१८ मे, २०१५

वंश जातीवादी - कार्ल मार्क्स
: कम्युनिस्ट धर्माची चिकित्सा :( भाग  २)

  वंश जातीवादी  - कार्ल मार्क्स  
मार्क्सने कृष्णवर्णीय निग्रोना (आफ्रिकन योग्य शब्द ) हीन दर्जाचे मानले होते. किंबहुना काळ्या कातडीच्या लोकांच्या हिनतेचे - गुलामीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन मार्क्स च्या लिखाणात येते  .

आजचे मार्क्सवादी  जगाला समता  - वर्ग संघर्ष आणि शहाणपणाचे डोस पाजत आहेत.  भारतातील  सर्व बौद्धिक संपदेवर त्यांचे निरंकुश वर्चस्व आहे . डाव्या / पुरोगामी चळवळिंनि भारतीय  मार्क्सवाद्यांनि लिहिलेलेला इतिहास   ग्राह्य मानला आहे . त्यामुळे हा विषय अतिशय महत्वाचा आहे .

 मार्क्स आणि मार्क्स वाद्यांच्या जाणिव आणि नेणिवेतील वंश वाद , वर्ण श्रेष्ठत्व आणि त्यांच्या हिंसक विचारांचा प्रस्तुत लेखात आढावा घ्यायचा आहे . त्यासाठी मार्क्सवाद्यांनिच  ऑनलाइन  प्रकाशित केलेले साहित्य  संदर्भ म्हणून वापरायचे आहे. मार्क्सवादी आणि कम्युनिस्टांच्या कामगार प्रश्नावरील प्रामाणिक लढयांसाठी  त्यांचे अभिनंदन - आभार मानून मी  मागील प्रकरणातच  त्यांना लाल सलाम केला आहे . प्रस्तुत लेख हा  लाल बांधवांच्या मार्क्स अवतारा बद्दलच्या अंधश्रद्धा निर्मुलनाचा  नम्र प्रयत्न आहे.

कार्ल मार्क्स हा कम्युनिस्ट धर्माचा संस्थापक प्रेषित होय . 
मार्क्सने केलेली जातीय टिका 

३० जुलै १८६२ रोजी एंजल्स ला लिहिलेल्या पत्रात मार्क्स ने स्वत:च्या छळवादी शत्रूवर खालील टिका केलेली आहे : -
" आता मला स्पष्ट झाले कि लासाले  च्या डोक्याचा आकार आणि केसाचा पोत; त्याची निग्गर पाळेमुळे दर्शवतो. एकतर  तो  मोझेस ची साथ देणार्या काळ्या आफ्रिकनाचा वंशज असेल  (अथवा त्याची आई वा आज्जी काळ्याशि रत झाली असेल )  जर्मन  ज्युचे सत्व आणि आणि काळा आफ्रिकी कच्चा माल  ( basic negroid stock ) याच्या मिश्रणातून  असलेच  विचित्र प्रोडक्ट तयार होणार . लासाले चा आगाव हट्टीपणा (importunate) एखाद्या  निग्गर  सारखाच आहे "  (संदर्भ १) 

मार्क्स आणि एंजल्स चा मुळातला पत्रव्यवहार जर्मन भाषेतून आहे. जर्मनीतला बोली शब्द नेगार असा आहे . नेगार न वापरता … जर्मन पत्रातही मार्क्स आणि एंजल्स ने निग्गर  हाच इंग्रजी शब्द वारंवार वापरला आहे .  निग्गर हि अपमानास्पद शिवी आहे . रक्त भेसळ , कवटिचा आकार आणि केसाचा पोत यावरून माणसाच्या वर्ण - वंश आणि वर्तणुकीबद्दल  (importunate)  मार्क्सने केलेली टिप्पणी यात दिसते . हा शुद्ध वंशवाद आहे . हिटलरपूर्व  युरोपात या विचाराची पक्की पकड होती . मार्क्सवरही त्याचा प्रभाव दिसतो.  
मार्क्स मत :  हीन वंशाचे काळे कृष्णवर्णीय 

मार्क्सचा वर्गलढा आणि समता गोर्या राष्ट्रातील गोर्या लोकांसाठी आहे . इतर राष्ट्रांना मार्क्स वाद लागू  असला  तरी शुद्ध वंश , हीन दर्जाचे वंश , मारून टाकण्याच्या लायकीचे वंश , गुलाम व्हायच्या लायकीचे वंश या तत्कालीन संकल्पना  मार्क्सच्या डोक्यात फ़िट्ट आहेत . ट्रीमोअ या वंशवादि शास्त्रज्ञा वर स्तुतिसुमने उधळत मार्क्स ने खालील मत व्यक्त केले आहे : -

" ट्रीमो चे संशोधन डार्विन पेक्षा अधिक योग्य आहे . त्याच्या विचाराचे ऐतिहासिक आणि राजकीय उपयोजन  महत्वाचे आणि   अधिक फलदायी ठरते …. ट्रिमो ने दाखवून दिले आहे कि काळ्यांचा निग्रो वंश हा  उत्क्रांतीत हीन दर्जाला घसरलेला वंश होय . "  (संदर्भ २)  

डार्विनच्या उत्क्रांती वादाचे असे  अनेक चुकीचे बोध  तत्कालीन युरोपात प्रचलीत होते.  सजीवाची उत्क्रांती प्रगतीकडे होते आणि काळे लोक हा उत्क्रांत सजीव नसून -   माकडाच्या  खाली दिशेने अधोगती झालेला अभागी जीव आहे असे हे ट्रिमॉ चे म्हणणे आहे . काळ्याचे माणूसपण ट्रिमो  नाकारतो . मार्क्स ने त्याला उचलून धरले आहे .

पण वंशवाद हे ट्रिमो आणि मार्क्सचे घोर अज्ञान आहे . वास्तविक पाहता  डार्विनचा विकसित  सिद्धांत  वंशभेद   खोडून काढतो आणि सर्व मानव  एकच आहेत अशा निष्कर्षाला आज येतो .( यावर अधिक माहिती साठी येथे क्लिक करा  . )

पण तत्कालीन युरोपने  डार्विनचा चुकीचा अर्थ काढत….  युजेनिक्स पासून हिटलरच्या वंश संहारापर्यंत अनेक विकृत प्रयोग केलेले होते . मार्क्स चा विचार तत्कालीन युरोपियन विचारा प्रमाणे जातीवादी - वंश - वर्ण श्रेष्ठत्व वादि असाच आहे .
कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्समार्क्स एंजल्सचि युरोपियन जोडगोळी : १८४८ 

१७८९ सालची पहिली फ्रेंच राज्यक्रांति, १८०४ साली नेपोलियनचा राज्याभिषेक.  या पार्श्व भूमीवर १८४८ साली युरोपात सार्वत्री क्रांती - लढाया - बंडे आणि नव राष्ट्रवादाचा उदय झालेला दिसतो . मुख्यत: पश्चिम आणि मध्य युरोपातल्या देशात राजेशाही विरुद्ध बंड घडत होते. तंत्र - विज्ञानातली  प्रगती , औद्योगिक क्रांति , कामगार वर्गाचे शोषण , मध्यम वर्गाचा उदय यातून हा घनघोर संघर्ष पेटत होता .

राजांचे राजमुकुट पालथे पडले , सिंहासने मोडली…….  इटालीत लोकशाही , फ्रांन्स मध्ये फेब्रुवारी क्रांती , जर्मनीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुकार , डेन्मार्कची नवी राज्यघटना - हंगेरी , पोलंड , ब्राझील सार्या देशात १८४८ साली उठाव आणि युद्धे चालू आहेत . राजेशाहीकडून लोकशाहीकडे आणि सामंतशाहि कडुन घटनात्मक आधुनिक राज्य - राष्ट्रांकडे …… युरोपचा प्रवास चालू झाला आहे .

व्हर्नेअ या चित्रकाराचे १८४८ च्या अनागोंद क्रांतिचे प्रसिद्ध  तैलचित्र 

मात्र लोकशाही मागणारे सारे युरोपियन भारतासारख्या वसाहतीना  गुलाम बनवून त्यांचे शोषण करणे चालूच ठेवत आहेत.   मानवी मुल्ये फक्त युरोप पुरतीच लागू आहेत . याच १८४८ साली मार्क्स आणि एंजल्स हे दोन युरोपियन मित्र त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करतात - कम्युनिस्ट मेनिफ़ेस्टो . त्यांचा धर्म ग्रंथ !

  समकालीन युरोप प्रमाणे  मार्क्स आणि एंजल्स  चे विचार युरोप बाहेरील काळ्यांना मानव समजत नाहीत यात काही आश्चर्य नाहि.

हिटलरचा नेशनल सोशालीझम (नास्झी ) , मुसोलिनीचा हुकुमशाही समाजवाद,  मार्क्सचा साम्यवाद
हे त्या काळात जन्मलेले काही हिंसक विचार आहेत .दुसर्या महायुद्धात  जे हरले ते संपले . मार्क्स वादाला मात्र धर्माचे स्वरूप आल्याने तो टिकुन आहे. त्याचे अनेक उप प्रकार जन्मले आहेत . फ़्रोईड च्या कालबाह्य आणि आज चूक ठरलेल्या मानस शास्त्राबरोबर मार्क्स ची संगड घालत …जाणिव नेणिवेतील वर्ग संघर्ष आजही पोथिप्रिय मार्क्स धर्मियात लोकप्रिय आहे.मार्क्समत  :  काळ्यांची गुलामी - जाणिव आणि नेणीवेत !

अमेरिकेत त्या काळी आफ्रिकन स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून राबवले जात आहे. त्यांना जनावराप्रमाणे कोंडुन ठेवले जात आहे. पुरेसे अन्न नाही . चाबकाचे फटके आहेत . जीवघेणे कष्ट आहेत . काळ्यांच्या गुलामी   बद्दल मार्क्सचे लिखाण अतिशय सूचक आहे .

मार्क्स गुलामीचे दोन भाग पाडतो . प्रत्यक्ष गुलामी आणि अप्रत्यक्ष गुलामी . काळ्या माणसांच्या गुलामीला तो प्रत्यक्ष गुलामी म्हणतो . आणि युरोपातील गोऱ्या कामगारांच्या शोषक नोकरीला  अप्रत्यक्ष गुलामी म्हणतो . मार्क्सचा वर्ग लढा (अप्रत्यक्ष गुलामी) गोऱ्या राष्ट्रातील समतेसाठी गोऱ्या गुलामांनि गोऱ्या मालकांशी केलेले युद्ध आहे . पुद्धोऑ  नावाच्या समाज वाद्याशी मार्क्स चे बरेच वाद विवाद झालेले आहेत.      पुद्धोऑ लिखित पुस्तकाला उत्तर द्यायला मार्क्स ने ' पोव्हर्टि ऑफ फ़िलोसोफ़ि( तत्वज्ञानाची गरिबी ) नामक पुस्तिका लिहिली आहे .  मार्क्स लिहितो  :

" (काळ्या) गुलामाशिवाय कापूस नाही . कापसाशिवाय यंत्रमाग नाही -  कि नवी औद्योगिक क्रांति नाही. गुलामीमुळे वसाहतींना मुल्य प्राप्त होते . वसाहतींमुळे जागतिक व्यापार संभवतो , व्यापारामुळेच मोठे उद्योग उभे राहतात . गुलामी हि अतिशय महत्वाची अर्थशास्त्रीय कल्पना आहे . जर गुलामी रद्द केली तर अमेरिके सारखा प्रगीतीशील देश एक पितृसत्ताक सामंतशाहि देश (patriarchal country) बनून जाईल . जर अमेरिकेचा नाश झाला तर सर्व आधुनिक अर्थशास्त्र आणि प्रागतिक संस्कृती नष्ट होऊन जाइल. "  ( संदर्भ ३ पृष्ठ  ५० ) 

 " हे पुन्हा स्पष्ट करायची अजिबातच गरज नाही कि येथे मी प्रत्यक्ष गुलामिबद्दल बोलतो आहे . अमेरिका , ब्राझील आदी देशातील काळ्या निग्रोंच्या गुलामी बद्दल लिहितो आहे . बुर्झ्वा उद्योगात जे यंत्राचे स्थान आहे . तेच स्थान प्रत्यक्ष गुलामीला तेथे आहे . " ( संदर्भ ३ पृष्ठ  ४९ - ५० )

मार्क्सने काळ्या गुलामांची तुलना यंत्राशि केली आहे . त्याना तो मानव नसून प्राणि समजत असे हे  आधीच्या लेखातून स्पष्ट झालेले आहे .

सदर मार्क्सच्या लिखाणाला एंजल्स ने तळटिप जोडली आहे . आणि १८४७ साली मार्क्सचे लिखाण कसे बरोबर होते …. ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे .

हेगेलच्या डायलेक्टिक्स चा मार्क्स  आणि मार्क्स वाद्यांवर प्रचंड प्रभाव आहे. वरील  चर्चा  हेगेल च्या डायलेक्टिक्स चे उपयोजन आहे .  वंशवादाचे समर्थन मार्क्सच्या जाणिवेत तर आहेच पण कथित नेणिवेत सुद्धा आहे.

मार्क्सच्या आर्थिक विचारातले क्रौर्य - हिंसा आणि वंशवाद याचे आकलन होण्यासाठी मार्क्स वर प्रभाव टाकणारे तत्वज्ञ थोडक्यात समजून घ्यावे लागतील .मार्क्स वर प्रभाव असणारे विचारवंत : ट्रीमोअ , हेगेल आणि स्पेन्सर 

डार्विन वा लमर्क चा अतिशय चुकीचा अर्थ  तत्कालीन युरोपात प्रचलित होता . " बळी तो कान पिळी " सर्व्हायव्हल ऑफ द फ़िटेस्ट . शक्तिमान करी राज्य ! असा काहीसा हा विचार आहे . त्यात हीन दर्जाच्या वंशाला (स्पीशीज) मारून टाकणे वा गुलाम करणे हे नैसर्गिक मानले गेले आहे . शुद्ध आणि श्रेष्ठ वंशीय गोऱ्या लोकांच्यातलि  विषमता मिटवण्यासाठी हिटलरचा नाझीवाद किंवा मार्क्सचा साम्यवाद आहे. हेगेल , स्पेन्सर आणि ट्रिमॉ च्या मतांचा विलक्षण प्रभाव हिटलर वर सुद्धा आहे .

 हिटलरने युजेनिक्स म्हणून काही वांशिक प्रयोग केले होते . काळ्या , अपंग , बुटक्या , कुरूप , कमकुवत लोकांची नसबंदी आणि सुधृढ लोकांचे भरगोस पुनरुत्पादन यातून देशाला रोगमुक्त आणि सबळ करण्याचा हा हिटलरि विचार आहे . गरिबी नष्ट करण्यासाठी गरिबांना मारून टाका असे म्हणण्या इतकेच युजेनिक्स मुर्खपणाचे आहे .

युजेनिक्स च्या विचार वृक्षाला नाझी छळ छावणीत फळे आली 
हा युजेनिक्स चा विचार ट्रिमो , हेगेल आणि स्पेन्सरच्या विचाराचे फळ आहे. हेगेलचे डायलेक्टिक्स समजले कि हिटलर मार्क्स मुसोलिनीचा विचार कसा बनला ते ध्यानात येते .हेगेलचे डायलेक्टिक्स

मनात एखादा विचार (थेसिस ) आला कि त्यावर काही शंका - आक्षेप (एन्टी थिसिस ) घेता येतात.  त्याच्या घुसळणितुन एक नवा विचार (सिन्थेसिस ) जन्माला येतो . हा सिन्थेसिस (नव विचार) सुद्धा एक प्रकारचा विचार (थेसिस) आहे. मग त्यालाही शंका - आक्षेप (एन्टी थिसिस ) घेता येतात . मग पुन्हा नवा विचार जन्मतो . अशा प्रकारच्या विचार कलहातून - विचाराची प्रगती होत जाते .

हिटलर आणि नाझी पक्षाने  हेगेलचे डायलेक्टिक्स वंशवादाला लावले . आणि हीन वंशाचा नाश करण्यासाठी   योजना बनवल्या . एन्टी थिसिस असलेल्या हीन वंशाचा नाश केल्याशिवाय नवा सिंन्थेसिस कसा जन्माला येईल ?  हेगेलचे डायलेक्टिक्स समाजशास्त्रात वापरले तर संघर्ष हिंसा आणि वंश विच्छेद अटळ आहे .

मार्क्स ने हेगेलचे डायलेक्टिक्स   अर्थशास्त्राला लावले आणि कम्युनिझम चा जन्म झाला. त्यामुळे कम्युनिझम मध्येही वर्ग संघर्ष आणि हिंसा अटळ आहे . मुळात  हेगेलचे डायलेक्टिक्स साफ चुकीचे आहे . विज्ञान आणि जीवशास्त्र याच्याशी हेगेल सुसंगत नाहि.  मानवी विचार हे थेसिस - एन्टी थिसिस अशा प्रकारे चालत नाहीत . मज्जातंतुच्या मेंदुतल्या जोडण्या स्मृतीचे विघटन शेकडो लहान लहान एककात करत असतात . त्यातील जो भाग आधी अनुभवलेला असतो तो लक्षात राहतो . विचार करण्याच्या जैविक प्रक्रियेत अनुभवाचा पोझीटीव्ह फ़िड्बेक अधिक महत्वाचा असतो . एन्टी थिसिस   नव्हे . असो.  हा एका  स्वतंत्र लेखाचा विषय आहे

 संघर्ष आणि हिंसेशिवाय सुद्धा प्रगती होते . आणि कायम प्रगती झालीच पाहिजे अशी काही अट परमेश्वराने (!) घातलेली नाही . हेगेलचे  नियम समाज शास्त्रांना लावता येत नाहीत .  हिटलरचीच चूक मार्क्स ने केलेली आहे. पोथिनिश्ठ मार्क्सवादी नवे विज्ञान न शिकता…  हेगेलच्या डायलेक्टिक्स ची  पारायणे करत बसले आहेत .

आंबेडकर आणि मार्क्स 

डॉ   बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्स आणि बुद्ध नावाचे एक पुस्तक लिहिले आहे . त्याच्या शेवटच्या वाक्यांचा  सारांश असा -  फ़्रेंच राज्यक्रांति मला स्वीकाराहार्य वाटते कारण  समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हि तिची घोषणा !  (मानवी ) बंधुता आणि स्वातंत्र्य याचा मार्क्सवादात स्वीकार नाही . म्हणून मार्क्स मान्य नाही.  (बुद्धात तिन्ही असल्याने तो मला अधिक प्रिय आहे )

 (मानवी ) बंधुता आणि स्वातंत्र्य याचा मार्क्सवादात स्वीकार नाही म्हणून मार्क्स मान्य नाही . 

(मार्क्स चे वांशिक उद्गार त्याकाळी इंग्रजीत भाषांतरीत  झाले नव्हते, तरीही बंधुता आणि स्वातंत्र्य याचा आभाव कम्युनिस्ट विचारात आढळल्याने बाबासाहेबांनी  मार्क्स नाकारला )

मार्क्स - एंजल्स  मत : हीन वंश आणि गरीब राष्ट्रे नष्ट करा 

हिटलरपूर्व जर्मनीत ज्यू द्वेषाचे प्रमाण तुलनेने कमी होते. आणि अनेक ज्यू तरुणांनाही जर्मन राइश (साम्राज्याची) स्वप्ने पडत असत . जर्मनीच्या पूर्वेला असलेल्या इंग्लंड फ्रांस आदी देशा बद्दल आदर आणि पश्चिमेच्या - स्लाव, झेक आणि रुमानिया वगैरे राष्ट्रांचा नाश हे  तत्कालीन जर्मनीचे तरुण स्वप्न  होते. हिटलर आणि मार्क्सची काही स्वप्ने तंतोतंत सारखी आहेत .  मार्क्स आणि एंजल्स ने १८४८ साली नव्या राइशन  चे  वृत्तपत्र म्हणून पेपर काढला . याचा संपादक मार्क्स आहे . एंजल्स लिहितो
"आम्ही पुन्हा बजावून सांगतो : पोलिश,टर्किश, रूसी  वगळता स्लाव वंशियांना भविष्य नाही . स्लाव लोकांकडे इतिहास , भूगोल , राजकारण , उद्योग यापैकी काहीच नाहि.आणि म्हणूनच  स्वतंत्र राष्ट्र म्हणून घेण्याची त्यांची पात्रता नाहि "   (संदर्भ ५ : १४-२२-१८४९ चा लेख ) 
याच  वर्तमानपत्रात मार्क्स आणि एंजल्स ने स्लाव , झेक , रुमानिया  आदी  राष्ट्रांविरुद्ध लहान राष्ट्रांविरुद्ध विषारी प्रचार चालवला होता .  एंजल्स आणखी लिहितो :
" मागास बाल्कन राष्ट्रांनि तात्काळ करायचे कर्तव्य म्हणजे क्रांतीच्या वादळात विरून जाणे हे होय . जर्मन पोल आणि हंगेरियन - बालकनांचा  भीतीदायक   सूड  घेणार आहेत.   सर्वंकश युद्धाचा प्रारंभ होईल. त्यात हि इटुकली बैलबोडी राष्ट्रे  कायमची नष्ट होणार आहेत. प्रतिक्रियात्मक , राज्ये , वंश आणि लोकही नष्ट होणार आहेत. आणि तीच प्रगती असेल. "  (संदर्भ ६)
एंजल्स ची हि सिंह गर्जना पुढे हिटलर ने वास्तवात आणली .मार्क्सवादी विष पेरणी 

क्रांतीकारकांचा दहशत वाद , हिंसेशिवाय प्रगती अशक्य , हिंसा हि क्रांतीला जन्म देणारी सुइण आहे अशा अर्थाची मार्क्सची शेकडो वाक्ये आहेत. स्टेलिन आणि माओ हे दोन मार्क्सचे अनुयायी .
रशियाच्या कम्युनिस्ट राजवटीत - स्टेलिन च्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हुकुमाद्वारे लाखो माणसे मारली गेली आहेत. माओ ची हिंसा थरकाप उडवणारी आहे . लाल चीन ने तरुण निशस्त्र विद्यार्थी आंदोलकांवर रणगाडे चालवून चौक च्या चौक रक्ताने भरले आहेत . (तियानान्मान चौक १९८९ )सामाजिक क्रांति झाली का ?

उत्तर नाही असे आहे.

लपवणे , दडपून खोटे बोलणे यात कम्युनिस्ट राजवटी पारंगत आहेत . चंद्रावर उतरलेला पहिला माणुस रशियन होता असे रशियन सरकार शिकवत असे. आजही चीन मध्ये फेसबुकवर बंदि आहे . तीयानंमान चौक याबद्दल कोणतीही माहिती चीन मधल्या इंटर्नेट वर मिळत नाही .

हेगेल    च्या तत्वजज्ञनाचा विकृत अर्थ काढून जमेल तेंव्हा हिंसा आणि न जमल्यास पुढच्या हिंसेची तयारी असे कम्युनिस्टांचे सूत्र आहे . जाणिव नेणीव खाउजा विरोध वर्ग संघर्ष मय  इतिहास---  या कम्युनिस्ट विचाराची विष पेरणी यत्र तत्र सर्वत्र झाली आहे. उद्याच्या हिंसेसाठी  हि तयारी केली गेली आहे. हेगेल मार्क्सचे विचार पुढे नेले तर हेच घडणार आहे. कम्युनिसटांच्या जाणिवेतले ध्येय हिंसा आणि नेणिवेतले ध्येय वंश्वाद असावे !!

कम्युनिस्ट बंधुहो १८ व्या शतकातील मागास विचाराला शास्त्रीय समाजवाद मानू  नका .

कोम्रेड बांधवांचे त्यांच्या त्यागाबद्दल आभार मानून सुद्धा त्यांची चिकित्सा करणे आणि मार्क्स बाबाच्या धार्मिक अंधश्रद्धेतून त्याना बाहेर काढणे . हे आम्ही आमचे कर्तव्य समजातो . त्यात माणुसकीचे भले आहे .  भारताचे हित आहे .  पुरोगाम्याचे कल्याण आहे आणि कम्युनिस्टांचे तर कोटकल्याण आहे .
(क्रमश:)

(लाल सलाम  पुढचा भाग : कॉम्रेड स्टालिन ते कोम्रेड शरद)
-------------------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ

१) कृष्णवर्णीय जावयाबद्दल टिप्पणी :  https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1862/letters/62_07_30a.htm

२) मार्क्स मत :  हीन वंशाचे काळे कृष्णवर्णीय 
https://marxists.anu.edu.au/archive/marx/works/1866/letters/66_08_07.htm

३)  काळ्यांची गुलामी - जाणिव आणि नेणीव  (पृष्ठ ४९ -५०)
https://www.marxists.org/archive/marx/works/download/pdf/Poverty-Philosophy.pdf

४) आंबेडकर आणि मार्क्स 
http://www.ambedkar.org/ambcd/20.Buddha%20or%20Karl%20Marx.htm#a8

५) स्लाव वंश स्वातंत्र्यास अपात्र ( १४-२-१८४९) 
https://www.marxists.org/archive/marx/works/download/Marx_Articles_from_the_NRZ.pdf

६) Neue Rheinische Zeitung. Translated By Wolf Pg 39 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

: कम्युनिस्ट धर्माची चिकित्सा :( भाग  २)
  वंश जातीवादी  - कार्ल मार्क्स  मार्क्सने कृष्णवर्णीय निग्रोना (आफ्रिकन योग्य शब्द ) हीन दर्जाचे मानले होते. किंबहुना काळ्या कातडीच्या लोकांच्या हिनतेचे - गुलामीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन मार्क्स च्या लिखाणात येते  .

आजचे मार्क्सवादी  जगाला समता  - वर्ग संघर्ष आणि शहाणपणाचे डोस पाजत आहेत.  भारतातील  सर्व बौद्धिक संपदेवर त्यांचे निरंकुश वर्चस्व आहे . डाव्या / पुरोगामी चळवळिंनि भारतीय  मार्क्सवाद्यांनि लिहिलेलेला इतिहास   ग्राह्य मानला आहे . त्यामुळे हा विषय अतिशय महत्वाचा आहे .

 मार्क्स आणि मार्क्स वाद्यांच्या जाणिव आणि नेणिवेतील वंश वाद , वर्ण श्रेष्ठत्व आणि त्यांच्या हिंसक विचारांचा प्रस्तुत लेखात आढावा घ्यायचा आहे . त्यासाठी मार्क्सवाद्यांनिच  ऑनलाइन  प्रकाशित केलेले साहित्य  संदर्भ म्हणून वापरायचे आहे. मार्क्सवादी आणि कम्युनिस्टांच्या कामगार प्रश्नावरील प्रामाणिक लढयांसाठी  त्यांचे अभिनंदन - आभार मानून मी  मागील प्रकरणातच  त्यांना लाल सलाम केला आहे . प्रस्तुत लेख हा  लाल बांधवांच्या मार्क्स अवतारा बद्दलच्या अंधश्रद्धा निर्मुलनाचा  नम्र प्रयत्न आहे.

कार्ल मार्क्स हा कम्युनिस्ट धर्माचा संस्थापक प्रेषित होय . 

मार्क्सच्या मुलीचा आंतरजातीय विवाह 

क्रांती स्वत:च्या कुटुंबात झाली कि खरी भाषा बोलली जाते . मार्क्सच्या मुलीने पॉल लाफ़ाए नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. हा इसम मार्क्सच्या  विचारांचाच चाहता  होता. पण त्याच्या पुर्वाजात कोणीतरी कृष्णवर्णीय - आफ्रिकन काळा आहे  असा समज होता. ३० जुलै १८६२ रोजी एंजल्स ला लिहिलेल्या पत्रात मार्क्स ने स्वत:च्या किंचित १/८  कृष्णवर्णीय जावयाबद्दल टिप्पणी केली आहे : -

" आता मला स्पष्ट झाले कि पॉल च्या डोक्याचा आकार आणि केसाचा पोत; त्याची निग्गर पाळेमुळे दर्शवतो. एकतर  पॉल मोझेस ची साथ देणार्या काळ्या आफ्रिकनाचा वंशज असेल  (अथवा त्याची आई वा आज्जी काळ्याशि रत झाली असेल )  जर्मन  ज्युचे सत्व आणि आणि काळा आफ्रिकी कच्चा माल  ( basic negroid stock ) याच्या मिश्रणातून  असलेच  विचित्र प्रोडक्ट तयार होणार . पॉल चा आगाव हट्टीपणा (importunate) एखाद्या  निग्गर  सारखाच आहे "  (संदर्भ १) 
मार्क्स आणि एंजल्स चा मुळातला पत्रव्यवहार जर्मन भाषेतून आहे. जर्मनीतला बोली शब्द नेगार असा आहे . नेगार न वापरता … जर्मन पत्रातही मार्क्स आणि एंजल्स ने निग्गर  हाच इंग्रजी शब्द वारंवार वापरला आहे .  निग्गर हि अपमानास्पद शिवी आहे . रक्त भेसळ , कवटिचा आकार आणि केसाचा पोत यावरून माणसाच्या वर्ण - वंश आणि वर्तणुकीबद्दल  (importunate)  मार्क्सने केलेली टिप्पणी यात दिसते . हा शुद्ध वंशवाद आहे . हिटलरपूर्व  युरोपात या विचाराची पक्की पकड होती . मार्क्सवरही त्याचा प्रभाव दिसतो.  जावयाच्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल आदर असूनही मार्क्सला त्याचे १/८ काळे रक्त बोचते हे महत्वाचे आहे.
मार्क्स मत :  हीन वंशाचे काळे कृष्णवर्णीय 
मार्क्सचा वर्गलढा आणि समता गोर्या राष्ट्रातील गोर्या लोकांसाठी आहे . इतर राष्ट्रांना मार्क्स वाद लागू  असला  तरी शुद्ध वंश , हीन दर्जाचे वंश , मारून टाकण्याच्या लायकीचे वंश , गुलाम व्हायच्या लायकीचे वंश या तत्कालीन संकल्पना  मार्क्सच्या डोक्यात फ़िट्ट आहेत . ट्रीमोअ या वंशवादि शास्त्रज्ञा वर स्तुतिसुमने उधळत मार्क्स ने खालील मत व्यक्त केले आहे : -

" ट्रीमो चे संशोधन डार्विन पेक्षा अधिक योग्य आहे . त्याच्या विचाराचे ऐतिहासिक आणि राजकीय उपयोजन  महत्वाचे आणि   अधिक फलदायी ठरते …. ट्रिमो ने दाखवून दिले आहे कि काळ्यांचा निग्रो वंश हा  उत्क्रांतीत हीन दर्जाला घसरलेला वंश होय . "  (संदर्भ २)  
डार्विनच्या उत्क्रांती वादाचे असे  अनेक चुकीचे बोध  तत्कालीन युरोपात प्रचलीत होते.  सजीवाची उत्क्रांती प्रगतीकडे होते आणि काळे लोक हा उत्क्रांत सजीव नसून -   माकडाच्या  खाली दिशेने अधोगती झालेला अभागी जीव आहे असे हे ट्रिमॉ चे म्हणणे आहे . काळ्याचे माणूसपण ट्रिमो  नाकारतो . मार्क्स ने त्याला उचलून धरले आहे .

पण वंशवाद हे ट्रिमो आणि मार्क्सचे घोर अज्ञान आहे . वास्तविक पाहता  डार्विनचा विकसित  सिद्धांत  वंशभेद   खोडून काढतो आणि सर्व मानव  एकच आहेत अशा निष्कर्षाला आज येतो .( यावर अधिक माहिती साठी येथे क्लिक करा  . )

पण तत्कालीन युरोपने  डार्विनचा चुकीचा अर्थ काढत….  युजेनिक्स पासून हिटलरच्या वंश संहारापर्यंत अनेक विकृत प्रयोग केलेले होते . मार्क्स चा विचार तत्कालीन युरोपियन विचारा प्रमाणे जातीवादी - वंश - वर्ण श्रेष्ठत्व वादि असाच आहे .
मार्क्स एंजल्सचि युरोपियन जोडगोळी : १८४८ 

१७८९ सालची पहिली फ्रेंच राज्यक्रांति, १८०४ साली नेपोलियनचा राज्याभिषेक.  या पार्श्व भूमीवर १८४८ साली युरोपात सार्वत्री क्रांती - लढाया - बंडे आणि नव राष्ट्रवादाचा उदय झालेला दिसतो . मुख्यत: पश्चिम आणि मध्य युरोपातल्या देशात राजेशाही विरुद्ध बंड घडत होते. तंत्र - विज्ञानातली  प्रगती , औद्योगिक क्रांति , कामगार वर्गाचे शोषण , मध्यम वर्गाचा उदय यातून हा घनघोर संघर्ष पेटत होता .

राजांचे राजमुकुट पालथे पडले , सिंहासने मोडली…….  इटालीत लोकशाही , फ्रांन्स मध्ये फेब्रुवारी क्रांती , जर्मनीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुकार , डेन्मार्कची नवी राज्यघटना - हंगेरी , पोलंड , ब्राझील सार्या देशात १८४८ साली उठाव आणि युद्धे चालू आहेत . राजेशाहीकडून लोकशाहीकडे आणि सामंतशाहि कडुन घटनात्मक आधुनिक राज्य - राष्ट्रांकडे …… युरोपचा प्रवास चालू झाला आहे .मात्र लोकशाही मागणारे सारे युरोपियन भारतासारख्या वसाहतीना  गुलाम बनवून त्यांचे शोषण करणे चालूच ठेवत आहेत.   मानवी मुल्ये फक्त युरोप पुरतीच लागू आहेत . याच १८४८ साली मार्क्स आणि एंजल्स हे दोन युरोपियन मित्र त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करतात - कम्युनिस्ट मेनिफ़ेस्टो . त्यांचा धर्म ग्रंथ !

  समकालीन युरोप प्रमाणे  मार्क्स आणि एंजल्स  चे विचार युरोप बाहेरील काळ्यांना मानव समजत नाहीत यात काही आश्चर्य नाहि.

हिटलरचा नेशनल सोशालीझम (नास्झी ) , मुसोलिनीचा हुकुमशाही समाजवाद,  मार्क्सचा साम्यवाद
हे त्या काळात जन्मलेले काही हिंसक विचार आहेत .दुसर्या महायुद्धात  जे हरले ते संपले . मार्क्स वादाला मात्र धर्माचे स्वरूप आल्याने तो टिकुन आहे. त्याचे अनेक उप प्रकार जन्मले आहेत . फ़्रोईड च्या कालबाह्य आणि आज चूक ठरलेल्या मानस शास्त्राबरोबर मार्क्स ची संगड घालत …जाणिव नेणिवेतील वर्ग संघर्ष आजही पोथिप्रिय मार्क्स धर्मियात लोकप्रिय आहे.मार्क्समत  :  काळ्यांची गुलामी - जाणिव आणि नेणीवेत !

अमेरिकेत त्या काळी आफ्रिकन स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून राबवले जात आहे. त्यांना जनावराप्रमाणे कोंडुन ठेवले जात आहे. पुरेसे अन्न नाही . चाबकाचे फटके आहेत . जीवघेणे कष्ट आहेत . काळ्यांच्या गुलामी   बद्दल मार्क्सचे लिखाण अतिशय सूचक आहे .

मार्क्स गुलामीचे दोन भाग पाडतो . प्रत्यक्ष गुलामी आणि अप्रत्यक्ष गुलामी काळ्या माणसांच्या गुलामीला तो प्रत्यक्ष गुलामी म्हणतो . आणि युरोपातील गोऱ्या कामगारांच्या शोषक नोकरीला  अप्रत्यक्ष गुलामी म्हणतो . मार्क्सचा वर्ग लढा (अप्रत्यक्ष गुलामी) गोऱ्या राष्ट्रातील समतेसाठी गोऱ्या गुलामांनि गोऱ्या मालकांशी केलेले युद्ध आहे . पुद्धोऑ  नावाच्या समाज वाद्याशी मार्क्स चे बरेच वाद विवाद झालेले आहेत.      पुद्धोऑ लिखित पुस्तकाला उत्तर द्यायला मार्क्स ने पोव्हर्टि ऑफ फ़िलोसोफ़ि( तत्वज्ञानाची गरिबी ) नामक पुस्तिका लिहिली आहे .  मार्क्स लिहितो  :

" (काळ्या) गुलामाशिवाय कापूस नाही . कापसाशिवाय यंत्रमाग नाही -  कि नवी औद्योगिक क्रांति नाही. गुलामीमुळे वसाहतींना मुल्य प्राप्त होते . वसाहतींमुळे जागतिक व्यापार संभवतो , व्यापारामुळेच मोठे उद्योग उभे राहतात . गुलामी हि अतिशय महत्वाची अर्थशास्त्रीय कल्पना आहे . जर गुलामी रद्द केली तर अमेरिके सारखा प्रगीतीशील देश एक पितृसत्ताक सामंतशाहि देश (patriarchal country) बनून जाईल . जर अमेरिकेचा नाश झाला तर सर्व आधुनिक अर्थशास्त्र आणि प्रागतिक संस्कृती नष्ट होऊन जाइल. "  ( संदर्भ ३ पृष्ठ  ५० ) 

 " हे पुन्हा स्पष्ट करायची अजिबातच गरज नाही कि येथे मी प्रत्यक्ष गुलामिबद्दल बोलतो आहे . अमेरिका , ब्राझील आदी देशातील काळ्या निग्रोंच्या गुलामी बद्दल लिहितो आहे . बुर्झ्वा उद्योगात जे यंत्राचे स्थान आहे . तेच स्थान प्रत्यक्ष गुलामीला तेथे आहे . " ( संदर्भ ३ पृष्ठ  ४९ - ५० )

मार्क्सने काळ्या गुलामांची तुलना यंत्राशि केली आहे . त्याना तो मानव नसून प्राणि समजत असे हे  आधीच्या लेखातून स्पष्ट झालेले आहे .

सदर मार्क्सच्या लिखाणाला एंजल्स ने तळटिप जोडली आहे . आणि १८४७ साली मार्क्सचे लिखाण कसे बरोबर होते …. ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे .

हेगेलच्या डायलेक्टिक्स चा मार्क्स  आणि मार्क्स वाद्यांवर प्रचंड प्रभाव आहे. वरील  चर्चा  हेगेल च्या डायलेक्टिक्स चे उपयोजन आहे .  वंशवादाचे समर्थन मार्क्सच्या जाणिवेत तर आहेच पण कथित नेणिवेत सुद्धा आहे.

मार्क्सच्या आर्थिक विचारातले क्रौर्य - हिंसा आणि वंशवाद याचे आकलन होण्यासाठी मार्क्स वर प्रभाव टाकणारे तत्वज्ञ थोडक्यात समजून घ्यावे लागतील .मार्क्स वर प्रभाव असणारे विचारवंत : ट्रीमोअ , हेगेल आणि स्पेन्सर 

डार्विन वा लमर्क चा अतिशय चुकीचा अर्थ  तत्कालीन युरोपात प्रचलित होता . " बळी तो कान पिळी " सर्व्हायव्हल ऑफ द फ़िटेस्ट . शक्तिमान करी राज्य ! असा काहीसा हा विचार आहे . त्यात हीन दर्जाच्या वंशाला (स्पीशीज) मारून टाकणे वा गुलाम करणे हे नैसर्गिक मानले गेले आहे . शुद्ध आणि श्रेष्ठ वंशीय गोऱ्या लोकांच्यातलि  विषमता मिटवण्यासाठी हिटलरचा नाझीवाद किंवा मार्क्सचा साम्यवाद आहे. हेगेल , स्पेन्सर आणि ट्रिमॉ च्या मतांचा विलक्षण प्रभाव हिटलर वर सुद्धा आहे .

 हिटलरने युजेनिक्स म्हणून काही वांशिक प्रयोग केले होते . काळ्या , अपंग , बुटक्या , कुरूप , कमकुवत लोकांची नसबंदी आणि सुधृढ लोकांचे भरगोस पुनरुत्पादन यातून देशाला रोगमुक्त आणि सबळ करण्याचा हा हिटलरि विचार आहे . गरिबी नष्ट करण्यासाठी गरिबांना मारून टाका असे म्हणण्या इतकेच युजेनिक्स मुर्खपणाचे आहे .

हा युजेनिक्स चा विचार ट्रिमो , हेगेल आणि स्पेन्सरच्या विचाराचे फळ आहे. हेगेलचे डायलेक्टिक्स समजले कि हिटलर मार्क्स मुसोलिनीचा विचार कसा बनला ते ध्यानात येते .हेगेलचे डायलेक्टिक्स

मनात एखादा विचार (थेसिस ) आला कि त्यावर काही शंका - आक्षेप (एन्टी थिसिस ) घेता येतात.  त्याच्या घुसळणितुन एक नवा विचार (सिन्थेसिस ) जन्माला येतो . हा सिन्थेसिस (नव विचार) सुद्धा एक प्रकारचा विचार (थेसिस) आहे. मग त्यालाही शंका - आक्षेप (एन्टी थिसिस ) घेता येतात . मग पुन्हा नवा विचार जन्मतो . अशा प्रकारच्या विचार कलहातून - विचाराची प्रगती होत जाते .

हिटलर आणि नाझी पक्षाने  हेगेलचे डायलेक्टिक्स वंशवादाला लावले . आणि हीन वंशाचा नाश करण्यासाठी   योजना बनवल्या . एन्टी थिसिस असलेल्या हीन वंशाचा नाश केल्याशिवाय नवा सिंन्थेसिस कसा जन्माला येईल ?  हेगेलचे डायलेक्टिक्स समाजशास्त्रात वापरले तर संघर्ष हिंसा आणि वंश विच्छेद अटळ आहे .

मार्क्स ने हेगेलचे डायलेक्टिक्स   अर्थशास्त्राला लावले आणि कम्युनिझम चा जन्म झाला. त्यामुळे कम्युनिझम मध्येही वर्ग संघर्ष आणि हिंसा अटळ आहे . 

मुळात  हेगेलचे डायलेक्टिक्स साफ चुकीचे आहे . विज्ञान आणि जीवशास्त्र याच्याशी हेगेल सुसंगत नाहि.  मानवी विचार हे थेसिस - एन्टी थिसिस अशा प्रकारे चालत नाहीत . मज्जातंतुच्या मेंदुतल्या जोडण्या स्मृतीचे विघटन शेकडो लहान लहान एककात करत असतात . त्यातील जो भाग आधी अनुभवलेला असतो तो लक्षात राहतो . विचार करण्याच्या जैविक प्रक्रियेत अनुभवाचा पोझीटीव्ह फ़िड्बेक अधिक महत्वाचा असतो . एन्टी थिसिस   नव्हे . असो.  हा एका  स्वतंत्र लेखाचा विषय आहे

 संघर्ष आणि हिंसेशिवाय सुद्धा प्रगती होते . आणि कायम प्रगती झालीच पाहिजे अशी काही अट परमेश्वराने (!) घातलेली नाही . हेगेलचे  नियम समाज शास्त्रांना लावता येत नाहीत .  हिटलरचीच चूक मार्क्स ने केलेली आहे. पोथिनिश्ठ मार्क्सवादी नवे विज्ञान न शिकता…  हेगेलच्या डायलेक्टिक्स ची  पारायणे करत बसले आहेत .

आंबेडकर आणि मार्क्स 

डॉ   बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्स आणि बुद्ध नावाचे एक पुस्तक लिहिले आहे . त्याच्या शेवटच्या वाक्यांचा  सारांश असा -  फ़्रेंच राज्यक्रांति मला स्वीकाराहार्य वाटते कारण  समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हि तिची घोषणा !  (मानवी ) बंधुता आणि स्वातंत्र्य याचा मार्क्सवादात स्वीकार नाही . म्हणून मार्क्स मान्य नाही.  (बुद्धात तिन्ही असल्याने तो मला अधिक प्रिय आहे ) (मानवी ) बंधुता आणि स्वातंत्र्य याचा मार्क्सवादात स्वीकार नाही म्हणून मार्क्स मान्य नाही . 

(मार्क्स चे वांशिक उद्गार त्याकाळी इंग्रजीत भाषांतरीत  झाले नव्हते, तरीही बंधुता आणि स्वातंत्र्य याचा आभाव कम्युनिस्ट विचारात आढळल्याने बाबासाहेबांनी  मार्क्स नाकारला )

मार्क्स - एंजल्स  मत : हीन वंश आणि गरीब राष्ट्रे नष्ट करा 

हिटलरपूर्व जर्मनीत ज्यू द्वेषाचे प्रमाण तुलनेने कमी होते. आणि अनेक ज्यू तरुणांनाही जर्मन राइश (साम्राज्याची) स्वप्ने पडत असत . जर्मनीच्या पूर्वेला असलेल्या इंग्लंड फ्रांस आदी देशा बद्दल आदर आणि पश्चिमेच्या - स्लाव, झेक आणि रुमानिया वगैरे राष्ट्रांचा नाश हे  तत्कालीन जर्मनीचे तरुण स्वप्न  होते. हिटलर आणि मार्क्सची काही स्वप्ने तंतोतंत सारखी आहेत .  मार्क्स आणि एंजल्स ने १८४८ साली नव्या राइशन  चे  वृत्तपत्र म्हणून पेपर काढला . याचा संपादक मार्क्स आहे . एंजल्स लिहितो

"आम्ही पुन्हा बजावून सांगतो : पोलिश,टर्किश, रूसी  वगळता स्लाव वंशियांना भविष्य नाही . स्लाव लोकांकडे इतिहास , भूगोल , राजकारण , उद्योग यापैकी काहीच नाहि.आणि म्हणूनच  स्वतंत्र राष्ट्र म्हणून घेण्याची त्यांची पात्रता नाहि "   (संदर्भ ५ : १४-२२-१८४९ चा लेख ) 
याच  वर्तमानपत्रात मार्क्स आणि एंजल्स ने स्लाव , झेक , रुमानिया  आदी  राष्ट्रांविरुद्ध लहान राष्ट्रांविरुद्ध विषारी प्रचार चालवला होता .  एंजल्स आणखी लिहितो :
" मागास बाल्कन राष्ट्रांनि तात्काळ करायचे कर्तव्य म्हणजे क्रांतीच्या वादळात विरून जाणे हे होय . जर्मन पोल आणि हंगेरियन - बालकनांचा  भीतीदायक   सूड  घेणार आहेत.   सर्वंकश युद्धाचा प्रारंभ होईल. त्यात हि इटुकली बैलबोडी राष्ट्रे  कायमची नष्ट होणार आहेत. प्रतिक्रियात्मक , राज्ये , वंश आणि लोकही नष्ट होणार आहेत. आणि तीच प्रगती असेल. "  (संदर्भ ६)
एंजल्स ची हि सिंह गर्जना पुढे हिटलर ने वास्तवात आणली .मार्क्सवादी विष पेरणी 

क्रांतीकारकांचा दहशत वाद , हिंसेशिवाय प्रगती अशक्य , हिंसा हि क्रांतीला जन्म देणारी सुइण आहे अशा अर्थाची मार्क्सची शेकडो वाक्ये आहेत. स्टेलिन आणि माओ हे दोन मार्क्सचे अनुयायी .

रशियाच्या कम्युनिस्ट राजवटीत - स्टेलिन च्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हुकुमाद्वारे लाखो माणसे मारली गेली आहेत. माओ ची हिंसा थरकाप उडवणारी आहे . लाल चीन ने तरुण निशस्त्र विद्यार्थी आंदोलकांवर रणगाडे चालवून चौक च्या चौक रक्ताने भरले आहेत . (तियानान्मान चौक १९८९ )

सामाजिक क्रांति झाली का ?

उत्तर नाही असे आहे.

लपवणे , दडपून खोटे बोलणे यात कम्युनिस्ट राजवटी पारंगत आहेत . चंद्रावर उतरलेला पहिला माणुस रशियन होता असे रशियन सरकार शिकवत असे. आजही चीन मध्ये फेसबुकवर बंदि आहे . तीयानंमान चौक याबद्दल कोणतीही माहिती चीन मधल्या इंटर्नेट वर मिळत नाही .

हेगेल    च्या तत्वजज्ञनाचा विकृत अर्थ काढून जमेल तेंव्हा हिंसा आणि न जमल्यास पुढच्या हिंसेची तयारी असे कम्युनिस्टांचे सूत्र आहे . जाणिव नेणीव खाउजा विरोध वर्ग संघर्ष मय  इतिहास---  या कम्युनिस्ट विचाराची विष पेरणी यत्र तत्र सर्वत्र झाली आहे. उद्याच्या हिंसेसाठी  हि तयारी केली गेली आहे. हेगेल मार्क्सचे विचार पुढे नेले तर हेच घडणार आहे. कम्युनिसटांच्या जाणिवेतले ध्येय हिंसा आणि नेणिवेतले ध्येय वंश्वाद असावे !!

कम्युनिस्ट बंधुहो १८ व्या शतकातील मागास विचाराला शास्त्रीय समाजवाद मानू  नका .

कोम्रेड बांधवांचे त्यांच्या त्यागाबद्दल आभार मानून सुद्धा त्यांची चिकित्सा करणे आणि मार्क्स बाबाच्या धार्मिक अंधश्रद्धेतून त्याना बाहेर काढणे . हे आम्ही आमचे कर्तव्य समजातो . त्यात माणुसकीचे भले आहे .  भारताचे हित आहे .  पुरोगाम्याचे कल्याण आहे आणि कम्युनिस्टांचे तर कोटकल्याण आहे .
(क्रमश:)

(लाल सलाम  पुढचा भाग : कॉम्रेड स्टालिन ते कोम्रेड शरद)

-------------------------------------------------------------------------------------------------------------

९ टिप्पण्या:

 1. आता दुस-या लेखाबद्दल. हा लेख म्हणजे अणूबोम्बच आहे यात शंका नाही. मार्क्सचे हे वांशिक धोरण कोणाला, मलाही, माहित नव्हते. तत्कालीन युरोपच्या श्रेष्ठत्वतावादी विचारांचा हा वंशवादी पगडा म्हटला तरी मार्क्सने त्याची सांगड अर्थवादाशी व वर्गसंघर्षाशी घालुन दिल्याने काय होते हे तुम्ही अप्रतिम दर्शवले आहे. एखाद्या मानवी गटाला बुद्धीने हीन मानने हीच मुळात अमानवी/अशास्त्रीय संकल्पना आहे. तीच संकल्पना अर्थशास्त्रात आणत भांडवलदार हा शोषकच असतो म्हणून त्याचा नायनाट करणे मार्क्सवादाला अत्यावश्यक बनुन जात असेल तर मग नवल नाही. त्या दृष्टीने मार्क्सवाद/माओवाद हा मानवी मुलभुत प्रेरणांना कस्पटासमान लेखतो हे उघड आहे. या वादातुन केले गेलेले इतिहासलेखनही, विशेषत: त्यांचे विश्लेशन प्राय: अविश्वसनीय बनुन जाते ते यामुळेच. कोम्रेड पाटील यांचे तुम्ही केलेले विश्लेशन वाचायला आवडेल तसेच रोमिला थापर यांचेही. ही मालिका अत्युत्तम अशी होते आहे. ही नेटाने पुर्ण करा....(नाहीतर...लवकरच येत आहे होSSSSSS हीच ललकारे कानावर यायची!

  उत्तर द्याहटवा
 2. जब्बरदस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त!

  पुढच्या भागाची वात बघतोय!

  उत्तर द्याहटवा
 3. http://jonjayray.tripod.com/engels.html
  http://www.orgonelab.org/MarxEngelsQuotes.htm

  उत्तर द्याहटवा
 4. डॉक्टर Abhiram Dixit, आपल्या "वंश जातीवादी - कार्ल मार्क्स" या लेखातील काही संदर्भ चुकीचे आहेत हे आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो.
  संदर्भ 1. मार्क्सचे एंगल्सला पत्र, 30 जुलै 1862 यात मार्क्स त्याचा समकालीन ज्यू जर्मन विचारवंत लासाले विषयी आपला राग व्यक्त करत आहे, जावयाविषयी (लाफाए) हे बोलणे नव्हे. या पत्रात मार्क्सची स्वत:ची आर्थिक स्थिती कंगाल असल्याचे स्पष्ट होते. सावकार, देणेकरी तगादा लावत आहेत. मार्क्स आपल्या कुटुंबाची इभ्रत वाचवण्याच्या प्रयत्नात आहे आणि अशावेळी आर्थिक मदत करण्याऐवजी त्या वेळी त्याचा पाहुणचार झोडणारा त्याचा "मित्र" लासाले त्याला मदतीच्या बदल्यात त्याच्या मुलीला प्रशियन सरदार हात्झफेल्डला सादर करण्याचा सल्ला देतोय. लासालेच्या पाहूणचारासाठी मार्क्सच्या बायकोने असेल नसेल ते गहाण टाकले आहे हे ही तो सांगतोय. या पार्श्वभूमीवर त्याने लासालेला दिलेल्या शिव्या मार्क्सचा वर्णद्वेष म्हणून ग्राह्य धराव्या का?

  उत्तर द्याहटवा
 5. संदर्भ 2. मार्क्सचे एंगल्सला पत्र, 7 ऑगस्ट 1866 याच्या उत्तरार्धात मार्क्स ट्रिमोच्या आकलनाबद्दलच्या नव्या कामाबद्दल बोलतोय. आपण घेतलेले वाक्य "he shows that the common negro type is only a degeneration of a far higher one." हे ट्रिमोचे आहे, मार्क्सचे नव्हे. मार्क्स ट्रिमोच्या त्या काळी नावीन्यपूर्ण असलेल्या पंक्चुएटेड इक्विलिब्रियमच्या इव्होल्यूशनरी थिअरीमुळे (या थिअरीला निओडार्विनियन्सनी नंतर खोडून काढले आहे) प्रभावित झाला आहे. याचा अर्थ त्याने ट्रिमोचे शिष्यत्व पत्करले असा घ्यावा काय? 1866 मध्ये ट्रिमो प्रख्यात होता ही बाब इथे महत्वाची आहे.

  उत्तर द्याहटवा
 6. संदर्भ 3. The Poverty of Philosophy, Karl Marx 1847, हा प्रूदौंच्या The Philosophy of Poverty वरील क्रिटिकल थिसिस आहे. यात मार्क्स प्रूदौंने विदित केलेल्या "प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, चांगली आणि वाईट. यातली चांगली घ्यावी वाईट त्यागावी, म्हणजे सर्व समस्या सुटतील वगैरे वगैरे" तत्वज्ञानाला एक एक मुद्दा घेऊन सुरुंग लावतो आहे. आपण यात जे चौथे निरीक्षण (Fourth Observation) घेऊन मार्क्सला गुलामी मंजूर होती असे विधान करता ते निरीक्षण मुळात प्रूदौंचे तर्कट लावल्यास गुलामीचे विश्लेषण कसे होईल याबद्दलचे मार्क्सचे विश्लेषण आहे, मार्क्सचा स्वत:चा विचार नव्हे. या तर्कटाचा फोलपणा त्याच निरीक्षणात मार्क्स नोंदवतो हे नजरेआड करता कामा नये. ("By taking the economic categories thus successively, one by one, and making one the antidote to the other, M. Proudhon manages to make with this mixture of contradictions and antidotes to contradictions, two volumes of contradictions" p.50, last lines of Fourth Observation) एखाद्या सिद्धांताचे तार्किक खंडन करताना तो सिद्धान्त विरोधाभासी कसा आहे हे मार्क्स दाखवून देत असताना त्याने जो सिद्धान्त खोडायचा त्याचा वापर करून केलेले विधान म्हणजेच मार्क्सचे मत आहे असे मानणे अतिशय चुकीचे होईल. हे पूर्ण डोक्युमेंट क्रिटीक आहे, थिसिस नव्हे.

  उत्तर द्याहटवा
 7. संदर्भ 4. डॉ. आंबेडकरांचा प्रदीर्घ लेख : बुद्ध की कार्ल मार्क्स, आपण या लेखाच्या शेवटच्या प्रकरणाच्या शेवटच्या परिच्छेदाचा सारांश "फ़्रेंच राज्यक्रांति मला स्वीकाराहार्य वाटते कारण समता, बंधुता आणि स्वातंत्र्य हि तिची घोषणा ! (मानवी ) बंधुता आणि स्वातंत्र्य याचा मार्क्सवादात स्वीकार नाही . म्हणून मार्क्स मान्य नाही. (बुद्धात तिन्ही असल्याने तो मला अधिक प्रिय आहे )" असा मांडला आहे. हा शेवटचा परिच्छेद इथे उद्धृत करतो.
  >The Buddha's method was different. His method was to change the mind of man: to alter his disposition: so that whatever man does, he does it voluntarily without the use of force or compulsion. His main means to alter the disposition of men was his Dhamma and the constant preaching of his Dhamma. The Buddhas way was not to force people to do what they did not like to do although it was good for them. His way was to alter the disposition of men so that they would do voluntarily what they would not otherwise to do.
  It has been claimed that the Communist Dictatorship in Russia has wonderful achievements to its credit. There can be no denial of it. That is why I say that a Russian Dictatorship would be good for all backward countries. But this is no argument for permanent Dictatorship. Humanity does not only want economic values, it also wants spiritual values to be retained. Permanent Dictatorship has paid no attention to spiritual values and does not seem to intend to. Carlyle called Political Economy a Pig Philosophy. Carlyle was of course wrong. For man needs material comforts" But the Communist Philosophy seems to be equally wrong for the aim of their philosophy seems to be fatten pigs as though men are no better than pigs. Man must grow materially as well as spiritually. Society has been aiming to lay a new foundation was summarised by the French Revolution in three words, Fraternity, Liberty and Equality. The French Revolution was welcomed because of this slogan. It failed to produce equality. We welcome the Russian Revolution because it aims to produce equality. But it cannot be too much emphasised that in producing equality society cannot afford to sacrifice fraternity or liberty. Equality will be of no value without fraternity or liberty. It seems that the three can coexist only if one follows the way of the Buddha. Communism can give one but not all.< पूर्ण लेख नजरेआड करून जरी हा परिच्छेद नीट वाचला तर यात बंधुता आणि स्वातंत्र्याचा मार्क्सवादात स्वीकार नाही म्हणून मला तो मान्य नाही असे कुठेच सापडत नाही. लेख पूर्ण वाचल्यास असे विचार अजिबात सापडत नाहीत. उलट यातून बाबासाहेबांना रशियन कामगार क्रांतीविषयी आदरच होता हे जास्त जाणवते. उलट रशियन कम्युनिस्टांनी आपल्या क्रांतीला बौद्धधर्माची जोड दिल्यास त्यांचे प्रश्न सुटतील असा विचार जाणवतो. संपूर्ण लेखात मार्क्सवाद त्याज्य आहे अशी भूमिकाच नाही. मार्क्सवाद अधिक सुदृढ कसा होईल याबद्दल विधाने जरूर आहेत. बाबासाहेबांचे विचार रशियन कम्युनिझममध्ये बुद्धविचारांचा अंगीकार करून सकारात्मकता कशी आणता येईल याचा ऊहापोह करतात. त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती अयशस्वी ठरली असे ढळढळीत विधान केलेले दिसते. लेख पूर्ण वाचता आपला सारांश पूर्णत: चुकीचा आहे हेच सिद्ध होते.

  उत्तर द्याहटवा
 8. संदर्भ 5. यात आपण म्हणता ते वृत्तपत्र न्यू राईश वगैरे नसून नोय र्हाइनिश झायटुंग आहे ज्याचा अर्थ "र्हाइनप्रदेशातील नवे वृत्तपत्र" असा आहे. या पेपरचे संपूर्ण नाव : "Neue Rheinische Zeitung: Organ der Demokratie" . तुमच्या माहितीसाठी र्हाइन ही नदी आहे. कलोन हे शहर या नदीकाठी वसले आहे जिथे कार्ल मार्क्सने हा पेपर काढला होता. हिटलरचे "राईश" म्हणजे "एंपायर" होते. मार्क्सला हिटलरशी नेऊन जोडण्याच्या खटपटीत नावांचे चुकीचे अर्थ कृपा करून काढू नका. या वृत्तपत्रातील तुम्ही संदर्भ दिलेला अग्रलेख 14 फेब्रुवारी 1849 चा आहे. आपण दिलेल्या ओळी त्या काळात त्या प्रांतात असलेल्या स्लाविक लोकांमध्ये राष्ट्रवाद शिरोधार्य मानून स्वातंत्र्य मिळवण्याचे बळ तेव्हा नाही या कटू सत्याला अधोरेखित करताना आलेल्या आहेत. या काळात बहुतांश स्लाविक प्रदेश ऑस्ट्रिया+हंगेरी, तुर्कस्तान, जर्मनी, पोलंड आणि रशिया असाच पारतंत्र्यात होता. तेव्हाच्या स्लाव लोकांच्या स्थितीवर हा अग्रलेख नेमके बोट ठेवतो. फुटीर राष्ट्रवाद्यांच्या नादी लागू नका अथवा मोठी राष्ट्रे चिरडून टाकतील अशी समज देऊ इच्छितो तर यात स्लाव वंशाचा द्वेष कुठून आला?
  आपला संपूर्ण लेख आणि संदर्भ तपासता मार्क्स वंशवादी होता जातिवादी होता हे आकलन संपूर्ण चुकीचे आहे असेच म्हणावे लागेल. स्वत: आधी निष्कर्ष काढून अर्धवट आणि चुकीचे संदर्भ देऊन मन मानेल तसे विश्लेषण आणि चुकीची माहिती कृपा करून पसरवू नये, बुद्धिभेद करू नये ही विनंती.

  उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *