१९ जाने, २०१३

हिंदुत्व विचाराची फ़ेरमांडणि


पुण्याच्या वसंत व्याख्यान मालेत  " हिंदुत्व  विचाराची फ़ेरमांडणि"   या विषयावर २००७ साली  मी भाषण केले होते . हिंदु समाजाचे संघटन आणि सबलीकरण करण्यासाठी काय केले पाहिजे यावर मत व्यक्त केले होते . त्या भाषणाच्या दोन वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या खाली देत आहे . वाचकांनी स्वत:च योग्य आणि अयोग्य काय ? याचा निष्कर्ष काढायचा आहे . मा. प्रल्हाद मिस्त्री यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा ऋणी  आहे . 
1. सकाळ




 2. सनातन प्रभात  




हिंदुत्त्व विचारांची फेरमांडणी


फेरमांडणी म्हणजे पुन्हा मांडणी. फेरमांडणीची हिंदुत्त्वाच्या विचारांना गरज आहे.

आत्ताच काही दिवसांपूर्वी ओरिसामधल्या जगन्नाथ मंदिरामध्ये दलितांना सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश दिला होता. बातमी ताजी आहे. सर्वोच्च न्यायालयाने दलितांना प्रवेश दिल्यामुळे तिथल्या पंडितांनी, ब्राह्मणांनी हे मंदिर अशुद्ध झालेलं आहे, विटाळलेलं आहे, असं म्हणून गोमूत्राने, गंगाजलाने ते मंदिर धुऊन काढलं, साफ केलं. पशूचं मूत्र आमच्या हिंदू बांधवांपेक्षा आज हिंदूंनाच पवित्र वाटतं आहे ही हिंदू समाजाची वस्तुस्थिती आहे. एकही हिंदुत्त्ववाद्याला या घटनेचा निषेध करावासा वाटला नाही; म्हणून हिंदुत्त्वाची फेरमांडणी आवश्यक आहे असं मला वाटतं. ही झाली ब्रह्मवृत्ती.

खैरलांजीमध्ये थोड्याच दिवसांपूर्वी दलित स्त्रियांची अब्रू लुटून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना ठार मारण्यात आलं. दलित कुटुंब अख्खं ठार मारलं गेलं. त्याही घटनेबद्दल हिंदुत्त्ववादी कुठे चकार शब्द बोलले नाहीत. ही झाली हिंदूंची क्षात्रवृत्ती. अशा ब्रह्मवृत्तीचा आणि क्षात्रवृत्तीचा हिंदू समाजात सुकाळ झाल्यामुळे आणि हिंदुत्त्ववाद्यांना त्याच्याशी काही देणंघेणं वाटत नसल्यामुळे मला हिंदुत्त्व विचारांची फेरमांडणी करावी असं वाटतं. साधारणतः कुठलाही शहाणा माणूस हिंदुत्त्व विचारांची फेरमांडणी करायला पाहिजे या विचारांशी सहमत होईल. परंतु हिंदुत्त्व विचारांच्या मांडणीचीच मुळात गरज काय असा कुठलाही सुज्ञ प्रश्न आपल्याला पडू शकतो. म्हणजे कशाला आहे, हिंदू-फिंदू कशाला पाहिजे? आपण हे मानवच आहोत, सगळं मानवराज्य आहे. या मानवतेच्या दृष्टीकोनातूनही सर्व प्रश्न आपल्याला सोडवता येतील. आपल्या सर्व प्रश्नांची उकल आपल्याला या मानवतेच्या दृष्टीकोनातून करता येईल. माणुसकी हाच खरा धर्म आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. मग त्यासाठी हिंदू या शब्दाबद्द‍ल आग्रह का? 


यासाठी मी माझ्या भाषणाची मांडणी तीन भागात करणार आहे. पहिला भाग आहे, हिंदुत्त्वाच्या मांडणीची गरज. दुसरा भाग आहे, प्रस्थापित हिंदुत्त्वाचे म्हणजे त्या भूमिकेचे मंडन आणि नंतर त्यातलं जे काही मला पटत नाही त्याचं खंडन; हा भाषणाचा दुसरा भाग आहे. भाषणाचा तिसरा भाग हा हिंदुत्त्वाच्या फेरमांडणीचा आहे, म्हणजे पुन्हा मांडणीचा आहे, वेगळ्या प्रकारच्या मांडणीचा आहे. यातला पहिला भाग म्हणजे हिंदुत्त्वाच्या मांडणीची गरज काय हा भाग हिंदुत्त्ववाद्यांच्या आवडीचा आहे. दुसरा भाग डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या आवडीचा आहे, आणि तिसरा भाग सध्या तरी कोणाच्याच आवडीचा नाही, तो आपल्या आवडीचा व्हावा अशी माझी यानिमित्ताने इच्छा आहे.






भाग १ - हिंदुत्त्वाच्या मांडणीची गरज काय आहे?






आपण भाषणाच्या पहिल्या भागाकडे येऊ. हिंदुत्त्वाच्या मांडणीची गरज काय आहे? मानवता हाच खरा धर्म आहे. ते एक उदात्त, अत्युच्च मूल्य आहे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. परंतु मानवता हा जरी चांगला धर्म असला तरी जगातली अनेक उच्च ध्येये आपल्यासाठी अजून शिल्लक आहेत. म्हणजे, युआन च्वांग जेव्हा पूर्वी भारतात आला होता तेव्हा कुलुपे नव्हती भारतात. कुलूप, ताला ह्याला संस्कृत शब्द नाही. भारतात कुलुपाची पद्धत नव्हती. कशाला, काय, कोण चोरीच करीत नव्हतं. पण जसं घरांना कुलुपं नसावीत ही एक चांगली गोष्ट आहे, तसं माणुसकी ही चांगली गोष्ट आहे, पण जोपर्यंत या जगात चोर आहेत, दरोडेखोर आहेत, खुनी आहेत, बलात्कारी आहेत, तोपर्यंत घराला कुलुपाची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे घरांना कुलुपांची आवश्यकता आज आहे, त्याप्रमाणे सगळी मानवजात जरी एक असली, माणुसकी हाच खरा धर्म असला, तरीही हिंदुंवर केवळ हिंदू म्हणूनच जेव्हा अन्याय होतात, अत्याचार होतात, तेव्हा त्या माणुसकीला कुलूप घालावं लागतं, त्या मानवतेला टाळं ठोकावं लागतं; आणि त्या कुलुपाचं नाव आहे, हिंदुत्त्व. अशी माझी हिंदुत्त्वाच्या मांडणीच्या गरजेची मीमांसा आहे.


आता जर का ज्याप्रमाणे दलितांवर अत्याचार झाले, अन्याय झाले, जर दलितांवर अत्याचार होत असतील, दलितांवर अन्याय होत असतील, तर त्यांनी संघटीत होणं आणि त्या अन्यायाला उत्तर देणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्याचप्रमाणे जर हिंदुंवर हिंदू म्हणून अन्याय होत असतील, अत्याचार होत असतील, पीडा होत असेल, तर त्यांनी हिंदू म्हणून एक होणं, संघटीत होणं आणि त्या अत्याचाराला उत्तर देणं हीही एक नैसर्गिक गोष्ट आहे. आता हिंदुंवर अन्याय होतात की नाही हा कदाचित वादाचा मुद्दा बनू शकेल. पण हिंदुंवर जर अन्याय होत असेल तर त्यांनी एक होणं आणि त्या अन्यायाला उत्तर देणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. आणि हीच हिंदुत्त्वाची मांडणी आहे.






हिंदुंसमोरचं आव्हान इस्लाम आणि ख्रिश्चनिटीचं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात अशा काही घटना घडत आहेत की त्यामुळे हिंदूंनी अतिशय शांत डोक्याने विचार करावा की इस्लाम काय आहे? आपल्या समोर कुठलं कुठलं आक्रमण होतंय? १५ जानेवारी २००६ ला मुंबईमध्ये हज हाउस मध्ये गुलाम हयाबक्ष नावाचा एक इमाम पकडला गेला होता. हज हाउस म्हणेज आपण जी मुसलमानांना सबसिडी देतो ना मक्का मदिनेला जायला, त्याचं ते एक स्टेशन असतं. त्या हज हाउसला जाऊन ते थांबतात, मग पुढे विमानाने मक्का मदिनेला जातात. ते एक त्यांचं धार्मिक केंद्र आहे, म्हणजे आपलं जसं वारकरी भवन असावं तसं. त्या वारकरी भवनामधला इमाम हा एक मोठा धार्मिक अधिकारी असतो. म्हणजे ती काय छोटी मोठी पोस्ट नव्हे. इमाम ही एक वजनाची पोस्ट आहे. तर हा गुलाम हयाबक्ष नावाचा इमाम, १५ जानेवारीच्या सर्व वृत्तपत्रात आहे, पोलिसांनी त्याला पकडलं. इस्लामिक अतिरेक्यांना तो ५०-५० लाख रुपयांच्या देणग्या पाठवीत होता. पोलिसांनी त्याला पकडलं आणि तेव्हाही हिंदूंना कुठे तरी प्रश्न पडायला पाहिजे होता की केवळ सामान्य मुसलमान नव्हे, तर मुसलमानांचा एवढा मोठा धर्मगुरु जर अतितेक्याना मदत करतो आहे, तर हा हज हाउस नेमका प्रकार काय आहे? हा नेमका इस्लाम काय प्रकार आहे? असा प्रश्न त्यावेळी हिंदूंना पडायला हवा होता.
त्यानंतर इमराना प्रकरण बरचं गाजलं. इमराना नावाची एक मुस्लीम स्त्री होती. तिच्यावर तिच्या सासऱ्यानेच बलात्कार केला होता. सासऱ्याने बलात्कार केल्यावर मुल्ला-मौलवी जमले आणि अतिशय तालासुरात सगळ्यांनी सांगितलं की तू आता तुझ्या सासऱ्याला नवरा मान आणि तुझ्या नवऱ्याला मुलगा मान, आणि हा आम्ही आमच्या इस्लामिक धर्मशास्त्रानुसार दिलेला निर्णय आहे. असं मुसलमानांनी, मौला-मौलवींनी उच्चरवाने टीव्हीवर सांगितलं होतं. तेव्हाही हिंदूंना प्रश्न पडायला हवा होता की नेमका हा इस्लाम काय आहे?
त्यानंतर सानिया मिर्झाचं प्रकरण आलं. सानिया मिर्झा, टेनिसपटू. दिसायलाही चांगली आहे, खेळतेही चांगली. तिचं प्रकरण आलं. सगळे मौलवी टीव्हीवर बसून म्हणत होते, टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रम चालले होते, की मुसलमानांच्या बायकांनी तर घरात बसलं पाहिजे, बुरखे घालून. ही सानिया मिर्झा कशी बाहेर पडते? फतवे काढा तिच्यावर. सानिया मिर्झाविरुद्ध फतवा निघू शकतो. फतवा हा इस्लामिक धर्मादेश असतो की हे कृत्य गैरइस्लामिक आहे, म्हणून बाहेर हो. सानिया मिर्झाविरुद्ध फतवा निघू शकतो, टीव्ही चॅनेल्स बघण्याविरुद्ध फतवे निघू शकतात, व्याज घेणे किंवा न घेणे याच्याविरुद्ध फतवे निघू शकतात, मग इस्लामिक दहशतवादाविरुद्ध एकही फतवा का निघाला नाही? याचाही हिंदूंनी शांत डोक्याने विचार करायची वेळ तेव्हा आलेली आहे.





भिवंडी मध्ये ५ जुलै २००६, दोन पोलिसांची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली. जगताप आणि गांगुर्डे अशा नावाचे दोन पोलीस हवालदार होते. या घटनेशी मी नंतर फार जवळून जोडला गेलो. “Centre For Human Rights, Policy Studies and Awareness “  नावाची एक संस्था मुंबईत आहे. या संस्थेतर्फे या पोलीस हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. या समितीचा एक स्वीकृत सदस्य म्हणून मी भिवंडीत जाऊन राहिलो होतो. तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पोलिसांच्या, तिथल्या रझा अकॅडेमीच्या लोकांच्या, मुस्लिमांच्या, सगळ्यांच्याच मुलाखती घेतल्या आहेत आणि त्याचा एक अहवाल आम्ही प्रसिद्ध केला होता. तो अहवाल पेपरमध्ये छापून आला आहे. प्रसिद्ध झाला आहे; मिळतो. त्याठिकाणी त्यावेळचे जे डीसीपी होते, सेनगावकर साहेब नावाचे डीसीपी होते, त्यांनी मला बोलतांना असं सांगितलं, त्याचा व्हिडीओ इंटरव्ह्यू माझ्याकडे आहे, त्याची सीडी मी बनविलेली आहे, तीही अजून उपलब्द्ध आहे, कुठल्या जिज्ञासूला हवी असेल तर त्याला मी देऊ शकतो. तिथल्या डीसीपींनी बोलतांना मला असं सांगितलं की हे जगताप आणि गांगुर्डे माझे दोन पोलीस हवालदार होते, ती फक्त शेवटची घटना होती. त्याआधी रझा अकॅडेमीने मोठं बंड उभारलं होतं की या जागेवर पोलीस स्टेशन बांधायचं नाही. एका विवक्षित स्थळी तिथे पोलीस स्टेशन बांधायचा कार्यक्रम सुरु होता. मुसलमानांनी सांगितलं, बांधायचं नाही, ही आमची जागा आहे. दंगल झाली, दंगल झाल्यावर पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात काही मुस्लीम दगावले. वाईटच झालं. दगावल्यानंतर जगताप आणि गांगुर्डे नावाच्या दोन पोलीस हवालदारांना पकडलं, हे श्री. सेनगावकर साहेबांच्या तोंडची वाक्यं बोलतो आहे हं मी, त्याची व्हिडीओ सीडी आहे माझ्याकडं. डीसीपी सेनगावकर साहेब म्हणतात - जगताप आणि गांगुर्डे नावाच्या दोन पोलिसांना पकडलं, त्यांचे कपडे काढले. मग चेक केलं, त्यांचा धर्म काय आहे. धर्म कळल्यावर २१ फ्रॅक्चर्स; मी तो पोस्टमार्टेम रिपोर्ट पहिला; त्याची कॉपी माझ्याकडे आहे; २१ हाडे तोडली लाथाबुक्क्यांनी. २१ फ्रॅक्चर्स आहेत दोघांमध्ये.  कानावर वार, डोळ्यांवर वार, बोटे तोडली गेली. त्या भिवंडी मध्ये आम्हाला उर्दू पत्रक मिळाली. त्यावेळी त्यांचा अर्थ कळला नाही. पोलिसांनीच दिली पत्रकं. आता आहेत पत्रकं आमच्याकडे. ती पत्रकं सध्या सध्या हल्ली भाषांतरित करून आम्हाला मिळालीत. पत्रकामध्ये कुराणातल्या आयती लिहिलेल्या – आम्ही या काफरांच्या हृदयात दहशत बसवून देऊ. मग आघात करा तुम्ही त्यांच्या मानेवर, आघात करा बोटांच्या पेरापेरांवर. अशा कुराणातल्या आयती लिहून मिळालेली पत्रकं. 



कुराण : ८ वि सुरह , १२ वि आयात 


अशा प्रकारे आमच्या समोर घटना घडत असतांनाही हिंदू समाजाला वाटलं नाही की हा इस्लाम काय आहे. याच्याकडे आपण एकदा डोळे उघडून बघावं. मुस्लिमांची कुठली आंदोलने देशभर चालू आहेत, ह्याच्याकडे आपण डोळे उघडून बघावं. तसं बघावं असं मला वाटतं म्हणून हिंदुत्त्वाची मांडणी मला आवश्यक वाटते.

नरहर कुरुंदकर नावाचे एक समाजवादी विचारवंत होऊन गेले. १९६८ साली डिसेंबर महिन्यात नांदेडला, महाराष्ट्रात त्यांची एक सभा होती. सभा कोणासमोर? जमाते इस्लामीच्या मुसलमानांसमोर. जमाते इस्लामी ही मुसलमानांना त्यांच्या मूलतत्त्ववादाकडे नेणारी संघटना आहे. तर या जमाते इस्लामीने नरहर कुरुन्दकरांना तिथे भाषणाला बोलवलेलं होत. नरहर कुरुंदकर म्हणजे समाजवादी. आता समाजवादी म्हणजे हिंदूंचे दुश्मन, असं मुसलमानांचं मत होतं. त्यामुळे ते आता आपल्याच बाजूने काहीतरी बोलणार, असं म्हणून त्या ज्येष्ठ समाजवादी विचारवंताला, नरहर कुरुंदकरांना १९६८ साली नांदेडला बोलवलेलं होतं. त्या ठिकाणी नरहर कुरुंदकर काय म्हणाले ते त्यांच्या ‘शिवरात्र’ नावाच्या पुस्तकात भाषण प्रिंट झालेलं आहे. ते भाषण असं आहे – सगळा मुसलमानांचाच जमाव होता, हजारो मुसलमान तेथे जमलेले. एकच नरहर कुरुंदकर ह गैरमुसलमान. मी त्यांना हिंदू म्हणणार नाही. ते समाजवादी होते, त्यामुळे त्यांना धर्मच नव्हता. तिथे नरहर कुरुंदकर उभे होते. त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात अशीच केली – 








मुसलमानांना आवाहन करतांना नरहर कुरुंदकर अस म्हटले, - हे मुसलमानहो, मी मुसलमान नाही; मी हिंदूही नाही. पण मी मुसलमान नाही; हिंदूही नाही म्हणजे माझी कुठल्याच धर्मावर श्रद्धा नाही. मी मुसलमान नाही हे तुम्ही मान्य केलं. पण माझा मुसलमान नसण्याचा हक्क तुम्हाला मान्य आहे का हे मला सांगा.’ नरहर कुरुंदकर त्या भाषणात म्हणतात, ‘मी बोलतो तेवढी ही गोष्ट सोपी नाहीये. जगात चोर असतात हे मान्य करणं वेगळं, पण चोरांचा चोर म्हणून जगायचा हक्क मान्य करणं वेगळी गोष्ट आहे. मी मुसलमान नाही हे तुम्हाला माहीतच आहे. पण मी मुसलमान नाही असा माझा मुस्लीम नसण्याचा हक्क माझ्याकडे आहे का? हे मला सांगा. एवढी सोपी गोष्ट नाही. मी मुसलमान नाही, म्हणजे अल्लाह हा एकमेव देव आहे हे मी मनात नाही. कुठलाही देव मानण्याचं, न मानण्याचं स्वातंत्र्य माझ्याजवळ आहे. अल्लाह हा एकमेव देव आहे हे मी मनत नाही. हे तुमच्या नमाजातलं रोजचं वाक्य आहे – ‘या इलाही इलिल्लाही मुहम्मद रसुलील्लाही, अल्लाह हा एकमेव देव आहे, सर्वश्रेष्ठ, आणि त्याचे प्रेषित मुहम्मद पैगंबर साहेब आहेत’  हे वाक्य मी मानत नाही. अल्लाहचा एकमेव प्रेषित म्हणजे मुहम्मद पैगंबर साहेब आहेत, हे मी मानत नाही. एवढ सोपं नाही. ज्याला इमान म्हणता, त्या पाच गोष्टींवर इस्लामनुसार श्रद्धा ठेवावी लागते – सर्वश्रेष्ठ अल्लाह, अल्लाहचे देवदूत, देवदूतांनी मुहम्मद पैगंबरांना सांगितलेले कुराण, पैगंबर साहेब आणि अंतिम निर्णय दिन. हे इस्लामचे पाच आधार आहेत, ते मी मानत नाही. मी मानत नाही, एवढं तुम्हाला मान्य असणं ठीक आहे. पण असं मान्य असण्याचा माझा अधिकार तुम्हाला मान्य आहे का? हे तुम्ही मला सांगा.’ या प्रश्नाचं उत्तर नरहर कुरुंदकरांना माहित होतं. या प्रश्नाचं उत्तर ते ज्यांच्या समोर बोलत होते त्या मुस्लीम श्रोतृ समाजालाही माहित होतं. पण त्या प्रश्नाचं उत्तर हिंदू समाजाला माहित नाही. मुसलमान नसणे ही एक गोष्ट, मुस्लीम नसण्याचा अधिकार आपला, मान्य करतात का मुसलमान ही दुसरी गोष्ट.


नरहर कुरुंदकर त्यांच्या पुढच्या भाषणात म्हणतात – समाजवादी विचारवंत आहेत, त्यांचं ते पुस्तकही मी आणलं आहे, जिज्ञासूंना मी दाखवू शकतो. नरहर कुरुंदकर म्हणतात – ‘मी मुसलमान नाही, मी तुमचा धर्म मानत नाही. जो काफिर आहे तो नरकात जाणार ही तुमची श्रद्धा मी मानत नाही. अशी श्रद्धा मान्य करण्याचा माझा अधिकार मुस्लीम देशात मला नाही. नाही म्हणजे काय, मी जर असं म्हटलो तर माझं डोकं फोडण्याचा अधिकार तेथील राजसत्तेनेच मुसलमानांना दिला आहे, पाकिस्तानात दिला आहे, बंगला देशात दिला आहे, अजून सौदी अरेबिया वगैरे सर्व मुस्लीम देशात दिलेला आहे. आणि थे जर मी असं बोललो तर माझं डोकं फोडण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारता. आम्ही डोक्याला कफन बांधूनच फिरतो असं तुम्ही म्हणता. त्यामुळे तुमच्याशी या विषयावर बोलण्यात काही अर्थ आहे का?’ अशा प्रकारचा प्रश्न मुसलमानांना कुरुंदकरांनी विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर मुसलमानांना माहित होतं, हिंदूंना माहित नाही ही माझी खंत आहे. इस्लामनुसार या अल्लाहच्या पृथ्वीवर जगण्याचं स्वातंत्र्य हिंदूंना नाही. नाही म्हणजे, तुम्ही आता जगतायत. तुम्ही जगतायत हे मान्य करणं वेगळं, पण जगण्याचा अधिकार मान्य करणं वेगळं. इस्लामनुसार जो मनुष्य इस्लामच्या पाच तत्त्वांवर श्रद्धा ठेवत नाही, रोजा, नमाज, जकात करत नाही त्याला निश्चितपणे नरक आहे. धर्माचं स्वातंत्र्य असणं वेगळं, की स्वातंत्र्य आहे तुला, पण नंतर नरक आहे, ही शिक्षाही तुमच्या स्वातंत्र्यात  समाविष्ट आहे. चोरी करायचं स्वातंत्र्य आहे, पण चोरी केल्यानंतर तुम्हाला कायदा जी शिक्षा देईल ती त्या स्वातंत्र्याचंच अनुकृत्य आहे. तसचं इस्लाम धर्मानुसार मुसलमान न राहण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु जर तुम्ही मुसलमान नसाल तर तुम्हाला नरकात ज्या काही शिक्षा मिळतील, अंगावर उकळतं तेल टाकलं जाईल, त्याचे जबाबदार तुम्ही स्वतःच. कुराणातल्या आयती आहेत! अशा प्रकारच्या इस्लामचं आव्हान आपल्या तोंडासमोर उभं आहे.


आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी सद्दाम हुसेनला ठार मारल्यानंतर बंगलोर मध्ये मोठी दंगल झाली. बंगलोर मध्ये जी दंगल झाली त्या दंगली मध्ये भारतात वाहनांची नासधूस तोडफोड करण्यात आली. आता तसं म्हणता आमचं काही देणं घेणं नव्हतं. तिथे अमेरिकेने सद्दाम हुसेनला मारलं. त्यात भारत सरकार सहभागी नव्हतं, इथले हिंदू सहभागी नव्हते. पण मी कधी एक इंग्रजी गोष्ट वाचली होती – पंचिंग बॅग. एका कारखानदाराने ----- आपल्या घराबाहेर  पंचिंग बग ठेवल्या होत्या. कामगार चिडले की जाऊन त्या पंचिंग बगला मारायचं. मग थोडा राग कमी होईल. त्या मालकावर जो राग आलेला असेल त्या कामगारांना, तो त्या पंचिंग बगवर ते कामगार काढत असत. या हिंदूंची पंचिंग बग झाली आहे. मुसलमानांना कुणाचाही राग आला की इथे तोडफोड करायची. काय संबंध होता इराक इराणमध्ये युद्ध चालू आहे आणि भारतात तोडफोड करण्याचा? 

ही जी मुस्लीम एकता आहे, हा जो जागतिक-विश्व-मुस्लीम बंधुभाव आहे, त्याला इस्लाममध्ये उम्मा म्हणजे इस्लामिक बंधुत्त्व असं म्हणतात.



या उम्माविषयी बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर , पुरोगामी विचारवंत, त्यांना हिंदू धर्माविषयी काहीही प्रेम नाही, त्यांना इस्लामविषयी बिलकुल राग नाही, त्यांना मुसलमानांची बिलकुल चीड नाही, ते डॉ. आंबेडकर, याची तटस्थ समीक्षा करतांना ‘Pakistan OR Partition of India’  या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात पान नं २९४ ते २९६ वर असं म्हणतात, ‘सारं जग, या साऱ्या जगाची वाटणी इस्लामने दोन भागात केली आहे – दार-उल-हरब आणि दार-उल-इस्लाम. दार-उल-हरब म्हणजे War land, युद्धभूमी. दार-उल-इस्लाम म्हणजे शांतता-भूमी, Islamic Peace.  इस्लाम म्हणजे शांतता.’ जो मुस्लीम होईल त्याच्यासाठी शांतता, जो गैरमुसलमान आहे, मुसलमान नाही, जो श्रद्धाहीन    काफर आहे, त्या काफरांचं मृत्यूनंतरचं स्थान निश्चितपणे नरक आहे, याच्यात कुठलाही वाद नाही. कुठल्याही मुस्लीम धर्म पंडितला जाऊन विचारा- काफरांना मृत्युनंतर काय? आम्हाला मृत्युनंतर काय? अतिशय उघडपणे तुम्हाला सांगतील- तुम्हाला मृत्युनंतर उकळत्या तेलाचा अग्नी आहे. बघा आता विचार करा. सत्यधर्म एकच आहे, तो अल्लाहने पाठविलेला आहे, अल्लाहने त्याच्या प्रेषितांना जगातल्या एकमेव सत्यधर्मासह  पाठविलेला आहे. तो सत्यधर्म पाठविल्यामुळे अनेकेश्वरवाद्यांना, मर्तीपूजकांना कितीही वाईट वाटलं तरी काही हरकत नाही, अशा कुराणातल्या आयती आहेत. इस्लाम हे तुमच्या समोरचं आव्हान आहे. ते आव्हान हिंदुत्त्ववाद्यांना, हिंदूंना अजूनही नीटपणे समजलेलं नाही.  







आत्ताच एक सच्छर कमिटीचा अहवाल प्रसिद्ध झाला. मुस्लिमांचं ठीक आहे, ते त्यांचा धर्म पळताहेत. त्या सच्छर कमिटीच्या अहवालामध्ये तीन भाग आहेत. पहिला भाग- त्यांनी मुसलमानांचे इंटरव्ह्यू घेतलेत की, मुसलमानांच्या मागण्या काय आहेत. दुसरा भाग- सांख्यिकी डाटा आहे सगळा. आणि तिसऱ्या भागात त्यांनी काही शिफारसी केल्यात की, मुस्लीम हितासाठी काय करायला पाहिजे. पहिला जो भाग आहे, त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या मागण्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये मुस्लिमांची एक लक्षणीय मागणी आहे, एकमुखाने केलेली मागणी आहे – ते असं म्हणतात की जे मुस्लीमबहुल भाग आहेत, त्या मुस्लीमबहुल भागामधला एस. सी., एस. टी. चा कोटा काढून टाका. म्हणजे ज्या भागात मुसलमान बहुसंख्य असतात, त्या भागात ज्या राखीव जागा निवडणुकीत लावलेल्या आहेत, त्या काढून टाका. नाहीतर आम्हाला हिंदू उमेदवारांना निवडून द्यावं लागतं. दलित-मुस्लीम भाई-भाईच्या घोषणा एकीकडे द्यायच्या, दुसरीकडे त्यांना उमेदवार मात्र मुसलमान पाहिजे. हे मुस्लीम मन कशातून बनलं आहे, याचा आपण एकदा विचार करायची वेळ आहे. दुसरा भाग सांख्यिकीचा आहे. संख्याशास्त्रीय माहिती. त्या संख्याशास्त्रीय माहितीमध्ये त्यांनी सगळी आकडेवारी दिलेली आहे की मग किती टक्के शिक्षण आहे, किती टक्के रोजगार आहे, किती टक्के नोकऱ्या आहेत. या सगळ्या संख्याशास्त्रीय माहितीमध्ये एक कोटी बंगलादेशी included  आहेत. म्हणजे बंगला देश मधल्या सरकारच्या नतद्रष्टेपणामुळे बंगला देशमधले मुसलमान दरिद्री आहेत, ते भारतात येतात, आणि ते भारतात आल्यावर ते का दरिद्री आहेत याच्यासाठी हिंदूंनी सहन करायचं आहे. हिंदूंनी त्यांच्यासाठी आपले हक्क सोडायचे आहेत. तिसरा भाग शिफारसींचा आहे. शिफारसींमध्ये असं म्हणतात, मुळात हा संख्याशास्त्रीय डाटाच चुकलेला आहेत. एक कोटी बांगला देशींसकट संख्याशास्त्रीय Statistical Analysis झालेलं आहे. तिसरा भाग कर्जांचा आहे. Economical and Political Weekly नावाचं एक मासिक असतं. त्याच्या गेल्या अंकामध्ये ही सारी माहिती आलेली आहे. तिसरा भाग कर्जांचा, त्यांच्या शिफारसींचा आहे. शिफारस अशी आहे की मुसलमानांना बँका कर्ज देत नाहीत, तेव्हा त्यांना कर्ज मिळवून द्या. अशा प्रकारे मुसलमानांना कर्ज दिली पाहिजेत, म्हणून एक शिफारस करण्यात आली आहे. बँका मुसलमानांना का कर्ज देत नसतील? बँकांचा उद्देश सरळ असतो. बँका काही जातीयवादी वगैरे नसतात. जो कर्ज फेडतो त्याला बँका कर्ज देतात.  मुसलमानांकडून कर्ज वसूल करण्याची हिम्मत नसल्यामुळे बँका पैसे देत नाही, मुसलमानांना कर्ज देत नाहीत. ह्याचा भार हिंदुंवरच पडणार आहे, जर का सक्ती केली गेली बँकांना. वसुली झाली नाही, तर भार कोणी सोसायचा तो? म्हणजे वाढेल ते व्याज कोणी सोसायचं? ते हिंदूंनी सोसायचं! म्हणजे त्या औरंगजेबाच्या काळामध्ये जिझिया लावला होता, की तुम्ही हिंदू आहात, आणि हिंदू असणं हे एक पाप आहे, महापाप आहे, तुम्ही काफर आहात, आणि काफर असल्यामुळे इस्लामी राजसत्तेला जिझिया द्या. अशा प्रकारचा जिझिया स्वतंत्र भारतातही आपल्यावर थोड्या फार फरकाने लादला जातो आहे. म्हणून हिंदुत्त्वाची मांडणी आवश्यक आहे, असं मला वाटतं.




मी एक कुत्रं पाळलं आहे. नाव आहे मिनिमी. अतिशय छोटं कुत्रं आहे. ल्हासा अक्सो जातीचं कुत्रं आहे. (२२.५२) त्याचे फार केस असतात, म्हणजे शेडा कुठला, बुडखा कुठला ते कळत नाही. डोळ्यांवर केस येतात, मागनं केस येतात. आणि मग ते त्याला भुंकायचं जरी असलं तरी त्याला दिसत नाही. मग ते असं डोकं वर करतं आणि करतं - भू. छोटसं कुत्रं, अकरा इंच. मी घरी आलो की ते अकरा इंचाचं कुत्रं नाचत, पळत येतं, कंबर हलवत येतं. आणि अशी ती माझ्या माझ्यासमोर शेपूट हलवते. लांगुलचालन या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे, शेपूट हलविणे. लांगुल म्हणजे शेपूट, आणि चालन म्हणजे हलविणे. मी पाच फूट अकरा इंच, ही मिनिमी अकरा इंचाची. तिला मी रोज खायला प्यायला देतो, ती माझ्यासमोर लांगुलचालन करते, मी समजू शकतो. पण ऐशी कोटीचा हिंदू समाज १२ -१३ टक्के मुसलमानांसमोर कसं लांगुलचालन करतो, हे कसं समजणार? हे कसं समजून घेणार? हे समजून घ्यायचा एक प्रयत्न व्हावा म्हणून मला हिंदुत्त्व विचारांची मांडणी आवश्यक आहे असं वाटतं. हिंदूंचे स्वतःचे म्हणून काही प्रश्न आहेत. ख्रिश्चन Conversion चा प्रश्न. आता इथे दापोडीमध्ये लाखालाखाच्या सभा भरताहेत. येशूचं पाणी वाटून, त्याचं व्हिडीओ शूटिंग घेतलेलं आहे आम्ही, येशूचं पाणी प्या सगळे रोग बरे होतील; येशूचं पाणी प्या आंधळ्याला डोळे येतील; लंगडा चलने लगेगा. माईक वरून सांगितलं जातं. आणि या अंधश्रद्धा पसरवून लाख लोकांच्या सभा दापोडी-बोपोडी कडे होतायत. हे हिंदू समाजावरचं आक्रमण आहे. आणि हे आक्रमण हिंदू समाजासमोर असल्यामुळे - प्रामुख्याने ते इस्लाम आणि ख्रिश्चनिटीचं आहे, ते अंधश्रद्धांच्या जोरावर आहे. तर भारतात मुस्लीम आणि ख्रिश्चन हे सोडून जे इतर भारतीय आहेत, त्यांना मी हिंदू असं म्हणतो. जे काफर आहेत त्यांना मी हिंदू असं म्हणतो. जे हिदन आहेत, त्यांना मी हिंदू असं म्हणतो. सावरकरही त्यांनाच हिंदू म्हणतात. एका चलाख व्याख्येत सावरकर म्हणतात, आसिंधुसिंधूपर्यंता, यस्य भारत भूमिका । पितृभूः पुण्यभूश्चैव स वै ‘हिंदु’रिति स्मृतः ।।  म्हणजे ज्याची पितृभूमी आणि मुख्यतः पुण्यभूमी किंवा Holy Land, त्यांची मंदिरे, गुरुद्वारा, बुद्धाची गया, जैनांची मंदिरे ही सगळी भारतापुरतीच आहेत, बाहेर नाहीत इस्लामसारख्या श्रद्धा. हे सगळे हिंदू आहेत. मी त्यांना हिंदू म्हणतो, सावरकर त्यांना हिंदू म्हणतात. प्रश्न असा आहे, ते स्वतःला हिंदू म्हणतात का? भाषणाचा पहिला भाग मी इथे संपवतो. heहिंदुत्त्वाच्या मांडणीची गरज काय आहे हा भाग मी इथे संपवतो.







भाग २प्रस्थापित हिंदूत्त्वाची मांडणी








भाषणाच्या दुसऱ्या भागाकडे येऊ. भाषणाचा दुसरा भाग आहे – प्रस्थापित हिंदूत्त्वाची मांडणी. हिंदुत्त्वाची प्रस्थापित मांडणी काय आहे? आता हिंदुत्त्ववादी लोक काय बोलतात हा दुसरा भाग आहे. पहिला भाग मी एका प्रश्नाने संपवला होता, मी त्यांना हिंदू म्हणतो, ते स्वतःला हिंदू म्हणतात का? उत्तर आहे – नाही. हिंदू या शब्दाविषयी, हिंदूंच्याच मनात अतिशय चीड आहे, राग आहे. पहिला भाग हिंदुत्त्व ज्यांना आवडला होता, दुसरा भाग त्यांना अजिबात आवडणार नाही. हिंदू स्वतःला हिंदू म्हणत नाहीत. कारण काय? हिंदू या शब्दाविषयी हिंदूंच्याच मनात इतका राग का? याचा शांत डोक्याने विचार करायची वेळ आहे.


आंबेडकर म्हणाले होते, हिंदू म्हणजे काय – तर किराण्याचं दुकान. किराण्याच्या दुकानात आपण गेलो; कांदे मागितले कांदे मिळतील; बटाटे मागितले बटाटे मिळतील; तांदूळ मागितले तांदूळ मिळतील; दूध मागितलं दूध मिळेल; ब्रेड मागितला ब्रेड मिळेल. किराणा मागून बघा; किराणा मिळणार नाही. किराण्याच्या दुकानात किराणा सोडून सगळं मिळतंय. हिंदूंच्या बाजारात हिंदू सोडून सगळं मिळतंय. मराठे आहेत, ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, दलित आहेत, द्रविड आहेत, उत्तर प्रदेशी आहेत, त्यांचे त्यांचे संघ आहेत. कन्नडचा भाषावाद आहे, मराठीचा भाषावाद आहे, आंध्र प्रदेशची तेलंगण समिती आहे, एकमेकांचं किराण्याचं दुकान आहे. हिंदू सोडून प्रत्येक गोष्ट या दुकानात मिळते, याचं कारण काय? ह्याला जबाबदार कोण? आणि या प्रश्नावरचं माझं उत्तर असं आहे की ह्याला प्रस्थापित हिंदुत्त्ववादीच जबाबदार आहेत. 



एक चूक हिंदुत्त्ववाद्यांकडून कायम केली जाते. जर का मुसलमानांचा इस्लाम आहे, तर मग आमचाही हिंदू धर्म आहे. ते कुराण घेऊन येतात; मग आम्ही पण काहीतरी घेऊनच जायला पाहिजे. मग कधी गीता शोधली जाते, कधी मनुस्मृती शोधली जाते, कधी वेद शोधले जातात किंवा अजून कुठलं तरी धर्मग्रंथाचं पुस्तक शोधलं जातं. आणि जर त्यांचा इस्लाम असेल तर मग आमच्या हिंदू धर्म की जय! ही घोषणा एवढ्यावरच थांबत नाही. ही घोषणा थोडी आणखी पुढे जाते, आणि ती घोषणा अशी बनते – आर्य, सनातन, हिंदू धर्म की जय! माझं असं मत आहे, की हिंदूंच्या विघटनाला आणि हिंदूंच्या किराणा बाजाराच्या दुकानाला या घोषणा कारणीभूत आहेत. आर्य, सनातन, वैदिक हिंदू धर्म की जय, म्हणजे काय? आर्य या शब्दासरशी किती लोकांचा विरोध आहे? पूर्ण द्रविड, खालची चळवळ घ्या. पूर्ण तमिळनाडूमध्ये रामास्वामी पेरियारनी एवढी मोठी जी दलित चळवळ उभारली ती फक्त आर्य या शब्दाच्या विरोधात उभारली.  जर तुम्ही आर्य सनातन वैदिक केलं, तर तामिळनाडू गेला. तिथं हिंदुत्त्ववादी कधीही पाय मारू शकत नाहीत. अर्थ तुम्ही काहीही काढा, त्यांना तो कधीही मान्य होणार नाही. तुम्ही आर्य म्हणजे संस्कृती आहे म्हणा, कृण्वन्तो विश्वमार्यं म्हणा, काहीही म्हणा; ते द्रविडांना कधीही मान्य होऊ शकत नाही. द्रविड चळवळीला कधीही मान्य होऊ शकत नाही. त्यांची तशी मानसिकताच बनलेली आहे. सनातन म्हटल की मग जैनांचं काय? बौद्धांचं काय? शिखांचं काय? ते तुमच्या सनातन धर्माचे कधीच नव्हते, त्यामुळे तुमच्या सनातन या एकाच शब्दासरशी जैन, बौद्ध, शीख हिंदूंच्या चळवळीतून तुटून पडतात. पहिल्या आर्य शब्दाने द्रविड जातात; सनातन शब्दाने जैन, बौद्ध, शीख जातात. वैदिक म्हटलं की मोठीच भानगड. 


लोकमान्य टिळकांचाच फोटो लावलेला आहे; ते वंदनीय आहेत; पण अनुकरणीय असलेच पाहिजेत असं काही नाही. लोकमान्य टिळकांनी हिंदूची व्याख्या करतांना – साधनानां अनेकता; परत प्रामाण्य वेदांपाशी जे असेल, प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु; अशी केलेली होती. परत ९८% हिंदूंनी वेद कधी पाहिलेले नाहीत. ९९% लोकांनी ते कधीही वाचलेले नाहीत. ९९.९९% लोकांना वेद हा आपला धर्मग्रंथ आहे हेच माहित नाही. अशा वेळी वैदिक या शब्दाच्या उच्च घोष णाबाजिने काय होतं?  ज्या ज्या वैदिक स्कूल आहेत; इथे घैसास वैदिक स्कूल आहे, बऱ्याच वैदिक पाठशाळा आहेत; तिथे ब्राह्मण सोडून बाकी कुठल्याही जातीला प्रवेश नाही. एखादा दुसरा तुरळक अपवाद सोडून द्या.  In general पूर्ण भारतात ही वैदिक या शब्दाची अवस्था आहे. वैदिक म्हटलं की ९९.९९% हिंदूं यातून बाहेर गेलेल आहेत. 


आर्य सनातन वैदिक हिंदुधर्म की जय; ही हिंदूंच्या विघटनाची घोषणा आहे. ही हिंदूंना तोडणारी घोषणा आहे. हिंदूंना जोडणारी घोषणा नाही. आणि आजच्या हिंदुत्त्वाची सगळी मांडणी अशाच प्रकारे प्रतिगामी आहे, अशाच प्रकारे मध्ययुगीन आहे. त्यामुळे हिंदुस्थानात हिंदुत्त्ववादीच अल्पसंख्यांक आहेत. बाकी कुठल्याही दशात हे शक्य नाही. हिंदुत्त्ववाद्यांच्या पराभूत, मध्ययुगीन, प्रतिगामी मानसिकतेमुळे हिंदुस्थानात हिंदुत्त्ववादी अल्पसंख्यांक आहेत. हिंदू बहुसंख्य आहेत; हिंदू ८०% आहेत; पण हिंदुत्त्ववाद्यांचं सरकार कुठेही बसू शकत नाही. ते हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर तर बसूच शकत नाही. फार तर माधवा सारखी वेगळ्या जातीपातींची मोट -------- बांधून उभारता येईल. किंवा वेगळ्या प्रादेशिक अस्मितेवर उभारता येईल. हिंदू म्हणून हिंदुस्थानात हिंदूंचं सरकार बसूच शकत नाही; ही वास्तविकता आहे. हिंदुत्त्ववादी अल्पसंख्यांक आहेत; कारण हिंदुत्त्वाची मांडणी चुकलेली आहे. हिंदुत्त्वाची मांडणी कशी चुकलेली आहे; हे आपण थोडक्यात बघू आणि मग हिंदुत्त्वाच्या फेरमांडणीकडे वळू.


आताच मुस्लिमांची लोकसंख्या वाढते आहे, वाढते आहे, म्हणून बराच गाजावाजा करण्यात आला. मुस्लिमांची लोकसंख्या वाढते आहे, हे एक सत्य आहे. आणि हिंदूंपेक्षा जास्त वेगाने वाढते आहे हेही एक सत्य आहे. ती काही भागांमध्ये अधिक  Concentrated आहे, हेही एक सत्य आहे. ह्याच्यावर उत्तर काय दिले आहे? बरं म्हणजे जे धोके पुढचे दाखविले गेले, की एक ५०-६० वर्षात अखंड भारतात म्हणजे भारत, पाकिस्तान, बंगला देश धरून; मुस्लीम बहुसंख्य होतील. किंवा अडीचशे तीनशे वर्षांनी आताच्याच भारतात मुस्लीम बहुसंख्य होण्याचा धोका आहे. अडीचशे तीनशे जाऊ दे. पण काही जिल्ह्यांमध्ये मुस्लीम लोकसंख्य वाढते आहे. आणि तिथे फाळणीची मागणी जोर धरू शकते. आताच गिलानीचं पाहिलं आपण; तलवारी घेऊनच निघाला होता, टीव्हीवर. तर अशी भीती घातली गेली, ठीक आहे. ह्याच्यावर हिंदुत्त्ववाद्यांचं उत्तर काय होतं? हिंदुत्त्ववादी म्हटले, तुम्ही पण लोकसंख्या वाढवा. म्हणजे मुसलमान चुका करताहेत्त, ते गटारात खेळताहेत, चिखलात उड्या मारताहेत. मग गटारात खेळण्याचा हक्क दोघांचा. ते गटारात उड्या मारताहेत मग आम्हीही गटारात उड्या मारणार. ते त्यांची लोकसंख्या वाढवताहेत; मग आम्हीही लोकसंख्या वाढवणार. ते चुका करताहेत मग आम्हीही चुका करणार. म्हणजे चुका करायचा हक्क दोघांचा. अशी हिंदुत्त्वाची मांडणी आहे. सरसकट सर्व हिंदुत्त्ववाद्यांची ही भूमिका आहे.






काय होईल हिंदूंची लोकसंख्या वाढवून? बरं हे practical तरी आहे का? एकीकडे ब्रह्मचर्याचं स्तोम करायचं. दुसरीकडे म्हणायचं लोकसंख्या पण वाढवा. कसं शक्य आहे दोन्ही एकावेळी? लोकसंख्या वाढवून हिंदूंसमोरचे कुठले प्रश्न सुटणार आहेत? आताच आपल्या पुणेकरांना अनुभव असेल; भारनियमनाने बेजार आहेत. एक वर्षापूर्वी माझ्या घरून इथे यायला दहा मिनिटे लागायची, आज वीस मिनिटे लागताहेत. रस्ते पुरत नाहीत वाहनांना. वीज इथल्या माणसांना पुरत नाहीये. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सुविधा आज आपल्या देशाकडे अपुऱ्या पडताहेत याच लोकसंख्येला. जर अशीच लोकसंख्या वाढवली; तर काहीच मिळणार नाही; वाढलेले हिंदू एकमेकातच लढून मरतील, वीज आणि पाण्यासाठी ! Quality नको तर quantity तरी असेल; ती quantity काय करायची आहे?  ती सगळी quantity अंतर्गतच लढेल. यादव्या माजतील; बेरोजगारीत. अशा प्रकारची भूमिका हिंदुत्त्ववाद्यांकडून घेतली जाते.


शंकराचार्यांचं प्रकरण झालं. शंकराचार्यांच्या वेळी, जर ते निर्दोष असतील तर सुटलेच पाहिजेत; प्रश्नच नाही. प्रश्न न्यायालयाचा होता. ते आमचे शंकराचार्य आहेत, म्हणजे काहीतरी महान आहेत कायद्यापेक्षा; त्यामुळे त्यांना सोडा; मग उद्या मुसलमानांनी जर त्यांच्या इमामाला सोडा अशी मागणी केली तर तुम्ही त्याला कोणत्या बेसवर विरोध करणार आहात? अशा प्रकारच्या प्रतिगामी मागण्या, म्हणजे मुसलमान ज्या चुका करतात, त्या चुका आम्ही पण करणार; मुसलमान जो मूर्खपणा करतात, तो मूर्खपणा आम्ही पण करणार; अशा प्रकारची मांडणी हिंदूंच्या प्रमुखांकडून होत असत. मंदिर अधिग्रहण  कायद्याचं हेच झालं. त्यामध्ये मशिदी आणि चर्चेस आले पाहिजेत, हे एकदम बरोबर. पण मंदिरे अधिग्रहण न करून काय होणार आहे? ही मंदिरे हिंदूंचे कोणते प्रश्न सोडवताहेत? मस्त  झाल्या यांच्याकडे पालख्या. सोन्याच्या रथातून शंकराचार्य फिरतात. शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचं सिंहासन देत होते. कुठली सामाजिक अशी कामं केली आहेत ह्यांनी? जर का ते सरकार दरबारी गेलं, तर असं काही नाही की त्याचा सदुपयोग होईल. पण एक शक्यता तर राहते ना की काहीतरी परिस्थितीत बदल होऊ शकेल. म्हणजे मुस्लिमांची का नाहीत? मग आमचीही करू नका, आणि त्यांचीही करू नका. अशा प्रकारच्या भूमिका या प्रतिगामी आहेत, त्या इतर लोक चुका करतात, म्हणून आम्हीही करणार अशा प्रकारच्या आहेत. अशा प्रकारची भूमिका हिंदुत्त्ववाद्यांकडून घेतली जाते.


अगदी recent, शेवटचं. काल बालगंधर्व कलामंदिरामध्ये एक अतिशय सुदर प्रदर्शन भरलेलं होतं. हे प्रदर्शन काश्मिरी पंडितांच्या डॉ. शृंगु यांनी भरवलेलं होतं. काश्मिरी पंडितांचे किती हाल झाले, त्यांना किती छळ सोसावा लागला, त्यांना कशा प्रकारे विस्थापित करण्यात आलं, कशाप्रकारे त्यांच्याविरुद्ध भावना भडकविण्यासाठी काश्मिरात जिहादी पोस्टर्स लागलीत, कशा प्रकारे त्यांना कॉर्नर करून काश्मीरमधून हाकलून दिलं गेलं, ह्याचं सगळ्याचं सचित्र प्रदर्शन तिथे मांडलेलं होतं. आता संपलं, काल शेवटचा दिवस होता. ते सगळं प्रदर्शन फिरून आलो की मग सगळ्यात शेवटचा स्टल, तो सगळ्यात छान होता. तो शेवटचा स्टल होता हिंदू जनजागृती समितीचा. पुस्तकं होती - श्राद्ध कसे करावे, हात कसे जोडावेत, पूजा कशी करावी, मंत्र-जपजाप्य-होमहवन हे कसं करावं; अशा प्रकारच्या पुस्तकांचा स्टल सगळ्यात शेवटी. म्हणजे हिंदूंनी हे सगळं बघायचं, मग शेवटी काय करायचं – श्राद्ध. दुसरं करणार तरी काय? श्राद्धच घालायला पाहिजे मेलेल्यांचं. एक सनातन धर्माचे सद्गृहस्थ, माझ्याकडे आले, त्यांचा पेपरही घेतो मी कधी कधी. मधली दोन पानं भूत बोलत असतं, देव बोलत, शिवाजी महाराज बोलतात, स्वर्गातून. सावरकर स्वर्गातून बोलतात ह्यांच्याशी, पेपरमध्ये छापतात. काय हिंदू हित होणार आहे? हिंदुंचं काय भलं होणर आहे? कुठला शहाणपणा हिंदूंना ----- शिकायला मिळणार आहे? आणि हिंदूंच्या कुठल्या म्हणजे बाहेरच्या अन्यायांचं परिमार्जन होणार आहे? अशा प्रकारे हिंदुत्त्वाची मांडणी आहे. 







आणि मी काय म्हणतो, फक्त गाढवपणाबद्दल बोलत नाही; माझा आक्षेप हिंदूंच्या सनातन धर्मावरच आहे, वेदांवर आहे, मनुस्मृतीवर आहे. वेदांमध्ये पुरुषसुक्त आहे, त्यात विषमता आहे. ‘ब्राह्मणोsस्य मुखमासीत, बाहुराजन्य कृतः; आणि शेवटी पदाभ्यां शूद्रोsजायत. ही बेसिक विषमता आहे. याचं तुम्ही कुठेही समर्थन करू शकत नाहीत. मग नाही, देवाच्या मूर्तीला पायालाच हात लावतो ना. मग तसं राष्ट्रपुरुषाच्या पायाशी कधी काही भेद नाही, एक दोन दिवस ब्राह्मणाला पायाशी ठेवा, मग आम्ही मानू. अशा प्रकारची विषमता ही ऋग्वेदातल्या दहाव्या मंडलातल्या १२ व्या ऋचेत आहे. मनुस्मृतीत आहे. मनुस्मृतीतला आठवा अध्याय वाचून बघा; जिकडे तिकडे मनूचं समर्थन करण्याची ज्यांना हौस येते. सगळी विषमता आहे. कोण कुणाला कशी शिक्षा द्यावी; ब्राह्मणाच्या शेजारी शद्र बसला तर त्याच्या कमरेला डाग द्या - अध्याय ८-२८०. हा सनातन धर्म आहे. श्रुती-स्मृती पुराणोक्त हाच सनातन धर्म आहे. आणि माझा बेसिक आक्षेपच त्याच्यावर आहे. त्या धर्माचा जयजयकार करून हिंदू कधीही संघटीत होऊ शकत नाहीत. हिंदूंना काहीही उत्तरं मिळू शकत नाहीत. आणि नेमकी अशाच प्रकारची सनातनी मागणी हिंदुत्त्ववाद्यांकडून केली जाते. अशाच प्रकारच्या प्रतिगामी भूमिका हिंदुत्त्ववाद्यांकडून घेतल्या जातात. त्यामुळे हिंदुस्थानात हिंदुत्त्ववादी अल्पसंख्यांक आहेत. त्यामुळे हिंदुस्थानात हिंदुत्त्ववादी कधीही सत्ता कमवू शकले नाहीत, मिळवू शकले नाहीत. आणि ते ठीक आहे, सगळं जे आहे ते आहे. सावरकर म्हणतातच – वंदनीय, पूजनीय, आदरणीय; पण अनुकरणीय नाही; आचरणीय नाही.






 पण आता करतोय काय आपण? राजस्थानमधल्या विधानसभेत भाजपने मनूचा पुतळा बांधलेला आहे. सरसंघचालकांची स्टेटमेंटस् – जातीव्यवस्थेतच आरक्षण आहे. कसली आरक्षणं? काय, गावकुसाबाहेर रहायची? विहिरीवर पाणी न भरायची? का सवर्णांची विष्ठा डोक्यावर उचलून न्यायची? कसली, आरक्षणं कसली आहेत? जातीव्यवस्थेत कुठली आरक्षणं आहेत? अशा प्रकारे हिंदुत्त्वाचं विघटन करायचं, हिंदू समाज छिन्नविच्छिन्न करायचा, असे उद्योग सगळे हिंदुत्त्ववादी दररोज उठून करत असतात. आणि ही हिंदुत्त्ववाद्यांची प्रस्थापित मांडणी आहे. चुकीची आहे, असं मला वाटतं.




आपण भाषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊ. एकदा हिंदुराष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय ते ठरवावं. झाडं, नद्या, डोंगर, किल्ले, चित्रं, नकाशे ह्याला हिंदुराष्ट्रवाद म्हणतात का? मी ह्याला हिंदुराष्ट्र म्हणत नाही. या भारतात राहणारे हिंदू लोक की ज्यांचे स्वतःचे असे काही प्रश्न आहेत, ज्यांच्या स्वतःवर अशी काही आक्रमणं आहेत, त्या लोकांना मी हिंदू म्हणतो, त्या समाजाला मी हिंदू म्हणतो. हिंदू ह एक प्रादेशिक शब्द आहे, समाज आहे. आणि असा हा समाज, ऐशी कोटींचा; तो अजून राष्ट्रच बनलेला नाही. एक राष्ट्र म्हणजे काय? अंगाला  टाचणी टोचली की डोळ्यातून टचकन पाणी यायला पाहिजे. कारण शरीराचा  आणि डोळ्याचा काही संबंध नसतो ना, पण त्या शरीरातला आत्मा एक असतो. त्या शरीरातला जीव एक असतो. हिंदूंच्या हाता पोटाला  टाचण्या टोचून बघा. दोन चार हिंदू मरू देत, कुठे काय फरक पडतो का त्यांना? कितीही मोडतोड  होऊ दे तरी काही फरक पडतो का त्यांना? 

आताच जत तालुक्यामध्ये, सांगलीत महाराष्ट्रात अजूनही अस्पृश्यता पाळली जाते. दलितांना वेगळं पाणी आहे. दलितांना कपबश्या वेगळ्या आहेत. हा हिंदू समाजाचाच घटक, आज त्याला मंदिरात प्रवेश दिला जात नाहीये, जत तालुक्यात. आमच्या संस्थेचे काही सदस्य जाऊन त्यांना रिपोर्ट करून आले आहेत. ---  जत तालुक्यात आजही दलितांना पाणी दिलं जात नाही.  


 टाचणी टोचली तरीही हिंदू समाज खडबडून जागा होत नाही. त्याबाबतीत त्याला  आपण काही करावं असं वाटत नाही, ज्यांना वाटतं त्यांना राष्ट्र म्हणतात. त्यांना एक देश म्हणतात. हिंदू समाज कुठे आहें राष्ट्र? हिंदू हा तर समाजसुद्धा राहिलेला नाही. त्याला समाज तरी म्हणावं की नुसती लोकं म्हणावं अशी शक्यता मला वाटते. का म्हणावं त्यांना राष्ट्र ? 


काय राष्ट्राचा गुणधर्म दाखवितात? एक दोन इंग्लिश लोकं मरू देत, अख्खा इंग्लंड चवताळून उठेल. अमेरिकेची एक ट्वीन टॉवर बिल्डींग पडली, अमेरिका उसळून उठली. २-४ तो तिकडे सद्दाम हुसेन मेला, इकडे भारतातले मुसलमान चवताळून उठतात. काय त्यांच्यात बंधुभाव आहे!


 हिंदु समाजाचे हित आणि सनातनी धार्मिकता यात निट फरक केला पाहिजे . या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अतिशय महत्वाचे आहेत . बाबासाहेब हिंदु राष्ट्र - सनातनी पणा यांचे विरोधक होते - त्याच वेळी ते हिंदु समाजाचे हिंतचितक होते . बाबासाहेबांचे विचार लक्षात घेतले तर फ़ेर्मांडणिचे आकलन अगदी सहज होईल .

हिंदुराष्ट्र जर या देशात खरोखरच निर्माण झाले तर ती या देशावरील खूप मोठी आपत्ती असेल यात शंकाच नाही. हिंदु काय म्हणतात याला महत्व नाही, हिंदुधर्मातील विचार हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा विध्वंस करणारे आहेत, त्यामुळेच ते लोकशाहीला पुरक नाहीत.म्हणून कोणतीही किमंत देवून हिंदुराष्ट्रास प्रतिबंध करायला हवा " Dr.B.R.Ambedkar.
Writings and Speeches Vol.8 'Pakistan and Partition of India ' page no.358

हा हिंदु राष्ट्राचा उल्लेख हि बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे .धार्मिक आधारावाचे (थिओक्रेटिक ) म्हणजे हिंदु कायद्यावर - स्म्रुतिंवर आधारलेले धर्म राष्ट्र हे -- समता आणि बंधुता यांचा विध्वंस करणारे आहेत असे बाबासाहेबांचे मत होते . परंतु फाळणी करून हिंदु बहुल भागाचे सेक्युलर - आधुनिक राष्ट्र बनवता येईल असा त्यांचा कयास होता . अखंड हिंदुस्थान हे धार्मिक मारामार्यांचे घर बनेल त्यामुळे पाकिस्तान वेगळे करावे . आणि हिंदुच्या भल्यासाठी खंडित भारत तयार करावा असा होरा दिसतो. फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --

" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " 

समता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता . त्यांनी सनातनी वृत्तीचा आयुष्यभर धिक्कार केला . मनुस्मृतीला काडी लावली . हिंदुच्या सनातन वैदिक धर्माचा त्याग केला . पण राजकीय दृष्ट्या त्यांना देशहिताची आणि हिंदुच्या राजकीय सामाजिक प्रगतीची चाड होती . धम्म स्वीकारापुर्वी एक वर्ष - बाबासाहेबांनी फ़ाळणिबद्दल देवाचे आभार मानले आहेत. परमेश्वर न मानणार्या बाबासाहेबांनी हलक्याश्या विनोदात लिहिलेले वाक्य अतिशय बोलके आहे . १९५५ सालीच बाबासाहेब आंबेडकर लिहितात कि -

" जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " 

(Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 )


फाळणी झाल्यानंतर कालौघात तीन देश निर्माण झाले :

भारत : विकसित सशक्त एकसंघ आणी भारतीय धर्मांची बहुसंख्या असलेला सेक्युलर देश.
पाकिस्तान : युद्धग्रस्त मागास आणि मवाली देश . इस्लामी शरियत कायदा . लोकशाही नाही.
बांग्लादेश : भूकग्रस्त , दरिद्री, बकाल आणि धर्मांध संघटनांचे घाउक उत्पादन करणारा देश.


 मुसलमानांच्या जिहादची मला भीती वाटत नाही; ते ठीक आहे; त्याला कायदा आणि सुव्यवस्था बघेल. त्या आपण करायच्या गोष्टीच नाहीयेत. मुसलमानांच्या उम्मतची मला वाटते. त्यांचा तो बंधुभाव आहे, उम्मत आहे, जगभरचा मुसलमान जो एकवटलेला आहे; जगातले सोडा हो, भारतातले, महाराष्ट्रातल्या तरी हिंदूंमध्ये ती उम्मत आहे का? तो बंधुभाव आहे का? ते एकजीवत्त्व  आहे का? अंगाला  टाचणी टोचल्यावर हिंदूंच्या डोळ्यात पाणी येतं का? हिंदू लोक एक  राष्ट्र आहेत का? 








आणि अखंड हिंदुस्थान करा, अखंड हिंदुस्थान करके रहेंगे, सिंधू नदी परत आणू या, ह्याने काय होणारेय? या देशातला हिंदू समाजच अजून एक झालेला नाही. या १२-१३ टक्के मुसलमानांच्या समोरच तो शेपूट हलवत उभा आहे. तुम्ही हेsss मोठे भरपूर सार्‍या दुनियाभरचे मुसलमान एक करून करणार काय? भारत-पाकिस्तान-बंगला देश सगळे मुसलमान आणून आता करणार काय? अशा प्रकारे हिंदुत्त्वाची ही जी प्रस्थापित मांडणी आहे, ती मला चुकीची वाटते. 

राष्ट्र म्हणजे एकजीवत्त्व आहे. राष्ट्र म्हणजे जातीव्यवस्थेचं निर्दालन आहे. राष्ट्र म्हणजे जातीव्यवस्था गाडून, वर्णव्यवस्था सोडून सर्व हिंदू समाजाने एक होणं आहे, एकजीव होणं आहे, तसं हिंदूंना अजून जमलेलं नाही. जे जे हिंदुहिताच्या आड येईल, त्याला त्याला विरोध करणं म्हणजे हिंदूराष्ट्रवाद आहे. हिंदुहित, मी हिंदुत्त्ववादी आहे, त्याचा अर्थ मी हिंदुधर्मवादी आहे असा नाही. मी हिंदुत्त्ववादी आहे, याचा अर्थ मी हिंदुहितवादी आहे, हिंदू समाजाच्या हितवादी आहे. मग हिंदू समाजाच्या हिताच्या पक्षात जे असेल त्याचा मी समर्थक आहे, आणि हिताच्या पक्षात जे नसेल त्याचा मी समर्थक नाही. जर मनुस्मृतीमुळे, वर्णव्यवस्थेमुळे हिंदू समाजाचं हित होत नसेल, तर मी त्याचा विरोध करणार आहे. जर का हिंदुत्त्ववाद्यांच्या चुकीच्या आडमुठ्या भूमिकांमुळे हिंदू समाजाचं हित होत नसेल तर मी त्याचा विरोध करणार आहे.

ह्याला मी हिंदूंचा राष्ट्रवाद असं म्हणतो.   
कायदा करून हिंदुराश्ट्र बनवणे अतिशय घातक ठरणारे आहे . 





भाग ३ : हिंदुत्व विचाराची फेरमांडणी 

शेवटचा टप्पा फेरमांडणीचा आहे. फेरमांडणीसाठी मी बरोबर दहा मुद्दे काढले. पहिलं, फेर मांडणी कशी व्हायला पाहिजे? समता, ममता आणि बंधुता या तत्त्वांवर फेरमांडणी झाली पाहिजे. समता ही बेसिक अट. कुठल्याही प्रकारचं समर्थन चालणार नाही. कुठल्याही प्रकारचं वर्णव्यवस्थेचं, चातुर्वर्ण्याचं, सगळं अनुवंश वगैरे झूठ आहे. सावरकरांपासून लोकांनी लिहून ठेवलेलं आहे – हुशार माणसाचा मुलगा हुशार होतो, शूर माणसाचा मुलगा शूर होतो, या सगळ्या गाढवपणाच्या संकल्पना आहेत, अनुवंश हा आचरटपणा आहे. सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यात आपण अधिक खोलात शिरायला नको. जिज्ञासूंनी सावरकरांचेच लेख याच्यावरचे वाचावेत. अनुवंश हा आचरटपणा आहे. हापूसला जर पायरीचं कलम लावलं तरच ते अधिक चांगलं फळ देतं. पारशांचा वंश अंतर्गत लग्नं करून खलास व्हायच्या मार्गावर आला आहे. अनुवंश हा गाढवपणा आहे. आणि तो जातिव्यवस्थेचा एक वैज्ञानिक आधार म्हणून सांगितला जातो. जातीव्यवस्था तोडणं, समता, ममता आणि बंधुता यांच्यावर हिंदुत्त्वाची फेरमांडणी करणं असा हिंदुत्त्वाच्या फेरमांडणीचा पहिला मुद्दा आहे.






दुसरा मुद्दा आहे – राखीव जागा. मला कळत नाही, हिंदुत्त्ववाद्यांना दररोज उठून राखीव जागांना विरोध करायला काय मजा वाटते? आज करुणानिधींचं स्टेटमेंट ‘सकाळ’ मध्ये आलेलं आहे. ‘सकाळ’ मध्ये करुणानिधींनी सरळ सरळ यादवीची भाषा केलेली आहे – ‘शूद्र जेव्हा हक्क मागतात तेव्हा तो नेहमीच डावलला जातो. शंभर कोटी लोकांचं भवितव्य दोन लोकांनी ठरवणं गैर आहे.’ एका राज्याचा मुख्यमंत्री बोलतो आहे. काय खदखदतंय याची जाणीव हिंदू समाजाला आहे का? डॉ. आंबेडकरांनी स्वतःच घटनेमध्ये या रिझर्वेशनच्या पायाभूत अशा काही अटी घालून ठेवलेल्या आहेत. हे त्यांनी दलितांवर अजिबात उपकार केलेले नाहीत. हे उपकार त्यांनी सवर्णांवर केलेले आहेत; हे आपल्याला समजलं पाहिजे. राखीव जागा हा दलितांवरचा उपकार नव्हे. राखीव जागा हा सवर्णांवरचा उपकार आहे. आज भारतात सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश एक दलित होऊ शकतो; अशी ही एक सामाजिक क्रांती आहे. ज्याला पाणी भरू दिलं जात नव्हतं, तो आज सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो. ही सामाजिक क्रांती भारतात रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली आहे. बाकीच्या देशातही क्रांत्या झाल्यात. फ्रांसमध्ये झाली, रशियात झाली. प्रत्येक क्रांती गिलोटिनच्या पात्याखाली झाली. गिलोटिन म्हणजे मोठं ब्लेड लावायचं, त्यात जे आपले विरोधक असतील, प्रतिगामी असतील त्यांना लाईनीत उभं करायचं, वरून ब्लेड सोडायचं, ब्लेड सोडलं की खाटकन् सगळी मुंडकी तुटून खाली पडायची. ती सगळी टोपलीत भरायची आणि घेऊन जायची. परत दुसरे प्रतिगामी आणायचे. अशा प्रकारे गिलोटिनच्या पात्यांखाली हरेक देशात क्रांती झाली. भारतात मात्र गिलोटिनशिवाय, रक्ताचा एकही थेंब न सांडता आम्ही क्रांती करून दाखवली; याचं श्रेय आंबेडकरांना, रिझर्वेशनला आहे. ज्याच्या हातात काही नसतं, he has nothing to lose but poverty, गरीबीशिवाय ज्याच्याकडे हरायला काहीच नसतं तो माणूस यादवीसाठी तयार आहे, तो माणूस गिलोटिनसाठी नेहमी तयार आहे. तयार कोण नाहीये? ज्यांच्या हातात आहे सगळं ते तयार नाहीत.


अशा प्रकारे ही जी transfer of power आहे, समसमान वाटणी लोकांना करून देणं आहे, इतकी पाच हजार वर्षे उच्च वर्णीयांना आरक्षण होतंच की. पाच हजार वर्षे शिक्षणाचा हक्क नव्हता; पाच हजार वर्षे पाणवठ्यावर पाणी भरू दिलं जात नव्हतं. सत्ता, संपत्ती करायचा हक्क नव्हता; हे सत्य आहे. हलाखीचीच परिस्थिती होती दलितांची. त्यांना जर रिझर्वेशन दिलं तर याच्यामध्ये सवर्णांनी चिडण्यासारखं काय? आणि त्याच्यामध्ये हिंदुत्त्ववाद्यांनी भाग घेण्याचं कारण काय? एक आई दोन मुलांबद्दल भेदभाव कसा करू शकते? म्हणजे, मुस्लिमांना आरक्षण द्यावं की नाही हा हिंदुत्त्ववाद्यांचा विषय होऊ शकतो. पण हिंदूंच्यातल्याच एखाद्या गटाला आरक्षण द्यावं की नाही हा हिंदुत्त्ववाद्यांचा विषयच नाहीये. हिंदुत्त्ववादी म्हणजे हिंदूंच्या हितासाठी लढणारे लोक. त्यांनी ‘रिझर्वेशन आर्थिक आधारावर द्या’ - हा सगळ्यात मोठा ढोंगीपणा आहे. आर्थिक आधारावर कसं देणार आरक्षण? मला वाटतं काल परवा तिकडे मनोहर जोशी सरांचं भाषण झालेलं आहे. त्यांच्याआधी बरेच राजकारणी बोलून गेले असतील. या राजकारण्यांची वर्तमानपत्रात जाहीर झालेली संपत्ती वाचा. माझ्यापेक्षा कमी. सी.ए. ठरवतो हो. आपलं उत्पन्न किती दाखवायचं हे सी. ए. ठरवतो. सगळ्यात श्रीमंत असतील न त्यांना सगळ्यात सोपं आहे आर्थिक आरक्षण मिळवणं. आर्थिक आरक्षण प्रक्टिकलच नाही. आर्थिक आरक्षण आपल्याला दाखविताच येणार नाही. अंबानी स्वतः किती वैयक्तिक कर भरत असेल?   तेव्हा आर्थिक आरक्षण ही एक दिशाभूल आहे. आरक्षण हे सामाजिक असलं पाहिजे; आणि ते बंधुतेच्या नात्याने दिलं गेलं असलं पाहिजे. 


अहो, साधं जपानचं उदाहरण घ्या. जपानमध्ये अणुबॉंम्ब पडायच्या आधी एक सामुराय नावाची जमात होती. हे सामुराय तिथले राजेही होते आणि धर्मकारणीही होते. जपानची संपूर्ण सत्ता त्या सामुरायींच्या हातात होती. ज्या दिवशी जपानवर अटम बॉंब पडला, त्याच्या दुसर्‍या दिवशी त्या सगळ्या सामुरायींनी जाहीर केलं – ‘उद्यापासून पाचशे वर्षे प्रयेक सामुराय गवत खाऊन राहील; आमच्या सर्व जपान्यांना जोपर्यंत शिक्षण मिळत नाही, सत्ता मिळत नाही, तोपर्यंत जपानचं काहीही भलं होणार नाही.’ असं म्हणून या सगळ्यांनी आपली सगळी सत्तेची पदं सामुरायींनी सोडून दिली. या सामुरायींएवढं आवाहन हिंदूंना करतच नाही. पन्नास टक्के मागताहेत ना? त्याला का विरोध करताहेत? आणि चला हिंदू समाजाचं मी समजू शकतो, जातीयवादी, म्हणजे नॅचरल आहे. हिंदुत्त्ववादी ह्याला कोणत्या तोंडाने विरोध करताहेत? त्यांचा इथे बोलण्याचा संबंध काय येतो? अशा प्रकारे फेरमांडणी मध्ये पहिला मुद्दा समतेचा, दुसरा मुद्दा राखीव जागांचा आणि तिसरा मुद्दा आंतरजातीय विवाहाच्या पुरस्काराचा.












फेरमांडणीचा चौथा मुद्दा असेल ट्रयच्या घोड्यांवर हल्ला करणे. ट्रयच्या घोड्याची एक गोष्ट सांगितली जाते. दोन देशातलं युद्ध सुरु होतं. त्यांना काही तटबंदी फोडून आत शिरता येत नव्हतं. ज्यांना शिरता येत नव्हतं. त्यांनी शत्रूसमोर एक मोठा लाकडी घोडा आणून ठेवला. लाकडी घोडा आणून ठेवल्यावर हे सगळे आतमधले रात्री खूष झाले.  मग यांनी दरवाजे उघडले, तो घोडा आत आणला. नगरात त्याची स्थापना केली, त्याची पूजा केली, त्याला शेंदूर वाहिला. नंतर सगळे रात्री घरी जाऊन झोपले. त्या रात्री त्या ट्रयच्या घोड्यातून सैनिक खाली उतरले. त्या सैनिकांनी दारं उघडली आणि सगळे शत्रू चालून आत आले. अशा प्रकारे जे ट्रॉZयचे घोडे हिंदुत्त्ववाद्यांमध्ये आहेत, जे हिंदुत्त्ववादी नाहीत; ज्यांचे   interest वेगळे आहेत; ज्यांचे  interest  स्वतःच्या जातीपातीत गुंतले आहेत,; अशा ट्रयच्या घोड्यांवर हल्ला करणे; हा हिंदुत्त्वाच्या फेरमांडणीचा चौथा मुद्दा आहे. त्याशिवाय हिंदुसंघटन होणारच नाही.


 मी, लोकांना असं वाटतं की हे काहीतरी संघाच्या विरोधी आहेत वगैरे. तसं काही नाही. संघाविषयी मला कुठलाही आकस नाहीये. त्यामुळे मी त्यांच्याविषयी बोलणं थांबवतो. थोडं सावरकरवाद्यांविषयीच बोलतो. माझ्या अगदी घरातले लोक. त्याच्या कंपूत मी वावरत असतो. पंढरपूरचे वा. ना. उत्पात; ब्राह्मणसंमेलनात जातात; तिथे जानवी घाला म्हणून फतवे काढतात; त्या कुमार केतकरांसारख्या सभ्य माणसाला हाणामारीच्या ऑर्डर वरतून देतात; ‘गर्वसे कहो हम ब्राह्मण है’ म्हणून पुस्तिका काढतात; हा काय प्रकार आहे? तुम्ही सावरकरांचं नाव घेऊ नका मग. तुम्ही हिंदूसंघटनाचं नाव घेऊ नका. तुम्ही तुमचं काय संघटन असेल ते स्पष्ट बोला. 

अशा प्रकारे जे ट्रयचे घोडे स्वतःच्या वेगळ्या  interest  साठी भगवा टिळा लावून हिंदुत्त्ववाद्यांमध्ये शिरलेले आहेत; त्या ट्रयच्या घोड्यांवर हल्ला करणे हा फेरमांडणीचा चौथा मुद्दा आहे.



पाचवा मुद्दा, धर्म बाजूला ठेवावा लागेल. धर्माचं उदात्तीकरण करून चालणार नाही. धर्म, जानवं, शेंडी हे चालणार नाही. वेद, मनुस्मृती, आख्यानं, पुराणं यांच्यातून हिंदू अजिबात संघटीत होत नाहीत. हिंदूंना त्याच्या हितासाठी समोरच्या धोक्यांपुरती जाणीव करून देऊन; त्यांच्या अंतर्गत समस्यांची जाणीव करून देऊन प्रेमाने, ममत्वाने एकत्र आणावं लागणार आहे. त्यासाठी हिंदूंचा धर्म बाजूला ठेवावा लागेल; कारण हिंदूंना असा धर्मच नाहीये बेसिकली. हिंदूंचे अनेक धर्म आहेत. जाते जाते कुलाचारा;| प्रयेक जातीचा कुळाचार वेगळा आहे, तोच त्याचा धर्म आहे. हिंदू ही जीवनपद्धती नाही; आंबेडकरही म्हणाले आहेत – Hindu is a nation in making , एक राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेतला समाज. हळूहळू बनतो आहे; एक होतो आहे. हळूहळू त्यांच्यामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना तयार होते आहे. ती कशी जोपासता येईल हा आपला मुद्दा आहे. त्यामुळे धर्म बाजूला ठेवावा लागेल. मुसलमान धार्मिक आहेत; मग आम्हीपण आमचा धर्म आणतो; अशा प्रकारच्या भूमिका चालणार नाहीत. त्यांना धर्म नाही ही एक चांगली गोष्ट आहे, आणि हे लोकांना पटत नाही – हिंदुत्त्ववाद्यांना; ही एक खोटी गोष्ट आहे. मागे मी हुबळीला गेलो होतो. 

तिथे  कार्यक्रम होता; त्रिशूलदीक्षेचा. तिथे गेलो होतो बोलावल्यावर. तिथे गेल्यावर समोर बजरंगी होते; बजरंगी म्हणजे कसे असतात, तुम्हाला माहित आहे. सगळे दहा हजार बजरंगी बसले होते. त्या बजरंग्यांसमोर मी असं सांगितलं - ‘तुमच्या हिंदूंच्या हितासाठी तुम्हाला तुमची मनुस्मृती जाळावी लागेल; त्यात विषमता आहे; अस्पृश्यता आहे. सगळे समोर बसलेले बजरंगी टाळ्या वाजवत होते; मागे व्यासपीठावर बसलेल्या शंकराचार्यांची तोंडे मात्र बघण्यासारखी झाली होती. हे हिंदूंना कळणार नाही हे काही मला पटत नाही. हे हिंदूंना कळेल; हे हिंदुत्त्ववाद्यांनाच कळेल की नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. हिंदूंना हिंदुत्त्वाची फेरमांडणी निश्चित कळेल. हिंदूंना हिंदुत्त्वाची फेरमांडणी निश्चित अपील होईल; ती हिंदुत्त्ववाद्यांना कशी अपील होईल; हे माझ्यासमोरचं आव्हान आहे.





 सहावी गोष्ट, सेक्युलॅरीझम. या शब्दाचा जो द्वेष केला जातो तो द्वेष सोडा. सेक्युलॅरीझम म्हणजे सर्वधर्मसमभाव नव्हे. सर्व धर्म चांगले आहेत; र्इश्वर अल्ला तेरे नाम; ते कुराणही छान; ती मनुस्मृतीही छान; अशा प्रकारच्या भोंगळपणाला सेक्युलॅरीझम म्हणत नाहीत. सेक्युलॅरीझमचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीत कुठंही इहवाद असा आहे. इहवाद याचा अर्थ धर्म वेगळा, निर्बंध वेगळा. एक पारलौकिक, एक इहलौकिक. पारलौकिक जगातलं पूर्ण स्वातंत्र्य सेक्युलॅरीझम देतो. म्हणजे तुम्ही श्रद्धा कशावर ठेवायची; अल्लावर, देवावर, कृष्णावर काहीही. पण आज या जगात कसं वागायचं याचं कोणतंच स्वातंत्र्य सेक्युलॅरीझम देत नाही. या सगळ्या गोष्टी स्टेटनी - म्हणजे माणसांनी विचार करुन बुद्धीने ठरवायच्या असतात. मी म्हणतो नेहमी सावरकर सेक्युलर होते. सावरकर काय म्हणतात - धर्म वेगळा, निर्बंध वेगळा; केमाल पाशावरच्या लेखातले शब्द आहेत. एकाचा विषय इहलोक, दुसर्‍याचा विषय परलोक. परलोकाने इहलोकात ढवळाढवळ करता कामा नये. सर्व धर्मग्रंथ हिंदु-मुसलमान सर्वांचे वंदनीय, पूजनीय, आदरणीय; आज अनुकरणीय नाहीत; आज आचरणीय नाहीत. आज कसं वागायचं ते मी माझ्या बुद्धीने ठरवेन; विचार करुन ठरवेन.

एवढं सेक्युलॅरिझम आहे. …  त्वेष बाळगण्याचं काहीच कारण नाही. याउलट सेक्युलॅरिझम ही एक हिंदूंच्या हिताची गोष्ट आहे; हे हिंदूंना समजावून दिलं पाहिजे. विरोध स्युडो-सेक्युलॅरिझमला करता येर्इल की हा सेक्युलॅरिझम तुम्ही फक्त हिंदूंच्या कानफटात मारायला वापरता; पण तिकडे मुसलमानांना त्यांचा धर्म - हसून हसून देतायत. पण हे काही मुसलमानांचं भलं नाही. हाही हिंदूंनी एकदा शांत डोक्याने विचार करावा. मुसलमानांचं कोणतं ऐेहिक लांगुलचालन हिंदू नेत्यांनी केलं आहे? मुसलमानांना दिलंय काय त्यांनी? मुसलमानांनी बुरखा मागितला, बुरखा दिला; मुसलमानांनी हज सबसिडी मागितली, हज सबसिडी दिली; मुसलमानांनी नमाज रस्त्यावर पढायची परवानगी मागितली, रस्त्यावर पढायची परवानगी दिली. मुसलमानांना आधुनिक शिक्षण कोणी दिलं? मुसलमानांना शहाणं कुणी केलं? मुसलमानांना विज्ञाननिष्ठ कोणी केलं? ते कुणीच केलं नाही. मुसलमानांच्या सर्व पारलौकिक मागण्या मान्य केल्या; ऐेहिकामध्ये मुसलमानांच्या उत्थानासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी कोणतीच गोष्ट हिंदू लोकांनी केलेली नाही; कोणतीच गोष्ट हिंदूंच्या राजकारण्यांनी केलेली नाही.


सातवा मुद्द‍ा असेल, मुस्लीमांचं प्रबोधन. मुस्लीमांचं प्रबोधन हीही हिंदुत्ववाद्यांना आपली एक जबाबदारी वाटावी,  म्हटली पाहिजे. मुस्लीमांचं प्रबोधन कसं करायचं? मुसलमानांना आपल्याला सांगायचं काय शेवटी?  की बाबांनो, आमचा जगण्याचा हक्क मान्य करा. एवढंच आपल्याला त्यांच्याकडून मुख्यतः आपल्या स्वतःसाठी हवं आहे. आपल्या जगण्याचा हक्क मान्य करा; ते केवळ आमच्यासाठी नव्हे, ते तुमच्यासाठी आहे. आताच   मुस्लीम वस्तीतच बॉंबस्फोट झाला होता. मुसलमानांच्या वस्तीतच बॉंबस्फोट झाला होता. देवबंद आणि बरेलवी अशा प्रकारचे दोन सेक्ट (पंथ) आहेत. मुसलमानांच्यात समता आहे; मुसलमान एक आहेत असं काही नाही. तीन जाती आहेत – अश्रफ, अफझल आणि हुसेन; ---------     म्हणजे उच्च वर्णीय, ओबीसी आणि शूद्र. असे त्यांच्यातही तीन भेद आहेत. त्यांच्यामध्ये देवबंद आहेत, बरेलवी आहेत, शिया सुन्नीचा मोठा फरक आहे; अहमदी आहेत, ज्यांना इतर लोक मुसलमानही म्हणत नाहीत. अशा प्रकारचे भिन्न पंथ-उपपंथ आहेत. परत त्यांची एकमेकांविषयीची मानसिकता अशीच आहे; की हा काफर आहे;  माझाच एक खरा; हा मुसलमान जरी स्वतःला म्हणत असला तरी हा खरा मुसलमान नव्हे. 






इंटरनेट जर कोणी वापरत असेल तर तिकडे देवबंद आणि बरेलवी असा एक सर्च देउन बघा. दोघांनी एकमेकांविरुद्ध काढलेले शेकडो फतवे मिळतील. तू काफर आहेस, तू काफर आहेस, तू काफर आहेस असं मुसलमान एकमेकांनाच म्हणतात. या देवबंद आणि बरेलवी मधल्या संघर्षातून मालेगावमध्ये शब्बे-बारात सणाला बॉंबस्फोट झाला होता. शब्बे-बारात या सणाच्या दिवशी मुसलमान त्यांच्या थडग्यासमोर मेणबत्त्या लावत असतात. हे एक प्रकारचं शिर्क, शिर्क म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्त्वात भागीदार मानणं. हा शिर्क इस्लामच्या लेखी एक गुन्हा आहे; म्हणजे दुसर्‍या गटाच्या लेखी. असं असल्यामुळे हा प्युअर इस्लाम नाही म्हणून मालेगावमध्ये झालेला तो बॉंबस्फोट आहे. हा जो कट्टरवाद तुम्ही जोपासताहेत, हा जो तुम्ही सगळं इस्लाम इस्लाम करत बसला आहेत; यातून तुमचं तरी काय भलं झालं आहे?. मुसलमानांनी आधुनिक होण्यामध्ये हिंदूंचं तर कल्याण आहे; पण मुसलमानांचं तर कोटकल्याण आहे; अशा प्रकारची भूमिका हिंदुत्त्ववाद्यांनी घेणं आवश्यक आहे. तुम्ही चुका करताहेत म्हणून आम्ही पण चुका करतो; अशी भूमिका नव्हे; आम्ही चुका करत नाहीत आणि तुम्हालाही करू देत नाहीत; अशा प्रकारची भूमिका हिंदुत्त्ववाद्यांनी घेणं आवश्यक आहे. 






आणि भारतीयत्त्वासाठी, मानवतेकडे शेवटी एक पाउल म्हणून; काय अनंत काळ कुठलीही भांडणे टिकणारी नाहीत, हिंदू-मुस्लीमांचं प्रबोधन होउन त्यांनी शेवटी जायचंच आहे. या मानवतेकडे एक पाउल टाकलं पाहिजे. सावरकरांचं ‘हिंदुत्त्व’ हे पुस्तकच एका तुकाराम महाराजांच्या अभंगाने संपतं – आमुचा स्वदेश, भुवनत्रयामध्ये वास काय आमचा देश, पृथ्वी सगळं एकच. पण जोपर्यंत चोरी-दरोडेखोरी असेल तोपर्यंत कुलुप घालायला लागेल; ते कुलुप म्हणजे हिंदुत्त्व. त्या कुलुपाची किल्ली नेहमी आपल्या खिशातच ठेवावी. ज्यावेळी भांडणं संपतील त्यावेळी मानवतेकडे जाण्यास हिंदूंनी उत्सुक असावं असा हिंदुत्त्वाच्या फेरमांडणीचा शेवटचा मुद्द‍ा आहे.


हिंदुत्त्वाचा राष्ट्रीय गोधळ चाललेला आहे. या राष्ट्रीय गोंधळामध्ये हिंदुत्त्ववाद्यांची अडचण काय आहे? हिंदुत्त्ववाद्यांची अडचण अशी आहे की त्यांचे आचार अतिशय चांगले आहेत. आसाम, मिझोरामपासून पूर्ण वेळ संघाचे प्रचारक जातात; जीव देतात स्वतःचा, अख्खं आयुष्य फुकट घालवतात; तिथल्या आदिवासी समाजासाठी, म्हणजे त्यांना ते वनवासी म्हणतात, मी आदिवासी म्हणतो. ठीक आहे, आपण शब्दांच्या भांडणात पडायला नको. 

पण तिथल्या आदिवासी समाजासाठी ते स्वतःचा जीव देतात, आयुष्यभर राब राब राबतात; कष्ट करतात. कुठल्याही डावे-पुरोगामी वगैरे असल्या धंद्यात पडत नाहीत; सगळे त्यांच्या परिषदा, सभा, संमेलनात रंगलेले आहेत. संघाच्या लोकांचे आचार अतिशय चांगले आहेत. जेवढे आंतरजातीय विवाह संघात होत असतील तेवढे कुठल्याही डाव्या-पुरोगाम्यांच्या चळवळीत होत नाहीत. त्यांचे आचार अतिशय चांगले आहेत, पण विचार अतिशय वार्इट.

वागतायत ठीक वागतायत; म्हणजे बरं आहे; पण रोजच्या रोज ही मध्ययुगीन जी भाषा हिंदुत्त्ववाद्यांकडून बोलली जाते; प्रतिगामी भाषा बोलली जाते; त्यासाठी हिंदुत्त्वाची वैचारिक फेरमांडणी आवश्यक आहे. अशी फेरमांडणी आवश्यक आहे असं मला वाटल्यामुळे मी आजचा भाषणप्रपंच केलेला आहे.

हिंदुत्त्वाचा राष्ट्रीय गोंधळ संपवण्यासाठी आम्ही आज आमचा एक गोंधळ घातलेला आहे. या गोंधळामध्ये मला माहितीये की आपण कुठल्याच लॉबीचे राहत नाही. लॉबीत राहण्याचेही काही फायदे असतात. म्हणजे एक संघाची लॉबी असते; एक ब्राह्मणांची लॉबी असते; एक डाव्या-पुरेगाम्यांची, त्यांची पण लॉबी असते; एकमेकाला पुरस्कार द्या; हे करा; ते करा. अशी फेरमांडणी केली तर आपण कुठल्याच लॉबीत राहत नाहीत; पण त्याने हिंदूंचं हित निश्चित होर्इल; असं मला वाटल्यामुळे मी या फेरमांडणीचा प्रयत्न केला. 







यामध्ये कोणाच्या काही भावना दुखावल्या असतील तर मला क्षमा करा; आणि माझ्या बालसुलभ उत्साहाचा तो एक भाग आहे असं आपण समजा. तुम्ही चिडावं किंवा तुमच्या भावना दुखवाव्यात असा माझा उद्द‍ेश नव्हता. तर याही हिंदुहिताच्या पोषक दृष्टीने काही विधायक होर्इल का अशा प्रकारे एक नवीन विचारांची दिशा हिंदुत्त्ववाद्यांसमोर ठेवावी असा माझ्या भाषणाचा हेतू होता.

हिंदुत्त्वाचा राष्टीय गोंधळ चालला होता. आज आम्ही  आमचा गोंधळ इथे घालतो आहोत; पण आमच्यामध्ये वैचारीक गोंधळ अजिबात नाही. मी मूळचा शाहू महाराजांच्या कोल्हापूरचा.

कोल्हापुरात जागरण गोंधळाची एक परंपरा आहे. अंबाबार्इला जागरण  गोंधळ घालतात. एका हातात पेटती मशाल आणि दुसर्‍या हातामध्ये संबळ घेऊन वाजवत वाजवत गोंधळी येतो; आणि उधं, उधं, उधं, उधं उधं, उधं, उधं, उधं करून सर्व देवदेवतांचा जयजयकार करायला लागतो. याला देवीचा जागरण गोंधळ म्हणतात. आम्ही जो घालतो आहोत, तो हिंदु समाजाचा जागरण गोंधळ आहे असं म्हणून मी माझं भाषण संपवतो.

वन्दे मातरम्.


(हे भाषण जुने असून त्यातील काही संदर्भ काही मुद्दे आणि काही विचार आता कालबाह्य आहेत . )

१३ टिप्पण्या:

  1. अभ्यासपूर्ण प्रतिपादन. हार्दिक अभिनंदन. पण प्रश्न हा आहे की सध्याच्या द्वेषपूर्ण वातावरणात हिंदू एकता कशी साध्य करायची. प्रयत्न केला तरी संशयाने पहातात. शिव्या घालतात. मार्ग सापडत नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. हिदु संघटित होण्याचा वेग वाढवला पाहिजे का ? हिंदु संघट्नेत काही अडचणी आहेत का ? हिंदु समाज एकजीव एकरस एकराष्ट्र होणे असा हिंदु संघट्नेचा अर्थ आहे का ? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर हिंदु त्व वाद्यांना आत्मपरिक्षणाचि घनघोर आवश्यकता आहे असे सूचित होते. हिंदुत्व वाद्यांचा अशास्त्रीय अवैद्न्यानिक आणि मध्ययुगीन दृष्टीकोन हे त्यामागचे कारण आहे.

    वेदातली विमाने, संस्क्रुतिचा अकारण गौरव आणि धार्मिकतेचे सोवळे आधुनिक राष्ट्र्निर्मितीला अनुपयुक्त आहे . एकदा संस्क्रुतिचा गौरव सुरु झाला कि चातुर्वण आले , अस्पृश्यता आली , फक्त तेव्हढेच नव्हे तर गणपतीच्या प्लास्टिक सर्जरीचे फुसके बार देशाला मध्ययुगात नेण्याची सेमी तालिबानी मानसिकता सूचित करतात . गोमुत्राची सरकारी आचमने म्हणजे हिंदु संघट्न नाही .

    राश्ट्र्निर्माण हि आधुनिक संकल्पना फ्रेंच राज्य क्रांतीतून आली आहे. त्यात लोकशाही, समता, बंधुता , बुद्धिवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य या पायावर राष्ट्र उभे राहते . हिंदुत्व वाद्यांची भाषा हि आधुनिक राष्ट्रवादाशी पूर्णपणे विसंगत आहे. पौराणिक राजा प्रधान आणि धर्म निर्णय देणारी व्यवस्था त्यांच्या भाषेतून अभिव्यक्त होते . भारताची गतकालीन संस्कृती हि काही शोषित समाजाला भीतीदायक वाटते हे खरेच , पण सतत आत्मौप्य आणि अनाकलनीय तत्वज्ञानाचा भडिमार करत स्पर्धा - विज्ञान - भौतिकवादाचा तिरस्कार करणारे हिंदुत्व सद्यकालीन सुशिक्षित हिंदुलाहि अप्रिय ठरणार यात शंका नाही .

    हिंदुत्व वाद्यात अभ्यासक नावची चीज अस्तित्वात नाही आणि पुराणमतवादि पढतमुर्ख या चळवळीचे दिग्दर्षक आहेत हि खरी अडचण आहे. भारतीय तत्वद्न्यानाच्या / अध्यात्माच्या बहुरंगी स्वरूपाविषयी हि हे लोक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत . अद्वैत वेदांत या एक दर्शनाच्या धर्म पिठाला - शंकराचार्याना हिंदुचे धर्मगुरू ठरवण्याचा प्रमाद देखील याच अनभ्यस्त वर्तमानाचे फलित आहे.

    मध्ययुगीन परिभाषे मुळे हिंदुचे विघटन होते आहे. आणि पुरोगाम्यांच्या अडाणिपणावर त्याचे खापर फोडून संघाला दोषमुक्त होता येणार नाही - कारण पुरोगामी लोक्स हिंदु संघट्नेच्या हेतुशीच बांधिल नाहीत .

    उत्तर द्याहटवा
  3. हिंदु नावाचा कोणताही धर्म नाही . ते एका लोकसमुहाचे नाव आहे. हिंदुचे अनेक वेगवेगळे धर्म आहेत . पारलौकिक मार्ग प्राप्ती हे या धर्मांचे एकमेव ध्येय नाही . अध्यात्म आणी समाज धारणेचे नियम असे धर्माचे दोन भाग आहेत .

    भाग १) भारतीय अध्यात्म : हे प्रामुख्याने दार्शनिक तत्वज्ञान ( जगाकडे पाहण्याचे विविध चष्मे असे ) आहे . अद्वैत - द्वैत - सांख्य - कर्मयोग या सार्या परस्पर विरोधी आणि काही ठिकाणी देवही न मानणार्या मतांची झुंबड आहे. त्यात सर्वच मार्ग खरे असू शकतात असा अनेकांतवाद भारतीय मतांत सर्वमान्य झाला आहे . हीच ती पंथविशयक भारतीय सहिष्णुता .

    पण दार्शनिक तत्वज्ञान म्हणजे धर्म नव्हे तो धर्माचा एक अतिशय लहान भाग आहे.

    भाग २) रूढी परंपरा आणि समाज नियमन / धारण करण्यासाठीचे नियम : म्हणजे धर्म होय. जाते जाते कुलाचार: असे एक संस्क्रुत वचन आहे . जात पंचायती - पूर्वजांपासून चालत आलेला कुलधर्म हे लहान लहान जात - टोळ्यांचे नियम धर्म आहेत. विषमता आणि गुलामी हा सार्या जगाचा इतिहास आहे . भारतातल्या हजारो जात टोळ्यांचे हजारो कुलाचार ह्या विषम परिस्थितीत निर्माण झाले . तेच सहा हजार कुळाचार म्हणजे हिंदु लोकांचे सहा हजार धर्म होत . हे सहा हजार धर्म एका सूत्रात नाहीत . महाराला दिवाळीचे गोड दान देताना त्याला कडु तेलाची बोटे लावणे हाही एक धर्मविधी म्हणुन काही जमातीत आहे. हे सहा हजार धर्म कोणत्याही प्रकारे एक नाहित.

    निष्कर्ष :
    १) भारतीय धर्माचा पहिला सहिष्णू दार्शनिक भाग पारलौकिक सहिष्णुता शिकवतो . इस्लाम आणी ख्रिस्ती धर्मासमोर तो निव्वळ फालतूपण ठरतो .
    २) भारतीय धर्माचा दुसरा समाज नियम विषयक भाग : - हे हजारो जातीय कुळ परंपरांचे कडबोळे आहे . त्यात सामान्य नियम काढण्यासाठी लिहिलेल्या देवल स्मृती / मनुस्मृती वगैरेही त्याज्य आहेत. हिंदुच्या संघट्नेला घातक आहेत.

    कोणत्याही अर्थाने हिंदु लोकांचे धर्म - कुल परंपरा हिंदु संघटनेला उपयुक्त नाहीत . त्यांचा दृगोच्चार हिंदु विघटनाचे कारण आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. दोष दाखवलेत मार्ग दाखवलात आता त्या मार्गावर लोक चालू लागले कि त्यांचाही एक वेगळा पंथ तयार होणार म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न !!

    उत्तर द्याहटवा
  5. हिंदू धर्म व संस्कृती विषयी त्यांना (बाबासाहेबांना) प्रेम होतं ... उत्तम विनोदाबद्दल धन्यवाद . प्रेम असलेली गोष्ट सोडायची प्रतिद्न्या करणे म्हणजे जरा गंमतच नाही का ? असो घटनेतल्या कलम २५ ब मध्ये बुद्धाला हिंदुचा पंथ म्हटले आहे . हा विनोद तर सुपरच आहे.

    २५ वे कलम धर्म स्वतंत्र्य देते. हे स्वातंत्र्य मर्यादित करण्यासाठी २५ (अ) घटनेत येते. आणि सामाजिक आर्थिक आणि राक्कीया बाबतीत धर्माविरुद्ध कायदे करण्याचे अधिकार सरकारला देते . २५ ब कलम सामाजिक सुधारणा आणि सर्व वर्गाच्या हिंदुना संस्थात्म्क धार्मिक संरचनेची तरतूद करते .

    त्याचा विस्तार करताना घटनाकार लिहितात कि या २५ अ, ब कायद्या बाबत हिंदुचा अर्थ हिंदु, जैन , शीख आणि बौद्ध असे सर्व (वेगवेगळे) धर्म मानणारे असा घ्यावा . घटनेत अतिशय स्पष्टपणे Sikh, Jaina or Buddhist " religion" असा उल्लेख येतो . पंथ बिंथ हि संघाची थेअरी आहे . घट्नाकारांनि सामाजिक सुधारणा करण्यासाठी हिंदु धर्मात हस्तक्षेप करायचे हाक्क राखीव ठेवताना हा उल्लेख आहे . त्यात शीख जैन बौद्ध या "धर्मानाहि" हा कायदा लागू आहे असा अतिशय स्पष्टपणे -- बौद्ध धर्म असा उल्लेख आहे . हि पंथाची भानगड कुठून काढली ? या लिंकवर ते कलम पाहता येईल : http://indiankanoon.org/doc/631708/

    उत्तर द्याहटवा
  6. प्रत्युत्तरे
    1. हिंदुराष्ट्र जर या देशात खरोखरच निर्माण झाले तर ती या देशावरील खूप मोठी आपत्ती असेल यात शंकाच नाही. हिंदु काय म्हणतात याला महत्व नाही, हिंदुधर्मातील विचार हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा विध्वंस करणारे आहेत, त्यामुळेच ते लोकशाहीला पुरक नाहीत.म्हणून कोणतीही किमंत देवून हिंदुराष्ट्रास प्रतिबंध करायला हवा "
      Dr.B.R.Ambedkar.
      Writings and Speeches Vol.8
      'Pakistan and Partition of India '
      page no.358.

      हटवा
  7. हिंदुराष्ट्र जर या देशात खरोखरच निर्माण झाले तर ती या देशावरील खूप मोठी आपत्ती असेल यात शंकाच नाही. हिंदु काय म्हणतात याला महत्व नाही, हिंदुधर्मातील विचार हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा विध्वंस करणारे आहेत, त्यामुळेच ते लोकशाहीला पुरक नाहीत.म्हणून कोणतीही किमंत देवून हिंदुराष्ट्रास प्रतिबंध करायला हवा "
    Dr.B.R.Ambedkar.
    Writings and Speeches Vol.8
    'Pakistan and Partition of India '
    page no.358

    हा हिंदु राष्ट्राचा उल्लेख हि बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे .धार्मिक आधारावाचे (थिओक्रेटिक ) म्हणजे हिंदु कायद्यावर - स्म्रुतिंवर आधारलेले धर्म राष्ट्र समता आणि बंधुता यांचा विध्वंस करणारे आहेत असे बाबासाहेबांचे मत होते . परंतु फाळणी करून हिंदु बहुल भागाचे सेक्युलर - आधुनिक राष्ट्र बनवता येईल असा त्यांचा कयास होता . अखंड हिंदुस्थान हे धार्मिक मारामार्यांचे घर बनेल त्यामुळे पाकिस्तान वेगळे करावे . आणि खंडित भारत तयार करावा असा होरा दिसतो. फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --
    " पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . "
    समता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता . त्यांनी सनातनी वृत्तीचा आयुष्यभर धिक्कार केला . मनुस्मृतीला काडी लावली . हिंदुच्या सनातन वैदिक धर्माचा त्याग केला . पण राजकीय दृष्ट्या त्यांना देशहिताची आणि हिंदुच्या राजकीय सामाजिक प्रगतीची चाड होती . धम्म स्वीकारापुर्वी एक वर्ष - बाबासाहेबांनी फ़ाळणिबद्दल देवाचे आभार मानले आहेत. परमेश्वर न मानणार्या बाबासाहेबांनी हलक्याश्या विनोदात लिहिलेले वाक्य अतिशय बोलके आहे . १९५५ सालीच बाबासाहेब आंबेडकर लिहितात कि -
    " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे "
    (Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 )

    फाळणी झाल्यानंतर कालौघात तीन देश निर्माण झाले :
    भारत : विकसित सशक्त एकसंघ आणी भारतीय धर्मांची बहुसंख्या असलेला सेक्युलर देश.
    पाकिस्तान : युद्धग्रस्त मागास आणि मवाली देश . इस्लामी शरियत कायदा . लोकशाही नाही.
    बांग्लादेश : भूकग्रस्त , दरिद्री, बकाल आणि धर्मांध संघटनांचे घाउक उत्पादन करणारा देश.

    उत्तर द्याहटवा
  8. झक्कास मांडणी! हिंदुत्ववाद्यांचा वैचारिक गोंधळ सर्वश्रुत आहेच! निव्वळ आणि निव्वळ त्याचमुळे हिंदुत्ववादी अल्पसंख्यांक ठरलेत :) जोपर्यंत सर्वसमावेशक हिंदुत्ववाद अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत ह्याचं काही खर नाही.

    उत्तर द्याहटवा

  9. (हे भाषण जुने असून त्यातील काही संदर्भ काही मुद्दे आणि काही विचार आता कालबाह्य आहेत . )>>>>> यातले कालबाह्य संदर्भ,मुद्दे अणी विचार कोणते आहेत आणी कालसुसंगत कोणते आहेत ते स्पष्ट कराल का?

    उत्तर द्याहटवा
  10. Ithe keval hindutvachi chikitsa aavashyak hoti. Muslimancha lekh swatntra liha.
    Braanana shivya devun upyog nahi. Sawarn tisatya payarivar rahyala tayar aahe fakt dalitanni tyanchaypeksha var javu naye itkich tyanchi iccha aahe.
    He sagale samajat nahi itake koni khule nahi.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *