३० डिसें, २०१५

इस्लाम प्रचारक : दत्त प्रसाद : दाभोलकर

इस्लाम प्रचारक : दत्त प्रसाद :  दाभोलकर

इस्लाम धर्माचा प्रचार करण्याचे व्रत दाभोलकर दत्तप्रसाद यांनी घेतले आहे, ते तसे का वागतात हे आपण या लेखात पाहायचे आहे.   अल्लाचा धर्म भारत भूमीला व्याप्त करावा अशी दाभोलकर साहेबाची  आंतरिक इच्छा या भाषणात स्पष्टपणे दिसते. हे  साहेब इकडचे तिकडचे   उतारे केवळ गंमत म्हणुन उधृत करत नाहीत . हजारो मुस्लिमाच्या गर्दीत - सार्वजनिक कार्यक्रमात त्याला एक अर्थ आहे . तो अर्थ कोणता आहे ? तर प्रस्तुत भाषणात  दाभोलकर म्हणतात की "जे विवेकानंद सांगतायात ते आज मी तुम्हाला वेगळ्या कारणाने सांगतोय. " (१) हे वेगळे कारण कोणते आहे ? तर मुहम्मद पैगंबर जयंती.   

त्यानिमित्त दाभोलकर  सर  भाषण देत आहेत . अर्थात दत्त जयंती प्रतिगामी आणी मुहम्मद जयंती पुरोगामी असते  असे लॉजिक महाराष्ट्राला कळून चुकले आहे . हे दाभोलकर  साहेब  कधी असहिष्णू हिंदुच्या धार्मिक  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माझ्या ऐकिवात नाही , पण मुहम्मदाच्या जयंतिचे अध्यक्ष त्यांनी व्हावे हा किती थोरपणा आहेय ! हे आहे पुरोगामित्व !!

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्याकडुन मी बुद्धिवाद , विज्ञान निष्ठा आणि धर्मनिरपेक्षता शिकलो . त्या अर्थाने मी डॉक्टरांचा शिष्य आहे.   त्यांच्या भावाविषयी हा लेख लिहिणे दु:खद असले तरी आवश्यक आहे  . त्याशिवाय पुरोगामित्वाचे स्वरूप लक्षात येणार नाही .  दत्तप्रसाद दाभोलकरांच्या  संपुर्ण भाषणाचे ट्रानस्क्रिप्ट आणि व्हिडियो क्लिप प्रस्तुत लेखाच्या शेवटी आहे .
(संदर्भाचे क्रमांक ट्रानस्क्रिप्टचे  )

मुहम्मद पैगंबराच्या जयंतिनिमित्त अगदी ताजे भाषण जे दाभोलकरांनि सातार्यात केले त्यानिमित्त  मुजाहिद (इस्लामी धर्मयोद्धा ) हि पदवी त्यांना  देण्यास काहीच हरकत नाही . अशाप्रकारे हजारो मुस्लिम माणसे जोडण्याचा जो सुबुद्ध धार्मिक उपक्रम या  मुजाहिद दाभोलाकारानी  चालवला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे .

पण मी त्यांना मुजाहिद म्हणणार नाही कारण …   

दाभोलकरांच्या  अध्यक्षिय  भाषणाची जाहिरात करण्यासाठी जी पत्रके वाटली गेली  ती विशेष पहाण्यासारखी आहेत . त्यात दत्तप्रसाद दाभोलकर यांचा उल्लेख ज्येष्ठ विचारवंत असा केला आहे . इस्लाम हा एकमेव सत्यधर्म असल्या कारणाने   मुस्लिमांनी दत्तोपंताना दिलेली  उपाधी या लेखात वापरायची आहे . ज्येष्ठ विचारवंत हि ती पदवी  आहे.


बर ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या कार्यक्रमाची जाहिरात कोणि केली ? तर मुस्लिम जागृती अभियान ! हे थोर आहेय !! मुस्लिम जागृती अभियान याने परिवर्तन वादि  संघटनांशी  समन्वय साधण्यासाठी काही मंच उभा केल्याचे पत्रकातच स्पष्ट दिसते. पत्रकातल्या फोन नंबरशी  जमाते इस्लामी ब्रिगेडचे धागे आमच्या काही पत्रकार मित्रांनी जुळवले आहेत . मला त्या विषयात जायचे नाही . माझा मुद्दा इतकाच कि -- या पत्रकावरून कार्यक्रम इस्लामी  धार्मिक हे स्पष्ट होते . पत्रकात जिहादचा गौरव आहे . ज्येष्ठ विचारवंत  दाभोलकरांनि सुद्धा स्वत:च्या भाषणात जिहादचा गौरवपूर्ण उल्लेख केला . (२) तो तसा का केला ? जिहादचा अर्थ काय ? इतकेच आपण प्रस्तुत लेखात समजून घ्यायचे आहे .

वरील इस्लामी पत्रकात कुराणाच्या काही आयतीचे क्रमांक  कंसात दिले  आहेत त्याद्वारे इस्लाम गौरव करण्याचा उद्देश पत्रकात स्पष्टपणे दिसतो. असो . पण पत्रकातले एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते वाक्य असे की - " " स्वातंत्र्य समता आणि बंधुता हि त्रिसूत्री मुहम्मद पैगंबरांनि प्रथम मांडली "" . त्यापुढे कुराणातल्या चार  आयतिंचे क्रमांक दिले आहेत. या इस्लामी पत्रकात इतरत्र  सर्वत्र  आयतिंचे क्रमांक कंसात दिले कि मग कुराणाचे तिथल्या  तिथे मराठीत भाषांतर दिलेले आहे . पण स्वातंत्र्य समता बंधुता वाल्या आयतिचे मराठि भाषांतर मात्र दिलेले नाही . अर्थात ज्येष्ठ विचारवंत  दाभोलकर याना त्या  कुराणि आयती माहित असणारच ! मला माहित नव्हत्या म्हणून मी सहजच गुगल करून पाहिले . त्यातली पहिली आयात १८:२९ या क्रमांकाची आहे . त्याचे मराठी भाषांतर दाभोलकरांच्या पत्रकात दिलेले नाही . फक्त आयतीचा क्रमांक दिला आहे . वाचकांच्या सोयीसाठी आम्ही ते भाषांतर इथे उधृत करत आहोत : -

कुराण १८:२९ -  "  कोणि (इस्लामवर ) श्रद्धा ठेवेल , तर कोणि ठेवणार नाही. त्यांना  नास्तिक राहुदे , नक्कीच त्यासाठी आम्ही (अल्लाने ) नरकातील अग्नी तयार ठेवला आहे. अग्नी काफिर नास्तिकांना वेधून टाकेल. जर (नास्तिकांनि ) पाण्याची भीक मागितली तर त्यांना उकळते धातुतेल  दिले जाइल . त्याने त्यांची  तोंडे जळून जातील . कसे वाटते हे खतरनाक  (dreadful) पेय अणि सैतानी बैठक (नास्तिकांना ) बसायला .  http://quran.com/18/29 

या कुराणि आयतीत समता आहे कि ? बंधुता ? कि स्वातंत्र्य ? हे ज्येष्ठ विचारवंत दाभोलकरांना ठाउक असावे . दाभोलकरांनि त्यांच्या भाषणात काही थोर विधाने केली आहेत. त्यातली मोजकी  विधाने जशीच्या तशी पाहुया. विचारवंत  म्हणतात : -

"इस्लाम ने प्रथम स्त्रियांना समानतेचा हक्क दिला. (३)"(प्रचंड टाळ्या ) 
त्यांनी कशाच्या आधारावर हे भाष्य केले ते आमच्या बालबुद्धीस कळणे अवघड आहे . ज्येष्ठ विचारवंत बुरखा , एकतर्फी तलाक आणि बहुपत्नीत्वाला समता म्हणत असावेत .  पण त्यांचे वाक्य सोलो नाही . दाभोलकर म्हणतात   वैदिक धर्म स्त्रियांना प्रचंड त्रास द्यायचा आणि …। हि गोष्ट खरी आहे. कि इस्लाम ने प्रथम स्त्रियांना समानतेचा हक्क दिला. (३) 

ज्येष्ठ  विचारवंतानि इथे हा वैदिक धर्म कोठून आणला हे कळावयास मार्ग नाही . पण मुहम्मदाच्या जयंतित इतर काफिर धर्माची नालस्ती करून एकमेव सत्यधर्मात ( इस्लाम ) मध्ये आवतण देण्याची प्रथा आहे . त्यास इस्लाम मध्ये दावत असे म्हणतात. जमाते इस्लामीच्या वेब साइटवर असे काफ़िरांना इस्लामची दावत देण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. दावत   चे अनेक प्रकार प्रख्यात मौलाना झाकीर नाईक ने डेव्हलप केलेले आहेत. ते सर्व यु ट्यूब पाहता येतील .  कठमुल्ला झाकीर पेक्षा आपले ज्येष्ठ विचारवंत तसूभर कमी नाहीत . (अल्ला त्यांना सुख  देवो )

तर दत्तोपंत दाभोलकर यांनी विवेकानंदाचा दाखला देत १० मिनिटाच्या भाषणात अनेकदा  - विवेकानंदाने हिंदुधर्मावर घणाघाती टिका केली असे खडे बोल सुनावले आहेत . घण मारून नष्ट करण्यात येते . याने अल्लाचे  श्रोते अनंदित झाले असणार. बर त्याला ज्येष्ठ विचारवंताने अशीही पुस्ती जोडली आहे कि , विवेकानंदानि सर्व धर्मावर टिका केली आहे . हे एक त्यांनी बरे केले  असे आम्हाला वाटते  ! पण विवेकानंदानि इस्लाम वर काय टिका केली आहे ? घण नसेल निदान हातोडा तरी ?? हे काही विचारवंत  सांगत नाहीत !!

पंत  असे म्हणतात कि , मशिदीत मुस्लिम स्त्रियांना प्रवेश हवा - अहाहा काय हे पुरोगामित्व !! मग लगेच हेही सांगुन टाकतात कि

" … आणि आजच्या कार्यक्रमात सारख्याच संख्येने किंवा   किमान १० -२० % स्त्रिया उपस्थित आहे - हि ती चळवळ हि ती रचना हाही जिहाद (२) आपल्याला हातात घ्यावा  लागेल …. "

सबब इस्लाम मध्ये इतकीच सुधारणा सहिष्णू दाभोलकरांना  आवश्यक वाटते ! आणि ते सुधारणा या पैगंबर जयंतीला १० % - २०% स्त्रिया उपस्थित राहिल्या त्यात आहेच - अशी मखलाशी आहे ….  बर मागणी अशी कि स्त्रिया मशिदीत येवोत . नमाज पढोत ! अल्लाहू अकबर !! त्यासाठी जिहाद (पराकाष्ठा) हातात घेण्याची  त्यांची  तयार आहे .  पंत आधी डॉ आंबेडकरांचे नाव घेतात आणि भाषणाला सुरवात करतात. अर्थात ते ज्येष्ठ विचारवंत असल्याने त्यांनी आंबेडकरांची पुस्तके वाचली असणार आणि बाबासाहेबांनी बुरख्याचा किती उद्धार केला आहे ते त्याना ठाउक असणारच ! डॉ  आंबेडकर लिहितात : -

ज्येष्ठ विचारवंत हे धार्मिक मूळतत्वाचा भाषणभर प्रसार करत आहेत . तेव्हा या साक्षात पुरोगामित्वास - डॉ आंबेडकर तोंडी लावण्या पुरते बोलायचे आणि इस्लाम मधील मूळ तत्वाकडे जावे असे खचितच वाटत असणार . तेव्हा पवित्र कुराण स्त्री मुक्तीविषयी काय म्हणते ते पाहुया : -

"पुरुष हे स्त्रियांचे मालक आहेत . हे अल्ला ने  - पुरुष स्त्रियांवर जो खर्च (सांभाळ ) करतात त्यासाठी दिलेले आहे . स्त्रियांनी माज केला तर प्रथम त्यास समजावून पहा , नाही ऐकले पलंगावर तिच्यावर बहिष्कार टाका , तरीही नाही ऐकले फटके मारा … पण त्यांनी आज्ञा पालन केले तर  मात्रा त्याना हानी पोचवू नका . अल्ला  कृपाळू आहे . (कुराण ४:३४) http://quran.com/4/34

अल्ला खरोखर कृपाळू आहे , आणि त्याची कृपा दाताप्रसाद दाभोलकर यांच्या स्त्री पुरुष समतेवर कायम राहो ! बाकी  पंतानि इस्लामचा प्रचार अवश्य करावा . तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे . पण दाभोलकर जे हिंदु मुस्लिम प्रश्ना बद्दल बोलले ते खरोखर गंभिर आहे . ते म्हणतात : -

" भारतात बाहेरून येउन किंवा इथल्याच काही इतर अतिवादी इतर धर्मियांनी जर दंगल केली नाही , तर हिंदुस्थानातले मुसलमान हे समता संदेश मानणारे आहेत. ते सामंजस्य करणारे आहेत. (४) "

इथले स्थानिक मुस्लिम दंगल करत नाहीत . एका तर बाहेरून चे लोक्स… म्हणजे कोण कोणास ठाउक ?  किंवा इथले इस्लाम सोडुन इतर धर्मातील इतर अतिवादी  दंगल घडवतात . ज्येष्ठ विचारवंताचे म्हणणे  अगदी योग्य आहे . आता इथल्या अतिवादी लोकांनी दंगल केली तर आणि तरच गरीब बिच्च्यार्या मुस्लिमांनी  उत्तर द्यायला नको काय ??  भारतातील दंगली कोण सुरु करते याचे संख्याशास्त्र कोणीही  उपटून काढू नये . आझाद मैदानावर शांतता धर्माच्या लोकांनी जी दंगल केली त्यामागे ब्रम्ह्देशातील काफ़िरांचा हात होता !!


दाभोलकरी तत्वज्ञान : 

एक धरम घेतला तर समदे  घ्या . नाय तर समदे सोडा. कुराण वेद इत्यादीचा आधार घेऊनच मानव बनता  येते . वगैरे सर्व धर्म समभाव  दाभोलकर सांगत आहेत . हे सारे ते विवेकानंदाच्या नावे बोलत आहेत . प्रथम  हे समजून घेतले पाहिजे कि ,  विवेकानंद काही पुरोगामी वगैरे नव्हते . ते अध्यात्मिक होते . त्यांना साक्षात्कार होत असत . विवेकानंदाना वेदांत वगैरे  गोष्टीची आवड होती . विवेकानंदानि इथल्या वर्ण जातीव्यवस्थेचे  वगैरे भरपूर कौतुक  केलेले आहे . विचारवंती भाषेत सांगायचे झाले तर १९८७ साली रामकृष्ण मठाने प्रसिद्ध केलेल्या पाचव्या खंडात हे सारे १४८ आणि १७४ व्या पानावर मिळेल. असल्या ट्रिक्स  करून काही भले होणारे नाही . वेदा  कडुन इस्लाम सहिष्णुता शिकला आणि इस्लाम कडुन हिंदु समता शिकले असा काही त्यांचा विचार दिसतो . तो सत्याच्या जवळपास सुद्धा नाही . पहिली गोष्ट म्हणजे हिंदु काही समता वगैरे शिकलेले नाहीत . आणि इस्लाम कडून ती कशी शिकता येईल ? तिकडे कुठे आहे समता ? बर वेदाकडुन इस्लाम सहिष्णुता शिकला म्हणजे काय ?  हिंदु भ्याड आहेत . होते आणि राहतील . त्याला दाभोलकर सहिष्णुता म्हणतात . इस्लाम मधील बुरखा , तलाक वगैरे त्याना स्त्री पुरुष  समता वाटते. बाकी मुस्लिम स्त्रियांनी मशिदीत जावे म्हणून आमचे ज्येष्ठ विचारवंत  जिहाद करायला तयार आहेत .

 चालायचंच !

डॉ अभिराम दिक्षित

--------------------------------------------------------------------
 ---------------------

ज्येष्ठ विचारवंताचे व्हिडियो भाषण आणि त्याचे लिखित स्वरूप संदर्भासाठि खाली देत आहोत : - (संदर्भाचे क्रमांक ट्रानस्क्रिप्टचे  )

https://www.youtube.com/watch?v=hyfoNY-Znfc 


सन्माननीय विचारमंच ,  आणि विचारमंचा समोरील सन्माननीय मान्यावर… खूप वेळ झालाय याची मला जाणिव आहे . नाहीतर तुम्हाला  माहित आहे कि मी जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा  तेव्हा तासभर घेतो. आज मी पाच दहा मिनिटाहुन जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही आधीच खूप थकलाय दमलाय याची मला जाणिव आहे. आजच्या कार्यक्रमाच वेगळेपण मोठेपण या पाच मिनिटात मला पुन्हा अधोरेखित करायचंय. मगाशी आपण वेगवेगळ्या धर्मांचे विचार ऐकले. सर्व विचार तुम्हाला पटले असतील अस नव्हे -- मलाही पटले असतील अस नव्हे . त्यावर सविस्तर वेगळी चर्चा होऊ शकते. यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल - पुन्हा पुन्हा सांगता येईल  तर हि कि सर्व धर्म कळत नकळत मानवता धर्म सांगतात. माणुस माणुस म्हणून त्याला बनवतात . माणुसकी हि सर्व धर्मांची खरी ओळख असते. आज त्याच्या पुढे जायची गरज आहे . काही जणांना पटणार नाही . पण जे राजर्षी शाहूनि सांगितलय  - महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडरांनी सांगितलय - विवेकानंदानिहि तेच सांगितलय आजच्या जगाला सर्व धर्म सद्भाव आणि सर्व धर्म समभाव यांची गरज आहे. सर्व धर्म सद्भाव आणि सर्व धर्म समभाव हे प्रर्त्यक्षात आणण सोप आहे - हे आपण सर्व धर्मांची मूळ तत्व पाहिली तर लक्षात येत .

याची चर्चा आपण आज करतोय कारण आज पैगंबर जयंती आहे आणि पैगंबर म्हटलं कि आधी सलिवुल्लाहि वसल्लम अस म्हणाव ;लागत याची मला कल्पना आहे . मला त्यांच्याबद्दल आदर आहे . पण आपण पैगंबर जयंतिला हे म्हणतोय आणि त्याला एक वेगळ महत्व आहे हे मला तुम्हाला सांगायचय . सर्व धर्म समभाव ज्यांनी सांगितलाय त्यामध्ये विवेकानंद येतात. विवेकानंदांनी सर्व धर्मांच्यावर टिका केलीय, आणि हिंदु धर्मावर घणाघाती टिका केलीय. त्यांनी सांगितलय अस्पृश्यता पाळणारा माझा धर्म हा धर्म नव्हे हा सैतानाचा बाजार आहे. पण हे सांगत असतानाच त्यांने सर्व धर्म समाभाव सांगितला आणि तो शक्य आहे अस सांगितल .

तो कसा साकारावा हेही सांगितल आणि धर्म म्हणजे काय ? याची व्याख्याही सांगितली. माणसाला जो माणुस बनवतो तो धर्म हि सर्व धर्मांची एकमेव व्याख्या आहे . त्यामुळे एक धर्म स्वीकारला तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील. आणि एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतील. आणि कोणताही धर्म न मानणारी पण खर्या अर्थाने धार्मिक असलेली माणसंही तुमच्यापुढे असतील. जे विवेकानंद सांगतायात ते आज मी तुम्हाला वेगळ्या कारणाने सांगतोय. (१)

आपल्याला आश्चर्य वाटत १२० वर्षापूर्वी ३ ओगस्ट १८९५ , विवेकानंदानि अमेरिकेत भाषण दिलाय ते त्यांची शिष्या व्होयली बोवल यांनी शब्दांकित केलेलं आहे . तिसर्या खंडात १९९ पानावर आहे . विवेकानंदना तिने म्हटलंय …. विवेकानंदानि ख्रिश्चन माणसे आणि ख्रिश्चन धर्म गुरुंसमोर , मुहम्मद पैगंबरांनी केलेलं कार्य आणि त्यांच मोठेपण याच्यावर भाषण केलाय (टाळ्या )

आपण हे विसरून जातो , विवेकानंदानि हे जे भाषण दिलय, विरा करंदिकर त्यांची तीन पुस्तक आहेत , विश्व मानव स्वामी विवेकानंद … केवढी आनंददायक  गोष्ट आहे , केवढी आशादायक गोष्ट आहे , केव्हढा चमत्कार आहे…. एक हिंदु संन्यासि अमेरिकेतल्या ख्रिश्चनांच्या समोर आणि ख्रिस्ती धर्म गुरुंच्या समोर, मुहम्मद पैगंबरांच योगदान याच्यावरती बोलतोय.

विवेकानंद एकदाच बोललेले नाहीत - त्यानंतर विवेकानंदानि २१ सप्टेंबर एकोणिशे म्हण्जे मृत्युपूर्वी दोन वर्ष आधी असाच भाषण दिलाय आणि ते त्यांनी पुन्हा अमेरिकेत दिलय. ते तुम्हाला विवेकानंद ग्रंथावलिच्या नवव्या खंडात शेवटी मिळेल. त्यामध्ये विवेकानंदानि पुन्हा पुन्हा सांगितलय कि तुम्ही जर धर्म मानत असाल तर तुम्हाला ,सर्व प्रेषीतांचा आदर करावा लागेल . सर्व प्रेशितांना समजावून घ्याव लागेल. आणि त्या प्रेशितांनि काय सांगितलय ते समाजावून घ्याव लागेल . आणि हे समजावून घेताना -- धर्म हे ग्रंथावर आधारित नाहीत - तर ग्रंथ हे धर्मावर आधारित आहेत .  ग्रंथानि जी मूलतत्व सांगितली ती आणि धर्माने जी मूलतत्व सांगितली ती जर वेगळी असतील तर ती आपण तपासून घेतली पाहिजेत. मगाशी एकान सांगितल की वैदिक धर्म स्त्रियांना प्रचंड त्रास द्यायचा आणि …। हि गोष्ट खरी आहे. कि इस्लाम ने प्रथम स्त्रियांना समानतेचा हक्क दिला. (प्रचंड टाळ्या ) (३)

पण विवेकानंद पुढे काय म्हणतात ते आपण विसरूतो. विवेकानंदानि हिंदुधर्मावर घणाघाती टिका करताना सांगितलय, की रजस्वलेने मंदिरात जाऊ नये अशी भंपक चर्चा करत हा धर्म उभाय आणि विवेकानंद   म्हणतात कि वेश्यांनाहि मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे -- पण त्यावेळी विवेकानंद विचारतात  - कि हे जर आपण सांगतोय आणि जर आपण मुहम्मद पैगंबरांना समजावून घेतलय…. तर आपल्याला हे हि कदाचित सांगाव लागेल….  की मशिदीतही स्त्रियांना हक्क मिळाला पाहिजे - ज्यावेळेस आपण सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्म सद्भाव म्हणतो - त्यावेळी स्त्री पुरुष समानता आहे . आणि आजच्या कार्यक्रमात सारख्याच संख्येने किंवा   किमान १० -२० % स्त्रिया उपस्थित आहे - हि ती चळवळ हि ती रचना हाही जिहाद (२) आपल्याला हातात घ्यावा  लागेल …. 


हे जर करायचं असेल तर या देशात ते फार सोप्पय … हे  विवेकानंदानि सांगितलय - ते म्हणाले - सोप्प आहे याच कारण अस्य कि हि गोष्ट ज्याला करायचीय --- त्यांनी हि गोष्ट समजली पाहिजे कि केवळ माणसाला जो माणुस बनवतो तो धर्म -- आणि एक धर्म स्वीकारला तर सार्या धर्मांचा स्वीकार करावा लागतो . आणि एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतात. इथे थांबता येणार नाही … तर समोरच्या धर्मातली जी चांगली गोष्टय त्यांचा आपण आदर  केला पाहिजे - सन्मान केला पाहिजे . आणि त्याच वेळी आपल्या धर्मात नसलेली आणि दुसर्या धर्मात असलेली जी गोष्ट्य… ती आपण घेतली पाहिजे. आणि विवेकानंदानि भारताच्या संदर्भात सांगितलय … ते हि लक्षात घ्या …. विवेकानंदानि  १० जून १८९८ ला सर्फराज मुहम्मद हुसेनना  पाठवलेले पत्रय.  १० जून १८९८ …. विवेकानंदान अमोराहून सर्फराज मुहम्मद ला पाठवलेल पत्रय - ते लिहितात … आमच्या अद्वैत वेदांतातले सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले तरीही समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला तो इस्लामनेच. आणि पुढे सांगतायत हे सर्व धर्म काळाच्या एका चौकटीत बंदिस्त झालेत . आणि पुढे सांगतायत - जिथे वेद नाही कुराण नाही आणि बायबल हि नाही अशा ठिकाणी  आपल्याला मानवजातीला घेऊन जावे लागेल. आणि हे काम आपल्याला वेद बाउबल आणि कुराण यांचा आधार घेऊनच कराव लागेल . हा मुद्दा बाजूला ठेवू पण त्यांनी सांगितलय  कि इस्लामने  प्रथम समतेचा संदेश दिला आणि पुढे हे हि सांगितल कि इस्लाम आणि इंग्रज यांच्या राजवटी मुळे  हिंदु धर्मात थोडी फार समता आली    .

 हे हि विवेकानंदांच्या भाषणात आहे. पण विवेकानंद हीही गोष्ट दुसर्या प्रकारे सांगतात. विवेकानंदांचा  अमेरिकेत ट्वेण्टिएथ सेंच्युरी होल मध्ये त्यांचा फार मोठा एक आसा परिसंवाद झाला. त्यानंतर त्यांची एक संपुर्ण मोठी अशी मुलाखत झाली होती आणि वेदांताच काम यावर ते बोलले होते . ते म्ह्टले इस्लाम पासून आम्ही समताच शिकलो. आणि इस्लाम वेदांतापासुन सहिष्णुता शिकला. आणि म्हणून विवेकानंद असे म्हणतात कि , भारतातला इस्लाम हा जगभरच्या  इस्लामचा एक भाग आहेच …  पण तो जग भरातल्या इस्लाम पेक्षा अधिक सहिष्णू आहे. विवेकानंद म्हणतात  भारतात बाहेरून येउन किंवा इथल्याच काही इतर अतिवादी इतर धर्मियांनी जर दंगल केली नाही , तर हिंदुस्थानातले मुसलमान हे समता संदेश मानणारे आहेत. ते सामंजस्य करणारे आहेत (४) आणि हे होऊ नये अस वाटत असेल तर या दोन धर्मांचा समन्वय या देशात पाहता येईल.

हे सांगताना विवेकानंद याच्याही पुढे गेलेत . विवेकानंदांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणि ते अंबाल्याला गेलेत आणि ते अंबाल्याला का गेलेत माहितेय ? ते अंबाल्याला गेले कारण अंबाल्यामध्ये आर्य समाजी  आणी इस्लाम  यात काही कुरबुर सुरु आहे अस त्यांना कळल म्हणून ते तिथे गेले. त्यांनी दोन्ही धर्मियांच्या प्रमुखाशी शंका केली . ते त्यांनी, ते संकट टाळल आणि त्यांनी अंबाल्याला फक्त एकाच संस्थेला भेट दिली . ते म्ह्टले  हिंदु मुसलमान मुल जिथे एके ठिकाणी शिकातात , आणि हिंदु मुसलमान मुलीही येतात अशा शाळेत मला जायचय. मित्रहो विवेकानंदांनि जे सांगितलं तो सर्व धर्म समाभाव आहे.

आपण मगाशी जे पाहिलं तो ही सर्व धर्म समभावय  आणि  सर्व धर्म समाभाव सर्व धर्म सद्भावा जवळही गेला  पाहिजे. हे सांगताना विवेकानंद आपल्या आयुष्याच कार्य सांगतायत - सर्व धर्मातल्या सर्व धर्म ग्रंथातल्या ज्या गौण गोष्टी आहेत. त्या गौण गोष्टींचा त्यांच्या मूलभूत तत्त्वांशी संबंध नाही . त्यांच्यावर खुल्या मनानी चर्चा झाली पाहिजे - आणि ते बदलायचं असेल तर बदलल पाहिजे आणि हे सांगताना विवेकानंदानि जे सांगितल डिव्हिनिटि ऑफ मेन बद्दल ते मी त्यांच्याच शब्दात वाचून दाखवतो आणि थांबतो . त्यांनी सांगितल जो हिंदुंचा ब्रम्ह आहे -- पारशांचा उर्मनय आहे , बौद्धांचा बुद्ध आहे , ज्युंचा जेहोवा आहे , ख्रिस्तांचा आकाशातील देव आहे आणि मुस्लिमांचा मुहम्मद पैगंबर आहे तो एक आहे . हे मी जाणतो - आणि तो एक आहे हे मी जाणतो तेंव्हा मी माणुस बनतो - 

मित्रहो -- सर्व धर्म समभावाचा हा संदेश आहे . आणि हा संदेश खर पाहता , आपल्याला आजच्या दिवशीही मिळतो आजच्या सर्व मोठ्या माणसांच्या कार्तुत्वातून मिळतो . एक चांगला कार्यक्रम इथे संपन्न झालाय . खूप वेळ असूनही आपण थांबलात . सर्व वक्त्यांनी चांगली भाषण दिली . आणि एक अतिशय चांगला कार्यक्रम इथे संपन्न झाला . आपण सर्व आलात . आपणा सर्वांचे आभार .

व्हीडियो भाषण

१० डिसें, २०१५

संघ आणि विज्ञान निष्ठा

संघ आणि विज्ञान निष्ठा 


स्वत:वरील टिकाकारांना चालना देऊन त्याचे विचार मागवून घेण्याचा - ते प्रसिद्धही करण्याचा संघाने नवा उपक्रम  राबविला आहे . उपक्रम स्तुत्य आहे . बुद्धिवाद - विज्ञान निष्ठे कडे टाकलेले एक पाउल आहे .  नवे शिकण्याची आणि वैचारिक आदान प्रदानाची  हि पद्दत  . या उपक्रमाचे नावही आकर्षक आहे : संघाची ९० वर्षे: गरज मंथनाची, संधी आत्मचिंतनाची, समीक्षा विचारवंतांची. अशा उपक्रमामुळे मुळे संघाचे कल्याण होईल असा  त्यांचा हेतू आहे  , शिवाय  भारताचे तर कोट कल्याण होईल असे आम्हाला वाटते . संघ परिवार सत्तेत असताना असा उपक्रम राबवणे स्तुत्य आहे .  ज्यांना सहसा पुरोगामी म्ह्टले जाते त्यांच्यातही हा गुण अस्तंगत होत चाललेला आहे .  

सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच सांगितले की, ‘हिन्दू धर्मांतील कोणताही विचार जर विज्ञानविरोधी असेल तर तो टाकून दिला पाहिजे आणि वैज्ञानिक विचार स्वीकारला पाहिजे.’  (१) १० सप्टेंबर १५ च्या इंडियन एक्स्प्रेस मध्ये हि बातमी आहे . पण  याउलट २४ सप्टेंबर च्या आउट्लुक मध्ये  भागवतांचे दुसरे विधान प्रसिद्ध झाले आहे.  त्यात भागवत म्हणतात कि, " विज्ञानाला मर्यादा आहेत - वेदाला नाहीत " तसेच  हिंदु धर्माचे आचार्य , संत आणि अभ्यासकांनी   वेदाचा कालसुसंगत  काढावा अशी पुस्ती त्यांनी जोडली  आहे . (२)  धर्मग्रंथांचा असा कालसुसंगत अर्थ अनेक प्रकारे काढता येतो . उदाहरणार्थ :- 

अ - आ - इ   

अ) वेदात विमाने होती, (हत्ती + माणुस =) गणपतीचा जन्म हे प्लास्टिक सर्जरीचे उदाहरण आहे किंवा गायीचे तूप जाळले कि ऑक्सिजन  निर्माण होतो असे म्हणता येते . परिवारातील अनेक महत्व पूर्ण व्यक्तींनी तत्सम विधाने केली आहेत . भारतीय संस्कृतीत / धर्मात विज्ञानच ठासून भरले आहे असे हे मत आहे.  (३)

आ) वेद फालतू आहेत. खरे विज्ञान अवैदिक परंपरात आहे. बौद्ध / बळी / शैव इत्यादी परंपरा खर्या अर्थाने वैज्ञानिक आहेत. विज्ञान पुरातन आहे. मात्र ते वेदात नसून अवैदिक प्रथात आहे. असाही युक्तिवाद करता येईल . या आर्ग्युमेंट मागे काही राजकीय समिकरणांचे हिशोब असले तरी अशी श्रद्धाही  अनेक  जण  मनापासून बाळगतात.

इ ) मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा   कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. कष्ट करून पुढच्या  पिढीत संपत्ति वाढवत नेता  येते .  जे संपत्ति बाबत खरे आहे तेच विज्ञाना बाबतही खरे आहे . दर पिढीत ज्ञानाची बेरीज होत असते . आणि ज्ञान वाढले कि त्यातून तर्कशास्त्र , तंत्रज्ञान आणि विज्ञान विकसित होत जाते … पिढी दर पिढी. त्यामुळे वेदाला, वेदांताला, अवेदाला  आणि  कुराण,  बायबल,  अवेस्ताला कपाटात ठेवून द्या. आजच्या जगण्याशी त्याचा काही संबंध नाही. 

----------------------------------
वरील  अ , आ , इ पैकी कोणता दावा 'अ'वैज्ञानिक आहे ? कोणता 'आ'चरट आहे ? आणि कोणता 'इ'ष्ट आहे ? हा लेखाचा विषय आहे . 
----------------------------------
विज्ञानाचे समर्थन सरसंघ चालकांनी करावे हे अत्यंत स्वागतार्ह आहे. पण विज्ञान म्हणजे काय ते आधी ठरवावे लागेल. अ ? आ ? की  - इ ? … त्या आधी हे ठरवावे लागेल कि संघानेच का बरे विज्ञान निष्ठ व्हावे ? बुद्धिवादाची मक्तेदारी  तर डाव्यांकडे जाते ! ते सुद्धा  जर पुरेसे विज्ञान निष्ठ नसतील तर मग संघच का ? बुद्धिवाद कोरडा कोरडा असतो . त्यामुळे स्वयंसेवकांचा उत्साह भंग झाला तर ?  प्रश्न रास्त आहे. उत्तर सोपे आहे. उत्तराकडे जाण्याआधी लेखाकाची भूमिका काय ? आणि संघाचा हेतू काय ? यावर थोडेसे भाष्य करुया .

आमची भूमिका : हिंदु हा धर्म नाही . ते लोक आहेत . त्यांचे अनेक धर्म आहेत.  भारतातील समग्र  हिंदु संस्कृतीने ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा मला अभिमान वाटतो. आणि तिच्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्याची मला शरम / लाज वाटते. लाज स्वत:च्या वाइट गोष्टींची वाटत असते . परक्याच्या नव्हे .   या अर्थाने माझी  ओळख   हिंदु अशीच आहे.  (धर्माच्या  अर्थाने नास्तिक असलो तरीहि ) मी कितीही आटापिटा केला तरी जग मला हिंदू हि  आयडेंटिटि  देणार आहे . तसेच हिंदुच्या  हितासाठी या समाजात बुद्धिवादी आणि उदारमतवादी प्रवाह  वाढीस लागणे आवश्यक आहे असे मला वाटते . संघ हि हिंदु साठीची संघटना असेल तर त्याच्याशी संवाद साधणे आणि त्याकडून अपेक्षा बाळगणे मला गैर वाटत नाही.

संघाचा हेतू काय ? हिंदु हित ? 


 संघ हि  जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. हि आनंदाची गोष्ट  आहे .  ती हिदू लोकांसाठी काम करते . हि त्याहून आनंदाची गोष्ट आहे . प्रश्न असा कि - 

हिंदु लोकांच्या हितासाठी कि संस्कृती  रक्षणासाठी ? हिंदू  लोकांचे हित कशात आहे ? मागे जाण्यात कि पुढे जाण्यात ?  

कोणीतरी रामतीर्थकर नावाच्या बाइंचि व्याख्याने मी ऐकली आहेत. बाईंचे विचार भीषण आहेत . हिंदु स्त्रियांनी गुलामीत जगणे  हा त्यांच्या कुटुंब  व्यवस्थेचा आधार आहे. (४) युट्युबवरील हे भयंकर विचार नव्या पिढीने ऐकले तर त्यांचे संघाविषयी  चांगले मत बनणे अशक्य आहे . या रामतीर्थकर  ताइंचि  भाषणे परिवारातल्या संस्थानि आयोजित केलेली मी पाहीलि आहेत.


राजीव दिक्षित नामक व्यक्तीची भाषणे आजही परिवारात प्रचारित होत असतात. संघाच्या  फेसबुक पेजवर हि हे दिसेल . हे दीक्षित साहेब रेकोर्डेड भाषणात :  राम मोहन रॉय सकट अनेक समाज सुधारकांची  टिंगल करत असतात. राजीव साने यांनी त्यांच्या ब्लोग वर केलेली दीक्षित ब्रँड स्वदेशीचे विचित्र विश्व  ही चिकित्सा अवश्य वाचावी.(५)

धर्म म्हणजे कर्तव्य असेल तर स्वत:च्या आईला सतीच्या चितेत ढकलणे हाही कधीकाळी पुत्रधर्म होता.   सती शिळा हरेक जुन्या गावात दिसतात. काही सांस्कृतिक कार्यक्रमात वीरपुरुष आणि बरोबर या सती शीळेचे पूजन झालेले मी पाहिले आहे . सती प्रथेची शरम वाटली पाहिजे. आपल्या माता भगिनिंना आपल्या पूर्वजांनी जाळून मारले त्याचा अभिमान कसा काय धरता येईल ? पराशर स्मृतीतल्या चौथ्या अध्यायात (श्लोक ३१-३३)  सतीचे समर्थन आणि कौतुक केलेले आहे.(६)

 राजा राम मोहन  रॉय हे सतिप्रथेचा विरोध करणारे समाजसुधारक होते .  एकिकडे सुधारकांची टिंगल  उडवणारे दिक्षित तुमचे ! (५) आणि दुसरीकडे  सनातन धर्माचा जयघोष  तुमचा ! सनातन धर्मात पराशर स्मृती येते आणि दिक्षितांमधे विखार …. याकडे दुर्लक्ष कसे करता येईल ?   प्रतिगामी आणि विज्ञान विरोधी प्रचार केला तर संघावर आधुनिक भारतीय मन प्रेम करेल ? की टिका करेल ??

संघाचे स्वदेशी प्रेम केवळ बबुल टुथपेस्ट  किंवा डाबर च्यवनप्राश खाण्या  इतके मर्यादित नाही . हिंदु जीवनपद्धती , विचारधारा , हिंदु अर्थशास्त्र , हिंदु विज्ञान वगैरे भागहि  त्यात येतात. हिंदु विज्ञान ? हा काय प्रकार आहे ? विज्ञान विज्ञान असते. त्याचे  हिंदु विज्ञान केले की मग वेदातली विमाने शोधत बसावी लागतात.आर्यभट : प्राचीन भारतीय गणिती

जयंत नारळीकर यांनी वाढवलेल्या पुण्याच्या आयुका संस्थेत प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि गणिती यांचे पुतळे आहेत. हिंदु लोकांनी काही प्रमाणात गणित आणि खगोल शास्त्र या विषयात प्रगती केली होती .  शून्य वापरून दशमान पद्धतिने आकडे लिहिण्याचा शोध भारताने लावला आहे. आजच्या गणित आणि विज्ञानाचा तो पायाच आहे. पुढे अरब व्यापार्यांनी भारतीय दशमान पद्धती आत्मसात करून हे गणित युरोपला शिकवले.  हे हि सर्वमान्य आहे. गंमत अशी कि हे  "हिंदु" गणित आहे म्हणून अरब किंवा युरोपने नाकारले नाही . युरोपाने  त्याचा विकास   केला आणि पुढे जगावर राज्य केले.

आर्यभटाचे गणित त्या काळी पुढारलेले होते ते इतरांनी स्वीकारले . आम्ही मात्र आज पुढारलेल्या लोकांचे आधुनिक विचार स्वीकारण्या ऐवजी वेदात विमाने शोधत असतो . विमान बनवायला स्क्रू लागणार . स्क्रू बनवायला - कारखाना - पोलाद -  खाणी . विमानाचे हजारो भाग त्याचे लाखो कारखाने . सारे वैदिक काळात होते ?? विमान उपटसुंभासारखे उडत नसते…  त्यामागे  गणित , विज्ञान , तंत्रज्ञान आणि हजारो लोकांचे श्रम उभे असतात. शेकडो पिढ्या त्याचा एक एक स्क्रू आणि पंखा  तयार करण्यासाठी झटलेल्या असतात .

वेदातली विमाने शोधणे याला आपण विज्ञान समजू लागलो तर मानवी उत्क्रांतीचा मूलभूत प्रवास आपल्याला समजलेला नाही. जे विमाना बाबत खरे आहे तेच जीवनपद्धती आणि संस्कृती बाबत हि खरे आहे . त्याचाही दर पिढीत विकास होत असतो . कारण ज्ञानाचा साठा वाढत असतो .

माझ्या लहानपणी संघातून आलेले एक निमंत्रण मला आठवते. कोणीतरी जोशीबाई नावाच्या व्याख्यात्या होत्या. आणि विषय होता : 

शिवलिंग आणि अणुभट्टी ! यावर काही चर्चेची आवश्यकता आहे काय ? हा  दंभ अपवादात्मक  आहे कि सार्वत्रिक ? याचा विचार संघ स्वयंसेवकांनिच करायचा आहे .विज्ञान निष्ठा म्हणजे काय ? 


हेलिकॉप्टर , रोकेट आणि अणू बॉंंम्ब म्हणजे विज्ञान………  विज्ञान निष्ठा नव्हे ! 
विज्ञान वेगळे आणि विज्ञान निष्ठा वेगळी . 
टेक्नोलोजी चा विकास म्हणजे विज्ञान निष्ठा नाही . विज्ञान निष्ठा हि कलाशाखेची  संकल्पना आहे . सर्व भौतिक व आर्थिक प्रगतीचा पाया विज्ञान आहे. तर विज्ञान निष्ठा हा सामाजिक सुधारणांचा , नैतिक प्रगतीचा आणि सांस्कृतिक उन्नतीचा पाया आहे . 

या निवडणुकीत मोदींनी विकास हा मुद्दा घेतला होता . तो विज्ञानाचा पुरस्कार आहे . विज्ञान निष्ठेचा नव्हे.  वाजपेयी सरकार ने केलेल्या पोखरण च्या अणुस्फोट स्थळी शक्तिमंदिर बांधायची घोषणा विश्व हिंदु परिषदेने केली होती.(७) यातून काय दिसते ? विज्ञान हवे पण विज्ञान निष्ठा नको !! प्रचंड उर्जा निर्माण करत विध्वंस करणारा अणुस्फोट करणे जेव्हढे आवश्यक व अवघड असते , त्यापेक्षा लोकांना विज्ञान निष्ठ पद्धतीने विचार करायला लावून त्यांच्यातील अंधश्रद्धेचा स्फोट करणे कितीतरी अधिक आवश्यक व अवघड असते. 

इंदिरा गांधीनी पहिले पोखरण घडवल्या नंतर घटनेच्या ५१(अ - ह ) कलमात सुधारणा करून   भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यात वाढ केली होती. त्यानुसार आज विज्ञान निष्ठ दृष्टीकोन (scientific temper)  , मानवता वाद (humanism) , चिकित्सक बुद्धी (spirit of inquiry) आणि सुधारणावाद (reform) यांचा विकास करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. (८)

यातला प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचा आहे. हे  सर्व शब्द एकमेकांशी संबंधित आहेत. विज्ञान निष्ठ दृष्टीकोनातून धर्म आणि परंपरा यांची चिकित्सा करून  धर्मात सुधारणा केल्या कि मानवतावाद जोपासता येतो . संघाला हे मान्य आहे का ? 

इंदिरा गांधिंनी अनेकदा घटना दुरुस्ती केली . त्यांना कोणि प्रतिगामी ठरवले नाही . मात्र संघ परिवार सत्तेच्या जवळपास फिरकला कि , घटना बचाव चे नारे बुलंद होतात. विरोधाचा काही भाग हे राजकीय ढोंग असेलही. पण संघाची अनेक हिंदुनाच भीती वाटते हे सत्य लपवता येणार नाही . घटनेत दुरुस्तीला कोणाचा विरोध नाही . घटना हे कसले प्रतिक आहे ? - ते छोडो  कल की  बाते - मागचे सोडा पुढे पहा याचे प्रतिक आहे . संघाचा चष्मा भविष्य लक्षी नाही तो पुराणमतवादी आहे अशी भिती हिंदुनाच वाटते . तुमचा  इतिहासाचा अभिमान  जितका सहज  आहे तितकीच शोषीतांना त्याची वाटणारी भीतीही नैसर्गिक आहे .

संघावर नेहमी टिका का होते ? 


त्यात सुशिक्षित लोक आघाडीवर का असतात ? चेतन भगत या लेखकाने एक मार्मिक वक्तव्य मागे केले होते .
प्रधानमंत्रि मोदि हे  राहुल प्रमाणे हुच्च इंग्लिश बोलत नसल्याने इंग्रजी पत्रकार त्यांचा तिरस्कार करतात असे चेतन म्हणाला होता . त्यात काही अंशी तथ्य असले तरी आधुनिक विचार हा इंग्लिशचा बटिक नाही . गणपतीच्या प्लास्टिक सर्जरीचे उदाहरण प्रधानमंत्र्यांनि दोन हॉस्पिटलच्या उद्घाटनात दिलेले मी स्वत:च्या कानांनी ऐकले आहे.(३) हे सारे आधुनिक जगात आदरणीय ठरेल ? कि विनोदी ?  हि सारी उदाहरणे मोदींनी बहुदा बात्रांच्या पुस्ताकात वाचली असावीत.

 आधुनिक परिभाषा आत्मसात नसल्याने …  परिवारापुढे नेमक्या काय अडचणी येतात ते समजून घावे लागेल. आधुनिक परिभाषा पाठांतर करून शिकता येत नाही … त्यासाठी विचारही आधुनिक असावा लागतो यावरही चिंतन करावे लागेल .

भाजपा सरकारच्या विविध नेमणुका का वादग्रस्त ठरतात ? ते  समजून घ्यावे लागेल.  उदाहरण म्हणून दिनानाथ बात्रा आणि सुदर्शन राव यांच्या नेमणुका पाहुया . हे दोघेही संघ परिवारात महत्वाचे व्यक्ती आहेत. दिनानाथ बात्रा हे संघाच्या विद्या भारतीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे तेजोमय भारत हे पुस्तक गुजरात सरकारने शाळेत अभ्यासाला लावले होते . या पुस्तकात बात्रा लिहितात :

"महाभारत काळात जेनेटिक्स चे उल्लेख येतात. कुंतीला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र होण्याचे हेच रहस्य आहे . गांधारीच्या अबोर्शनचा मास गोळा द्वैपायन ऋषींनी औषधी प्रक्रिया करून -- शंभर तुकड्यात कापला -- मग तो १०० तुपाच्या रांजणात दोन वर्ष ठेवला. त्या रांजणातुन  गांधारीचे १०० पुत्र जन्मले." (९) 
मासाचा गोळा , शंभर तुकडे , जेनिटिक्स ? हि नेमकी कोणाची चेष्टा आहे ? गांधारीची  ? कि विज्ञानाची ? सूर्याबरोबर जेनिटिक्स ? सुर्याचे जीन्स कुठे मिळाले ? याबरोबर बात्रांनी  पेटंट अमेरिका असे शब्दहि वापरले आहेत . हे सगळे प्स्युडो सायन्स आहे .कोन्ग्रेस समाजवादी हे खरे सेक्युलर नाहीत ते इस्लामचे लांगुलचालन करतात म्हणून त्यांना प्स्युडो सेक्युलर म्हणावे हे संघाचे मत मला मान्य आहे . संघाच्या प्स्युडो सायन्स चे काय करायचे ? हे प्सुडो सायन्स शाळेतल्या विद्यार्थ्यांची बुद्धिहत्या करते आहे . पण मुद्दा त्याहून गंभिर आहे . हे छद्म विज्ञान हिंदु समाजाच्या हि मुळावर उठले आहे. आणि दुष्ट रूढींचे समर्थन करून हिंदु समाज अधिक छिन्न विच्छिन्न करत आहे.


सुदर्शन राव हे संघाच्या इतिहासविषयक संकलन शाखेचे सदस्य आहेत . त्यांची  (ICHR) सरकारी भारत इतिहास परिषदेचे प्रमुख म्हणून नेमणुक झाली होती . सुदर्शन यांनी जाती व्यवस्थेचे गुणगान करणारे लेखन केले होते . त्यावर  बरेच वादंग झाले . पुढे त्यांनी राजीनामा दिला (१०)

सुदर्शन नेमके काय म्हणाले या वादात  खोल खोल जाता येईल . जात वर्ण याची चर्चा करत गोल गोल फिरता येईल . तरी कुंती सूर्य  जेनिटिक्स वाले बात्रा , विमानवाले  बोडस , जातवाले सुदर्शन यांची मते एकंदर संघ परीवारात मान्य आहेत यापासून पळुन जाता येणार नाही. कदाचित शीर्ष नेतृत्व आणि प्रवक्ते  अमान्य करतील पण  बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा यापासून परिवार कोसो दूर  आहे.

 भारतीय राजकारणाच्या समाजकारणाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर ते आत्मसात केले पाहिजे . बात्रा , बोडस , सुदर्शन  पेक्षा अधिक बरी  माणसे मिळवता आली पाहिजेत , टिकवता आली पाहिजेत. त्यासाठी काही मूलभूत भूमिकांवर चिंतन करावे लागेल. 

-----------------------------
भारतीय संस्कृती हि इतरांपेक्षा थोर आहे . ती जगाला मार्गदर्शक आहे . अशी भूमिका एकदा घेतली कि , मग जुन्या शिळ्या  गोष्टींचे येन केन प्रकारेण समर्थन करत बसावे लागते . आणि संघ ते  करतो हि वस्तुस्थिती आहे. 
-----------------------------


सेक्युलारीझम = विज्ञान निष्ठा  


राजनाथ सिंहाचे पंथनिरपेक्ष विधान बरेच गाजले . ते मत त्यांच्या एकट्याचे नाही . धर्मनिरपेक्ष या शब्दा ऐवजी पंथनिरपेक्ष असा शब्द वापरावा असे मत संघात प्रचलित आहे. का ? धर्म म्हणजे कर्तव्य - मातृधर्म पितृधर्म  शेजारधर्म इत्यादी … मग कर्तव्याला  कर्तव्यच  का म्हणायचे नाही ? धर्म का म्हणायचे ? 

कारण हिंदु हि जीवन पद्धती आहे असे संघाला वाटते. सगळी गोची इथून सुरु होते. मौलवी  झाकीर नाईकाला इस्लाम हि जीवनपद्धती वाटते. बुरख्या पासून शरिया पर्यंत आणि हदीस मधील बुद्धिवादापर्यंत सारे जीवन कसे जगावे याचे मार्गदर्श इस्लाम करतो म्हणून तो "दिन " = जीवन पद्धती आहे असे कठमुल्ल्यांचे मत आहे . तुम्ही जर हिंदु हि जीवन पद्धती म्हणार असाल तर मग … फरक काय राहिला ? 

जीवन पद्धती म्हणजे कसे जगावे , कोणते कपडे घालावेत ? (जीन्स ) काय खावे ? (सामिष ) काय प्यावे ? कसा विचार करावा ? बायकोने नवर्याशी  कसे संबंध ठेवावे ? आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवावे काय ? खाप पंचायती असाव्यात काय ? समलिंगी संबंधांना परवानगी द्यावी  का ? जातिव्यवस्थेचे काय करावे ?

हे सगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे जीवनपद्धती - हि जीवनपद्धती हिंदूची - आता यावर आक्षेप येणार हे उघड आहे . या आक्षेपांचि चर्चा वर दिलेल्या अ / आ / इ अशा तिन्ही प्रकारे करता येईल . एकतर आमच्या कडील सर्व परंपरा अतिशय उत्तम सुधारक आहेत असे म्हणत वैदिक कि  अवैदिक ? - धर्म ग्रंथ - त्याचा खरा अर्थ - बफेलो न्याशनालीझम कि गोमाता ? याचा पिंगा घालात गोल गोल घुमत राहता येईल. किंवा धर्म ग्रंथ आणि परंपरा आता जुन्या झाल्या . मागचे सोडा पुढे पहा असेही म्हणता येईल . (= सेक्युलारीझम )

भारताच्या राज्यघटनेत अगदी पहिल्या पासून सेक्युलारीझम आहे तो घटनेच्या २५ व्या कलमात आहे. पुढे तो प्रिएम्बल मध्ये आला म्हणून घटनेच्या ढाच्यात काही फरक पडत  नाही. आपल्या घटनेतले प्रत्येक कलम सेक्युलर आहे . सेक्युलारीझम चा भावार्थ - मागचे सोडा पुढे पहा इतकाच आहे .  

उदाहरणार्थ समान नागरी कायदा हि संघाची अतिशय चांगली मागणी आहे. त्याचा पायाच मुळी  सेक्युलारीझम आहे .  कुराण किंवा शरियत मधील कायद्यानुसार चार बायका - तीनदा तलाक आणि अरबी पोटगी चालणार नाही . इस्लामी कायदे पाळण्याचा अधिकार मुस्लिमाना नाही. त्यांनी आधुनिक कायदे पाळावेत असा तो आग्रह आहे . हा कायदा मुस्लिम स्त्रियांच्या हिताचा आहे .

जर मुस्लिमाना आधुनिक कायदे पाळायचे आवाहन करायचे असेल - तर हिंदुनि काय करावे ? आधी स्वत: आधुनिक व्हावे ? कि धर्म - पंथ - कर्तव्य - उपासना पद्धती यात गोल गोल फिरत राहावे ? 


हमीद दलवाई काय म्हणतात ? 


खरे पुरोगामी आणि मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई म्हणतात , 
  " हिंदू आणि मुसलमान अशा जातीय तत्त्वावर या देशाची एकदा रक्तरंजित फाळणी झाली. एक देश इस्लामी पाक पाकिस्तान झाला.  तेंव्हा  दुसरा देश हा हिंदुचा हिदुस्थान झाला पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. मग हिंदूचे धर्मराज्य वगैरे आपोआप संकल्पना येतात , दुसरी संकल्पना मुस्लिमांची ! कि हा देश धर्म निरपेक्ष आहे .इथे धर्म स्वातंत्र्य आहे … तवा हवा तेव्हढा आणि वाटेल तसा इस्लाम आम्ही पाळणार ! इस्लाम पाळणे हा आमचा घटना दत्त अधिकार आहे . दोन्ही संकल्पना साफ चूक आहेत ."

मुस्लिमांच्या पक्षपातासाथि  देश सेक्युलर नाही . या देशात १०० % हिंदू असते तरीही हा देश सेक्युलरच राहीला पाहिजे  .   


या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमांसाठी नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता . सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील . शासकीय निर्णय न्याय , नीती , आचरण इत्यादी आधुनीक  चष्म्यातून घेतले जातील . आदत आणि इबादत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . कुणाची पूजा करावी आणि पारमार्थिक बाबिना इबादत म्हणतात . या इबादत चे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षतेत जरूर आहे.  आदत म्हणजे इहलोक .आणी  इथले नियम . किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही . सर्व हक्क शासनाकडे आहेत .  या देशात फक्त हिंदूच राहिले असते तरीही हा देश सेक्युलरच राहिला असता. मनुस्मृती नाही , कुराण नाही कोणताच   फायनल ! असा ग्रंथ नाही . आम्ही नव्या ज्ञानाचे मानवतेचे आणि बहुविधतेचे चाहते ……हि आमची  चाहत . आणि शेवटची इच्छा !  माणसाच भल माणसांनी करायचं असत … माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी  युद्ध लढणार आहे . आयकल का ?  हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन !  (११)
एक मुसलमान म्हणून मुस्लिमांच्या हितासाठी हमीद लढू शकतो - त्याना आधुनिक बनवायचे व्रत घेऊ शकतो . तर मग संघ हिंदुसाठी असे का करू शकत नाही ? 

उत्साह भंग : वास्तव कि कल्पना ? बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा या फार कोरड्या गोष्टी आहेत . त्यात भावनेचा ओलावा नाही , समर्पण नाही असा एक विचार मी ऐकला आहे.  बुद्धिवाद माणसे जोडू शकत नाही . विज्ञाननिष्ठा संघटना बांधु शकत नाही. भारता पुढच्या समस्या सोडवायला संघटन हवे . ठीक आहे . 

पण बुद्धिवादी दृष्टीकोन घेतल्याशिवाय या समस्या सुटतील काय ? कि आपण त्याच अ - आ - इ मध्ये अडकून पडत आहोत ? याचा विचार संघ परिवाराने करायचा आहे . व्यक्तिगत आयुष्यात अतिशय मृदू , अजिबात जात पात न पाळणारे . आधुनिक विचाराचे . अगदी आंतरजातीय विवाह करणारे अनेक स्वयंसेवक मी व्यक्तिगत रित्या ओळखतो. मग संघाच्या धोराणाना नेहमी संशयाने का पाहिले जाते ? सेक्युलारीझम बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा यावरिल भूमिकेत काही आत्मचिंतन - बदल करणे.  आधुनिक परिभाषा आणि आधुनिक विचार समजून घेणे आवश्यक आहे का ? श्री रमेश पतंगे यांनी त्यांच्या पहिल्या पुस्तकात संघ हि बदलत जाणारी संस्था आहे असे म्ह्टले आहे . काही अंशी ते सत्य आहे . त्यामुळे मी प्रस्तुत लेखात गोळवलकर गुरुजींचे विचारधन इत्यादी विषय टाळून संघाच्या केवळ आजच्या भूमिकांची चर्चा केलेली आहे . 

आणिबाणीच्या आजूबाजूला समाजवादी व इतर लोकांशी आलेल्या संबंधाचा आणि  चर्चेचा परिणाम म्हणून संघाच्या अनेक भूमिकात बदल झाले. त्याने उत्साह भंग झाला ? की सळसळून कामाला लागून - संघाची समाज मान्यता  वाढली ? सांस्कृतिक राष्ट्रवादाचा अर्थ संस्कृती विकसन असा करायला हवा . वेदाचे कालानुरूप अर्थ काढणे असा नाही . 

विंडोजचे नवे व्हर्जन दररोज येतात . जुन्या व्हर्जनचे  अर्थ काढले जात नाहीत . आणि त्यामुळे जुन्या व्हर्जनचा अपमानही होत नाही . काही हिंदु लोकांना काही सांस्कृतिक प्रतीके आवडतील - काही आवडणार नाहीत. त्यात किती वेळ गोल गोल फिरत राहणार ? आता वेळ भविष्याची खिडकी उघडायची आहे.

वैचारिक आदान प्रदानाची संधि दिल्या बद्दल मी आभारी आहे. संघासारख्या ९० वर्ष जुन्या मोठ्या संघटनेवर माझ्यासारख्या शुल्लक माणसाने टिका करावी . … हा लहान तोंडी मोठा घास आहे काय ? कदाचित असेल . पण मांडलेले मुद्दे योग्य आहेत कि नाही ? हिंदुच्या हिताचे आहेत कि नाही ? यावर विचार करावा अशी विनंती मी अतिशय तळमळीने आणि मनापासून करतो आहे . 

राष्ट्र म्हणजे नद्या, झाडे, जमीन नाही . मंदिर , घंटा,  ग्रंथ नाही . इथली जिती  जागती जिवंत माणसे  म्हणजे राष्ट्र . हे अ - आ - इ  चे एरंडाचे गुर्हाळ बंद  करून आता उद्याच्या भारताच्या चष्म्याने पहायला हवे.  इथल्या माणसांच्या भल्यासाठी बाह्या दुमडाव्यात आणि संस्कृतीचे पुराण टाळून निडर छातीने भविष्याच्या मैदानात यावे . हे नव्या युगाचे आव्हान स्वयंसेवकांचा उत्साह वाढवेल अशी अशा करुया . हिंदु समाजाबद्दल प्रेम बाळगुन काम करायचे म्हणजे या समाजाला  अंधश्रद्धा , जातिवाद, मूर्ख रूढी यातून बाहेर काढायचे . धर्म चिकित्सक आणि आधुनिक बनावायचे -  सुरवातीला  हुंडाबंदि सारखे साधे आवाहन सहज पेलता येण्यासारखे आहे .डॉ. अभिराम दीक्षित 

------------------------
संदर्भ

(११) संदर्भ : पृष्ठ १४३ ,  हमीद दलवाई - क्रांतिकारी विचारवंत : संपादक : शमसुद्दिन तांबोळी : २००९ :  डायमंड पब्लिकेशन्स -१ डिसें, २०१५

अंधश्रद्धेबद्दल अंधश्रद्धा

" देवाधर्माला विरोध नाही फक्त वाइट गोष्टीना आहे ". हि एक अशास्त्रीय , अतार्किक आणि पलायनवादि भूमिका आहे.

चांगल्या वाइटाचि व्याख्या हि ग्रुहितकांवर ठरत असते. आणि धार्मिक गृहितके एकदा सत्य मानली कि त्यातून बाहेर पडण्याचे कोणतेच कारण उरत नाही . बुरखा घालणे सौदी अरेबियात वाइट मानले जात नाही आणि अस्पृश्यता हा भारतात धर्माचाच भाग असतो. आता देवाधर्माला विरोधा नाही आणि वाइट गोष्टीना विरोध अशी हास्यास्पद भूमिका घेता … वर बुरखा आणि अस्पृश्यता याला धार्मिक लोक्स  योग्य मानतात - हे कसे विसरता ?
आधुनिक अर्थाची मानवता व्यक्तिस्वातंत्र्य लोकशाही इत्यादीची प्रस्थापना करायची असेल तर सर्व धर्म आणि प्रत्येक देव यांची जिनोसाइड आवश्यक आहे .. डोळस श्रद्धा असू शकतात हीच सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. देवा धर्मा सकट सर्व वाइट गोष्टीना विरोध अशी भूमिका हवी .
प्रश्न विचारायचे थांबल्याशिवाय देव मिळत नाही आणि प्राचीन धर्म चोपडीतल्या रूढी कायद्याशिवाय धर्म दिसत नाही . त्यांचे एकसमय आमुलात उन्मूलन अत्यावश्यक आहे.

यात आता एका धर्माशी लढू मग दुसर्या असा क्रम लावणे ही ष्ट्रेटिजि सुद्धा बालिश आहे. मुळात भूमिका शब्द्प्रामण्य आणि देव या विरोधात असली पाहिजे . अशाप्रकारची स्पष्ट आणि शुद्ध भूमिका घेतल्यास गर्दी जमत नाही अशी भीती काहीना वाटते . गर्दी जमवणे हाच उद्देश असेल तर हळदी कुंकु किंवा नमाजाचे कार्यक्रम ठेवावेत !

बुद्धीवादाचे नाही !!

रूढी हे बहुमत आणि सुधारणा हे अल्पमत -
हा निसर्ग नियम बदलण्यास कोणतीही ष्ट्रेटिजि कामाची नाही . वहाबी इस्लामशी लढण्यासाठी धर्माध हिंदुच्या फौजा निर्माण करणे जितके बालिश आहे . तितकेच - किंवा त्याहून अधिक पोथीनिष्ठ - पौराणिक पुरोगामी वारसा शोधण्याचा प्रयत्न करणारे ठरतात .
सनातन्याशी लढण्यासाठी जमाते इस्लामीशी युती किंवा अवैदिक परंपरातले विज्ञान शोधणे ह्या क्लुप्त्या वेदात विमाने आहेत म्हणण्या सारख्याच बालिश आहेत.
पिढ्यान पिढ्या ज्ञानाचा संचय होतो त्यामुळे भूतकाळातील लोक आपल्यापेक्षा मागास असतात हे समजून घेतले पाहिजे. सनातन्यांच्या शस्त्राने - त्यांच्या मार्गाने त्यांच्याशी कधीही लढता येत नाही . त्यांची शस्त्रे हाती घेणे म्हणजे स्वत:च सनातनी होणे होय .-----------------------------------------------------

थापा मारून अंधश्रद्धा निर्मुलन होत नसते. 

-----------------------------------------------------
चित्रलेखाच्या पहिल्या पानावर प्रा J B शिंदे काही अभंग लिहित असतात … २१ व्या शतकातल्या आधुनिक मराठीतले हे अभंग फेसबुकावर तुकोबांच्या नावे प्रसिद्ध केले जातात ! सध्या घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || असा एक अभंग तुकोबांच्या नावे फिरत आहे । या आधी अनेकदा अध्यक्ष , अंधश्रद्धा , दैनंदिनि असे आधुनिक मराठीतले शब्द असलेले अभंग तुकोबांच्या नावावर खपवलेले मी पाहिले आहेत .
-----------------------------------------------------
तुकोबा वंदनिय आहेत पण विज्ञान निष्ठ असू शकत नाहीत हे समजून घ्या !
--------------------------------------------------------

तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हि पहिली अंधश्रद्धा. तर ते समतावादी असल्याने त्यांना  विषमता वाद्यांनी मारले हि दुसरी अंधश्रद्धा. पहिली भाबडी आहे. दुसरी  जातीय .  

काही राजकीय पक्षांना (उदा शरद पवार) यांना   उपयुक्त अशी जातीय आणि धार्मिक समीकरणे बांधणार्यांना आपल्याकडे पुरोगामी म्हणून ओळखले जाते. 

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दोनहीं विधी - हे दोन वेगवेगळ्या पंथाच्या ब्राम्ह्णांकडुन करून घेतलेले ( दुप्पट )कर्मकांड आहे . पण राजकीय व्रत घेतले कि  - कि निश्चलपुरी गोसाव्याने केलेला दुसरा तांत्रिक राज्याभिषेक हे हि अंधश्रद्धा निर्मुलन वाटु लागते .

अशाप्रकारे अंधश्रद्धा निर्मुलन आणि सनातनीपणा यात आज काहीही अंतर उरलेले नाही . होय देवा धर्माला आमचा विरोध आहे . सर्व धर्म आमचे शत्रू आहेत . त्यातून मानवाची मुक्ती करणे आमचे ध्येय आहे . हे अंधश्रद्धा निर्मुलनाचे ब्रीद असले पाहिजे . 

धर्म मानवनिर्मित आहेत . ते पुरातन आहेत . पुरातन काळातील नीती आणि योग्य अयोग्यतेचे संदर्भ आता बदलले आहेत. त्यामुळे धर्म त्याज्य आहेत . हे समजून घ्यावे लागेल .

…… आणि हि नास्तिकता योग्य आहे पण ती लोकाना पटणार नाही…. म्हणुन बोलू नये हे अगदीच हास्यास्पद वाटते . लहान मुलाना इंग्लिश येत नाही मग शाळा बंद करा असा हा तर्क आहे. जे योग्य असेल ते सांगावेच लागेल. अवैदिक परंपरातले विज्ञान शोधणे,साडे तीनशे वर्षा पूर्वीच्या शिवाजी महाराजांना सेक्युलर (इहवादी ) ठरवणे आणि आमचा विरोध फक्त वाइट रूढीना आहे असे म्हणणे ह्या अंधश्रद्धा निर्मुलानातील अंधश्रद्धा आहेत . -

Dr Abhiram Dixit .


२५ नोव्हें, २०१५

आमिरचे इस्लामी अंतरंग


आमिर  खान चे ग्रेट पूर्वज मौलाना जमालुद्दीन यांनी सहिष्णू अकबर बादशहा  विरुद्ध  जेहाद पुकारला होता हे कोणाला माहित आहे ? जेहाद म्हणजे काय ? अथवा देश सोडुन जाणे - हिजरत याचा इस्लामी पारिभाषिक अर्थ किती लोकांना समजतो ? इस्लाम बद्दल संपुर्ण अज्ञान बाळगणारी जमात म्हणजे हिंदु . आणि इस्लामला  दुध पाजून गोंजारणारा घटक म्हणजे पुरोगामी हिंदु . ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग या धर्माने शीख असल्याने त्यांच्याजवळ हिंदु पुरोगाम्या एव्हढी सद्गुण विकृती नाही . म्हणून त्यांनी खांन साहेबाच्या असहिष्णू परदेश वापसी वर सणसणीत गुगली टाकली.   ती गुगली टोलवण्याच्या नादात आमिरचा  त्रिफळा  अल्ला, कुराण  आणि हिजरत च्या रूपाने प्रकटला . तवलिन सिंग यांनी स्पष्टच विचारले कि इस्लामी दहशत वादाबद्दल  भारतीय असहिष्णुते इतकी काळजी वाटते का ?  त्यावर चर्चा घडली . या प्रश्नोत्तराचा अर्थ  हिंदू लोकांना कळणार नाही कारण त्याना इस्लामचा अर्थ आणि संदर्भ बिल्कुलच  समजत नाही . हिंदुत्व वाद्यात अभ्यासाची परंपरा नाही . आणि पुरोगामी अभ्यासकात इस्लामचे खोटे कौतुक करण्याची परंपरा आहे . आमिरची  भूमिका  समजून सांगायला हा लेख लिहित आहोत.  अमीर फार मोठ्या इस्लामी खानदानाचा चिराग आहे . त्याच्या घराण्याचा इतिहासही समजून घ्यावा लागणार आहे .

आमिर खानचे  केवळ त्या घराण्यात असणे   महत्वाचे नाही . तर त्यांचे विचारही  पूर्वजांशि जुळतात   ते महत्वाचे आहे . 

एकाच मुलाखतीत भारताला असहिष्णू  … इस्लामला  सहिष्णू आणि … भारत सोडण्याला वर्धिष्णू असे आमिर खान का म्हणाला ? याचा उलगडा लेख वाचल्यावर होऊ शकेल . आणि हे केवळ मुस्लिम व्होट बेंक पोलिटिक्स नव्हे - जिता जागता इस्लाम आहे .  याचीही प्रचीती येईल .
त्रिफळा : आमिरची असहिष्णुता , आझादांचा करार  आणि जमालुद्दीन चा जेहाद 


असे भारत सोडुन जायचे आवाहन आमिरच्या खानदानात अनेकांनी केलेले आहे . त्याला इस्लामी परिभाषेत हिजरत असे म्हणतात .  आमिरचे मामे आजोबा म्हणजे अबुल कलाम आझाद आणि या मामुजान चे  ग्रेट पूर्वज म्हणजे मौलवि जमालुद्दीन होय . (१)  या तिघांचे रक्ताचे थेट नाते तर आहेच शिवाय इस्लामी मेंदुच्या ताराही जुळलेल्या आहेत . आमिरची असहीष्णूता समजून घ्यायची असेल तर प्रथम मामुजान मौलाना  आझादांची हिजरत समजून घ्यावी लागेल  आणि त्या आधी  त्याचे ग्रेट पूर्वज मौलवी जमालुद्दीन यांचा जिहाद समजून घ्यावा लागेल.  तर आमिरचे ग्रेट पूर्वज मौलाना जमालुद्दीन यांनी सहिष्णू अकबरा विरुद्ध  जेहाद पुकारला होता .  (२)

या दोन पूर्वज मौलानांशी  आमिर खानचे विचार कसे जुळतात ते  पाहुया.  


जमालुद्दीन चा अकबरा विरुद्ध  जेहाद   


बादशहा अकबर हा मध्ययुगातला विचारी राजा आहे. आणी नव्या अनुभवानी.... नव्या विचारानी माणसे बदलतात.... याचे उदाहरण आहे. सुरवातीला पारंपारिक जुलमी असलेला अकबर पुढे भारतातील वेगवेगळ्या पंडितांशि चर्चा करू लागला . धार्मिक विषयांवर चर्चा करण्याचा छंद अकबराला लागला आणि त्यासाठी इबादतखाना नावाचे नवे ऑफिस अकबराने उघडले . 

शिया, सुनी, पारशी, शीख, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव असे वेगवेळ्या पंथांचे पंडित बोलावून - इबादतखान्यात अकबर त्यांच्याशी चर्चा करू लागला. येथे चार्वाकाचे अनुयायी येवून गेल्याचे नोंद आहे. या चर्चात परस्पर मतांचे मंडन , खंडन होत असे. कफिरांना कुराणचे खंडन करायचा अधिकार देणे मौलवींना पटण्याजोगे न्हवते. हळूहळू सर्वच धर्म खरे आहेत अशा भुमिकेवर अकबर येवून पोचला. शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख अकबर बादशहाच्या काळात आढळतो . हा शहाणा अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता . उत्तर आयुष्यात १५८२ साली अकबराने इस्लाम धर्म सोडून दिला आणि दिने इलाही नावाचा नवाच धर्म काढला .त्याच्या या नव धर्माला - धर्म ग्रंथच नव्हता . मौलवी / पंडित हि भानगड पण नव्हती . या नव धर्म स्थापनेवर कदाचित चार्वाक मताचा अंशत: प्रभाव असावा.  

अकबराने  हिंदुवर लावलेला झिजीया कर  रद्द करून टाकला पुढे मुस्लिम धर्मगुरूंचा ब्लास्फेमीचा अधिकार  काढून घेतला. इस्लामचे प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांवर कुणी टीका केली तर मुसलमान ते सहन करू शकत नाहीत. अशी टीका करणार्यांचा छळ करण्याचा अधिकार मुस्लिम धर्मगुरूंकडे असतो. आजही सर्व मुस्लीम देशात हा कायदा आहे. १५७९ साली अकबराने हा कायदा रद्द केला. (२)

अकबराने ब्लास्फेमीचा कायदा रद्द केल्यामुळे मौलवी चिडले. त्यांनी अकबराविरुद्ध बंड केले. कलक्त्त्याला मोठे बंड झाले. अकबराचा पाडाव झाल्याशिवाय भारतात इस्लामला भविष्य नाही असे मौलवींना वाटत होते. त्यांनी अकबराला काफर म्हणून जाहीर केले आणी अकबराविरुद्ध जिहाद पुकारला. अकबराने उलेमा आणी मौलवींचे बंड क्रूरपणे चिरडले. अनेक शेख आणी फकीर हद्दपार केले. अनेकांना कंदाहरच्या बाजारात विकले. त्यांच्या दर्गे आणी मशीदिंच्या जमिनी जप्त केल्या. राजकीय गोंधळ घातल्यास वक्फ च्या जमिनी जप्त करणारा आणी इस्लामी धर्मवेड्यांना गुलाम करून कंदाहरच्या बाजारात विकणारा, अकबर हा पहिला आणी शेवटचा भारतीय. 

 अकबर त्याच्या धर्म चिकित्सक बुद्धीमुळे आणि धर्म सहिष्णू राज्य कारभारामुळे तो सर्व धर्मीय प्रजेत लाडका होता . दिने इलाही या नव्या धर्माचा संस्थापाक  म्हणून  तो निर्वातला .  शिवाजी महाराजांनीही अकबराची स्तुती केल्याचे उल्लेख इतिहासात येतात. 

ज्यांनी अकबराविरुद्ध जिहाद केला   - अशा प्रसिद्ध मुल्ला मौलवित जमालुद्दीन हे नाव फार महत्वाचे आहे. ते मेहदवि चळवळीचे पाठीराखे होते . सय्यद नुरुद्दीन या आपल्या पूर्वजाचा वारसा ते चालवत होते . सय्यद नुरुद्दीन यांनी इस्लामी राजेरजवाड्यांनी इस्लामची मुल तत्वे सोडून भरकटू नये म्हणून हि चळवळ चालवली होती .  सय्यद नुरुद्दीन आणि जमालुद्दीन या प्रसिद्ध मौलवींच्या वंशात मौलाना आझादांचा जन्म झालेला आहे . (२) मौलाना आझाद हे अमीर खानचे मामे आजोबा होत . 


आझादांचा करार  


भारताच्या राजकारणात मुल्ला मौलाविना आणण्याचा अग्रमान मौलाना आझादांकडे जातो. १९१२ साली मौलाना आझाद यांनी 'अल हिलाल' नावाचे उर्दू साप्ताहिक  काढले आणि राजकारणात धर्म (इस्लाम ) आणला पाहिजे याचा ते जोरदार प्रचार करू लागले . (२). त्यांच्याच प्रेरणेने जमियत उलेमा हिंद नावाची उलेमांचि संघटना स्थापन झाली  आणि मौलविंनि धर्माचे आवाहन करून मुस्लिमांना उत्तेजित करायला सुरवात केली . ब्रिटिशांचे शासन आल्यामुळे भारत हा दार उल हरब (शत्रू भूमी ) बनलेला आहे . सबब ब्रिटिशांना हाकलून देऊन कुराण आणि शरियत वर आधारित राज्यव्यवस्था आली पाहिजे अशी मागणी मौलवी करू लागले. ब्रिटिशांना  विरोध करण्यासाठी या मौलविंनि कोन्ग्रेस शी हातमिळवणी केली म्हणून त्याना राष्ट्रवादी मुसलमान म्हटले जाते .  मौलाना आझादांच्या 'अल हिलाल' मध्ये अशी शिकवण दिली जात होती कि , 

"एका हातात धर्म आणि दुसर्या हातात राजकारण पाहिजे, पण कुराण मात्र दोन्हीकडे पाहिजे . (इमानवंत  हो = अल्लाहशी एकनिष्ठ ) तुम्ही अजिबातच हिंदुना घाबरू नका . फक्त अल्लाहची भीती बाळगा. तुम्ही अल्लाहने दिलेला गणवेश टाकून दिलेला आहे . तो अंगावर घाला म्हणजे सारे जग तुम्हाला घाबरू लागेल .  तुम्ही अल्लाहने पाठवलेले पृथ्वीचे शासन कर्ते आहात.   '(३)मध्ये  आझादांनी कुराणाचा सहिष्णू अर्थ लावण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला .  या अक्षम्य गुन्ह्याबद्दल मौलविंनि त्याना तीन वेळा दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा दिली . हा  काल्पनिक फतवा  कधी आमलात आणला गेला नाही . पण मुस्लिम समाजाचे राजकीय नेते होण्यासाठी काय करावे ? वा करू नये ? याची पुन: शिकवण आझादांना मिळाली. 

काफ़िरांशि संबंध ठेवण्याचे ३ इस्लामी मार्ग :

जिहाद , करार आणि हिजरत हे इस्लामनुसार काफ़िरांशि राजकीय व्यवहार करण्याचे तीन महत्वाचे मार्ग आहेत. जिहाद (प्रयत्न  / पराकाष्ठा ) प्रथम स्वत:च्या मनातल्या गैर इस्लामि वृत्तीविरुद्ध करायचा आहे . नंतर वाणी आणि लेखणीने काफ़िरांना इस्लाम मध्ये बोलवायची दावत देण्यासाठी जिहाद करायचा आहे . इतके समजावूनही काफिर मुस्लिम झाले नाहीत तर मात्र (जिहाद बा सैफ ) तलवारीचा जिहाद करावा अशी कुराणाची आज्ञा आहे . अर्थात जिहाद करण्या एव्हढी शक्ती प्राप्त होई पर्यंत काफ़िरांशि करार (मोइदा ) करून राहता येते. तेही न जमल्यास दार उल हरब (शत्रू भूमी)  ला सोडुन  . दार उल इस्लाम मध्ये स्थलांतर करावे लागते . अशाप्रकारे देश सोडुन जाण्याला हिजरत असे म्हणतात .

मौलाना आझादांच्या मते काफिर हिंदुशि करार (मोइदा ) करून भारतात रहावे. इंग्रजांविरुद्ध जिहाद करण्यासाठी मौलाना आझादांनी  हा निर्णय घेतलेला आहे . हिंदुशि केलेला हा करार हा कुराण आणि शरियत या इस्लामी कायद्यानुसारच आहे अशी आझादांचि धारणा आहे .  असगर आली इंजिनिअर  लिहितात : (४ )

" हिंदु मुसलमान यांनी एका राज्यात रहावे यासाठी , आझाद प्रेषित मुहम्मद यांनी ज्युंबरोबर केलेल्या मदिना कराराचा आधार घेत असत ."  ते प्रेषीतांचे उदाहरण असल्याने शरियतचा भाग होत होता . या मदिना करारात शरियतचे राज्य असणार होते . राज्याचे प्रमुख प्रेषितच होते. कायदे करणारे , त्यांचा अंमल करणारे व न्याय देणारे तेच होते . हे प्रेषीतांचे अधिकार मौलाना आझादांना इमामासाठी पाहिजे होते . इमामाच्या  राज्याखाली हिंदुनि रहावे असे त्यांना वाटत होते . (४,५)
जमालुद्दीनचा जिहाद आणि आझादांचा करार समजून घेतला कि आमिरची असहिष्णुता समजण्यास मदत होईल . इस्लामची जुजबी ओळख झाल्यावर आता , तवलीन सिंग आमिर खान आणि मुलाखतकार यांच्यात काय चर्चा झाली ते पाहू :आमिरचा इस्लाम वाद  : दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो !


भारतात असहिष्णुता वाढली आहे काय ? याचे उत्तर आमिर खान ने होकारार्थी दिले . बायकोचे नाव घेऊन भारत देश सोडुन जाण्याविषयी बोलला . तिचेअसहिष्णू  मत आमिरानेच सार्वजनिक केले आणि ते मान्य असल्याचेही सांगितले .  पण हि चर्चा इथे थांबत नाही . आमिरला दहशत वादाविषयी प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने दहशतवादाला कोणताच धर्म नसतो असे उत्तर दिले . इस्लामी दहशतवाद असे म्हणू नये  असे आमिरने ठासून सांगितले . मग उगीच इतरही धर्माची  नावे घेतली ! दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो असे हे लॉजिक ! पिके चित्रपटात हिंदुच्या देवाधर्माची चिकित्सा आणि चेष्टा  करणारा पुरोगामी आमिर खान इस्लाम बद्दल भलताच आस्तिक निघाला !

आमिर खान चा जन्म इस्लाम मधील अतिशय महत्वाच्या मौलविंच्या घरातला आहे . त्या सांस्कृतिक वारशातून आणि बहुश्रुत , वाचनातून त्याला इस्लाम बद्दलच्या सर्व चर्चा ठाउक आहेत. आमिरचा ब्लोग पाहिला तर त्याच्या या संबंधिच्या ज्ञानावर सहज प्रकाश पडेल. 

तवलीन सिंग यांनी हि चर्चा पुढे वाढवली , त्यांनी म्हटले 
"इस्लामला वाचवण्यात काहीहि  अर्थ नाही. प्यारिस मधील हल्लेखोरांच्या हातात कुराण होते . ते अल्लाहू अकबर ओरडत होते. भारत जितका सहिष्णू वा असहिष्णू आधी होता तितकाच आताही आहे . आमिर जर तू  (हिंदुंच्या ) असहिष्णुते बद्दल इतका संवेदनशील आहेस तर या दहशत वादी हल्ल्यांबद्दल तुझी संवेदना काय आहे ? … वहाबी इस्लामच्या वाढत्या प्रसाराबद्दल तुझे काय मत ? "

यावर उत्तर देताना खान साहेबांनी वहाबी इस्लाम बद्दल चकार शब्द काढला नाही. उलट इस्लाम किती गोंडस आणि शांततेचा धर्म आहे हे ते पटवत बसले . अशाप्रकारे  मोडरेट लोक्स  धर्माचे रक्षण करतात. आणि धर्मातून  नवे   दहशतवादी तयार होत रहातात.

हिंदुच्या असहिष्णुतेने चिंताक्रांत झालेला आमिर खान इस्लामी दहशतवादाबद्दल कशी  धर्म रक्षक भूमिका घेत होता ते वाखाणण्या जोगे होते.

तवलीन सिंग यांनी असेही सुचवून पाहिले कि गालिब चा भारतीय इस्लाम आणि वहाबी आक्रमक इस्लाम यात फरक केला पाहिजे . आमिरने हा सल्ला धुडकावुन लावला  . सारा इस्लाम निष्पाप आहे आणि इस्लाम हिंसेला परवानगी देत नाही अशीच रट शेवटपर्यंत लावली. आमिर मौलाना आझाद आणि मौलाना जमालुद्दीन यांची पेन इस्लामिक भूमिका मांडत राहिला .

कुराणात काही सुरा मक्का शहरात  अवतीर्ण झाल्या आहेत आणि काही सुरा मदिना शहरातल्या आहेत . शक्ती कमी असताना इस्लाम धर्माचे गोड बोलून रक्षण आणि शक्ती वाढली कि परधर्म निर्दालन अशी कुराणाची स्पष्ट शिकवण या वरून समजते . जामाते इस्लामीचे संस्थापक मौलाना मौदुदि आणि नास्तिक अभ्यासक नरहर कुरुंदकर यांनी या विषयावर बरेच भाष्य केलेले आहे . (७)

एकतर आमिरची भूमिका कुराणाला धरून पडत्या काळातील गोड बोलून  धर्म रक्षणाचि असेल……  किंवा तो इस्लामची चिकित्सा करायला भीत असेल .

जर तो इस्लाम बद्दल बोलायला भीत असेल आणि हिंदुच्या असहीष्णूतेबद्दल एल्गार करत असेल तर - सहिष्णू कोण ? हे आमिरनेच समजून घेतलेले बरे.

 काही कलाकार याआधी भारत सोडतो वगैरे बोलले होते पण त्यांनी कोणतीही धार्मिक वा राजकीय टिप्पणी केली नव्हती .  आमिरने ती केली .

आमिर खान च्या इंटरर्व्ह्यु मधील ४ मिनिटे (व्हिडियो )इतक्या अतिरेकी हल्ल्यांनंतरही इस्लामला हिंसक ठरवणे
चुकीचे आहे....
बर  मग..
दोन - चार घटनांवरून माझ्या देशाला तुम्ही असहिष्णू का ठरवताय ?"

याचे उत्तर  आमिर खान ला आज ना उद्या  द्यावे लागेल


अमिर खानची हिजरत 


ज्या देशात इस्लामचे भवितव्य कठिण दिसते त्या देशातून निघून जावे - हिजरत करावी  अशी इस्लामी धर्माज्ञा आहे. त्यानुसार आमिर खान ने भारत सोडुन जाण्याची भाषा केली आहे .

जमालुद्दिनचा जिहाद हरला ,  आझादांचा करार फसला आता देश सोडुन अन्यत्र जाणे (हिजरत) हि इस्लामी धर्माज्ञा आहे.  हिंदुत्व वादि पक्ष एकाहाती सत्तेत  आल्याने आमिरच्या पुर्वजांचे इस्लामिक भारताचे स्वप्न फसले आता हिजरत हा एक पर्याय तो सुचवू पाहतो आहे . खरे पाहता आमिरची भीती अनाठाई आहे . हिंदुत्व वाद्यांची  मर्यादा आत्गौरव आणि सनातनी पणा इतकीच आहे . वस्तुत: इस्लामचे पालन पोषण करण्यास (पुरो/प्रती) सर्वच हिंदु कटिबद्ध आहेत .

तरी  आमिरची हिजरत मागील  भूमिका समजून घेण्यासाठी त्यांचे  बडे  मामूजान मौलाना आझाद हिजरत विषयी काय म्हणतात ते पाहुया . ( साल १९२० खिलाफ़तच्या दरम्यान )

" शरियतच्या सर्व तरतुदी , सद्य:कालीन घटनाक्रम , मुस्लिमांचे हित आणि राजकीय साधकबाधकता या सर्वांचा विचार करून माझे समाधान झाले आहे कि , …. भारतीय मुसलमानांना भारतातून हिजरत (देशांतर ) केल्याशिवाय अन्य कोणताच पर्याय उरलेला नाही . … जे लगेच हिजरत करू शकत नाहीत त्यांनी हिजरत करणार्यांना (मुहाजीरीन ) मदत केली पाहिजे. " (६)

आमिर खान स्वत: अत्ता हिजरत करू शकत नाही हे उघड आहे ,  त्याचे आर्थिक हितसंबंध भारतात आहेत . कदाचित तो इतर इमान वंतांना तसे सुचवत असावा . खरे पाहता त्याची गरज नाही . सनातनी हिंदुत्व वादी आणि इस्लाम रक्षक हिंदु पुरोगाम्यांच्या भारत देशासारखी सुपीक जमीन इस्लामला कोठेच मिळणार नाही .

जमालुद्दिनचा जेहाद , आझादांचा करार आणि आमिर खान  ची हिजरत अशी एका माळेचे मणि ! बडे मामू  मौलाना आझाद खिलाफातीसाठी लढत इमान्वंत मुस्लिमाना हिजरत करण्याचे आवाहन करीत . त्यानुसार १९२० सालच्या आसपास १८००० इमानवंत हिजरत करून अफगाणिस्तान ला गेले होते . परंतु लगेच अफ़गाणिस्तानच्या आमिराने आपल्या सरहद्दी त्यांच्यासाठी बंद केल्या - मग हि हिजरत मोहीम थांबली. (५)

आज कोणि हिजरत करतो म्हणाला तरी हेच परिणाम दिसतील !

हज यात्रेला जाउन मुसलमान सैतानाला  दगड मारण्याचा एक विधी करत असतात . अर्थात हा विधी प्रतिकात्मक आहे . खर्या सैतानाला वाळूचे कण मारून काही उपयोग नाही --  धोंडे मारले पाहिजेत हे इमान वंतांना चांगलेच कळते . अशाच प्रकारे हि आमिरची प्रतीकात्मक हिजरत आहे . खरी खरी नाही !

तरीही इस्लामी जगतात हिजरत कि मोहिदा यावर  चर्चा सुरु झाली आहे . आजच ओवेसीने हिजरत करणार नाही म्हणून सांगितले . हि चर्चा सुरु करण्याचे श्रेय आमिर खान कडे जाते .


पवित्र हज यात्रेत सैतानाला दगड मारताना श्री आमिर खान मुसलमान जर ‘खरे’ मुसलमान बनले तर संघर्षच उरणार नाही.अशी आमिर खान ची भूमिका दिसते.   हे ‘खरे’ अमुक बनावे काय? हा प्रश्न एकदा ‘ओशों’ना विचारला गेला. ते म्हणाले “अरे भाई अगर कच्चा हिंदू और कच्चा मुसलमान इतना खतरनाक है, तो जरा सोचो! सच्चा हिंदू और सच्चा मुसलमान कितना खतरनाक होगा!!”
-------------------------------------------------------------------

ताजा कलम : संगीतकार ए आर रहमान यांनीही असहिष्णुते बद्दल भूमिका घेतली आहे .
ए आर रेहमान  यांच्या  या भूमिकेचे स्वागत . 

रहमान यांनी आमिर प्रमाणे इस्लाम धर्म रक्षण केलेले नाही तर …. रजा अकेडमि च्या धर्मांध फ़तव्यावर भाष्य केलेले आहे . संगित गैरीस्लामिक आहे . प्रेशितावरील एका चित्रपटाला रहमान ने संगित दिल्यामुळे रजा एकेडमी ने ए आर रहमान विरुद्ध फतवा काढला होता .

"आता ए आर रहमान धर्म भ्रष्ट झाला….  मुस्लिम होण्यासाठी त्याने पुन्हा कलमा पढला पाहिजे . काफिर झाल्याने लग्न रद्द ! आता शरीयत नुसार रहमान ने पुन्हा लग्नाचे विधी केले पाहिजेत असे रजा अकेडमि चे म्हणणे आहे .(८, ९ )
भिवंडितिल पोलिस हवालदार हुतात्मा जगताप आणि गांगुर्डे च्या खुनात दोषी आणि आझाद मैदानावर दंगल घडवणारी हीच ती रजा एकेडमी . ए आर रहमान ने रजा अकेडमि चा निषेध केला .

या इस्लामी फतव्या बरर्हकुम 'दिल्ली 'आणि 'युपीच्या' * कथित सेक्युलर  * मुख्यमंत्र्यांनि  रहमानचा कार्यक्रम  टाळणयाचा प्रयत्न केला  त्यांचाही उल्लेख  रहमान ने केला आहे . . यानंतर या तापल्या तव्यावर पोळी भाजत - इस्लाम मध्ये संगितसेवा जमत नसेल तर हिंदू व्हा ! असे घर वापसीचे बाष्कळ आवाहन करणार्या विश्व हिंदु परिषदेवरही ए आर रहमान टिका केली आहे .

वरील  सर्व गोष्टीना रहमान असहिष्णुता असे म्हणतो . 

धार्मिक बाबतीत टिका टिप्पणी करताना - त्या विषयाची जाण असावी आणि खरी सेक्युलर भूमिका घ्यावी हि बुद्धी ए आर रेहमान कडे आहे .पुरोगाम्याला तेव्हढि अक्कल नाही हा मुद्दा आहे . (८, ९ )

डॉ अभिराम दीक्षित 

------------------------
संदर्भ :

१) आमिरचे मावस आजोबा म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद आणि आझादांचे जिहादी पूर्वज म्हणजे मौलवी जमालुद्दीन: अमीर खान त्याच्या मामे आजोबांवर म्हणजे मौलाना आझादांवर चित्रपट बनवणार आहे , अशा बातम्या आधी येउन गेल्या आहेत .
  

२) आकलन : नरहर कुरुंदकर : मौलाना आझाद एक पुण्यस्मरण / अकबर 

३) लेखसंग्रह:  अप्रिय पण भाग २ . शेषराव मोरे  , २००८

४ ) पृष्ठ ११० , इस्लामिक स्टेट : असगर आली इंजिनिअर , विकास पब्लिकेशन,  १९९४ 

५) पृष्ठ १५६ आणि पृष्ठ १८४ , अखंड भारत का नाकारला , प्रा मोरे , राजहंस प्रकाशन , २०१२ 

६)   Page 219 , Gandhi : Pan Islamism , Imperialism and Nationalism in India , OUP , 1989

७)  जागर : नरहर कुरुंदकर , दवत उल कुरआन : मौलाना मौदुदि 

८) http://indianexpress.com/article/entertainment/entertainment-others/fatwa-against-a-r-rahman-majid-majidi-for-film-on-prophet/

९) http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/a-r-rahman-identifies-with-aamir-khan-says-he-too-faced-similar-situation/articleshow/49917936.cms


सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *