२५ जाने, २०१५

द इमिटेशन गेम : इतिहास बदलणारे प्राध्यापक (चित्रपट परिक्षण )

द इमिटेशन गेम : इतिहास बदलणारे प्राध्यापक
(चित्रपट परिक्षण )

प्रस्तुत गोष्ट हि केम्ब्रीज च्या एका होमो गणिती प्राध्यापकाची सत्यकथा आहे . दुसऱ्या  महायुद्धाचा समय आहे. युद्धखोर नाझी जर्मनीचा सर्व आघाड्यावर विजय होतो आहे . हुकुमशाही वंशवाद आणि हिट्लर शाही विरुद्ध उभी असलेली दोस्त राष्ट्रे हरणार बहुतेक ! इग्लंडच्या एम आय - ६ आणि इतर गुप्तहेर संस्थानि  विद्वान लोकांना पाचारण केले आहे . एक बुद्धिबळपटू ,  एक स्त्रेटिजिस्ट , अनेक बुद्धिमान आणि एक गणिती … प्राध्यापक

मुख्य मुद्दा कधी हाणा मारिचा नव्हताच … मूळ मुद्दा आहे रणनितिचा … शत्रूची जहाजे कोठे चालली आहेत ? रसद कोण -कोठे  रसद पुरवतो आहे …. हल्ला कोठे करायचा आहे ? हि सारी माहिती माहिती जर्मन रेडियो वर बोलत आहेत .  ती माहिती कोड केलेली आहे.   रेडिओ फ्रिक्वेन्सी हेक वगैरे करूनही    काही समाजात नाही . कारण जर्मन सांकेतिक बोलत आहेत . आता A  ला B म्हटले C ला D म्हटले तर ? ABCD  ला  BCDE म्हटले जाइल .  एक चे अंतर आहे ,(A+1)  हे झाले कोड चे सूत्र. (A+6, A-1, ) … या हजारो लाखो शक्यातातून  … जर्मन कोडचे रहस्य शोधून काढतोय तो गणिताचा प्राध्यापक .

जोपर्यंत जर्मन कोडचे रहस्य काळात नाही । तोपर्यंत गणिती प्राध्यापकाला चैन नाही … रात्रंदिवस जागून प्राध्यापक जर्मन नाझीचा कम्युनिकेशन कोड हुडकतो आहे . त्यासाठी प्राध्यापक टीम  बनवतो…  एक बुद्धिबळपटू ,  एक स्त्रेटिजिस्ट , अनेक बुद्धिमान आणि एक गणिती … प्राध्यापक




मग एक दिवस प्राध्यापकाच्या लक्षात  येते कि  , जर्मन  लोक मशिनच्या सहाय्याने कोड देत आहेत … त्या कोडचे कोडे डिकोड करून उलगडण्या साठी  मानवी बुद्धी अपुरी आहे … मग कारर कट्ट चालणार्या काट्यांचे आणि आर्यांचे ..एक प्रचंड अभिनव यंत्र तयार होते । त्यास गणीति प्राध्यापक ख्रिस्तोफर असे नाव देतो .

या यंत्राने रोज जर्मन कोड डिकोड झाल्याने दोस्त राष्ट्र दुसरे महायुद्ध जिंकतात . हि गोष्ट ब्रिटिश सरकारकडून गुप्त ठेवली जाते.

१) पुढे त्या गणिती प्राध्यापकास समलिंगी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अटक होते . त्यावेळच्या ब्रिटिश कायद्यानुसार प्राध्यापकास शिक्षा म्हणुन नपुंसक बनवले जाते . प्राध्यापक पुढे आत्महत्या करतो .

२) पन्नास वर्षांनी इंग्लंडचि राणी गुपित उघड करते आणि युद्ध जिंकण्यात प्राध्यापकाने शोधलेल्या यंत्राचा आणि तंत्राचा यथोचित गौरव होतो .

३) आज सर्व युरोपीय राष्ट्रात समलिंगी संबंधाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे .

४) गणिती प्राध्यापकाने शोधलेल्या यंत्राला आज कोम्प्युटर म्हणुन ओळखले जाते .

सदर चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे आणि अवश्य पहावा असाच आहे . अभिनय, दिग्दर्शन, एडिटिग केमेरा वगैरे तांत्रिक बाजू उत्तम असल्या तरी चित्रपटाची कथाच एव्हढी जबरदस्त आहे कि इतर गोष्टींकडे लक्षच जात नाही . ५/५ स्टार .








५ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *