गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?
(मला समजलेले गांधीजी भाग २ )
******************************************************************************************************************************************************************
संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची दहावी आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे. द न गोखले यांचे डॉ आंबेडकरांचे अंतरंग हे हि पुस्तक संदर्भ म्हणून वापरले आहे .
******************************************************************************************************************************************************************
गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष अटळ होता . एक दलितांचा नेता आणि दुसरा सवर्ण हिंदुंचा पुढारी यात गुलुगुलु गुलाबी ऐक्य शक्य नव्हते . त्याला सामाजिक कारणे जवाबदार होती . हा संघर्ष कधी निर्माण झाला ? कसा निर्माण झाला ? कसा वाढत गेला ? आणि कधी संपला ? हे आपण प्रस्तुत लेखात पहायचे आहे .
आजच्या दलितांनी गांधिंचा द्वेष करण्याचे कारण नाही आणि सवर्णांनी आंबेडकरांचा किंवा आजच्या दलितांचा राग धरू नये .म्हणुन हि धडपड.
हिंदु महासभा हा हिंदुंचा पक्ष म्हणणे तत्व म्हणुन ठिक आहे . पण लोकशाहीच्या राजकारणात हा एक जोक ठरत असतो . ज्याला लोक मते देतात तो पक्ष त्या समाजाचा असतो . सवर्ण हिंदुंनि फ़ाळणिपुर्वि आणि फ़ाळणिनंतरहि गांधिबाबाच्या कोग्रेसला मते टाकलि होती. तत्कालीन सवर्ण हिंदुंचा पुढारी - लोकनियुक्त पुढारी गांधी होता .
आंबेडकर गांधिंकडे सवर्ण हिंदुंचा नेता म्हणुनच पहात होते . तत्कालीन हिंदुंच्या हृदयावर गांधीच राज्य करत होते. हे सत्य एकदा मान्य केले कि पुढे जाता येईल . आंबेडकरांचा प्रश्न वेगळा होता. दलित समाजातल्या एका घटकाने त्याकाळी त्यांना पुढारी मानले होते . त्या काळाचा विचार आंबेडकरांनि राजकारणात प्रवेश करण्या आधीपासून केला पाहिजे. आणि त्या आधी परिस्थिती, अनुभव, वाचन आणि विचार करून माणुस सतत बदलत जात असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे .
महाडचा धर्म संगर : फक्त गांधिजिंचि तसबीर
चवदार तळ्यासाठी केलेला सत्याग्रह हि बाबासाहेबांच्या संघर्षातलि पहिली मोठी लढाई . २५ डिसेंबर १९२७ रोजी ह्या लढ्याला आरंभ झाला. ७ - ८ हजार माणसे जमली होती . मंडपात येताना शिवाजी महाराज कि जय ! आणि गांधीजी कि जय ! अशा घोषणा देण्यात येत होत्या . यावेळी मंडपात फक्त एकाच नेत्याची तसबीर विराजमान होती - गांधीजी ! (खैरमोडे ३ - १५९ )
आपल्या तडाखेबंद भाषणात बाबासाहेब म्हणतात -
" चवदार तळ्याचे पाणि प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही . आजपर्यंत ते प्यायलो नव्हतो तेंव्हा काही मेलो नव्हतो . इथे आम्ही पाणि पिण्यासाठी जमलेलो नाही . आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी जमलो आहोत. हि सभा समतेची आहे ...
हिदू समाज समर्थ करायचा असेल तर चातुर्वण्य व असमता यांचे उच्चाटन करून हिंदु समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारण्याचा मार्ग हा हिंदु समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणुन मी म्हणतो - कि आपले कार्य जितके स्वहिताचे आहे , तितकेच राष्ट्र हिताचे आहे . …. हि सभा हिंदु समाजाचे संघटन करण्यासाठी बोलावली आहे. " (बहिष्कृत भारत ३-२ - २ ७ )
या काळात बाबासाहेब गांधी आणि गांधिविचार दोन्हीही मानत असलेले दिसतात. माहाडच्या धर्म संगराला बाबासाहेबांनी सत्याग्रह म्हटले होते . हे हि ध्यानात ठेवले पाहिजे . " सत्याग्रह हि विचारसरणी आम्ही गीतेतून घेतली असून . गीता हा धर्म ग्रंथ म्हणुन आम्हाला मान्य आहे " - बाबासाहेब (बहिष्कृत भारत - २५ - ११ - २ ७ ). याच परिषदेत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली .
१९ २ ७ सालीच बाबासाहेबांनी दादरच्या गणेशोत्सवात भाषण केले होते . आणि विरोधकांच्या बंदोबस्तासाठि खिशात पिस्तुल बाळगले होते! (खैरमोडे २ - १ ४ ९ )
हिंदु राहून समता प्राप्त करणे आणि त्यासाठी लढा देणे हे आंबेडकरांचे धोरण १९ २ ७ साल पर्यंत स्पष्ट दिसते आणि हिंदु पुढारी - गांधी हे आपले विरोधक आहेत असे आंबेडकरांना त्याकाळी वाटत नव्हते हे हि स्पष्ट होते .
हिंदु समाज समर्थ आणि संघटित करण्याची मनीषा आंबेडकरांनि या काळात अनेकदा बोलून दाखवली आहे.
काळाराम ते सायमन : ठिणगी पेटली
काळा राम मंदिर प्रवेशासाठी अस्प्रुश्यांचा संघर्ष चालू होता. त्यावेळी आंबेडकरांनि गांधिंना सवाल केला होता - " मंदिर प्रवेशाचा प्रश्न मिटल्या नंतर जेंव्हा अस्पृश्य लोक जातीच्या आणि चातुर्वणाच्या उच्चाटनाचा प्रश्न हाती घेतील . तेंव्हा महात्माजी कोणाच्या बाजूने उभे राहतील ? "
हा सवाल फक्त गांधीना नव्हता. पुर्या हिंदु समाजाला होता.
गांधीजी उत्तरले - " मी मानत असलेल्या हिंदु धर्मात उच्च नीचता नाही पण डॉ आंबेडकरांना वर्णाश्रमाशि झगडा करायचा असल्याने मी त्यांच्या पक्षाला राहू इच्छित नाही. कारण वर्णाश्रम हा हिंदु धर्माचा अभिन्न भाग आहे, अशी माझी श्रद्धा आहे . " (कीर - २ ३ ९ )
गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष इथून सुरु होतो.
(सनातनी हिंदु धर्माला डांबर फासत आहेत . गांधीजी ते कष्टाने पुसू पाहत आहेत आणि आंबेडकर त्याचा पाया असलेल्या वर्ण व्यवस्थेवर हातोड्याने घाव घालत आहेत. ब्रिटीश लांबून मजा बघत आहेत- तत्कालीन व्यंगचित्र )
सायमन आयोग :
हा आयोग भारताला कोणत्या बाबतीत स्वायतत्ता द्यावी याचा विचार करण्यासाठी होता . बहुतेक सर्व राजकीय पक्षांनि त्याला अनेक मर्यादा आहेत म्हणुन विरोध केला . बहिष्कार घातला . आंबेडकरांनि मात्र सायमन आयोगाला सहकार्य केले आणि त्याला एक लांबलचक निवेदन नेउन दिले . का ? हा आंबेडकरांचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी द्रोह होता का ? काय होते त्या निवेदनात ? या प्रश्नांचि उत्तरे पहाण्या आधी एका घटनेची नोंद केली पाहिजे .
सायमन गो ब्याक ! म्हणत आंदोलन करताना लाला लजपत राय यांच्या छातीवर ब्रिटिश पोलिसी दंडुके बसले. त्याबद्दल ७ डिसेंबर १ ९ २ ८ च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात श्रद्धांजली वाहताना बाबासाहेब म्हणतात - " लाला लजपत राय यांनी राजकारण आणि समाजकारण यात फारकत करून आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही .त्याकाळी लालाजिंचा आर्य समाज मुस्लिमांच्या आक्रमणापेक्षा जातीभेदादि हिंदु समाजाच्या अंतर्गत दोषांकडे अधिक लक्ष पुरवत असे . अस्पृश्यांच्या चळवळीबद्दल लालाजिंचि सहानुभूती कळकळीची होती "
१ ९ २ ७ ते ३ ० या काळात बाबासाहेबांच्या विचारात बदल घडू लागलेला दिसतो . त्यांना अजून हिदू समाजाकडून आशा आहे पण गांधिविरुद्ध मत बनू लागले आहे . ठिणगी पेटली आहे .
******************************************************************************************************************************************************************
विभक्त मतदार संघ म्हणजे काय ?
भारातात सध्या जी लोकशाही आहे त्यात संयुक्त भौगोलिक मतदार संघ आहेत . काही जागा मागास उमेदवारांना राखीव आहेत . पण प्रत्येक उमेदवारासाठी सर्व जाती धर्माचे लोक मत देतात . त्यामुळे निवडणुकीतल्या उमेदवाराला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते.
विभक्त मतदार संघ म्हणजे काही जातीना वेगळे मतदार संघ . आजच्या पदवीधर मतदार संघात ज्याप्रमाणे पदवीधर उमेद्वरांसाठि केवळ पदवीधर च मतदान करतात त्याप्रमाणे - दलित उमेदवारासाठी केवळ दलितांनी मतदान करणे म्हणजे - विभक्त मतदार संघ.
ब्रिटिशांना दिलेल्या सायमन कमिशनच्या निवेदनात बाबासाहेब लिहितात -
" १ ) आज अस्पृश्य समाजाच्या समस्या वेगळ्या असल्याने ते हिंदु समाजापासून वेगळे आहेत
२) मात्र अस्पृश्यांसाठी मागितलेल्या मागितलेल्या सवलती तात्पुरत्या आहेत . सर्व भारत शेवटी एका व्हावा . " (गोखले १ १ ८ )
या काळात आंबेडकरांनि विभक्त मतदार संघाला कडाडून विरोध केलेला आहे. आणि राखीव जागा मागितलेल्या आहेत .
निवेदनात बाबासाहेब म्हणतात - विभक्त मतदार संघ हे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. विभक्त मतदार संघात निवडुन गेलेले उमेदवार सभागृहात सर्वांसाठीच कायदे करतात . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांबद्दल कायदे करण्याचा हक्क विभक्त मतदार संघातल्या उमेदवारांना मिळतो . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांवर राज्य करणे हि कुठली लोकशाही ? ( Dr Ambedkar Writings and Speeches. Vol 2 pg 344 - 366, 1982)
ह्या निवेदनात बाबासाहेबांचा लोकशाहीवाद आणि राष्ट्रवाद अनेकवार व्यक्त झाला आहे . पण सायमन शी सहकार्य केले म्हणुन त्याकाळी बाबासाहेब देशद्रोही असल्याची चुकीची टिका कोंग्रेसि वर्तमान पत्रांनी केली होती .
गोलमेज परिषद : वणवा पेटला
सायमन आयोगापुढे ३७ दलित संघटना गेल्या होत्या. त्यापैकी ३५ संघटनांनि विभक्त मतदार संघांचि मागणी केली होती . आंबेडकरांनि आपले वैयक्तिक मत बाजूला ठेवत पुढे लोकमताला मान दिला . (खैरमोडे ४ - १ ४ १ . १ ४ २ ) आणि गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी दलितांना विभक्त मतदार संघ मागितले . लोकमताच्या रेट्यात बाबासाहेबांनी बदललेला हा निर्णय आहे .
इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत . जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधीबाबा बद्दल हि खरे आहे.
******************************************************************************************************************************************************************
प्रौढ सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय ?
ब्रिटिश राजवटीत हि निवडणुका होतच होत्या पण मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता. ठराविक जमीन ठराविक शिक्षण असलेलेच लोक मतदान करू शकत . या गाळण्यांमूळे बहुसंख्य दलितांना मतदानाचा हक्क मिळत नव्हता आणि त्यामुळे राखीव जागांवरुन निवडुन जाणारे दलित उमेदवारही सवर्णांचे चमचे असत.
प्रौढ मताधिकार म्हणजे १८ / २१ वर्षे वयाच्या सर्व भारतियांना मतदानाचा अधिकार असणे . प्रौढ माताधीकारात सर्व दलितांनाहि मतदानाचा हक्क मिळतो आणि अस्पृश्य हिताबद्दल जागरूक असणारे उमेदवार निवडुन जाणे सोपे होते , असे आंबेडकरांचे मत होते .
******************************************************************************************************************************************************************
स्वत:चे विभक्त मतदार संघाबद्दलचे प्रतिकूल मत राजकारणी आंबेडकरांनि बदलले . गांधिंमधल्या अट्टल राजकारणी पुरुषा बद्दल तर कोणालाच शंका नाही ! राजकारणात स्वत:च्या लोकांचा अनुनय करावा लागतो . हा लोकशाहीचा साइड इफ़ेक्ट आहे !
गांधीनी सवर्णांच्या भावना बोलून दाखवत दलितांच्या विभक्त मतदार संघाला विरोध केला असे काहिंना वाटते. प्रौढ मतदानाचे नाव सुद्धा नसताना केवळ उच्चशिक्षिताना मतदानाचा अधिकार असताना - आंबेडकरांची नवी मागणी चुकीची होती असे म्हणता येणार नाही. पण जर दलितांना विभक्त मतदार संघ दिले तर उद्या सर्वच जाती स्वत:चे वेगळे मतदार संघ मागतील -प्रत्येक जात स्वत:चे उमेदवार निवडुन देऊ लागली तर - उमेदवारांना सर्वसमावेशक भूमिका घेण्याची काहीच गरज उरत नाही त्यामुळे जातीवादी उमेदवारच निवडुन येतील आणि ते देशाचे तुकडे पाडतील हि गांधिजिंचि भीती हि अनाठाई नव्हती.
गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष पेटु लागला आणि त्यातच उभयतांचि भेट ठरली.
वादळी भेट आणि जळते उद्गार
इथे एका विनोदी गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे . हि भेट संपेस्तवर आंबेडकर हे अस्पृश्य समाजातले आहेत हेच गांधीना माहित नव्हते. (कीर १८०) गांधीजी आंबेडकरांना पुण्याचे पुरोगामी ब्राह्मण समजत असत ! आंबेडकरांच्या शैक्षणिक डिग्र्यांकडे पाहून गांधिंनि हा ग्रह करून घेतला होता कि आंबेडकर या ब्राह्मण आडनावामुळे गांधिंचा तसा ग्रह झाला होता ते सांगता येत नाही . ( आं - बा -व -डे -क - र हे मुळ नाव बदलून त्यांच्या एका प्रेमळ ब्राह्मण गुरुजीने आंबेडकर असे स्वत:चे नाव दफ्तरी लावले होते. आंबेडकरांनि तेच पुढे कायम ठेवले)
पण गांधिंचा समज आंबेडकर हे एक पुरोगामी ब्राह्मण गृहस्थ आहेत असा होता! आणि पुरोगामी ब्राह्मण हा प्राणि राजकारणात फारशी किंमत द्यायच्या लायकीचा नसतो ! कदाचित यामुळेच या भेटीत गांधिंच्या अजब पुर्वग्रहामुळे मोठे नुकसान झाले असे मानायला जागा आहे ! आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांनी गांधी भानावर आले आणि ते अस्पृश्य समाजातले आहेत काय ? अशी सहकार्यांकडे विचारणा केली .
कादाचित हा - पुरोगामी ब्राह्मण कशापाई नसती उठाठेव करतो आहे ? कशासाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या लष्कराच्या भाकरी भाजतो आहे ? अशा भावनेतून गांधीनी भेटीची सुरवातच थोडी कडक केली. आंबेडकरांचि पार्श्वभूमी माहित नसल्याने - कोणत्या परीस्थित आणि दबावात हा निर्णय घेतला हे गांधिंना कळलेले नसणार . सुरवातीला त्यांनी आंबेडकरांकडे चक्क दुर्लक्ष केले आणि दुसर्याच कोणाशीतरी सुत कताइबद्दल बोलू लागले. थोड्या वेळाने गांधी म्हणाले " आंबेडकर तुमचा जन्म व्हायच्या आधीपासून मी अस्पृश्यांसाठी काम करतो आहे . (तेंव्हा मला शहाणपणा शिकवू नये ! ) कोग्रेसने अस्पृश्यांसाठी विस लाख रुपये खर्च केलेले आहेत.
अशाप्रकारच्या बोलण्याने आंबेडकर चांगलेच व्यथित झाले असणार. त्यांनी चिडून गांधिंना खडे बोल सुनावले शेवटी म्हणाले " ज्या देशात आमच्या समाजाला कुत्र्यापेक्षा वाइट वागणुक मिळते त्या देशाला मी मायभूमी म्हणु शकत नाही , गांधीजी मी पुन्हा सांगतो - मला मायभूमी नाही !"
या वादळी भेटीमुळे - गांधिंच्या दुर्लक्ष करण्यामुळे आणि आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांमुळे या दोनही महान नेत्यात तयार झालेला व्यक्तिगत दुरावा बराच काळ टिकला.
पुणे करार : कौन जिता … कौन हारा
आंबेडकरांनि विभक्त मतदार संघांचि मागणी सोडुन द्यावी म्हणुन गांधिजिंनि उपोषण सुरु केले. ज्याच्या मागे जवळजवळ सारा सवर्ण समाज आहे त्याचा मृत्यू झाला तर गावोगावच्या अस्पृश्यांना काय झेलावे लागले असते ? आंबेडकरांसमोर पुणे करारावर सही करण्याशिवाय कोणता पर्याय होता ?
ताणलेले दोर
पण त्या आधी एका भानगडिचा वेध घेणे आवश्यक आहे. ती भानगड म्हणजे राजा - मुंजे करार होय . एम सी राजा हे एक अस्पृश्य पुढारी होते . राजा आणि त्याच्या सारख्या इतर अस्पृश्य पुढार्यांच्या दबावामुळेच आंबेडकरांना आपली मुळातली सायमन कमिशन समोरची भूमिका बदलत विभक्त मतदार संघाना पाठिंबा द्यावा लागला होता . हेच राजा आता गटबाजीचे राजकारण खेळले . आणि स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी त्यांनी डॉ मुंजे या हिंदु महासभेच्या पुढार्याबरोबर एक करार केला. या करानुसार अस्पृश्यांना विभक्त मतदार संघ नको . वाढीव राखीव जागा हव्या अशी मागणी केली !
आता आंबेडकरांसमोर मोठा पेचप्रसंग होता . महाराष्ट्रातल्या महार समाजाचा पुर्ण पाठिंबा आणि मराठि दलीतात बर्यापैकी वजन या आंबेडकरांच्या जमेच्या बाजू असल्या तरी अखिल भारतीय पातळीवर त्या क्षणापर्यंत तरी आबेडकर हे सर्व दलितांचे एकमुखी नेते नव्हते . अखिल भारतीय पातळीवर दलितांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना राजा सारख्या अंतर्गत गटबाजांबरोबर हि राजकाराण भोगावे लागत होते . पंचाइत अशी कि राजा मुंजे करार मान्य केला तर आंबेडकरांनि राजाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य केलेले आहे आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व अधिकार राजा कडे आहेत असा सरळ अर्थ निघत होता . राजा आणि मुंजेंचि तीच राजकीय चाल होती . आता आबेडकरांना चटकन विभक्त मतदार संघाची मागणी सोडणे अशक्य झाले . राजा सारख्या गटबाज व्यक्ती च्या हाती राष्ट्रीय दलित चळवळीची सूत्रे देण्याचा गलथान पणा आंबेडकर करणे शक्य नव्हते.
त्यामुळे आंबेडकरांनिहि विभक्त मतदार संघाचा मुद्दा ताणून धरला आणि गांधिंना प्राणांतिक उपोषण करण्या पर्यंत परिस्थिती ताणावी लागली.
परिस्थिती विकोपाला जाऊ लागली . गांधिजिंना कोणत्याहि परीस्थित जातीय तत्वावर विभक्त मतदार संघ नको होते . आणि आंबेडकर एका विचित्र राजकीय परिस्थितीमुळे झटकन निर्णय फिरवू शकत नव्हते. गांधिंचि तब्येत खालावू लागली . परिस्थिती स्फोटक बनू लागली. गांधिंचा मृत्यू ओढवला असता तर गावोगाव सवर्ण दलित दंगली पेटल्या असत्या . बाबासाहेबांसारख्या लोकशाहीवादी नेत्याला दंगली होणे कदापि मंजुर नव्हते त्यामुळे त्यांनी पुणे करारावर सही केली .
व्यथित होऊन आंबेडकर म्हणाले होते " हे कोंग्रेस वाले माझे राजकीय जीवन संपुष्टात आणतील आणि मग तेच दलितांचे पुढारी होतील " ( खैरमोडे ५ - ३१ )
पुणे करारावर सही - हा आंबेडकरांचा राजकीय पराभव होता काय ? त्यांच्या सहकार्यांना तेंव्हा तसेच वाटले आजही आंबेडकर वाद्यांच्या हृदयातली ती एक भळभळति जखम आहे . त्यामुळे मने तुटली आहेत . पण सत्य काय आहे ?
अंतिम विजय कोणाचा ?
पुणे करारामुळे विभक्त मतदार संघ रद्द झाले आणि संयुक्त मतदार संघ आले असा बर्याच लोकांचा भ्रम असतो . ते खरे नाही . पुणे करारा मुळे संयुक्त आणि विभक्त मतदार संघाचे एक आगळेच फ्युजन जन्माला आले . त्यानुसार -
१) दोन स्तरीय निवडणुक पद्धती आली . अस्पृश्यांनी स्वत:चे चार उमेदवार निवडायचे (विभक्तपणे) आणि त्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या चारपैकी एक उमेदवार (संयुक्तपणे ) निवडायचा. या कलमामुळे सवर्णांचे चमचे निवडुन जाण्याचा धोका आंबेडकरांनि टाळला. आणि खरे पाहता आंबेडकरांचा मुलभुत विचार गांधिंनि मान्य केला.
२) या करानुसार अस्पृश्यांना १ ८ टक्के राखीव जागा मिळाल्या . (त्या पूर्वीच्या मेकडोनल्ड निवाड्यापेक्षा खूपच जास्त होत्या )
३) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठि वेगळी काढुन ठेवायची रक्कम ठरली यातही आंबेडकरांनि ठरवलेला आकडा ग्राह्य धरण्यात आला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच दलितांचे एकमेव राष्ट्रीय नेते आहेत आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व हक्क एकट्या आंबेडकरांना आहेत हि गोष्ट सिद्ध झाली . पुणे करारा नंतर आंबेडकर हे एकमेव राष्ट्रीय दलित नेते असून एम सी राजा सारखे लोक केवळ उपट्सुंभ आहेत हे सिद्ध झाले.
पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा हक्क दलितांसकट सर्वांना मिळाला . शीक्षण , जमीन इत्यादी चाळण्या गेल्या . त्यामुळे घटना परिषदेचे सदस्य असलेल्या आंबेडकरांनि स्वतंत्र भारतात एकदाही विभक्त मतदार संघ मागितले नाही . प्रौढ सार्वत्रिक मतदान आल्याने विभक्त कि संयुक्त हा मुद्दाच उरला नाही .
गांधिंना जे साध्य करायचे होते ते हि घडलेच - द्विस्तरीय गुंतागुंतीची निवडणुक प्रक्रिया झाल्याने इतर जाती विभक्त मतदार संघ मागाण्याचा धोका टळला . कारण इतकी गुंता गुंतिचि प्रक्रिया सर्व जातींसाठी लागू करणे अशक्यच होते . त्यातून जातीय फायद्याची गणिते बांधणेहि दुरापास्त होते .
थोडक्यात पुणे करार बरोबरीत सुटला किंवा थोड्या प्रमाणात आंबेडकरांच्याच बाजूला झुकला असे म्हणावे लागते. स्वातंत्र्यानंतर तर तो प्रश्न पुर्णपणेच आउट डेट बनलेला आहे . कारण सार्वत्रिक प्रौढ मतदान !
सम्यक पणे विचार बदलणारा - झपाटलेला अभ्यासक : डॉ आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि विद्वान गृहस्थ होते . राजकारण - समाजकारण - धर्म कारण याबद्दल ते सतत अभ्यास करत आणि नव्या अभ्यासानुसार - मते बदलत असत . उदाहरण घायचे झाले तर भगवत गीता या हिंदु धर्म ग्रंथाबद्दल लिहिता येईल .
१) १९ २ ७ सालच्या महाडच्या संगरात त्यांनी मनुस्मृती जाळली पण गीता हा धर्मग्रंथ स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही लोकांना मान्य आहे असे ते त्याकाळी म्हणत असत .
२) पुढे धर्मांतराच्या घोषणे नंतर गिता हा पुर्णपणे मूर्खपणे आणि बाष्कळ पणे लिहिलेला ग्रंथ आहे असे ते म्हणत .
३) धर्मांतरानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले - गीतेत ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बुद्ध धर्मातून उसन्या घेतल्या आहेत . (म्हणजे गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत !)
एकाच ग्रंथाबद्दल व्यक्त केलेली हि मते आहेत . प्रा शेषराव मोरे यांनी त्यांच्या आंबेडकरांवरिल ग्रंथात राजकारण , समाजकारण , इतिहास मिमांसा या सर्वच बाबतीतल्या बदलत जाणार्या मतांचा आढावा घेतला आहे .
अभ्यासक नवीन माहितीनुसार मते बदलत जातोच . पण आंबेडकरांचे सामाजिक धोरणही त्यांची धर्म मिमांसा आणि इतिहास मिमांसा बदलते. जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत ते गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना परिषदेत दाखल झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड बिल पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी त्यांनी गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले .
समता आणणे आणि लोकशाही रुजवणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी धर्म मिमांसा आणि इतिहास मीमांसा लिहिली , त्यात वेळोवेळी बदल केले , कारण त्यांना इतिहास केवळ लिहायचा नव्हता तर घडवायचाहि होता .
स्वत:ची मते बदलण्याचे स्वातंत्र्य जर आंबेडकरांना आहे तर गांधिंना का नाही ?
परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी
परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी
गांधीजी हे आंबेडकरांप्रमाणे विद्वान , अभ्यासक किंवा संशोधक निश्चितच नव्हते . पण त्यांना उभ्या देशाबद्दल कळकळ प्रेम आणि जिव्हाळा होता . दलितांचे भले करणे हा गांधिंसमोरचा एकमेव कार्यक्रम कधीच नव्हता पण उच्च निचतेला आणि मुख्यत: अस्पृश्यतेला त्यांचा विरोध पहिल्या पासून होता . त्याला गांधिंनि कमी महत्व दिल- हा आरोप खोटा म्हणता येणार नाही . पण गांधी म्हणजे अस्पृश्यांच्या जिवावर उठलेला सैतान निश्चितच नव्हे.
गांधीही स्वत:ची मते अगणित वेळा बदलत आलेले आहेत . मी हिमालया एव्हढ्या चुका केल्या आहेत असे गांधिंनि अनेकदा म्हटले आहे .
कधीकाळचा चातुर्वणाचा समर्थक गांधी । यापुढे मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच हजार राहीन अशी अट ठेवतो .। आणि राउंड टेबलाची नीती पुढे घटनाकारांना सन्मान देण्यापर्यंतही बदलते । बाकी गांधिंचि मते बदलत गेली आणि बाबासाहेब कायदामंत्रि (पहिल्या) मंत्रिमंडळात होण्यामागे गांधी होते । पहिल्या घटनेपरिषदेवर बाबासाहेब लीग च्या पाठिंब्यावर गेले होते । ती परिषद पुढे रद्द झाली आणि फ़ाळणिनंतर जी नवी घटनापरिषद आली त्यावर बाबासाहेब जाताना गांधिंनि पाठिंबाच दिला होता . कोग्रेसच्या पाठिंब्या शिवाय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होणे शक्य नव्हते … आणि आंबेडकरांसरखा विद्वान कायदा पंडित हातचा घालवायला गांधिजिहि मूर्ख नव्हते .
सुरवातीला गांधी सनातनी आणि चातुर्वणाचे समर्थक आहेत असा अर्थ निघू शकेल अशी पुष्कळ वचने गांधिंच्याच साहित्यातून काढुन दाखवता येतील . पुढे मात्र . गांधिंनि त्यांचे विचार बदलले आणि हिंदु धर्माच्या सर्व स्मृतींचे आणि धर्म ग्रंथांचे पुनर्लेखन करावे आणि स्त्रिया आणि शुद्र यांवर अन्याय करणारा भाग त्यातून काढुन टाकावा असे स्पष्ट मत गांधिंनि व्यक्त केले . ( म. गांधी आणि समाजसुधारणा - आकलन . नरहर कुरुंदकर)
हिंदु राहून समता प्राप्त करण्याचा हा गांधी विचार आहे . हा विचार १ ९ २ ७ सालच्या आंबेडकरांच्या विचारासारखाच आहे.
गांधीच्या अर्धनग्न धार्मिक फ़किरिपेक्षा आंबेडकरांचे सुटा बुटात राहणे आणि त्यांचा आधुनिक विचार मला अधिक भावतो पण ....
सुस्पष्ट , लोजिकल , तर्कशुद्ध विचार करणारा माणुस उभ्या भारताचा नेता बनणे अशक्यच होते. या देशाची विविधता समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरिपणा जितका संकिर्ण (Complex ) होता तितकेच गांधिंचे व्यक्तिमत्व हि संकिर्ण होते.
भारतासारख्या अनेकपदरी देशात राजकारण करायचे झाले तर मायावतिलाहि शेवटी सर्वजन हिताय अशी घोषणा द्यावी लागते हे विसरून चालणार नाही . गांधीना सर्वोदय हवा होता . पण अंत्योदय हे त्याचे सूत्र होते . सर्वांच्याच डोळ्यातले अश्रू पुसण्याची गांधिंचि महत्वकांक्षा आहे . पण अंत्यजाच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हि त्याची पहिली पायरी आहे . गांधी हे मुख्यत: राजकीय नेते आहेत पण त्यांनी समाजकारण झटकून टाकलेले नाही . त्यांची धर्माची परिभाषा , हरिजन वगैरे संकल्पना माझ्यासारख्या नास्तिकाला पचणार्या नाहीत पण गांधिंचा उदारमत वाद भारताला थोड्या बहुत प्रमाणात का होईना जोडू शकला हे नाकारता येत नाही .
समारोप
घटनेचा साचा बनवून बाबासाहेबांनी ह्या देशाचा मनु पालटला . गांधिच्या पाठिंब्या शिवाय हे शक्य नव्हते . देशाचे भविष्य कसे चालावे याचा ढाचा आंबेडकर तयार करतात आणि त्यांच्या नियुक्तीला गांधिंचा पाठिंबा असतो . तेंव्हा मुख्य वाद मिटलेला असतो. हा देश सनातनी विचारांनी चालणार नाही … आधुनिक राज्यघटनेनुसार चालेल अशी ग्वाही मिळालेली असते . . बाकी थोडेबहुत मतभेद सगळ्याच माणसात असणार आणि ते नैसर्गीकही आहे .
गांधी आंबेडकर मुख्य वाद आणि संघर्ष इथे संपतो .
तरीही या दोन महान भारतीय नेत्यांत कधीही मनोमिलन झाले नाही हि भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे .
गांधी सवर्ण हिंदुचे नेते होते पण अस्पृश्यांचे दुश्मन नाही . आंबेडकर दलित समाजाचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे घटना परिषदेतील काम , हिंदु कोड बिल , कायदा मंत्रि म्हणुन केलेले काम हे सर्व देशासाठी होते . एक अर्थशास्त्री म्हणुन आंबेडकरांचा रिझर्व बेंक ऑफ इंडिया च्या पायाभरणीत मोठा वाटा आहे . हे काम सर्वच देशासाठी आहे . त्या अर्थाने आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत .
स्पृश्य - अस्प्रुश्यांचा संघर्ष जटिल होता . अस्पृश्यांची अस्मिता जागी करणे - अन्याया विरुद्ध लढणे - स्वत:चे न्याय्य हक्क मागणे आवश्यक होते. हे काम आंबेडकरांनी केले . त्याचवेळी अस्पृश्यांना त्यांचे हक्क देऊन टाकण्यासाठी सवर्णांचि मानसिकता तयार करणे आवश्यक होते . गांधिंनि तेच काम टप्प्या टप्प्याने केले . हे कामही अतिशय अवघड होते आणि आवश्यकही होते .
त्या दोघात एकमत दुर्दैवाने झाले नाही म्हणुन आजही तो भांडण वारसा चालू ठेवणे वेडेपणाचे आहे .
(क्रमश:)
-------------------------------------------------------------------------------------------------------------
मला समजलेले गांधिजी या मालिकेतील पुढील भाग : -
भाग ३) पुस्तकांपलिकडचे गांधी : (आगामी )
"देशाचे भविष्य कसे चालावे याचा ढाचा आंबेडकर तयार करतात आणि त्यांच्या नियुक्तीला गांधिंचा पाठिंबा असतो" --> गांधी का नेहरू?
उत्तर द्याहटवाM.K.Gandhi and rest of the Gandhis who followed him, do not want to give up the political influence and independent dalit leadership. That is why they perpetuate Gandhi believer harijan.Gandhi wanted only untouchability to be removed and ambedkar wanted annihilation of caste. Gandhi vs Ambedkar debate is not resolved because Ambedkar chose to leave Hinduism and to accept Buddhism. The answer of this debate lies in future.
उत्तर द्याहटवाबघण्याचा दृष्टिकोण बदलला तरी आपण इतिहास बदलू शकत नाही !
उत्तर द्याहटवायात गांधी कडे खुपच positive दृष्टिने पाहिले गेले आहे आणि लेखकाने वाचकाला गांधीच्या बाजुने positive दृष्टीने पाहण्याचा indirect सल्ला दिला आहे
उत्तर द्याहटवाहा जो काही इतिहास आणि त्या इतिहासाची चिकित्सा लेखकाने येथे केली आहे त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच होईल. माल यामध्ये इतिहासातील घटनाक्रमाकडे पाहण्याची एक चिकित्सक वृत्ती लेखाकामध्ये दिसून आली आणि इतिहास सांगत असतांना लेखकाने आपले केलेले मत, राजकीय घडमोडीबाबत स्वतःचे काय मत आहे त्या बाबत सांगितलेले कारण मला पटले म्हणण्यापेक्षा सांगण्याची पद्धत खूप आवडली.
उत्तर द्याहटवाhttp://kalamnaama.com/gandhi-ambedkar/
उत्तर द्याहटवाDr Dixit,
उत्तर द्याहटवाI am really impressed with your blog. Perfect analysis of these two great leaders of India.
Personally Pune Karar is the most complext issue Indian history has seen and you explained in so much detail with simplification.
Thanks
Sameer
Gandhijinna Kitihi changlya Drushtikonatun Pahil Tarihi Tyanni Kelelya Chuka Sudharnya Palikade Ahet..Sandharbhasathi Babasahebanch Pustak Bharat Ani Pakistanchi Phalni He Vacha...Othrwise Tya Veli Lihelela Kontahi Pustak Je Tya Velcha Bharatach Chitra Dakhvel, Tumhala Gadhi Kase Hote Sampurn Bhartasathi Te Kalel...Please Jarur Vacha
उत्तर द्याहटवापुणे कराराने दलितांचे खूप नुकसान झाले. दलित संख्येने जवळपास १५% असले तरी देशभर विखुरलेले असल्याने, एकाही मातदारसंघात ते आपल्या बळावर जिंक्कू शकत नाहीत. राखीव जागेवर कायम कॉंग्रेसचा किंवा अन्य मोठ्या पक्षाचा दलित उमेदवार जिंकणार. असा उमेद्वार प्रथम त्या पक्षाचे धोरण सांभाळणार, नंतर दलितांचे हित. त्यामुळे सतत इतर मोठ्या पक्षाशि निवडणूक समझोता करणे आले. अशामुळे दलित पक्ष कधीच बळकट झाले नाहीत. त्यांचे नेते आणि कार्यकर्ते निराश होऊन अखेर अन्य पक्षत दाखल होतात. रामदास आणि रामविलास यांनी नुकतेच हे सिद्ध केले. पुणे कराराने झालेले हे नुकसान भरून काढण्यासाठी स्वतंत्र मतदार संघांची गरज नाही, पक्ष-यादीची प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची निवडणूक पद्धत स्वीकारली, कि दलितांना स्वबळावर योग्य तेवढ्या जागा मिळतील, आणि देशाच्या सत्तेमध्ये योग्य वाट मिळेल. मग दलित पक्षान्ना इतरांच्या वळचणीला उभे राहण्याची गरज रहाणार नाही.
उत्तर द्याहटवाप्रथम हे लक्षात घ्यायला हव की आंबेडकरानी सर्वात आधी 1919 साली साउथबरो कमिटीपुढे स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली पण ती मागणी कमिटीने फेटाळली पुढे 1928 साली आंबेडकरानी आपली स्वतंत्र मतदार संघाची मागणी पुर्ण होणार नाही म्हणुन त्यानी एक पाउल मागे घेतल व आरक्षणासहीत प्रोढ मतदानाची मागणी केली ( त्यावेळी दलित समाज गरीब व अशिक्षित अस्ल्या कारणामुळे त्याला मतदानाचा अधिकार जवळपास नव्हताच ) तरीही पुढे ते म्हणतात जर प्रोढ मतदानाची मागणी आमची पुर्ण होत नसेल तर आम्ही स्वतंत्र मतदार संघ मागु ( त्या वेळी कीमान प्रोढ मतदान पद्धत व आरक्षण या मुळे दलितांचे प्रतिनिधी निवडुन येतील व ते दलितांचे प्रश्न सरकार मध्ये मांडु शकतील अशी आशा आहे )
उत्तर द्याहटवागोलमेज परीषदेत अल्पसंख्यांकाच्या मिटींग मध्ये तीन गोष्टीवर चर्चा झाली
अल्पसंख्यांकाचे प्रतिनीधी कसे निवडावेत ? ते सरकार ने निवडावेत का ? तर हा विकल्प सर्वानुमते फेटाळण्यात आला
दुसरा म्हणजे सयुक्त मतदार संघ व सोबत आरक्षण हा सुध्दा बहुसंख्याकाने निवड होत अस्ल्याने आरक्षित जागेवरुन उभा राहिलेला उमेद्वार अल्पसंख्यकाशी प्रामाणिक पणे अल्पसंख्याकाचे प्रश्न मांडेल की नाही हि शंका मांडण्यात आली व हा देखील विकल्प फेटाळण्यात आला व सर्व अल्प्संख्यांकानी स्वतंत्र मतदार संघाची मागणी उचलुन धरली ( हि शंका पुणे करारामुळे खरी ठरली )
गांधीनी मुस्लिम शिख अल्प्संख्यांकाच्या मतदार संघाला विरोध केला नाही पण ज्यांची परीस्थिती यांच्या पेक्षा कीतीतरी पटीने बेकार होती त्या दलितांच्या स्वतंत्र मतदार संघाला विरोध केला व आमरण उपोषणाला बसले ( मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदार किंवा शिखांच्या स्वतंत्र मतदार संघाला विरोध केला असता तर त्यांचा जिव गेला असता तरी हाती काही लागल नसत )
व गांधीजींच्या मरणाने दलितांच हत्याकाड घडेल त्यामुळे आंबेडकरानी आपली स्वतंत्र मतदार संघची मागणी सोडुन दिली व पुणे करार घडला त्या करारात कोंग्रेस कोणताही हस्तक्षेप करणार नाही असे ठरले असताना त्यात कोंग्रेस्ने हस्तक्षेप केला व ज्या अस्प्रुश्य उमेद्वाराला सर्वात कमी ( चौथ्या नंबरची ) मते अस्प्रुश्यांची मते पडली असताना कोंग्रेसने हिंदुमतावर ते निवडुन आणले व पुढे खुद्द आंबेडकरानाच पुणे कराराचा धिक्कार करावा लागला (दलितांच्या स्वतंत्र मतदार संघाचा प्रश्न सोडवण्याचा डा.आंबेडकरानी प्रयत्न केला पण खुद्द कोंग्रेसचे महात्मा असणार्या गांधीनी दलितांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या विरोधात स्वाताची बाजी लावली होती. त्यामुळे दलिताना स्वतंत्र मतदार संघ दिला गेल असता तर गांधीचा अपमानच झाला असता असे कोंग्रेस ने ग्रह करुन घेतला व पुणे करार होता तसाच कोंग्रेसने चालु ठेवला.)
(संविधान सभेवर गेल्यानंतर आंबेडकरानी मुलभुत अधिकार समितीला 1947 रोजी एक निवेदन सादर केले ते नंतर 15 मार्च 1947 साली state & minorities या नावाने प्रकाशित झाले त्यात स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीचा उल्लेख होता)
तसेच
(मार्च 1949 मध्ये अस्प्रुश्यांकरता स्वतंत्र मतदार संघ असावेत, अगर सयुक्त मतदार संघ ठेवल्यास निदानपक्षी जो अस्प्रुश्य उमेद्वार शे.40 टक्के अस्प्रुश्यांची मते मिळवील त्यासच निवडल्याचे जाहीर करावे अशी सुचना डा.आंबेडकरानी आणली असता पिल्ले-खांडेकर यानी कोंग्रेसचे पट्टे गळ्यात बांधुन त्या सुचनेला खो दिला एव्हढेच नव्हे तर एक गुप्त शिष्टमंडळ वल्लभभाई पटेलांकडे पाठवुन आम्हास राखेव जागा नकोत असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.ते दोघेही कोंग्रेसच्या हिंदु मतावर अस्प्रुश्यांचे प्रतिनिधी म्हणुन निवडुन आले होते.)
इतक्या मागण्या करुनहीगांधींच्या मान-अपमानापायी कोंग्रेसने दलितांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीला फाट्यावर मारल व कोंग्रेसचे दलाल निवडुन येतील अशी पुणे कराराची निती करुन ठेवली
(पुणे करारातील 5 व्या मुद्द्यानुसार 10 वर्षानंतर प्राथमिक निवडणुक रद्द केली गेली. व तसाच तो पुणे करारचा फास दलितांच्या मानगुटीभोवती अजुन घट्ट होत गेला )
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा<<<<<<>>>>>
उत्तर द्याहटवा<<<<<<< घटना परिषदेचे सदस्य असलेल्या आंबेडकरांनि स्वतंत्र भारतात एकदाही विभक्त मतदार संघ मागितले नाही . प्रौढ सार्वत्रिक मतदान आल्याने विभक्त कि संयुक्त हा मुद्दाच उरला नाही . >>>>>>
<<<<<<< पहिल्या घटनेपरिषदेवर बाबासाहेब लीग च्या पाठिंब्यावर गेले होते । ती परिषद पुढे रद्द झाली आणि फ़ाळणिनंतर जी नवी घटनापरिषद आली त्यावर बाबासाहेब जाताना गांधिंनि पाठिंबाच दिला होता . >>>>>>
अर्धसत्य मांडुन इतिहास बदलता येतो पण सत्य फार काळ लपुन राहत नाही 1945 मध्ये द्वितीय महायुध्द समाप्त झाले. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले.या प्रश्नावर विचार विनिमयासाठी ब्रिटिश शासनाने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठवले. या शिष्ट मंडळाने ( कॅबिनेट मिशन) 16 मार्च 1946 रोजी सत्ता हस्तांतरणाची आपली योजना घोषित केली. भारताचा भावी राज्य कारभार चालविण्याच्या द्रुष्टीने संविधान निर्मितीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात यावी असे या योजनेत सुचित करण्यात आले होते. त्या प्रस्तावानूसार संविधान सभेच्या स्थापणेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेवर सदस्यांचे निर्वाचन प्रांतीय विधान मंडळाच्या निर्वाचित ससदस्यांद्वारे करण्यात आले. काँग्रेसच्या विरोधामुळे डाॅ. आंबेडकर मुंबई विधान मंडळातुन निर्वाचित होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी बंगाल विधान मंडळातुन श्री. जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर अनुसुचित जातीच्या सदस्यांच्या पाठींब्यावर संविधान सभेत प्रवेश मिळवला. संविधान सभेचे कामकाज 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झाले. त्याआधी कॅबिनेट मिशनने मुस्लिम लीगची पाकीस्तानची मागणी अव्यवहार्य म्हणुन फेटाळली त्यामुळे मुस्लिम लीग ने कामकाजावर बहीष्कार घातला.
काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात बेबनाव वाढतच होता. ब्रिटिशांपासुन भारतीयांना सत्तेचे हस्तांतरण शांतपणे होण्यासाठी त्यावर तोडगा काढण्यासाठी 22 मार्च 1947 रोजी लाॅर्ड लुई माऊंटबेटन भारतात आले. त्यानी निष्कर्ष काढला की देशाच्या विभाजनाला पर्याय नाही. म्हणुन ब्रिटिश नेत्यांशी चर्चा करून 3 जुन 1947 रोजी माऊंटबेटन योजना जाहीर करण्यात आली. या योजनेमुळे पाकीस्तानचा मार्ग मोकळा झाला त्या बरोबरच बंगालमधून संविधान सभेवर निवडुन गेलेल्या डाॅ. आंबेडकरांच सभासदत्व रद्द झाले. संविधान सभेचे अध्यक्ष डाॅ. राजेंद्र प्रसाद यांनी मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. बी. जी. खेर यांना 30 जून 1947 ला पाठवलेल्या पत्रात डाॅ. आंबेडकरांची संविधान सभेवर त्वरीत निवड व्हावी असे सुचवले.to be cont.....
अर्थात जी काँग्रेस काही महीन्यांआधी डाॅ. आंबेडकर संविधान सभेवर जाऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होती. ज्या काँग्रेस मधले मोठे सरदार पटेलांसारखे नेते अशी वल्गना करीत होते की 'मी संविधान सभेची दारच काय खिडक्या सुध्दा बंद केल्या आहेत पाहुया डाॅ. आंबेडकर कसे आत शिरतात?' असे म्हणनारी काँग्रेस खरच आंबेडकरांना संविधान सभेत मनापासून पाठवु शकेल काय ?
उत्तर द्याहटवाहे जाणुन घेण्यासाठी त्या काळाची परीस्थिती समजून घ्यावी लागेल.
संविधान सभेवर त्या काळात राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर बर्याच टिका होत होत्या. त्यातील काही टिका इतक्या कडवट होत्या की त्या टीकाकाराना संविधान सभेच्या अध्यक्षाना म्हणजेच डा. राजेंद्र प्रसाद याना त्याबाबतीत स्पष्टीकरण देने भाग पडले. सोमवार दि.20 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेचे कामकाज सुरु होण्यापुर्वी त्यानी निवेदन केले. त्या निवेदनात काही टीकांचा उल्लेख करुन त्या कशा चुकीच्या आहेत त्याबद्दल स्पष्टीकरण केल होत.
त्या टीका म्हणजे डिसेंबर 1946 साली ब्रिटीश संसदेच्या ' हाउस ओफ कोमंस ' (लोकसभा) मध्ये बोलताना चर्चील यानी भारताची संविधान सभा " फक्त एका जातीची प्रतिनिधीत्व करते " असा अभिप्राय व्यक्त केला होता. तर विस्काउट सायमन यानी ' हाउस ओफ लोर्डस ' मध्ये बोलताना संविधान सभेला "हिंदुंची संघटना" असे संबोधुन पुढे म्हटले होते की " काय दिल्ली येथे होणार्या सवर्ण हिंदुंच्या मिटींगला सरकार संविधान सभा म्हणुन मान्य करु शकते ?"(संविधान सभेतील वादविवाद खंड 2 प्रुष्ठ 267)
यांसारख्या टिकांचा परीणाम असा झाला की 17 डीसेंबर 1946 रोजी डा. जयकरानी मांडलेल्या वादग्रस्त ठरावामुळे सभेच तापमान वाढलेल असतानाच अनपेक्षितपणे डा.आंबेडकराना संविधान सभेचे अध्यक्ष डा.राजेंद्र प्रसादानी आपल म्हणन मांडण्यासाठी आमंत्रित केल.
3 जुन 1947 रोजी माउंटबेटन योजनेनुसार बंगालचा भाग पाकीस्तानचा भाग म्हणुन अधोरेखित करण्यात आला त्यामुळे बंगालमधुन संविधान सभेवर निवडुन गेलेले आंबेडकरांची निवड रद्द झाली. डा.आंबेडकर गोलमेज परीषद, पुणे करार यान्मुळे दलितांचे एकमेव नेते कींवा सर्वात मोठे नेते आहेत अशी मान्यता मिळाली होती.
अर्थात जर डा.आंबेडकर संविधान सभेवर नसते तर राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर होत असलेली टीका खरी ठरली असती व संविधान सभेच्या अध्यक्षानी (डा. राजेंद्र प्रसाद) यानी केलेल स्पष्टीकरण याला काहीच अर्थ नसता त्यामुळे कोंग्रेसची राष्ट्रीय आंतराष्ट्रीय राजकारणात खुप मोठी बदनामी झाली असती.
हे सर्व टाळण्यासाठी डा.राजेंद्र प्रसाद यानी जुन 1947 आंबेडकरांची जागा रद्द झाली लगेच 30 जुनला डा.राजेंद्र प्रसाद यानी मुम्बै चे मुख्यमंत्री याना पत्र लिहुन डा. आंबेडकरांची संविधान सभेवर त्वरीत निर्वाचन करण्याची सुचना केली.
कोंग्रस ला आंबेडकरांच्या येण्याने कोणताही तोटा नाही झाला असता कारण संविधान सभेवर कोंग्रेसच बहुमत होत त्यामुळे डा.आंबेडकराना दलितांच्या स्वतंत्र मतदार संघाची मागणी त्याना पुर्ण करता आली नसती व कोंग्रेस च्या बहुमता मुळे पुणे करार ही रद्द करता आला नसता.
कोंग्रेस ला आंबेडकरांच्या येण्याने झाला असता तर तो फायदाच होता.कारण कोंग्रेसच्या पाठींब्यावर आंबेडकर संविधान सभेवर गेल्यामुळे आधिच कोंग्रसकडुन दुखावलेला दलित समाजाचा कोंग्रेसवरचा राग निवळेल अशी कोंग्रेसला आशा वाटत होती व डा. आंबेडकरांसारखा विद्वान संविधान बनविण्याच्या कामी येत होता. तर दुसरीकडे आंबेडकराना दलितांच्या सुरक्षा प्रावधाने अंतर्भुत करण्याच्या द्रुष्टीने संविधान सभेत जायाचच होत
( आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर डा.आंबेडकरानी स्वातंत्र्य, समता, बंधुता हि मुल्ये असणारी लोकशाही वर आधारीत संविधानाची निर्मिती केलीच.व त्याच बरोबर चर्चेत वादविवाद करुन दलित, अल्पसंख्यांक, स्त्रिया, मागसवर्गीय यासाठी पुरेशी संरक्षीत प्रावधाने करुन ठेवली.)
उत्तर द्याहटवा(दलितांच्या स्वतंत्र मतदार संघाचा प्रश्न सोडवण्याचा डा.आंबेडकरानी प्रयत्न केला पण खुद्द कोंग्रेसचे महात्मा असणार्या गांधीनी दलितांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या विरोधात स्वाताची बाजी लावली होती. त्यामुळे दलिताना स्वतंत्र मतदार संघ दिला गेल असता तर गांधीचा अपमानच झाला असता असे कोंग्रेस ने ग्रह करुन घेतला व पुणे करार होता तसाच कोंग्रेसने चालु ठेवला.)
(संविधान सभेवर गेल्यानंतर आंबेडकरानी मुलभुत अधिकार समितीला 1947 रोजी एक निवेदन सादर केले ते नंतर 15 मार्च 1947 साली state & minorities या नावाने प्रकाशित झाले त्यात स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीचा उल्लेख होता)
तसेच
(मार्च 1949 मध्ये अस्प्रुश्यांकरता स्वतंत्र मतदार संघ असावेत, अगर सयुक्त मतदार संघ ठेवल्यास निदानपक्षी जो अस्प्रुश्य उमेद्वार शे.40 टक्के अस्प्रुश्यांची मते मिळवील त्यासच निवडल्याचे जाहीर करावे अशी सुचना डा.आंबेडकरानी आणली असता पिल्ले-खांडेकर यानी कोंग्रेसचे पट्टे गळ्यात बांधुन त्या सुचनेला खो दिला एव्हढेच नव्हे तर एक गुप्त शिष्टमंडळ वल्लभभाई पटेलांकडे पाठवुन आम्हास राखेव जागा नकोत असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.ते दोघेही कोंग्रेसच्या हिंदु मतावर अस्प्रुश्यांचे प्रतिनिधी म्हणुन निवडुन आले होते.)
इतक्या मागण्या करुनहीगांधींच्या मान-अपमानापायी कोंग्रेसने दलितांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीला फाट्यावर मारल व कोंग्रेसचे दलाल निवडुन येतील अशी पुणे कराराची निती करुन ठेवली
(पुणे करारातील 5 व्या मुद्द्यानुसार 10 वर्षानंतर प्राथमिक निवडणुक रद्द केली गेली. व तसाच तो पुणे करारचा फास दलितांच्या मानगुटीभोवती अजुन घट्ट होत गेला )
ref.
1 संविधान सभेतील वादविवाद खंड 2
2 डा. बाबासाहेब आंबेडकरांची एतिहासिक भाषणे व भारतीय संविधानाची निर्मिती (संपादक - प्रदीप गायकवाड)
ब्रिटिशांना दिलेल्या सायमन कमिशनच्या निवेदनात बाबासाहेब लिहितात -" १ ) आज अस्पृश्य समाजाच्या समस्या वेगळ्या असल्याने ते हिंदु समाजापासून वेगळे आहेत२) मात्र अस्पृश्यांसाठी मागितलेल्या मागितलेल्या सवलती तात्पुरत्या आहेत . सर्व भारत शेवटी एका व्हावा . " (गोखले १ १ ८ )या काळात आंबेडकरांनि विभक्त मतदार संघाला कडाडून विरोध केलेला आहे. आणि राखीव जागा मागितलेल्या आहेत . निवेदनात बाबासाहेब म्हणतात - विभक्त मतदार संघ हे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. विभक्त मतदार संघात निवडुन गेलेले उमेदवार सभागृहात सर्वांसाठीच कायदे करतात . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांबद्दल कायदे करण्याचा हक्क विभक्त मतदार संघातल्या उमेदवारांना मिळतो . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांवर राज्य करणे हि कुठली लोकशाही ? ( Dr Ambedkar Writings and Speeches. Vol 2 pg 344 - 366, 1982)>>>>>>>>मुळात हे मत आंबेडकरानी मुळ निवेदनात मांडलेल नाही म्हणजे 23 अक्टोबर 1928 ला सायमन कमिशन समोर मांडलेल नाही नंतर म्हणजे मुंबै विधीमंडळाच्या समितीने 7 मे 1929 या दिवशी दलित वर्गाला विभक्त मतदार संघ नसावा मुसलमानांकरता मात्र विभक्त मतदार संघ असावा अशी जेव्हा समितीने शिफारस केली तेव्हा दलित समाजाला साधा मतदानाचा अधिकार नाही त्यानी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली असता ती फेटाळली जाते (1919 साली आंबेडकरानी केलेली दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी साउथबरो समितीने फेटाळली होती ) त्यातच 1916 साली लखनो करार मुस्लिम लीग व कोंग्रेस ने केला होता त्यात कोंग्रेस ने मुस्लिमांची स्वतंत्र मत्दार संघाची मागणी स्विकारली व पुढे 1928 साली नेहरु घटना समिती स्थापुन त्यात मुस्लिमाच्या मागण्या पुर्ण करुन दलिताना साधा आरक्षणाचा ही उल्लेख नव्हता त्यामुळे संतापुन 17 मे 1929 आपली भिन्न पत्रिका सायमन समितीला दिली व वरील उद्गार तुम्ही जे लिहिलेय ते लिहिले ( आंबेडकरांचा मुस्लिम स्वतंत्र मतदार संघाला विरोध नव्हता कारण पुढे 1952 साली त्यानी मुस्लिमांसमोर स्वतंत्र मतदार संघाच महत्व पटवले )(कांग्रेस आणि मुस्लिम लिग च्या राजकारणाची प्रतिक्रीया होती )state & minorities मध्ये आंबेडकर म्हणतात बहुसंख्य समाजाने विभक्त मतदार संघ मागणे व हिच मागणी अल्पसंख्य समाजाने करणे यातील फरक हे लोक लक्षात घेत नाही बहुसंख्य समाजास विभक्त मतदार संघ मागण्याचा अधिकारच नाही कारण अगदी सोपे आहे बहुसंख्य समाजाला विभक्त मतदार संघाचा अधिकार देणे म्हणजेच अल्पसंख्य समाजाच्या सन्म्त्ती वाचुन बहुसंख्य समाजाचे सरकार अल्पसंख्यांकांच्या डोक्यावर लादने होय. ही गोष्ट लोकशाहीच्या सर्वमान्य सिद्धंताशी विसंगत आहे ज्यांचेवर राज्य करायचे त्याच्या सन्मत्तीने राज्य चालवणे म्हणजे लोकशाही होय उलट पक्षी अल्पसंख्य समाजास स्वताचे हिताचे द्रुष्टीने मतदार संघ मतदार निवडण्याची संधी दिली तर कोणतीही आपत्ती ओढवणार नाही कारण अल्पसंख्यांक समाज बहुसंख्याकावर राज्य करेल हे सुतराम संभवनीय नाही."
उत्तर द्याहटवाहे आंबेडकरांचे बोल वरच्या कोट चे उत्तर तेच देतात (स्वातंत्र्या आधी मुस्लिम समाज लोकसंख्याच्या मानाने बर्या पैकी होता संघटीत होता म्हणुन आंबेडकरानी त्यावेळी त्यांच्या स्वतंत्र मतदार संघाला विरोध केला असावा व पाकीस्तान निर्मिती नंतर 1952 मध्ये त्यानी मुस्लिम समाजासमोर स्वतंत्र मतदार संघाच महत्व पटवुन दिले कारण तेव्हा भारतात मुस्लिम फारच अल्पसंख्यांक झाले होते )
ref
1. डा. आंबेडकर चरीत्र - धनंजय कीर
2. state & minorities
आजही पदविधर मतदार संघातुन उमेद्वार निवडुन येतात ते कोणासाठी कायदे करतात ?
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा" सत्याग्रह हि विचारसरणी आम्ही गीतेतून घेतली असून . गीता हा धर्म ग्रंथ म्हणुन आम्हाला मान्य आहे " - बाबासाहेब (बहिष्कृत भारत - २५ - ११ - २ ७ ). याच परिषदेत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली .>>>>>>>
उत्तर द्याहटवा.
.
2<<<<<>>>>>
.
.
3<<<<>>>>
.
.
.
माफ करा 1 ला दिलेला कोट अर्धा चुकीचा आहे खरा कोट पुढील प्रमाणे आहे
आंबेडकर म्हणतात " सत्याग्रह ....हि विचार सरणी आमची नव्हे . आम्ही ती गीतेवरुन घेतली आहे...... गीतेचा आधार देण्याचे दुसरेही एक कारण आहे , ते हे की हा धर्म ग्रंथ उभय पक्षाना स्प्रुश्याना तसेच अस्प्रुश्याना मान्य आहे.अन्य कोणताही ग्रंथाचा आधार जर आम्ही दिला असता तर निमित्तास टेकलेले स्प्रुश्य लोक यानी तुमचा आधार अम्हास मान्य नाही असे म्हणावयास मागे पुढे पाहिले नसते . अस्प्रुश्यानी आरंभिलेला सत्याग्रह जर गीतेच्या कसोटीस उतरला तर त्यास विरोध करण्यास स्प्रुश्य लोकांस मुळी तोंडच उरणार नाही कारण तसे करणे म्हणजे पर्यायाने गीता अमान्य केल्यासारखेच होणार आहे "
<<<<< जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत ते गीतेला पुज्य मानत होते.>>>>हे मत तुम्ही कुठल्या आधारावर मांडता हे कळात नाहीये खर धनंजय कीर यानी देखील इतक्या खात्रीपुर्वक मत मांडलेल नाही ते देखील " आंबेडकर हे गीतेला धर्मग्रंथ मानत असावेत " अंदाज वर्तवत शखास्पद स्थितीत आहेत आणि तुम्ही तर पुर्ण खात्रीच केलीत की ते गीतेला आधी धर्म ग्रंथ मानत होते
असो मुळात तुम्ही तो लेख वाचला आहे की नाही हे मला माहीत नाही मी तो लेख वाचला आहे म्हणुन सांगतो त्या लेखाच नावच " अस्प्रुश्यता व सत्याग्रहाची सिद्धी " असे आहे 25 नोव्हेंबर 1927 ला बहिष्क्रुत भारतात छापला होता
त्या लेखाचा उद्देश्य अस्प्रुश्यांची सत्याग्रहासाठी मानसिकता तयार करणे व या आगोदर 20 मार्च ला सवर्णानी अस्प्रुश्यानी सत्याग्रह करत असताना जी दंगल घडवुन आणली ती पुंहा घडु नये म्हणुन तो लेख लिहला होता अस्प्रुश्य हे हिंदु धर्मिय असल्या कारणाने(त्याना सत्याग्रहासाठी तयार करण्यासाठी) व स्प्रुश्य देखील हिंदु अस्ल्याकारणाने ( व स्प्रुश्य हिंदुंचा विरोध होअउ नये व हि विचार सरणी आम्ही गीतेतुन घेतली असल्याकारणाने त्याला विरोध करु नका )या दोघाना मान्य असणारा ग्रंथ कुराण बायबल तर होअउ शकत नाही म्हणुन आंबेडकर गीतेचा आधार घेतात
त्याच लेखात ते उपरोधाने गीतेवर(क्रुष्णावर) टीका सुद्धा करतात
आंबेडकर म्हणतात "ज्या वस्तु साठी अर्जुन सत्याग्रह करीत होता त्या वस्तुला, ज्या वस्तुसाठी अस्प्रुश्य लोक सत्याग्रह करणार आहेत त्या वस्तुच्या मानाने फुटक्या कवडीचीही कीमत नाही. पांडव राज्यासाठी भांडत होते अस्प्रुश्य लोक माणुसकी साठी भांडत आहेत .......राज्यावाचुन पांडव काही मेले नसते पण माणुसकी वाचुन अस्प्रुश्य लोक जिवंत पणी मेलेले आहेत . राज्यासारख्या क्षुल्लक ध्येयासाठी जर पित्रुहत्या, गुरुहत्या, बंधुहत्या किंव कुलक्षय यांसारखी थोर (?) ( मुळ लेखात ? चिनह नाही वाचकाना त्यातला उपरोध सहज कळावा म्हणुन दिला आहे )कर्मे करावयास अर्जुनास श्रीक्रुष्ण सांगतो तर माणुसकी कमविण्यासारख्या अत्युत्तम ध्येयासाठी साधा हटयोग देखील अस्प्रुश्यानी करु नये असे स्प्रुश्यानी सांगणे हा निव्वळ बाष्कळपणा होय."
वर मी दिलेले लेखातील दोनीही कोट वाचल्यानंतर हे लक्षात येइल की गीतेचा आधार फक्त सत्याग्रहालाआधार देण्यासाठीच केलेला आहे ( वाचकानी तो लेख पुर्णपणे वाचुन पहावा )
त्या लेखात आंबेडकर अस कुठेही असे म्हणत नाहीत की गीतेला आंबेडकर स्वता मानतात.किंबहुना ते गीतेवर उपरोधाने टीकाच करतात ( तसाच आधार हिंदु कोड बिल तयार करताना आंबेडकराना वेगवेगळ्या स्म्रुतीचा आधार घ्यावा लागला म्हणजे कोणीही अशी समजुत करुन घेउ नये की आंबेडकर स्म्रुती मानत होते आणि स्म्रुतीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत असजर कोणाची समजुत असेल तर तो तुमचा मुर्खपणाच असेल मुळ हिंदु कोड बिल व त्यावरील चर्चा वाचा कस आंबेडकरानी स्त्रियांच्या उन्नत्ती साठी कायदा करण्यासाठी एका छोट्या बिंदुतुन रेषा काढली ते )
इथवर पहिल्या मुद्द्याच स्पष्टीकरण केलेल आहे to be cont...
2जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत ते गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना परिषदेत दाखल झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड बिल पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी त्यांनी गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले
उत्तर द्याहटवा.
.
3पुढे धर्मांतराच्या घोषणे नंतर गिता हा पुर्णपणे मूर्खपणे आणि बाष्कळ पणे लिहिलेला ग्रंथ आहे असे ते म्हणत .३) धर्मांतरानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले - गीतेत ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बुद्ध धर्मातून उसन्या घेतल्या आहेत .
.
.
.
या दोन मुद्द्यात ही काहीच दम नाही
आंबेडकर आपल्या गीतेवरच्या टिकेवर होणार्या टीकेवर भाष्य करताना म्हणतात "गीतेचा अभ्यास करताना निव्वळ गीता पुस्तकावर अवलंबुन गीतेचा अर्थ कळणार नाही , तर त्याकालीन इतर वाड:मयाचा अभ्यास करुन गीतेचा अर्थ लावला पाहीजे "
या भाषणा मुळे आपणास कळुन येइल की जेव्हा त्यानी बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यावर ( प्रतिक्रांतीचा इतिहास ) अर्थ लावल (त्या आगोदर ते शिख धर्माकडे आकर्षित झाल्यावर गीतेचा अर्थ शिख धर्माशी लावला नाही कारण ते इतिहासाच्या द्रुष्टीने योग्य नव्हत )
(भगवद्गीता जातिव्यस्थेची प्रसारक व बौद्ध धरमाच्या नाशास ठरली आणि ते करण्यासाठी बौद्ध तत्वद्न्यानात हिंसा व जातिव्यवस्था घुसडुन तीच रुप बदलुन त्याला दैवी रुप कश्या पद्धतीन जनमाणसात बिंबवल ते स्वतंत्र पणे मांडीन )
फक्त आंबेडकरच गीतेत बौद्ध तत्वद्न्यान असलेला आहे असे मांडत नाही तर बरेच इतिहास कार असे आहेत की जे बौद्ध तत्वद्न्यान गीतेत आहे असे सांगतात त्यातील एक म्हणजे धर्मानंद कौसंबी व दुसरे कर्मवीर शिंदे. कर्मविर शिंदे हे मराठा समाजातील असुन कोंग्रेसशी संबंधीत आहे आणि त्यानी बौद्ध धर्म स्विकारल्याच माझ्या तरी माहितीत नाही ते सुद्धा गीतेत बौद्ध तत्वद्न्यान असल्याच सांगतात महत्वाच म्हणजे त्यांचा आणि आंबेडकरांचा खुप मोठा वाद झाला होता
हिंदु कोड बिल संबंधात गीतेबद्दल जे मांडलय तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हिंदु कोडबिलाला आंबेडकरानी स्म्रुतींचा देखील आधार घेतला (137+ स्म्रुती पैकी एकाद दुसरा स्म्रुतीतील बिंदु सारखा आधार घेउन त्याची हिंदु कोड बिल सारखी रेषा केली ) त्या बाबतीत त्यानी कधी असे म्हटलेल नाही की ते बौद्ध धर्मातुन घेतले आहे ?कसे म्हणतील कारण स्म्रुती कायद्याचा ग्रंथ तर गीताही तत्वद्न्यान ग्रंथ आहे कायदा हा लादावा लागतो तर तत्वद्न्यान लोक स्विकारतात (भगवद गीतेने जातीव्यस्थेचा प्रसार कसा केला व ते लोकानी कसा स्विकारला ते स्वतंत्रपणे मांडीन )आणि कोणी असा समजत असेल की त्यानी वेगवेग्ळ्या गोष्टीसाठी स्म्रुतीचा कींवा भगवद गीतेचा आधार दिला म्हणजे ते स्म्रुती अथवा गीता मानत होते असे म्हणने मुर्खपणाच होइल
त्यानी फक्त शुध्द इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जसा कौसंबीनी , कर्मविरानी मांडला तसा
म्हणुन आंबेडकरानी स्वताच्या हेतु साठी इतिहास भगवद गीतेवरील भाष्य केल हे म्हणन चुकीच आहे
I will write in detail Nishant
हटवामाझा तुमच्या हेतुवर सध्यातरीsशंका नाहीये तुम्ही गांधीवाद्यामध्ये आणि आंबेडकरवाद्यान्मध्ये समेट घडवुन आणण्याचा प्रयत्न करत आहात हि खरच चांगलीgगोष्ट आहे पण त्यासाठी आपण अर्धसत्याचा वापर करत आहात हि गोष्ट बरी नव्हे. आंबेडकर आणि गांधींच्या विचार धारा पुर्णता भिन्न आहे त्यामुळे आंबेडकर वादी आणि गांधी वादी यांच्यात समेट होणे मला तरी शक्य वाटत नाही तरीहि गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागबाबत आदर करतो पण दलितांविरुद्ध च्या केलेल्या गोष्टीन्मुळे मी तेवढाचtत्यांचा रागही करतो आणि तुम्ही पुढेkकाय लिहणार याबद्दल वाट पाहतो
हटवाI will write in detail Nishant
उत्तर द्याहटवा1. चवदार तळ्यासाठी केलेला सत्याग्रह हि बाबासाहेबांच्या संघर्षातलि पहिली मोठी लढाई . २५ डिसेंबर १९२७ रोजी ह्या लढ्याला आरंभ झाला. ७ - ८ हजार माणसे जमली होती . मंडपात येताना शिवाजी महाराज कि जय ! आणि गांधीजी कि जय ! अशा घोषणा देण्यात येत होत्या . यावेळी मंडपात फक्त एकाच नेत्याची तसबीर विराजमान होती - गांधीजी ! (खैरमोडे ३ - १५९ )
उत्तर द्याहटवा2. या काळात बाबासाहेब गांधी आणि गांधिविचार दोन्हीही मानत असलेले दिसतात. माहाडच्या धर्म संगराला बाबासाहेबांनी सत्याग्रह म्हटले होते .
3. हिंदु राहून समता प्राप्त करणे आणि त्यासाठी लढा देणे हे आंबेडकरांचे धोरण १९ २ ७ साल पर्यंत स्पष्ट दिसते आणि हिंदु पुढारी - गांधी हे आपले विरोधक आहेत असे आंबेडकरांना त्याकाळी वाटत नव्हते हे हि स्पष्ट होते .
4. काळा राम मंदिर प्रवेशासाठी अस्प्रुश्यांचा संघर्ष चालू होता. त्यावेळी आंबेडकरांनि गांधिंना सवाल केला होता - " मंदिर प्रवेशाचा प्रश्न मिटल्या नंतर जेंव्हा अस्पृश्य लोक जातीच्या आणि चातुर्वणाच्या उच्चाटनाचा प्रश्न हाती घेतील . तेंव्हा महात्माजी कोणाच्या बाजूने उभे राहतील ? "हा सवाल फक्त गांधीना नव्हता. पुर्या हिंदु समाजाला होता.गांधीजी उत्तरले - " मी मानत असलेल्या हिंदु धर्मात उच्च नीचता नाही पण डॉ आंबेडकरांना वर्णाश्रमाशि झगडा करायचा असल्याने मी त्यांच्या पक्षाला राहू इच्छित नाही. कारण वर्णाश्रम हा हिंदु धर्माचा अभिन्न भाग आहे, अशी माझी श्रद्धा आहे . " (कीर - २ ३ ९ )गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष इथून सुरु होतो>>>>>>>>>>
हो हे बरोबर आहे की काळाराम मंदिर सत्याग्रहाननंतर म्हणजे 1930 नंतर त्यांचा गांधींशी संघर्ष सुरु होतो पण याचा अर्थ असा नव्हे की ते आधी गांधी विचार आणि गांधीना मानत होते. तुमच्या जर असे पुरावे असतील तर द्या पुरावे मग मी सुद्धा माणीन पण पुरावे नसताना उगाच काहीतर बोलायच.गांधींचा फोटो लावला म्हणजे ते गांधी विचार मानत होते अस समजायच काय राव तुम्ही शहानिशा न करताच तुम्ही अंदाज बांधलात बर बोला कुठला गांधीविचार ते मानत होते 'सत्याग्रह ? त्या बद्दल ही मी पुढे लिहीतो पण आधी गांधींचा फोटो का लावला याच स्पष्टीकरण देतो
20 मार्च 1927 रोजी आंबेडकरानी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्या वेळी तेथे जी दंगल झाली त्यात गांधीवादी मोठ्याप्रमाणे होते.(याचा पुरावा बहीष्क्रुत भारताच्या 22 एप्रिल 1927 च्या बहिष्क्रुत भारतात भेटेल )टीळकांच्या म्रुत्युनंतर गांधींचा भारतीय राजकारणात उदय झाला होता थोड्याच कालावधीत ते सवर्णांचे नेते महात्मा बनले होते. आधिच्या कमेंट मध्ये सांगीतल्या प्रमाणे 25 डिसेंबर 1927 सत्याग्रह ला जसा भगवद्गीतेचा अधार जसा घेतला तसाच गांधींचाही आधार घेतला होता ( कारण गांधी हे सवर्णांचे संत महात्मा असल्याकारणाने व भगवद्गीता सवर्णाना पुजनिय असल्याकारणाने त्याचा वापर आपण सवर्णानी दंगल करु नये म्हणुन हौउ शकतो व गांधींचा आणि आंबेडकरांचा कधी आमने सामने परीचय नसल्याकारणाने आंबेडकरांचा गांधीना विरोध असण्याचा प्रश्नच नव्हता)त्याच बरोबर त्यात सर्व संतांचे विचार देखील लिहले गेले होते बस एवढ्याच कारणासाठी गांधीजींची तेथे तसवीर होती. आणि विचाराच म्हणाल तर गांधींचा सत्याग्रह करण्याची पद्धत आंबेडकराना मान्य नव्हती ( याचा पुरावा आपल्याला 25 डीसेंबर 1927 चा सत्याग्रह होण्या आधीचा म्हणजे 25 नव्हेंबर 1927 च्या अंकात मिळेल )
अस्प्रुश्यता व सत्याग्रहाची सिद्धी असे त्या अग्रलेखाच शिर्षक असुन त्यात ते म्हणतात "जेथे समभाव आहे तेथे लोकसंग्रह आहे व जेथे लोकसंग्रह आहे तेथे सत्कार्य आहे आणि अशा कार्याविषयीचा जो आग्रह तो सत्याग्रह होय अशी आम्ही सत्याग्रहाची व्याख्या करतो.ही विचार सरणी आमची नव्हे आम्ही ती गीतेवरुन घेतली आहे."
to be cont..
सत्याग्रहाची रीत कशी असावी असे सांगताना ते म्हणतात " सत्याग्रहाची रीत म्हणजे म.गांधीनी घालुन दिलेली रीत याशिवाय दुसरी रीत असु शकणार नाही, असा समज सर्वत्र पसरलेला दिसतो. म. गांधींच्या सत्याग्रहाची रीत आहे तीत हिंसेला वाव ठेवला नाही, इतकेच नव्हे तर, जेथे हिंसा आहे तेथे सत्याग्रह नाही असे त्यांचे मत आहे. हे म.गांधींचे म्हणने तर्क शुद्ध आहे ह्याबद्दल एकमत होणे शक्य नाही असे आम्हास वाटते.अमुक एका माणसाचा आग्रह सत्याग्रह किंवा दुराग्रह आहे हे त्या कार्याच्या नैतिक स्वरुपावर अवलंबुन असते.ते कार्य जर सत्कार्य असेल तर त्या बाबतीत धरलेल्या आग्रहास सत्याग्रह म्हटलेच पाहिजे.आणि जर ते असत्य असेल तर त्या बाबतीत त्याने धरलेल्या आग्रहास दुराग्रह म्हणावे लागेल. हिंसा, अहिंसा ही केवळ आग्रहाच्या सिद्धीची साधने आहेत............कारण अहिंसा परमो धर्म: असे जरी सांगण्यात येते तरी सर्वच ठीकाणी अहिंसा धर्म पाळणे शक्य नाही......गांधींचा अहिंसात्मक सत्याग्रहाचा मार्ग अशा द्रुष्टीने पाहीले तर अव्यवहारीक ठरतोच.पण तो अहिंसात्मक म्हणने हा देखील निव्वळ भ्रम आहे........जर हिंसा या शब्दाचा व्यापक अर्थ घेतला तर म. गांधींची अहिंसा एक प्रकारे हिंसाच आहे असे म्हणावे लागते......खरे म्हटले असता शक्य असेल तोवर अहिंसा व जरुर पडेल तर हिंसा, असे धोरण सत्याग्रही माणसाने ठेवणे हे सिद्धिच्या द्रुष्टीने रास्त आहे - इतकेच नव्हे तर नितीच्या द्रुष्टीने ही प्रशस्त आहे."(वाचकानी लेख मुळातुन सविस्तर वाचावा)
उत्तर द्याहटवाअशा प्रकारे आंबेडकर गांधींची सत्याग्रहची पद्धत मान्य करतच नाहीत किंबहुना त्यावर टीकाच करतात
16 नोव्हेंबर 1928 मधील अग्रलेखात आंबेडकर म्हणतात ".....कोंग्रेस ने 1917 साली अस्प्रुश्य निवारणाचे सोंग आणुन एक ठराव पास केला. पण तो तेथेच धुळ खात पडला. त्यानंतर म. गांधींची लाट उसळली तीत अस्प्रुश्य हा हिंदु धर्मावर मोठा कलंक आहे , हे सुत्र जन्माला आले. पण म. गांधीना " सामर्थ्य आहे चरक्याचे ||जो जो फीरवील त्ययाचे " या महामंत्राशिवाय दुसरे कशातच तथ्य नाही असे वाटत असल्यामुळे त्यानी अस्प्रुश्यता निवारणाचा कार्यक्रम जोराने असा कधीच चालु केला नाही. त्या कार्यक्रमाची त्याना खरोखरच विशेष आवड आहे की काय याबद्दल आम्हास तरी निदान शंका आहे. हिंदुमुसलमानांची दंगल असताना त्यानी 21 दिवसांचे उपोषण केले. खादीचा प्रसार व्हावा म्हणुन खादी विणील त्यालाच कोंग्रेसचा मेंबर करावा असा त्यानी आग्रह धरला.पण स्प्रुश्य - अस्प्रुश्य मधील अमानुष वागणुक बद्दल आपली नापसंती दर्शवण्यासाठी एक दिवसही देह दंडन त्यानी केले नाही कींवा अस्प्रुश्यता निवारण करील तोच कोंग्रेसच मेंबर होइल असे ते म्हणाले नाहीत. आता तर म.गांधी म्हणजे उडालेला बार आहे. त्यांची कोणाला फारशी अपेक्षा नाही."
.
.
18 जानेवारी 1929 मधील 'नेहरु कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य ' या अग्रलेखात आंबेडकर गांधींवर टीका करताना म्हणतात ".......आमचे म.गांधी मात्र हे मुसलमानामधील मतांतर राष्ट्रप्रेमाचे चिंन्ह आहे असे मानुन त्याच्या आधारवर 1931 सालापासुन स्वातंत्र्याची चळवळ सुरु करणार आहेत. इश्वर करो आणि म.गांधी पासुन या देशाची सुटका होवो ! " ( खर्या अर्थाने फाळणीची बीजे नेहरु कमिटी व मुस्लिम लिग च्या या योजने मुळे पेरली गेली )
.
.
.
या सर्व टीका काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या1930च्या आधीच्या आहेत
आता मला सांगा असा कुठला पुरावा आहे की आंबेडकर गांधी आणि गांधीविचार मानताना दिसतात असेल तर द्या पुरावा
ते सुरवातीपासुन गांधी आणि गांधींचे विचार मानत नसुन त्यावर टीकाच करतात
1. पण जर दलितांना विभक्त मतदार संघ दिले तर उद्या सर्वच जाती स्वत:चे वेगळे मतदार संघ मागतील -प्रत्येक जात स्वत:चे उमेदवार निवडुन देऊ लागली तर - उमेदवारांना सर्वसमावेशक भूमिका घेण्याची काहीच गरज उरत नाही त्यामुळे जातीवादी उमेदवारच निवडुन येतील आणि ते देशाचे तुकडे पाडतील हि गांधिजिंचि भीती हि अनाठाई नव्हती.
उत्तर द्याहटवा2. गांधिंना जे साध्य करायचे होते ते हि घडलेच - द्विस्तरीय गुंतागुंतीची निवडणुक प्रक्रिया झाल्याने इतर जाती विभक्त मतदार संघ मागाण्याचा धोका टळला . कारण इतकी गुंता गुंतिचि प्रक्रिया सर्व जातींसाठी लागू करणे अशक्यच होते .
3. या करानुसार अस्पृश्यांना १ ८ टक्के राखीव जागा मिळाल्या . (त्या पूर्वीच्या मेकडोनल्ड निवाड्यापेक्षा खूपच जास्त होत्या )>>>>>>>.
.
.
मुळात आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की गांधीजीनी स्वतंत्र मतदार संघ सोडाच पण आरक्षित जागानाही विरोध केला होता हे लक्षात घेतल पाहीजे. प्रौढ मतदानाशीवाय कुठलीही मागणी मान्य करायला ते नकार देत होते ( हे समजल्यावर जे आरक्षण घेणार्या समाजातले आहेत त्या गांधीवाद्याना झटका लागला असेल पण हे सत्य आहे गोलमेज परीषदेत त्यानी दलितांच्या आरक्षणाला देखील विरोध केला होता )पुणे करारानंतर गांधीनी आणी आंबेडकरानी सुद्धा एक एक पाउल मागे घेतल पण कोंग्रेस (किंवा गांधी ) यानी आंबेडकराना दिलेला निवडणुकीत हस्तक्षेप न करण्याचा शब्द पाळला नाही आणि म्हणुन आंबेडकरानी पुणे कराराचा धिक्कार केला
पुणे करारामुळे अस्प्रुश्याना राखीव जागा जास्त मिळाल्या पण त्यापैकी प्राथमिक निवडणुका कीती जाग्यावर घेण्यात आल्या? त्यात जीथे प्राथमिक निवड्णुक झाल्या तीथे कोंग्रेसच्या हिंदु मतांवर अस्प्रुश्यातील ज्याला सर्वात कमी चौथ्यानंबरची मते पडली ते कसे निवडुन आली त्याचा तपशील पहा. खरे तर पुणे करारामुळे अस्प्रुश्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी कधीच निवडुन गेले नाही आणि त्यामुळेच कोंग्रस असो कींवा भाजपा यांचे दलालच अस्प्रुश्यांचे प्रतिनिधी म्हणुन निवडुन जातात
तुमच्या मते जर अस्प्रुश्यान स्वतंत्र मतदार संघ दिले गेले अस्ते तर दुसर्या जातीनीही स्वतंत्र मतदार संघ मागीतले अस्ते अस असेल तर मग आज सवर्ण आरक्षणाची मागणी करतात म्हणुन दलितांच आरक्षण रद्द करण हे न्यायाच्या द्रुष्टीने योग्य होएल काय
मुळात तुम्हाला अस्प्रुश्यांचा प्रश्न समजलाच नाही अस्प्रुश्यांची परीस्थीती आणि चातुर्वर्ण्यात असणार्याची परीस्थिती एकदम भिन्न आहे. तिथे ब्राह्मण जरी अल्पसंख्य असले तरी त्यांच वर्चस्व राजकारणात होतच ब्राह्माणांच्या विरोधात सर्व जाती कधी एकत्र येत नाहीत कींवा मरा ठ्यांच्या विरोधात इतर जाती कधी एकत्र येत नाहीत किंवा चातुवर्णातील कोणत्याही एका जातीच्या विरोधात सर्व जाती कधीच एकत्र येत नाहीत आणि येणार नाहीत पण अस्प्रुश्यांच तस नाही एखादा उम्मेद्वार अस्प्रुश्य असेल तर हिंदु धर्मातील ( चातुर्वर्णतील ) सर्व जाती त्याच्या विरोधात जातात व अस्प्रुश्या चा पराभव घडवुन आणतात आणि हि गोष्ट हिंदु धर्मातल्या कोणत्याही जातीबरोबर घडण्याची शक्यता नाही आणि ते घडल तरी त्याचा प्रभाव काही मतदारा संघापुरताच मर्यादीत असतो अस्प्रुश्यांच्या बाबतीत हि परीस्थिती अखंड भारतात असते त्यामुळे त्यांचे खरे प्रतिनिधी त्यांच्या हिताचे कायदे करण्याच्या द्रुष्टीने निवडुन येत नाहीत म्हणुन आज जी परीस्थिती दलितांची आहे तशीच आहे त्यामुळे तुमच म्हणन न्यायाच नाही
.
.
.
गांधिंना जे साध्य करायचे होते ते हि घडलेच - द्विस्तरीय गुंतागुंतीची निवडणुक प्रक्रिया झाल्याने इतर जाती विभक्त मतदार संघ मागाण्याचा धोका टळला . कारण इतकी गुंता गुंतिचि प्रक्रिया सर्व जातींसाठी लागू करणे अशक्यच होते . >>>> म्हणुन त्यानी आपली मागणी सोडली असेल हे शक्य वाटत नाही उलट सरकारणेच ती न्याय नाही म्हणुन नाकारली असण्याची शक्यता आहे उलट द्विस्तरीय निव्डणुकांचा परीणाम दलितांवर जास्त पडला कारण द्विस्तरीय निवडणुकीमुळे दलित उमेद्वाराचा खर्च खुप वाढला म्हणुन बर्याच ठीकाणी द्विस्तरीय निवडणुकच झाली नाही त्यामुळे अस्प्रुश्यांचे खरे प्रतिनिधी निवडुन येण्याला ओपोअआप आळा बसला ( आणि त्यातही कोंग्रेस ने निवड्णुकीत हस्तक्षेप केल्याने अस्प्रुश्यांचे खरे प्रतिनिधी जवळपास निव्ड्णुकीत विजयी हौ शकले नाही ) दुसरी कडे ब्रह्मणेतरांची आर्थिक ताकत त्या मानाने अस्प्रुश्यांपेक्षा खुप बरी होती.
1. पुढे मात्र . गांधिंनि त्यांचे विचार बदलले आणि हिंदु धर्माच्या सर्व स्मृतींचे आणि धर्म ग्रंथांचे पुनर्लेखन करावे आणि स्त्रिया आणि शुद्र यांवर अन्याय करणारा भाग त्यातून काढुन टाकावा असे स्पष्ट मत गांधिंनि व्यक्त केले . ( म. गांधी आणि समाजसुधारणा - आकलन . नरहर कुरुंदकर)
उत्तर द्याहटवाहिंदु राहून समता प्राप्त करण्याचा हा गांधी विचार आहे . हा विचार १ ९ २ ७ सालच्या आंबेडकरांच्या विचारासारखाच आहे.
.
2. कधीकाळचा चातुर्वणाचा समर्थक गांधी । यापुढे मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच हजार राहीन अशी अट ठेवतो
.
3. गांधीही स्वत:ची मते अगणित वेळा बदलत आलेले आहेत . मी हिमालया एव्हढ्या चुका केल्या आहेत असे गांधिंनि अनेकदा म्हटले आहे .
.
4. स्वत:ची मते बदलण्याचे स्वातंत्र्य जर आंबेडकरांना आहे तर गांधिंना का नाही ?
.
5. भारतासारख्या अनेकपदरी देशात राजकारण करायचे झाले तर मायावतिलाहि शेवटी सर्वजन हिताय अशी घोषणा द्यावी लागते हे विसरून चालणार नाही >>>>>>>
गांधीचे कुरुंदकरानी सांगीतलेले विचार गांधीनी कधी मांडले होते? सर्वजनिक रीत्या सांगीतले होते की खाजगी बैठकीत ? सार्वजनिक रीत्या सांगीतले होते तर मग त्याबद्दल कुठल्या वर्तमान पत्रात छापल गेलेल होत ? आणि खाजगीत केल होत तर का? ते ही गोष्ट मांडायला भित होते का ?
असे बरेच प्रश्न निर्माण होतात. तरीही तुम्ही आणि करंदीकरानी सांगीतल म्हणुन विश्वास ठेवु
तरीही गांधी त्यांच्या म्हणण्यातुन शेवटीही चातुवर्ण व्यवस्थाच मानताना दिसतात त्याचा ते कधीही निषेध करत नाहीत ( खर तर गांधीनी आधी जन्मा अधारीत जाती व्यवस्था व वर्ण व्यवस्था याच समर्थन केल होत विचारात परीवर्तन आल असत तर त्यानी त्याचा निषेध केला असता नुसत काल बाह्य म्हणुन त्याला अर्थ नव्हता कींवा सुरुवातीलाच जातिव्यवस्थेवर आपले विचार त्यानी सार्वजनिक रीत्या मांडायला नको होत )
मुळात धर्म ग्रंथांचे पुनर लेखणाने काही फरक पडला नसता कारण मुळात वेदात चातुर्वर्ण्य व्यवस्था नव्हतीच ( ती नंतर घुसडण्यात आली )तरीही लोकानी आणि शेकडा 90 टक्के लोकानी वेद वाचले नसले तरी त्यांचा वेदातील चातुर्वर्ण्या वरचा विश्वास बसलेला आहे धर्म ग्रंथाच्या पुनर लेखणाने त्यात काही फरक पडणार नाही कारण वेद हे देवाने लिहीलेले आहेत अशी त्यांची समजुत आहे आणि जो पर्यंत स्म्रुती आणि वेद आहेत तो पर्यंत (इतर धर्मग्रंथ) जातिव्यस्थेवरचा विश्वास त्यांचा राहणार आहे त्यामुळे काही करायच असेल तर ते म्हणजे धर्मग्रंथांच विध्वंसन
हिच गोष्ट आंतरजातिय विवाहा बद्दलची काही लोक आंबेडकरांच आंतर जातीय विवाह बद्दल च मत अर्धवट मांडताना दिसतात आंबेडकर आंतर जातिय विवाहामुळे जातिव्यवस्था उद्धस्त होएल असे जरी म्हटले असले तरी ते मनापासुन घडुन येण्यासाठी त्यांचा ग्रंथप्रामाण्यावरचा विश्वास उडाला पाहिजे त्या साठी धर्म ग्रंथांच विध्वंसन होण गरजेच आहे नुसत गांधी प्रमाणे मी फक्त आंतर जातिय विवाहानाच हजर राहीन हे म्हटल्याने खरच आंतर जातिय विवाह घडत नसतात अशे हजारो गांधी गेले तरी हिंदुचा धर्मग्रंथ प्रमण असल्यामुळे ते फक्त गांधीच्या येण्या न येण्यामुळे आंतर जातिय विवाह करतील हे म्हणन ही हास्यास्पद आहे बर गांधी गेल्यानंतर काय ? परत पुंहा लोक स्वताच्या जातीत विवाह करायला सुरुवात करतील
.
.
.
4. स्वत:ची मते बदलण्याचे स्वातंत्र्य जर आंबेडकरांना आहे तर गांधिंना का नाही ?
.
5. भारतासारख्या अनेकपदरी देशात राजकारण करायचे झाले तर मायावतिलाहि शेवटी सर्वजन हिताय अशी घोषणा द्यावी लागते हे विसरून चालणार नाही >>>>>>>
हो स्वताच मत बदलण्याच स्वातंत्र आहेच की मी वर स्पष्ट केल्या प्रमाणे आंबेडकरानी फक्त संशोधनानुसार आपली मते बदलली (गांधींच तस नव्हत )त्यांचा हेतु लोकांच्या मतांशी नव्हता हे समजुन घ्यायच असेल तर बहुतांश महारांचा विरोध असताना त्यानी महार वतन बिल हे मुंबै विधानमंडळात मांडलेच तो काळही सायमन कमिशन च्या जवळचाच आहे (1927) ( कारण ते विधेयक महारांच्या फायद्याचच होत पण अडाणी महाराना काही महारांच्या इतर नेत्यानी भडकवुन दिल्यामुळे त्यानी त्या बिलाला जोरदार विरोध केला)
आणि सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय हि भुमिका चांगलीच आहे पण मायावतीनी गांधीसारख जातिव्यवस्थेच समर्थन कधी नाही केल
आता गांधींच्या दांभिक विचाराविष्यी थोडेसे
उत्तर द्याहटवाजेव्हा गांधी जाती व्यवस्था मानत होते तेव्हा त्यांची मते कीती खतरनाक होते ती त्यांची मते वाचुन पहा मी ती मते इथे सविस्तर देत नाही पण त्यांचा एक मत जरुर इथे देइन कारण त्याने त्यांचा दांभिक पणा नजरेला येतो ते कसे ते पहा ...
गांधी नवजीवन या आपल्या गुजराती साप्ताहीकात म्हणतात .."....जातिव्यवस्थेला राजकीय आधार आहे. प्रातिनिधीक व्यवस्थेसाठी जात ही मतदार संघ म्हणुन स्विकारली जाउ शकते."
हे गांधीजींचे जातीव्यवस्था मानत असतानाचे विचार तेच गांधी अस्प्रुश्यांच्या आरक्षणाला (प्रतिनिधीत्वाला) ( मी स्वतंत्र मतदार संघ म्हणत नाही तर आरक्षण म्हणतोय ) त्यालाही विरोध करत होते हा कीती दांभिक पणा !
गुरुवायुर मंदीर विषयीचा दांभिक पणा आपणास माहित असेलच
..
. जनतेला जेव्हा वळण लावण्याची पाळी येते तेव्हा गांधीजी एकतर अलिप्त होवून जात असतात किवा आपल्याच तत्वाशी अप्रामाणिक राहतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे केरळ येथील गुरुवायुर मंदिर प्रवेश होय. गुरुवायुर येथे केल्ल्पण व त्यांच्या सहका-यांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी चळवळ सुरु केली. मंदिराचे विश्वस्त झोमोरीन यांनी हिंदू धार्मिक नेमणूक कायदा, उपकलम ४० चा आधार घेत मंदिराची प्रथा व रिवाज याविरुध्द ते काहीही करू शकत नसल्यामुळे मंदिर प्रवेश नाकारला. झामोरीन ची बाजू विचारात घेता गांधीजीनी केल्ल्पण यांना तीन महिने उपोषण स्थगित करण्याची सूचना केली. १ जानेवारी १९३२ पर्यंत मंदिर खुले न केल्यास मी स्वत: उपोषणात सामील होण्याचे अभिवचन गांधीनी केलप्पन याना दिले होते. तीन महिन्यानंतरही मंदिर प्रशासनाने मंदिर प्रवेश नाकारला. परंतु यावेळेस गांधीजीनी केलप्पन यांना दिलेले अभिवचन मोडत नवा डाव खेळला. केल्लपन यांनी चालवलेली चळवळ ही अकाली असून त्यात सक्तीचा वास असल्याने त्यांनी आपले उपोषण स्थगित करावे असे केल्ल्पण यांना कळविले. त्यानंतर गांधीनी मंदिर प्रवेशासाठी दोन बाबी समोर केल्या, पहिली बाब हिंदूचे सार्वमत तर दुसरे कायदेशीर अडथळा दूर करण्यासाठी व्हाईसरायची संमती. पुढे सार्वमताचा निकाल मंदिर प्रवेशाच्या बाजूने लागला व व्हाईसरायची संमतीही मिळाली तरीही गांधीजीनी अस्पृश्याच्या मंदिर प्रवेशासाठी उपोषण केले नाही. यातच गांधीजीचे खरे गुपित उघड होते. त्यामुळे आजही अस्पृश्य समाज गांधीजीचा विरोध करतो तो गांधीजीच्या या विश्वासघातकी दोगलेपनामुळेच.
http://bmraut.blogspot.in/2013/03/blog-post_25.html?m=0
अजुन बर्याच बाबतीत असा दांभिक पणा केला आहे पण तो आपला विषय नाही सध्या तरी एव्हढे पुरे
( काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण द्याल अशी आशा करतो )
धन्यवाद
समाप्त.