१९ ऑक्टो, २०१५

एका चित्राचा इतिहास : अणि एक जिनियस चित्रकार

तुम्हाला जुने नोकिया फोन आठवतात का ? त्यात कन्नेक्टिंग  पिपल म्हणून सुरवातीला हाताला हात लागत असे . त्याला काही संदर्भ बायबलचा आहे . मायकेल एंजोलोचे अजरामर चित्र त्याच्याशी मिळते जुळते आहे . त्याआधी आपल्याला ज्यू , ख्रिस्ती आणि इस्लाम या सेमेटिक धर्मातला परस्पर संबंध समजावून घ्यावा लागणार आहे .
ज्यू - ख्रिस्ती - इस्लाम  असा तो काल प्रवाह आहे  . पहिल्यातून दुसरा आणि दुसर्यातून तिसरा धर्म आला .
ख्रिस्ती लोकांचे बायबल जुना ज्यू करार मानते - पण देवाने केलेला नवा करार म्हणजे म्हणजे येशु मुखाने आलेली वाणी होय अशी त्यांची श्रद्धा आहे . इस्लाम मुहम्म्दाला शेवटचा प्रेषित मानतो .

 हे सगळे स्वत:च्या आधीच्या ईश्वर दत्त प्रेषीतांना मानतात . पण पुढच्या प्रेषीतांना मानत नाहीत . म्हणजे . ज्यू लोक्स येशूला भामटा मानतात म्हणून त्याला क्रुसावर चढवून ठार मारतात . पण हि श्रद्धा दोन्ही बाजूने आहे . इस्लामी लोक्स  येशुला मानतात . पण शेवटचा प्रेषित म्हणून मुहम्मदाचे नाव घेतात . या आधीचे प्रेषित मान्य पण जुने धर्म मान्य नाहीत अशी ती गोंधळि भूमिका आहे .  प्रेषित म्हणून अरबस्तानात उगवलेले इतर लोक्स मुहाम्म्दाने तोतये प्रेषित म्हणून जाहीर केले . आणि नंतर तोतये प्रेषित मारून टाकले .

 एडम मात्र या सगळ्यांचा सेमेटिक प्रथम पुरुष आणि मनु   आहे .

या खालच्या चित्रात  जो नागडा माणुस  दिसतो आहे . तो एडम होय .तो पहिला माणुस . या सेमेटिक धर्मांचा युग मनु .  ज्यू , ख्रिस्ती , इस्लाम आदी सेमेटिक धर्मानुसार देवाने पृथ्वी बनवली - माणुस बनवला - प्रकाश बनवला . एण्ड द ग्वाड सेड लाइट - एण्ड देअर वोस लाइट - हे वाक्य बायबलच्या पहिल्या पानावर येते . बायबल जुना करार आणि नवा करार अशा दोन भागात आहे . ओल्ड टेक्स्टामेंट - जुना करार म्हणजे ज्यू लोकांचा धर्म ग्रंथ होय .

हे चित्र मायकेल एंजेलो चे आहे . या बुद्धिमान आणि प्रतिभावान मायकेल एंजेलो चे  नाव लिओनार्डो दा विंची बरोबर घेतले जाते . गेल्या पाच शतकात युरोपात जे प्रबोधन झाले त्याचे हे दोन  आधार आहेत . व्होल्तेर इतकेच त्यांचे महात्म्य आहे .

 मायकेल एंजोलेचा ख्रिस्ती  केथालिक  पोप शी पहिल्यांदा संबंध १५०५ साली येतो . पोप त्याला स्वत:ची कबर बनवायची आज्ञा देतो .मेल्यानंतर पोप ला स्वत:ची एक सुंदर कबर असावी असे वाटते .  मायकेल ला भरपूर पैसे देऊन बोलावण्यात येते … पुढे  काहीतरी फाटते आणि मायकेल पळुन जातो . त्याला पैशावरून चोर म्ह्टले जाते . पण चर्च या प्रतिभावान कलाकारास टाळू शकत नाही … पुढे त्यास व्हेटिकन चर्च वर चित्रे काढण्याचे कोण्ट्र्याक्ट दिले जाते . मायकेल ऐकत नाही । त्यावर  प्रचंड राजकीय दबाव टाकला जातो ।

पंधराव्या शतकातले चर्च हा प्रकार निट समजून घेतला पाहीजे . हजारो स्त्रियांना जिवंत जाळून मारण्यासाठी यांनी विच हंट चे कार्यक्रम चालवले  आहेत . पोप ला लाच देऊन स्वर्ग मिळवता येतो . आणि त्यासाठी मरताना स्वत:च्या कबरीत पोप ने देवाला लिहिलेलि  चिट्ठी ठेवावी लागत असते . ह्या चिट्ठ्या रोमन केथोलिक चर्च विकत असे . हे चर्च आणि पोप लोक्स ….  मायकेल एंजेलो नावाच्या बुधिमंताला  फारसे आवडत नसतील तर तो दोष त्या काळच्या चर्चचा आहे . पण पुढे  या बुद्धिमान मूर्तीकाराला चर्चने मारून मुटकून चित्रकार बनवले आणि - व्हेटिकन च्या भिंती रंगवण्याचि सक्ती केली .हे चित्र मायकेल एंजोलोने काढलेले अजरामर चित्र आहे . त्यात नागडा एडम हा सेमेटिक युगमनु अर्ध मृतावस्थेत दिसतो . एडमचे पडिक जननेंद्रिय आणि त्याचा पडलेला हात त्याच्या मृतावस्थेची साक्ष आहेत . म्हातार्या बलवान दाढीवाल्या देवाने त्याच्या हाताला स्पर्श केला तर , तो जिवंत होणार आणि - भूतलावर जीव सृष्टीची निर्मिती होणार . मायकल एंजेलो  नावाच्या प्रज्ञावंताने उभा केलेला हा अर्धमृत एडम खरोखर पहाण्यासारखा आहे . हे चित्र मायकेल ने पवित्र व्हेटिकन मधील सर्वात महत्वाच्या सिस्टिन चेपेल मध्ये काढले आहे .

खरी गंमत यापुढेच आहे . ख्रिस्ती परंपरेत देवदुतांना पंख दाखवले जातात . मायकेल ने काढलेल्या चित्रात देवदुतांना पंख नाहीत . सारे देवदुत देवाला धरून लटकत आहेत . देव ज्या पोकळीतून बाहेर येतो आहे … ते  पोर्टल निट पहा . ते मानवी मेंदुचे क्रोस सेक्शन आहे . म्हणजे एडम  ला देवाने जिंदगी  दिलेलि  नसून . मानवी मेंदुतुन देवाची निर्मिती झाली असे मायकेल एंजेलो ला सुचवायचे आहे .

देवाने माणुस नाही बनवला - माणसाच्या मेंदुतुन देव जन्माला 


देव हि संकल्पना मानवी मेंदुतुन निर्माण झाली असे स्पष्ट  पणे सांगणारी हि कलाकृती …. केथोलिक ख्रिस्त्यांच्या सर्वात पवित्र चर्च -व्हेटिकान मधल्या - सर्वात महत्वाच्या सिस्टिन चेपेल मध्ये मायकेल एंजेलो ने चीत्तारून ठेवली आहे . सलाम त्याला !


या युगमनु  एडम ने पुढे कंटाळा आला म्हणून देवाला म्ह्टले इव्ह (स्त्री )  दे . मग देव म्हटला फुकट काय मिळत नाही . मग  एडम ने छातीतली एक बरगडी देवाला तोडुन दिली . देवाने त्यातून इव्ह नावाची स्त्री तयार केली … त्या दोघाना सैतान सापाने ज्ञान वृक्षाचे फळ खाण्याची चुगली केली … एडम आणि इव्ह ने ज्ञान वृक्षाचे फळ खाल्ले मग देव चिडला . त्याने चिडून शाप दिला . म्हणून मानवी जात मर्त्य आहे … अन्यथा माणुस अमर होता.

ज्ञान मिळवले हे पहिले पाप … तेच पाप पिढ्यान पिढ्या चालू आहे . हे जे ज्ञान फळ आहे त्याला बायबल मध्ये (सफ़रचंद ) एप्पल म्ह्टले गेले आहे . हे अर्धे खाल्लेले एप्पल पुढे स्टिव्ह जॉब्स ने आपल्या कोम्पुटर बनवणार्या  कंपनीचे बोधचिन्ह बनवले .  ज्ञानाचा प्रवाह अव्याहत चालू आहे . सर्व धर्माची धर्मसत्ता मेली . शिल्लक मरत जाणार आहे .  सनातनी  चर्चच्या छाताडावर प्रतिभावान मायकेल इंजेलो ने कोरलेले चित्रशिल्प आजही आपला ठसा शाबूत ठेउन  आहे .२ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *