६ मे, २०१५

महाराष्ट्राला हे भूषणास्पद नाही


 मला वस्तुनिष्ठ इतिहास आवडतो त्यामुळे -  पुरंदरेंचे रसाळ इतिहास सांगणारे  - अलंकारिक पुस्तक फारसे कधी भावले नाही. पण हे पुस्तक अनेकांना अतिशय आवडते . आणि त्यांचा तो अधिकार आहे . मुख्य म्हणजे   … बाबासाहेब पुरंदरेंवर  जातीवादाचा आरोप करणे गैर आहे . पुरंदरेना कोणि शिवाजी महाराजांचे विरोधक समजत असेल तर - तो एक भयंकर विनोद आहे . बाबासाहेब पुरंदरे  हरदासी कथेकरी - कीर्तनकार आहेत .  

बाबसाहेब पुरंदरेंचि लेखन  शैली  अलंकारिक आणि हरदासी कीर्तन कारांसारखी   आहे  - " महाराष्ट्राच्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाकले तर जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच ! पर्वत नद्या समुद्र जणु जिवंत आहेत . सह्याद्री हे महाराष्ट्राचे गोत्र आहे. असा त्यांचा समज आहे.  त्यांनी शिवाजी हा देव म्हणून निवडला आहे . असे दैवतीकरण मला बिलकुल मान्य नसले तरी - पुरंदरे जातीवादी नाहीत.  शिवरायांचे त्याना विरोधक समजणे आणि ९० वर्षाच्या वृद्ध लेखकावर हीन दर्जाची टिका करणे हा गुन्हा आहे. 


पुरंदरेंच्या  पुस्तकात ब्राम्ह्णांवर भरपूर टिका आहे . पान क्र  ६० वर रोटिबंदि आणि जातिभेद पाळून देशाला दुबळे करणार्या वेदशास्त्र संपन्न ब्राम्ह्णांवर पुरंदरेंनि केलेली टिका वाचायला मिळेल . पण त्यावेळी हे लक्षात ठेवले पाहिजे कि ,. शिवाजी महाराज आणि त्यांचा कालखंड हा धार्मिक मध्ययुगीन आहे - त्यामुळे त्याचे वर्णन करताना - खरेखुरे वर्णन करताना -  थोडेबहुत गोब्राम्हण प्रतिपालन येणार आहे. मुस्लिमांचा उल्लेख शत्रू म्हणून येणार आहे . त्याला काही उपाय नाही . पुरंदरे आणि केळुस्करांच्या पुस्तकात काय फरक आहे ? अगदी महात्मा फुलेंच्या शिवाजी महाराजंवरिल पोवाड्यात असेच उल्लेख येतात - 
------------------------------------------------------------------------------- 
महात्मा फुलेंच्या  शिवाजी महाराजांवरिल पोवाड्यातले  काही चरण  : 

 म्लेच्छे केले डोके वर || आले सिंधू नदीवर, स्वार्‍या केल्या वारोंवार | 
काबुला सोडी | नदांत उडी || ठेवितो दाढी | हिंदूस पिडी || 
बामना बोडी | इंद्रिये तोडी || पींडिस फोडी | देऊळे पाडी ||
चित्रास तोडी | लेण्यास छेडी ||गौमांसी गोडी | डुकरांसोडी ||  
मुर्तीस काढी | काबूला धाडी||झादीस तोडी | लुटली खेडी ||
 हिंदूस झोडी | धर्मास खोडी ||देऊळे फोडी | बांधीतो माडी ||
बुरखा सोडी || पत्नीस पीडी ||

जीधर उधर मुसलमानी | बीसमिलाहि हिमानी ||
सचा हरामी शैतान आया | औरंगजीब नाम लिया ||

(या सर्वाचा परिणाम म्हणून जिजामातेने शिवरायांना उपदेश केला आणि मग -) 

माताबोध मनी ठसतां राग आला यवनांचा |बेत मग केला लढण्याचा ||
लोकप्रितीकरीता करी गुरू रामदासास |राजगडी स्थापी देवीस ||
मोठ्या युक्‍तीने सर केला किल्ला तोरण्याचा |रोविला झेंडा हिदूंचा ||

महात्मा फ़ुलेंचा संपुर्ण पोवाडा वाचण्यासाठी ओन्लाइन लिंक : http://mahatmaphule.info/shp.html
------------------------------------------------------------------------------- --
हे सर्व महात्मा फ़ुलेंचे शब्द आहेत .यातला एक शब्द खोटा निघाला तर सोशल मिडियावर लिहिणे सोडुन देइन . पण या चरणावरुन कोणि महात्मा फुलेंना मुस्लिम द्वेष्टे ठरवू नये ...हिंदुत्व वादि हि ठरवू नये. तसे करणे चूक असेल .कारण हा पोवाड्यातला सिलेक्टिव्ह भाग ... .(Out of context ) .... समग्र साहित्य वाचून ठरवावे लागते . पुरंदरेंबाबत हि तेच खरे आहे. मागचे पुढचे संदर्भ न पाहता मधलीच वाक्ये वापरून पत्रके तयार केली तर पुरंदरेंच्या पुस्तकातुनहि हवे ते अर्थ काढता येतील . पुरंदरेंचि जी वाक्ये आक्षेप हार्य म्हणून फेसबुकवर फिरत आहेत … त्याच्या मागची पुढची दोन पाने वाचण्याचे कष्ट कोणि घेईल काय ? त्यातली अनेक पत्रके आणि वाक्ये पूर्णपणे बनावट आहेत हे तरी समजेल काय ? 

पुरंदरेंचे पुस्तक   मुलांसाठी सांगितलेले आख्यान - कीर्तन आहे . लहान मुलांना  देशभक्ती  शिकवावी असा त्या पुस्तकाचा उद्देश आहे. पुस्तकात दिलेली चित्रे पाहिली तरी वाचक म्हणून कोणते वय अपेक्षित आहे ते सहजच कळेल . लोकप्रिय - कीर्तनकार - हरदासी - भाषाप्रभू म्हणून पुरंदरेंचे मराठी साहित्याला महत्वाचे योगदान आहे . माझ्या मते सुहास शिरवाळकर , पुरंदरे , बाबा कदम अशा लोकप्रिय लेखाकांकडे पाठ फ़िरवण्याचा करंटेपणा माराठी सारस्वताने करू नये. त्यांना पुरस्कार देणे योग्य आहे . 

पुरंदरेंच्या पुस्तकाचा आणि नाटकाचा साकल्याने विचार केला तर त्यातून मिळणारा संदेश हा सहजसुंदर  बाळबोध असला तरी त्यात मुस्लिम - द्वेष,  जातिवाद असे काही नाही. जाणता राजा नाटकात स्टेजवर ख्रिस्ती  क्रोसचि पूजा आहे. हिंदु मुस्लिम ऐक्यासाठी दोन अक्खे प्रवेश आहेत.  नाटकात आणि पुस्तकातून मिळणारा मुख्य संदेश देशभक्तीचा आहे.   लहान मुलांना देशभक्ती शिकवणे हा गुन्हा आहे ? 

मुलांना देशभक्ती वगैरे शिकवायला भरपूर कौशल्य आणि बुद्धिमत्ता लागते … पुरंदरेंचे पुस्तक एम ए च्या इतिहासाला लावावे असे त्यांचे हि म्हणणे नाही . आणि सर्व सामन्य  वाचकासाठी कादंबरीमय चरित्र लिहिणे यात काही चुक नाही.

आता थोडे लेन बद्दल - 

लेनेने  शिवरायांवर दुष्टपणे चिखलफेक केली आहे. त्याचे पुस्तक विश्वास ठेवण्या सारखे नाही  हे आपण मानतो . पण त्याने पुस्तकात लिहिलेल्या आभार प्रदर्शनावर विश्वास ठेवतो . हा काय प्रकार आहे ?  लेनचे अक्खे पुस्तक ब्राम्हण आणि हिंदुच्या विरोधी आहे . संघ , शिवसेना,  भाजपाच्या विरोधात लेनने त्याच पुस्तकात पुष्कळ लिहिले आहे . त्याला पुरंदरे मदत करत असतील हे तर्काला पटण्यासारखे नाही .

लेनच्या पुस्तकावर बंदि घालावी म्हणून बाबासाहेबांनी ओक्स्फ़र्ड ला लिहिलेले पत्र प्रसिद्ध झाले आहे. लेनच्या वात्रट पुस्तकाची मिडियावर जाहिरात करत बसणे हेच गैर आहे .  

लेन च्या पुस्तकाचे आणि वाक्याचे ब्रिगेडने आंदोलनात्मक मार्केटिंग महाराष्ट्र भर  केल्यानंतर…….  आपण सारे मराठी लोक -----   लेनच्या चष्म्यातून पाहू लागलो आहोत काय ?  असा प्रश्न मला पडतो .  शिव चरित्राकडे तमाम महाराष्ट्राने केवळ जातीय चष्म्यातून पहायला लागावे - हे फार दु:खदायक आहे . आणि याला आता कोणि अपवाद उरला आहे असे वाटत नाहि. हे सारे अतीव क्लेशकारक  आहे . हा जातिवादाचा विजय आहे. महाराष्ट्राला  हे  भूषणास्पद नाही  .


 बाबासाहेब पुरंदरे इतिहासकार आहेत असे ते स्वत:सुद्धा म्हणत नाहित.पण मराठी साहित्यातले त्यांचे योगदान महत्वाचे आहे . त्यांना दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार इतिहास वा अमुक एक कारणासाठी म्हणून दिला जात नाही . हा जीवन गौरव पुरस्कारा सारखा एक पुरस्कार आहे. तो पुरस्कार महाराष्ट्र पातळीवरचा लहान पुरस्कार आहे. पुरंदरे त्या पुरस्कारासाठी पात्र आहेत . एव्हढेच नव्हे तर आजवर  त्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या इतर लोकांपेक्षा अधिक लोकप्रिय / प्रसिद्ध आहेत.

ब्रिगेडचा  चालू विरोध हीन दर्जाचा आणि पातळी सोडलेला आहे. १) त्याच्या सुरात सूर मिसळणे , २) तटस्थ राहणे किंवा ३)  ब्रिगेडी जातीय - प्रतिगामी  विचाराला विरोध करणे हे तीन पर्याय आहेत . मी तिसरा पर्याय निवडला आहे.

(अभ्यासक श्री संजय सोनावणि यांनी ब्रिगेडच्या सर्व मुद्द्यांचे खंडन केलेले . ते ना हिंदुत्व वादि  आहेत . ना संघाचे स्वयंसेवक . त्यांच्या ब्लोग ची लिंक : http://sanjaysonawani.blogspot.in/2015/05/blog-post_6.html)

११ टिप्पण्या:

 1. बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार आहेत कि शाहिर हे स्पष्ट नाहि।पुराव्याशिवाय ऐतिहासिक गोष्ठी सांगने दंतकथा ठरतात। त्यांनि चालवलेल कार्य निश्चित स्पृहणीय आहे। पन गोब्राम्हन टोन पटत नाहि। फडनविस सरकार ने। गोवंशहत्या बंदि कायदा केला व गोब्राम्हन पुरस्कार करनार्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला। गोब्राम्हन या संदयेला ऐतिहासिक पुरावा आहे का।

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. Ref : Budhbhushan - Rajneeti , Writer - Sambhajiraje Bhosale Editor : R. A. Kadam, Rajmayur Prakashan (February 2012)

   adhyaya 2 Shloka 554

   हटवा
  2. बाबासाहेब पुरंदरेंना शिवशाहीर हि पदवी सातारा गादीच्या राजमाता सुमित्रादेवी भोसले ह्यांनी दिली होती..

   हटवा
 2. मित्रवर्य अभिराम ,
  मला वाटतं की ,समाजातील जे प्रचलित काळातील तथासकथित बुद्धिमान मंडळी आहेत ,तीच मंडळी केवळ एक तर फार पद्धतशीरपणे यांच्यात तेल टाकण्याचे काम करत आहेत .
  मुद्दा तो नाही ,पण नविन पिढीवरती एक indirect impact असा होतो की , शिवजी महाराज आणि त्यांचा पराक्रम वगैरे राहूदयात बाजूला ,ते कुण्या पैकी होते अन् पुरंदरेनी काय लिहिलं ते कुणापैकी होते ?
  इंग्लिश पंतप्रधान Winston Churchill' भारतास स्वातंत्र्य देताना हाच मुद्दा उपस्थित केला होता . आपण जात-पात ,धर्म यांचे पलीकडे केंव्हा जाणार?
  प्रत्येक विषयाचा किती चौथा काढणार? तो ही social relevance नसताना !!

  उत्तर द्याहटवा
 3. vichar karaayla lawnaara lekh. Bill Watterson's sarcasm come to mind. http://imgfave.com/view/3439365

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. “History is the fiction we invent to persuade ourselves that events are knowable and that life has order and direction. That's why events are always reinterpreted when values change. We need new versions of history to allow for our current prejudices.” - Bill Watterson

   हटवा
 4. डॉक्टर आपण जो लेख लिहिला आहे त्यास पूर्ण पणे सहमत आहोत.तुमच्या मनातील तळमळ आणि सच्चे पणा या मागचा हेतु किती शुद्ध आहे हे या लेखातून स्पष्ट होते! धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 5. एस. एम. मुश्रीफ यांनी लिहलेल्या ' हु किल्ल्ड करकरे' यावर त्याचं सांगली मध्ये १४ एप्रिल ला व्याख्यान झाल. त्या व्याख्यानातील त्यांच्या तोंडातले हे शब्द ...........

  "....... कर्नल पुरोहित त्यांच्या कडून जप्त केलेल्या ल्याप्त्वाप(laptop) मधील पाचवी व्हिडियो करकरे पाहत होते. ( या आधी ४ व्हिडियो पाहून प्रज्ञा सिंघ ठाकूर आणि बर्याच जणांना अटक झाली होती ) . २३ नोव्हेंबर २००८ मधील हिंदुस्तान टाईमस मधील हि बातमी....... करकरेंनी या संधर्भात दोन इतिहासकार, हिमानी सावरकर, कर्नल चितळे, मिलिंद एकबोटे यांना चौकशी साठी बोलावलंय. मी ATS मधल्या माझ्या एका ओळखीच्या अधिकार्याला विचारल कि हे दोन इतिहासकार कोण आहेत बाबा....... ? त्यांची नावे ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल..... ते होते 'बाबासाहेब पुरंदरे' आणि दुसरे आहेत ते निनाद बेडेकर . ज्यांना आपण इतिहासकार समजत होतो ते अशे देश ध्रोही कृत्य मध्ये सामील होते ............. .."

  Any explanation for this ...........?

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. एस. एम. मुश्रीफ यांचे एकुण दावे पोकळ गल्लाभरू आणि प्रसिद्धी लोळूलूप वाटतात . याच महाभागाने २६ ११ चा हल्ला हा संघाने घडवून आणलेला आहे . पाकिस्तान ने नाही - असेही तारे तोडले होते. त्याचवेळी हुतात्मा करकरेंच्या पत्नीने त्यांचा निषेध केला होता - मुश्रीफ यांच्या दाव्यांचा विरोध करकरेंच्या पत्नीने करावा - यातच बरेच काही आले .

   हटवा
 6. एस. एम. मुश्रीफ यांचे एकुण दावे पोकळ गल्लाभरू आणि प्रसिद्धी लोळूलूप वाटतात . याच महाभागाने २६ ११ चा हल्ला हा संघाने घडवून आणलेला आहे . पाकिस्तान ने नाही - असेही तारे तोडले होते. त्याचवेळी हुतात्मा करकरेंच्या पत्नीने त्यांचा निषेध केला होता - मुश्रीफ यांच्या दाव्यांचा विरोध करकरेंच्या पत्नीने करावा - यातच बरेच काही आले .

  उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *