******************************************************************************************************************************************************************
हा लेख प्रस्थापित मतांना धक्का देणारा असल्याने . संदर्भासहित स्पष्टीकरण केलेले आहे . शेवटी संदर्भ ग्रंथांचि यादी दिलेली आहे (१-१० ६ ) हा संदर्भ - यादीत दिलेल्या पहिल्या संदर्भग्रंथातिल १ ० ६ वे पान असा वाचावा . कुरुंदकर आणि शेषराव मोरे हे माझे गुरु तर आहेतच पण स्वत:चे पूर्वग्रह बाजूला ठेवून तटस्थ पणे इतिहासाची समिक्षा करणारे दुर्मिळ इतिहासकारही आहे . या लेखाची प्रेरणा त्यांच्याच लेखनातून मिळाली आहे . नेताजिंचे विचार योग्य कि अयोग्य याची चर्चा न करता … त्यांचे मुस्लिम विषयक विचार काय होते ? ते आपण प्रस्तुत लेखात तटस्थ पणे जाणून घ्यायचे आहे .
******************************************************************************************************************************************************************
क्रांतिकारकांचे मुकुटमणि
क्रांतिकारकांचे मुकुटमणि म्हणुन भारतीय जनता सुभाषबाबुंना मानते . आपल्या या प्रिय नेत्याच्या मृत्यूची खबर भारतीय पचवू शकलेले नाहीत . नेताजी भारताबाहेर जिवंत आहेत अशी श्रद्धा बाळगणारे कित्येक लोक होते. वास्तविक पाहता बोसांचे आपल्या मातृभूमीवर नितांत प्रेम होते. भारत सोडुन कोठेतरी परदेशात गुप्तपणे राहण्यापेक्षा त्यांनी मायभूमीत सामान्य माणसाचे अतिसामान्य जीवन पत्करले असते . त्यांना भारतात प्रवेश नाकारणारे सरकार एक आठवडा हि टिकू शकले नसते. तरीही त्यांचा मृत्यू पचवणे कठिण जाते . ते जिवंत असावेत - असले पाहिजे असे भारतीय मनाला वाटत राहते आणि मग सुरस - चमत्कारिक कथांचा जन्म होत जातो . असे दंतकथांचे नायकत्व फार कमी नेत्यांच्या नशिबी येते कारण जनतेचे इतके अपार प्रेमही फार कमी लोकांच्या नशिबी येते.
महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे असेच झाले आहे . हिदुत्व वादि , कम्युनिस्ट , सेक्युलर , समाजवादी, कोंग्रेसि , ब्रिगेडी , बहुजन वादि फार काय कट्टर इस्लाम वादि सुद्धा - शिवराय आमचेच म्हणुन छाती ठोकून सांगतात. त्यामागे अनेक राजकीय कारणे आहेत पण सर्वात महत्वाचे कारण आहे कि - महाराष्ट्रातली तमाम मराठि जनता रयतेच्या या राजावर मनापासुन प्रेम करते . सुभाष बाबुंच्या वाट्याला हे भाग्य अखिल भारतीय स्तरावर आहे . प्रस्तुत लेखात भावनेची झूल बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ अंगाने विचार करायचा आहे .
सुभाष बाबू आणि सावरकर यात भेट झाली होती हे खरे आहे . सावरकरांचे अभिनव भारत संघटनेतिल सहकारी रासबिहारी बोस यांची सुभाशबाबुंना सेनेच्या स्थापनेत मदत झाली होती हे ऐतिहासिक सत्य आहे पण त्यावरून सुभाष बाबू हिंदुत्व वादि ठरत नाहित. त्यांनी सावरकरांची भेट घेतली होती यावरून ते सावरकर वादि हि ठरत नाहीत !
विस्तार भयास्तव प्रस्तुत लेखात आपण सावरकर संदर्भात अधिक खोलात न शिरता - नेताजिंचे मुस्लिम प्रेम पहायचे आहे . त्यानंतर सुभाष बाबुंचा सावरकरांसोबत फोटो लावायचा का ? याचा निर्णय सावरकर भक्तांवरच सोडायचा आहे . फक्त जाता जाता एव्हढे नमूद केले पाहिजे कि ज्या नौदलातील बंडाला घाबरून ब्रिटिश भारतातून पळाले असे अनुमान काढले जाते त्या बंडखोरांच्या हातात बंडाच्या वेळी भगवे झेंडे न्हवते . त्यांच्या हातात कोग्रेसचे तिरंगे होते आणि मुखी - महात्मा गांधी कि जय होते !
सुभाषबाबूंचे आकलन करताना कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी . जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे."
जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
सुभाषबाबूंनी त्यांच्या आझाद हिंद रेडीओवरच्या भाषणातून गांधीचा उल्लेख राष्ट्रपिता असाच केला होता. बंगाल मधल्या दास पॅक्ट नुसार ५२ % मुसलमानाना ६०% जागा मिळणार होत्या आणी सुभाषबाबू ह्या कराराचे पाठीराखे होते हे पटवून देत कुरुंदकर सुभाषबाबूंचे मुस्लीम प्रेम दाखवून देतात. आकलन मधल्या याच लेखात कुरुंदकर लिहितात - गांधी, नेहरू आदी ज्या नेत्यांना बहुसंख्य हिंदुंचा कौल मिळाला ते सर्व मुस्लिम धार्जिणे आणि ज्यांना बहुसंख्येने कधीच जवळ केले नाही ते हिंदुंचे एकमेव प्रतिनिधी असे गणिताचे विपरीत उत्तर हुडकण्यात वरिष्ठ वर्गीय हिंदुनि स्वत:च्या वांझोट्या बुद्धीचे कौतुक करून घेतले आहे . कुरुंदकरांचे वरील वाक्य कोणाला उद्देशून आहे ते उघड आहे. समजदार को इशारा काफी है !
मुस्लिमांना किती द्यायचे ?
बाबुंचे गांधिंशि वाद झाले होते हे इतिहास सिद्ध आहे. हे वाद कोणत्या कारणावरुन झाले होते ? या वादाला काही हिंदु मुस्लिम आयाम होता काय ?
हिंदु मुस्लिम भांडणाचा गैरफायदा इंग्रजांनि घेऊ नये म्हणुन सारेच कोंग्रेसि धडपडत होते. हिंदु - मुस्लिम प्रश्नाबाबत उदार भूमिका घेतली पाहिजे असे सर्व कोंग्रेस जंटल्मन्स चे म्हणणे होते. दोन मुस्लिमांना तीन मतांचा अधिकार देणारा कायदा लखनौ करारात लोकमान्य टिळकांनी उचलून धरला होता. टिळकांपासुन गांधिंपर्यंत आणि नेहरुंपासुन बोसांपर्यंत सारेच मुस्लिमांबाबत उदार मतवादी होते .
मुस्लिमांना किती द्यायचे ? यावरून गांधीजी आणि बाबूत वाद झालेले आहेत …. गांधी म्हणतात त्यापेक्षा अधिक दिले पाहिजे असे सुभाष बाबुंचे मत होते ! दास पेक्ट च्या वेळी याच कारणावरुन दोन्ही पक्षात वाजले हि होते. मुस्लिमांबाबत बोस हे गांधिंपेक्षा अधिक उदार आहेत हे ध्यानात ठेवले पाहिजे . देशबंधू चित्तरंजन दास यांच्या दास पेक्ट नुसार तत्कालीन बंगाल मधील ५ २ % मुस्लिमाना ६ ० % जागा विधिमंडळात राखीव मिळणार होत्या . सुभाषबाबू हे देशबंधू चित्तरंजन दास यांचे पट्टशिष्य होते . त्यांच्यावरील मृत्युलेखात सुभाष बाबू म्हणतात . " हिदू नेत्याताला कोणीही दास यांच्याएव्हढा इस्लामचा मोठा मित्र नाही . ते इस्लाम वर निस्सीम प्रेम करणारे होते. " (२- ६ ८ )
१ ९ ३ ८ साली जिन्हा सुभाष बाबुंना म्हणाले होते " मिस्टर बोस तुम्ही चित्तरंजन दास यांचे शिष्य आहात . त्यामुळे तुमचे माझे जमेल . पण माझे आणि गांधिंचे कधीच जमणार नाही " (३-२४६ )
फ़ोरवर्ड ब्लोक हा बाबुंचा कोंग्रेस अंतर्गत पक्ष होता . हा डाव्या विचारांचा पक्ष होता . उजव्या नाही ! हिंदु मुस्लिम प्रश्नाबाबत सुभाष बाबुंचि स्वत:ची ठाम मते होती . ती मते पुढिलप्रमाणे -
१) (अपवाद वगळता ) भारतातली मुस्लिम राजवट हि मुख्यत: सहिष्णू होती . त्यात हिंदुना सांस्कृतिक , सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्य मिळत होते. (१ -८ )
२) मुस्लिम राजवटीच्या काळात भारत हा प्रगतीच्या आणि वैभवाच्या शिखरावर पोहोचला होता . (१-७)
३ ) मुस्लिम प्रश्न हा कधी अस्तित्वातच न्हवता … ब्रिटिशांनि फोडा आणि राज्य करा या नीतीने हा प्रश्न उभा केला . ब्रिटिश निघून जाताच हिंदु मुस्लिम प्रश्न चुटकीसरशी नष्ट होईल असे त्यांचे मत होते . (२-२ ९ १ )
४) इतिहासात कोणतेच हिंदु मुस्लिम असे भांडण झालेले नाही . भारतीय जनातेतले भेद ब्रिटिश शासानाने निर्माण केलेले आहेत . (२-३ २ १ ) . १ ९ २ ३ साली झालेलि मोपला दंगल हा ब्रिटिश राजवटीचा परिणाम आहे . (१ - ६ ९ )
६) भारताची फाळणी रोखावी म्हणुन बाबुंनि मुस्लिम लीगच्या जिनासाहेबाकडे एका प्रस्ताव ठेवला होता आणि जिनांना अखंड भारताचे पंतप्रधान बना अशी गळ घातली होती . (३-३ ० ७ ) . पण "सारख्याच जातीय" हिंदु महासभेकडे त्यांनी असला कोणताही प्रस्ताव पाठवला नव्हता !
विस्तार भयास्तव हि मते योग्य कि अयोग्य याची चर्चा करत नाही . पण सुभाष चंद्र बोस यांची मते हि अशी होती .
जिन्हा मुहम्मद या पाकिस्तानच्या राष्ट्रपित्याची भेट बोसबाबुनी सावरकर भेटीच्या दिवशीच घेतली होती |
सुभाष बाबुंचे मुस्लिम सहकारी आणि हितचिंतक :
१) अफ़गाणिस्तानचा अमीर अमानुल्ला याने भारतावर स्वारी करून हा देश इंग्रजांपासुन मुक्त करावा असे काही भारतीय मुस्लिम नेत्यांना वाटत होते. गांधिजिंचा याला पाठिंबा होता . या पदच्युत अमीर अमानुल्ला ची सुभाष बाबुंनि १ ९ ३ ४ साली रोम येथे भेट घेतली होती . सुभाष बाबुंच्या भावी योजना अमानुल्ला ला एव्हढ्या पसंद पडल्या कि त्याने सुभाष बाबुंच्या दिमतीला आपली इसोटा फ्राशिनी हि (महागडी) मोटार भेट दिली होती . (३-२१५ )
२) फोरवर्ड ब्लोक या नेताजिंच्या डाव्या पक्षात आणि आझाद हिंद सेनेत मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांचा सहभाग होता . पेशावारचे कार्यकर्ते मिया अकबर्शहा , अबिद हसन , हबिबूर रहमान, शहनवाज , कियानी , गिलानी यांनी आपली निष्ठा नेताजिंच्या चरणी वाहिली होती. (३ - ४ ० ८ , १ १ )
३) हबिबखान नावाच्या एका धनाढ्य पंजाब्याने नेताजिंचे एक भाषण ऐकले . तो धावत व्यासपीठाकडे गेला आणि चित्कारला " नेताजी मी माझी सारी संपत्ति तुमच्या चरणांशी अर्पण करतो आहे . केवळ संपत्तीच नाही . माझे सारे जीवनही . " (३- ४ ७ १ ). नेताजिंना असे अनेक हबिब्खान मिळाले होते.
४ ) १ ९ ४ १ मध्ये गुप्तपणे देशत्याग करून जाताना सर्व जवाबदारी अकबर शहा वर होति. प्रवासातले नेताजिंचे टोपण नाव होते - महंमद झिया उद्दीन ( ३-३१८)
५)बाबुंना या प्रवासात पेशावर ला उतरून घेण्यासाठी माजीदखान आले होते. माजिद खानाचा मोठा भाऊ म्हणजे अब्दुल काय्युमाखान . हे मुस्लिम लीगचे मोठे नेते होते. (३ - ३ ३ ९ )
६) पुढच्या प्रवासात रशिया कडे जाण्यासाठी त्यांनी हाजी महंमद चे सहकार्य घेतले. (३-३ ५ १ ). १९ ४ ३ मध्ये जर्मनीहून जपान ला जाताना बरोबर फक्त अबिद हसन होता . (३-४ ३ ३ ) । नेताजी ज्या विमानात निधन पावले त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेला एकमेव विश्वासू सहकारी म्हणजे हबिबूर रहमान .
नेताजिंना जेव्हढे मुस्लिम सहकारी आणि त्यांचे प्रेम मिळाले - तेव्हढे इतर कोणत्याहि तत्कालीन हिंदु नेत्याला मिळालेले दिसत नाही . नेताजिंच्या मुस्लिम प्रेमाची हि पावतीच आहे .
आझाद हिंद सेना ते आझाद मुस्लिम सेना :
१) आझाद हिंद फौजेत मुस्लिमांची संख्या लक्षणिय होती . मुळात ब्रिटिश सैन्यातच मुस्लिम बरेच होते आणि आझाद हिंद फौज हि याच युद्धकैद्यांतुन तयार झाली होती . नेताजिंचि मुस्लिम जनमानसातली प्रतिमा त्यांना या सेनेचे नेतृत्व करण्यात उपयोगी पडली असावी . आझाद हिंद सेनेचे मुख्य प्रतिनिधी मंडळ ७ लोकांचे होते . या ७ पैकी ४ मुस्लिम होते . (३-४ ५ ७ )
२) लक्ष्मि सहगल आझाद हिंद सेनेत केप्टन होत्या त्यांचे इन्किलाब झिंदाबाद नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यात पान क्र : ४ ७ वर लक्ष्मि सहगल लिहितात " वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीत म्हणुन स्वीकारणे नेताजिंना पसंद न्हवते. त्यामुळे मुस्लिम जनतेच्या भावना दुखावतात असे त्यांना वाटे . त्यामुळे फौजेत 'वंदे मातरम' ऐवजी 'जन गण मन' हे गीत म्हटले जाई . " लक्ष्मि सहगल यांचे चक्षुर्वै सत्य पुरेसे बोलके आहे. नेताजी मुस्लिमांच्या भावना जपण्यासाठी किती धडपडत असत हेच यावरून सिद्ध होते.
३) आझाद हिंद फौजेत फक्त आझाद हिंद रेडिओ नव्हता । त्या जोडीने आझाद मुस्लिम रेडिओ देखील होता . (३- ४ १ ४ ). मुस्लिमांची मने राखण्यासाठीच नेताजींनी हा निर्णय घेतला होता .
४ ) इक्बाल शेदाई हे सुभाष बाबुंचे खास मित्र होते त्यांना आझाद हिंद फौजेत नेताजिंनंतर क्र २ चे स्थान हवे होते . पण पुढे ते पालटले . शेदाइंनि आझाद मुस्लिम फौज उभारली . पुढे ते पाकिस्तानात स्थाईक झाले . (३ - ४ १ ५ ). नेताजिंच्या राष्ट्रीय आत्म्यास किती वेदना झाल्या असतील ! पण सुभाष बाबू आपल्या सिद्धांतावरुन हटले नाहीत . त्यांच्या फौजेत मुस्लिमांचे स्थान तसेच राहिले.
५ ) केप्टन मुहम्मद दुराणी हा नेताजिंचा फार लाडका होता . सिद्धहस्त लेखक विश्वास पाटिल यांच्या महानायक कादंबरित पान क्र ८३९ वर फार रोमहर्षक वर्णन आलेले आहे .राष्ट्रीय अशा अझाद हिंद फौजेत सुद्धा काही लोक धर्मांध प्रचार करत होते. पत्रके वाटली जात होती "गांधी आणि सुभाष हे हिंदुंचे नेते आहेत . यांना हिंदुराज्य हवे आहे . हिंदुंचे दास बनू नका . पाकिस्तानचा ध्यास घ्या . जिना साहेबासाठी आपले सर्वस्व अर्पण करा ". नेताजी हे पत्रक मोठ्याने वाचत असताना मुहम्मद दुराणी ताडकन उभे राहिले. आणि म्हणाले " पाकिस्तान हा शब्दोच्चार सहन करण्याऐवजी मरण पत्करलेले चांगले . खुद्द आझाद हिंद फौजेत असा बुद्धिभेद करणारा पशु कोण आहे त्याला आपल्यासमोर फ़रफ़टत आणतो . "
६) हाच तडाखेबंद भाषण देणारा महम्मद दुराणी च तो पत्रक वाटणारा गद्दार होता हे समजल्यावर नेताजिंना किती यातना झाल्या असतील . नेताजींनी आदेश दिला" पकडा त्या गद्दार दुराणिला !" (उक्त ९ २ ० ). शेदाइंप्रमाणेच दुराणिहि गद्दार निघाला हे ऐतिहासिक सत्य आहे. पण तरीही नेताजींनी आपले हिंदु मुस्लिम ऐक्याचे धोरण सोडले नाही हाही इतिहासच आहे .
७) नेताजिंच्या मृत्युसमयी त्यांच्या बरोबर एकमेव विश्वासू सहकारी होता - हबिबूर रहमान . तोच त्यांच्या हौतात्म्याचा साक्षिदार होता .
हिंदु मुस्लिम ऐक्यावर प्रगाढ श्रद्धा असणार्या सुभाष बाबुंना हिंदुत्वाच्या रांगेत बसवता येईल का ?
************************************************************************************************************************************************************************************************************************
संदर्भ ग्रंथ :
1) The Indian struggle (1920 - 1942) - Subhash Chandra Bose, OUP (1977)
2) The Essential writings of Netaji Subhash Chandra Bose, OUP (1998)
3) नेताजी : वि. स. वाळिंबे , मेहता पब्लिशिंग हाउस पुणे (१९ ९ ४ )
Dhanywad Abhiramji Dnyanat Bhar padali ...
उत्तर द्याहटवावरील दिलेल्या मुस्लिम प्रेमाच्या उदाहरणान वरून एकाच सिद्ध होते की , कितीही अंजारा गोंजारा पिसाळलेले कुत्रे मालकालाच चावणार .
उत्तर द्याहटवा२ मुस्लिमांना ३ मत देणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाचेच उदाहरण म्हणावे लागेल.
काही व्यक्ती थोर असतात म्हणजे नेहमीच बरोबर असतात असे नही हेच या वरून सिद्ध होते.
बाकी लेखन खूपच चान झाले आहे मुद्देसूद आणि योग्य ते दाखले देवून.
माहितीत भर पाडल्या बद्दल धन्यवाद.
पण प्रस्तुत लेखात हिंदू मुस्लिम ऐक्य कुठे आहे?
उत्तर द्याहटवानेताजींनी मुस्लिमांसाठी वेगळ्या सुविधा केल्या होत्या, यातच वाटा वाती आली इथे आइक्य कुठे आहे??
मुस्लिम प्रेम म्हणा फार तर.
उत्तर द्याहटवात्याकाळातील काळातील नेत्यांना मुस्लिम राष्ट्र ही संकल्पना फारशी माहित नसवि. व सत्ता दिली तर फाळणी टळेल अशी स्वत:ची खुळचट समजूत करून ठेवली असावी त्यांनी.
नशीब फाळणी झाली नाहीतर आज हे मुस्लिम प्रेम कुठवर गेले असते कल्पनाही करवत नाहि.
आमच्याच देशात आम्ही पोरके .
कधी हिंदूंच्या भावना दुखावतात म्हणून या देशात कुठल्या गोष्टी वर बंदी आली असेल तर सांगा म्हणजे झाले.
अभिराम तुम्ही लिहिता फार छान यात वाद नाहि. तुमचा अभ्यास हे दांडगा आहे,फक्त अनुमान काढताना जरा खोलात विचार केलात तर उत्तम.
उत्तर द्याहटवाParag Mokashi - अनुमान करणे मी वाचकावर सोडुन देतो
उत्तर द्याहटवाIt is complete nonsense. Why are we putting every tall personality into a box either हिंदुत्ववादी or मुस्लिम धार्जिणे. Deliberate attempt by some one named Abhiram to confuse the people. There is no doubt that Netaji was absolutely patriot like Veer Savarkar. Stop spreading this
उत्तर द्याहटवाAnonymous What is patriot ?
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाचेरेकरांनी लिहिलेली जी वाक्ये सुरुवातीला आपण उल्लेख केली आहेत ती माझ्या १९८८ सालच्या द्रष्टे सावरकर काल-आज आणि उद्या या धनंजय किर स्मृती स्पर्धेतील बक्षिस मिळालेलुया निबंधातील आहेत असे मला वातत आहे. पण ते असो. फक्त हि वाक्ये सुरस आणि चमत्कारिक आहेत म्हणजे काय? गांधीजींच्या अहिंसक आंदोलना मुळे स्वातंय्त्र्य मिळाले हा भाबडा समज कोणाचा असेल तर उपाय नाही, पण दुसरे महायुद्ध आणि भारतीय शिपाई यांच्या निष्ठा ब्रिटिशांशी रहाण्याचा संभव उरला नाही हे सत्य नाही का? पंतप्रधान ऍटलींचे वाक्य सुसर व चमत्कारिक आहे हे तुमच्या लेखात कुठेच सिद्ध होत नाहि. सुभाषचंद्र बोस हिंदूत्ववादी आहेत असा कोणत्याही सावरकर वाद्याचा समज होता असे माझ्या तरी ऐकिवात माहितीत नाही. स्वत: सावरकरांनी फॉरवर्ड ब्लॉक आणि हिंदूमहासभा यात कोठे सहमती आहे व कोठे नाही हे सविस्तर पणे विशद केले आहे. कै.बाळाराव सावरकरांनी लिहिलेल्या सावरकर चरित्रात ते सविस्तर दिले आहे. तेव्हा सुभाषचंद्रांना हिंदुत्ववादी मानतात हा लेखाचा पायाच मुळात गैरसमजावर आधारित आहे. बोस हिंदुत्ववादी असल्याने त्यांना कोणीही सावरकरवादी आदर देत नसून त्यांच्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गक्रमणामुळेच आदर व्यक्त करतात. सुभाषचंद्र बोस यांची आणि सावरकरांची अकस्मात घडून आलेली भेट थोडक्यात न संपता दोन दिवस तब्बल ६ तास घडली. याच भेटित सावरकरांनी राशबेहारींचे पत्र सुभाष बोस यांना दाखवले. राशबेहारी बोस व सावरकाअंचा पत्रव्यवहार संपूर्ण पणे पाहिला तर राशबेहारी ,सुभाश आणि सावरकर या सलग साखळीचा उलगडा होतो. राशबेहारी बोस यांनी तर जपानमध्ये हिंदूमहासभेची स्थापना केली इतकेच नव्हे तर हिंदू कोण ,हिंदुत्व म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण सावरकरांनी त्यांना पत्रातून समजाऊन दिले व त्यानंतर जपान हिंदूसभेची स्थापना झाली.
उत्तर द्याहटवाhttp://saneshekhar.blogspot.in/2009/09/blog-post.html
उत्तर द्याहटवाhttp://saneshekhar.blogspot.in/2012/02/blog-post.html
प्र.के.अत्रे यांनी सुद्धा सुभाष कथा मध्ये कुठेही नेताजींना हिंदुत्ववादी म्हणून रंगवलेले नाही. अत्रे यांचे जाऊ द्यात पण सावरकरवादी लेखक कै.श्री.हरिभाऊ देसाई यांचे रनझुंजार नेताजी म्हणून पुस्तक आहे.त्यात त्यांनी कुठेही नेताजींना हिंदुत्ववादी म्हणून गौरवलेले नाही. आजपर्यंत कोणत्याही सावरकर वाद्याच्या पुस्तकात - ज्यांना मोरे बहुदा सरसकट सावरकर भक्त म्हणतात- सुभाषचंद्र बोस यांना हिंदुत्ववादी म्हटल्याचे वाचलेले आढळत नाही,मग मोरे किंवा तुम्हाला सुभाषचंद्र बोसांना हिंदुत्ववादी समजले जाते असा भास का झाला?
उत्तर द्याहटवासुभाष बाबू आणि सावरकर यात भेट झाली होती हे खरे आहे . सावरकरांचे अभिनव भारत संघटनेतिल सहकारी रासबिहारी बोस यांची सुभाशबाबुंना सेनेच्या स्थापनेत मदत झाली होती हे ऐतिहासिक सत्य आहे पण त्यावरून सुभाष बाबू हिंदुत्व वादि ठरत नाहित. त्यांनी सावरकरांची भेट घेतली होती यावरून ते सावरकर वादि हि ठरत नाहीत !
उत्तर द्याहटवा<<<<
हि वरची सर्वच वाक्ये विचित्र आहेत. भेट झालि हे खरे आहे का नाही या विषयावर एकतर वादच नाही. प्रश्न आहे तो या भेटीतून सावरकरांनी बोसांना निश्चित दिशा दिली का नाही? त्याचे उत्तर होय असेच आहे. राशबेहारिंची बोसांना म्दत झाली असे नसून राशबेहारी बोस हेच आझाद हिंद चे संस्थापक होते. सुभ्हाष चंद्र बोस जपानम्ध्ये पोचण्यापूर्वीच सुमारे ५०००० चे सैन्य राशबेहारींकडे जमा झाले होते.त्याचे नेतृत्व राशबेहारींपेक्षा पुष्कळच तरुण असलेल्या सुभाषचंद्रांकडे आले. तेव्हा राशबेहारींनी जाता जाता केलेली मदत असे आझाद हिंद सेनेचे स्वरुप नाही.सावरकरांनी त्यांच्या व बोसांच्या भेटीचे जे वर्णन केले आहे त्यावर अविश्वास दाखवण्याचे कारण नाही कारण परिस्थिती जन्य पुरावे आणि कागदोपत्री पुरावे ते खोटे ठरवत नाहीत. मात्र याचा अर्थ सर्व कर्तुत्व सावरकरांचे असे नाही,मात्र सशस्त्र क्रांतीचे तत्वज्ञान ,जे १९०८ च्या सावरकरांनी सांगितले त्याचे सुभाषचंद्र बोस अनुयायी /पाईक ठरतात. जसे रशियन वा चीनी क्रांतीचे प्रत्यक्ष नेतृत्व मार्क्स ने केले नसले तरी जगभर त्यास मार्क्स वाद म्हणून ओळखले जाते तशाच पद्धतीने काहिशा समानार्थी पद्धतीने सावरकरांच्या सशस्त्र क्रांतीविषयक लेखनाची स्फुर्ती भगतसिंगाप्रमाणेच सुभाषचंद्र यांनाही मिळत होती. त्यामुळे सुभाष-सावरकर भेटीने बोस हिंदुत्ववादी ठरतात किंवा सावरकरवादी ठरतात असे शुद्धीत असलेल्या कोणीही आजपर्यंत म्हटलेले नाही ,तसे म्हटल्याचे तुम्हाला का वाटले व हि सर्वस्वी गैरलागू वाक्ये एका मागून एक जोडून आपण का लिहावीत हे कळत नाही.
Chandrashekhar Sane, Please visit hindu nationalist people once and the decide .... kurundkar said the same thing
उत्तर द्याहटवा"आमचे हिंदुत्व प्रेमी नेटकरि मित्र मधुसूदन चेरेकर " ... अशा शब्दप्रयोगा ऐवजी ...."आमचे नेटकरि मित्र मधुसूदन चेरेकर ".. असे असायला हवेत ... हिंदुत्व प्रेमी आहेत किंवा नाही हे लोकाना ठरवू द्या. ... इतिहास शोधताना तुमचे निर्णय लोकाना आधीच सांगून तुम्ही बायस्ड ओपिनियन तयार करत आहात असे वाटत नाही का ?
उत्तर द्याहटवा"त्यानंतर सुभाष बाबुंचा सावरकरांसोबत फोटो लावायचा का ? याचा निर्णय सावरकर भक्तांवरच सोडायचा आहे"
उत्तर द्याहटवा.
हा हा हा ... समोर आलेल्या सत्याचा उपयोग कसा करायचा ते पण सुचवले आहेत ... म्हणजे, तुमचे संशोधन ' targeted ' संशोधन केले आहेत असे कोणाला प्रस्तावनेत वाटू लागल तर, आधीच बायस्ड असलेले वाचक, पुढचे न वाचता थांबतील ...
.
अशी वाक्ये, नंतरच्या चर्चेत आली असती तर जास्त बरे झाले असते
.
असो ... मी संपूर्ण वाचणारच .......
आपण लिहेलेले खरे असेल तर आमचे दुर्दैव आणि सुदैव असे दोन्ही म्हणावे लागेल. ज्या सुभाश्चान्द्रांची आम्ही द्रष्टा म्हणून पूजा केली ते स्वप्नाळू होते आणि मुस्लिमांकडून सहिष्णू असण्याची अपेक्षा करीत होते जे कधीच शक्य नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नरहर कुरुंदकरांच्या आपणच दिलेल्या संदर्भानुसार मुस्लिम इतरांचा मुस्लिम नसण्याचा हक्क कधीं मान्य करीत नाही आणि हे जगभरातील अनेक उदाहरवरून वारंवार सिद्ध होते आणि भारतातील मुस्लिमही त्याला अपवाद नाहीत. याचाच अर्थ असा कि सुभाषबाबू कितीही कर्तबगार असले तरी स्वातंत्र्यानंतर त्यांचा हातात भारताची सूत्रे जाण्या राष्ट्राला धोकाच अधिक होता. म्हणजेच त्यांचे राज्य आले नाही हे आमचे सुदैव आणि आम्ही त्यांना दूरदृष्टीचा मानत होतो हे आमचे दुर्दैव असेच म्हणावे लागेल. अर्थात सुभाष बाबूंचे य. दि. फडके यांनी लिहिलेले चरित्र वाचल्यानंतर मला देखील काही प्रमाणात हेच प्रश्न पडले होते, पण मी त्यावर गांभीर्याने विचार केले नव्हता. सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे जनरल कियानी, सुभाषबाबुंचे मुख्य सहकारी स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात गेले आणि तेथील लष्कराचे अधिकारी होवून भारताविरुद्ध लढले.
उत्तर द्याहटवाविषय हिंदुत्ववाद्यांचा समीक्षेचा आहे कि सुभाश्चान्द्रांचा? भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला सशस्त्र लढाही तेवढाच महत्वाचा आहे आणि त्यातील सावरकर हे एक महत्वाचे नाव आहे. सावरकरांनी हा लढा सुरु केला तेंव्हा ते हिंदुत्ववादी नव्हते पण काळाच्या ओघात त्यांना मुस्लिम मानसिकतेचा अंदाज आला आणि त्यांनी तो धोका ओळखला जो कदाचित सुभाष बाबुना ओळखता आला नाही. कदाचित तो त्यांनी नंतर ओलखलाहि असता. सावरकरांनी सांगितलेला मुस्लिम मानसिकतेचा भाग आजही केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला लागू होतो. आणि असे असतानाही आपल्याकडे तसे काहे नाही म्हणणे यासारखा दुसरा मूर्खपणा नाही.
उत्तर द्याहटवारासबिहारी बोस हेच आझाद हिंद सेनेचे संस्थापक व संघटक होते केवळ वयपरत्वे त्यांनी आपल्या संघटनेचे नेतृत्व तरुण सुभाश्चान्द्रांकडे दिले. त्यांच्या योगदानाला किरकोळ समजू नका. महत्वाचे म्हणजे मुस्लिम मानसिकतेचा विचार आता वैश्विक पातळीवर करणे आवश्यक आहे कारण तो आता जगातील सर्व खंडातील एक मोठी समस्या झाली आहे. भारताने कितीही डोळे झाकले तरी हा विचार वैश्विक होणारच. आठवा, चीनने ऑलिम्पिक काळात त्यांच्या मुस्लिमांवर घातलेली बंधने. चीन हे करू शकले कारण त्यांच्याकडे लोकशाही नाही आणि मतांसाठी त्यांना मुस्लिमांचे लाड करण्याची गरज नाही. जगभरातील लोकशाहीचा मोठा फायदा मुस्लिमांनी वोट बँकेच्या रूपाने घेतलेला आहे. हेही विसरत काम नये कि जगातील एकही मुस्लिम राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी नाही आणि जगभरातील ज्या ज्या प्रांतात मुस्लिम बहुसंख्य आहेत तेथे देखील लोकशाही आणि शांतता धोक्यात आली आहे. उदाहरणार्थ काश्मीर, रशियातील चेचेन्या, चीनमधी शिन्शियांग प्रांत, नॉर्वे आणि स्पेन मधील मुस्लिम बहुल भाग, भारतातील आसाम. यादी बरीच लांबेल वास्तव स्वीकारावे.
हटवाआझाद हिंद सेनेचे मुख्य प्रतिनिधी मंडळ ७ लोकांचे होते . या ७ पैकी ४ मुस्लिम होते
हटवाPublic administration ministers of the Provisional Government of Free India included:
Lakshmi Swaminadhan – The Minister in Charge of Women's Organization
Mr. S. A. Ayer – The Minister of Broadcasting and Publicity
Lt. Col. A. C. Chatterji – The Minister of Finance
Lt. Col. Aziz Ahmed
Lt. Col. N. S. Bhagat
Lt. Col. J. K. Bhonsle
Lt. Col. Guizara Singh
Lt. Col. M.Z. Kiani
Lt. Col. A. D. Loganathan
Lt. Col. Ehsan Qadir
Lt. Col. Shahnawaz Khan Capt. Dilip Singh Siwach
A.M.Sahay – Secretary
Karim Ghani
Debnath Das
D.M. Khan
A. Yellapa
J. Thivy
Sardar Ishar Singh Narula
A. N. Sarkar – the government's official Legal Advisor
छान. या लेखातून सुभाष हा किती मुस्लिम तुष्टीकरणवादी अर्थात मूर्ख होता हे सिद्ध झाले. टिळकही तितकाच महामूर्ख होता हेही मला माहीत आहे. परंतु सावरकर कधीकधी उगीचच जाहीररीत्या त्याची स्तुती का करीत त्याचा उलगडा होत नाही. परंतु सुभाषचा फेडरल प्रांतपद्धतीला असलेला कट्टर विरोध व केंद्रवर्ती प्रांतप्रणालीचा त्याचा कट्टर पुरस्कार हा मात्र कौतुकास्पद होता. त्याचप्रमाणे सावरकरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या भिकारड्या भाषावादी व अर्थातच फुटीरतावादी व हिंदुत्वास मारक अशा चळवळीस पाठिंबा दर्शविण्याचे महापाप का केले याचाही उलगडा होत नाही. यावर सविस्तर लेखाची अपेक्षा करतो.
उत्तर द्याहटवाje hindutw virodhi ani ati muslim dharjine ahet te gele tel lavt....yanna muslimancha itka kalwala yeto kuthun....?ki koni relatives hote ya lokanche muslman....yanni samjun ghetlela nasto ka islam? ani dharmachua vicharsarnicha tya dharmachya samanya lokanvr kh parinam hoto he tyanna manya nh ka ? je ahe te ahe....changlyala changle ani vaitala vait mhava apla ky ani dusryacha ky he na pahta....ashi nidan mothya mansankadun tri apeksa hoti....ata pasun ekch konich mahapurush nh ....konalach dokyavr ghyayche nh....aplyala patatay tech khara ani apn unbiasedly vichar karaycha....islam chi vicharsarnikharach jagachya shantatela dhokhadayak ahe....ani tya vichar sarnichya adhin barech muslman gele ahet kadachit kh unbiasedly vichar karnare tyanchyat pn astil asa manun.....ani hindunchyat pn ati vyalti puja ha durgun ahe....kalachya oghat hindu dharmat barich kranti zali ahe he pn manya karava lagel pn ati vyatki puja ha durgun jane pn garjecha ahe....
उत्तर द्याहटवाAll the leaders were desperate keeping India as whole,but were not.This proves that it is very difficult to live with moslems peacefully united.
उत्तर द्याहटवाBy reading this article some questions raised in my mind, "Why did Netaji incline towards Islam and not towards Hindutva ? " Why did he prefer Muslims over hindus?" "Why did Netaji give more preference to Muslims than Hindus ?"
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाश्रीयुत अभिराम दीक्षित, तटस्थपणे/ भावनांची झूल बाजूला ठेवून वगैरे शब्दांचे खेळ कशाला करता? याहि प्रकरणात सावरकरांनी स्वतः माती खाल्ली आहे, हे मोठ्या मनाने मान्य करा कि राव!
उत्तर द्याहटवा" हिंदु मुस्लिम ऐक्यावर प्रगाढ श्रद्धा असणार्या सुभाष बाबुंना हिंदुत्वाच्या रांगेत बसवता येईल का ?" हा प्रश्न विचारण्याआधी सावरकरांनी काय केलं ते पहा. 10 मे 1952 साली पुण्यात अभिनव भारत संघटनेच्या विसर्जन कार्यक्रमात सेनापती बापट यांच्या उपस्थितीत सावरकरांनी स्वतः, "आझाद हिंद सेनेची स्थापना नेताजींनी आपल्याशी चर्चा करून केली होती व ते एक हिंदू संघटन होते" अश्या आशयाचे विधान केले होते. सावरकरांनी स्टेजवर नेताजींची प्रतिमा ठेवली होती, त्याची हार घालून पूजा देखील केली होती.
आणि हो नेताजी सुभाषचंद्र बोस, विवेकानंद हे खरे हिंदुत्वाचे चेहेरे आहेत. फुटीरवादी, छद्म-हिंदुत्ववादी सावरकर नव्हेत.
http://maliabhi.blogspot.in/2017/08/blog-post_5.html
त्यावेळी अखंड भारत होता जशी गांधीची स्तुती त्यांनि केली तशी सावरकरांची पण केली. फाळणी टाळणे आवश्यक होते कारण फाळणीच्या हिंसाचारात १० लाख मेले त्यातील ६.५ ते ७ लाख हिंदु शिख होते. आर्थिक फटका जबर बसला. टिळकांनि लीग बरोबर करार केला, सावरकर मुखर्जीच्या हिंदु महासभेने पण मुस्लीम लीग शी युती केली होती. क्षण भर ते मुस्लीम प्रेमी होत असे मानले तर ते प्रकार गांधी टिळक नेहरु यांनि ही केले आहेत. फक्त मुस्लीमांनीच त्याना मदत केली असे मानणे चुक आहे काबुलला ५५ दिवस त्यांना घरी लपवुण ठेवणारा उत्तमचंद मल्होत्रा (पंजाबी हिंदु) होता . नांबियार स्वामी हे लोक ही हिंदु च होते आझाद हिंद सेनेतही हिंदु बहुसंख्यू होते!
उत्तर द्याहटवा