१७ मे, २०१५

लाल सलाम: कम्युनिस्ट धर्माची चिकित्सा :


 भाग १  लाल सलाम ( उपोद्घात ) 


मार्क्सवादी अतिशय बुद्धिमान आहेत यात शंका नाही . गेली अनेक वर्षे कम्युनिस्तांच्या अनेक पिढ्या बौद्धिक क्षेत्रात अहोरात्र झटत आहेत . औद्योगिक क्रांतिसंदर्भात मर्यादित अर्थाने मार्क्सचा विचार योग्यच आहे . श्रमिकांची पिळवणूक करणारे भांडवल दार हे वास्तव आहे. त्याविरुद्ध जगातल्या काम गारांनो एक व्हा अशीही हाक मार्क्स ने दिली आहे . श्रमिकांच्या बाजूचे तत्वज्ञान आणि राजकीय विचारधारा तयार करणारा द्रष्टा म्हणून मार्क्स चे योगदान वादातीत राहील …३० -४० वर्षापुर्वीच्या गिरिणि युगात कम्युनिस्ट चळवळीने अनेक महत्वपूर्ण निर्णय धसाला लावले आहेत . कामगारांचे वेतन - कामाचे तास याबाबतीतले त्यांचे परिश्रम याना मनापसून लाल सलाम . ध्येयवेड्या कम्युनिस्टांच्या जीवन व्रताला त्यागाला- शोषित वर्गा बद्दलच्या प्रेमाला सेल्युट . आता पुढे जाऊ … .कम्युनिस्टांचि पहिली मर्यादा म्हणजे त्यांनी नवा धर्म काढला आहे . धर्म म्हणजे काय ? धर्माची व्याख्या काय ? तर पोथीतल्या मंत्रांचे अर्थ लावून भूतकाळ आणि भविष्यकाळ वर्तवता येतो असे गर्जून सांगणारा पोथिपंडित .
कम्युनिस्टांनि इतिहासाच्या आकलनाचा एकमेव लाल चष्मा धारण केलेला आहे . आणि जगाचा इतिहास एका सूत्रात त्याना व्यक्त करता येतो !

मानवी जीवन आणि जीवशास्त्र हे बहुरंगी बहुढंगि असते - त्यामागे अनेक प्रेरणा असू शकतात . पैसा महत्वाचा आहे पण हि एकमेव प्रेरणा नाही . असू शकत नाही . लिनियर मेथेमेटिक्स चे दिवस संपले . गणिताच्या बारावीत शिकवले जाणारे मेट्रिक्स चे नियम कम्युनिस्ट कधी शिकणार ?

मानवी जीवनाच्या प्रेरणा कशा शोधाव्यात ? त्यासाठी जीवशास्त्र , मेंदुशास्त्र उपलब्ध असताना - मार्क्स पोथीत लिहिलेली एकमेव आर्थिक प्रेरणा सत्य मानणे हि सरळ सरळ धर्मांधता आहे .

विज्ञान मार्क्स कालाहुन बरेच पुढे सरकले आहे . मानवी जीवनाच्या प्रेरणा शोधण्यासाठी साहित्य आणि इतिहास याचा आधार घेण्याचे दिवस संपले . जीवशास्त्र , मेंदुशास्त्र , इव्होल्युशन ( उत्क्रांती विज्ञान ), रसायनशास्त्र , बायोकेमिस्ट्री , बिहेव्हियरल सायन्स यांच्या हजार चष्म्यातून - मानवी प्रेरणे बद्दल - अधिक शास्त्रशुद्ध माहिती मिळु शकते . एकाही मार्क्स वाद्याने यापैकी एकाही विषयाला स्पर्श केलेला नाही .

स्वत:ची पोथी वापरून भूत - वर्तमान - भविष्य यांची आकाशवाणी करणे हे तर शुद्ध पोंगापंडिताचे लक्षण आहे .

हिंसेची भक्ती हे अजून एक धार्मिक लक्षण मार्क्सवाद्याना लागू पडते . हिंसा हा लाल क्रांतितला अपरिहार्य घटक आहे . मार्क्सने हिंसेला सुइणिचि उपमा दिली होती . हिंसा सर्वथा अयोग्य असे कोणीही शहाणा माणुस म्हणणार नाही . गांधी , महावीर आणि बुद्ध या अहिंसेच्या पुजार्यांनिहि अपवाद म्हणून हिंसेचे महत्व - स्व संरक्षण वगैरे गोष्टीत मान्य केले आहे . कम्युनिस्टांच्या समाज क्रांतीत हिंसा अपरिहार्य आहे . हिंसेशिवाय वर्गीय न्याय मिळूच शकत नाही अशी हि श्रद्धा आहे . मार्क्सचे अमुक एक वचन चूक आहे असे म्हणणारा कम्युनिस्ट मी आजवर पाहिला नाही . एकही चूक न करणार्या पुरुषाला अवतार किंवा प्रेषित म्हणतात - माणुस नाही .
पोथी, प्रेषित , हिंसा सारे काही अपरिहार्य मानणार्या या विचाराला धर्म म्हणून आपल्या विचार विश्वात स्थान द्यावे आणि त्यांच्या अंधश्रद्धा निर्मुलनाचे कसोशीने प्रयत्न करावेत असे अम्हास हल्ली फार जोमाने वाटु लागले आहे . अति अल्पसंख्य कम्युनिस्ट बांधवा बद्दल आम्हास बहुसंख्य हिंदु बांधवा इतकेच प्रेम वाटते ! त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धांचे पहिले बळी तेच आहेत . हिंदुचे अंधश्रद्धा निर्मुलन जितके महत्वाचे आहे - तितकेच कम्युनिस्टांचे हि आहे .
अभ्यासू कम्युनिस्ट मंडळि पुरोगामी कळपात बेमालूम पणे मिसळुन गेली आहेत . हिंसक क्रांतिचे बीजारोपण करणारे साहित्य अनेक वर्ष निर्माण करत आहेत . कम्युनिस्ट लोक जातवास्तव समजून घेत नाहीत अशी टिका करत- करत …सार्या पुरोगाम्यांनी कम्युनिस्ट लिखाण आणि इतिहासाचे आकलन १०० % मान्य करून टाकले आहे. याचे परिणाम गंभिर होणार आहेत . कम्युनिस्ट पक्ष अमान्य पण त्यांचे विचार मान्य अशी परिस्थिती पुरोगाम्यांची बनली आहे. या लेखमालेत कम्युनिस्ट साहित्याची चिकित्सा करायची आहे ……. (क्रमश: )

आगामी 

कम्युनिस्ट धर्माची चिकित्सा

१) लाल सलाम :  ( उपोद्घात ) 
२) वंश जातीवादी  - कार्ल मार्क्स
३)
कॉम्रेड स्टालिन ते कोम्रेड शरद
४) लाल हिंसा : इतिहास आणि विज्ञान 
५) लाल बांधवाना कळकळीचे आवाहन 


1 टिप्पणी:

  1. अभिरामजी, दोन्ही लेख आज निगुतीत वाचून काढले. पहिल्या लेखाबद्दल म्हणायचे तर मार्क्सवद हा नवीन धर्म आहे हे मान्यच. पोथीनिष्ठा आणि शब्दप्रामाण्य हे गुण मार्क्सवाद्यांत आहेतच. पुरोगामी मंडली मार्क्स धर्म नाकारतो म्हणुन धर्म नाकारत असतात हेही वास्तव. भारतातील इतिहास बव्हंशी एकतर हिंदुत्ववादी किंवा मार्क्सवादी भुमिकेतुन लिहिला गेला आहे त्यामुळे त्यातील वास्तविकताही लोप पावलेली आहे. वर्गवाद आणि वर्गविग्रहाची भाषा बोलायला चांगली असली तरी भारतातील समाजवास्तव हे स्वतंत्रपणे पाहिले जायला हवे. मुळात भारतीय माणूस जडवादी नसल्याने व बव्हंशी लोकांच्या प्रेरणा या जात व धर्माशी निगडित असल्याने आपला वरिषठ-कनिष्ठत्वाचा वाद आणि मार्क्सचा वर्गविग्रहत्वाचा वाद याची सांगड बसू शकत नाही. भारततील पुरोगामी विचारसरणी भंपक ठरली आहे ती यामुळेच.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *