२८ मार्च, २०१५

पुरोगाम्यांचे मातृपूजन

(प्रस्तुत कोमेंट  बहुसंख्य पुरोगाम्यांना उद्देशून लिहिली  आहे. अपवाद क्षमस्व !)

पुरोगाम्यांनी गेले काही दिवस सर्वत्र मदर तेरेसाचे पूजन चालवले आहे . पुरोगाम्याची हि नवी मम्मी  नरसंहाहरक हुकुम   शहांकडुन  लाच घेऊन त्यांना पापमुक्त घोषित करीत असे .

हैतीचा हुकुमशहा निष्पाप म्हणुन घोषित करण्यासाठी चर्च ला किती डॉलरची  देणगी मिळाली होती ?  मदर ने त्याला कसे पापमुक्त केले ? पुरोगाम्याची हैती हुकुमाशाहीशी गाठभेट काय ?

मोहन भागवत हा एक माणुस आहे आणि काही ठिकाणी त्यांचे म्हणणे योग्य असू शकते . काही ठिकाणी अयोग्य आणि न पटणारे असू शकते या साध्या सारासार विवेकबुद्धीचा पुरोगामी कंपुस विसर पडला आहे .
मदर तेरेसाने कोणतीही सेवा वगैरे केली नाही . होस्पीस हा अंधश्रद्धेचा क्रूर खेळ आहे . मारणार्याच्या यानांचे मुके घेत येशूचे चिंतन म्हणजे होस्पीस . सनातन प्रभात आणि केथोलिक चर्च यात काहीही फरक नाहि.

 संघ मुखातून जे काही बाहेर पडेल ते सारे अस्पृश्य आहे असे मानण्याचा पुरोगामी कल दिसतो . मदर तेरेसाबद्दल भागवत फारच सौम्य बोलले होते . तेरेसाचे भारतरत्न काढून घेऊन तिच्या सार्या संस्थांचि विधिवत चौकशी व्हायला हवी . तेरेसाबद्दल मी सविस्तर ब्लोगवर पुराव्यासकट लिहिले आहे ते येथे वाचता येईल . . खरे तर व्हेटिकन ख्रिस्ती चर्च हा जागतिक पुरोगाम्यांचा चेष्टेचा विषय आहे . अंधश्रद्ध मदर तेरेसा च्या बाजूने उभे राहणे हा पुरोगामित्वाचा क्रायटेरिया आहे काय ?

स्वकियांचा जातीय द्वेष आणि परकीय धर्माबद्दल अतोनात सहिष्णुता हे हिंदुत्वाचे प्रधान लक्षण आहे.  मदरची मातृपूजा हा पुरोगाम्यांच्या हिंदुत्वाचा जाज्वल्य अविष्कार होय ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *