१८ ऑक्टो, २०१२

वसंततिलका

पूर्वसूत्र :
वसंततिलका
(वसंत ऋतू. (Spring) त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणी त भ ज ज ग ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. वसंततिलका वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने.(माझे म्रुत्युपत्र ही सावरकरांची कविता होय.हा वृत्तबद्ध कविता करण्याचा ८५% जमलेला प्रयत्न आहे !)


कवितेचे नाव : वसंततिलका
वृत्त : वसंततिलका
कवितेचा विषय :वसंततिलका

(Spring) वसंत ऋतू. त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक. हा तिलक लावण्यासाठी; सृजनासाठी; जननासाठी पृथ्वी आतुर झाली आहे. वरुणदेवतेला साकडे घालते आहे........

.
.
.
हे देव हो; वरुणराजन; व्याकुळे रे
आसक्त होय अधरी; अवनी अधीरे
आरक्त नेत्र असती; अजली अश्रू रे
ती काय रूदन करी; न कळे तुला रे
.
.
ऐकू न ये तुज अत्रुप्त तहानलेली
पृथ्वीमुखे करुण आळवणी सुरू ही
फेके रसाल मग ती प्रणयी पलाश
हा कामदेव दिधला मधुगंधपाश
.
.

.
.
पाशात हा वारुणराज फसे पहा रे
प्रत्येक ही पुरुष आतुर होतसे रे
ते वारुणीय अबला बल तेज काही
अव्हेरणे वरुणराजन शक्य नाही
.
.
.
आव्हान नेत्र करतीच वसुंधरेचे
सौदर्य स्रौष्ठव भरीव गोल साचे
हे पृथ्वी गर्जुन असे नर धाव घेतो.
कामांध हा वरुण देवच दैत्य होतो.
.
.
.
7
.
.
.
हे अप्सरे गडगडाट नभांगणात
वीजा कडाडत तडाक प्रपात होत.
धारात नाहत धरा धर सुंदरा ती
धो धो पडे वरुण हा वरतो वरोनी
.
.
.
5
.
.
.
ते कोसळो धबधबे सरिता भराया
श्रृंगार शामल करेल वसुंधरेला
माजात हा वरुण पौरुष कार्य दावी
ती सुंदरा तृप्त धरा मम कारणेची
.
.
.
.
.
.
अद्यापि ना कळतसे प्रसवा धरेला
हा काय हो? सृजन शून्य वर्षाव झाला
आनंद हो प्रजननात कथे तयाला
कैसे? कधी? नवनिर्माण जमेल याला?
.
.
.
व्रुत्ती वसंततिलका न तुझी खुले का ?
.
.



2



डॉ. अभिराम दीक्षित

1 टिप्पणी:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *