२० एप्रि, २०१५

हिटलरचा भारत द्वेष !

हिटलरचा भारत द्वेष !

हिटलरचे माइन काम्फ हे आत्मचरित्र भारतात तुफान विकले जाते. जर्मनीत त्यावर बंदि आहे. महाराष्ट्राचे हिटलर प्रेम जरा ओसांडुनच वाहते. त्याचे मराठी चरित्र हे बेस्ट सेलर पुस्तक आहे.   आर्यधर्मोध्दारक सदा सन्माननिय महापुरुष हिटलर यांच्या 126 व्या जयंती निमित्त सादर नमन !!!!! अशा अर्थाच्या पोस्ट हिटलरच्या जयंती निमित्त सोशल मिडियावर फिरत होत्या .

१९३० साली हिटलर म्हणतो ' भारताच्यास्वातंत्र्य  लढ्याचे कौतुक मला नाहि. भारतीय वंश हीन दर्जाचा आहे. इंग्रज शुद्ध नॉर्डिक  वंशीय आहेत . आणि नीच जातीच्या स्वातंत्र्य वादि भारतीयांना इंग्लंडने हवे तसे हाताळावे.  पहिल्यांदा  त्या गांधीला गोळी घाला , नाही भागल इतर महत्वाच्या डझनभर स्वातंत्र्य  सैनिकाना मारा, डझनाने काम झाल नाही, तर दोनशे लोकांना मारा, आणि आवश्यक वाटल्यास अजूनही …. (संदर्भ १)

सुभाषबाबना त्याने कैक दिवस भेटच दिली नाही . महत्प्रयासाने जेंव्हा तो भेटला तेंव्हा " भारताला रशिया जिंकेल म्हणून रशियाशी युद्ध केले पाहिजे इंग्लंडशि नाही वगैरे असंबद्ध बडबड त्याने सुरु केली …सुभाषबाबू लिहितात - या माणसाशी गंभिर राजकीय चर्चा करणेच अवघड आहे !



हिटलर हा एक मूर्ख आणि आक्रस्ताळी मनुष्य होता . तत्कालीन अध:पतित युरोपीय संस्क्रुतित  तो जर्मनीत लोक प्रिय ठरला यात काही नवल नाही . हिटलर चा सर्व विचार हा वंश श्रेष्ठत्व - वंशवाद  याभोवती फिरत राहतो. आज विज्ञानाने ते सर्व फोल ठरवले आहे . पण हिटलर हा देशभक्त हुकुमशहा होता - आणि अशाच एका नेत्याची भारताला गरज आहे - अशी एक भारतीय अंधश्रद्धा अजूनही आहे. आजच्या प्रगत जर्मनीत मात्र हिटलर देशद्रोही - देशबबुडव्या समजला जातो. हिटलरच्या  आणि नाझीवादाच्या विरुद्ध जर्मन शालेय अभ्यासक्रमात धडे असतात.
 
भारतीय लोक युरोपियनांच्या तुलनेत बरेच काळे असतात . त्यामुळे ते हीन दर्जाचे रक्त भेसळ झालेले टाकाऊ वंश आहेत असे हिटलर मानत असे. हिटलर लिहितो - " हे काळे लोक म्हणजे जन्मजात अर्धवानर - त्यांच्यावर विशेष मेहनत - खर्च  करून त्याला  वकील बनवणे हा विनोदी प्रकार आहे.  (Mein Kampf p. 391).

केवळ वंश नाही तर हिंदु संस्कृती हि देखील एक खालच्या दर्जाची गोष्ट आहे असे हिटलर मानत असे . २२ ओगस्ट १९४२ रोजी हिटलर लिहितो " काशीला हिंदु प्रेते जाळून पाण्यात टाकतात - तेच पाणी पितात. असल्या घाणेरड्या लोकांविरुद्ध स्वच्छतेचे  क्रुसेड (ख्रिस्ती धर्मयुद्ध )  लढले पाहिजे. ब्रिटिश लोक सतिबंदिभोवति खेळत बसले आहेत . हिंदुना अतिशय जबरी शिक्षा (rigorous  penalties) दिल्या पाहिजेत. आपण त्यांच्यावर राज्य करत नाही हे त्यांचे नशीब  आहे. मी भारताचा सम्राट असतो असतो तर हींदुचे आयुष्य वेदनामय करून टाकले असते .    (We should make  their lives a misery!) - ( संदर्भ २)





हिटलर ने त्याच्या माइन काम्फ या आत्मचरित्रात भारतीय लोकांचा उल्लेख - हलक्या नसलेचे कुत्रे असा केला आहे . हीन वंशाच्या लोकांना गेस चेंबर मध्ये ठार मारले पाहिजे असे नाझिंचे स्पष्ट मत होते -आहे - राहील  . बाकी भारतीयांच्या  अडाणी आर्य बंधु प्रेमाबद्दल काय लिहावे ?



 संदर्भ १) Appeasement and World War II. David Faber (2009). Munich, 1938:Simon and Schuster. p. 40.
संदर्भ २) Hitler's Table Talk - १९४१ ४४ : २२ ओगस्ट १९४२

१० टिप्पण्या:

  1. An eye opner. Now read the above information in the context of Subahshbabu 's view towords Germany!

    उत्तर द्याहटवा
  2. RSS che commander mhanun tar hitler la mantat karan te swatala suddha raktiy ani arya mhanajech germani che ahot ase mantat ani amachyavar shashan karu pahtaat.

    उत्तर द्याहटवा
  3. Hitler che bharata baddal vichar ani Hitler che kartutva he don vegale vishay aahe..... tyala aapan avdat navto mhanun tyache gun avdun hot nahit ani vice-versa....

    उत्तर द्याहटवा
  4. अभिराम, शैलेंद्र वैद्य या फेसबुक मित्राने माइन काम्फची लिंक पाठवली आहे. त्यात असा काही उल्लेख नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ही ती लिंक
    https://archive.org/stream/meinkampf035176mbp/meinkampf035176mbp_djvu.txt

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Mukesh sir I will write in detail in 2 days as traveling now. E edition is different than print and page no do not match in 2 different editions. I will write with more precise referances ... photos from book etc.

      हटवा
  5. this is great. an eye opener. but if we consider all this true then how do we look towards Netaji Bose freedom fighting and his military plans? if successful what is your thought would have happened here ?

    उत्तर द्याहटवा
  6. also please publish some details about NAZI symbol. most people gets confused it with swastik. why he choose that symbol. does it got some meaning in German? is it somehow co-related to Sanskrit?

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *