२६ एप्रि, २०१३

मौलाना हसरत मोहानी चे उदात्तीकरण






भारतातले बहुसंख्य मुसलमान हे अब्दुल हमीद आणि अश्फाक उल्ला खान चा आदर्श ठेवतात . त्यांच्या माथी दंगल खोर मौलाना मारण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे . सध्या काही धर्मांध शक्तींनी मौलाना हसरत मोहानी चे उदात्तीकरण चालवले. आहे . कोण आहेत हे मौलाना हसरत मोहानी?


१) मुस्लिम लीग चे १ ९ २ १ अन २ ३ सालचे अध्यक्ष . या अधिवेशनात कॉंग्रेस च्या - नोन व्हायोलंन्स थॉट वर आक्षेप घेतला गेला . याच लीग ने डायरेक्ट ए क्षन डे पुकारून भारताची फाळणी केली .

२) अफगाण आक्रमण या विषयावर दिलेल्या मुलाखतीत हसरत मोहानी म्हणतात - " मी पहिल्यांदा मुसलमान आहे त्यानंतर सर्वकाही आहे. " . १ ९ २ ० च्या अलाहाबाद च्या खिलाफत कमिटीत मौलाना हसरत मोहानी यांनी गर्जना केली - " अफगाणिस्तान ने आक्रमण केल्यास भारतीय मुसलमान त्याला मदत करतिल." …… याच अधिवेशनात हे मौलाना तुर्कस्थान च्या दुर्दशेमुळे ढसा ढसा रडले होते .
(http://books.google.co.in/books/about/Gandhi.html?id=DU50PwAACAAJ) पान २ १ ७


३ )केरळातील मोपला मुस्लिम आणि हिंदु यात झालेल्या दंगलिवर भाष्य करताना मौलाना हसरत मोहानी म्हणतात - " मोपला प्रदेश हा " दार उल अमन" राहिलेला नसून " दार उल हरब " झालेला आहे . मोपलांना असे वाटत होते कि , हिंदु लोक शत्रू बरोबर संगनमत करत होते . त्यामुळे मोपले हिंदुना दोन पर्याय देत होते - कुराण (धर्मांतर ) किंवा तलवार (मृत्यू) . मृत्युपासून सुटका करून घेण्यासाठी जर हिंदुनि इस्लाम स्वीकारला तर ते धर्मांतर स्व खुशीचे ठरते . " Roland Miller "Mappila Muslims of Kerala: a study in Islamic trends" orient longman orient longman (1976 ) pg no 150


४) या मौलानांचे उदात्तीकरण करण्याचा चंग अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटि ने बांधला आहे. जमाते इस्लामी ची साथ आहे . त्यासाठी त्यांचा डॉ . बाबासाहेब आंबेडकरांबरोबरचा संदर्भहिन फ़ोटो वारंवार प्रकाशित केला जात आहे. (संदर्भ :http://aligarhmovement.com/book/export/html/264) दोन राजकीय नेत्यांचा एकत्र फ़ोटो असणे म्हणजे त्यांचे विचार जुळणे असे नाही .


५) डॉ बाबासाहेब आबेडकर त्यांच्या पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथात या मौलाना हसरत बद्दल काय म्हणतात ? . बाबासाहेबांनी मौलानाचा कावा उघड केला आहे . त्यांनी योग्य अवतरण उद्धृत केलेले आहे . - (महाराष्ट्र शासन सरकारी प्रकाशन पान १ ६ ० , पीडीएफ पान ७ ८ -http://www.ambedkar.org/pakistan/pakistan.pdf )

बाबासाहेब म्हणतात " - “ But I was surprised, an out-and-out Nationalist like Maulana Hasrat Mohani opposed the resolution on the ground that the Mopla country no longer remained Dar-ul-Aman but became Dar-ul-Harab and they suspected the Hindus of collusion with the British enemies of the Moplas. Therefore, the Moplas were right in presenting the Quran or sword to the Hindus. And if the Hindus became Mussalmans to save themselves from death, it was a voluntary change of faith and not forcible conversion—Well, even the harmless resolution condemning some of the Moplas was not unanimously passed " ( पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया . महाराष्ट्र शासन सरकारी प्रकाशन पान १ ६ ० , पीडीएफ पान ७ ८ - http://www.ambedkar.org/pakistan/pakistan.pdf । पीडीएफ पान ७ ८ )

बाबासाहेबांनी मौलांनांचा अंतस्थ हेतू उघड करून ते कसे दंगलखोर होते हे सिद्ध केले आहे. अशा मुस्लिम लीग समर्थक दंगलखोराचा फ़ोटो बबसाहेबांबरोबर लावणे योग्य आहे काय ?

भारतातले बहुसंख्य मुसलमान हे अब्दुल हमीद आणि अश्फाक उल्ला खान चा आदर्श ठेवतात . त्यांच्या माथी दंगल खोर मौलाना मारण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे . आणि बाबासाहेबांचे त्याबरोबरचे चित्र हे दिशाभूल करणारे आहे हेही कोणीतरी सांगितले पाहिजे म्हणुन हा उपद्व्याप .
 — 

1 टिप्पणी:

  1. १) साहेब पहिल्यांदा एका समजून घ्या बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारतात एकदाच १ ९ ५ २ साली संसदेच्या निवडनुकीला उभे होते . त्यावेळी त्यांनी समाजवाद्यांशी युती केली होती . त्यावेळी मुस्लिम लि ग प क्ष भारतात उरला न्हवता कारण फाळणी होउन गेली होती .

    २) तुम्ही जो मुस्लिम लीग ने बाबासाहेबांना संसदेत पाठवले असा प्रचार करत आहात तो बदनामीकारक तर आहेच आणि सत्याला हि धरून नाही . १ ९ ४ ६ साली बाबासाहेबांनी लीग चा पाठिंबा घेतला आहे पण तो संसदेत जाण्यासाठी न्हवे. तर घटना परिषदेत जाण्यासाठी होय .

    ३) घटना परिषदेत त्यावेळी जनतेने निवडलेले नव्हे तर प्रांतिय सरकारांनी सुचवलेले प्रतिनिधी (आजच्या राज्यसभेप्रमाणे ) पाठवायचे होते. मुंबै प्रांतात बाबासाहेबांच्या पक्षाचे कुणीही निवडुन आले नव्हते म्हणुन बंगाल विधिमंडळात बाबासाहेबांच्या नावाचा प्रथम पुरस्कार तेथील दलित प्र्तिनिधिंनि केला . मुस्लिम लीगने नाही . (आजच्या राज्यसभेप्रमाणे ) लीगने त्यांच्या नावाला पाठिंबा दिला . ते बंगाल मधून लोकनियुक्त झाले न्हवते त्यामुळे त्यांचा मतदार संघ मुद्दाम गांधीने पाकिस्तानात घातला असे म्हणणे हास्यास्पद आहे.

    ४) फाळणीची कारणे फार खोलवर रुतलेली आहेत आणि बाबासाहेबांनी ती त्यांच्या पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथात सविस्तर लिहिली आहेत ती आपण अवश्य वाचावी .

    ५) फाळणी झाल्यानंतर प्रस्तुतची घटना समिती बरखास्त झाली आणि जुलै १ ९ ४ ७ मध्ये बाबासाहेब कोंग्रेसच्या पाठिंब्यावर घटना समितीत निवडुन गेले . सबब त्या लीगी पाठिंब्यातुन फारसे काही निष्पन्न होत नाही . तरी मिळालेल्या संधीचा बाबा साहेबांनी उपयोग करून घेतला ४ ६ सालच्या परिषदेत
    केलेले राष्ट्रवादी भाषण अवश्य वाचा . त्यात काढलेले मुस्लिम लीगचे वाभाडेहि वाचा .

    ६) कधी कोंग्रेस तर कधी लीग च्या पाठिंब्यावर बाबासाहेब नियुक्त झाले आहेत . पण बाबासाहेब त्यांपैकी एकाचेही समर्थक न्हवते. किंवा कोंग्रेस तर कधी लीग आंबेडकरांचि पाठीराखी न्हवती .बाबा साहेबांसारख्या कायादेताद्न्याला आणि घटना पंडिताला तेथे घेणे भाग होते म्हणुन घेतले गेले .

    ७) तात्पर्य : संसदेत पाठवले हे चूक । मतदारसंघात उभे राहून बाबासाहेब लीगच्या पाठिंब्यावर गेले हे चूक . ते लोकनियुक्त मतदारसंघातून निवडुन गेले नव्हते त्यामुळे …राज्यसभेप्रमाणे नियुक्त झाले होते म्हणुन - लीगचा पाठिंबा अन त्यामुळे बामणी गांधीने तो मतदारसंघ पाकिस्तानात टाकला - हे फाळणीचे कारण होते हे तर साफ चूक .

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *