४ सप्टें, २०१५

सिरीया ते अरबस्तान

( इसीस आणि अन्य मुजाहिदांच्या धर्मयुद्धात वाट फुटेल तिकडे पळणारे निर्वासित . अरबांनी भाईचारा वा इस्लामी उम्मत सुद्धा नाकारता फटकारले गेलेले अभागी जीव . युरोप मार्गे केनडा आणि मग तुलनेने सुधारलेल्या अणि सापेक्षत: सुसंसकृत जगात प्रवेश करण्यासाठी अधीर झालेले कुटुंब . जिवाचा धोका पत्करत समुद्रात नाव लोटते . पण ती फुटते . अभागी तीन वर्षाच्या लेकराचे प्रेत तुर्कस्थान च्या किनार्यावर पहुडलेले दिसते . या घटनेवर आणि निर्वासित प्रश्नावर जगभर फ़ोटो , चित्रे फिरत आहेत . त्यावर हि कविता : सिरीया ते अरबस्तान)








दु:ख आणि दैन्य यांच्या दौलती चोहीकडे
भूक भांडण रौद्र हिंसा - अन्न पाणि आटले
राज्य घेती क्रांति गीते - रक्त बदला दाटला
सूड घ्याया घे प्रतिज्ञा - धर्म आहे माजला


लाथ तख्तावरि, युद्ध हे घरोघरी
कफ़न डोक्यावरी, वीर हे धावती
नारा हा तक्दिरी , गर्जना ते करी
अल्ला हु अकबरी , घेई तो काळजी








इसीस आणिक स्थानिक जंगम
तुंबळ संगर
जिहाद करुया अल्लासाठी
समग्र तांडव


धर्माचे ते राज्य आणुया , शरियत धंदा
हृदयावरती हात ठेवुनी बोले बंदा
या गोर्यांचा काळा धंदा
काफिर गंदा


मुजाहिदांचि फौज चालली जन्नतीकडे
युरोप आणि अमेरिकेला कापरे भरे


वारे शिरले कानात ,
चौखूर उधळला रानात ,
घनघोर उसळला तालात


अरबाचा तो अबलख घोडा, मूर्ती तोडा श्रद्धा ठेवा
अश्म युगिच्या सैतानाने शड्डू ठोकला वाळूत
घनघोर उसळला तालात

----------------------------------------


भूक आणिक अन्न शोधत हे फिरस्ते चालले
धर्म धगीने भाजले
शांततेचे श्वास द्या हो भावकीचे छत्र द्या
आर्ततेने बोलले


इस्लामाची शपथ घालूनी, दारो दारी विनवित
उम्मत गंमत भाईचारा, क्षणोक्षणला तुडवीत






दारिद्र्याचा तांडा चाले त्या गोर्यांचा वेशीत
उपेक्षितांचा धर्म कोणता ? माणुसकीला शोधीत


अन हे वादळ सागर मंडल , नौयानाचे असंख्य तुकडे
डळमळ धांदल तांडव घडले , तुटुन पडले जिकडे तिकडे


शांत झोपला पाण्यात , चिमुकला गोजरा वाळूत
हा अल्लाचा एकाच बंदा , नरकी जगाला , स्वर्गी गेला

झूटी जन्नत , स्वर्गही खोटा शरियत आणि पुराणी धंदा 

या बंद्यासाठी तयार करुया स्वर्ग चिमुकला जिता जगता !



- डॉ अभिराम दीक्षित

(सोबतचे चित्र मुरात सायीन यांचे आहे )





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *