२० नोव्हें, २०१५

पुरोगाम्याचे इस्लाम प्रेम

पुरोगाम्याचे इस्लाम प्रेम : भाग २ : साने गुरुजी

उच्चशिक्षित विद्वान  आणि  पुरोगामी अभ्यासकांनी इस्लामबद्दल वेळोवेळी घेतलेल्या भूमिका इथे पहायच्या आहेत .

 शरद बेडेकर
शरद बेडेकर हे एक नास्तिक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व . लोकसत्तेत त्यांनी मानवाविजय नावाची  मालिका लिहिली . त्यात सर्व धर्माची योग्य ती चिकित्सा करणयात आली . मात्र मूळ  इस्लाम मध्ये जिहाद आणि हिंसेचे स्थान काय ? यावर बेडेकरांनी भाष्यच केले नाही. काही फुटकळ दहशत वाद्यांना आणि हल्लिच्या मुल्ला मौलाविना दोष दिला पण कुराणात हिंसा आहे काय ? यावर लिहिलेच  नाहि . इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि गीतेत प्रत्यक्ष चातुर्वर्ण आहे अशी योग्य भूमिका त्यांनी याच लेखमालेत घेतालेलेली आहे . त्याबद्दल टिका केलेली आहे . असे करताना कृष्णाचे कौतुक करणायाच्या भानगडीत बेडेकर पडत नाहीत हे अतिशय स्वागतार्ह आहे . इस्लाम बद्दल लिहिताना त्यांनी कुराण इतर धर्माप्रती सहिष्णू आहे काय ? मुहम्मदाचि काफिर विषयक मते काय होती ? याची चर्चा केलेली नाही . मात्र मुल्ला मौलवी आणि सद्य कालीन राज्यकर्ते यान दोष देताना . मूळ इस्लामची प्रचंड स्तुती केली आहे . आणि मुहम्मदाला सर्व आधुनिकतेचे पितामह  ठरवले आहे . खरोखर बेडेकरांचे मुहम्मद प्रेम  मौलवी झाकीर नाइक लाहि  लाजवेल . बेडेकर काय लिहितात ते त्यांच्याच शब्दात पाहू :

"महंमदाने अरब टोळ्यांमधील भ्रामक व अनीतिमान चाली नष्ट करून, टोळीगणिक बहुदेवता मानण्याऐवजी, त्यांना एकेश्वरवाद शिकवून त्यांच्यात एक सामाजिक, सांस्कृतिक उत्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांच्यात ज्ञानार्जनाची आस्था निर्माण होऊन तिथे एक सांस्कृतिक अभिसरण घडून आले. एका अशिक्षित माणसाने ‘विद्याभिरुची वाढविली’ हे म्हणणे काहीसे चमत्कारिक वाटत असले तरी ते पूर्णत: खरे आहे. अरेबियातील वाङ्मयीन प्रगती काव्य आणि इतर साहित्य प्रकारांचा उदय कुराणाबरोबर किंवा त्यानंतर मागोमाग झालेला असून, या चळवळींतून अनेक उत्कृष्ट ग्रंथांची उत्पत्ती झाली हे मत आता विद्वतमान्य आहे. अरबी भाषा ही ग्रीक, हिब्रू किंवा संस्कृत भाषांसारखी प्राचीन भाषा नसून, तीत कुराणपूर्व काळात धड व्याकरणही नव्हते व काही ग्रंथही नव्हते. महंमदानंतर त्या भाषेची सर्वागाने वाढ झाली. इ.स.च्या आठव्या शतकात हारून-अल्-रशीद व इतरांनी परदेशातून विद्वान लोक आणून त्यांच्याकडून ग्रीक, संस्कृत इत्यादी भाषांतील ग्रंथांची अरबी भाषांतरे करवून घेतली. अंकगणित, खगोलशास्त्र, संगीत, रसायन, वैद्यक, तर्कशास्त्र, अलंकारशास्त्र इत्यादी विषयांचे ज्ञान अरबांनी भारतीय पंडितांकडून मिळविले व ते युरोपियन लोकांना दिले. ख्रिस्तपूर्व ग्रीक संस्कृतीतील प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल यांच्याही ग्रंथांची त्यांनी भाषांतरे करून घेतली. अरबांनी करून घेतलेल्या ग्रीकादी विद्वानांच्या ग्रंथांमुळे व अरबांशी आलेल्या संबंधांमुळेच, पुढील काही शतकांनंतर युरोपात झालेले विद्येचे पुनरुज्जीवन (रिनेसन्स) घडू शकले, ही गोष्ट आता सर्वमान्य झालेली आहे. अशा प्रकारे पश्चिम आशिया व दक्षिण युरोप या खंडप्राय भूभागाला एक नवी दृष्टी देण्यास महंमद हा अशिक्षित, पण सदाचरणी माणूस मूळ कारण ठरला हे आज सर्वमान्य ऐतिहासिक सत्य आहे."

See more at: http://www.loksatta.com/sampadkiya-news/arabistan-and-islam-religion-1108650/#sthash.xYmhoyjh.dpuf


साने गुरुजी 

शामची आई वाचले नसेल असा मराठी वाचक विरळ. खरा तो एकची धर्म - जगाला प्रेम अर्पावे इतक्या  सरळ सोप्या  साध्या भाषेत वैश्विक तत्वज्ञान सांगणारा हा  संतपुरुष.…  गुरुजींची लेखणी इस्लामचे वर्णन करताना कशी प्रेमळ बनत जाते हे आपण त्यांच्याच शब्दात पाहुया . 'इस्लामी संस्कृती 'या नावाने साने गुरुजींनी दोन खंड लिहिलेले आहेत . त्यातला पहिला खंड तीन आवृत्तीत प्रकाशित झाला आहे . दुसरा खंड मात्र बाजारात मिळत नाही . तो साधना प्रकाशन कडे असावा .

साने गुरुजींचे इस्लाम प्रेम आणि मुहम्मद स्तुती इतक्या उच्च दर्जाची आहे . कि गुरुजिंच्या या पुस्तकाचे प्रकाशन आणि प्रसार जमाते इस्लामी सुद्धा करते . (लिंक खाली पहिल्या कोमेंटित )

"इस्लामचे बाळ जिथे पाळण्यात घातले गेले ' .  त्या अरब भूमीतील अरबांचे  गुरुजींना प्रचंड प्रेम  वाटे . अरबांच्या स्वभावाचे वर्णन करताना गुरुजी लिहितात ' लूटमार हा त्यांचा मुख्य धंदाच असे. त्यांची वाळवंटि जमीन त्यांना अन्न देत नसे. खजूर हीच त्यांची भाकरी . म्हणून घासदाणा लुटणे प्राप्त . निसर्गाने हि भामटेगिरी त्यांना शिकवली ' भामटेगिरिला नैसर्गिक म्हणून झाल्यावर त्यातही अरब कशी व्यावसायिक माणुसकी दाखवत याचे वर्णन करताना गुरुजी लिहितात :

--------------------------
"अरब लुटालुट करी परंतु या लुटालुटितहि त्याने मर्यादा धर्म ठेवला होता. तो *शक्यतो* हिंसा टाळी. मी या व्यापार्याचे ओझे कमी करतो आहे असे तो म्हणे ! आणि ज्यांना लुटायचे असेल तेथे स्त्री असेल तर … अरब लुटारू त्या  स्त्री वर हात टाकत नसे. तो म्हणेल - तुमचे नेसूचे लुगडे किंमतीचे आहे . ते मला हवे आहे . तुम्ही दुसरे नेसा . तोवर मी दूर जातो …आणि मग अरब दूर जाउन पाठ करून उभा राहील . "  
--------------------------

स्त्री ने नकार दिला तर अरब काय करील ? हे गुरुजींनी सांगितलेले नाही . पण वरील परिच्छेदातून  गुरुजींची इतिहासदृष्टी दिसून येते.  इतर  धर्मियांच्या कत्तली आणि मुर्त्या फोडून टाकण्याचे प्रसंग प्रेषित मुहंमदाच्या आयुष्यात येतात . त्याचे गुरुजींनी शैलीदार वर्णन केले आहे . बनी कुरेझा नावाची ज्यू जमात प्रेशितांशि एकनिष्ठ राहत नव्हती (इस्लाम कबुल करत नव्हती- दगा देत होती  ) . त्यांची प्रेषित कत्तल करतात . डॉ  रफिक झकेरिया यांच्या मुहम्मद एण्ड  कुराण या ग्रंथानुसार कत्तल केलेल्या ज्युंचि संख्या ९०० आहे . या प्रसंगाचे वर्णन करताना साने गुरुजी लिहितात : - तिसरी जमात बनी कुरेझा हि देखील प्रेशितांशि एकनिष्ठ राहिली नाही . त्यांच्यावरही प्रेशितांनि कारवाई केली . मात्र त्यांना (इतर ज्युं प्रमाणे ) हद्दपारीची शिक्षा न देता , त्यातील सर्व प्रौढांना ठार मारण्याची व स्त्रिया व मुले यांना गुलाम करण्याची शिक्षा दिली गेली … पुढे  गुरुजी या हत्या आणि गुलामीचे समर्थन करताना लिहितात - त्यां वेळेस मुहम्मद आणि त्याचे अनुयायी यांच्यासमोर जगण्या मरण्याचा प्रश्न होता. (अशी कारवाई न केल्यास ) बाल्यावस्थेतील अरब राष्ट्र जगते ना ! मुस्लिम धर्म टिकता ना ! पुढे पसरता ना !…. ६२७ सालचे ९०० ज्युंचे  हत्यांकाड मागे सारून । मुहम्मद प्रेषित यांच्या ६३० सालच्या मक्का विजयानंतर :  साने गुरुजी यांनी केलेले प्रेशीत  मुहम्मद  कृत मुर्तिभंजनाचे वर्णन तर विलक्षण आहे

--------------------------
" मक्का वाल्यांना त्रास दीला गेला नाही. (इथे वरील कत्तल लक्षात घेतलेली नाही )…  परंतु  मक्केतल्या मूर्तीना मात्र त्रास झाला . जुने मूर्तिपूजक आपल्या मुर्तिंचा भंग शांतपणे पाहत होते . त्या सर्व मूर्ती प्रेषित मुहम्मदानी  स्वत:च्या हाताने फोडून टाकल्या ! प्रत्येक मूर्तीसमोर मुहम्मद उभे राहत व म्हणत , 'सत्य आले आहे , असत्य नष्ट होत आहे . असे म्हणत त्या मूर्ती फोडत . अशा रीतीने सर्व मूर्ती भंगुन , सारे जुने कर्मकांड रद्द करून , जमलेल्या सर्वांना उद्देशून त्यांनी भाषण केले . कुराणातील मानवाच्या ऐक्याचे मंत्र म्ह्टले   "
--------------------------

साने गुरुजींची हि  मानवाच्या कुराणिय ऐक्याची कल्पना किती सुंदर  आहे ! जमाते इस्लामिला हि कल्पना विशेष आवडली असावी . जमाते इस्लामीने इतर धर्मियांना मुस्लिम बनवण्यासाठी प्रेषित  मुहम्मद सर्वांसाठी असे एक अभियान चालवले आहे . साने गुरुजींची इस्लामी संस्कृती हे पुस्तक केवळ समाजवादी साधना प्रकाशित करते असे नाही . इस्लाम प्रचारार्थ जमाते इस्लामीही साने गुरुजिंच्या या पुस्तकाचा प्रचार  करते . (लिंक खाली पहिल्या कोमेंटित ).

https://drive.google.com/file/d/0B0J3OP30FPKkOTM4OTQ2MDUtZmUwMy00NTgyLTk2NTAtY2NiNmQzYmI0MGU5/view


लिंक खाली पहिल्या कोमेंटित

सावरकर जेंव्हा पुरोगामी होते तेंवा तेही असेच बोलत असत . पुढचा भाग १९०८ सालच्या पुरोगामी साव्र्करांवर लिहितो . हे १९०८ सालचे क्रांतिकारी सावरकर स्माज्वाद्यांनाहि का मान्य असतात - ते लक्षात येइलच !

1 टिप्पणी:

  1. agadi wegla ani purogamyanchi chirfad karnara lekh ahe... nehami purogami lok islam, preshit wagaire falatu dharmvishayak sangtat tyawar tumhi apli parkhad mate vyakt kelit he tumache kautuk karne karave tiatke kamich ahe.. visit my blog at avinashpataskar blogspot..

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *