कम्युनिस्ट धर्माची चिकित्सा :( भाग २)
वंश जातीवादी - कार्ल मार्क्स
या सुधारित लेखासाठी कम्युनिस्टांच्या अधिकृत वेबसाइट्वारिल संदर्भ दिले आहेत. जुन्या लेखात आवश्यक ते बदल केले आहेत. टेक्निकल चुका सुधारल्या आहेत.
कम्युनिस्ट धर्म प्रेषित कार्ल मार्क्सने कृष्णवर्णीय निग्रोना हीन दर्जाचे मानले होते. (आफ्रिकन योग्य शब्द ) किंबहुना काळ्या कातडीच्या लोकांच्या हिनतेचे - गुलामीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन मार्क्स च्या लिखाणात येते .
जेएनयु मधील आजचे AISF कन्हैय्या मार्क्सवादी जगाला समता - आणि सहिष्णुतेचे डोस पाजत आहेत. ते ढोंग आहे . कपट आहे. कम्युनिस्टांच्या नेणिवेतले कपट उघडे करण्यासाठी हा लेख …
मार्क्स आणि मार्क्स वाद्यांच्या जाणिव आणि नेणिवेतील वंश वाद , वर्ण श्रेष्ठत्व आणि त्यांच्या हिंसक विचारांचा प्रस्तुत लेखात आढावा घ्यायचा आहे . त्यासाठी मार्क्सवाद्यांनिच ऑनलाइन प्रकाशित केलेले साहित्य संदर्भ म्हणून वापरायचे आहे. कम्युनिस्टांच्या इंटरनेट लिंक्स द्यायच्या आहेत.
कामगार प्रश्नावरील प्रामाणिक लढयांसाठी कम्युनिस्ट बंधुंचे अभिनंदन आणि आभार मानून मी त्यांना लाल सलाम करतो . कम्युनिस्ट अतिशय प्रामाणिक आणि बुद्धिमान आहेत - त्याबद्दल नमन - प्रोब्लेम त्यांच्या बॉस मध्ये आहे - कार्ल मार्क्स मध्ये आहे. मुलभुत कम्युनिस्ट विचार वाइट आहे.
प्रस्तुत लेख हा वाट चुकलेल्या लाल बांधवांच्या --- मार्क्स अवतारा बद्दलच्या --- अंधश्रद्धा निर्मुलनाचा नम्र प्रयत्न आहे.
मार्क्सने केलेली जातीय टिका
३० जुलै १८६२ रोजी एंजल्स ला लिहिलेल्या पत्रात मार्क्स ने स्वत:च्या छळवादी शत्रूवर खालील टिका केलेली आहे : -
" आता मला स्पष्ट झाले कि लासाले च्या डोक्याचा आकार आणि केसाचा पोत; त्याची निग्गर पाळेमुळे दर्शवतो. एकतर तो मोझेस ची साथ देणार्या काळ्या आफ्रिकनाचा वंशज असेल अन्यथा -- त्याची आई वा आज्जी काळ्याशि रत झाली असेल --- जर्मन ज्युचे सत्व आणि आणि काळा आफ्रिकी कच्चा माल ( basic negroid stock ) याच्या मिश्रणातून असलेच विचित्र प्रोडक्ट तयार होणार . लासाले चा आगाव हट्टीपणा (importunate) एखाद्या निग्गर सारखाच आहे " (संदर्भ १)वर्ण वर्चस्व वाद मार्क्स च्या वाक्या - वाक्यातून ओसांडून वाहतो आहे.… मार्क्स आणि एंजल्स चा मुळातला पत्रव्यवहार जर्मन भाषेतून आहे.
जर्मनीतला बोली शब्द नेगार असा आहे .
नेगार न वापरता … जर्मन पत्रातही मार्क्स आणि एंजल्स ने निग्गर हाच इंग्रजी शब्द वारंवार वापरला आहे . निग्गर हि अपमानास्पद शिवी आहे . रक्त भेसळ , कवटिचा आकार आणि केसाचा पोत यावरून माणसाच्या वर्ण - वंश आणि वर्तणुकीबद्दल (importunate) मार्क्सने केलेली टिप्पणी यात दिसते .
हा शुद्ध वंशवाद आहे . हिटलरपूर्व युरोपात या विचाराची पक्की पकड होती . मार्क्स वरही त्याचा प्रभाव दिसतो. लासाले आणि मार्क्स चे काही आर्थिक कारणावरून विवाद झाले होते . आर्थिक कारणासाठी समोरच्या व्यक्तीचा वंश - शत्रूची जात आणि त्याच्या कवटिचा आकार तपासणार्या मार्क्सच्या डोक्यात किती समता असेल ? मार्क्स बाबाने वरील पत्रात स्त्रियां विषयी वापरलेली भाषा लक्षात घेतली पाहिजे -
मार्क्स मत : हीन वंशाचे काळे कृष्णवर्णीय
मार्क्सचा वर्गलढा आणि समता गोऱ्या राष्ट्रातील गोऱ्या लोकांसाठी आहे . इतर राष्ट्रांना मार्क्स वाद लागू असला तरी शुद्ध वंश , हीन दर्जाचे वंश , मारून टाकण्याच्या लायकीचे वंश , गुलाम व्हायच्या लायकीचे वंश या तत्कालीन संकल्पना मार्क्सच्या डोक्यात फ़िट्ट आहेत . ट्रीमोअ या वंशवादि शास्त्रज्ञा वर स्तुतिसुमने उधळत मार्क्स ने खालील मत व्यक्त केले आहे : -
" ट्रीमो चे संशोधन डार्विन पेक्षा अधिक योग्य आहे . त्याच्या विचाराचे ऐतिहासिक आणि राजकीय उपयोजन महत्वाचे आणि अधिक फलदायी ठरते …. ट्रिमो ने सिद्ध केले आहे कि काळ्यांचा निग्रो वंश हा उत्क्रांतीत हीन दर्जाला घसरलेला वंश होय . " (संदर्भ २)
ट्रिमॉअ वर मार्क्स भलताच भाळला होता. याचे कैक पुरावे मार्क्स च्या साहित्यात मिळतात . ट्रिमॉअ ने लावलेले उत्क्रांती वादाचे असे अनेक चुकीचे बोध तत्कालीन युरोपात प्रचलीत होते. सजीवाची उत्क्रांती प्रगतीकडे होते आणि काळे लोक हा उत्क्रांत सजीव नसून - माकडाच्या दिशेने खाली अधोगती झालेला अभागी जीव आहे असे हे ट्रिमॉ चे म्हणणे आहे . काळ्याचे माणूसपण ट्रिमो नाकारतो . मार्क्स ने त्याला उचलून धरले आहे .
पण वंशवाद हे ट्रिमो आणि मार्क्सचे घोर अज्ञान आहे . वास्तविक पाहता डार्विनचा विकसित सिद्धांत वंशभेद खोडून काढतो आणि सर्व मानव एकच आहेत अशा निष्कर्षाला आज येतो .( यावर अधिक माहिती साठी येथे क्लिक करा . )
पण तत्कालीन युरोपने डार्विनचा चुकीचा अर्थ काढत…. युजेनिक्स पासून हिटलरच्या वंश संहारापर्यंत अनेक विकृत प्रयोग केलेले होते . मार्क्स चा विचार तत्कालीन युरोपियन विचारा प्रमाणे जातीवादी - वंश - वर्ण श्रेष्ठत्व वादि असाच आहे .
कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स |
मार्क्स एंजल्सचि युरोपियन जोडगोळी : १८४८
१७८९ सालची पहिली फ्रेंच राज्यक्रांति, १८०४ साली नेपोलियनचा राज्याभिषेक. या पार्श्व भूमीवर १८४८ साली युरोपात सार्वत्री क्रांती - लढाया - बंडे आणि नव राष्ट्रवादाचा उदय झालेला दिसतो . मुख्यत: पश्चिम आणि मध्य युरोपातल्या देशात राजेशाही विरुद्ध बंड घडत होते. तंत्र - विज्ञानातली प्रगती , औद्योगिक क्रांति , कामगार वर्गाचे शोषण , मध्यम वर्गाचा उदय यातून हा घनघोर संघर्ष पेटत होता .
राजांचे राजमुकुट पालथे पडले , सिंहासने मोडली……. इटालीत लोकशाही , फ्रांन्स मध्ये फेब्रुवारी क्रांती , जर्मनीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुकार , डेन्मार्कची नवी राज्यघटना - हंगेरी , पोलंड , ब्राझील सार्या देशात १८४८ साली उठाव आणि युद्धे चालू आहेत . राजेशाहीकडून लोकशाहीकडे आणि सामंतशाहि कडुन घटनात्मक आधुनिक राज्य - राष्ट्रांकडे …… युरोपचा प्रवास चालू झाला आहे .
व्हर्नेअ या चित्रकाराचे १८४८ च्या अनागोंद क्रांतिचे प्रसिद्ध तैलचित्र |
मात्र लोकशाही मागणारे सारे युरोपियन भारतासारख्या वसाहतीना गुलाम बनवून त्यांचे शोषण करणे चालूच ठेवत आहेत. मानवी मुल्ये फक्त युरोप पुरतीच लागू आहेत . याच १८४८ साली मार्क्स आणि एंजल्स हे दोन युरोपियन मित्र त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करतात - कम्युनिस्ट मेनिफ़ेस्टो . त्यांचा धर्म ग्रंथ !
समकालीन युरोप प्रमाणे मार्क्स आणि एंजल्स चे विचार युरोप बाहेरील काळ्यांना मानव समजत नाहीत यात काही आश्चर्य नाहि.
हिटलरचा नेशनल सोशालीझम (नास्झी ) , मुसोलिनीचा हुकुमशाही समाजवाद, मार्क्सचा साम्यवाद
हे त्या काळात जन्मलेले काही हिंसक विचार आहेत .दुसर्या महायुद्धात जे हरले ते संपले . मार्क्स वादाला मात्र कम्युनिस्ट धर्माचे स्वरूप आल्याने तो टिकुन आहे. त्याचे अनेक उप प्रकार जन्मले आहेत . फ़्रोईड च्या कालबाह्य आणि आज चूक ठरलेल्या मानस शास्त्राबरोबर मार्क्स ची संगड घालत …जाणिव नेणिवेतील वर्ग संघर्ष आजही पोथिप्रिय मार्क्स धर्मियात लोकप्रिय आहे.
मार्क्समत : काळ्यांची गुलामी - जाणिव आणि नेणीवेत !
अमेरिकेत त्या काळी आफ्रिकन स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून राबवले जात आहे. त्यांना जनावराप्रमाणे कोंडुन ठेवले जात आहे. पुरेसे अन्न नाही . चाबकाचे फटके आहेत . जीवघेणे कष्ट आहेत . काळ्यांच्या गुलामी बद्दल मार्क्सचे लिखाण अतिशय सूचक आहे .
मार्क्स गुलामीचे दोन भाग पाडतो . प्रत्यक्ष गुलामी आणि अप्रत्यक्ष गुलामी . काळ्या माणसांच्या गुलामीला तो प्रत्यक्ष गुलामी म्हणतो . आणि युरोपातील गोऱ्या कामगारांच्या शोषक नोकरीला अप्रत्यक्ष गुलामी म्हणतो . मार्क्सचा वर्ग लढा (अप्रत्यक्ष गुलामी)
गोऱ्या राष्ट्रातील समतेसाठी गोऱ्या गुलामांनि गोऱ्या मालकांशी केलेले युद्ध आहे .
पुद्धोऑ नावाच्या समाज वाद्याशी मार्क्स चे बरेच वाद विवाद झालेले आहेत. पुद्धोऑ लिखित पुस्तकाला उत्तर द्यायला मार्क्स ने ' पोव्हर्टि ऑफ फ़िलोसोफ़ि' ( तत्वज्ञानाची गरिबी ) नामक पुस्तिका लिहिली आहे . मार्क्स लिहितो :
" (काळ्या) गुलामाशिवाय कापूस नाही . कापसाशिवाय यंत्रमाग नाही - कि नवी औद्योगिक क्रांति नाही. गुलामीमुळे वसाहतींना मुल्य प्राप्त होते . वसाहतींमुळे जागतिक व्यापार संभवतो , व्यापारामुळेच मोठे उद्योग उभे राहतात . गुलामी हि अतिशय महत्वाची अर्थशास्त्रीय कल्पना आहे . जर गुलामी रद्द केली तर अमेरिके सारखा प्रगीतीशील देश एक पितृसत्ताक सामंतशाहि देश (patriarchal country) बनून जाईल . जर अमेरिकेचा नाश झाला तर सर्व आधुनिक अर्थशास्त्र आणि प्रागतिक संस्कृती नष्ट होऊन जाइल. " ( संदर्भ ३ पृष्ठ ५० )" हे पुन्हा स्पष्ट करायची अजिबातच गरज नाही कि येथे मी प्रत्यक्ष गुलामिबद्दल बोलतो आहे . अमेरिका , ब्राझील आदी देशातील काळ्या निग्रोंच्या गुलामी बद्दल लिहितो आहे . बुर्झ्वा उद्योगात जे यंत्राचे स्थान आहे . तेच स्थान प्रत्यक्ष गुलामीला तेथे आहे . " ( संदर्भ ३ पृष्ठ ४९ - ५० )
पितृसत्ताक सामंतशाहि देश (patriarchal country) तयार होऊ नयेत म्हणून काळ्यांनी गुलामीत राहिले पाहिजे हि मार्क्सवादी विचारधारा आपण निट समजून घेतली पाहिजे.
मार्क्सने काळ्या गुलामांची तुलना यंत्राशि केली आहे . काळ्याना मार्क्स मानव नसून प्राणि समजत असे हे आधीच्या लेखातून स्पष्ट झालेले आहे .
सदर मार्क्सच्या लिखाणाला एंजल्स ने तळटिप जोडली आहे . आणि १८४७ साली मार्क्सचे लिखाण कसे बरोबर होते …. ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे . एंजल्स हा मार्क्स चा मित्र आणि सर्वश्रेष्ठ समकालीन भाष्यकार आहे . डाय्लेक्टिक चा प्रत्यक्ष अर्थ काय घ्यायचा ? याचे व्यवस्थित मार्गदर्शन एंजल्स ने केले आहे.
हेगेलच्या डायलेक्टिक्स चा मार्क्स आणि मार्क्स वाद्यांवर प्रचंड प्रभाव आहे. वरील चर्चा हेगेल च्या डायलेक्टिक्स चे उपयोजन आहे . वंशवादाचे समर्थन मार्क्सच्या जाणिवेत तर आहेच पण कथित नेणिवेत सुद्धा आहे.
आंबेडकर आणि मार्क्स
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्स आणि बुद्ध नावाचे एक पुस्तक लिहिले आहे . त्याच्या शेवटच्या वाक्यांचा सारांश असा -
" फ़्रेंच राज्यक्रांति मला स्वीकाराहार्य वाटते कारण समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हि तिची घोषणा ! (मानवी ) बंधुता आणि स्वातंत्र्य याचा मार्क्सवादात स्वीकार नाही . म्हणून मार्क्स मान्य नाही. (बुद्धात तिन्ही असल्याने तो मला अधिक प्रिय आहे )"We welcome the Russian Revolution because it aims to produce equality. But it cannot be too much emphasised that in producing equality society cannot afford to sacrifice fraternity or liberty. Equality will be of no value without fraternity or liberty. It seems that the three can coexist only if one follows the way of the Buddha. Communism can give one but not all. - Dr BR Ambedkar
(मानवी ) बंधुता आणि स्वातंत्र्य याचा मार्क्सवादात स्वीकार नाही म्हणून मार्क्स मान्य नाही . |
(मार्क्स चे जातीयवादी वांशिक उद्गार त्याकाळी जर्मन भाषेत उपलब्ध होते. त्या काळी इंग्रजीत भाषांतरीत झाले नव्हते, तरीही बंधुता आणि स्वातंत्र्य याचा आभाव कम्युनिस्ट विचारात आढळल्याने बाबासाहेबांनी मार्क्स नाकारला. साहेबांच्या बुद्धिमत्तेची चुणुक इथे दिसते. )
मार्क्स - एंजल्स मत : हीन वंश आणि गरीब राष्ट्रे नष्ट करा
हिटलरपूर्व जर्मनीत ज्यू द्वेषाचे प्रमाण तुलनेने कमी होते. आणि अनेक ज्यू तरुणांनाही जर्मन राइश (साम्राज्याची) स्वप्ने पडत असत . जर्मनीच्या पूर्वेला असलेल्या इंग्लंड फ्रांस आदी देशा बद्दल आदर आणि पश्चिमेच्या - स्लाव, झेक आणि रुमानिया वगैरे राष्ट्रांचा नाश हे तत्कालीन जर्मनीचे तरुण स्वप्न होते. हिटलर आणि मार्क्सची काही स्वप्ने तंतोतंत सारखी आहेत . मार्क्स आणि एंजल्स ने १८४८ साली नव्या राइशन चे वृत्तपत्र म्हणून पेपर काढला . याचा संपादक मार्क्स आहे . एंजल्स लिहितो
"आम्ही पुन्हा बजावून सांगतो : पोलिश,टर्किश, रूसी वगळता स्लाव वंशियांना भविष्य नाही . स्लाव लोकांकडे इतिहास , भूगोल , राजकारण , उद्योग यापैकी काहीच नाहि.आणि म्हणूनच स्वतंत्र राष्ट्र म्हणून घेण्याची त्यांची पात्रता नाहि " (संदर्भ ५ : १४-२२-१८४९ चा लेख )याच वर्तमानपत्रात मार्क्स आणि एंजल्स ने स्लाव , झेक , रुमानिया आदी राष्ट्रांविरुद्ध -- लहान राष्ट्रांविरुद्ध विषारी प्रचार चालवला होता . एंजल्स आणखी लिहितो :
" मागास बाल्कन राष्ट्रांनि तात्काळ करायचे कर्तव्य म्हणजे क्रांतीच्या वादळात विरून जाणे हे होय . जर्मन पोल आणि हंगेरियन - बालकनांचा भीतीदायक सूड घेणार आहेत. सर्वंकश युद्धाचा प्रारंभ होईल. त्यात हि इटुकली बैलबोडी राष्ट्रे कायमची नष्ट होणार आहेत. प्रतिक्रियात्मक , राज्ये , वंश आणि लोकही नष्ट होणार आहेत. आणि तीच प्रगती असेल. " (संदर्भ ६)एंजल्स ची हि सिंह गर्जना पुढे हिटलर ने वास्तवात आणली .
मार्क्सच्या आर्थिक विचारातले क्रौर्य - हिंसा आणि वंशवाद याचे आकलन होण्यासाठी मार्क्स वर प्रभाव टाकणारे तत्वज्ञ थोडक्यात समजून घ्यावे लागतील .
मार्क्स वर प्रभाव असणारे विचारवंत : ट्रीमो , हेगेल आणि स्पेन्सर
डार्विन वा लमर्क चा अतिशय चुकीचा अर्थ तत्कालीन युरोपात प्रचलित होता . " बळी तो कान पिळी " सर्व्हायव्हल ऑफ द फ़िटेस्ट . शक्तिमान करी राज्य ! असा काहीसा हा विचार आहे . त्यात तथा कथित हीन दर्जाच्या वंशाला (स्पीशीज) मारून टाकणे वा गुलाम करणे हे नैसर्गिक मानले गेले आहे . शुद्ध आणि श्रेष्ठ वंशीय गोऱ्या लोकांच्यातलि विषमता मिटवण्यासाठी हिटलरचा नाझीवाद किंवा मार्क्सचा साम्यवाद आहे. हेगेल , स्पेन्सर आणि ट्रिमॉ च्या भंकस मतांचा विलक्षण प्रभाव हिटलर वर सुद्धा आहे .
हिटलरने युजेनिक्स म्हणून काही वांशिक प्रयोग केले होते . काळ्या , अपंग , बुटक्या , कुरूप , कमकुवत लोकांची नसबंदी आणि सुधृढ लोकांचे भरगोस पुनरुत्पादन यातून देशाला रोगमुक्त आणि सबळ करण्याचा हा हिटलरि विचार आहे . गरिबी नष्ट करण्यासाठी गरिबांना मारून टाका असे म्हणण्या इतकेच युजेनिक्स मुर्खपणाचे आहे .
युजेनिक्स च्या विचार वृक्षाला नाझी छळ छावणीत फळे आली |
हेगेलचे डायलेक्टिक्स
मनात एखादा विचार (थेसिस ) आला कि त्यावर काही शंका - आक्षेप (एन्टी थिसिस ) घेता येतात. त्याच्या घुसळणितुन एक नवा विचार (सिन्थेसिस ) जन्माला येतो . हा सिन्थेसिस (नव विचार) सुद्धा एक प्रकारचा विचार (थेसिस) आहे. मग त्यालाही शंका - आक्षेप (एन्टी थिसिस ) घेता येतात . मग पुन्हा नवा विचार जन्मतो . अशा प्रकारच्या विचार कलहातून - विचाराची प्रगती होत जाते .
हिटलर आणि नाझी पक्षाने हेगेलचे डायलेक्टिक्स वंशवादाला लावले . आणि हीन वंशाचा नाश करण्यासाठी योजना बनवल्या . एन्टी थिसिस असलेल्या हीन वंशाचा नाश केल्याशिवाय नवा सिंन्थेसिस कसा जन्माला येईल ? !!!!
हेगेलचे डायलेक्टिक्स समाजशास्त्रात वापरले तर संघर्ष हिंसा आणि वंश विच्छेद अटळ आहे .
मार्क्स ने हेगेलचे डायलेक्टिक्स अर्थशास्त्राला लावले आणि कम्युनिझम चा जन्म झाला. त्यामुळे कम्युनिझम मध्येही वर्ग संघर्ष आणि हिंसा अटळ आहे .
मुळात हेगेलचे डायलेक्टिक्स साफ चुकीचे आहे . विज्ञान आणि जीवशास्त्र याच्याशी हेगेल सुसंगत नाहि. मानवी विचार हे थेसिस - एन्टी थिसिस अशा प्रकारे चालत नाहीत . मेंदुशास्त्र हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो
संघर्ष आणि हिंसेशिवाय सुद्धा प्रगती होते . आणि कायम प्रगती झालीच पाहिजे अशी काही अट परमेश्वराने (!) घातलेली नाही . हेगेलचे नियम समाज शास्त्रांना लावता येत नाहीत . हिटलरचीच चूक मार्क्स ने केलेली आहे. पोथिनिश्ठ मार्क्सवादी नवे विज्ञान न शिकता… हेगेलच्या डायलेक्टिक्स ची पारायणे करत बसले आहेत .
मार्क्सवादी विष पेरणी
क्रांतीकारकांचा दहशत वाद , हिंसेशिवाय प्रगती अशक्य , हिंसा हि क्रांतीला जन्म देणारी सुइण आहे अशा अर्थाची मार्क्सची शेकडो वाक्ये आहेत. स्टेलिन आणि माओ हे दोन मार्क्सचे अनुयायी .
रशियाच्या कम्युनिस्ट राजवटीत - स्टेलिन च्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हुकुमाद्वारे लाखो (सात लाख आय गेस - हिशोब कदाचित शेकड्यात चूकेल) माणसे मारली गेली आहेत. माओ ची हिंसा थरकाप उडवणारी आहे . लाल चीन ने तरुण निशस्त्र विद्यार्थी आंदोलकांवर रणगाडे चालवून चौक च्या चौक रक्ताने भरले आहेत . (तियानान्मान चौक १९८९ )
लाखो लोकाना मारणार्या खुनी खमुनिस्टानि सहिष्णुतेची भाषा बोलावी ?
सामाजिक क्रांति झाली का ?
उत्तर नाही असे आहे.
लपवणे , दडपून खोटे बोलणे यात कम्युनिस्ट राजवटी पारंगत आहेत . चंद्रावर उतरलेला पहिला माणुस रशियन होता असे रशियन सरकार शिकवत असे. आजही चीन मध्ये फेसबुकवर बंदि आहे . तीयानंमान चौक याबद्दल कोणतीही माहिती चीन मधल्या इंटर्नेट वर मिळत नाही .
हेगेल च्या मुळात बोगस तत्वज्ञानाचा विकृत अर्थ काढून जमेल तेंव्हा हिंसा आणि न जमल्यास पुढच्या हिंसेची तयारी असे कम्युनिस्टांचे सूत्र आहे . जाणिव नेणीव खाउजा विरोध वर्ग संघर्ष मय इतिहास--- या कम्युनिस्ट विचाराची विष पेरणी यत्र तत्र सर्वत्र झाली आहे. उद्याच्या हिंसेसाठी हि तयारी केली गेली आहे. हेगेल मार्क्सचे विचार पुढे नेले तर हेच घडणार आहे. कम्युनिसटांच्या जाणिवेतले ध्येय हिंसा आणि नेणिवेतले ध्येय वंश्वाद असावे !!
कम्युनिस्ट बंधुहो १८ व्या शतकातील मागास विचाराला शास्त्रीय समाजवाद मानू नका .
कोम्रेड बांधवांचे त्यांच्या त्यागाबद्दल आभार मानून सुद्धा त्यांची चिकित्सा करणे आणि मार्क्स बाबाच्या धार्मिक अंधश्रद्धेतून त्याना बाहेर काढणे . हे आम्ही आमचे कर्तव्य समजातो . त्यात माणुसकीचे भले आहे . भारताचे हित आहे . पुरोगाम्याचे कल्याण आहे आणि कम्युनिस्टांचे तर कोटकल्याण आहे .
(क्रमश:)
(लाल सलाम पुढचा भाग : कॉम्रेड स्टालिन ते कोम्रेड शरद)
-------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ
१) कृष्णवर्णीय टिप्पणी : https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1862/letters/62_07_30a.htm
२) मार्क्स मत : हीन वंशाचे काळे कृष्णवर्णीय
https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1866/letters/66_08_07.htm
३) काळ्यांची गुलामी - जाणिव आणि नेणीव (पृष्ठ ४९ -५०)
https://www.marxists.org/archive/marx/works/download/pdf/Poverty-Philosophy.pdf
४) आंबेडकर आणि मार्क्स
http://www.ambedkar.org/ambcd/20.Buddha%20or%20Karl%20Marx.htm#a8
५) स्लाव वंश स्वातंत्र्यास अपात्र ( १४-२-१८४९)
https://www.marxists.org/archive/marx/works/download/Marx_Articles_from_the_NRZ.pdf
६) Neue Rheinische Zeitung. Translated By Wolf Pg 39
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अत्यंत माहितीपूर्ण आणि विचारव्यूह घडवणारा लेख... हेगेल प्रकरण मला फारसे माहिती नव्हते. आतापर्यंत कम्युनिस्टविरोधी अनेक चांगले लेख वाचले आहेत, पण तात्विक गाभा उलगडून विचारधारेला तर्काची खण-कुदळ लावणारा हा लेख फार आवडला... धन्यवाद !
उत्तर द्याहटवा