१६ डिसें, २०१३

जमाते इस्लामीचा भाईचारा

 जमाते इस्लामीचा भाईचारा 


जमाते इस्लामी हिंद ने - अब्दुल कादिर मौला यांच्या फाशीचा निषेध केलेला आहे. अब्दुल कादिर मौला हे बांग्लादेश जमाते इस्लामीचे नेते . त्यांच्यावर खून , आणि स्त्रिया आणि मुले यांसकट सामुहिक कत्तलिंचे आरोप सिद्ध झालेले आहेत . मिरपुरचा खाटिक या नावाने ते कुप्रसिद्ध होते . त्यावर सिद्ध झालेले आरोप १) एका कवीचा स्वहस्ते शिरछेद . २) ११ वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार . ३) ३४४ जणांच्या गोळ्या घालून केलेल्या सामुहिक हत्याकांडात सहभाग .  .भारतातली जमाते इस्लामी या बांगलादेशी मौलानाच्या समर्थनार्थ उतरली आहे .





बांग्लादेशात ... तसे खून करणे योग्यच आहे म्हणत  समर्थकांनी  फाशीचा निषेध म्हणुन अल्पसंख्य हिंदुंचि घरे पेटवली आहेत .  गंम्मत म्हणजे भारतातल्या जमाते इस्लामी ने सुद्धा त्यांच्या फाशीचा निषेध केला आहे . त्यांना शहीद म्हटले आहे. आणि "" देश "" एकत्र ठेवण्यासाठी अब्दुल कादिरचे कृत्य योग्यच होते अशीही पुस्ती जोडली आहे . हा देश म्हणजे कोणता देश ? एकत्र म्हणजे काय ? आणि जमाते इस्लामीचा भाईचारा म्हणजे काय ?  हे सविस्तरपणे माहित करून घेणे आवश्यक ठरले आहे .



http://jamaateislamihind.org/eng/jih-chief-strongly-condemns-execution-of-bangladesh-jamat-islami-leader/



जमात चा इतिहास 


मौलाना मौदुदि  हे जमाते इस्लामी चे जन्मदाते . मौदुदि चा  जन्म महाराष्ट्रातला . १९४१ साली त्यांनी जमाते इस्लामीची स्थापना केली . जमाते इस्लामीचा मुस्लिम लीग ला विरोध होता . मुस्लिम बहुल पाकिस्तान बनवण्यात जमाते इस्लामीला स्वारस्य नव्हते. त्यांना अखंड भारतात कुराण , हदीस आणि शरिया कायद्यानुसार चालणारी इस्लामी धर्माची राजवट आणायची होति. मौदुदिंच्या दुर्दैवाने देशाची फाळणी झाली . अखंड भारतात अल्ल्लहचा दिन (इस्लाम ) नुसार चालणारी राजवट आणण्याचे स्वप्न भंगले.   मग मौदुदि त्यातल्या त्यात इस्लामी असलेल्या पाकिस्तानात गेले .





पाकिस्तानात दाखल होताच त्यांनी अहमदिया विरुद्ध प्रचार सुरु केला . अहमदिया हा मुस्लीमातला एक अल्प्संख्य गट आहे . त्यांवर मैत्रेय बुद्ध , क्रुश्णादि अवतार यांचा प्रभाव आहे.  नव्या युगात जिहाद बा सैफ (तलवारीचा रक्तरंजित  जिहाद ) लागू पडत नाही असे अह्मदियांचे धार्मिक मत आहे . मौलाना मौदुदिंनि  अहमदिया हे मुस्लिम नसून  " काफर"  आहेत असा विचार मांडला .  विशुद्ध इस्लामी राजसत्ता स्थापना करण्यासाठीच मौदुदि पाकिस्तानात गेले होते . अहमदिया मुस्लिमांविरुद्ध प्रचार हे त्याकडेच टाकलेले एक पाउल होते. . त्याची परिणती १९५३ सालच्या अहमदिया विरोधी दंगलीत झाली . कत्लेआम घडले -  आणि पाकीतानात त्या ठिकाणी मार्शल लो पुकारला गेला .  आजही त्यांची जमाते इस्लामी हि संघटना पाकिस्तानातील प्रमुख राजकीय मूलतत्व वादि पक्ष आहे.


तर फाळणी झाल्यावर जमाते इस्लामीचे जन्मदाते पाकिस्तानात गेले आणि तिथल्या अहमदिया मुस्लिम सारख्या काफ़िरांचा पाडाव करू लागले . फाळणी झाल्याने भारतात उरलेल्या जमातचे  काय होणार ? देशाचे दोन तुकडे झाल्याने जमाते इस्लामी चे दोन तुकडे होणे अपरिहार्य होते.    पण प्रत्यक्षात  जमाते इस्लामीचे तीन तुकडे झाले - एक जमाते इस्लामी हिंद ,दुसरा जमाते इस्लामी  पाकिस्तान आणि तिसरा म्हणजे काश्मीर .  काश्मीर मधलि जमाते इस्लामी ही भारत विरोधी संघटना आहे .  

अशाप्रकारे वेगवेगळ्या भू राजकीय परिस्थितीशी जमात ने जुळवून घेतले ! आणि मुळात एकाच असणारी संघटना तीन वेगवेगळ्या नावांनी काम करू लागली … लवकरच या संघटनेला आणखी एक चौथी उपशाखा काढावी लागणार होती.


बांग्लादेश युद्ध 


इंदिरा गांधिंनि पाकिस्तानशी युद्ध करून त्याचे दोन तुकडे केले . लाखभर पाकि सैन्य डोक्यावर हात ठेवून शरण आले .  याच पाकि सैन्या बरोबर अब्दुल कादिर मौला काम करीत होता .  हे पाकि सैन्य जे अनन्वित अत्याचार स्थानिक बांगलादेशी वर करत होते त्यात अब्दुल कादिर सामील होता .  या युद्धाच्या दरम्यान हजारो  हिंदु, मुस्लिम विचारवंतांचि  कत्तल करण्यात आली . यात डोक्टर , संगितकार , विचारवंत , कवी , तत्वज्ञ यांचा समावेश होता . पाकि सैन्याकडून हि कत्तल झाली त्यात जमाते इस्लामीचे लोक सामील होते . त्यांनि मुख्यत: माहिती पुरवण्याचे काम केले .  कादिर मौला वर एका कवीचे मुंडके स्वहस्ते उडवल्याचा आरोप   सिद्ध झाला आहे. ह्या कत्तल झालेल्या विचारवंतांचे स्मारक आजही बांग्लादेशची राजधानी ढाका येथे आहे .





हे विचारवंत स्वतंत्र बांग्लादेश मागत होते हा त्यांचा गुन्हा होता . कादिर मौला ला पाकिस्तान नावाचा देश एक ठेवायचा होता . त्याचे हे ""देश "" एकत्र ठेवण्याचे प्रयत्न भारतातल्या जमाते ते इस्लामीने वाखाणले आहेत .

मुळात हे बांगलादेशी विचारवंत पाकिस्तान पासून फुटून वेगळा देश का मागत होते ? हेच मुळी  जमाते इस्लामिला समजलेले नव्हते . आजही समजलेले  नाही.  १९७१ पूर्वीच्या अखंड पाकिस्तानात (पाक + बांग्लादेश ) बंगाली भाषिक संख्येने बहुसंख्य होते .  पण देशाची अधिकृत भाषा उर्दू होती . मुठभर पंजाबी मुस्लिमांची दादागिरी सर्वत्र चालू होती . बंगाली अस्मिता इस्लामी भाइचार्याहुन अधिक टोकदार बनली आणि बांग्लादेशाचा जन्म झाला . धर्माच्या आधारावरची राष्ट्रे ठिसुळ तर असतातच पण प्रतिगामी विचारधारा फक्त खड्ड्यात च घेऊन जात असते .


जमाते इस्लामी हिंद 


तर जमाते इस्लामी हिंद या जमाते इस्लामीच्या भारतीय तुकड्याने आपला भाईचारा प्रकट केला आहे . हा भाईचारा बांगलादेशी मुस्लिमांसाठी नाही . बांग्लादेश चा गद्दार जमाती नेता कादिर मौला यासाठी आहे . त्याने पाकिस्तान एक ठेवण्यासाठी केलेले प्रयत्नहि  वाखाणले आहेत . हि सर्व कृत्ये जमातच्या इतिहासाशी सुसंगत अशीच आहेत . अहमदिया असो कि बंगाली भाषिक ,लहान - लहान मायनोरिटि चिरडत पेन इस्लामचे स्वप्न पहाणे हा जमात ए इस्लामीचा मुळ स्वभाव आणि धोरण आहे .  जमाते इस्लामीचा अभ्यास करताना - त्यांच्या परिभाषा समजून घ्याव्या लागतील . अल्प्संख्य , अन्याय , न्याय , देश , जिनोसाइड या बाबतच्या त्यांच्या इस्लामी संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे . आणि कोणत्या परिप्रेक्षातुन त्या बदलतात हे हि लक्षात ठेवले पाहिजे .

२ टिप्पण्या:

  1. i lov Bharat , Pak , Bangladesh nd Eran , Irak Afgan , Quba , Venezuala nd all country of wrds.............

    उत्तर द्याहटवा
  2. फुटीरतावाद्यांनी दिली अखंडतावादींना
    शिक्षा
    हुतात्मा मौलाना अब्दुल कादीर मुल्ला यांना दिलेल्या फाशीचा जमाअत-ए-इस्लामी हिंदकडून तीव्र निषेध
    नवी दिल्ली-
    सिव्हिल सोसायटीने केलेल्या निदर्शंनांना डावलून बांग्लादेश सरकारने गेल्या १२ डिसेंबरच्या रात्री बांग्लादेश जमाअत-ए-इस्लामीचे उपमहासचिव मौलाना अब्दुल ़कादिर मुल्ला यांना फाशी देऊन त्यांना शहिद केले. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना जलालुद्दीन उमरी यांनी बांग्लादेश सरकारच्या या कृतिचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.
    मौलाना अब्दुल कादिर मुल्ला यांनी सत्तरच्या दशकात पूर्व पाकिस्तान (आजचा बांग्लादेश)मध्ये स्वतंत्र बांग्लादेशच्या मागणीविरूद्ध देशाच्या अखंडतेसाठी जनतेत शांततेच्या मार्गाने संपर्वâ मोहिम चालवली होती. परंतु भारताच्या तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्देशावरून सशस्त्र ‘बांग्ला वाहिनी’च्या मदतीने शेख मुजिबुर्रहेमानसारख्या पुâटिरतावाद्यांनी स्वत:च्या देशाचे तुकडे करून १९७१ मध्ये बांग्लादेश बनवला होता. देशाच्या अखंडतेसाठी राबविण्यात आलेल्या चळवळीचे अध्यअन करण्याकरिता बांग्लादेशच्या तात्कालीन राष्ट्रप्रमुखांनी एक आयोग नेमला होता. या आयोगाने दिलेल्या अहवालात या चळवळीत फारसा हिंसाचार झाला नसल्याचे उघडकीस आल्यामुळे सर्व अखंडतावादी नेत्यांना व कार्यकत्र्यांना सार्वजनिक माफी देऊन मूक्त करण्यात आले होते. या घटनेला जवळपास चार दशके उलटल्यानंतर बांग्लादेश जमाअत-ए-इस्लामीचा प्रभाव त्या देशात वाढत असल्याचे पाहून आता बांग्लादेश सरकार जुने खटले उकरून न केलेल्या गुन्ह्यांचे निमित्त करून राजकीय सूड उगवत आहे. निर्दोष हुतात्मा मौलाना अब्दुल ़कादिर यांना दिलेली फाशी हा राजकीय सूडच आहे.
    प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या वक्तव्यात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना उमरींनी सांगितले की, ‘‘देशाची अखंडता अबाधित राखण्याकरिता प्रयत्न करणे, हा गुन्हा ठरू शकत नाही. मौलाना अब्दुल ़कादिर यांनी केलेल्या प्रयत्नांचे गुन्हेगारीकरण करून त्यांंंना व बांग्लादेश जमाअत-ए-इस्लामीच्या तसेच इतर पक्षांच्या नेत्यांना जन्मठेप विंâवा मृत्युदंड देणे हा अत्यंत व्रूâर असा अत्याचार आहे, त्याचे उदात्तीकरण केलेच जाऊ शकत नाही.’’
    मौलाना उमरी म्हणाले की, ‘‘शेख मुजिब यांच्या काळात या नेत्यांपैकी कुणावरही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नव्हते. बांग्लादेश वेगळा झाल्यानंतरही बांग्लादेश जमाअत-ए-इस्लामी (बी.जे.आय.) हा देशातील एक सन्मानप्राप्त राजकीय पक्ष आहे आणि त्या देशात या पक्षाने सत्ताधारी व विरोधी पक्ष म्हणूनही एक सकारात्मक भुमिका पार पाडली आहे. एक सत्ताधारी राजकीय पक्ष हा न्यायासाठी आवश्यक बाबी लक्षात न घेता आपल्या विरोधकांवर घाणेरडे आरोप करण्याची पातळी गाठतो, याची या लोकशाहीच्या युगात कल्पना करणेही शक्य नाही.’’ भविष्यात अशाप्रकारची कृती करू नये, असे बांग्लादेश सरकारला त्यांनी आवाहन केले आणि अन्याय, अत्याचाराविरूद्ध आवाज बुलंद करण्याचे त्यांनी भारत सरकार, इतर देशांची सरकारे व जनतेला आवाहन केले.
    जमाअतचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना उमरींनी अब्दुल ़कादिर मुल्ला हे शहिद (हुतात्मे) झाल्याची प्रतिक्रीया व्यक्त करत त्यांच्या ़कुटूंबीयांप्रति आणि त्यांच्या संघटनेतील सहकाNर्यांंप्रति सहानुभूती व्यक्त केली. त्यांनी दुवा केली की, ‘‘अल्लाह त्यांना स्वर्गात उच्च स्थान देवो आणि त्यांच्या कुटूंबियांना तसेच सत्याच्या वाटेवर चालणाNया सर्वांनाच दृढता बहाल करो!’’ (आमीन!) by Naushad Usman, mubai (member: Jamaat-e-islami hind)

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *