३० जाने, २०१३

गांधीहत्या आणि मी


 
 गांधीहत्या आणि मी 

 माझा प्रवास :  नथुराम भक्ती ते गांधी समर्थक  
मला समजलेले गांधीजी   (भाग - १ )

विद्यार्थिदशेत मी मुंबई ला राहायचा . बांद्रे . मातोश्री पासुन पाच मिनिटावर . हिंदुत्वान भारलेलं वातावरण होत . रुद्राक्षाच्या माळा . गंध . शाल . खणखणाट. शिवसेनेच्या शाखेवर कोलनितलि पोरं पडिक असत. कैरम खेळताना तिथं चाललेल्या देशभक्तीच्या चर्चा कानावर पडत असत. त्यात गांधिजिंचा उल्लेख टकल्या असाच हमखास होत असे. त्यानं देशाची वाट लावली असं ठाम मत सोंगट्या उडवताना व्यक्त केल जाई . आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला होता. त्यांची बकरी , पंचा, मुसलमानांच लांगुलचालन हे सारे आमच्यासाठी विनोदाचे  विषय होते. गांधिंनि सगळ्या हिंदुना बकरी बनवायचा ध्यास घेतला होता . मुसलमानांच्या बकरी  ईद ची सोय करायला ... किवा ... हो गांधीजी हे राष्ट्र पिता आहेतच कारण -  त्यांनी देशाची आई    XXली...... . किंवा याहून घाणेरड्या विनोदांना आम्ही धो धो हसून दाद देत असू.  पुढे कुठल्यातरी पुस्तक प्रदर्शनात गोपाळ गोडसे यांच   पुस्तक हाती लागलं . पुस्तकाच्या कव्हरवर आगीच्या ज्वाळा होत्या . विकत घेऊन वाचल. त्या पुस्तकांनी त्यावेळी मनात आग पेटली होती  . देशाची फाळणी करणाऱ्या आणि दुश्मन पाकड्यांसाठि पंच्चावन्न कोटीचे दान देणार्या या अधमाला नथुराम गोडसे मारतो ते एक राष्ट्रीय काम होते असे मला वाटत असे. देशभक्ती हे पाप असेल तर मी पापी घोर भयंकर । मात्र पुण्य ते असेल जर मग नम्र माझा अधिकार तयावर !



अहिंसे  चे बाळकडु पाजून गांधीने देश षंढ बनवला.   हिंदुस्थान च्या नामर्द पणाचा हा बाप  आणि पाकिस्तानचा राष्ट्रपिता - त्याविषयी आदर वाटणं मला शक्यच न्हवतं . वाचनाच्या गोडितुन पुढे मला विज्ञानाविषयी प्रचंड आकर्षण आणि कुतूहल निर्माण झालं . प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो आणि मानवी बुद्धीला अधिक प्रयत्नाने आज ना उद्या तो उलगडू शकतोच असे मला वाटे. पूर्वी वरुणराजा पाउस पाडत असे. त्यानं तो पाडावा म्हणुन ऋषी यज्ञ करत असत . आता समुद्रातल्या वाफेचे ढग बनून नैऋत्य मोसमी वार्यांमुळे पाउस पडतो हे ठौक झालय. आपण कृत्रिम पाउसही पाडू लागलोय .

जगातली सर्व रहस्ये विज्ञान उलगडू शकते ... आज नाही तर उद्या  पण मानवी तर्कशास्त्राला  सारे उलगडेल .. अशी आमची विज्ञान निष्ठ  - बुद्धिवादी दृष्टी विकसित होत होती . त्यामुळे तर गांधी विषयीच्या तीरस्कारात भरच पडत गेली. अस्पृश्यता काढता म्हणुन भुकंप होतात असे म्हणणारे सनातनी आणि अस्पृश्यता पाळता म्हणुन भुकंप होतात असे म्हणणारे गांधी.... दोघेही सारखेच मूर्ख आहेत असे मला वाटे .  गांधिजिंचे अध्यात्म -  आत्मशुद्धीचे उपास, श्रद्धावानांचा सेनानी होण्याचा त्यांचा मनसुबा,  त्यांची विज्ञान   विरोधी भूमिका , हिंद स्वराज मध्ये त्यांनी रेल्वे पासून सर्व तंत्रद्न्यानाला केलेला विरोध  त्यांचे ब्रह्मचर्य आणि सत्याचे प्रयोग सार - सार बालिश खेडवळ आणि बावळटपणाच आहे असा मजबूत ग्रह मी करून घेतला होता. विज्ञान निष्ठ - बुद्धिवादी अशा समग्र सावरकर साहित्याचे वाचन केल्यावर  (थोड्याकाळासाठि का होईना) पण  सावरकर वाचले असते तर खुद्द मोहनदास करमचंद गांधीही -- गांधिवादाचे विरोधक बनले असते असे वाटे. 


पुढे वाचन वाढलं तसतसं देशासमोरचे अधिक प्रश्न नजरेस पडु लागले. डॉ आंबेडकरांच कीर लिखित चरित्र वाचल्यावर-  जातिव्यवस्था हा रोग संपविल्याशिवाय देशाच भल होणार नाही हे मनापासून पटल. तिथेही व्हिलन गांधीच होता. चातुर्वणाचा समर्थक गांधी हा सनातनी होता आणि म्हणुनच त्याचे विचार आपल्या देशाला जातिमुक्त होऊ देत नाहीत असेही वाटे.  पुढे सावरकर लिखित गांधी गोंधळ , अरुण सारथिंचे गांधिंवरिल टिकास्त्र आणि डॉ आंबेडकरांचे -  गांधी आणि कोंग्रेस ने अस्पृश्यांसाठी काय केले ?  हि पुस्तके माझ्या मनातला गांधी विरोध अधिकाधिक प्रबळ करत गेली . 
एक वेळ अशी आली कि वेगवेगळ्या पुस्तकातली उलट सुलट मते आणि तर्क  वाचण्या बरोबरच  ... माणसं वाचण अधिक आवश्यक आहे अस मला वाटु लागलं.  कारण मत बनत ते माणसाच्या अनुभवातून . माणसं वाचू लागलो तसे नवे गांधी कळत गेले ... 
आणि गांधिंच हे पुस्तकाबाह्य आकलन फार वेगळ होतं . 

हिंदुत्व वादी  आणि आंबेडकरवादी या दोघांचाही गांधी हा प्रमुख आणि  समान शत्रू आहे. तरीही या मुद्द्यापुराता का होईना पण या दोन प्रवाहांचा  संगम झाल्याचे आढळत नाही. ते का ? हा चिंतनिय प्रश्न आहे. आणि लेखमालेच्या उद्याच्या दुसर्या भागात त्याचा उहापोह आपण करू . 


या भागात नथुराम वाद्यांच्या युक्तिवादाचे खंडन करायचे आहे . 


नथूरामच्या नाटकाने आणि गोपाळ गोडसेंच्या पुस्तकाने असे भरपूर अज्ञान पसरले आहे.  सर्व सामन्य मराठि माणसात : मुख्य गोंधळ आहे तो वध - हत्या - खून या शब्दावरून .संस्कृतात किवा मराठीत कोणत्या अर्थाने हे शब्द वापरले जातात ? हिंदुराष्ट्र वादाच्या ध्येयाने पछाडलेल्या बहुसंख्य अतृत्प आत्म्यांना मात्र गांधी "वध " हा समर्थनीय आणि वधकर्ता पूजनीय वाटतो . ( कधी उघड पण निदान मनात तरी  कायम ! ) इथपासून गोंधळ सुरु होतो.

 संस्क्रुत डिक्शनरी -

 संस्क्रुत डिक्शनरी पाहिली तर वध  आणि हत्या यात फारसा फरक नाही हे चटकन लक्षात येईल . वध म्हणजे  वाइट व्यक्तीला ठार मारणे असा अर्थ तर बिलकुल नाही . संघाचे मुखपत्र  'पाञ्चजन्य'मध्येसुद्धा 'गोवधबंदी' असा शब्द वापरला गेलेला आढळला. गोवध  हा शब्द कसा रुढ झाला मग ? गाय हि आपल्या पूर्वजांच्या मते दुष्ट होती काय ?   

दोन व्यक्तींच्य समोरासमोरच्या द्वंद्वात होतो तो वध. आणि युद्धात सामुहिक होतात त्या हत्या . 

 साधरणत: असे वापरण्याचा प्रघात आहे. मी नथुराम बोलतोय नाटकाचे मराठीला योगदान काय ? असा प्रश्न कोणि विचारला तर वध  शब्दावरून घातलेला घोळ असे त्याचे उत्तर येईल. 




नाटकातला नथुराम म्हणतो :

 " आपण शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला असे म्हणतो - हत्या नाही  - म्हणुन मी पण गांधीचा वध केला असे म्हणावे" असे नाटकातल्या नथूरामचे म्हणणे आहे. कंसवध हा शब्द वापरला जातो ते दोन व्याक्तीतले द्वंद्व युद्ध  होते म्हणुन . चांगल्याचा वाइटावर विजय या अर्थाने नव्हे. हे नाटकातल्या नथुरामला कळलेले दिसत नाही . इथे त्या  नथुरामचे  संस्कृत भाषेविषयीचे अज्ञान दिसून येते. नाहीतर वध हा शब्द अनेकदा वाइट अर्थानेही वापरला जातो हे त्याच्या लक्षात आले असते. निदानपक्षि गोवध , अभिमन्यू वध, पितृवध, मातृवध, इत्यादी शब्द तरी "पंडित"  नथुरामला ठाउक नकोत  का?  

मुळ मुद्दा असा आहे कि इथे नाटकी नथुरामला स्वत: ला शिवरायांची आणि गाधिंना अफझलखानाची उपमा द्यायची आहे. नथूरामची उपमा चुकली आहे. कंसवध , जरासंधवध , अफझलखान वध  इत्यादी वधांच्य प्रसंगी समोरासमोरचे द्वंद्व युद्ध झाले होते . दोन्ही बाजू सशस्त्र होत्या . युद्धसज्ज होत्या . तूल्यबळ होत्या. एका शक्तिहीन निशस्त्र म्हातार्या  माणसावर गोळ्या झाडणे हे समोरासमोरचे  द्वंद्व आहे काय ? पुरुषार्थ आहे काय ? निदान नथुराम ने गांधिंना प्रतिकाराची संधि तरी दिली होती काय ?

गांधिंनि प्रतिकार केला नसता हि गोष्ट वेगळी .. पण जिथे द्वंद्व् झालेच नाही तिथे वध  होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . तो एक भ्याड खून होता. 

गांधिंना हरवण्याचा द्वंद्वात्मक मार्ग  होता . -  तो म्हणजे  लोकशाही मार्गाने कोंग्रेसला पराभूत करणे.  हि लोकशाही गांधीची कोंग्रेसच देऊ  पाहात होती. नथुरामला प्रतिकार करण्याची संधि गांधीच देत होते. पण नथुरामला आणि त्याच्या हिंदुमहासभेला गांधिंना निवडणुकीत हरवणे शक्य वाटत न्हवते. म्हणुन त्यांनी निवडणुकांच्या लढाइतुन पळ काढला . आणि खुनाचा शोर्ट कट स्वीकारला. 
राजकीय खून हे इतिहासात घडलेले आहेत. जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा खुनाचा पर्याय शिल्लक राहतो. मदनलाल धिंग्रा किंवा भगतसिंग यांनीही राजकीय वध केले होते . पण इंग्रजांशि लढण्यासाठी तेंव्हा लोकशाहीचे कोणतेहि मार्ग शिल्लक न्हवते. त्यामुळे  ते समर्थनीय वाटतात . गांधीजी तर पक्के लोकशाही वादि  होते. त्यांचा राजकारणात सामना करण्याऐवजी खून करणे हे भ्याड कृत्य आहे.  




मग नथुरामचा शोर्ट कट त्याच्या अनुयायांना का समर्थनीय वाटतो ? 

देशाची फाळणी हा हिंदुत्व वाद्यांच्या लेखी एका  महान  गुन्हा आहे. आणि मातृभूमीचे तुकडे  करणार्याला त्यांच्या लेखी एकच  शिक्षा आहे - वध ! ज्या दिवशी मी बाबासाहेब आंबेडकरांचे फ़ाळणिवरिल ( शास्त्रशुद्ध ) पुस्तक वाचले त्यावेळी माझ्या मुलभुत संकल्पनाच उलट्या पालट्या होऊन गेल्या . मी फाळणी हे एक वरदान आहे असे समजू लागलो . प्रा शेषराव मोरेंचे ताजे पुस्तक तर यासंदर्भात पुराव्यांची जंत्रिच देते . फाळणीला गांधिहत्येचे कारण म्हणून हिंदुत्व वादि नथुराम टाहो फोडतात . 

ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते. अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या वर  जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का?

हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे. 

खरे पाहता हिंदू समाजात आणी धर्मात तुलनेने राष्ट्रवादी गोष्टी कमी आहेत. हिंदूधर्माची मूलभूत शिकवण -   
  •  परधर्म सहिष्णुता विरुद्ध इस्लामी जिहाद 
  •  उम्मत( कुराणसिद्ध मुस्लिम बंधुभाव) विरुद्ध हिंदू ची  जातिव्यवस्था.
ही लढाईच विषम आहे. हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते.

फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली . अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले.

मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे  लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात.  कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे  का विसरतात ?"


फाळणीमुळे अखंड भारताच्या धोक्यापासून हिंदूंचे रक्षण झाले. हे वास्तव समजून घेतले पाहिजे. 


अखंड भारतातलि मुस्लिम लोकसंख्या 




५ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या फाळणीला जवाबदार कोण ? हा प्रश्न गेली गेली ६५ वर्षे हिंदुस्थानी विचारवंतांना छळतो आहे. हिंदुत्ववादी अखंड हिंदुस्थानचा जप करत यासाठी गांधींच्या अहिंसक स्वभावाला जवाबदार ठरवतात. तर सेक्यूलर विचारवंत फाळणीसाठी संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद आणी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाला दिलेली मान्यता या गोष्टी दोषपूर्ण मानतात. 
 सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल. 
माझ्यासमोरचा प्रश्न फाळणीला जवाबदार कोण असा नाहीच . फाळणीचे श्रेय कोणाला द्यायचे ? असा आहे !



 द्विराष्ट्रवादाची तुतारी : 


द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील.


सर सय्यदांपासुन चालत आलेली आणि पुढे मुस्लिम लीग , इक्बाल आणि राष्ट्रवादी मुस्लिमांनिहि अधोरेखीत केलेला  अखंड भारताची योजना थोड्याफार फरकाने  होती कि - 
मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. भारत स्वतंत्र झाला की लोकशाही आलीच.  संख्येच्या बळावर हिंदू ही राज्यकर्ती जमात बनेल. डोक्याचे वजन न मोजता डोक्यांची फक्त संख्या मोजणारी ( भुलक्कड ! ) लोकशाही सय्यद अहमदांना मान्य न्हवती. हिंदू आणी मुसलमान हे भारत नावाच्या वधूचे दोन सुंदर डोळे  (द्विराष्ट्रवाद) आहेत म्हणून राजकीय सत्तेचे वाटप दोन्ही डोळ्यांना समान झाले पाहिजे. आणी म्हणूनच  सर्व सत्ताकेंद्रात (लोकसभा ते ग्रामपंचायत) ५० % राखीव जागा मुस्लिमांसाठी असल्या पाहिजेत असे सय्यदांचे म्हणणे होते. ३५ % मुस्लिमांसाठी ५०% जागा आणी हिंदूच्या भावनेसाठी अखंड भारत. असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे.
मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्‍याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली !
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:!
(अर्थः सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा माणूस अर्ध्याचा त्याग करतो आणी उरलेल्या अर्ध्या चा स्वीकार करतो ! )

त्यामुळे गांधिंनि फाळणी करून हिंदुचा घात केला आणि म्हणुन नथुराम ने त्यांना मारले .....असे म्हणणारे डबल ढोलकी ठरतात. मग गांधी हत्येचे समर्थन करण्याचे काही कारण उरते काय ? गांधिंनि हिंदुचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने योजनापूर्वक फाळणी केली असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही . 
पण गांधिहत्येच्या समर्थकांनाहि ते कारण पुढे करता येणार नाही कारण सकृत दर्शनी तरी फाळणी हिंदुना हितकारक ठरली आहे. 







फाळणी मुळे हिंदुचा राजकीय विजय झाला आणि हजार वर्षाच्या धार्मिक भांडणातुन हिंदुंचि मुक्ता झाली . या विषयावर बाबासाहेब आंबेडकरांचि मते अतिशय अभ्यासपुर्ण आहेत. फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - 
" जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक ,  ,  परिणामशुन्य राज्य बनेल । जणु जिवंत प्रेत    , न पुरलेला मृतदेह "  
(पाकिस्तान ३ ४ ०.  DrBabasaheb Ambedkarwritings and speechesVolume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page ३ ४ ० ) 

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली   बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. --  
" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती .
समता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता . त्यांनी सनातनी वृत्तीचा आयुष्यभर धिक्कार केला . मनुस्मृतीला काडी  लावली . हिंदुच्या सनातन वैदिक धर्माचा त्याग केला . पण  राजकीय दृष्ट्या त्यांना देशहिताची आणि हिंदुच्या राजकीय सामाजिक प्रगतीची चाड होती . धम्म स्वीकारापुर्वी एक वर्ष - बाबासाहेबांनी फ़ाळणिबद्दल देवाचे आभार मानले आहेत. परमेश्वर न मानणार्या बाबासाहेबांनी हलक्याश्या विनोदात लिहिलेले वाक्य अतिशय बोलके आहे .  १९५५ सालीच  बाबासाहेब आंबेडकर लिहितात कि - 
" जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
(DrBabasaheb Ambedkarwritings and speechesVolume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 )

फाळणी झाल्यानंतर  कालौघात तीन देश निर्माण झाले : 
  1. भारत :  विकसित सशक्त एकसंघ आणी भारतीय धर्मांची बहुसंख्या असलेला सेक्युलर देश. 
  2. पाकिस्तान : युद्धग्रस्त मागास  आणि मवाली देश . इस्लामी शरियत कायदा . लोकशाही नाही.  
  3. बांग्लादेश : भूकग्रस्त  , दरिद्री, बकाल  आणि  धर्मांध संघटनांचे घाउक उत्पादन करणारा देश.  


भारतातून बरीच मुस्लिम लोक संख्या वगळली गेली. ती त्यांच्या पाक - बांगलादेशी मार्गाने जायला स्वतंत्र झाली . मुस्लिम बहुल भाग मनाने पाकिस्तानात होताच . नकाशावर रेघा ओढण्याचा राजकीय उपचार गांधी नेहरुंनी मनापासून केला . काय चुकले त्यांचे ? 

मुस्लिम लीग सारखे तत्कालीन राजकीय पक्ष आणि इस्लाम धर्म काफिर भारतीयांबरोबर सेक्युलर राजकारण करू शकत नाही त्यामुळे बाबासाहेब फाळणीचे समर्थक होते . त्यांचा विचार किती योग्य होता ते आजचे तीन देश (भारत , पाकिस्तान आणि बांग्लादेश ) पाहिले कि स्पष्ट होते . 


डॉ आंबेडकरांचे पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक डबल ढोलकी सनातन्यांकडुन  कडुन अनेकदा वापरले जाते. मुस्लिम द्वेषाचे शस्त्र म्हणून अखंड हिंदुराष्ट्रवादि  त्याचा वापर करतात .  वस्तुत: आंबेडकरांनि हे पुस्तक फाळणीचे समर्थन करण्यासाठी लिहिलेले आहेत. दार उल हार्ब आणि दार उल इस्लाम अशी जगाची वाटणी इस्लामी धर्मशास्त्राने केलेली असल्याने मुस्लिमांचे हिंदुबरोबर सहजीवन अशक्य आहे -  फाळणी अपरिहार्य आहे असे आंबेडकर म्हणतात. अखंड भारतात धार्मिक प्रश्न उग्र बनून राहतील आणि मग सामजिक सुधारणांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच उरणार नाही . या भावनेतून वेगळ्या चुली मांडणे बरे म्हणत आंबेडकरांनिहि फाळणीला पाठिंबा दिला आहे. सामजिक सुधारणा करता याव्यात  राजकीय लोकशाही - सेक्युलारीझम आणि आधुनिक विचार यांचा भारताला  लाभ व्हावा म्हणून आंबेडकरांचा फाळणीला पाठींबा होता ! द्वेषाने आंधळ्या झालेल्या अखंड हिंदुराश्ट्र वाल्यांनी बाबासाहेबांचे पुस्तक वापरणे हास्यास्पद आहे. 


५५ कोटीचे कारण तसेच फुसके आहे. गांधीना मारायचे प्रयत्न ५५ कोटीच्या आधीपासूनचे आहेत. असे अनेक प्रयत्न नथुराम गटाने बरीच वर्षे केलेले आहेत.
  






गांधिजीं चा खून जातीय मानसिकतेतून झाला का   ? 


गांधिहत्येनंतर ब्राम्हणांची घरे गावगुंडांनी जाळली . उदाहरणार्थ त्यात माझ्या पुर्वजांचेहि घर होते. त्याकाळी माझे आजोबा आणि त्यांचे बंधु गांधीवादी होते. कोन्ग्रेस मध्ये होते. तरीही घर जाळले. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या .  गांधीचे समर्थक कधी गांधीवादी नव्हते - अहिंसकहि  नव्हते . यांसंदर्भात  गांधिहत्येला जातीवादाची पार्श्वभूमी होती काय ? हा अतिशय  महत्वाचा प्रश्न आहे. नथुराम ब्राम्हण वादि  होता असा चावट प्रचार आजही केला जातो . तो खरा नाही . नथुरामच्या मनात अखंड भारत माता घर करून होती. तो त्याच्या मनातल्या अखंड हिंदुराश्ट्राचा -  परम देश भक्त होता . हिदू मुस्लिम समस्येचे  त्याचे आकलन कमी होते हा महत्वाचा मुद्दा आहे.  

गांधीजीचा खून आणि त्यानंतरची जाळपोळ होईपर्यंत - गांधी  ब्राम्हण विरोधी होते असे कोणालाही कधी वाटले नव्हते . गांधिंची  कोन्ग्रेस देशाचा प्रधान मंत्रि नेहरू आणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रि खेर याना बनवत होती . हे दोघे ब्राम्हण होते .

 गांधी ब्राम्हण विरोधी नव्हते तसा  नथुराम हि ब्राम्हण वादि नव्हता .

नथुराम जहाल हिंदु होता. जहालपणा हे अडाणीपणाचे लक्षण आहे.  त्यामुळे नथुरामला  गांधीजिंचे सखोल राजकारण कळत नव्हते . नथुराम फारसा धार्मिक हि नव्हता तो जमातवादी होता . नथूरामच्या त्याकाळी अस्पृश्यतेला विरोध होता . वेद गीता आदी धर्म ग्रंथांवर केलेली टिका समजून घेतली पाहिजे . तो आंबेडकरांचा अधिकार आहे. अशा अर्थाचे लेखन नथुराम ने केलेले आढळते . नथुराम सनातनी सुद्धा नव्हता . प्रत्येक चुकीचा  माणुस हा सनातनी असला पाहिजे असे काही नाही . पुरोगामी वा अतिजहाल राष्ट्रवादी सुद्धा चुकीचे काम करू शकतात. राजकारणात आणि समाजकारणात सोप्या व्याख्या करणे टाळले पाहिजे. नथूरामने अतिरेकी देशभक्ती , जहाल हिंदुत्व आणि हिंदु मुस्लिम समस्या न समजल्याच्या  अडाणिपणातुन हे अधम  कृत्य केले .






नथुरामला  हिंदु समाजाचे आकलन झालेलेले न्हवते . नथुरामियांना आजही झालेले नाही. हिंसा - अहिंसा - सशस्त्र क्रांति वगैरे बालिश मुद्द्यांभोवती त्याचे वक्तृत्व अजून खेळते आहे.  हिंदु समाज अहिंसक वगैरे कधीच न्हवता. महाभारतातलि भाउबंदकि आधुनिक भारतापर्यंत सनातन  चालू आहे. शेतिच्या बांधावरुन भाऊ भावाचे खून करतो. राज्यावरून चुलत्यांचे रक्त वाहवले जाते.  जातिपातिंचा आजचा संघर्ष थेट एकलव्य किवा शंबुक किंवा परशुराम पर्यंत भिडवला जातो.  हिंदु लोक एक राष्ट्र - एक जीव नाहीत. आजतरी नाहीत . हिंदुना एकजीव - एकाराष्ट्रीय बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यात वाद नाही . त्यासाठी सनातनी वृत्ती सोडुन आधुनिक राष्ट्रवाद स्वीकारावा लागणार आहे .  आधुनिक राष्ट्रवादाच्या, लोकशाहीच्या परिप्रेक्षातुन हिंदुना पहायला शिकवणे हि काळाची गरज होती. त्यासाठी गांधिंनि अहिंसा हे उपकरण वापरले. त्यानेच त्यांनी हिंदु लोकांची मने जिंकली. आज मुस्लिमांविरुद्ध असणारा जहाल राष्ट्रवाद उद्या आपल्यालाहि  खाइल अशी भीती हीदुसमाजातल्या अनेक गटांना वाटते.  महाराष्ट्रातले उदाहरण द्यायचे झाले तर ब्राह्मणेतर चळवळीचे देता येईल . टिळकांची जहाल कोग्रेस -   ब्राह्मणेतर चळवळीला कधीच आपली वाटली नाही. त्या जहाल्पणात काहिंना ब्राह्मण्याचा वास येत होता. पण अहीसक गांधिंच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर पक्ष कोंग्रेस मध्ये आला हे विसरता येईल काय ? गांधिंचि अहिंसा सार्यांना कवेत घेणारी होती . गांधिजिंच्या अहिंसेबद्दल आपण लेखमालेच्या तिसर्या भागात अधिक सविस्तर चर्चा करू. 







 फाळणी झाल्यानंतरहि मुस्लिमांना दंगलीची झळ पोचू नये म्हणुन हा महात्मा भारतात वणवण फिरत होता.  हीदुच्या सुरक्षेसाठि पाकिस्तानात पदयात्रा काढण्याचेही त्यांचे ठरले होते . पाकिस्तानातल्या हिंदुवर होणार्या अत्याचाराने नथुराम पेटुन उठला होता. त्याला इथल्या मुस्लिमांवर सुड उगवायचा होता ...... आणि हिंदुसमाजाला सुडाच्या तत्वा   पासून दूर नेणारा महात्मा त्याला नको होता असाही तर्क लढवता येईल . सूडाचे तत्व अस्तनिताल्या निखार्यासारखे असते ते स्वत:लाही जाळतेच . दशतावादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानात आज तोच जिहाद अंतर्गत भस्मासुर बनला आहे हे दिसत नाही काय ? तरी क्षणभर युक्तिवादासाठी मान्य करू ...कि नथुरामला सुड घ्यायचा आहे. गांधिजिंचा खून केल्याने नथूरामचे सूड ध्येय सफल झाले काय ? गांधिहत्येचा परिणाम काय झाला ?  गांधीला गोळी घालताच एका क्षणात  - भारतातल्या मुस्लिम विरोधी दंगली थांबल्या .....   नथुरामच्या गोळीने असंख्य मुस्लिमांचे जीव वाचले . त्याचे सुडाचे तत्व फेल झाले . पाकिस्तान ची निर्मिती हा गांधिविचाराचा पराभव आहे असे कोणास म्हणायचे असेल तर  गांधिहत्येचा परिणाम हा नाथुरामि सुड तत्वाचा पराभव आहे हे हि मान्य करावे लागेल . 


पाकिस्तानची निर्मिती हा गांधीच्या सर्वधर्म समभावाचा पराभव होता असे म्हणणारे लोक कुराणाचा दाखला देण्यात पटाईत आहेत . कुराणातला जिहाद. काफ़िरांना मारण्याच्या आज्ञा . इस्लाम धर्माची ( कुराण प्रणित ) असहिष्णुता याचे दाखले  - कुराणातल्या आयतिंचे क्रमांक देत अवश्य देता येतील . गांधिजिंचि सर्वधर्म समभाव नावाची एक छोटीशी पुस्तिका आहे.  त्यात गांधीजी विनम्रपणे म्हणतात कि दास आणि दस्युंविरोधातल्या ऋग्वेदातल्या ऋचांचे क्रमांक हि असेच दाखवता येतील . मानुस्मृतीतली शुद्रविरोधी टिपणे श्लोकांच्या क्रमांकासहित प्रसिद्ध झालेली आहेत . त्याचा नेमका अर्थ वेगळाच आहे  असा वाद सर्व धर्म मार्तंड घालत बसतात. 

गांधीबाबा हि सुट - धर्माचा आधुनिक अन्वयार्थ काढण्याची सुट .... सर्वच धर्मांना देतात आणि त्याला - सर्वधर्म समभाव असे नाव देतात .  गांधिंच्या मौलाना आझाद नामक शिष्याने कुराणातल्या आयती वापरून सर्व धर्म समाभाव सिद्ध केला होता ! 

( मौलाना आझादांचा फसलेला प्रामाणिक प्रयत्न  वाचण्यासाठी येथे क्लिक करा )  

थोडक्यात गांधिहत्येचे हिंदु म्हणुन समर्थन करता येत नाही हे मला उमगले आहे. त्यांच्या सर्व धर्म समभावा वर टिका करताना भान सोडले जाते हेही समजले  आहे .

तरी अधुनिक दृष्टिकोनाचे  बुद्धिमान विचारवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यात वाद का झाले त्याचे खरे स्वरुप काय होते ... हा प्रश्न मला अस्वथ करतो. ..



(क्रमश:)

मला समजलेले गांधिजी या मालिकेतील पुढील भाग : - 


भाग ३) पुस्तकांपलिकडचे गांधी : (आगामी )   





----------------------------------------------------------------------------------------------------------------------

(फ़ाळणिमागिल राजकारण या  विषयावर अधिक अभ्यासासाठी : - प्रा शेषराव मोरे यांचे 'गांधी आणि कोङ्ग्रेसने अखंड भारत का नाकारला ?'  हे पुस्तक अवश्य वाचावे. पुस्तकाच्या निर्मिती - प्रकाशानात आमचाही अल्पसा सहभाग आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तकही या संदर्भात महत्वाचा दस्तावेज आहे.   )


.

३९ टिप्पण्या:

  1. लेखमालेचा आरंभ तर चांगला आहे, पुढील भागांची आतुरतेने वाट बघत आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. विवेचन अधिक स्पष्ट हवे. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे हे मुद्देसूदपणे मांडले तर ते कळण्यास मदत होईल. शैलीत अडकू नये. त्यामुळे विचार पातळ होतो. बाकी ठीक चालू द्या...

    उत्तर द्याहटवा
  3. Aapla lekh atishay muddesood aahe. Gandhi wadh kaay kinwa Hatya kaay yaache samarthan tathakathit Hindutwawadi kitihi karot, parantu aaj sarwa jag Gandhinche Tatwadnyan aawashyak manate. Te aacharne kathin asle tarihi aawashyak maanate.

    उत्तर द्याहटवा
  4. I have little different and additional perception on this subject. I did read nathram and savrkar before Gandhi...but even Before that my mind never convinced with justification of godase gave in his books (by gopal godase) or in natak by dalavi...I would wish you to meet you someday in person to talk on this...not specifically but may be in general on Gandhi. Thanks for blog.

    उत्तर द्याहटवा
  5. बरेचसे मुद्दे पडण्यासारखे आहेत ....गांधीवादाकडे पाहण्याचा एक नवाच दृष्टीकोन मिळाला .........उत्कृष्ट लेख ......
    पुढील भाग ब्लोग वर शोधत आहे ...
    ब्लॉगची पुनर्रचना आवश्यक वाटते ...लेखांची सुसंगती लागत नाही .
    आणि हवे ते लेख योग्य क्रमाने सापडत नाहीत ...

    उत्तर द्याहटवा
  6. Vachava bolalo thoda lekh pan Kay sarv batya bol...... babasaheb falanichya virodhat hote... kharach babasaheb je bolat hote ki sanatani Brahman ani purogami Brahman hya ekach sharirachya don bhuja ahet

    उत्तर द्याहटवा
  7. Abhijit Gaikwad - डॉ आंबेडकरांचे पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक अशाच डबल ढोलकी विचारवंता कडुन अनेकदा वापरले जाते. वस्तुत: आंबेडकरांनि हे पुस्तक फाळणीचे समर्थन करण्यासाठी लिहिलेले आहेत. दार उल हार्ब आणि दार उल इस्लाम अशी जगाची वाटणी इस्लामी धर्मशास्त्राने केलेली असल्याने मुस्लिमांचे हिंदुबरोबर सहजीवन अशक्य आहे - फाळणी अपरिहार्य आहे असे आंबेडकर म्हणतात. अखंड भारतात धार्मिक प्रश्न उग्र बनून राहतील आणि मग सामजिक सुधारणांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच उरणार नाही . या भावनेतून वेगळ्या चुली मांडणे बरे म्हणत आंबेडकरांनिहि फाळणीला पाठिंबा दिला आहे.


    फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक , , परिणामशुन्य राज्य बनेल । जणु जिवंत प्रेत , न पुरलेला मृतदेह " (पाकिस्तान ३ ४ ०. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page ३ ४ ० )

    फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली म्हणजेच महानिर्वाणापुर्वि व धम्म स्वीकारापुर्वी एका वर्ष - बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. -- " पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 )

    उत्तर द्याहटवा
  8. खुप छान लेख, अजून विवेचन करता येईल, पुढच्या भागाची वाट बघतोय

    उत्तर द्याहटवा
  9. गांधिंना हरवण्याचा द्वंद्वात्मक मार्ग होता . - तो म्हणजे लोकशाही मार्गाने कोंग्रेसला पराभूत करणे. हि लोकशाही गांधीची कोंग्रेसच देऊ पाहात होती. नथुरामला प्रतिकार करण्याची संधि गांधीच देत होते. पण नथुरामला आणि त्याच्या हिंदुमहासभेला गांधिंना निवडणुकीत हरवणे शक्य वाटत न्हवते. म्हणुन त्यांनी निवडणुकांच्या लढाइतुन पळ काढला . आणि खुनाचा शोर्ट कट स्वीकारला.

    <<<
    >>>
    लोकशाही मार्ग गांधी देऊ पहात होते? थुत्‌. नथुरामने किंवा हिंदुत्ववाद्यांनी साधे वृत्तपत्रातून लेख लिहिले तर जामिनावर जामिन मागून पेपर बंद पाडले जात होते, १९४६ साली दोन ट्रक भरुन पोलिस आणून सावरकर सदनला गराडा घातला गेला होता.हि झूट मुट की लोकशाही का? १९५० ला पाकिस्तानचा पंतप्रधान भेट देणार म्हणून ६७ वर्ष्र वयाचा सावरकरांना बेळगावच्या तुरुंगात डांबले गेले. हा लोकसाही मार्ग का? आणि आत्तासारखे १०० % लोकांना मतदानाचा अधिकार होता असा काही गैरसमज आहे काय काय आपला? जेमतेम १० % लोक मतदान करु शकत होते. टाटा - बिर्लां सारख्या धनदांडग्यांचा पैसा निवडणुकीत कॉंग्रेस ला मिळत होता. इतर पक्षांच्या कितीतरी अधिक पटीने. गांधीजींच्या मनाविरुद्ध कोणी निवडून आले तर गांधीजी त्रागा करत नव्हते काय? आणि निवडणुकीतून पळ कोणी काढला हो? यथाशक्ती हिंदूमहासभा लढतच होती. १९५२ साली ५ खासदार लोकसभेत होते. १९८४ च्या भाजपाच्या २ खासदारांच्या तुलनेने पहा म्हणजे त्याचे महत्व कळेल. हा खून नथुरामने वैयक्तिक रित्या केला होता तो काही हिंदूमहासभा या पक्षाने केलेला नव्हता. किती भाबडे पणाने आणि बेजबाबदार पणे लिहायचे याला काही मर्यादा?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हा खून नथुरामने वैयक्तिक रित्या केला होता तो काही हिंदूमहासभा या पक्षाने केलेला नव्हता? मग नथुराम त्याच्या कृत्याचे समर्थन करताना जी विचारसरणी मांडतो ती कोणाची? त्याची स्वतःची वैयक्तिक? - See more at: http://drabhiram.blogspot.in/2013/01/blog-post_30.html#sthash.lhEFBWwU.dpuf

      हटवा
  10. डॉ आंबेडकरांचे पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक अशाच डबल ढोलकी विचारवंता कडुन अनेकदा वापरले जाते. वस्तुत: आंबेडकरांनी हे पुस्तक फाळणीचे समर्थन करण्यासाठी लिहिलेले आहेत<<<< तुम्ही पण डबल ढोलकीच.कारण आंबेडकरांनी फाळणीचे समर्थनार्थ पुस्तक लिहिले असले तरी ते काही एकराष्ट्रवादातून लिहिलेले नाही. फायद्यापुरते संदर्भ घेणे अशा अर्थी डबल ढोलकी कोणाला उद्देशून टिका करत असाल तर तुम्हीही तेच करताय. गांधीनीतीविरुद्ध आंबेडकरांनी गांधीजींवर कडक टिका या पुस्तकात केली आहे. ते काही गांधी समर्थनाचे पुस्तक नाही.

    उत्तर द्याहटवा
  11. कुराणातल्या आयतिंचे क्रमांक देत अवश्य देता येतील . गांधिजिंचि सर्वधर्म समभाव नावाची एक छोटीशी पुस्तिका आहे. त्यात गांधीजी विनम्रपणे म्हणतात कि दास आणि दस्युंविरोधातल्या ऋग्वेदातल्या ऋचांचे क्रमांक हि असेच दाखवता येतील .
    <<<

    मुसलमान म्हणवून घेणारे आणि मुसलमान म्हणवून न घेणारे डिगाने सापडतील , हे दास आणि दस्यु कुठे आहेत ते जरा शोधून द्याल का? त्यांच्यातील राष्त्रभावना पॅन दासीझम किंवा दस्युझम आणि दहशतवाद दाखवता येईल का? कोणा दस्यु नाहीतर दासाने स्वतंत्र राष्त्र मागितले आहे का? उठसूट आजच्या ब्राह्मणांना प्रतिनिधी मानून असे क्रमांक देनारे असा ब्राह्मण दाखवून देतील का कि जो स्वतंत्र ब्राह्मणीस्थान मागत आहे वा देशाची फाळणी मागत आहे वा स्वतंत्र राष्ट्राची स्वप्ने पहात आहे किंवा दंगली घडवून आणत आहे? कोणताही संदर्भ कोठेही देण्याने काय सिद्ध होते? फक्त वडाची साल पिंपळाला एवढच सिद्ध होत.

    उत्तर द्याहटवा
  12. Chandrashekhar Sane .. What about Manusmruti ?? Many people proudly call themselves descendants of das/ dasue . What about atrocities in Manusmruti on Shudras ??

    उत्तर द्याहटवा
  13. very good article...loved it...marathit ase blogs vachun far bare vatale..

    उत्तर द्याहटवा
  14. गांधी समजून घेण्यासाठी सतत गोडसे /सावरकरांचा वापर करावा लागतो का ? स्वतः कॉंग्रेसने गांधींना वापरून सत्ता मिळवली .. त्यांनी तरी गांधींचे कोणते विचार या देशात रुजवले ?म्हणजे सत्ता मिळवण्या साठी गांधी विचार आणि वैयक्तिक जीवनशैलीत नेहरूंची कॉपी करणे या व्यतिरिक्त काय घडले आहे . गांधींचा सर्वात मोठा पराभव कॉंग्रेसने केला आहे .. त्याबद्दल बोला .
    अभिजीत

    उत्तर द्याहटवा
  15. लिखाणाची परिवर्तन शैली चांगलीच ओळखीची झाली आहे ... एखाद्या मोठया नामांकित व्यक्तीवर लिहायला/बोलायला सुरु करायचे आणि मग दर दोन चार ओळींच्या आड हिंदुत्ववादी..सावरकर यांना झोडायचे ( विषय त्यांचा नसतांना ) . असे करणे म्हणजे मुळात आपल्याला तरी गांधी कळले आहेत का याचीच मला अधिक शंका वाटते .
    अभिजीत

    उत्तर द्याहटवा
  16. Apan gandhi samarthanasathi ubhe aahat ase diste tyancha mulyankanasathi( analysis) nahi.Tase kele aste tar bhumiket farak padala aasata. Apan nutral nahi ase watate..
    Mi hindutwa wadi nahi, musalman dweshta nahi, kontyahi pakshacha nahi, mi falni - Gandhi pahileli nahi,

    उत्तर द्याहटवा
  17. abhiram i think you should have given seshrao more the due credit in your article, otherwise it looks like plagaraism

    उत्तर द्याहटवा
  18. "Mala samajlele Gandhiji" hya lekhachi surwat tyanchya hatyene karnyache prayojan kay he samjat nahi? Tumhala Gandhijinchya wicharan baddal lihayche aahe ka Sawarkar aani Godse hyanchyawar tika karaychi aahe? Tase aslyas aapli ti yogyata nahi he pahile samjun ghya. Hindu dharma ani hindu tatwadyan hya baddal bolaychi hi aapli patrata nahi hehi janun ghya. Gandhijinchi hatya karne hi ek prakar Nathuram Godsen kadun far mothi chuk jhali ase watte. Tya mule Sunthe wachun khokla gela ashi "Nehru Congress" chi soy jhali. Thodi wat pahili asti tar "Nehru Congress" nech yougya to ilaj kela asta aani aaj je. Tari tatparya aapla lekh ha Gandhijinni kelelya karya baddal simit theva aani winakaran aapli patrata nasta thor wyakttinwar tika karne tala. Evdha kelat tari pushkal

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

      हटवा
    2. चिटणीसजी... आपण एकदम योग्यतेवर आलात हे शोभनीय नाही, वैचारिक विचार मांडणे आणि त्यातून विचारांती समाधान होणे हाच मुळात वैचारिक स्वातंत्र्याचा गाभा आहे. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे जर गृहीत धरलेच तर सावरकरांची सुद्धा वयाचा २१ व्या वर्षी कोणावर टीका करण्याची योग्यता नव्हतीच पण तरी त्यांच्या टीकेचे विवेचन टिळक करायचेच ना. आजही अनेक टिळक अशा विचारांचे विवेचन आणि विश्लेषण करीतच असतील... मुळात प्रश्न योग्यतेचा नाही .... टिपिकल विचारांचा आहे... एकदम योग्यता काढण्य पेक्षा आणि समाज मान्य अपमान करण्यापेक्षा विचार मांडा साहेब.... (भाग्यातुषार जोशी)

      हटवा
    3. If somebody is hurt by my comments, I apologize for the same. Waril lekhatun vividha sandarbha deun, Lekhakane jo falni justify karnyacha prayatna kelela aahe to chukicha watto. Gandhiji mahan hote hyat kahi shankach nahi pan tyanchi pratyek goshta kinwa kruti, wichar he barobarach hote ase nahi. Ashya wicharanna jar wirodh jhalela asel tar to suddha tyach mansiktetun samjun ghyala pahije. Gandhiji aani tyanche wirodhak hyanna saman nyay lawla gela pahije. Saglyancha uddesh shevti swatantrya prapti aani samajache hit hach hota. Bakichyanche sodun deu pan Gandhijinna tyanchyach congress madhun pan khup wirodh hota he ka lokansamor aanle jat nahi, hyachi khanta watte. Sawarkaransarkhya swatantryawirawar tika karnya adhi, tyanna aani tyanchya bhumikela pan samjun ghetla pahije ani konawarahi kewal Gandhi wirodhak mhanun tika hota kama naye, evdhach wichar mandawasa wato.

      हटवा
  19. गांधीहत्येचे सर्व हिंदुत्ववादी समर्थन करतात असे मला वाटत नाही. माझे मत असे आहे की गोडसेनी हिंदुत्वाचे जितके नुकसान केले आहे तितके कुणीच केलेले नाही. त्याचे समर्थक साधारणपणे अज्ञानातून त्याला ग्रेट मानतात. गांधीजींचा पराभव व्हायला सुरुवात झाली होती. सरदार पटेलांनी तर उघडपणे सांगितल होता की गांधींनी संन्यास घ्यावा. सरोजिनी नायडू म्हणत की गांधींना गरीब ठेवण्यात सरकारला फार खर्च येतो. स्वत: गांधींना गांधीवादाच्या मर्यादा कळल्या होत्या क़ारण आयुष्यभर सर्व प्रकारच्या युध्दांना (अगदी ज्यु होलोकोस्टविरुधच्या युधाचाही)विरोध करणारया माणसाने काश्मीरच्या युध्दाचे समर्थन केले होते! गांधीजींचा खून करून गोडसेनी त्यांच्या विचारसणिला अमर बनवले.
    राहीली गोष्ट फाळणीची . फाळणी हिंदुंसाठी मोठा तोटा होता. आपली जमीन गेली . जमीन महत्वाची असते. स्वत: अब्राहम लिंकननी सिव्हिल वोर करून एका अर्थांनी फ़ाळनीच टाळली होती.
    तुम्ही लिहिता 'मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्‍याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली !'. इथेच तर सगळी गडबड आहे. तुम्ही फाळणी मान्य केली कारण त्याच्यातून हिंदुंना फायदा होता कारण लोकसंख्येचिही फाळणी झाली वगैरे म्हणता याचाच अर्थ मुस्लिम सेक्युलर बनू शकत नाही अस मान्यच करत नाही का? मुस्लिम सेक्युलर बनूच शकत नाहीत तर मग पुर्ण लोकसंख्येची फाळणी का नाही केलीत?? आणि जर मुस्लिम सेक्युलर होऊ शकतात ,तर मग फ़ाळणीचा बेसिक उद्देशच फोल ठरतो. माझ्यामते फाळणी न करता खरा सेक्युलरवाद आणला असता तर ते जास्त बर झाला असत. मुस्लिमही सेक्युलर होऊ शकतात .
    मुलत: गांधीजींनी जिन्नाशी चुकीच्या प्रकारे बोलणी केली . डायरेक्ट एक्शन घेऊन जीन्नाने दहशतीचा अवलंब करून पाकिस्तानची मागणी लावून धरली. ती हिंसा थांबवण्यासाठी फाळणी करवणे हे चुकीचे होते. कारण दोन्ही गोष्टींचा काहीच संबंध नव्हता आणि अशा परिस्थितीत गांधीजी तोट्याचाच सौदा करणार होते. मुलाचे अपहरण करून त्याच्या आईवडीलांशी बोलणी करताना अपहारकर्ता कितीही चुकीचा असला तरीही आईवडीलांना त्याचे म्हणने मान्य करावेच लागते. फ़ाळणीसंबंधीही तसेच झाले. जीन्नाने हिंसेची भिती दाखवून स्वत:चे म्हणने मान्य करवले. जे चूक आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. "गांधीहत्येचे सर्व हिंदुत्ववादी समर्थन करतात असे मला वाटत नाही." म्हणजे आपल्याला तशी खात्री नाही. असे अनेक हिंदुत्ववादी मला माहित आहेत, जे सार्वजनिक चर्चेमध्ये गांधी हत्येचा निषेध करतात आणि खासगीत गांधींची टवाळी करून हत्येचे निलाजरे समर्थन करतात.
      गोडसेनी हिंदूंचे नुकसान केले म्हणजे नेमके काय केले?
      गांधींचा खून झाला नसता तर त्यांची विचारसरणी निरर्थक ठरली असती काय?
      "जमीन महत्वाची असते." पण लोकांबद्दल काय? लोक आणि त्यांचे स्वातंत्र्य, विचार महत्वाचे नाहीत काय?
      हिंदुत्ववाद्यांना फक्त जमीनच महत्वाची आहे हे अनेक अशाच गोष्टीवरून दिसते....

      हटवा
  20. अजून एक गोष्ट म्हणजे कुराण आणि मनुस्मृती यांची तुलना होऊ शकत नाही. मुळात किती हिंदुंनी मनुस्मृती वाचलेली असते???मुळ इश्यू हा आहे की जवळपास सर्वच हिंदु हे मान्य करतात की त्यांच्या धर्मात काही चुका आहेत. किती मुस्लिम त्यांच्या धर्माबद्दल हे मान्य करतात? हिंदु,ख्रिश्चन,ज्यू यांच्यात आणि मुस्लिमांमधे एक मोठा फरक आहे. पहिले लोक आपल्या धर्मांवर प्रेम करतात पण त्यांच्यापैकी बहुतांश लोक हे मान्य करतात की त्यांचा धर्म,धर्मग्रंथ यांच्यात चुका असू शकतात. पण साधारणपणे मुस्लिम हे कधीच मान्य करू शकत नाहीत . अगदी उच्च शिक्षीत मुस्लिमही हे मान्य करू शकत नाहीत की त्यांच्या धर्मग्रंथात काही चूक असू शकते. ते म्हणतात की धर्मग्रंथामधील उपदेशाचे चुकीचे अर्थ लावल्याने सर्व घोळ होतात . मुळ शिकवणुकीत काहीच चूक नाही पण त्या शिकवणुकीचा चुकीचा अर्थ लावल्याने वाईट गोष्टी घडतात . 'खुदा के लिये' सारख्या चित्रपटातही काय मेसेज आहे? की मुळ इस्लाम धर्म पर्फ़ेक्ट आहे पण धर्मांध त्याचा चुकीचा अर्थ लावतात .

    उत्तर द्याहटवा
  21. मनुष्य धर्माची व्याख्या सांगणारा एक उत्तम लेख आहे. पुढील लेखाची आतुरतेने वाट पाहत आहे. ----नेहूल

    उत्तर द्याहटवा
  22. इतिहास मधला विनोद म्हणजे पाकीस्थान ची स्वीकृती हा विचार काही लोकाला हास्यास्पद वाटतो त्यांनाच काँग्रेसी म्हणायला काय हरकत आहे !!!!
    पापास्थान ची स्वीकृती त्याचे कारण आणी समर्थन आणि चर्चा म्हणजे मुलाला आई का विकायला लागली त्याची कारण मिमासा करण्यासारखे आहे आणि तसे समर्थन तर वेश्या पण आपल्या वेश्यावृतीचे करू शकते (त्याला पण पोट आहे आणि त्याची परिस्थिती पण दयनीय आहे ,त्याला पण ह्या व्यवसाय मध्ये ओढण्यात आले आहे !!!!)
    ज्यांना फाळणी स्वीकृत करायची कारणे पटतात त्यांनी हिंदू राष्ट्र वाद किंवा विषया ची चर्चा का करावी !!!!!!
    त्यांना भय का वाटतो की हा विचार प्रचार करून हिंदू इस्लाम वरती सूड उगवणार तर नाही ना ????
    हा मानवते वरती कलंक तर लागणार नाही ना !!!!
    फाळणी चा कलंक हा मानवते वरती कलंक म्हणून स्वीकार करा असे जे विचार प्रगट करतात त्यांना हिंदू जर सूड म्हणून असा कलंक धुण्या साठी सिद्ध होत असतील किवा तसा प्रचार करत असतील तर त्याची पोट :दुखी का ह्वावी !!!!!

    उत्तर द्याहटवा
  23. गांधींसोबत त्यांची अहिंसा देखील मेली ....
    हत्येनंतर लगेच च ब्राम्हणाची घरे जाळली,लुटली , मारहाण केली ही अहिंसा नक्कीच नह्वती ....
    हसायचे का? आता .........................

    उत्तर द्याहटवा
  24. सकृत दर्शनी तरी फाळणी हिंदुना हितकारक ठरली आहे? Kashi?

    उत्तर द्याहटवा
  25. वाह फार छान। ....... पुढ़च्या भागची वाट पहतोय

    उत्तर द्याहटवा
  26. प्रत्येक चरित्र हे Grey Shades मधले आहे . नातुराम पूर्णपणे चुकीचा नव्हता ना गांधी पूर्णपणे बरोबर होते . फाळणीपर्यंत सारी गोष्ट मान्य होते पण हि देखील निर्विवाद गोष्ट आहे कि गांधींनी तत्कालीन राजकारणात केलेली लुडबुड ! त्याचा सरदार पटेलांना केवढा त्रास झाला असेल हे तेच जाणतात ! कदाचित आंबेडकरांनी त्यांच्यावर डागलेल्या तोफा ह्याच कारणास्तव होत्या . त्यांचे हट्ट , उपोषणे ह्यांवर आंबेडकरांचे विचार त्यांच्या Grammar of Anarchy ह्या भाषणातून स्पष्ट होतात ते असे - “we must…hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. It means we must abandon the bloody methods of revolution. It means that we must abandon the method of civil disobedience, non-cooperation and satyagraha. When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. But where constitutional methods are open, there can be no justification for these unconstitutional methods. These methods are nothing but the Grammar of Anarchy and the sooner they are abandoned, the better for us." आजकाल चाललेली बिनबुडाची असली उपोषणे बघता ते केवढे समर्पक होते हेही समजते . काही वर्षांपूर्वी जन लोकपाल साठी केलेलं आंदोलन किती वायफळ आणि अविचारी होते हे त्याचं उदाहरण आहे !

    हीच एकमेव गोष्ट आहे ज्यामुळे गांधी हि तात्कालीन राजकारणातील डोकेदुखी होतात ! त्यांच्या ह्या 'आचरट ' खोड्यांमुळे कदाचित आंबेडकरांचे गांधीशी वैचारिक वितुष्ट होते असाही निकष काढता येईल .

    व्यक्तिशः गांधींचे विचार व्यक्तिगत विकासासाठी उत्तम आहेत परंतु त्यांचे सर्व विचार हे पटण्यायोग्य नाहीत हे देखील सत्य आहे .

    आपला लेख उत्तम होता . असेच उत्तम आम्हाला आपणाकडून वाचावयास व ऐकावयास मिळो ! धन्यवाद आणि शुभेच्छा !!

    उत्तर द्याहटवा
  27. डॉक्टर दीक्षित,

    मला वर डॉक्टर चिन्मय कुलकर्ण्यांनी मांडलेला लोकसंख्येच्या फाळणीचा मुद्दा पटतो (दुवा : http://drabhiram.blogspot.com/2013/01/blog-post_30.html?showComment=1380729530362#c3621962183408118583 ). आंबेडकरांनी ज्या ग्रंथात फाळणी व्हावी असं म्हंटलं त्याच पुस्तकात लोकसंख्येची अदलाबदल व्हावी असाही आग्रह धरला होता. तशी अदलाबदल न केल्यामुळे आज भारतात मुस्लिमांची संख्या सतत वाढते आहे आणि पाकिस्तान व बांगलादेशात हिंदूंची संख्या सतत घटते आहे.

    असो.

    तुम्ही म्हणता की गांधींचा हरवायचा मार्ग म्हणजे काँग्रेसला लोकशाही पराभूत करणे. मला हे विधान मान्य नाही. १९३९ साली सुभाषबाबू लोकशाही मार्गाने काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. मात्र गांधींनी पट्टभी सीतारामय्या यांना बळेच अध्यक्ष केले. या पार्श्वभूमीवर गांधींना लोकशाही मार्गाने हरवणे शक्य नाही याची खात्री पटते.

    असो.

    गांधींनी ५५ कोटी रुपये पाकिस्तानला द्यावे म्हणून उपोषण सुरू केल्याचं रिझर्व्ह बँकेच्या फाळणीवरील कागदपत्रांत स्पष्टपणे नमूद केलं आहे. गांधी हा माणूस टेररिस्ट फायनान्सर आहे. त्याला उडवलं ते बरंच केलं.

    आ.न.,
    -गा.पै.

    उत्तर द्याहटवा
  28. डॉक्टर साहेब ---- एखादे वर्तमानपत्रात छापून आलेले पत्र पुरावा कधी पासून झाला.....संदर्भ ५५ कोटी बाबतचे आपले वरील विधान....

    उत्तर द्याहटवा
  29. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख अभिराम...
    अभिराम द ग्रेट...

    उत्तर द्याहटवा
  30. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख अभिराम...
    अभिराम द ग्रेट...

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *