सेक्युलारीझम हा भारतातील राजकारणात सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय आहे . राज्यघटनेवरिल चर्चेत हा विषय वारंवार येतो . वस्तुत: सेक्युलारीझम हा कायद्याचा विषय आहे . संविधानातल्या २५ व्या कलमाच्या अर्थाने … भारतीय राज्यघट्नेत कोणत्या अर्थाने सेक्युलारीझम आलेला आहे ? ते आपण समजून घेतले पाहिजे. हिंदु / मुस्लिम धार्मिक लोकांनी सेक्युलारीझम चे अत्यंत चुकीचे अर्थ काढले आहेत .
(आपल्या घटनेतले मुळ सेक्युलारिझम चे कलम लेखाच्या शेवटी दिले आहे )
सेक्युलारिजम आणी सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला. आणी प्रचंड घोळ घातला. सभ्य स्त्री - पुरुष हो - आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही. घटनेत सेक्यूलारिझम आहे.
सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत.
सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती - ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही. मी फक्त संविधानातला सेक्युलारीझम मानतो.धर्मातला नाही. .
----------------------------------------------------------
ज्याना स्वत:ला भारताचे नागरिक म्ह्णवायचे त्याना संविधानाचे सार्वभौमत्व मानणे अनिवार्य आहे.

तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात. कारण प्रेमात पडायचं वय कधीही संपत नाही आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..
समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील.
पण मनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात.
मांडे खा. पण मनातल्या मनात.
तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल !
भारताच्या राज्यघटनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल.
तुम्ही म्हणाल सतिप्रथा हा आमचा धार्मिक अधिकार आहे . मनातल्या मनात म्हणायचं - तुमच्या घरातसुद्धा असला धर्म पाळू लागलात तर तुरुंगात रवानगी होइल.
तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल.
धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही.
सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे.

मी फक्त संविधानातला सेक्युलारीझम मानतो . ज्याना स्वत:ला भारताचे नागरिक म्ह्णवायचे त्याना संविधान मानणे अनिवार्य आहे.

हिंदुत्व वाद्यांचा खोटा प्रचार
या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमाच्या फायद्यासाठी / पक्षपातासाठी आहे असा प्रचार अनेक हिंदुत्व वादि करतात . हा प्रचार असत्य आहे . . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक चष्म्यातून घेतले जातील .

दही हंडीचे किती थर रचावेत ? किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत .
धर्म आणि पंथ या दोन शब्दा बद्दल संघाने पुरेसा गोंधळ घातला आहे . त्यांना वाटते पंथ म्हणजे उपासना पद्धती आणि धर्म म्हणजे कर्तव्य ! म्हणून ते पंथ निरपेक्षता हवी म्हणतात …. हा संघ परिवाराचा भ्रम आहे किंवा सरळ खोटा प्रचार . धर्म / कर्तव्य हे सुद्धा राज्यघटनेच्या आधीन राहून पार पाडायचे आहेत हे समजून घ्या . अगदी माता पिता पुत्र पत्नी या बाबतीतली कर्तव्ये सुद्धा कायदा ठरवतो - धर्म नाही .
घटनेतील मूलभूत तत्वे धुडकावून लावत राजीव गांधिंनि मुस्लिम लांगुलचालन केले . शहाबानो केस मध्ये धर्मनिरपेक्षता ठोकरून मुस्लिम धर्मांधते समोर लोटांगण घातले आणि इस्लामी कायद्यानुसार एका मुस्लिम महिलेवर अन्याय केला . याची परतफेड म्हणून पुढे राजीवानेच बाबरी मशिदीचे कुलूप उघडुन एका नव्या वादाला तोंड फोडले . पुढचा इतिहास सर्वांना माहित आहे .
देशाच्या सेक्युलारीझामचे वाटोळे कोन्ग्रेस ने केले . शहाबानो आणि बाबरीचा फटका कमी पडला असावा. दादरी वरून मुस्लिम व्होट बेंक पोलिटिक्स सुरूच आहे.
समान नागरी कायद्याचे लोणचे घालणार्या कोङ्ग्रेसचि नोकरी पत्करून सध्या पुरोगाम्यांनि दादरिवर पुरस्कार वापसी सुरु केली आहे . हे सरळ मुस्लिम वोट बेंकचे राजकारण - आधी समान नागरी कायदा आणि सेक्युलारीझम वर मत मांडावे - आणि मग फुरस्कार वापसी करावी.
दुट्टपी पुरोगाम्यांनी हिंदुना सेक्युलारीझम आणि मुस्लिमांना सर्व धर्म समभाव लागू केला आहे . यात खरे तर नुकसान मुस्लिमांचे आहे . मुस्लिम यामुळे मध्ययुगातच राहत आहेत . पण थोडा तोटा हिदुचा सुद्धा आहे . तो असा कि फ़ुरोगाम्यानच्या भंकस मुळे आपल्यात सुद्धा सध्या साक्षि साध्वी ला महत्व मिळु लागले आहे
----------------------------------------------------------
देशातला सेक्युलारीझम हा सर्व धर्माच्या सुधारणेसाठी आहे । आणि ज्या धर्माचा समाज या सुधारणेच्या सुवर्ण संधीचा फायदा घेणार नाही … तो चिखलातच मागास आणि दरिद्री राहणार आहे … पण हे कोणि बोलायचे ?
धर्म ग्रंथ जुने झाले ते आता कपाटात ठेवा ग्रंथालयाच्या - आज कसे जगावे हे विज्ञान ठरवेल - धर्म नव्हे - हा सेक्युलारीझाम आहे …

थोडक्यात : धर्म पाळायचा नाही, रस्त्यावर तर धर्म आणायचाच नाही , धर्म दारात पाळायचा नाही , धर्म घरात पाळायचा नाही - फार तर मनात पाळायचा ! धर्म घरात हि पाळायचा नाही . तुम्ही तुमच्या घरात तुमच्या पत्नीशी कसा व्यवहार करावा ? हे कायदा ठरवणार . संविधान ठरवणार आहे - तुमचा धर्म नाही . संविधान धर्म मानत नाही - तुम्हीही तुमचा धर्म घरातसुद्धा पाळायचा नाही - फार तर मनात पाळायचा

घटनेतले २५ वे कलम लेखाच्या शेवटी देतो आहे. हे सेक्युलारीझम चे कलम आहे. यानुसार public order, morality and health याच्या आधीन राहून धर्म पाळता येतो . धर्मातली एखादी गोष्ट जर अनैतिक , अनारोग्यकारक वा असामाजिक वाटली तर शासन त्याविरुद्ध कायदा करु शकते . economic, financial, political या सर्व बाबतीत शासनाचा निर्णय अंतिम आहे . धर्माचा नाहि.

मुस्लिमांच्या पक्षपातासाथि देश सेक्युलर नाही . या देशात १०० % हिंदू असते तरीही हा देश सेक्युलरच राहीला पाहिजे .
या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमांसाठी नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक चष्म्यातून घेतले जातील . आदत आणि इबादत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . कुणाची पूजा करावी आणि पारमार्थिक बाबिना इबादत म्हणतात . या इबादत चे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षतेत जरूर आहे. आदत म्हणजे इहलोक .आणी इथले नियम . किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत . या देशात फक्त हिंदूच राहिले असते तरीही हा देश सेक्युलरच राहिला असता.मनुस्मृती नाही , कुराण नाही कोणताच फायनल ! असा ग्रंथ नाही . आम्ही नव्या ज्ञानाचे मानवतेचे आणि बहुविधतेचे चाहते ……हि आमची चाहत . आणि शेवटची इच्छा ! माणसाच भल माणसांनी करायचं असत … माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी युद्ध लढणार आहे . आयकल का ? हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन !
(आपल्या घटनेतले मुळ सेक्युलारिझम चे कलम लेखाच्या शेवटी दिले आहे )
काय आहे सेक्युलारिजम ? त्याचा राज्य घटनेतला अर्थ काय ?
सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत.
सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती - ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही. मी फक्त संविधानातला सेक्युलारीझम मानतो.धर्मातला नाही. .
----------------------------------------------------------
ज्याना स्वत:ला भारताचे नागरिक म्ह्णवायचे त्याना संविधानाचे सार्वभौमत्व मानणे अनिवार्य आहे.
----------------------------------------------------------
तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात. कारण प्रेमात पडायचं वय कधीही संपत नाही आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..
समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील.
पण मनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात.
मांडे खा. पण मनातल्या मनात.
तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल !
भारताच्या राज्यघटनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल.
तुम्ही म्हणाल सतिप्रथा हा आमचा धार्मिक अधिकार आहे . मनातल्या मनात म्हणायचं - तुमच्या घरातसुद्धा असला धर्म पाळू लागलात तर तुरुंगात रवानगी होइल.
तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल.
धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही.
सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे.
----------------------------------------------------------
मी फक्त संविधानातला सेक्युलारीझम मानतो . ज्याना स्वत:ला भारताचे नागरिक म्ह्णवायचे त्याना संविधान मानणे अनिवार्य आहे.
----------------------------------------------------------
हिंदुत्व वाद्यांचा खोटा प्रचार
या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमाच्या फायद्यासाठी / पक्षपातासाठी आहे असा प्रचार अनेक हिंदुत्व वादि करतात . हा प्रचार असत्य आहे . . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक चष्म्यातून घेतले जातील .
----------------------------------------------------------
दही हंडीचे किती थर रचावेत ? किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत .
धर्म आणि पंथ या दोन शब्दा बद्दल संघाने पुरेसा गोंधळ घातला आहे . त्यांना वाटते पंथ म्हणजे उपासना पद्धती आणि धर्म म्हणजे कर्तव्य ! म्हणून ते पंथ निरपेक्षता हवी म्हणतात …. हा संघ परिवाराचा भ्रम आहे किंवा सरळ खोटा प्रचार . धर्म / कर्तव्य हे सुद्धा राज्यघटनेच्या आधीन राहून पार पाडायचे आहेत हे समजून घ्या . अगदी माता पिता पुत्र पत्नी या बाबतीतली कर्तव्ये सुद्धा कायदा ठरवतो - धर्म नाही .
- वृद्धाश्रम पुराणात नाहीत - तरी ते बेकायदेशीर ठरवता येत नाहीत
- धर्मातला वानप्रस्थाश्रम कायद्याने सक्तीचा करता येत नाही
सेक्युलारीझम हा शब्द घटनेत पहिल्या दिवसापासून आहे . धर्म निरपेक्षता स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या २५ व्या कलमात तो आहे . पुढे हा शब्द घटनेच्या प्रास्ताविकात सुद्धा घातला गेला . पण त्यामुळे त्याच्या अर्थात काहीच फरक पडत नाही .
पुरोगाम्यांचे ढोंग
देशाच्या सेक्युलारीझामचे वाटोळे कोन्ग्रेस ने केले . शहाबानो आणि बाबरीचा फटका कमी पडला असावा. दादरी वरून मुस्लिम व्होट बेंक पोलिटिक्स सुरूच आहे.
समान नागरी कायद्याचे लोणचे घालणार्या कोङ्ग्रेसचि नोकरी पत्करून सध्या पुरोगाम्यांनि दादरिवर पुरस्कार वापसी सुरु केली आहे . हे सरळ मुस्लिम वोट बेंकचे राजकारण - आधी समान नागरी कायदा आणि सेक्युलारीझम वर मत मांडावे - आणि मग फुरस्कार वापसी करावी.
दुट्टपी पुरोगाम्यांनी हिंदुना सेक्युलारीझम आणि मुस्लिमांना सर्व धर्म समभाव लागू केला आहे . यात खरे तर नुकसान मुस्लिमांचे आहे . मुस्लिम यामुळे मध्ययुगातच राहत आहेत . पण थोडा तोटा हिदुचा सुद्धा आहे . तो असा कि फ़ुरोगाम्यानच्या भंकस मुळे आपल्यात सुद्धा सध्या साक्षि साध्वी ला महत्व मिळु लागले आहे
----------------------------------------------------------
सेक्युलारीझम चा हेतू काय ?
देशातला सेक्युलारीझम हा सर्व धर्माच्या सुधारणेसाठी आहे । आणि ज्या धर्माचा समाज या सुधारणेच्या सुवर्ण संधीचा फायदा घेणार नाही … तो चिखलातच मागास आणि दरिद्री राहणार आहे … पण हे कोणि बोलायचे ?
धर्म ग्रंथ जुने झाले ते आता कपाटात ठेवा ग्रंथालयाच्या - आज कसे जगावे हे विज्ञान ठरवेल - धर्म नव्हे - हा सेक्युलारीझाम आहे …
----------------------------------------------------------
थोडक्यात : धर्म पाळायचा नाही, रस्त्यावर तर धर्म आणायचाच नाही , धर्म दारात पाळायचा नाही , धर्म घरात पाळायचा नाही - फार तर मनात पाळायचा ! धर्म घरात हि पाळायचा नाही . तुम्ही तुमच्या घरात तुमच्या पत्नीशी कसा व्यवहार करावा ? हे कायदा ठरवणार . संविधान ठरवणार आहे - तुमचा धर्म नाही . संविधान धर्म मानत नाही - तुम्हीही तुमचा धर्म घरातसुद्धा पाळायचा नाही - फार तर मनात पाळायचा
----------------------------------------------------------
घटनेतले २५ वे कलम लेखाच्या शेवटी देतो आहे. हे सेक्युलारीझम चे कलम आहे. यानुसार public order, morality and health याच्या आधीन राहून धर्म पाळता येतो . धर्मातली एखादी गोष्ट जर अनैतिक , अनारोग्यकारक वा असामाजिक वाटली तर शासन त्याविरुद्ध कायदा करु शकते . economic, financial, political या सर्व बाबतीत शासनाचा निर्णय अंतिम आहे . धर्माचा नाहि.
----------------------------------------------------------
हमीद दलवाई काय म्हणतात ?
खरे पुरोगामी आणि मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई म्हणतात ,
" हिंदू आणि मुसलमान अशा जातीय तत्त्वावर या देशाची एकदा रक्तरंजित फाळणी झाली. एक देश इस्लामी पाक पाकिस्तान झाला. तेंव्हा दुसरा देश हा हिंदुचा हिदुस्थान झाला पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. मग हिंदूचे धर्मराज्य वगैरे आपोआप संकल्पना येतात , दुसरी संकल्पना मुस्लिमांची ! कि हा देश धर्म निरपेक्ष आहे .इथे धर्म स्वातंत्र्य आहे … तवा हवा तेव्हढा आणि वाटेल तसा इस्लाम आम्ही पाळणार ! इस्लाम पाळणे हा आमचा घटना दत्त अधिकार आहे . दोन्ही संकल्पना साफ चूक आहेत ."
मुस्लिमांच्या पक्षपातासाथि देश सेक्युलर नाही . या देशात १०० % हिंदू असते तरीही हा देश सेक्युलरच राहीला पाहिजे .
या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमांसाठी नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक चष्म्यातून घेतले जातील . आदत आणि इबादत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . कुणाची पूजा करावी आणि पारमार्थिक बाबिना इबादत म्हणतात . या इबादत चे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षतेत जरूर आहे. आदत म्हणजे इहलोक .आणी इथले नियम . किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत . या देशात फक्त हिंदूच राहिले असते तरीही हा देश सेक्युलरच राहिला असता.मनुस्मृती नाही , कुराण नाही कोणताच फायनल ! असा ग्रंथ नाही . आम्ही नव्या ज्ञानाचे मानवतेचे आणि बहुविधतेचे चाहते ……हि आमची चाहत . आणि शेवटची इच्छा ! माणसाच भल माणसांनी करायचं असत … माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी युद्ध लढणार आहे . आयकल का ? हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन !
( संदर्भ : पृष्ठ १४३ , हमीद दलवाई - क्रांतिकारी विचारवंत : संपादक : शमसुद्दिन तांबोळी : २००९ : डायमंड पब्लिकेशन्स)
प्रा शेषराव मोरे काय म्हणतात ?
प्रा मोरे लिहितात "सेक्युलारीझम हे घटनेने दिलेले मुल्य आहे ; घटना सार्वभौम आहे . हे लक्षात घेऊन राष्ट्र हि संकल्पना त्याच्याशी जुळवून घेतली पाहिजे . सेक्युलारीझम च्या विरोधी असणार्या गोष्टी राष्ट्र या संकल्पनेत आणता येणार नाहीत . "
राज्यशास्त्राच्या विद्यार्थी अभ्यासकांनी प्रा. मोरेंचे पुढील भाषण अवश्य ऐकावे. विषय गंभिर असला तरी , हे एक विनोदी आणि खुसखुशीत भाषण आहे.
सेक्युलारीझम चा खरा अर्थ : प्रा शेषराव मोरे (भाषण १ तास यु ट्युब )
------------------------------------------------------------------- घटनेतले २५ वे कलम
Article 25 in The Constitution Of India 1949
25. Freedom of conscience and free profession, practice and propagation of religion
(1) Subject to public order, morality and health and to the other provisions of this Part, all persons are equally entitled to freedom of conscience and the right freely to profess, practise and propagate religion
(2) Nothing in this article shall affect the operation of any existing law or prevent the State from making any law
(a) regulating or restricting any economic, financial, political or other secular activity which may be associated with religious practice;
(b) providing for social welfare and reform or the throwing open of Hindu religious institutions of a public character to all classes and sections of Hindus Explanation I The wearing and carrying of kirpans shall be deemed to be included in the profession of the Sikh religion Explanation II In sub clause (b) of clause reference to Hindus shall be construed as including a reference to persons professing the Sikh, Jaina or Buddhist religion, and the reference to Hindu religious institutions shall be construed accordingly
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा