५ मार्च, २०१५

सावरकर - गोळवलकर आणि गोमाता

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गायी बद्दलच्या / विज्ञान निष्ठ लेखांमुळे गोळवलकर गुरुजी चांगलेच संतापले होते ! गोळवलकर गुरुजी सावरकरांबद्दल लिहितात - " त्यांचे हिंदुत्व पोकळ आहे , निव्वळ प्रतिक्रियावादी आहे, त्यात हिंदु जीवन मुल्यांचा अभाव आहे आणि ती एक विकृत धारणा आहे " . (विचारधन ५८-५९ भाविसा २००१) सावरकरांनी गोळवलकरांना दोनदा घरापर्यंत येऊनही भेट नाकारली होती . संघाच्या कार्यालयात आजही सावरकरांचा फ़ोटो अपवादानेच आढळतो . हिंदु महासभेची एकही बैठक संघाच्या नावाने तळतळाट केल्याशिवाय संपत नाही . या दोन प्रसिद्ध व्यक्तिमत्वात आणि त्यांच्या संघट्नात वैर का आहे ? कारण वैयक्तिक आहे कि वैचारिक ? लवकरच येत आहे …… सावरकर - गोळवलकर आणि गोमाता



सावरकरांच्या गायी बद्दलच्या  / विज्ञान निष्ठ लेखांमुळे गोळवलकर गुरुजी चांगलेच संतापले होते ! त्यांनी सावरकरांचे हिंदुत्व पोकळ आहे , निव्वळ प्रतिक्रियावादी आहे त्यात हिंदु जीवन मुल्यांचा अभाव आहे आणि ती एक विकृत विचारसरणी आहे असे उद्गार काढले होते . सावरकरिय नावाचा गट तात्यांच्या  सर्व प्रकारच्या विज्ञान निष्ठ विचाराला तिलांजली देऊन गोळवलकरिय गटात जातो आहे  . फोटोची पूजा आणि विचाराला केराची टोपली या  धोरणाने संघ क्रम क्रमाने गांधी सावरकर आंबेडकर या सार्यांनाच स्वयंसेवक बनवतो आहे … संघ बढता जा रहा है … संघाबद्दल मला आदर आहे कारण  त्यांचे हिंदु संघटनेचे काम इतर कोणाहिपेक्षा सरस आहे .

पण केवळ हिंदु संघटन हा एकमेव महत्वाचा विषय नाही . हिंदु सबलिकारण हा देखील आहे . सावरकरी विचारानुसार , हिंदुचे सबलीकरण अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यातून होईल , गोरक्षणातुन नाही । असे आमचे आकलन आहे . चालू प्रवाहात वाहत जाणे हिंदु हितकारक ठरणार नाही असे वाटते . इथे चर्चा करण्याच्या मर्यादा आणि गोळ्वलकरि गटाचा ठामपणा लक्षात घेऊन …   नम्रपणे आपल्या सर्वांची रजा घेतो .काही चुकले असल्यास क्षमा करावी .  गट सोडतो आहे. वंदे मातरम !  


गोरक्षक बायाबुवांचि गंमत !

मी गाय या विषयावर मानवतावादी भूमिका मांडली होती . गरीबाची भूक भागवणे आणि भाकड जनावरे पोसणे यातले आर्थीक  सामाजिक द्वंद्व  मला अभिप्रेत होते . भावनांपेक्षा  भूक आणि धर्मापेक्षा देश मोठा आहे हे समजवायचे होते . हिंदूची संस्कृती बहुविध आहे . दलित जातीना मृत गोमास खाण्याची सक्ती धार्म - समाजानेच केली आहे.अनेक मागास जाती आजही गोमास खातात . ते हिंदु नाहीत ? इशान्य भारत आणि दक्षिण भारतातले तथाकथित सवर्ण  हिंदु जातीही गोभक्षक आहेत. त्यांचे काय ? द्रविड चळवळ , बफेलो नेश्नालीझाम , उत्तर भारत काऊ बेल्ट आणि गायीच्या प्रतीकावरून असलेले सांस्कृतिक संघर्ष हंबरून रडत आहेत .  गोमातेने वाचन करू नका असा फतवा काढला आहे का ?

मुस्लिम लांगुलचालनाचे रडगाणे आहेच  . गोरक्षकांना स्वप्नातही मुसलमान दिसत असावेत . हिंदुत्व वाद्यांनी त्यांच्या नावाने गळे काढणे ठीकच ! पण गोभक्षक हिंदुंचे काय ? मागास जमातींचे काय ?  भारत उभा करणारे लोक - पारशी हे  मुख्यत: गोमासावर जगतात  - क्रांतिकारी मादाम कामा , उद्योगपती जे आरडी टाटा, राष्ट्रनेते दादाभाई नौरोजी, शास्त्रज्ञ होमी भाभा , गोदरेज , पाकिस्तानचे दोन तुकडे करणारे फिल्ड मार्शल सेम माणेकशो - या सार्यांनी भारत घडवला आहे . आजवर एकही पारशी निरुद्योगी आळशी किंवा देशद्रोही निपजला नाहि. हे सारे पारशी मुख्यत: मुंबईत स्थाईक आहेत . त्या पारशांचा जो मुख्य आहार - गोमास - त्यावर बंदि आणणे हा राष्ट्रवाद ? हि संस्कृती ?  आमची ती संस्कृती म्हणत  गाव कुसातील  लोकांचे संघटन करणे - हिंदुचे विघटन करणे - आणि धार्मिक कायदे करणे हि बुद्धीहत्याच आज धर्म मानली जात आहे.

खरे पाहता या कायद्याने हिंदुत्व चळवळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. समान नागरी कायदा हि भाजपाची अतिशय चांगली आणि रास्त राष्ट्रीय मागणी आहे.  कोणत्याही धार्मिक आधारावर वेगळे कायदे बनवू नये . मुस्लिमांचा पर्सनल लो बंद झाला पाहिजे . ……. आज गोहत्या बंदि कायद्याच्या रूपाने तथाकथित हिंदुचा पर्सनल लो सार्या महाराष्ट्रावर लादला आहे . आता कोणत्या लोजिकने समान नागरी कायदा मागणार ? सर्व   धर्म आता धार्मिक कायदे मागणार आणि सरकारला ते द्यावे लागणार …हि देशाच्या विघटनाकडे वाटचाल आहे ….  हुश्शार लोक्स

हा कायदा हिंदुना आवडणार नाही. ब्रह्मान मराठे माळी  इत्यादी सवर्ण म्हणजे हिंदु नव्हे .  प्रत्यक्षात   गाय आणि हिंदु याचा काहीच संबंध नाही . याचा विरोध अपेक्षित होता  पण प्रतिवाद करताना गोर्क्षकांचि अतिशय आक्रमक आक्षेपहार्य  भाषा ! जणू गाय हि आईच ! आणि प्रश्न असा कि तुम्ही तुमच्या आईला म्हातारपणी विकणार का ? बापाला कसायाकडे देणार का ? गोभक्तांचेच लॉजिक थोडे आणखी पुढे वाढवता येईल … कारण गाइस ते खरोखरचीच आई समजू लागले आहेत.
मग मला त्यावर अनुक्रमे पडलेले प्रश्न असे -
गाय ज्यांची माता असेल त्यांचा बाप कोण असावा ?
आई बापास वेसण घालणे जरा चमत्कारिक नाही काय ?
 बापास शेतकामावर  जुंपणे ?….  त्याने निट काम  करावे म्हणुन त्याचे हार्मोनल खच्चीकरण करणे हा काय प्रकार आहे ?
गायीला वेसण घालणे आणि बैलाचे खच्चीकरण प्रोसेस गोभक्तांनि पाहिले आहेत का ?
आई बापाशी असे वागतात ?
पशू गो माता आणि खच्चीकृत पित्याची अवलाद  हिंदु … हे बिरुद अभिमानास्पद आहे  ?




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *