प्रा शेषराव मोरे
शेषराव मोरे हे वतनदार पाटलाच्या पण एका खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले. मॅट्रिकपर्यंत त्यांनी शेतीकाम केलेच, पण पुढे शेती विकून टाकीपर्यंत (1990) शेतात काम करण्याचा छंद सोडला नाही. सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक होण्याची त्यांची इच्छा, पण इतरांमुळे नाइलाजाने त्यांना अभियांत्रिकीचे पदवीधर व प्राध्यापक व्हावे लागले. पण आपला मूळ पिंड त्यांनी सोडला नाही. अभियांत्रिकीच्या अध्यापन काळात दिवसाकाठी सरासरी 7-8 तासांपेक्षा अधिक वेळ सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासासाठी देणे शक्य होत नसल्यामुळे वीस वर्ष पूर्ण होताच स्वेच्छा सेवामुक्ती घेऊन (1994) त्यांनी या अभ्यासाला पूर्णतः वाहून घेतले.
तीव्र बुद्धिमत्ता, बुद्धिवादी जीवनदृष्टी, तर्कशुद्ध विचार, अभियांत्रिकी आणि कायद्याच्या अभ्यासामुळे आलेला काटेकोरपणा, वास्तवाचे भान, स्वतंत्र विचार करण्याची पद्धत, अभ्यासांती पूर्वीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी, जे पटले ते स्पष्टपणे मांडण्याचा निर्भीडपणा, आणि हे सारे करण्यामागे समाज व राष्ट्रहिताची तळमळ ही वैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून व लेखनातून दिसून येतात. त्यांची खालील ग्रंथसंपदा याची साक्ष देणारी आहे.
1. सावरकरांच्या बुद्धिवादः एक चिकित्सक अभ्यास (1988, 92) (संक्षिप्त आवृत्ती) सावरकरांचा बुद्धिवाद व हिंदुत्ववाद (2003, 06)
2. सावरकरांचे समाजकारणः सत्य आणि विपर्यास (1992) (संक्षिप्त आवृत्ती) सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (2003)
3. काश्मीरः एक शापित नंदनवन (1995, 2001, 04)
4. डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरणः एक अभ्यास (1998)
5. विचारकलह (भाग पहिला) (1998)
6. अप्रिय पण... (भाग पहिला) (2001)
7. शासनपुरस्कृत मनुवादीः पांडुरंगशास्त्री आठवले (2001, 05)
8. मुस्लिम मनाचा शोध (2000, 1, 3)
9. Islam : Maker of the Muslim Mind (2004)
10. प्रेषितांनंतरचे चार आदर्श खलिफा (2006)
11. 1857 चा जिहाद (2007)
12. अप्रिय पण... (भाग दुसरा) (2008)
13. विचारकलह (भाग दुसरा) (2008)
14. गांधी आणि कॉंग्रेसने अखंड भारत का नाकारला (2012)

विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१५)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा