१७ डिसें, २०१३

कॉन्सपिरसी थिअरि : होऊ दे खर्च !


कॉन्सपिरसी थिअरि : होऊ दे खर्च !


आपल्या आजूबाजूला भयंकर कट आणि कारस्थाने सुरु आहेत . आपल्याला उल्लू बनवले जात आहे .फसवले जात आहे. खरे वास्तव वेगळे आहे . आणि दाखवल जातय काहीतरी भलतच ! हे मिडियात येत नाही कारण मिडिया हाच एका महाभयंकर कटाचा भाग आहे

हि अतिशय लाडकी आणि झटक्यात लोकप्रिय ठरणारी थेअरी आहे . अमेरिकेतल्या टोप टेन कोन्स्पिरसी थेअरी खालच्या व्हिडियो लिंक मध्ये पहायला मिळतील . यात औषध कंपन्या पैसे कमावण्यासाठी आजारांचे विषाणू पसरवतात , लोकांचे मेंदु नष्ट - भ्रमिष्ट करून त्यांच्यावर राज्य करण्यासाठी सरकार पाण्यात फ़्लोराइड मिसळते , इल्युमिनाटि नावाचा धर्मगट जगावर राज्य करण्यासाठी - युद्धे , माइंड कंट्रोल रसायने वगैरे वापरत असतो. 








शिवाय पर्ल हार्बर अमेरिकन सरकारने मुद्दामच घडू दिले - अमेरिकन राश्ट्राध्यक्ष रूझवेल्ट ते रोखू शकला असता पण त्याला युद्धात उतरायचे होते । म्हणुन त्याने गुप्तचर यंत्रणेच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले , ९ -११ ची घटना अमेरिकन सरकारनेच घडवली कारण त्यांना मध्यपूर्वेतल्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध करायचे होते ! अमेरिकन स्वभावाल अनुसरून सर्व कोन्स्पिरसि थेअरी मांडल्या गेल्या आहेत - सर्वच्या सर्व पैशाशी नायतर पेट्रोल च्या भावाशी संबधित आहेत !!

अशीच एक गाजलेली थेअरी होती चंद्रावर माणुस उतरलाच नाही । आणि सामन्य माणसाला पटतील असे त्याचे खोटेच व्हिडिओ नासा ने तयार केले आहेत .त्याबाजुचे आणि विरुद्ध असे हजारो व्हिडियो आणि लेख इंटर्नेट वर प्रसिद्ध आहेत .

भारतातही अशा अनेक कोन्स्पिरसि थेअरी आहेत . 


१ ) नेहरू मुसलमान होता , इंदिरेचा नवरा फिरोझ मुसलमान होता , आणि राजीव आणि त्याच्या मुलांचा ख्रिस्ती बात्मिस्मा सोनियाने घडवला .

२) नथूरामने दंगल घडवण्यासाठी गांधिजिंना मारण्या आगोदर स्वत:ची सुंता केली होती .

३) मक्केत शिवलिंग आहे . ते चादरीखाली लपवले आहे .


हिंदु स्वभावानुसार या सार्या कोन्स्पिरसी थेअरी मुसलमानांशि निगडित आहेत . मुसलमान एडस पसरवतात (गर्दीत सुया टोचून) म्हणुन कर्नाटकात उडपी जिल्ह्यात एक दंगलहि झालेली आहे .


बाम्सेफी मंडळिंनि त्यांच्या स्वभावानुसार काही कोन्स्पिरसि थेअरी स्वीकारल्या आहेत … यात प्रामुख्याने शेटजी - भटजिंचे एक गुप्त मंडळ सतत भारताचा इतिहास , भूगोल , नागरिकशास्त्र इत्यादी बदलत असते . आंबेडकरांचा मतदार संघ पाकिस्तानात जावा म्हणुन गांधीने फाळणी केली. अशा प्रकारच्या थेअरी प्रसूत केल्या आहेत .


या कटकारस्थानाच्या थेअर्यांवर अनेकांचा मनापासून विश्वासही असतो .
आणि हे जगात सर्वत्र चालते .




त्याची कारणे :


१) आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहून निष्कर्ष काढणे हि माणसाच्या मेंदूची पद्धत आहे .

२) पण त्याच वेळी काही महत्वाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे आपण उत्क्रांतीत शिकलो आहोत . आपल्या आजू बाजूला रेडिओचा आवाज चालू आहे , कावळा ओरडतो आहे , कुत्रा भुंकतो आहे … पण रस्ता क्रोस करताना आपल्याला फक्त ट्रकचा हॉर्नच ऐकू येतो । . बाकी काही नाही .। बिन महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे वरदान मानवी उत्क्रांतीत आपण निसर्गाकडून शिकलो आहोत . जगण्यासाठी ते आवश्यकही आहे .

३) महत्वाचे काय ? आणि बिन महत्वाचे काय ? हे आपण - संस्कार , वाचन , नातेवाइक - मित्र यांकडून मिळणारी माहिती यावरून ठरवतो.

४) मग महत्वाच्या तेव्हढ्याच गोष्टी लक्षात ठेवतो (तथाकथित बिन महत्वाच्या विसरून जातो ).

५) मग आपल्या संस्कारानुसार महत्वाच्या वाटणार्या गोष्टींची एक तर्क संगति आपला मेंदु आपोआप लावतो - आणि त्यातून आपला स्वभाव म्हणा किंवा अनेकांचे सारखे स्वभाव एकत्र येउन जन्माला येणार्या विचारधारा (इझम ) म्हणा - जन्माला येतात आणि वाढतात .

६) पण आपण अनेक तथाकथित बिन महत्वाच्या गोष्टी विसरून गेलेलो असतो . त्यामुळे आपल्या स्वभावाला किंवा विचारधारेला (इझम) ला न मानवणार्या गोष्टी आपल्याला दिसतच असतात .

उदाहरणार्थ अमेरिका हा महाचोर भांडव्लदरांचा देश आहे हे लाडके डावे गृहीतक आहे . मग रशिया सारख्या महान देशा आधी ते कसे काय चंद्रावर पोचतील ? पण त्यांचे चंद्रावर्चे फ़ोटो तर दिसतायत खरे !

७) यावेळी आली हुक्की मारली बुक्की च्या आवेशात एखाद्या कोन्स्पिरसि थेअरी चा जन्म होतो . नासा ने खोटेच व्हिडियो बनवले ! - नवे सत्य स्विकारण्यापेक्षा - कोन्स्पिरसि थेअरी वर विश्वास ठेवणे मानवी मेंदुला अधिक सोपे असते .

८) हे पूर्णत: नैसर्गिक आहे … प्राणि नुसतेच आकलन करत बसला तर मारूनच जाइल त्याला काही निश्कर्ष काढावेच लागतात आणि त्यावर विश्वास ठेवून निर्णय करावे लागतात . 

या उत्क्रांतीच्या देणगितच या थिअर्यांचे मर्म आहे .







५ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. ९० टक्के वेळा कोन्स्पिरसी ( खोट्याचा सतत प्रचार आणि प्रसार ) करून दिशाभूल केली जाते
    .
    .खुपदा चुकीचे शब्द वापरून घटना सांगितली की त्यातून मुद्दाम अनर्थ ध्वनित केला जातो
    .
    पण काहीवेळा ओल्याबरोबर सुके जळते तसे ...
    काही घटना " कोन्स्पिरसि असणार" या सबबी खाली, १०० % सत्य असल्या तरी, नाकारल्या जातात ..

    २) नथूरामने स्वत:ची सुंता केली होती.
    ( ती प्रोसीजर करणारे मान्यताप्राप्त डॉक्टर होते, म्हणून त्यास ऑपरेशन म्हणावे...
    मान्यताप्राप्त डॉक्टर नी केला असल्याने, यासाठी करण्यासाठी कदाचित वैद्यकीय कारण असू शकेल पण
    त्यांनी सुंता हा कदाचित धार्मिक मानला जाणारा विधी केला होता हे समजण्याचे कारण नाही ...
    थोडक्यात त्या क्रियेसाठी वापरलेला 'सुंता' हा शब्दप्रयोग चुकीचा
    तसेच त्याने नाव-आडनाव किंवा सुंता पेक्षा सहज दिसणारे 'जानवे' त्यागले नव्हते ...
    म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा हेतू त्या प्रोसिजर किंवा विधीत नक्कीच नव्हता )

    घटना १०० % सत्य आहे.... शब्द बदलले तर अर्थ बदलतात त्यामुळे त्या घटना असत्य वाटण्याची शक्यता आहे
    अन्यथा ...nothing arguable / disputable

    उत्तर द्याहटवा
  3. निधर्मीवाद्यांची लाडकी थिअरी:संघ हा ब्राह्मण धार्जिणा आहे , षड्यंत्र करत असतो वगैरे. जगात सगळ्यात टाकावू काय. असेल तर हिंदु धर्म इत्यादी याचाही उल्लेख राहून गेला.

    उत्तर द्याहटवा
  4. खुप छान पण भितीदायक माहिती दिली आहे.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *