४ ऑक्टो, २०१५

प्रा शेषराव मोरे मुलाखत


मुलाखतीचा व्हिडियो प्रा शेषराव मोरे मुलाखत वृत्तांत :


आम्ही कधी मुस्लिम वा हिंदु माणसाचा द्वेष केला आहे काय ? आम्ही कधी कोणता धर्म चांगला आहे असे म्ह्टले आहे काय ? चातुर्वण, जाति, अस्पृश्यता याचे समर्थन केले आहे काय ? मग तुम्ही मला प्रतिगामी का म्हटलात ? …… प्रा शेषराव मोरे तळमळून विचारत होते…
मोरे सर म्हणाले :
" वैचारिक क्षेत्रात - प्रतिगामी हि सगळ्यात मोठी शिवी आहे , प्रतिगामी म्हणजे बुरसटलेल्या विचाराचा - प्रतिगामी म्हणजे लोकशाही न मानणारा - घटना कायदे याचा दुश्मन , प्रतिगामी म्हणजे हिटलरि वृत्तीचा , मनुवादी , दुष्ट , दुर्जन , मागासलेल्या विचाराचा ……. या सगळ्या उपाध्या प्रतिगामी या एका शिवीत व्यक्त होतात -- त्यामानाने वैचारिक दहशतवाद हे विशेषण फारच सौम्य आहे …
कि प्रस्थापित पुरोगाम्यांना प्रश्न विचारणारा आपोआप प्रतिगामी ठरत असतो ?
पुन्हा हे ' दहशतवाद' विशेषण आम्ही कोणाला वापरले ? ज्यांनी आमचे लिखाण कधी वाचलेलेच नाही …. आमचे साहित्य संमेलनातले भाषण सुद्धा पुर्ण वाचलेले नाही … आणि आम्हाला प्रतिगामी , हिंदु धर्मवादि अशी विशेषणे लावत सुटले आहेत .... त्याना हे मार्क्सवादी पोथिनिश्ठ वैचारिक दहशतवादी म्हटले . काय चुकले आमचे ? ? हा काय प्रकार आहे ?
मग प्रा मोरेंनि एक जळजळीत आणि संतप्त सवाल विचारला -
आम्हाला धर्मवादी , जातीय , द्वेष्टे , बुरसट्लेल्या विचाराचे म्हणजेच प्रतिगामी असे म्हणणार्याना आमचा एकच प्रश्न आहे - तुम्ही आमची पुस्तके आणि लेखन वाचले काय ? सावरकर ,काश्मीर , डॉ आंबेडकर , गांधीजी अशा वेगवेगळ्या विषयावर आम्ही परिश्रम पूर्वक पुस्तके लिहिली आहेत…. त्यातले एक तरी तुम्ही वाचले काय ? निदान ज्या भाषणावर टिका करत आहात ते अध्यक्षिय भाषण तरी वाचले काय ? मी कसा काय प्रतिगामी ?
मी हिंदुत्व वादि आहे - सावरकरवादी आहे असे कोण म्ह्टले ? मी तरी असे कधी नाही म्हटले … पण माझ्या अभ्यासाच्या विषयात सावरकर आहेत - सावरकर हा विषय अभ्यासाचा बनवणे - हे प्रतिगामी आहे ?
अभ्यासाचे ' विषय ' सुद्धा प्रतिगामी असतात ? ? ?
म्हणजे हिंदु हा शब्द निंदा व्यंजक शिवी सारखा वापरला नाही …. म्हणुन आम्ही प्रतिगामी ठरतो काय ? हिंदु हा शब्द वापरणे आणि सावरकरांचा अभ्यास करणे - हे प्रतिगामित्व आहे काय ? अशा प्रकारे दबाव निर्माण करणे आणि आणि अभ्यासक संशोधकाला वाळीत टाकणे हा पुरोगामी वैचारिक दहशतवाद आहे . असे आम्ही काल म्हटलो - आजही म्हणू .....
मागे जेव्हा म्ह्टले तेंव्हा आमची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदि निवड झाल्यावर ज्या भावना माध्यमात आल्या त्याच्यावर ती प्रतिक्रिया होती . त्यावेळी आम्ही भाषण दिले सुद्धा नव्हते तरीहि आमची पुस्तके न वाचता मला प्रतिगामी ठरवण्यात आले होते.
सावरकर काय ? सावरकरवादी म्हणजे काय ? पहिल्यांदा व्याख्या करा - हिंदुत्व वादि म्हणजे काय ? मी यातल्या कोणत्या व्याख्येत बसतो ? सावरकरांचे साहित्य तरी कोणि वाचले आहे ? सावरकर म्हणतात सर्व धर्म ग्रंथ कालबाह्य झाले . ……. वेद हे जर पाच हजार वर्ष जुने ग्रंथ असतील - तर ते वेद पाच हजार वर्ष मागासलेले ग्रंथ आहेत … देव, वेद , गीता , गाय , सर्व संत , उपास , जात , वर्ण , पोथ्या , पुराणे , सत्यनाराण यातले काहीही सावरकरांच्या टीकेतून सुटले नाहि. …. मग सावरकर कसे काय प्रतिगामी ? त्यांचा अभ्यास केला - म्हणून मी कसा काय प्रतिगामी ?
--------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------
एकदम प्रतिगामी , सनातनी , जातीय , धर्मांध वगैरे शिक्के लेबले मारून पुरोगामी बांधव मोकळे झाले होते . त्यातल्या बहुतेकानी - मोरे सरांची एकही ओळ वाचली नव्हती … एका पेपरातल्या त्रोटक बातमीवर सारी टिका उभी होती … तरीही सत्यप्रियता आणि तटस्थता हेच प्रमाण मानत मी आणी शेलार सरांनी - प्रा शेषराव मोरे यांना पुढचे प्रश्न विचारायला सुरवात केली …
----------------------------------------------------
----------------------------------------------------
दाभोळकर पानसरे हत्याकांड याबद्दल प्रश्न विचारले , सेक्युलारीझम , भारतीयत्व , धर्मचिकित्सा , गांधिजिंचा खून , गोडसे - कपूर आयोग याबद्दल प्रश्न विचारले - प्रा मोरे यांनी प्रत्येक गुगली वर सिक्सर मारला …
…. शिवाय शेवटी मोरे मास्तरांनी विरोधकांचे कोट्स पुन्हा तेच पेपर घेऊन वाचून दाखवायला सुरवात केली - तेव्हा सभागृहात - एकच हशा फिदीफिदी पिकत होता ….
या समग्र मुलाखतीत संतोष शेलार सरांनी एक नवीनच टर्म हुडकून काढली - निर्वाचन आयोग !
न वाचताच निष्कर्ष काढणारा आयोग !!
-------------------------------------
शेषराव म्हणाले :
सावरकरांनी हिंदुचा धर्म आणि संस्कृती इतर धर्मापेक्षा टीचभर श्रेष्ठ आहे असे एकदा तरी म्हटले आहे काय ? ते सावरकर सगळे धर्मग्रंथ कालबाह्य म्हणतात - मला जर सावरकर धर्मवादी वाटले असते किंवा त्यांचा सहभाग गांधिहत्येत आहे असे वाटले असते - तर मी त्यांच्यावर पुस्तक लिहिलेच नसते - अभ्यास संशोधना नंतर हा निष्कर्ष मी काढला आहे.
---------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


प्रा शेषराव मोरे   यांच्यावर टिका करणार्या निवडक लेखांचा संग्रह - श्री प्रकाश बाळ , कुमार सप्तर्षी , जयदेव डोळे , विनोद शिरसाठ , सुनील तांबे , अविनाश दुधे  या पत्रकार लेखक आणि पुरोगामी विचावंरत मानले जाणार्यांनी प्रा शेषराव मोरेंवर केलेल्या टीकात्मक लेखांचा हा संग्रह आहे …

बाळ यांनी प्रा मोरेंच्या बुद्धीला बेशिस्त म्ह्टले आहे, कुमार सप्तर्षीच्या मते शेषराव मोरे बरळत आहेत …एकुण सर्व पुरोगामी लेखकांच्या मते -- मोरेंचा कुठल्यातरी शासकीय पदावर डोळा आहे म्हणून भाजपाला / संघाला खुष करण्या साठी मोरे असे बोलत आहेत … 

हे सर्व गंभिर आरोप करण्यापूर्वी कोणत्याहि टीकाकाराने मोरेंचे संपुर्ण ४० पानी  अध्यक्षिय भाषण वाचलेले नाही . कारण तेव्हा ते छापील स्वरूपात उपलब्धच नव्हते … वर्तमानपत्रातील त्रोटक बातम्यावर अवलंबून ह्या पुरोगामी "विचारवंतानि" व्यक्तिगत आणि काही ठिकाणी  असंसदिय असे शब्द वापरले आहेत … 

पुरोगाम्यांच्या  विचारशक्तीचे आणि सभ्यतेचे आकलन व्हावे म्हणून त्यांचे सर्व लेख एकत्रितपणे अवश्य  वाचावेत … त्याचे संकलन या ब्लोग वर केले आहे . 

१० ओक्टोबर २०१५ , औरंगाबाद येथील आगामी मुलाखतीत प्रा शेषराव मोरे  - हे सर्व प्रश्न टिका यांची   उत्तरे देतील .

·         संशोधक शेषरावांची बौद्धिक बेशिस्त
o    First Published :10-September-2015 : 05:08:54

http://www.lokmat.com/gall_content/2015/09/10/2015-09-10~edit1_ns.jpg

o    - प्रकाश बाळ

(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)

एखाद्या व्यक्तीवर न्यायालयात खटला चालू आहे आणि नंतर तिची सुटका होते, तेव्हा ती निर्दोष आहे, असं ठरवायचं की, पुराव्याअभावी तिची सुटका झाली आहे, असं मानायचं?

मराठीतील सुप्रसिद्ध सावरकरवादी विचारवंत व संशोधक शेषराव मोरे यांनी केलेल्या विधानामुळं हा प्रश्न उद्भवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना न्यायालयानं निर्दोष सोडलेलं असताना गांधी हत्त्येत त्यांचा हात होता, अशी बदनामी कोणी करीत असेल, तर या संबंधात पोलिसात तक्रार करता येते आणि ती करावी, असं मोरे यांनी अंदमानातील विश्व मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून जे समारोपाचे भाषण केले, त्यात म्हटलं आहे. मोरे हे संशोधक आहेत. त्यामुळं संशोधकी बौद्धिक शिस्तीनुसार तपशीलाबाबत ते काटेकोर असतील, असं मानायला हवं. म्हणून या साऱ्या गांधी हत्त्येच्या प्रकरणातील न्यायालयीन तपशील काय दर्शवतो, ते बघू या.

या प्रकरणात नथुराम गोडसे व इतर आठ आरोपींच्या विरोधात २७ मे १९४८ रोजी न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आलं. सावरकर सात क्रमांकाचे आरोपी होते. आठवा आरोपी दिगंबर रामचंद्र बडगे याला माफीचा साक्षीदार म्हणून २१ जून १९४८ रोजी न्यायालयानं मान्यता दिली. त्याची एक आठवडा तपशीलवार उलट तपासणी झाली आणि तो विश्वासार्ह साक्षीदार आहे, अशा निष्कर्षाप्रत न्यायालय आलं. मगच त्याला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता देण्यात आली.

हा तपशील विशेष लक्षात घेण्याचं कारण म्हणजे गांधीजींच्या हत्त्येच्या कटात सावरकरांचा हात होता की नाही, याबाबत न्यायालयानं जो निर्णय दिला, त्यात या बडगेची साक्ष महत्वाची होती. ‘नथुराम व आपटे या दोघांसमवेत मुंबईतील शिवाजी पार्क भागात असलेल्या ‘सावरकर सदनात’ मी १४ व १७ जानेवारी १९४८ अशा दोन वेळा गेलो होतो. दुसऱ्यांदा १७ जानेवारीला भेट संपल्यावर निरोप देताना, ‘यशस्वी होऊन या’, असं सावरकर म्हणाल्याचं मी ऐकलं. नंतर परत जाताना आपटे यानं मला सांगितलं की, गांधीजींची १०० वर्षे आताच भरली आहेत, हे काम यशस्वीपणं पार पाडलं जाईल, याची सावरकरांना खात्री आहे’.

न्यायाधीश आत्मचरण दास यांनी १० फेब्रुवारी १९४९ ला निकाल देताना सावरकर यांच्याविषयी म्हटलं होतं की, ‘बडगेची साक्ष विश्वासार्ह आहे. पण त्याला पुष्टी देणारा जो पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला, तो नि:संदिग्ध व पुरेसा नाही. त्यामुळं अशा पुराव्याच्या आधारे सावरकर यांना दोषी मानणं योग्य ठरणार नाही’.

गांधी हत्त्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून सावरकरांची न्यायालयानं मुक्तता केली, हे खरं. पण त्यांना निर्दोष ठरवलेलं नाही, केवळ ‘नि:संदिग्ध व पुरेसा पुरावा नसल्यानं’ त्यांची मुक्तता करण्यात आली, हे वरचा सगळा घटनाक्र म दर्शवतो.

हा झाला न्यायालयीन खटल्याचा तपशील. याच काळात देशाचे गृहमंत्री असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे गांधी हत्त्येच्या कटातील सावरकरांच्या सहभागाबद्दल काय मत होतं, ते पाहू या. पंडित जवाहरलाल नेहरू यांना २७ फेब्रुवारी १९४८ रोजी लिहिलेल्या पत्रात पटेल यांनी म्हटलं आहे की, ‘बापूंच्या हत्त्येच्या तपासाबद्दल दररोज संध्याकाळी काही काळ मी संपूर्ण माहिती घेत असतो आणि जे काही मुद्दे उद्भवतात, त्यावर सूचनाही देत असतो...आतापर्यंत जो पुरावा समोर आला आहे, त्यानुसार सावरकरांच्या सूचनेनुसार काम करणाऱ्या (‘डायरेक्टली अंडर सावरकर’ असे पटेल यांचे शब्द आहेत ) हिंदू महासभेतील एका अतिरेकी गटानं बापूंच्या हत्त्येचा कट आखून तो अंमलात आणला’. श्यामाप्रसाद मुकर्जी यांना ७ मे १९४८ रोजी लिहिलेल्या पत्रात सरदार पटेल यांनी म्हटलं होतं की, ‘या खटल्यासंबंधात महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल सी. के. दफ्तरी यांच्याकडून मी सतत माहिती घेत असतो. जर सावरकरांना आरोपी करायचे असेल, तर त्याआधी माझ्याशी सल्लामसलत करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. अर्थात हा झाला न्यायालयीन कामकाजासंबंधीचा मुद्दा. पण नैतिकदृष्ट्या जर बघायचं झालं, तर गुन्ह्यातील एखाद्याच्या सहभागाबद्दल त्याला दोषी ठरवता येणं शक्य आहे.’ शेवटी सावरकरांना आरोपी करण्यात आलं. याचा अर्थ त्याला पटेल यांची संमती होती, हे उघड आहे आणि नैतिकदृष्ट्या सावरकर दोषी आहेत, असंही पटेलांना वाटत असल्याचं स्पष्ट होतं.

मोरे यांची चलाखी अशी की, न्यायालयीन खटल्याचा हा सगळा तपशील सोईस्करपणं डोळेआड करून ते केवळ कपूर आयोगाच्या अहवालाचा उल्लेख करतात. ‘९९ दोषी व्यक्ती सुटल्या तरी चालेल, पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये’, या तत्वानुसार चालणाऱ्या न्यायालयीन कामकाजात जे शक्य झालं नाही, ते काम कपूर आयोगानं केलं, एवढाच काय तो फरक आहे.

संशोधक मानले जाणारे मोरे हे इतकी बौद्धिक बेशिस्त दाखवतात; कारण एक भक्त म्हणून ते सावरकरांकडं बघत आहेत, संशोधक म्हणून नव्हे. मग ते तसा आव कितीही आणोत. सावरकरांचं जाज्वल्य देशप्रेम, क्रांतिकारत्व, विज्ञाननिष्ठा, जातीपातीला त्यांचा असलेला विरोध इत्यादीबद्दल दुमत असायचं कारणच नाही. पण हे सारं होतं, ते एकजिनसी समाज असलेलं बलिष्ठ हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी. आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते सावरकर, आंतरधर्मीय विवाहाचे कट्टर विरोधक होते. असं असूनही मोरे जेव्हा म्हणतात की, सावरकरांचंच काम दाभालकर पुढं नेत आहेत, तेव्हा ती सावरकरांवरील अंधश्रद्धाच असते.

‘अखंड भारता’चं स्वप्न पाहणाऱ्या सावरकरांचे भक्त असलेले असे हे मोरे अंदमान भारतात असूनही ‘विश्व’ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारून ‘पुरोगामी दहशतवादा’वर बोलतात, तेव्हा वैचारिक भंपकपणा यापेक्षा त्याला दुसरं काय म्हणायचं?

.
===================================================
===================================================
===================================================

.

सावरकरांवरील गांधी हत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही....
- सुनील तांबे 

२० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींच्या प्रार्थनासभेत बॉम्बस्फोट झाला. ह्या प्रकरणात मदनलाल पहवा ह्याला अटक करण्यात आली. पोलिसांना दिलेल्या जबानीत आपण सावरकरांना भेटून मग दिल्लीला आलो अशी कबुली त्याने दिली. ही माहिती तत्कालीन मुंबई राज्याचे गृहमंत्री मोरारजी देसाई ह्यांना सत्वर मिळाली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना (जमशेटजी नगरवाला, मुंबई पोलीस उपायुक्त) सूचना दिल्या. त्यानुसार सावरकरांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. त्यातून ठोस काही माहिती मिळाली नाही पण नगरवालाने दिल्लीच्या पोलीसांना कळवलं-- ‘Don’t ask me why’, he told Sanjevi [Delhi Police Officer], ‘but I just know another attempt is coming. It’s something I can feel in the atmosphere here’”
गांधी हत्या खटल्यामध्ये मोरारजी देसाई ह्यांची उलट तपासणी आरोपी क्रमांक ७ (सावरकर)च्या वकीलांनी घेतली. टाइम्स ऑफ इंडिया (सप्टेंबर १, १९४८) च्या बातमीत खालील तपशील आहे.
“In cross-examination of the Honourable Mr Morarji Desai, counsel for accused number seven [V.D. Savarkar] asked the following question: ‘Did you have any other information about Savarkar, besides Professor Jain’s statement for directing steps to be taken as regards him?’
“Witness answered the question as follows: ‘ Shall I give the full facts? I am prepared to answer. It is for him [Savarkar] to decide.’ Counsel for accused number seven thereafter stated that he dropped the question. The prosecution submitted that the question, answer and the statement of counsel should be recorded but Your Honour declined to do so. It is submitted that the question, the answer and the statement of counsel for accused number seven should have gone on the record.”
मोरारजी देसाईंनी मुंबई राज्याच्या विधानपरिषदेत खालील विधान केलं.... “Savarkar’s past services are more than offset by the present disservice”. (एप्रिल ८, १९४८) मात्र कोर्टात तोंड उघडलं नाही.
गांधी हत्या प्रकरणातील माफीचा साक्षीदार होता दिगंबर बडगे. त्याची साक्षीची काळजीपूर्वक तपासणी न्यायमूर्ती आत्माचरण ह्यांनी केली. बडगेने दिलेली माहिती वा पुरावे ह्यांना अन्य साक्षीदारांचाही दुजोरा मिळत असल्याने तो सत्य कथन करतो आहे असा निर्वाळाही न्यायमूर्ती आत्माचरण यांनी निकालपत्रात नोंदवला आहे.
“The approver in this evidence says that on 14.1.1948 Nathuram V. Godse and Narayan D. Apte took him from the Hindu Mahasabha office at Dadar to the Savarkar Sadan saying that arrangements will have to be made for keeping the ‘stuff’. He had the bag containing the ‘stuff’ with him, Nathuram V. Godse and Narayan D. Apte then went inside leaving him standing outside the Savarkar Sadan. Nathuram V. Godse and Narayan D. Apte came back 5-10 minutes later with bag containing the ‘stuff’.
“The approver then says that on 15.1.1948, in the compound of the temple of Dixitji Maharaj, Narayan D. Apte told him that Tatyarao Savarkar had decided that Gandhiji should be finished and had entrusted that work to them. The approver then says that on 17.1.1948 Nathuram V. Godse suggested that they should all go and take the last ‘darshan’ of Tatyarao Savarkar. They then proceeded to the Savarkar Sadan. Narayan D. Apte asked him to wait in the room on the ground floor. Nathuram V. Godse and Narayan D. Apte went up to the first floor and came down after 5-10 minutes. They were followed immediately by Tatyarao Savarkar. Tatyarao Sarvarkar addressed Nathuram V. Godse and Narayan D. Apte ‘ yashasvi houn ya’ (be successful and come).
“Narayan D. Apte on their way back from Savarkar Sadan said that Tatyarao Savarkar had predicted ‘ Tatyarao yani ase bhavishya kele ahe ki Gandhijichi sambhar varshe bharali ata apale kam nischita honar yat kahi sansaya nahi (Gandhiji’s hundred years were over – there was no doubt that their work would be successfully finished).
“There is nothing on the record of the case to show as to what conversation had taken place just prior to that on the first floor between Nathuram V. Godse and Narayan D. Apte on the one hand and Vinayak D. Savarkar on the other. There is thus no reason to suppose that the remarks said to have been addressed by Vinayak D. Savarkar to Nathuram V. Godse and Narayan D. Apte in the presence of the approver was in reference to the assassination plot against the life of Mahatma Gandhi.
“It would thus be unsafe to base any conclusions on the approver’s story given above as against Vinayak D. Savarkar.”
माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या माहितीला दुजोरा मिळेल अशी साक्ष वा पुरावा पुढे आलेला नसल्याने सावरकर दोषमुक्त झाले.
सावरकरांच्या मृत्युनंतर हा पुरावा पुढे आला. गांधी हत्या कटकारस्थानाची चौकशी करण्यासाठी १९६५ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जीवनलाल कपूर ह्यांचा आयोग केंद्र सरकारने नेमला.
आयोगाच्या चौकशीत असं निष्पन्न झालं की अप्पाराव कासार, सावरकरांचे अंगरक्षक आणि गजानन विष्णू दामले, सावरकरांचे सचिव वा सेक्रेटरी ह्यांच्या जबान्या पोलीसांनी ४ मार्च १९४८ रोजी नोंदवल्या होत्या. दोघांनी आयोगापुढे दिलेल्या साक्षीत गोडसे आणि आपटे अनेकदा सावरकरांकडे सल्लामसलतीसाठी येत होते हे नोंदवलं. आप्पाराव कासारांनी सांगितलं की जानेवारी २३ वा २४ (१९४८) रोजी गोडसे आणि आपटे सावरकरांकडे आले होते. दामलेंच्या साक्षीने ह्या माहितीला दुजोरा दिला. ते म्हणाले जानेवारीच्या मध्यावर गोडसे सावरकरांना भेटायला आला होता. आप्पाराव कासार आणि गजानन दामले ह्यांच्या साक्षी गांधी खून खटल्यामध्ये का नोंदवण्यात आल्या नाहीत, त्यांची उलटतपासणी का करण्यात आली नाही हे गूढ आहे.
बडगेच्या साक्षीला दुजोरा देणारा हा पुरावा नोंदवण्यात आला असता तर सावरकरांनाही गांधी हत्या प्रकरणात सजा झाली असती. पण ते घडलं नाही म्हणून सावरकर निर्दोष सुटले.
न्यायमूर्ती कपूर ह्यांनी नोंदवलेला अभिप्राय असा-- All these facts taken together were destructive of any theory other than the conspiracy to murder by Savarkar and his group.
मुद्दा काय तर गांधी हत्या प्रकरणातून सावरकरांची निर्दोष सुटका झाली ही वस्तुस्थिती आहे. मात्र कपूर आयोगाच्या अहवालाने गांधी हत्या कारस्थानात सावरकर सहभागी होते ह्यावर शिक्कामोर्तब केल्याने संसदेमध्ये सावरकरांचं चित्र काय तर पुतळा जरी उभारला तरिही त्यांच्यावरचा हा कलंक धुतला जाऊ शकत नाही. शेषराव मोरे ह्या सावरकर भक्ताने या चर्चेला नव्याने सुरुवात केल्याबद्दल त्यांचे आभार मानाययला हवेत.
मराठी वैचारिक विश्वात पुरोगाम्यांची दहशतवाद आहे असं विधान विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, शेषराव मोरे ह्यांनी अलीकडेच केलं. परंतु गांधी खून खटला आणि कटकारस्थान ह्या विषयाला मराठी प्रसारमाध्यमांनी अपवादानेच प्रसिद्धी दिली आहे. पुरोगाम्यांनीही ह्या विषयावर निकालपत्र, आयोगाचे अहवाल ह्यासंबंधात सविस्तर माहिती दिलेली नाही की भूमिका घेतलेली नाही. तरिही मोरे ह्यांना पुरोगाम्यांना दहशतवादी म्हणावसं वाटतं. गांधी खून खटल्यातील सावरकरांच्या भूमिकेचा भांडाफोड महाराष्ट्रातील पुरोगाम्यांनी केला असता तर मोरे ह्यांनी त्यांच्यासाठी कोणतं विशेषण वापरलं असतं देव जाणे.
कपूर आयोगाचा अहवाल आणि न्यायमूर्ती आत्मा चरण ह्यांचं निकालपत्र माहितीच्या मायाजालात उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी त्याचा अवश्य शोध घ्यावा.
- सुनील तांबे
------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
.
===================================================
===================================================
===================================================

.
पुरोगाम्यांनी परिघाबाहेर ठेवलेला अभ्यासक
·         विनोद शिरसाठ
·          
·         Sep 13, 2015, 03:11 AM IST
·         Print
·         Decrease Font
·         Increase Font
·         Email
·         Google Plus
·         Twitter
·         Facebook
·         COMMENTS
1
·         Email
·         Google Plus
·         Twitter
·         Facebook
·         COMMENTS
पुरोगाम्यांनी परिघाबाहेर ठेवलेला अभ्यासक
५ आणि ६ सप्टेंबरला अंदमान येथे झालेल्या चौथ्या मराठी विश्व साहित्य संमेलनातील मोरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने (खरे तर त्यातील काही विधानांनी) छोटेसे वादळ उठले आहे. अर्थातच ते वादळ लवकर शमणार आहे; जरी ते वादळ घोंघावत राहावे, अशी प्रा. मोरे यांची इच्छा असली तरी! हे भाकीत काही वाचकांना जरा विचित्र वाटेल; पण तसे होणार आहे, हे खरे! हे भाकीत कशाच्या आधारावर केले जात आहे, असा प्रश्न काही वाचकांच्या मनात येईल; त्याचे उत्तर ‘यापूर्वी असेच होत आले आहे’ असे आहे. म्हणजे? म्हणजे, प्रा. मोरे यांना घणाघाती चर्चा, वाद हवे असतात आणि त्यांना तो आनंद मिळू द्यायला पुरोगामी वर्तुळातील लोक फारसे उत्सुक नसतात, असा आतापर्यंतचा इतिहास आहे...

महाराष्ट्रात ‘पुरोगामी’ नावाचे जे काही वर्तुळ आहे; ते बरेच विशाल, बेशिस्त व अस्ताव्यस्त आहे आणि त्या मोठ्या वर्तुळात अनेक छोटी-छोटी वर्तुळे आहेत. या सर्व लहान वर्तुळांची आपापली अशी केंद्रे आहेत. एक वर्तुळ गांधींना केंद्र मानणारे, दुसरे नेहरूंना, तिसरे आंबेडकरांना, चौथे महात्मा फुल्यांना, पाचवे आगरकर/रानडे यांना, सहावे मार्क्सला आणि असेच आणखी काही... ‘पुरोगामी’ या लेबलखाली वावरणारी ही सर्व वर्तुळे म्हणजे, लहान-मोठे गट-तट परस्परांशी सतत भांडत असतात; इतरांशी भांडण कमी पडले, तर स्वतःशीच भांडत असतात. परिणामी, हे सर्व गट-तट वेळी-अवेळी तुटत असतात, फुटत असतात; आणि पुन्हा परस्परांत मिसळून एकमेकांवर कुरघोडी करीत असतात. हे करताना परस्परांवर ‘नाही नाही ते’ आरोप करीत असतात आणि ‘आम्हीच कसे खरे पुरोगामी’ असे छातीठोकपणे सांगत असतात. पण... पण यापैकी कोणताही गट-तट प्रा. शेषराव मोरे यांच्याशी भांडत नसतो, मोरे यांचे काही वाचत नसतो आणि अर्थातच त्यांना कार्यक्रमांसाठी बोलावतही नसतो; या सर्व गटा-तटांनी शेषराव मोरे हा विषय ऑप्शनलाच टाकलेला असतो. थोडक्यात काय, तर पुरोगामी वर्तुळाने शेषराव मोरे नावाचा अभ्यासक आपल्या परिघाबाहेर ठेवलेला असतो. पुरोगाम्यांचे हे वर्तन ‘अप्रिय पण...’ या प्रकारातील आहे, म्हणून प्रा. शेषराव मोरे यांचा राग उफाळून आला असला तरी, त्याला कोणाकडेही इलाज नाही.

प्रा. शेषराव मोरे यांची लेखन कारकिर्द दोन तपांहून अधिक काळाची आहे आणि या काळात त्यांची डझनभरापेक्षा अधिक पुस्तके आली आहेत. सरासरी दोन वर्षांनी एक पुस्तक, असे ते प्रमाण आहे. त्यात त्यांनी सावरकर, इस्लाम, काश्मीर आणि भारताची फाळणी हे विषय प्रामुख्याने हाताळले आहेत. अर्थातच, हे सर्व काम त्यांनी कठोर परिश्रम घेऊन केले आहे. म्हणजे अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास करून प्रा. मोरे यांचे जाडे-जाडे ग्रंथ आकाराला आले आहेत, त्यांच्या काही आवृत्त्या निघाल्या आहेत आणि त्यांना वाचकप्रियताही लाभली आहे. इतकी की, प्रा. शेषराव मोरे यांचे चाहते, अनुयायी, भक्त यांचाच एक संप्रदाय झाला आहे, असे म्हणायला हरकत नसावी. ‘मी कुठल्याही गटातटाचा नाही’ असे प्रा. मोरे म्हणतात, हे खरेच आहे; पण त्यांचा स्वतःचाच एक गट तयार झाला आहे, हेही खरे आहे.

प्रा. शेषराव मोरे यांना सावरकर अभ्यासण्याची प्रेरणा रा. स्व. संघाकडून किंवा हिंदू महासभेकडून किंवा अन्य संघटनेकडून मिळालेली नाही, असे ते सांगतात. त्यांच्या शाळेतील उप्पेगुरुजींकडून सावरकर अभ्यासण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आणि वयाच्या विशीत संपूर्ण सावरकर वाचून काढला, अशी माहितीही ते देतात. त्यामुळे अनेक पुरोगाम्यांना वाटते की, वयाच्या त्या कोवळ्या टप्प्यावर प्रा. शेषराव मोरे यांच्यात सावरकरांचा विचार भिनलेला असेल, तर आपण वाद-चर्चा करून उपयोग होणार नाही. आणखी एक कळीचा मुद्दा असा आहे की, प्रा. शेषराव मोरे त्यांच्यावरील वैचारिक प्रभाव सांगताना नरहर कुरुंदकर यांचा उल्लेख आवर्जून करतात; पण कुरुंदकरांची अभ्यासपद्धती आणि प्रतिपक्षाला चकवण्याची शैली जरी प्रा. मोरे यांनी घेतली असली तरी कुरुंदकरांचा ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ मात्र त्यांनी घेतलेला नाही. त्यामुळे ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ अशीच काहीशी ती स्थिती आहे. दोघांच्या तर्कशैलीतील साम्य बघा... कुरुंदकरांनी ‘मी नास्तिक का आहे?’ असे सरळ न सांगता ‘मी आस्तिक का नाही?’ या शीर्षकाचा लेख लिहिला. प्रा. शेषराव मोरे यांनी ‘काँग्रेसने व गांधींनी खंडित भारत का स्वीकारला?’ असे न म्हणता, ‘अखंड भारत का नाकारला?’ असा तिरपागडा प्रश्न विचारला. आता दोघांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूमधील फरक बघा... कुरुंदकर म्हणायचे, ‘मी समाजवादीच आहे, पण माझा समाजवाद राष्ट्रीय समाजवादापेक्षा निराळा आहे.’ प्रा. शेषराव मोरे यांच्या म्हणण्यातून ‘मी हिंदुत्ववादीच आहे, पण माझे हिंदुत्व प्रचलित हिंदुत्वापेक्षा निराळे आहे’, असाच अर्थ ध्वनित होतो आहे. असो. मुद्दा काय तर, कुरुंदकर व शेषराव मोरे दोन टोकांवर उभे आहेत, जरी त्यांची अभ्यासपद्धती व तर्कशैली यात साम्य असले तरी!

अशा या शेषराव मोरे यांची विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे आणि ते संमेलन अंदमानला होणे, असा योग अनपेक्षितपणे जुळून आला. त्यामुळे त्यांना परमोच्च आनंद होणे व काहीसा कैफ चढणे स्वाभाविक होते. पण या संमेलनाची, संमेलनाच्या अध्यक्षांची पुरोगामी वर्तुळातून दखल घेतली न जाणे, हा प्रकार प्रा. मोरे व त्यांच्या चाहत्यांसाठी जरा क्लेशदायक ठरला असावा. त्यातच भर म्हणजे, हे संमेलन साहित्य संमेलन नाही, तर शिवसेना व भाजप यांचे मेळावे असल्याप्रमाणे अनेकांना भासले... आणि स्वतः प्रा. मोरे यांनी त्याला समारोपाच्या दिवशी ‘सावरकर मराठी राष्ट्रीय संमेलन’ असे संबोधल्याचे प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे कैफ आणि क्लेश अशा संमिश्र भावनांचा निचरा करण्याच्या प्रक्रियेतून संमेलनाच्या अध्यक्षाची भाषणे झाली असावीत, असा एक अंदाज आहे.

प्रा. शेषराव मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात जी काही वक्तव्ये केली; त्याला काही जण तोफ डागणे म्हणतील, काहींना त्यात खंत दिसेल, तर काही जणांना त्यात वैफल्याची भावना असल्याचे जाणवेल. प्रत्यक्षात, या तिन्हींचे अजब मिश्रण म्हणजे ती वक्तव्ये आहेत. खरे तर त्यांची ती वक्तव्ये जुनीच आहेत, अनेक वेळा अनेक व्यासपीठांवरून केली गेलेली आहेत; पण आता विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून ती आलीत, म्हणून छोटे वादळ निर्माण झालेले दिसते आहे. त्यातील माध्यमांनी उचलून धरलेले एक वक्तव्य असे आहे की, ‘हिंदूविरोधी असणे/बोलणे म्हणजे पुरोगामी, असे वैचारिक क्षेत्रात समजले जाते.’ दुसरे वक्तव्य, ‘डावे-उजवे अशी विभागणी करणारे पुरोगामी हे वैचारिक दहशतवादी आहेत.’ आणि तिसरे वक्तव्य, ‘सावरकरांच्या विचारांचा विपर्यास करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत.’

वरील तीन वक्तव्यांकडे पुरोगामी कसे पाहतात? एक तर हिंदू पुरोगाम्यांनी हिंदू धर्मातील मूलतत्त्ववादाच्या विरोधात, मुस्लिम धर्मातील पुरोगाम्यांनी मुस्लिम मूलतत्त्ववादाच्या विरोधात, ख्रिश्चन धर्मातील पुरोगाम्यांनी ख्रिश्चन मूलतत्त्ववादाच्या विरोधात, आणि त्या-त्या धर्मातील पुरोगाम्यांनी त्या-त्या मूलतत्त्ववादाच्या विरोधात असणे/काम करणे ही ‘पुरोगामी’ असण्यासाठीची/म्हणवून घेण्याची पूर्वअट असते. त्यामुळे प्रा. मोरे यांचा पहिला आक्षेप हाच मुळात आक्षेपार्ह ठरतो. दुसरे वक्तव्य आहे, डावी-उजवी मांडणी करण्याबाबतचे... पुरोगाम्यांच्या गटा-तटांचे इतर कशावर एकमत होत नाही; पण सावरकर हे केंद्र मानून ज्याचा अभ्यास आकाराला येतो, त्याला पुरोगामी वर्तुळातील लोक आपल्यातला मानत नाहीत. आणि प्रा. शेषराव मोरे यांनी तर स्वतःचे छोटे वर्तुळ सावरकरकेंद्री करून पुरोगामी वर्तुळाच्या बाहेरच राहण्याचा निर्णय स्वतःच घेऊन ‘आमच्यासाठी तुमच्या खेळाचे नियम बदला’, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुरोगाम्यांमधील अनेकांना ही मागणीच वैचारिक दहशतवादासारखी वाटते आहे. आणि तिसरे वक्तव्य, ‘सावरकरांच्या विचारांचा विपर्यास केला गेला आहे’, हे सांगताना प्रा. मोरे असाही दावा करतात की, सावरकरच खरे सेक्युलर होते आणि त्यांचाच विचार राज्यघटनेत आला आहे. पण गंमत अशी आहे की, पुरोगाम्यांमधील अनेकांना मोरे यांचे असे निष्कर्ष हाच मोठा विपर्यास वाटतो. त्यामुळे प्रा. मोरे यांच्या म्हणण्याप्रमाणे, विपर्यास करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करायचा असेल, तर मोठीच समस्या निर्माण होते.

‘अखंड भारत का नाकारला?’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रा. शेषराव मोरे म्हणतात, ‘मी वकीलच आहे, पण वकील कधीही विरोधी पक्षाची बाजू मांडत नाही.’ खरेच आहे ते. पण त्या पुस्तकाबाबत कळत-नकळत असा दावा केला जात आहे की, यातून काँग्रेस व नेहरू-गांधी यांची बाजू मांडली/पुढे आणली आहे. त्यामुळे काही पुरोगाम्यांना असेच वाटते की, त्या पुस्तकात (नावापासूनच) सर्वत्र गांधी, नेहरू व काँग्रेसच्या भूमिकांचा विपर्यास केलेला आहे; पण ते पुरोगामी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार स्वप्नातही करूच शकत नाहीत, कारण त्यांना प्रा. मोरे यांना आनंद मिळू द्यायचाच नाहीये... असो.
मोरेसर, पुरोगामी वर्तुळाच्या परिघावरून जे दिसले, त्यातील काही निरीक्षणे केवळ वर आम्ही मांडली आहेत. त्यामुळे तुमच्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, असा आरोप कृपया आमच्यावर ठेवू नये.

vinod.shirsath@gmail.com
(लेखक साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.)
-------------------------------------------------------
-------------------------------------------------------
.
===================================================
===================================================
===================================================

.
शेषराव मोरे यांचा वैचारिक संभ्रम
- डॉ. कुमार सप्तर्षी
शनिवार, 12 सप्टेंबर 2015 - 02:00 AM IST

Tags: sheshrao more, marathi literary meet, andman, kumar saptarshi
Kumar Saptarshiअंदमानमध्ये ‘विश्‍व साहित्य संमेलन‘ झाले असे म्हणतात. त्या संमेलनाच्या नावात "विश्‍व‘ शब्द का होता हे गूढ आहे. वास्तविक साहित्याची व्याख्या सर्वांना सहित घेऊन जाणे अशी आहे. तथापि, या संमेलनात फक्त हिंदुत्ववादी संप्रदायाला स्थान होते, असे दिसले.

विशेष म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांचे अध्यक्षीय भाषण सर्वसमावेशक नव्हते. ना त्याला साहित्याचा स्पर्श, ना व्यापक वैश्‍विकतेचा गंध! ते म्हणतात, "महाराष्ट्रात पुरोगाम्यांचा दहशतवाद आहे.‘ "डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे जे कार्य सुरू केले होते, ते एक प्रकारे सावरकरांनी पाऊण शतकापूर्वी सुरू केलेले कार्य पुढे नेणे होते.‘ भाषणात असेही म्हटले, "डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी यांची हत्या कोणत्या एका विचारसरणीने केली नाही. त्याला वेगळी कारणे आहेत.‘ सर्वांत धोकादायक विधान म्हणजे, "सावरकरांना कलंकित करणारी इतिहासातील पाने फाडली पाहिजेत. गांधीहत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाचा त्यांच्यावरील कलंक पुसला पाहिजे.‘

वास्तविक हिंदुत्ववाद आणि हिंदू यांचा अन्योन्य संबंध नाही. भारतात शेकडो संप्रदाय आहेत. त्यापैकी हिंदुत्व हा एक संप्रदाय. हिंदुत्व http://www.esakal.com/esakal/20150911/images/4942130304103007001/5277839511064214327_Org.jpgहा हिंदूंना गोळा करण्याचा आणि त्या मार्गे सत्तासंपादनाचा प्रपंच आहे. "हिंदू‘ या शब्दाच्या आड लपून हिंदुत्ववादी राजकीय स्पर्धा करीत आहेत. हिंदुत्व आणि सनातन धर्म याचाही काही संबंध नाही. हिंदुत्व ही अगदी अलीकडे निर्माण झालेली एक विचारसरणी आहे. मुळात ती संभ्रमावस्थेवर आधारलेली आहे आणि मोरेंच्या रूपाने तिला नवा प्रवक्ता मिळालेला दिसतो. आता हे लक्षात घेतले पाहिजे, की पुरोगामी हे हिंदुत्ववादावर टीका करतात, तेव्हा ते हिंदूंवर टीका करीत नाहीत. प्रा. मोरे म्हणतात, "पुरोगामी म्हणजे हिंदूंवर टीकेचे प्रहार करणारे.‘ हे धादांत असत्य विधान आहे. धर्म वेगळा आणि समाज वेगळा. पुरोगामी धर्माची चिकित्सा करतात. उदाहरणार्थ, कर्मविपाकाचा सिद्धान्त. त्यानुसार माणसाची प्रतिष्ठा आणि संपत्ती या गोष्टी जन्म नावाच्या अपघातावर ठरणार. कर्तृत्वाने जन्माधिष्ठित गोष्टींवर मात करता येत नाही. विशिष्ट लोकांकडे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा का? आणि अन्य भारतीय अस्पृश्‍यतेसारख्या गुलामगिरीत का राहतात? याचे उत्तर एकच. ते म्हणजे, गेल्या जन्मात त्याने पुण्य केले म्हणून त्याला सवर्णाच्या घरात जन्माला येण्याचे जमले. अस्पृश्‍य का? तर त्याने गेल्या जन्मी पाप केले. या भूमिकेमुळेच भारतीय समाज कर्तृत्वहीन झाला. जातिसंस्था फक्त भारतात आहे. जगात अन्यत्र कोठेही नाही. म्हणून ती हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध अशा सर्वांमध्ये आहे. भारतीय मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध हे जगातील त्यांच्या धर्मबांधवांपेक्षा वेगळे आहेत. हे वास्तव सांगण्यात दहशतवाद कसला?
समाजहिताच्या आड येणाऱ्या गोष्टींच्या विरोधात प्रबोधन करणारा तो पुरोगामी. पुरोगामी म्हणजे पुढे पाहणारा. उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारा. मोरे मात्र म्हणतात, "पुरोगामी दहशतवादी असतात.‘ या विधानाला प्रमाण काय? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. प्रतिगामी म्हणजे भूतकाळात डोके खुपसून बसलेला. भविष्याकडे पाठ फिरवणारा. समाजातील कुप्रथा आणि दोष यांना कुरवाळणारा. म्हणजे एका अर्थी व्यापक समाजहिताची बांधिलकी न मानणारा. थोडक्‍यात, प्रतिगामी म्हणजे संकुचित विचारसरणीचा आणि हिंसाचाराचा मार्ग अवलंबणारा. धर्मद्वेष आणि धार्मिक तेढ वाढली तर ती भारतीय बांधवांमधील बंधुत्व नष्ट करते. प्रतिगामी मंडळींनी आजवर परधर्मीयांची व पुरोगामी मंडळींची हत्या केली. त्याची संख्या मोठी आहे. पुरोगामी हे विशेषण लावणाऱ्या कोणीही कधी हत्येचा मार्ग अवलंबलेला नाही, हा इतिहास कसा नाकारता येईल? मग दहशतवादी कोण हे स्पष्ट झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. याउलट कोणत्या प्रतिगामी व्यक्तीची महाराष्ट्रात हत्या झाली, हे मोरे यांनी आपल्या विधानाच्या पुष्टीसाठी सांगायला हवे. "पुरोगामी लोकांच्या हत्येमागे विचारसरणीच्या भिन्नतेचे कारण नाही,‘ हे विधान ते कशाच्या आधारे करतात, हा प्रश्‍न आहे. गुप्तचर यंत्रणेच्या थाटात केलेले हे भंपक विधान आहे. "सावरकरांवरचे कलंक धुवून टाका,‘ असे म्हणताना जणू कलंक धुण्याचा साबण त्यांच्याकडे आहे, असा आविर्भाव त्यांनी आणला आहे. पण इतिहास असा बदलता येत नाही.
-----------------------------------------------
-----------------------------------------------
.
===================================================
===================================================
===================================================

.
बरे झाले, शेषराव बरळले!’
·         First Published :

http://www.lokmat.com/gall_content/2015/09/12/2015-09-12~Kumar-Saptarshi_ns.jpg

·         - डॉ. कुमार सप्तर्षी

असे म्हणतात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या लिखाणातून येते. रशियन क्रांतीची चाहूल टॉलस्टॉय, चेकॉव्ह वगैरेंच्या लेखनातून लागली होती. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हुकूमशाही येण्याची शक्यता, मग ते कम्युनिस्ट असो वा धर्माध असोत, जॉर्ज ऑरवेलच्या कादंब:यांमधून व्यक्त झालेली दिसते. सध्याचे केंद्र सरकार कोणत्या विचारधारेचे आहे व ते कोणत्या दिशेने प्रवास करीत हुकूमशाहीचा टप्पा गाठेल याची चाहूल अंदमान येथे झालेल्या तथाकथित विश्व साहित्य संमेलन आणि त्याचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या वाणीला फुटलेल्या धुमा:यातून लागते. तसे पाहिले तर नांदेडवासी शेषराव मोरे यांना कुणी विचारवंत मानत नाहीत. तरीही हुकूमशाहीचा सूर्य उगवणार आहे, हे कोंबडय़ाप्रमाणो ते आरवले. वास्तविक साहित्यिक संवदेनशील असल्याचे म्हटले जाते. पण काही विचारवंत विकाऊ, तर काही भाट असतात. पूर्वी राजे, बादशाह, संस्थानिकांनी पदरी बाळगलेल्या भाटांचे काम रोज राजाची खोटी स्तुती करून त्याला उपयोगी पडेल असे बोलत राहणो हेच असे. निर्थक, विसंगत, पोकळ शब्दभांडार हेच भाटांचे भांडवल असायचे. हे समजून घेतले की, शेषराव मोरे यांचे भाषण उलगडू लागते.
शेषराव मोरे हे ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागले. मी स्वत: नरहर कुरुंदकरांबरोबर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुद्दाम नांदेडला जात असे. तेव्हापासून प्रा. शेषरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय आहे. ढोबळमानाने समाजवादी मंडळी कुरुंदकरांना आपल्या विचारसरणीचे मानत. तथापि, दलित व मुस्लीम या जनसमूहांबद्दल कुरुंदकरांच्या बुद्धीचा भाग प्रतिगामी होता.
निजामाच्या राजवटीत मजलीस इत्तेहदूल मुसलमीन ही कट्टर धार्मिक संघटना व त्यांची परधर्मीयांवर हल्ले करणारी रझाकार नामक अतिरेकी संघटना यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे मराठवाडय़ातील पुरोगामी म्हणविणा:या विचारवंतांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल, इस्लामबद्दल, आंबेडकरांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता. हा दोष कुरुंदकरांमध्ये देखील सुप्तावस्थेत होता. नामांतर आंदोलनात सवर्ण मंडळींनी दलितांवर हल्ले व अत्याचार केले. त्या हिंसाचाराचा निषेध करून समाजात विवेकाची व सामंजस्याची पुनस्र्थापना करण्यासाठी थोर समाजवादी नेते एसेम जोशी यांचा दौरा झाला.
नांदेड येथे व्यासपीठावरून भर सभेत कुरुंदकरांनी एसेम अण्णांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यांची दलितविरोधी भूमिका ऐकून एसेम हतबल झाले होते. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. दलितांना गावकुसाबाहेर ठेवण्याचा प्रघात मराठवाडय़ात उघड स्वरूपात होता. रात्री लूटमार करण्यासाठी गावातील श्रीमंतांची घरे दाखवण्यासाठी रझाकार प्रथम दलितांना भेटत. रझाकारांच्या दहशतीमुळे गावकुसाबाहेर राहणारी दलित मंडळी गावातील श्रीमंतांच्या वाडय़ार्पयतचा रस्ता दाखवित. म्हणून मराठवाडय़ात मुस्लिमांइतकाच दलितद्वेष ठासून भरलेला आहे.
रझाकारांनी अत्याचार केले ही गोष्ट खरीच होती. तथापि, हा इस्लामच्या धर्मग्रंथाच्या शिकवणुकीचा भाग नव्हता. याबद्दल मी स्वत: कुरुंदकरांशी खूप वेळा वाद घातलेला आहे. पण ते भूतकाळातील आठवणी विसरायला तयार नव्हते. तेवढा भाग सोडला तर कुरुंदकर पुरोगामी विचारांचे होते.
प्रा. शेषराव मोरे हे ख:या अर्थाने कधीच पुरोगामी नव्हते. पण नांदेडमध्ये कुरुंदकरांचे नाव मोठे होते. त्यामुळे मोरे यांनी त्यांचे कुंकू लावले होते. ते स्वत:ला कुरुंदकरांचे शिष्य म्हणवत. ज्याचे नाव चलतीत आहे त्याच्या नावाने कपाळी कुंकू लावायचे आणि सवाष्ण म्हणून मिरवायचे हा मोरे यांचा खास स्वभाव! संशोधक हा त्यांचा पिंड नव्हे. पण बाजारात विकल्या जाणा:या विचारसरणीचे ग्रंथ लिहिणो हा त्यांचा छंद आहे.
सत्यनिष्ठा बाळगायची नाही, ही भूमिका असते. जगातील ज्यू लेखकांनी सातत्याने इस्लाम व ािश्चन या धर्माबद्दल संभ्रम निर्माण करणारे विपुल ग्रंथलेखन केले आहे. ते वाचून मोरे अनमान धपक्याने निष्कर्ष काढतात. त्यांना प्रत्यक्ष पुराव्याची कधी गरज भासली नाही. शेषराव मोरे यांनी ‘गांधीजींना देशाची फाळणी हवी होती’ असा निष्कर्ष आधी काढला. त्याला विक्रीमूल्य होते. आपल्या निष्कर्षाच्या समर्थनार्थ त्यांनी 7क्क् पानांचा ग्रंथ लिहिला. हिंदुत्ववाद्यांचे मार्केट असल्याने प्रकाशकाने तत्परतेने तो प्रकाशित केला. चांगली कमाई झाली. मी त्या ग्रंथातील प्रत्येक शब्द न शब्द वाचलेला आहे. कुठेही गांधींना फाळणी हवी होती असा निष्कर्ष काढता येत नाही. सर्व काही मोघम व अनुमान पद्धतीचे प्रतिपादन आहे. शिवाय भाषाशैली अत्यंत कंटाळवाणी आहे.
हिंदुत्व ही सत्ताप्राप्तीसाठी केलेली एक चतुर खेळी आहे. त्यात खूप विसंगती आहे. हिंदुत्ववादी मंडळींना मोरेंसारखा विचारवंताचा बुरखा पांघरलेला ब्राrाणोतर हवाच होता. मग मोरे यांनी कुरुंदकरांचे कुंकू पुसले आणि नवा घरोबा केला. पुढील वर्षी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सत्ता त्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ हा पुरस्कार प्रदान करून उपकाराची परतफेड करेल.
अंदमानचे साहित्य संमेलन ख:या अर्थाने हिंदुत्ववादीच संमेलन होते. हिंदुत्ववाद्यांचा हुकमाचा एक्का म्हणून मिरवण्यासाठी अध्यक्षपदावरून शेषराव बरळले. जो हिंदूंबद्दल टीका करतो त्याला ‘पुरोगामी दहशतवादी’ म्हणावे, असे त्यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी उपहास केला. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांची हत्त्या हिंदुत्ववाद्यांनी केली नाही, असे ते म्हणाले. जणू मोरे हे तपास यंत्रणोचे प्रमुख होते. कोणत्या कारणाने या हत्त्या झाल्या, हे मोरे यांनी प्रसिद्ध करावे.
सावरकरांवरील कलंक हिंदुत्ववादी साबणाने धुवून टाकावा, असा त्यांचा आग्रह आहे. गांधींच्या हत्त्येनंतर सावरकरांना आरोपी म्हणून अटक झाली होती. त्या कटात ते क्र. 8 चे आरोपी होते. पण ते हुशार होते. ते कधीही पुरावा मागे ठेवत नसत. दिल्लीच्या लाल किल्ल्यातील तुरुंगात ते नथुराम गोडसे व अन्य आरोपींना ओळखही दाखवत नसत. म्हणून सरदार पटेलांनी पं. नेहरूंना पत्र लिहून त्यांचे नाव खटल्यातून वगळले. त्यापूर्वी त्यांनी सौदा केला. सावरकरांना सोडण्याच्या मोबदल्यात त्यांनी राजकारण सोडून द्यायचे, असा सौदा झाला. गांधी हत्त्येच्या आरोपातून वगळल्यानंतर शेवटर्पयत सावरकर राजकारणाबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. उलट हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेल्या भोपटकर वकिलांना त्यांनी तंबी दिली की, गांधी हत्त्या या विषयात माङयाबद्दल एक शब्दही बोलू नका, मी निदरेष आहे वगैरे गोष्टी बोलू नका.
सावरकरांचा इतिहास पुसून टाकण्याची एवढी घाई कशासाठी? मोदी सरकार आज आहे तर उद्या नाही असे त्यांना वाटते. म्हणून त्यांची घाई आहे. घाई करून सावरकरांना राष्ट्रपिता जाहीर करण्याचा हा कट आहे. या पद्धतीने नथुराम गोडसेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येईल!
पुरोगाम्यांना ‘दहशतवादी’ हे विशेषण लावण्यापूर्वी त्यांनी कुणा प्रतिगाम्याची हत्त्या केली, याचा पुरावा मोरे यांनी द्यायला हवा होता. याउलट, प्रतिगाम्यांनी पुरोगाम्यांच्या ज्या हत्त्या केल्या, त्याची नामावली मोठी आहे.
काही असो, शेषराव मोरे यांना साहित्यिक वा विचारवंत वा सत्यउपासक म्हणता येणार नाही. परंतु संभ्रम निर्माण करण्यासाठी ते अशी विधाने करतात. हिंदुत्ववादाची सारी रचना संभ्रमाच्या पायावर उभी आहे. हिंदुत्ववादी हा एक संप्रदाय आहे. त्यांच्यावर टीका केली की समस्त हिंदूंवर टीका होते, हे विधान पटणारे नाही. हिंदूची खरी व्याख्या करायची असेल तर ‘जो पूर्वकर्मविपाक सिद्धांत मानतो, जन्मावरून सत्ता, संपत्ती यांचे वाटप ज्याला मान्य आहे, जो जातिव्यवस्था मानतो आणि ज्याला अस्पृश्यता मान्य आहे, तो हिंदू’ असे म्हणावे लागेल.
हिंदू धर्म व हिंदुत्व यांचा अन्योन्य संबंध काही नाही. जो हिंसेवर निष्ठा ठेवतो आणि जो हिंदू समाजाच्या उपरोक्त व्याख्येत बसतो त्याला हिंदुत्ववादी म्हणतात. शेषराव मोरे डॉ. नरेंद्र दाभोलकरांना सावरकरांचे वारस मानतात. या वैचारिक गफलती निर्माण करून संभ्रम माजवण्याचा त्यांचा डाव आहे, हे सिद्ध होते. सावरकरांना विज्ञानवादी म्हणवणो हा भ्रम समाजवादी मंडळींतदेखील आहे.
सावरकर सामथ्र्याचे पूजक होते. शक्तिपात होऊ नये म्हणून ते दलितांबद्दल कळवळा दाखवत. चित्पावन ब्राrाण ही जात ब्राrा व क्षात्रतेजाचा संकर असल्याने ती टिकली पाहिजे, असे ते मानत. तसे पुरावे आहेत. शेषराव मोरे कितीही घासले तरी राज्यघटनेला पर्याय म्हणून सावरकरवाद जागा घेऊ शकत नाही. शेषराव मोरे यांना पुरोगामी वा प्रतिगामी यापैकी एक विशेषण न लावता त्यांना ‘संभ्रमपुरुष’ असे विधान आपण देऊ या. त्यामुळे ते हिंदुत्ववाद्यांना अधिक प्रिय होतील व सन 2क्16 मधील महाराष्ट्रभूषण पुरस्कारास अधिक पात्र ठरतील.

(लेखक ‘युक्रांद’चे संस्थापक, ‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक आणि गांधीवादी विचारवंत आहेत.)
saptarshi.kumar@gmail.com

.
===================================================
===================================================
===================================================

.
शेषराव पुरोगाम्यांवर का घसरले ?
 14-09-2015 11:22:12 PM
A- A A+
जयदेव डोळे 
ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ

महाराष्ट्रात पुरोगामी दहशतवाद तयार झाला असून त्याने मराठी वैचारिकतेला घट्ट विळखा घातला आहे’ अशी खंत प्रा. शेषराव मोरे यांनी विश्व साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नुकतीच व्यक्त केली आहे. शेषरावांना महाराष्ट्राने आदर दिलेला आहे. त्यात पुरोगामी विचारांची व्यासपीठे नाहीत. पुरोगाम्यांनी शेषरावांना बोलावण्याचे कारणच नव्हते. कारण सावरकरांची विशिष्ट प्रतिमाच शेषरावांनी महाराष्ट्राला सांगितली. तेव्हा शेषरावांनी एवढे मोठे पद मिळाल्यानंतरही इतकी बारीकशी खंत व्यक्त करत रडगाणे गाण्यापेक्षा विज्ञाननिष्ठ, अंधश्रद्धा विरोधक, जातीप्रथा विरोधक, पतितपावन मंदिराचे संस्थापक अशी सावरकरांची पुरोगामी प्रतिमा अधिक ठळकपणे आणावी; तरच उरले-सुरलेले पुरोगामी त्यांना मान्यता देतील.
‘हिंदूंच्या विरोधात जेवढे अधिक बोलू तेवढे आपण पुरोगामी, असे समीकरण रूढ होत आहे. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारा प्रतिगामी ठरवला जातो. हा तर पुरोगाम्यांचा दहशतवाद आहे. या पोथीनिष्ठ
माक्र्सवादी पुरोगाम्यांनी भारतातील वैचारिकतेचे पुरते वाटोळे केले आहे,’ असे वक्तव्य अंदमानमध्ये ६ व७ सप्टेंबर रोजी आयोजिलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी केले आहे. शेषरावांनी केलेले हे विधान अतिशय गंभीर आणि आक्षेपार्ह आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर, साने गुरुजी, माक्र्स यांचे अनुयायी पुरोगामी जरूर आहेत, पण ते दहशतवादी कधीच नाहीत. महाराष्ट्राने जो विचार स्वीकारलेला आहे, इथं ज्या विचारांचे असंख्य अनुयायी आहेत, विचारवंत आहेत, त्यांच्या प्रभावास दहशतवाद म्हणणे चुकीचे आहे. कोणत्याही राज्यात त्या राज्याच्या स्थापनेपासून एक विचार बळकट झालेला असतो. महाराष्ट्रनिर्मितीसाठी उजव्या विचारांच्या तुलनेत डाव्या विचारांच्या कार्यकत्र्यांनी, पक्षांनी आणि विचारवंतांनी मोठी कामगिरी बजावली. साहजिकच महाराष्ट्राच्या विचारविश्वावर डाव्या आणि पुरोगामी विचारांची छाप पडली.
समाजवादी,साम्यवादी, शेतकरी कामगार पक्ष यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र घडवला. म्हणून डाव्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रावर पडला. यशवंतराव चव्हाणसुद्धा मानवेंद्रनाथ रॉय यांचे अनुयायी असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राला
समाजवादी वळण द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे अवघा महाराष्ट्र अगदी तुकोबांपासून ते सानेगुरुजींपर्यंत- अगदी तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांपर्यंत - एका निधर्मी, समतानिष्ठ आणि आधुनिक विचारांचा पाठपुरावा करणारा असेल तर अशा बहुसंख्याक विचाराने शेषरावांसारख्या विचारवंताला स्थान देण्याचा प्रश्नच येत नाही.
शेषराव अभ्यासक म्हणून मान्यताप्राप्त आहेत. पण त्यांच्या अभ्यासाचा विषय महाराष्ट्राला मान्य नाही. गांधीजींचा खून एवढाच सावरकरांबाबतचा वादाचा मुद्दा नाही. मुसलमानांविषयीची त्यांची मते आणि अन्य धर्मियांबद्दलची त्यांची भूमिका ही कोण्याही पुरोगामी आणि आधुनिक विचारांना मान्य होणारी नसल्यामुळे सावरकरवादी बाजूला फेकले गेले. काँग्रेसने कधीही सावरकरांना मोठेपणा दिला नाही. पण त्यांचा अनादरही केला नाही. त्यामुळे डाव्या व पुरोगामी विचारांच्या पक्षांची भूमिका आणखीनच स्पष्ट होते.
समाजामध्ये पुरोगामी-प्रतिगामी, डावे-उजवे असे भेद करावेच लागतात. सबगोलंकारी अथवा ढोबळमानाने कोणालाही विचार करता येत नसतो. जातिव्यवस्था, स्त्रियांवरील अत्याचार, हुंडाबळी, विधवा विवाह अशा प्रश्नांबाबत ठाम भूमिका घ्यावीच लागते. त्यामुळे समाजामध्ये दोन तट पडतातच. वैचारिकदृष्ट्या शेषरावांचा या प्रतिगामी तटाशी संबंध येतोच. हिंदुत्त्ववाद्यांनी जातिव्यवस्था, विषमता, स्त्रियांचे अधिकार याबाबत कधीही आंदोलने केली नाहीत. त्यामुळे शेषराव मोरे हे आपोआपच प्रतिगामी ठरतात. म्हणून शेषरावांचा अभ्यासक म्हणून आदर असला तरी त्यांच्या भूमिकांबद्दल आक्षेप राहणारच.
शेषरावांना पुरोगामी विचारवंत म्हणून कोण अपेक्षित आहेत? अगदी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून सदानंद मोरे यांच्यापर्यंत शेषरावांना कोणी मान्यता द्यायला हवी होती? असे मान्यता देण्याचे प्रयत्न या ना पुरोगामी करतात ना प्रतिगामी. प्रत्येकाचे स्वतंत्र विचारविश्व असते. समविचारी लोकांचाच समूह बनत असतो. आपले विचार अधिकाधिक पसरावेत असे कार्य राजकारणातून होते. त्यात शेषराव कमी पडले तर त्यांचा तो दोष ! कारण सावरकरांची हिंदुत्वनिष्ठ प्रतिमा शेषरावांच्या लिखाणातून ठळक बनली. विज्ञाननिष्ठ, अंधश्रद्धा विरोधक, जातीप्रथा विरोधक, पतितपावन मंदिराचे संस्थापक अशी सावरकरांची प्रतिमा शेषरावांना ठळक करता आली नाही. ही प्रतिमा पुरोगाम्यांनाही मान्य आहे. पण हिंदुत्त्ववादी सावरकर श्रेष्ठ की पुरोगामी सावरकर श्रेष्ठ याबाबत पुरोगामी कार्यकर्ते त्यांच्या हिंदुधर्मविषयक विचारांना समोर ठेऊन पास - नापास करत असतात.
शेषरावांना महाराष्ट्राने आदर दिलेला आहे. त्यात पुरोगामी विचारांची व्यासपीठे नाहीत. पुरोगाम्यांनी शेषरावांना बोलावण्याचे कारणच नव्हते. कारण सावरकरांची धर्मनिष्ठ आणि धर्मराष्ट्रनिष्ठ अशी विशिष्ट प्रतिमाच शेषरावांनी महाराष्ट्राला सांगितली. त्यामुळे निधर्मी, लोकशाहीवादी आणि स्वातंत्र्यपूजक विचारांना सावरकरांप्रमाणेच शेषराव मोरेदेखील मान्य होणे शक्य नाही. खुद्द सावरकर यांच्या लिखाणात लोकशाही आणि स्वातंत्र्य यांबाबत जास्त विवेचन करत नाहीत. धर्म आणि राष्ट्र हेच त्यांचे आवडीचे विषय आहेत. खेरीज हिंदू महासभा वगळून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्रात आघाडी घेतो याचा अर्थच असा की, महाराष्ट्रालाही सावरकर मान्य नव्हते आणि त्यांच्यापेक्षा पुराणमतवादी व सनातनी विचारांचा संघ महाराष्ट्र स्वीकारतो, याचाही शेषरावांनी अभ्यास करावा. तेव्हा शेषरावांनी एवढे मोठे पद मिळाल्यानंतरही इतकी बारीकशी खंत व्यक्त करावी हे पटत नाही.
पुरोगामी असे कोण लागून गेले की, ज्यांनी शेषरावांना मान्यता द्यावी? पुरोगाम्यांनी कधीही प्रतिगाम्यांकडे आम्हाला मान्यता मिळावी, अशी मागणी केलेली नाही. ते सरळ जनतेसमोर अथवा वाचकांसमोर अथवा श्रोत्यांसमोर मांडणी करतात. विज्ञाननिष्ठ व लोकशाहीवादी असल्यामुळे आपल्यालाच सत्य उमगले आहे, असा दावा ते कधी करीत नाहीत. शेषराव आदी उजव्या विचारांच्या लोकांच्या आम्हालाच सत्य कळल्याचा दावा असतो, निदान तसा आर्विभाव असतो. अशा घट्ट विचारांशी लोकशाहीनिष्ठ व स्वतंत्र विचारांच्या विचारकांशी चर्चा होत नाही. पुरोगाम्यांनी कधीही कोणाला प्रमाणपत्रे दिलेली नाहीत. प्रमाणपत्रे वाटून परिवार वाढत नसतो. आता अनुभव उलटाच येत आहे. पुरोगामी विचार पिछाडीला जाऊन महाराष्ट्र पुन्हा एकदा जीर्णमतवादी आणि पोथीनिष्ठ, कर्मकांडे स्वीकारत निघाल्याचे दिसते आहे. त्यामुळे पुरोगामी असे कोण लागून गेले, ज्यांनी दहशत उत्पन्न केली आणि शेषरावांना खालचे स्थान दिले? मुळातच जे प्रखर विचार करणारे असतात त्यांची अल्पसंख्या असते. त्यांचे विचार प्रखर असले तरी संख्या कमी असल्यामुळे त्यांना समाज मागे येण्याची फिकिरच नसते. कदाचित दूरचा विचार आधीच करून ठेवल्यामुळे त्यांना पाठबळ सापडत नाही. पण म्हणून ते शेषरावांप्रमाणे मला मान्यता नाही, असे रडगाणे गात नाहीत. शेषरावांसारख्या अभ्यासकाने रडगाणे गाण्यापेक्षा पुरोगामी सावरकरांची प्रतिमा अधिक ठळकपणे आणावी, तरच उरले-सुरलेले पुरोगामी त्यांना मान्यता देतील.
सध्या संघ परिवाराला सत्ता मिळाली आहे, पण सत्तेला भक्कम आधार देणारे विचारवंत त्यांच्यापाशी नाहीत. त्यामुळे शेषरावांनी ही संधी साधून पुरोगाम्यांवर हल्ला केला आणि माझाही विचार करावा, अशी साद दिली. संघ परिवार दोन्ही ठिकाणी सत्तेत येतो, याचा एक अर्थ पुरोगामी विचारांची पिछेहाट झाली आहे. असे असताना पुरोगाम्यांचा दहशतवाद काढण्यामध्ये काहीच अर्थ नाही. तरीसुद्धा शेषराव या दहशतवादाविषयी बोलतात तेव्हा त्यांचा कुठल्या पदावर डोळा आहे की, काय असा संशय येतोच !
जयदेव डोळे
ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ

====================================================

गांधीहत्या, सावरकर आणि शेषराव मोरे
अविनाश दुधे 
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

---------
महाराष्ट्रात आजच्या घडीला ज्यांना तर्ककठोर, वस्तुनिष्ठ विचारवंत, लेखक म्हणता येईल अशांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही. जी काही दोन-चार नावं आहेत त्यामध्ये अंदमानात नुकत्याच पार पडलेल्या विश्‍व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांचा क्रमांक निश्‍चितपणे लागतो. गेल्या काही वर्षांत अथक परिश्रम घेऊन केलेल्या संशोधनपर लेखनाने त्यांनी हे

स्थान मिळविले आहे. संशोधनातून, अभ्यासातून, पुरावे व संदर्भातून जे काही समोर येईल ते निर्भयपणे मांडायचे. हे मांडताना वेगवेगळे समूह, राजकीय पक्ष, धार्मिक संघटना, जात, पंथ, धर्माचे दबावगट यांना काय वाटतं? समाजात रूढ असलेल्या संकल्पनांना धक्का बसतो काय, अशा बाबींचा विचार न करता अप्रिय असलं तरी सत्य लोकांसमोर मांडायचं या पद्धतीने शेषराव मोरे लेखन करत आले आहेत. या विषयात रुढार्थाने गुरू नसले तरी अभ्यास आणि संशोधनाच्या विषयात मोरेंनी ज्यांना आदर्श मानले त्या नरहर कुरुंदकरांच्या पावलावर त्यांनी पाऊल ठेवले म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. गेल्या काही वर्षांतील 'काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?','काश्मीर एक शापित नंदनवन,' '१८५७ चा जिहाद,' 'मुस्लिम मनाचा शोध' अशा शेषरावांच्या अनेक पुस्तकांनी वर्षानुवर्षे रूढ असलेल्या अनेक धारणांना जबरदस्त धक्का दिला. त्यांच्या या पुस्तकांची विचारवंत व संशोधकांमध्ये मोठी चर्चा झाली. प्रतिवाद झालेत. काहींनी त्यांच्या निष्कर्षांबद्दल मतभेदही दर्शविले. मात्र अशा मतभेदानंतरही शेषराव मोरे हे अस्सल, तर्कनिष्ठ संशोधक आहेत याबाबत जवळपास एकमत आहे. त्यामुळे अंदमानातील विश्‍व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर अनेकांना मनापासून आनंद झाला. नांदेडसारख्या काहीशा आडवळणाच्या शहरात राहिल्याने प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या शेषरावांच्या लेखनकामाची, सखोल अभ्यासाची, संशोधनाची यानिमित्ताने चर्चा झाली, याचा आनंद मोठा आहे.
      शेषराव मोरे यांचा लौकिक सावरकरप्रेमी आणि सावरकरवादी असा आहे. स्वत: मोरे ते नाकारत नाहीत. सावरकरांचे विचार बाजूला ठेवून देशाला एकही पाऊल पुढे टाकता येणार नाही, हे मोरेंचे ठाम मत आहे. सावरकरांसारखा सर्वंकष विचार करणारा नेता दुसरा नाही, हे ते अनेक वर्षांपासून आग्रहाने सांगत आहेत. अंदमानातील साहित्य संमेलनानिमित्त वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी सावरकरांची वेगवेगळ्या विषयातील मते सविस्तरपणे मांडलीत. सावरकरांचे मोठेपण, महानता याबाबत एकवाक्यता नसली तरी शेषराव मोरेंचं सावरकर प्रेम समजून घेता येतं. विश्‍व साहित्य संमेलनाच्या उद््घाटनपर भाषणात मात्र त्यांनी आपल्या सावरकर प्रेमाचा अतिरेक करताना एका वादग्रस्त मुद्याला हात घातला. 'महात्मा गांधी यांच्या हत्येत सावरकरांचा हात होता असे जर कुणी म्हणत असेल तर त्याबाबत पोलिसात तक्रार केली पाहिजे आणि संबंधितांविरुद्ध खटला दाखल केला पाहिजे,' असे ते म्हणाले. 'न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असल्याने सावरकरांवरील हा कलंक दूर झाला पाहिजे,' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. एक सावरकरप्रेमी म्हणून मोरे यांच्या भावना समजून घेता येतात. मात्र त्यांच्याबद्दल पुरेसा आदर ठेवून सांगावेसे वाटते की, इतर सर्व विषयांत तर्ककठोर भूमिका घेणारे शेषराव मोरे सावरकरांच्या विषयात अशी भूमिका घ्यायला तयार नाहीत. सावरकरांना त्यांनी श्रद्धेच्या कोंदणात नेऊन बसवले आहे. गांधीहत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असतानाही सावरकरांचे विरोधक त्यांची बदनामी करण्यासाठी हा मुद्दा वारंवार उकरून काढतात, असे मोरे म्हणतात. मात्र गांधीहत्या विषयातील सावरकरांच्या भूमिकेबाबत इतर विषयांप्रमाणे खोलात जायला मोरे तयार नाहीत. गांधीहत्या प्रकरणात सावरकरांच्या भूमिकेची चिकित्सा करण्याची त्यांची अजिबात तयारी नाही.
    न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असली तरी सावरकरांना गांधी हत्येच्या कटाची माहिती होती आणि गांधींचा खून करणारे नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना सावरकर अनेकदा भेटत होते, याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. शेषरावांसारख्या तर्कनिष्ठ विचारवंताने ते उडवून लावावेत हे त्यांच्या लौकिकाला शोभत नाही. गांधीहत्या आणि गांधीहत्येच्या खटल्याबाबतची असंख्य पुस्तके व न्यायालयाची अधिकृत कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यातून नथुराम गोडसे व नारायण आपटे वारंवार सावरकरांना भेटत होते, ही बाब स्पष्ट झाली आहे. गांधीहत्येच्या खटल्यातील माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने गांधीहत्येच्या १३ दिवस आधी नथुराम व आपटे सावरकरांना भेटले होते. त्या भेटीत सावरकरांनी यशस्वी होऊन या..., असा आशीर्वाद गोडसे व आपटेंना दिला होता, ही बाब न्यायालयासमोर सांगितली होती. पुढे सावरकरांचे अंगरक्षक आप्पाराव कासार आणि सचिव दामले यांनी कपूर आयोगासमोर बडगेच्या या साक्षीला दुजोरा दिला होता. न्यायालयात बडगेच्या साक्षीला पुष्टी न मिळाल्याने आणि कासार व दामलेंची न्यायालयासमोर उलटतपासणी न झाल्याने केवळ तांत्रिक कारणाने सावरकर निर्दोष सुटलेत. देशातील त्यावेळची फाळणीनंतरची नाजूक परिस्थितीही सावरकरांना निर्दोष ठरविण्यात कारणीभूत ठरली. गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी गांधीहत्येचे झालेले एकूण सात प्रयत्न, गांधीहत्या होण्याअगोदरचा घटनाक्रम, गांधीहत्येचा खटला, कपूर आयोगाचा अहवाल, गांधीहत्येच्या प्रयत्नांमागची मानसिकता याबाबत सविस्तर प्रकाश टाकणारं 'लेट्स किल गांधी' हे अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी गांधीहत्या प्रकरणातील सावरकरांच्या भूमिकेबाबत पुराव्यासह विवेचन केले आहे. काही महिन्यांपूर्वी 'आम्ही सारे' फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका शिबिरात बोलतानाही तुषार गांधी यांनी गांधीहत्येच्या षडयंत्रातून सावरकरांचे नाव वगळणे अशक्य असल्याचे मत नोंदविले होते. गांधीहत्येच्या कटात अनेक व्यक्ती, संस्था, ग्वाल्हेर व अल्वारच्या राजघराण्यांचा हात होता आणि त्या सर्वांना को-आर्डिनेट करण्याचे काम सावरकरांनी केले असा ठोस आरोप तुषार गांधींनी त्या व्याख्यानात केला होता. (या विषयात अधिक उत्सुकता असणार्‍यांनी 'लेट्स किल गांधी' हे पुस्तक आणि कपूर आयोगाचा अहवाल नक्की वाचावा.)
 
पुरावे आणि संदर्भाशिवाय काहीही न बोलणार्‍या शेषराव मोरेंसारख्या परखड संशोधकाने सावरकरांच्या प्रेमापोटी तेव्हाचा घटनाक्रम आणि पुरावे नाकारणे हे अतिशय खेदजनक आहे. इतिहासातील इतर व्यक्तिरेखांना कठोर कसोटी लावणारे शेषराव मोरे हे सावरकर चुकूच शकत नाही, असे मानतात हे अचंबित करणारे आहे. मुळात सावरकरही इतरांसारखेच माणूस होते. राग, मत्सर, संताप, असूया या भावनांपासून त्यांचीही सुटका नव्हती, हे लक्षात घेण्याची शेषरावांची तयारी दिसत नाही. सावरकरांचा प्रखर बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, धर्माची कठोर चिकित्सा, समाजसुधारणांचा आग्रह या गोष्टी जशा नाकारता येत नाहीत त्याचप्रमाणे त्यांनी गांधींबद्दल असलेला आकस आणि गांधींच्या मारेकर्‍यांसोबत असलेले त्यांचे संबंधही नाकारता येत नाही, ही गोष्ट शेषरावांसह प्रत्येकच सावरकरप्रेमींनी समजून घेण्याची गरज आहे. (अंदमानातील जन्मठेपेची शिक्षा भोगण्यापूर्वीचे सावरकर आणि अंदमानातून बाहेर आलेले सावरकर या दोन भिन्न मानसिकतेच्या व्यक्ती होत्या, हे सावरकरांचा निरपेक्ष अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात. या अंगानेही जरा सावरकरांचं मनोविश्लेषण झालं पाहिजे.) गांधीहत्येच्या प्रयत्नातील सावरकरांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग हा त्यांच्या सार्‍या कर्तृत्वावर पाणी फेरते ही बोच शेषरावांसहीत तमाम सावरकरप्रेमींना असणे समजू शकते. त्यातून सावरकरांचा गांधीहत्येत हात होता असे म्हणणार्‍यांची तक्रार पोलिसात करा, असे शेषराव मोरे म्हणत असतील. मात्र असे केल्याने सत्य झाकोळून टाकता येत नाही. लपविता तर येतच नाही, हे किमान शेषरावांना तरी सांगण्याची गरज नाही.
- अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६
Reply, Reply all or Forward | More

=====================================================
 बेळगाव तरुण भारत संपादकीय
शेषराव मोरे यांचा अजेंडा कोणता? 
Posted: 9:47 PM, September 8, 2015
sheshrao-more1
अंदमानला भरलेल्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ज्येष्ठ लेखक व समीक्षक प्रा. शेषराव मोरे यांनी जी भाषणे केली आहेत, ती वाचल्यावर त्यांचा निश्चितच एक अजेंडा त्याच्यामागे लपला आहे, हे स्पष्ट जाणवते. जेमतेम 250-300 प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेले हे विश्व संमेलन म्हणायचे  की गल्ली संमेलन म्हणायचे असा प्रश्न पडतो. शिवाय अंदमानच्या संमेलनाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाची झालर लाभली होती. हे जरी स्वाभाविक असले तरी अन्य फारशा विषयांच्या चर्चेत न जाता सावरकर नावाचा एकच सूर आळवत संमेलन घडवायचे, हे कितपत सुयोग्य होते, याचा आता तरी संयोजक संस्थांनी शांतपणे विचार केला पाहिजे. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकर प्रदीर्घ काळ होते. त्यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर हेही तेथे होते. अंदमानच्या साहित्य संमेलनात जवळपास कोणालाही बाबाराव सावरकरांची आठवणही झाली नाही.

अंदमान साहित्य संमेलनाचे रूपांतर खुद्द मोरे यांनी म्हटल्याप्रमाणे सावरकर राष्ट्रीय संमेलनात झाले आहे, ही गोष्ट अधोरेखित केली पाहिजे. त्यांचे अध्यक्षीय भाषण आणि समारोपाचे भाषण या दोन्हींमध्ये एक सुप्त अजेंडा मांडण्याचा त्यांचा जो हेतू होता, तो पूर्णतः स्पष्ट झालेला आहे आणि सफलही! त्यांच्या भाषणाचे कौतुक आता सुरू झाले आहे आणि त्यामुळे त्यांचा अजेंडाही अधिक टोकदारपणे  महाराष्ट्रासमोर येईल, असे वाटते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मोरे यांनी भारतीय राज्यघटनेचा, सेक्युलॅरिझमचा आणि सावरकरांच्या विचारांचा जयघोष केला आहे. सकृतदर्शनी राज्यघटना, सेक्युलॅरिझम हे शब्दप्रयोग वापरले की, साहजिकच भाषणाला पुरोगामी वळण देता येते. सावरकरांच्या सामाजिक विचारांचे वळण हे प्रागतिक व क्रांतिकारक होतेच. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित हिंदू परिवाराने त्यांची घोर उपेक्षा केली. मोरे यांच्या भाषणात सावरकरांच्या विचारांचे उदंड कौतुक वाचायला मिळते. तथापि, हिंदू हितवादी संघटनांनीच केलेल्या घोर उपेक्षेमुळे त्यांचे विचार दुर्लक्षिले गेले, दूर फेकले गेले, हेच वास्तव आहे. याउलट अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुद्धिप्रामाण्यवादी विचार मांडणाऱया अनेक संघटना यांनी सावरकरांचे धर्मविषयक व्यापक विचार आपल्यापरीने प्रसृत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.  संघपरिवाराला उपदेश करण्याच्या फंदात प्रा. मोरे पडलेले नाहीत. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून रशियातील साम्यवाद, पोथीनिष्ठ मार्क्सवादी पुरोगामी आणि अर्थातच गांधीजी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. हे करताना त्यांनी महाराष्ट्रातील पुरोगामी मंडळींनी हिंदुत्ववादी हे पुरोगामी नाहीत, अशी जी समजूत आणि विचार सातत्याने मांडला आहे, त्याचा समाचार घेतला आहे. त्यामुळे मराठी  वैचारिकता या पुरोगामी दहशतवादाच्या विळख्यात सापडल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. या पार्श्वभूमीवर सावरकरांची भारावलेली भव्यदिव्य प्रतिमा (प्रखर बुद्धिवादी, समाज क्रांतिकारक व सेक्युलर) मोरे मांडतात आणि त्यामुळे आपण प्रभावित झालो, हेही ते सांगतात.

शेषराव मोरे यांच्या व्याख्यानातील धोकादायक भाग म्हणजे सावरकरांनी हिंदू शब्दाची जी व्याख्या केली आहे,  तिचा केलेला पुरस्कार, ही व्याख्या योग्य आहे, असे प्रशस्तीपत्र ते आपल्या भाषणात देतात. धर्मसंस्थापकांच्या जन्मभूमीच्या आधारे हिंदू कोण, ही व्याख्या सावरकरांनी केली आहे. त्यामुळे साहजिकच याबाबतचे मतभेद स्पष्टपणे मांडले पाहिजेत. याच्यापुढे जाऊन ‘हिंदू’ ऐवजी ‘भारतीय’ या शब्दाची सेक्युलर राज्यघटनेच्या संदर्भात व्याख्या करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. शब्दच्छल करत एका सुप्त अशा विघटनवादी विचारांकडे हिंदू हितवादी मंडळींना कसे न्यायचे याचे मोरे यांचे भाषण म्हणजे एक उत्तम नमुना म्हणावा लागेल. कारण भारतीय शब्दाची व्याख्या करताना राष्ट्रीय आणि वैचारिकदृष्टय़ा खरा भारतीय कसा असावा, याची व्याख्या केली पाहिजे, अशी सूचना  ते करतात. शेषराव मोरे यांच्या म्हणण्याप्रमाणे ती व्याख्या अशी आहे, ‘जो स्वतःचा (किंवा स्वतःचे) पवित्र धर्मग्रंथ व भारताची राज्यघटना यांच्यात विरोध आला तर धर्मग्रंथापेक्षा राज्यघटना श्रेष्ठ आहे, असे जाहीरपणे सांगतो व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, तो खरा भारतीय.’ यात मेख अशी आहे की, ही व्याख्या  कोणत्या समाजाला उद्देशून केली आहे, हे सुज्ञांना वेगळे सांगायला नको. मात्र विचारवंत व लेखक अशा विशेषणांचा गजर आपल्याभोवती होईल, अशा पद्धतीने वावरणाऱया मोरे यांनी ही अतिशय धोकादायक व्याख्या केली आहे आणि संरक्षणासाठी वारंवार सेक्युलर राज्यघटनेची जोड देण्याचा म्हणूनच प्रयत्न केला आहे. सावरकरांच्या व्याख्येपेक्षा आशयाच्या दृष्टीने ही व्याख्या वेगळी आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

अर्थात मोरे यांनी एकूणच हिंदू हितवादी परिवाराची पालखी स्वेच्छेने आपल्या खांद्यावर घेतल्यामुळे हिंदूंचे  पुरोगामित्व सावरकरांच्या विचारांच्या प्रकाशात उजळवून टाकणे, हा त्यांच्या अजेंडय़ातील प्रमुख मुद्दा आहे. हिंदूंचे हित सांभाळण्याचा पवित्रा घेणाऱया संघटनांनी प्रत्यक्षात हिंदूचे किती नुकसान होते, याची झाडाझडती घेण्याची भूमिका मात्र मोरे सोयीस्करपणे बाजूला टाकतात. या देशातील बहुसंख्य असणाऱया हिंदू समाजाने सातत्याने एका धर्माचा विचार मांडणाऱया पक्ष किंवा संघटनांना स्वातंत्र्योत्तर काळात जवळपास फारशी संधी आणि मान्यता  दिली नाही, याचा शोध मोरे यांच्यासारख्या विद्वानांनी घेतला तर निश्चितच त्या मंथनाचा लाभ समाजाला व अभ्यासकांना होईल. या देशातील अल्पसंख्य समाजाने काही वेळा दिशाहीन भरकटत हिंसेचा मार्ग अवलंबिला होता, अशाही घटना नोंदलेल्या आहेत. तथापि, बहुसंख्य धर्मियांचाच हा देश अशा घोषणा सतत देणाऱया या पक्ष व संघटनांनी भारतीय राज्यघटनेच्या मूलाधारालाच धोका निर्माण केला, हे स्पष्टपणे नमूद करायला मोरे विसरले की काय?

समारोपाच्या भाषणात शेषराव मोरे यांनी गांधीहत्येत सावरकरांचा हात असल्याचा कलंक सरकारने दूर करावा,  अशी सूचना  केली आहे. त्यासाठी सरकारने न्यायालयात जावे आणि सावरकरांवर त्यांचा  गांधीहत्येत हात होता, असा आरोप करणाऱयाविरुद्ध पोलिसात तक्रार करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. इतिहासाची ही फार जटिल पाने आहेत आणि त्यातील तपशीलही फार संवेदनशील आहेत. एक गोष्ट निश्चितच स्पष्ट आहे आणि ती म्हणजे आपल्या अंदमानपूर्व आयुष्यात सावरकर हे सशस्त्र क्रांतीचे केवळ समर्थक नव्हते, तर या गटाचे ते अग्रणीही होते. अंदमानातील काळय़ा पाण्याच्या शिक्षेनंतर सावरकरांनी माफीनामा लिहून दिल्यावर ब्रिटिश सरकारने त्यांना जिल्हा बंदी केली आणि राजकीय कामाला बंदीही केली. या बंदीच्या काळात सावरकरांनी जे सामाजिक  चिंतन केले व कार्य केले, केवळ याच्याच आधारावर शेषराव मोरे यांचे अध्यक्षीय भाषण बेतलेले आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.

नथुराम गोडसेशी सावरकरांचे जवळचे संबंध होते आणि एका अर्थाने ते मार्गदर्शक व शिष्य या स्वरुपाचेच होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाच्या पूर्णतः उलट होता, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे सावरकरांचे व्यक्तिमत्त्व दोषरहित, कलंकरहित आणि पूर्णतः उजळविणारे असेच आता चित्रित झाले पाहिजे, ही मोरे यांची महत्त्वाची भूमिका आहे. एकूणच संघपरिवाराला पोषक ठरणारी भूमिका आता ते सतत मांडत राहणार व प्रसारित करत राहणार, हेही स्पष्ट दिसते. अर्थात हिंदूहिताचे रक्षण करणाऱया या सर्व संघटनांना सावरकर पचणे व स्वीकारणे किती अवघड आहे, याची जाणीव मोरे यांनाही लवकरच होईल, यात शंका नाही. त्यांच्या कथित बुद्धिवादी अध्यक्षीय भाषणाने मात्र त्यांचा खरा अजेंडा समोर आला, एवढेच त्याचे फलित!=========================================================

·  
श्री. शेषराव मोरे यांना काही प्रश्न...
— मधुकर डुबे, नाशिक.
रसिक, १३ सप्टेंबरमधला विनोद शिरसाठ यांचा ‘पुरोगाम्यांनी परिघाबाहेर ठेवलेला अभ्यासक’ हा लेख वाचला. शेषराव मोरेंनी महाराष्ट्रात ‘पुरोगामी दहशतवाद’ आहे, असे विधान केले आहे. खरे तर अलीकडच्या काळात ‘सांस्कृतिक दहशतवादाची’ अनेक उदाहरणे या पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहेत. पण शेषरावांनी या मुद्द्यांवर चकार शब्ददेखील काढलेला नाही.
उदाहरणार्थ, गोवंशहत्याबंदी. शेषराव मोरे स्वतःला सावरकरवादी, इहवादी मानतात. पण तरीदेखील या प्रश्नावर सोयीस्कर मौन बाळगतात. सावरकरांची या मुद्द्याबद्दलची कडवी मते लक्षात घेता आणि शेषरावांची सावरकर विचारांवरील निष्ठा लक्षात घेता, त्यांनी गोवंशहत्याबंदीविरुद्ध केवळ विधानच नव्हे, तर आणखी तीव्र राजकीय कृती करायला हवी होती. अंदमानचे संमेलन ही त्यासाठी अत्यंत मोठी संधी होती. कदाचित असे करण्याआड त्यांना मिळालेले अध्यक्षपद तर आले नसावे? आज महाराष्ट्राला परखड आणि स्पष्ट बोलणाऱ्या विचारवंतांची गरज आहे. पारितोषिक आणि मानसन्मानासाठी वैचारिक निष्ठा गहाण ठेवणाऱ्या स्युडोविचारवंतांनी महाराष्ट्राच्या वैचारिक संस्कृतीचे मोठे नुकसान केले आहे.
शेषराव स्वतःला नरहर कुरुंदकरांचे शिष्य मानतात. पण असे म्हणून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. नरहर कुरुंदकर हे हिंदुत्ववादाचे कट्टर विरोधक होते. कारण हिंदुत्व आणि भारतीय संविधान या गोष्टी एकत्र जाऊच शकत नाहीत. खरे तर कुरुंदकर आणि मोरे यांच्या विचारात मूलभूत पातळीवर मोठा अंतर्विरोध आहे. त्यांची भारतीय संविधानावर निष्ठा होती. त्या संविधानातील सेक्युलॅरिझमचे तत्त्व हे त्यांना अक्षरशः प्राणप्रिय होते. हिंदुत्वाची कितीही व्यापक व्याख्या केली, तरी ते घटनेतील या तत्त्वाला छेदच देते. कारण, घटना व्यक्तीची स्वायत्तता हे मूल्य केंद्रस्थानी मानते, तर हिंदुत्वाची संकल्पना ही विशिष्ट धर्मात जन्मलेल्या व्यक्तीला खास दर्जा देते. असे नसते तर हिंदुत्व या कल्पनेचा उदयच झाला नसता. आपले हिंदुत्व हे कसे प्रागतिक आहे, हे सांगण्याचा चलाख प्रयत्न शेषराव आजवर करत आले आहेत. त्यात कमालीचे यशस्वी झाले आहेत. अशी सबगोलंकार भूमिका घेणे कोणत्याही ‘यशवादी’ व्यक्तीस आवश्यक असते. आज कुरुंदकर असते, तर त्यांनी शेषरावांच्या या दुटप्पीपणावर जोरदार हल्ला चढवला असता.
जेव्हा डाव्या, पुरोगामी विचारांना प्रतिष्ठा होती, तेव्हा शेषरावांनी स्वतःला कुरुंदकरांचे, अ. भी. शहांचे, हमीद दलवाईंचे वैचारिक वारसदार असल्याचे भासवले. त्या वेळेस हे तिघेही हिंदुत्वाचे कट्टर विरोधक आहेत आणि हिंदुत्व ही या देशाच्या गाभ्याला छेद देणारी गोष्ट आहे, असे मानणारे हे विचारवंत आहेत. या गोष्टीकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. आता केंद्रात आणि राज्यात हिदुत्ववादी विचाराचे सरकार आले आहे. अशा वेळेस दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांचा खून करणाऱ्या दहशतवादी विचारांचा निषेध करण्याऐवजी, तसा निषेध करणाऱ्या पुरोगामी लोकांच्या ‘दहशतवादा’बद्दल बोलण्याचे महान काम शेषराव मोरे आज करत आहेत. धन्य शेषराव आणि धन्य त्यांची तत्त्वनिष्ठा.
dube.madhukar@gmail.com
·         ----------------------------------------------------
·         ----------------------------------------------------


·         पुरोगाम्यांना दहशतवादी म्हणणे ही मळमळ असली तरी ----

- सुधाकर जाधव 

---------------------------------------------------------------
----पुरोगाम्यातील उदारतने खालची धोकादायक पातळी गाठली आहे हे सत्य नाकारता येणे कठीण आहे. .एखादा विचार पटत नसेल तर कोणतेही हेत्वारोप न करता आणि त्या माणसाला दूर न लोटता त्याचे तर्कसंगत खंडन हे प्रत्येक पुरोगामी कडून अपेक्षित आहे. उदारता हा पुरोगामी आणि प्रतिगाम्याना एकमेकापासून वेगळा करणारा एकमेव नसला तरी सर्वाधिक महत्वाचा घटक आहे. तुकडोजी महाराज किंवा गाडगे बाबा रूढी परंपरा देव धर्म यांचेवर किती प्रखर टीका करायचे पण त्याच लोकांना आईच्या मायेने जवळ करायचे. आमचा विचारच खरा आहे आणि तो प्रत्येकाने मानलाच पाहिजे असे जे म्हणतात ते प्रतिगामी आहेत. मग ते मार्क्सला मानणारे असोत , बुद्धाला मानणारे असोत की गांधीला. मला तुझा विचार मान्य नाही हे मी तुला आणि लोकांना पटवून देत राहील पण तुला तुझा विचार मांडण्या पासून रोखणार नाही असे म्हणणारा खरा पुरोगामी. स्वत: इतकेच दुसऱ्याचे स्वातंत्र्य ज्याला प्रिय असते तोच पुरोगामी असू शकतो. प्रतिगामी नेहमीच स्वातंत्र्याचे वैरी राहात आले आहेत. उद्या भागवतांनी म्हंटले की तुम्ही तुमच्या घरात तुमचा धर्म पाळा , आम्हाला आमच्या घरात आमचा धर्म सुखाने पाळू द्या आणि बाहेर दोघेमिळून राष्ट्रधर्म पाळू या तर त्यांना विरोध करण्याचे आणि टीका करण्याचे कारण उरणार नाही. पण त्यांना विविधता नको आहे , सगळ्यांवर आपले विचार लादायचे आहेत . ते स्वातंत्र्य विरोधी आहेत म्हणून प्रतिगामी आहेत. माझा विचार-फुले , आंबेडकरांचा विचार- हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि तो मानणार नाही त्याला आम्ही वाळीत टाकू ही भूमिका कधीच पुरोगामी असू शकत नाही. विरोधकांचा आम्ही जितका अनादर करू तितके पुरोगामित्वा पासून दूर जावू ही खुणगाठ प्रत्येक पुरोगाम्याने आपल्या मनाशी बांधली पाहिजे. पुरोगाम्यांची स्वत:ची अशी संघटनेची, सत्तेची ताकद नसताना ज्यांच्या हाती सत्ता आहे,संपत्ती आहे , संघटन आहे ते पुरोगाम्यांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नाही कारण पुरोगामी विचार हाच आपल्या मार्गातील मोठा अडथळा आहे असे त्यांना वाटते. हा तर पुरोगामी विचाराचा गौरव आहे. असा गौरव करणाऱ्यांना शिव्याशाप कशासाठी द्यायचे ?
- सुधाकर जाधव
·         ----------------------------------------------
·         ----------------------------------------------
·             ---------------------------------------------------
·         -------------------------------------------------
·         सप्तर्षी अजूनही कुमारच...
21:29 No comments
http://1.bp.blogspot.com/-IuqrWZncVoo/Vfjvl6Q6WAI/AAAAAAAAATI/G4nQpxn8Ot4/s320/Kumar%2BSaptarshi.jpg

    अंदमान येथे झालेल्या ४ थ्या विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशातील विचारधारेच्या वर्तुळात चांगलीच वैचारिक घुसळण झाल्याचे पाहायला मिळाले. या निमित्ताने अनेक कुमार विचारवंतांना आपल्या सुमार बुध्दीचे दर्शन घडविण्याची संधी शेषराव मोरे सरांनी उपलब्ध करून दिली. अर्थात अनेक वर्षे बिळात बसलेल्या नव्हे नव्हे लोकांनी बसवलेल्या भूजंगांना आता परत फुत्कार सोडायची  सुरूवात प्रा. मोरे सरांनी उपलब्ध करून दिली. तेही एक बरेच झाले. कारण ज्या तथाकथित ज्येष्ठाना लोक खूप मोठे विचारवंत मानत होते त्यांच्या बुध्दीची 'पातळी' (सुटत आहे) कळून येत आहे. कुमार सप्तर्षी सारख्यांची असलेली जुनी ओळख पुसून सुमार सप्तर्षी अशी होत आहे.
     असं म्हणतात, एखादी व्यक्ती व्यक्ती वा संघटना जेव्हा सर्वोच्च शिखरावर पोहोचते तेव्हाच त्याची घसरण सुरू झालेली असते. सप्तर्षींच्या बाबतीतही तिच गत आहे. अर्थात त्यांची घसरण होऊन बराच काळ लोटला. आजच्या पिढीला सप्तर्षी कोण हे माहितही नाही. मात्र त्यांच्या 'युक्रांदी'य कारकिर्दीविषयी थोडेफार माहिती असलेल्यांनाही त्यांच्या अपयशाचे गुपित एव्हाना कळले असेल.
विशेष म्हणजे हे कळण्याला त्यांचे प्रा. शेषराव मोरे यांच्याविरोधातील लेखच पुरेसे ठरलेत.
      दै. सकाळ, लोकमत या वृत्तपत्रातून त्यांनी गेल्या आठवडाभरात शेषराव मोरे सरांवर बरेच विषारी नव्हे तर विखारी फुत्कार सोडलेत. मात्र त्यातून ते निश्चित अशा निष्कर्षाप्रत पोहोचू शकले नाहीत. लोकमत मधील मंथन पुरवणीतील लेखाच्या सुरूवातीलाच ते लिहितात की, "असे म्हणतात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या लिखाणातून येते. रशियन क्रांतीची चाहूल टॉलस्टॉय, चेकॉव्ह वगैरेंच्या लेखनातून लागली होती. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हुकुमशाही येण्याची शक्यता, मग ते कम्युनिस्ट असो वा धर्मांध असोत, जॉर्ज ऑरवेलच्या कादंबऱ्यामधून व्यक्त झालेली दिसते. सध्याचे केंद्र सरकार कोणत्या विचारधारेचे आहे व ते कोणत्या दिशेने प्रवास करीत हुकुमशाहीचा टप्पा गाठेल याची चाहूल अंदमान येथे झालेल्या तथाकथित विश्व साहित्य संमेलन आणि त्याचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या वाणीला फुटलेल्या धुमा-यातून लागते. तसे पाहिले तर नांदेडवासी शेषराव मोरे यांना कुणी विचारवंत मानत नाहीत. तरीही हुकुमशाहीचा सूर्य उगवणार आहे, हे कोंबड्याप्रमाणे ते आरवले."
   सप्तर्षी यांच्या वरील उताऱ्या तून त्यांच्या बुध्दिची कीव करावी तेवढी कमीच वाटते कारण, एकीकडे ते म्हणतात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या लिखाणातून येते, मात्र वास्तवात देशात सत्ताबदल होऊन वर्ष लोटले आहे. त्यामुळे मोरे यांना सत्ताधा-यांचे भाट ठरविण्याचा सप्तर्षी यांचा युक्तीवाद पहिल्याच वाक्यात फोल ठरतो. त्यावरून त्यांच्या लिखाणात किती विखार आहे हे स्पष्ट होते. वरील उताऱ्यात केंद्र सरकार कसे हुकुमशाहीकडे जाणार आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात आणि खाली तेच सांगतात की, मोरे कोंबड्याप्रमाणे आरवले. या दोन्ही आरोपातून त्यांच्या सुमार बुध्दीचे दर्शन घडते. वर कढी म्हणजे, मोरे यांना कोणी विचारवंत मानत नाही असे ते म्हणतात तर मग, सप्तर्षी यांनी हा लेखनप्रपंच का केला? याचे उत्तर त्यांनी द्यावे.
      पुढे ते लिहितात, मोरे हे कुरूंदकरांच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागले तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच परिचय आहे.  त्याचा दाखला देत सप्तर्षी कुरुंदकरांच्या बुध्दिचा अर्धा भाग दलित व मुस्लिम या जनसमूहाबद्द्ल प्रतिगामी होता असे सांगतात. मग जर का त्यांच्या बुध्दिचा भाग अर्धा प्रतिगामी होता तरीही सप्तर्षी हा मुद्दा सोडून त्यांना पुरोगामी मानत होते. त्यामुळे तुमच्या या मोरेंबद्दलच्या लेखाला वाचकांनी नक्की काय मानायचे? पुरोगामी की प्रतिगामी?
     पुढे जाऊन या लेखात सप्तर्षी कुरुंदकरांबाबत म्हणतात, "मराठवाड्यातील लोकांमध्ये मुस्लिमांइतकाच दलित द्वेषही ठासून भरलेला आहे. कारण दलित लोक रझाकारांना गावातील श्रीमंतांचे घर दाखवित. मग रझाकार त्यांचे घर लुटीत. रझाकारांनी अत्याचार केले ही गोष्ट खरीच होती. त्यामुळे कुरुंदकर ही गोष्ट विसरायला तयार नव्हते. ती गोष्ट सोडता कुरुंदकर पुरोगामी होते."
सप्तर्षी यांचा हा युक्तिवाद किती बालिशपणाचा आहे हे लक्षात येते. जर का कुरुंदकारांच्या बुध्दिचा एखादा भाग प्रतिगामी मानून सप्तर्षी त्यांना मानत असतील तर मग मोरे यांच्याबाबतीतच आकस का? सप्तर्षी त्यांच्याबाबतीतही आपला उदात्तपणा का दाखवत नाहीत? एकंदरीतच काय तर, कुरूंदकरांच्या नावावर आपल्या सोयीच्या विचारांचे अपहरण करून आपली दुकानदारी चालवायची आणि ज्यामुळे दुकानदारी धोक्यात येईल असे वाटते तिथे सोयीस्कर पळवाट शोधायची असाच प्रताप सप्तर्षी आपल्या लिखाणात धादांतपणे करतात. वर शेषराव मोरेंना शहाणपणा शिकवतात की, "सत्यनिष्ठा बाळगायची नाही, ही भूमिका असते."
      पुढे ते शेषराव मोरेंच्या ग्रंथ संशोधन आणि लेखन कार्याकडे वळतात. एखाद्या सत्यनिष्ठ विचारवंताचा तेजोभंग कसा केला जातो याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे. " शेषरावांनी 'गांधीजींना देशाची फाळणी हवी होती' असा निष्कर्ष आधी काढला. त्याला विक्री मुल्य होते. आपल्या निष्कर्षाच्या सन्मानार्थ त्यांनी ७०० पानांचा ग्रंथ लिहिला. हिंदुत्त्ववाद्यांचे मार्केट असल्याने प्रकाशकाने तत्परतेने तो प्रकाशित केला. चांगली कमाई झाली. मी त्या ग्रंथातील प्रत्येक शब्द न शब्द वाचलेला आहे. कुठेही गांधींना फाळणी हवी होती असा निष्कर्ष काढता येत नाही. सर्व काही मोघम व अनुमान पध्दतीचे प्रतिपादन आहे. शिवाय भाषाशैली अत्यंत कंटाळवाणी आहे."
  वरील उताऱ्यात सप्तर्षींचा मोरे यांच्याबद्दलचा आकस दिसून येतो. कारण यांना मोरेंचा पुस्तकातील तर्कवाद मान्य नाही. मग लेखाच्या सुरूवातील हेच सप्तर्षी महाशय जॉर्ज ऑरवेलच्या कादंब-यांतील दाखला देतात मग मोरेंच्या तर्कवादाबाबतचा त्यांचा आकस नक्की कितपत योग्य वा न्याय्य आहे? राहता राहिला प्रश्न 'कॉंग्रेस आणि गांधींनी अखंड भारत का नाकारला? ' या पुस्तकाचा. तर सप्तर्षी यांचा दावा आहे की मोरेंनी हा ग्रंथ केवळ हिंदुत्त्ववाद्यांना पुरक असाच लिहिला आहे. वर ते ते म्हणतात मी या ग्रंथातील शब्द न शब्द वाचलाय. मात्र त्यांनी हा ग्रंथ खरच वाचला आहे का? याबाबत माझ्या मनात शंका आहे. कारण ज्या कोणी हा ग्रंथ वाचला असेल त्यांच्याही मनात हा लेख वाचून प्रश्न चिन्ह उभारला असेल की, खरच सप्तर्षींनी हा ग्रंथ वाचलाय का? कारण हा ग्रंथ हिंदुत्त्ववाद्यांना पुरक असा मुळीच नाही. केवळ नावावरूनच त्यांनी ग्रंथाबाबत निष्कर्ष काढला असावा अशी दाट शंका माझ्या मनात आहे. वास्तविक पाहता शेषराव मोरे यांच्या इतपत, भारताच्या फाळणीबाबतचे सेक्युलर विश्लेषण करणारी भूमिका आजवर कुणी मांडली नसावी. ते ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा कट्टर समर्थक असूनही. त्यामुळे सप्तर्षींनी मोरे यांच्या लिखाणाबाबत शंका घेवूच नये. खरे तरे मोरे यांच्यासारखी माणसे तर्कवादी लेखन करून सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या लिखाणामुळे सप्तर्षींसारख्या वैचारिक दुकानदारांची दुकानदारी बंद पडू लागल्यानेच असा विरोध वा तेजोभंग करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत आहे.
       या उपरोक्त कुमार सप्तर्षी यांनी आपल्या लेखात बऱ्याच सुमार दर्जाचे युक्तिवाद मांडण्याचा वृथा प्रयत्न केला आहे. आपण कसे पुरोगामी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करताना ते किती जातीयवादी आहेत हे त्यांच्या लेखातून दिसून येते. प्रत्यक्ष जीवनातही ते पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरून थोडा स्पार्क असणाऱ्या तरूणांना त्याची जात विचारतात. आणि जर का त्याने सांगितली नाही तर ते त्याच्या कुटुंबीयांना गाठून त्याची जात काढून घेतात. त्यामुळे इतका जातीयवादी माणूस इतरांच्या पुरोगामीत्वावर शंका घेतो हेच मुळी हास्यास्पद आहे. सप्तर्षींच्या या लेखनप्रपंचावरून एकच गोष्ट मनात येते की,
बहि-यांची जमवूनी मैफिल तो दाद लाटतो आहे,
अंधांच्या वस्तीत आरसे व्यर्थ वाटतो आहे.
   
- सागर सुरवसे.
९७६९१७९८२३
Follow on Twitter : @sagarsurawase
·         ------------------------------------------
·         ------------------------------------------
·         न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन का मान्य होत नाही ?
o    दीपक पटवे
o  
o    Sep 20, 2015, 01:20 AM IST
o    Print
o    Decrease Font
o    Increase Font
o    Email
o    Google Plus
o    Twitter
o    Facebook
o    COMMENTS
0
o    Email
o    Google Plus
o    Twitter
o    Facebook
o    COMMENTS
न्यायालयाच्या निर्णयाचे  समर्थन का मान्य होत नाही ?
रसिकच्या १३ सप्टेबरच्या अंकातील विनोद शिरसाठ यांचा लेख एकूण त्यांच्या प्रतिमेशी विसंगत वाटला. अर्थात, त्यांची प्रतिमा काही हिंदुत्ववादी नाही; पण ज्यांना केवळ समाजवादी किंवा पुरोगामी म्हणवून घेण्यात धन्यता वाटते आणि त्यासाठी तारतम्याशी त्यांनी कायमची फारकत घेतलेली असते, अशा वर्तुळातले ते नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मात्र प्रा. शेषराव मोरे यांच्याविषयी त्यांनी लिहिलेल्या लेखातून काहीही ठोस मिळत नाही. उलट काही प्रश्न पडतात आणि ते अनुत्तरितच राहतात.

स्वत:ला पुरोगामी किंवा समाजवादी म्हणवून घेणाऱ्यांकडून प्रा. मोरे यांच्या वक्तव्यांची सकारात्मक दखल घेतली जाईल, अशी अपेक्षाही नाही. पण मोरे यांनी केलेल्या विधानांचे त्यांच्याच पद्धतीने खंडण केले जाणे स्वत:ला पुरोगामी आणि बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्यांकडून अपेक्षित आहे. कोणत्याही विचारांना बांधून न घेतलेला आणि सर्व विचारधारांचे परिस्थितीसापेक्ष विश्लेषण करू पाहणारा वाचकही मोठ्या संख्येने तयार झाला आहे. त्याच्या विवेकी बुद्धिप्रामाण्यवादाला पोषक असे वैचारिक खाद्य त्याला हवे आहे. प्रा. मोरे यांनी काही स्पष्ट आणि वादग्रस्त ठरू शकतील, अशी विधाने भाषणातून केली; तेव्हापासून अशा विवेकी वाचकांची भूक वाढली आहे. ती भूक भागवली जाईल, ही अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता विनोद शिरसाठ यांचा लेख वाचल्यानंतर मात्र दिसत नाही. शिरसाठ यांनीच नमूद केल्याप्रमाणे, पुरोगाम्यांनी प्रा. शेषराव मोरे यांना बहिष्कृतच केले असेल (परिघाबाहेर ठेवले असेल) तर ती अपेक्षा पूर्ण तरी कशी होणार? ‘पुरोगामी वर्तुळाच्या परिघावर जे दिसले त्याचे नोंदवलेले निरीक्षण’ असे आपल्याच लेखाचे वर्णन करून विनोद शिरसाठ यांनी स्वत:ची या संपूर्ण लेखातील मुद्द्यांपासून सुटका करून घेतली आहे. तरीही प्रा. मोरे यांच्या विधानांतील फोलपणा पटवून देणारे निरीक्षण नोंदवण्याऐवजी त्यांनी यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्यात आपली लेखणी अधिक खर्ची पाडावी, याचे आश्चर्य वाटते. डॉ. मोरे यांच्या लिखाणाची कोणताही पुरोगामी गट दखल घेत नाही, त्यांना व्याख्यानांना बोलवत नाही आणि त्यांचे लेखन वाचतही नाही(!), असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्याचे कारण डॉ. शेषराव मोरे यांच्या लेखनात दिलेले संदर्भ चुकीचे असतात, खोटे असतात, त्यांनी हाताळलेले विषय आणि मुद्दे तथ्यहीन असतात म्हणून असे होते की, कथित पुरोगाम्यांना डॉ. मोरे यांनी हाताळलेल्या विषयात टीका करायला काही सापडत नाही, त्यांचे मुद्दे खोडून काढता येत नाहीत आणि समर्थन करणेही त्यांच्या प्रतिमेला पटत नाही म्हणून असे होते? याचे उत्तर वाचकांना मिळायला हवे. प्रा. मोरे यांनी वयाच्या विसाव्या वर्षी सावरकर वाचून काढला, म्हणून त्यांच्यात सावरकरांचा विचार भिनलेला असेल, असे पुरोगामी मंडळी गृहीत धरून चालत असतील (शिरसाठ यांच्या निरीक्षणानुसार) तर पुरोगाम्यांची ही अंधश्रद्धाच म्हणायला हवी आणि ती भंपक हिंदुत्ववाद्यांच्या अंधश्रद्धांइतकीच घातक आहे, हे मान्य करायला हवे. प्रा. शेषराव मोरे हे नरहर कुरुंदकरांचा वैचारिक प्रभाव स्वीकारतात, म्हणून तो नाकारण्यातही त्यांचे टीकाकार स्वत:ला का धन्य मानत आहेत, हेही कळत नाही. प्रा. मोरे फसवणूक करीत आहेत, हेच सिद्ध करायचे असेल तर त्यासाठी त्यांनी सावरकरांविषयी केलेल्या विधानांतील फसवणूक सिद्ध करायला हवी. कारण सध्याचा संदर्भ तोच आहे. सावरकरांना गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असेल आणि म्हणून प्रा. मोरे सावरकरांना पुन्हा गांधी हत्येचे सूत्रधार म्हणवणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची भाषा करीत असतील, तर पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांना ते का मान्य होत नाही, याचेही कायदेशीर, संयुक्तिक आणि पटणारे उत्तर अजून कोणी दिल्याचे वाचनात नाही. ते उत्तर शिरसाठ यांच्या लेखातून मिळणे अपेक्षित होते. न्यायालयाने दिलेला निकाल कसा अन्याय्य होता, हे सिद्ध करण्यासाठी हे पुरोगामी का आपली लेखणी झिजवत नाहीत, असाही प्रश्न पडतो. या कथित पुरोगाम्यांना या देशातली न्यायव्यवस्थाच मान्य नाही, असा निष्कर्ष त्यातून काढला जाऊ शकतो. एखाद्या धर्मातील मूलतत्त्ववादाच्या विरोधात असणाऱ्यांनाच पुरोगामी म्हटले जात असेल तर (शिरसाठ यांनीच सांगितलेली व्याख्या) ते तत्त्व सावरकरांना का लावले जात नाही? असाही प्रश्न पडतो. पुरोगामीत्वाची तीच व्याख्या असेल तर सावरकर हेदेखील पुरोगामीच ठरायला हवे. पण शिरसाठ म्हणतात त्यानुसार सावरकर हे केंद्र मानून ज्याचा अभ्यास आकाराला येतो, त्याला पुरोगामी वर्तुळातील लोक आपल्यातला मानत नाहीत. असे का, याचे उत्तर देण्याचेही शिरसाठ यांनी ते चांगले संपादक असूनही टाळावे, याचे आश्चर्य वाटते. हिंदुत्ववाद्यांवर टीका करणे म्हणजे पुरोगामी असणे, ही प्रा. शेषराव मोरे यांनी केलेली व्याख्या असली तरी प्रा. मोरे यांच्यावर टीका करणे म्हणजे पुरोगामी असणे, अशीही एक धारणा समोर येऊ पाहते आहे, असे दिसते. टीका करणे चुकीचे नाही; पण ती टीका ज्या मुद्द्यामुळे केली जाते आहे, त्या मुद्द्याला बगल देऊनच ती केली जात असेल तर त्यातून काय साधले जाते कळत नाही. विवेकी वाचकांची भूक असल्या झापडबंद लेखनाने कशी भागणार?

deepakpatwe@gmail.com


----------------------------------------------------
----------------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *