... हे मायावी देवदूता .... (१८५७ - ७५)

१६ मार्च १८५७ : सादिक अल अखबार या दिल्लीच्या व्रुत्तपत्राची हेडलाईन : पर्शियातील दरबारी लोकांनी आपल्या सम्राटाला सल्ला दिला की आपण ब्रिटीशांविरुद्ध जिहाद करून हिंदुस्थान जींकून घ्यावा. याविषयी सावरकर लिहितात - " १८५७ चे आरंभी दिल्लीच्या मशिदींवरून याच अर्थी सार्वजनिक जाहिरनामे फडकू लागले ! ' फिरंग्यांचे ताब्यातून हिंदुस्थानची मुक्तता करण्यासाठी इराणी सैन्य लवकरच येत आहे. तेंव्हा या काफिर लोकांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी समरांगणात उडी घ्यावी" (१८५७ - ६५). हेच सावरकर उत्तरायुष्यात हिंदुत्ववादी झाले. पुढे उत्तरायुश्यात गांधींनी अफगाणिस्तानच्या अमिराला आवताण धाडले होते तेंव्हा सावरकरांनी पायताण उगारले होते.

२९ मार्च १८५७ : मंगल पांडे गोळी झाडतो. (मंगल पांडेचे मार्गदर्शक मित्र म्हणून नक्कीखान आणी वहाबी नेता पीर अली याचा सावरकरांकडून गौरवपूर्ण उल्लेख. ) (१८५७ -६७, २८५)

१० मे १८५७ : मीरत चा उठाव (घोडदळाकडून प्रारंभ). बंडखोर कैदी मुक्त. अनेक ब्रिटिशांना कायमची मुक्ती. याविषयीचे सावरकरांचे भाष्य मुळातुनच वाचण्यासारखे आहे !.

११ मे १८५७ : बंडखोर सैन्य दिल्लीत दाखल. बहादुरशहा जफर ला बादशहा घोषित केले. आज्ञापत्रांवर बहादुरशहाची राजमुद्रा झळकू लागली. " विजयाचा अधिपती ! धर्माची ज्योत ! इस्लामचा संरक्षक - सम्राट मुहंमद बाहदुरशहा." याविषयी सावरकर लिहितात " बादशहाचे राज्याहरोहण म्हणजे जुन्या मोगल सत्तेची पुनःस्थापना न्हवती. ते हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक होते." (१८५७ -२२८)

१९ मे १८५७ : दिल्लीतील सर्व ख्रिश्चनांचे शिरकाण त्यानंतर दिल्लीत हिंदूंविरुद्ध जिहादची घोषणा. सावरकर लिहितात - काही माथेफिरू मुस्लिमांनी हिंदूविरुद्ध जिहादची घोषणा केली. (१८५७ - २३०)

जून १८५७ : उत्तर भारतात बंडाचा वणवा पेटतो. सावरकर लिहितात - लखनौला तर मशिदी मशिदीतून मौलवींनी जिहाद सुरू करण्यासाठी उघड व्याख्याने देत असावे. पाटणा व हैद्राबाद येथे रात्रीरात्रीतून सभा भरत व निरनिराळ्या मौलवींकडून लोकांस स्वातंत्र्ययुद्धाचे व स्वधर्मयुद्धाचे शिक्षण देण्यात येई. (१८५७ - ६६)
१ नोव्हेंबर १८५८ : शिखांच्या मदतीने ब्रिटीश बंड चिरडतात राणीचा जाहिरनामा प्रकाशित. सावरकर - शिखांनी देशद्रोह केला असे म्हणतात. (१८५७ - १२४)


(१८५७ -१२४ हा संदर्भ समग्र सावरकर वाङमय खंड चार १८५७ चे स्वातंत्र्यसमर पृष्ठ १२४ असा वाचावा. वीर सावरकर प्रकाशन, मुंबई. १९६३)








शिखांच्या भूमिकेबद्दल सरदार खुशवंतसिंगांचे विचार - 

" मीरत आणी दिल्लीच्या बंडखोरांनी मोगल साम्राज्याच्या पुनःस्थापनेची घोषणा केली. आपल्या वाडवडिलांवर मोगलांनी केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या एकत वाढलेल्या शिखांचा - बहादुरशहा जफर सम्राट होण्याला तीव्र विरोध होता. शिखांनी दिलेल्या संरक्षणात होडसन ने राजपुत्रांना ठार केले. शीखांनी त्या बहादुरशहापुत्रांची प्रेते चांदनी चौकात लटकवली ..... त्याच ठीकाणी.... जेथे गुरु तेग बहादुरांना औरंगजेब बादशहाने ठार केले होते."
शिखांनी हा सूड उगवला होता : मेलेल्या मुस्लीमांच्या प्रेतांवर एक एक सपाटे लगावित ते ओरडत होते - हा घ्या गुरु गोविंदसिंगांसाठी... आणी हा ... आणी हा ..आणी हा ... तीन गुरुंसाठी.








४. ऊठावाचे प्रेरक, नायक आणी लाभधारक हिंदू की मुसलमान ?




नानासाहेब पेशवे : २० एप्रिल १८५९ रोजी नानासाहेबांनी ब्रिटिशांना लिहिलेले पत्र प्रामाणिक आणी वीरश्रीयुक्त आहे:
" मी असहाय्य म्हणून बंडखोरांना मिळालो ... सैनिक माझ्या (मूळ) प्रदेशातले न्हवते.... दबावाखातर मला बंडखोरांना मिळणे भाग पडले.... आता माझा नाईलाज आहे. मी तुमच्याशी लढायला तयार आहे.मी एकटाच राहिलो आहे. आपली लौकरच गाठ पडेल आणी त्यावेळी तुमचे रक्त सांडून ते गुढगाभर खोल साचेल. तुमच्यासारख्या सामर्थ्य वान राष्ट्राचा मी शत्रू आहे याचा मला अभिमान आहे. मरण तर एके दिवशी यीलच, त्याला भितो कोण ?"

नानासाहेबांचे हे निर्वाणीचे पत्र त्यांचा स्वदेशाभिमान आणी शौर्य तर दाखवतेच पण ते कोणत्या परिस्थितीत १८५७ च्या बंडात सामिल झाले ते ही दाखवते. हे माफीपत्र नाही. गनिमीकावा नाही. ब्रिटीशांना दिलेले उघड अव्हान आहे. नाइलाजाने आपण बंडात सामिल झालो असेच नानासाहेब म्हणतात.
फौजेची घोषणा होती - खुल्क खुदाका, मुल्क बादशहा , हुकुम नानासाहेब और फौज बहादुरका




तात्या टोपे  यांनी म्हटले आहे : पायदळाच्या आणि दुसर्‍या घोडदळाच्या तुकड्यांनी आम्हाला घेरले आणी नाना व मला खजिन्याच्या खोलित कैदी म्हणून ठेवले. त्यानंतर बंडवाल्यांनी आम्हाला बरोबर नेले.






झाशीची राणी नाइलाजाने युद्धात पडली पण शेवटच्या हौतात्म्याने भावी पिढ्यांसमोर आदर्ष निर्माण करून गेली.
तात्या, नाना किंवा झाशीची राणी देशभक्त आणी स्वाभिमानी होते यात शंका नाही; १८५७ च्या उठावात ते नाखुशीने आले पण आपल्या तेजाने झळाळून उठले.

१८५७ सालीच इंग्रज पराभूत झाले असते तर ? या देशात लोकशाही येणार होती काय ? हिंदुपतपातशाही येणार होती काय ? या प्रश्नात अजून एक प्रश्न आहे..... तर देशाचे भविष्य काय असते ?

हमीरपुरचा अलिबक्ष, बांद्याचा नवाब, मौलाना लियाकत अलि, हाजी इमादुल्लाह, बुलंदशहरचा वलिदाद खान, आग्र्याचा वजिर खान्,अलिगडचा गौस मुहम्मद खान, अयोध्येचा मौलाना अहमदशहा, आझमगडचा मुझफ्फर जहान; गोरखपूरचा मुहम्मद हसन, राहतगडचा नवाब, मुरादाबाद चा मज्जूखान हे या उठावाचे ऊठावाचे प्रेरक, नायक आणी लाभधारक होते.

हिंदुस्थानचा घोषित बादशहा होता : बहादुरशहा जफर




हे छायाचित्र १८५८ चे इंग्रजांच्या कैदेतल्या बादशहाचे आहे. बादशहा शायर होता. बादशहाला कैदेत टाकले. त्याच्या दोन मुलांची शिरे कापून ती त्याच्या समोर पेश करण्यात आली. त्यावेळी इंग्रजांचा एक हुजर्‍या बादशहाला म्हणतो,

"दमदमाये में दम नही अब खैर मानो जान की !
ऐ जफर, ठंडी हुई अब तेग हिंदुस्थान की !!"

त्यावर उसळून डोळ्याचा अंगार फेकीत बादशहाने दिलेला जवाब इतिहास सांगणारा मंत्र ठरला.

"गाजीयों में बू रहेगी जब तलक ईमान की !
तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की !!"

यातल्या गाजी आणी इमान या शब्दांचे अर्थ जरूर पहावेत.
http://www.islambasics.com/view.php?bkID=999999&chapter=9


५. उठाव काळातील जिहादी जाहिरनामे

या जाहिरनाम्यांचा सर्वधर्मसमभावी म्हणून गौरव केला जातो. संख्या शेकड्यात आहे. विस्तारभयास्तव केवळ बहादुरशहा व नानासाहेबांचे मोजके सर्वधर्मसमभावी जाहिरनामे बघू.

बहादुरशहाचे जाहिरनामे :

@ इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सामिल होणे हे हिंदू व मुसलमान यांचे अनिवार्य कर्तव्य आहे.
@विविध मार्गांनी येथील धर्माना नष्ट करण्याचे काम इंग्रज करत आहेत. तेंव्हा सर्व हिंदूनी गंगा, तुळस व शाळिग्राम यांची तर सर्व मुस्लिमांनी खुदा व कुराण यांची शपथ घ्यावी की; इंग्रजांना ठार मारणे हे आपले धर्मकर्तव्य आहे.
(येथे मुस्लिमानी खुदाची अन कुराणची शपथ पण हिंदूंनी मत्र आपल्या देव आणी धर्मग्रंथांची शपथ न घेता झाडे, नदी अन दगडाची शपथ घ्यायची आहे. अल्लाशिवाय इतर सर्व देव हे सैतानाची रूपे आहेत हा वहाबी विचार यामागे आहे. अल्लसोबत इतर देवताना मान देणे यास शिर्क असे म्हणतात कट्टरवाद्यांच्या लेखी तो महान गुन्हा आहे. )
@ रोहिलखंडाच्या नवाबाला पठवलेल्या आदेशात बहादुरशहा लिहितो - खुदाच्या क्रुपेने हिंदुस्थानातून कुफ्र व शिर्क यांचे उच्चाटन झाले असून इस्लामची प्रस्थापना झाली
.. आता शरियत विरोधी एकही गोष्ट घडता कामा नये.



नानासाहेबांचे जाहिरनामे :

@ सर्वश्रेष्ठ व सर्वशक्तीमान खुदाच्या कृपेने व बादशहाच्या शत्रुसंहारक सुदैवाने ... ख्रिश्चन लोकाना पकडून नरकलोकी पाठवण्यात आलेले आहे. त्याबद्दल आनंद साजरा केला पहिजे.
@काफिर इंग्रज या देशात व्यापार करण्याच्या मिशाने आले
@ दयामाया न दाखवता काफिरांची कत्तल करा त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल.
हि शिकवण नानासाहेबाच्या धर्माची नाही हे उघड आहे. आणी त्याच्या नावाने कोण जाहिरनामे काढत होता हे पुस्तकात उलगडले आहे.





६. ऊठाव काळातील हिंदू मुस्लिम संघर्ष

बहादुरशहाचा पुत्र व गादीचा सांभाव्य वारस जवानबख्त याने - एका वेळेस एक शत्रू - हे धोरण स्पष्टपणे व्यक्त केले होते. " काही दिवसांतच आम्ही काफिर इंग्रजांना पायाखाली तुडवू व त्यानंतर हिंदूंना ठार करू." (तळटीप पान १६७)
ब्रिटीशांना हाकलून देण्यासाठी हिंदूंच्या सहकार्याची आवश्यकता होती; तेंव्हा त्यांना चुचकारून धक्क्याला लावण्यात आले. पण वहाबींची मूळ प्रेरणा इस्लामी मूलतत्ववादाची असल्याने एकतेचे गारूड फार काळ टिकले नाही.
उठावकाळातील हिंदू मुस्लिम संघर्ष मोरेनी २० पानात लिहिला आहे.



*******************************************************************************************************
हिंदू मुस्लिमात संघर्ष न होणे देशासाठी आवश्यक आहे. पण हा सत्यशोधन टळणे हा त्यासाठीचा मार्ग न्हवे. १८५७ चा जिहाद हे पुस्तक पूर्ण वाचल्यानंतरच मोरेंचा जिहाद नेमका कशाविरुद्ध आहे ते कळू शकेल.
******************************************************************************************************

 - डॉ. अभिराम दीक्षित, पुणे 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html


९ टिप्पण्या:

  1. बंडाचा मुख्य कणा म्हणजे इंग्रजांच्या सैन्यातील भारतीय शिपाई. त्यांत मुस्लिम बहुसंख्य होते काय? हिंदु सैनिकांची प्रेरणा कोणती होती? या सैनिकांनी नेहेमी ग्रितिश ऑफिसर्सच्या हाताखाली लढाया केल्या होत्या. बंड केल्यावर त्याना Leadership उरली नाही. मग त्यानी नानासाहेब, लक्ष्मीबाई याना पुढारी केले. नानासाहेबाला तरी लढायांचा अनुभव कोठे होता? ख्यालीखुशालीत आयुष्य गेले होते. लक्ष्मीबाईने अंगभूत गुणांच्या जोरावर, अनुभव नसूनहि, अशा दर्जाची Leadership दिली कीं ज्याचे इंग्रजांनीहि कौतुक केले. अखेर हे मुख्यत्वे 'शिपायांचे बंड'च होते हे मान्य केलेले बरे.

    उत्तर द्याहटवा
  2. abhiram saheshrao more sahebannche "muslim manacha shodh" mi vachle ....... zzzzzzzabardast..... jar prateek mansane tesecular pustak

    vachle tar bhartacha kharach hindustan hoil....

    उत्तर द्याहटवा
  3. really hats of you sir....very nuch deep and versatile study is needed for such article..... i m not judging you(its not my level).....but really nice and some what different from others......really unbiased....nice.....

    उत्तर द्याहटवा
  4. काय हां पराकोटीचा मुस्लिमद्वेष! मुस्लमानांच्या विरुद्ध खरेखोटे पुरावे देऊन आणि इतिहासाची तोड़मरोड़ करून संघी चड्डीवाले आज सत्तेवर आलेत.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अरे अनाम सेक्युलर मित्रा . प्रस्तुत लेखात बाबासाहेबांचे १८५७ बद्दलचे आकलन योग्य आहे आणि साव्र्करांचे चुकले आहे असे म्ह्टले आहे . इथे चड्डी संघ यांचा काय संबंध . यातले एकही विधान पुराव्या शिवाय केलेले नाही . एका जरी पुरावा मी दिलेला खोटा निघाला तर यापुढे लिहिणे बंद करेन . फालतू बकवास बंद कर नाही तर कोणते विधान चूक आहे ते सांग . तुझ्यासारखे फेक्युलर आणि बात्रा सारखे मोड्युलर यात काही फरक आहे असे मला वाटत नाही . अभ्यास करायला नको . पुरावे द्यायला नको . हेत्वारोप करून मोकळे . तुमच्या सारख्या मुर्खांचि सद्दी राजकारणातून तर कधीच संपली आहे … आता बाळबोध फुर्रोगाम्याना इतर क्षेत्रातही कोणि विचारणार नाही आहे .
      --------------------------
      १८५७ चा उठाव हा वस्तुतः ब्रिटीशांविरुद्ध मुस्लिमांनी घोषित केलेला जिहाद होता. .. हा उठाव सय्यद अहमदनी ब्रिटीश राजवटीमुळे भारत "दार उल हरब" झालेला आहे म्हणून जे आंदोलन सुरू केले होते त्याचे पुनुरुत्थान होय. हा उठाव म्हणजे भारताला "दार उल इस्लाम" करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला प्रयत्न होता.
      - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
      (समग्र आंबेडकर वाङमय खंड ८ पृष्ठ २९५. महाराष्ट्र शासन)

      हटवा
  5. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. मुसलमानांसाठी तो जिहाद असेलही पण नानासाहेबआणि लक्ष्मीबाईंसाठी तो काय होता? स्वत:चे राज्य (म्हणजे करवसुली हा धंदा असलेली व सैनिकी कर्मचारी असलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी) वाचविण्यासाठी शेवटच्या क्षणी नाईलाज म्हणून केलेला संपूर्णत: स्वार्थप्रेरित संघर्षच ना? त्यात देशभक्ती, हिंदुत्व, रयतेचे कल्याण वगैरेंचा लवलेशही कोठेही दिसत नाही. त्याचा एवढा इश्यू तो काय? ब्रिटिश राज्यच अनेक पटींनी उजवे व दूरगामी विचार करता अत्यंत फायदेशीर होते.

    उत्तर द्याहटवा
  7. खुप छान प्रांसगिक मांडणी केली आहे...! जिहाद म्हणजे प्रत्येकाच्या नजरेतून वेगळा होता पण आजच्या परिस्थिती जिहाद म्हणजे फक्त दहशतवाद निर्माण करणे हे स्पष्ट दिसते...! भारत स्वातंत्र होण्याआधी ब्रिटीश साम्राज्य हुकूमशाहीने व दडपशाहीने करत असतील तर ते अमान्य होते पण हिंदू व मुस्लिमांच्या इतिहासातील काहाणी कशा रक्तरंजित करुन सांगितल्या जातात जेणे करुन दोन र्धमात पेट व्हावा आज परिस्थिती बदली आहे स्वातंत्र मिळून ६४ वर्ष पुर्ण झाली तरी देखील काय चित्र बदले हे सर्वाना माहित आहे या प्रसंगाचा आजच्या समाजा परिस्थितीशी बघितले तर दुसरे स्वातंत्र समर सुरु होईल असे वाटणे चुकीचे नाही...! खुप छान वाचून बर्‍याच गोष्टी कळण्यास मदत झाली

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *