८ मे, २०१५

पुराणातली विमाने आणि शिवरायांची धर्मनिरपेक्षता new

पुराणातली विमाने आणि शिवरायांची धर्मनिरपेक्षता 

 हिंदवी स्वराज्य हा शब्द शिवरायांनी वापरला आहे .त्याचा तत्कालीन  अर्थ होतो हिंदुचे राज्य . संभाजी राजांच्या महाराजंच्या अनेक पत्रातून आणि बुधभूषण काव्यात सुद्धा - वर्णधर्म रक्षणाच्या प्रतिद्न्या आहेत . (संदर्भ १).  त्या काळाच्या मर्यादा आहेत . शिवाजी महाराज धार्मिक अर्थाने हिंदु होते . पारंपरिक हिंदुधर्म हा परकीय धर्माबद्दल सहिष्णू आणि स्वकीय बांधवाना वर्णाश्रमात जखडणारा आहे . त्यामुळे शिवराय परधर्म सहिष्णू असणे हे त्यांचे धार्मिक हिदुत्व आहे . सर्व देव नमस्कार: केशवं प्रती गच्छति । प्रत्यक्ष  रामदास स्वामिंनिहि मुसलमानी अष्टके लिहून अल्लाचा गौरव च केला आहे . सर्व धर्म संभावी असणे वेगळे आणि सामजिक द्रुश्ट्या पुरोगामी असणे वेगळे . पुरोगाम्याच्या मेंदुला काय झाले आहे ? शिवरायांच्या  काळात अस्पृश्यांना सैन्यात घेतले होते हे खरे आहे . पण महार सैन्य पेशव्यांकडे पानिपताच्या युद्धातही होते हा इतिहास आहे .



(संदर्भ १): Ref : Budhbhushan - Rajneeti , Writer - Sambhajiraje Bhosale Editor : R. A. Kadam, Rajmayur Prakashan (February 2012) adhyaya 2 Shloka 554


 अस्पृश्यातल्या  लढवय्या जमातिना सैन्यात स्थान देणे हे वर्णाश्रम धर्माचे पालनच आहे .अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्याचा कायदाही भारतात पूर्वी कधीच नव्हता  . १९५० साली तो आधुनिक कायदा आपल्याला घटनेच्या रूपाने मिळाला . आणि अस्पृश्यतेच्या अमानुष रुढितून सुटका झाली . आजच्या आधुनिक विचारांचे आरोपण आणि अपेक्षा ३५० वर्षांपूर्वी करणे हा मूर्खपणा आहे .ज्या कारणामुळे पुराणात विमाने असू शकत नाहीत - नेमक्या त्याच कारणामुळे शिवराय धर्म निरपेक्ष असू शकत नाहित. पुरोगामी सुद्धा असू शकत नाहित. १७९० सालच्या फ्रेंच राज्यक्रांतीत जन्मलेले विचार सोळाव्या शतकातल्या शिवकालात कसे काय असतील ? पुराणातली विमाने अथवा सोळाव्या 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *