२२ जुलै, २०१६

गेम थेअरी : सवाल नैतिकतेचा (भाग १)

 सवाल नास्तिकाच्या नैतिकतेचा (भाग १)

देवा धर्मा मुळे नैतिकता टिकून राहते असे मानले जाते.  नरक, स्वर्ग, कर्मफळ इत्यादी गोष्टींना घाबरून सामान्य माणसे खरे बोलतात, चोऱ्या, खून, लबाड्या, बलात्कार करत नाहीत असेही म्हणतात. ईश्वराच्या संकल्पाने प्रमाणे कायदा काही सर्व व्यापी - सर्व साक्षी  नाही . कायद्याच्या कचाट्यातून सुटणेही फार सोपे असते. त्यामुळे खरे खोटे कसेही असो - देव धर्म उपयुक्त आहेत - कारण त्यामुळे नीतिमत्ता आणि सचोटी टिकते असे  म्हटले जाते.  प्रस्तुत लेखात आपण विज्ञान, गणित आणि जीवशास्त्र नैतिकतेकडे कसे पाहते ? याची चर्चा करायची आहे.

दोन माणसांनी एकमेकांशी कसे वागावे ? याचे नियम म्हणजे नैतिकता . आपण येथे गेम थेअरीतले दोन कैद्यांचे प्रसिद्ध उदाहरण पाहायचे आहे. समजा....

गेम थेअरी

बबन  आणि मगन  असे दोन चोर आहेत. त्यांनी एक मोठा दरोडा घातला . हे दोन्ही चोर अतिशय बुद्धिवादी आणि नास्तिक आहेत असे आपण गृहीत धरायचे आहे. पोलिसांनी त्या चोरांना पकडले आहे. दोन वेगवेगळ्या कोठड्यात ठेवलेले आहे . बबन आणि मगन ची स्वतंत्र पोलीस चौकशी सुरू आहे. या दरोड्याला कोणीही साक्षीदार नाही . कोणताही पुरावा नाही . पण बबन आणि मगन पैकी एक जण माफीचा साक्षीदार बनू शकतो .

१) जो गुन्हा कबूल करेल तो माफीचा साक्षीदार ठरेल. त्याला कोणतीही शिक्षा नाही (शून्य  वर्षे ) - दुसर्याला २० वर्ष खडी फोडावी लागेल .

२) दोघांनी गुन्हा कबूल केला तर पोलीस हलकी कलमे लावून पाच वर्षात दोघांनाही  सोडून देतील.

३) मगन  आणि बबन या दोघांनीही गुन्हा मान्य केला नाही   - गप्प राहिले तर - केस चाले स्तवर एखादे वर्ष तुरुंगात काढावे लागेल . साक्षीदार नसल्याने दोघेही वर्षभरात सुटतील .

तिसरा पर्याय सरळच दोघांच्याही फायद्याचा आहे.  दोघे गप्प राहिले तर - वर्षभरात सुटतील . पण हे गणित इतके सोपे नाही . दुसरी बाजू काय निर्णय घेते ? हे दोघांनाही माहीत नाही .  संगनमत करायला पोलीस संधी देत नाहीत.

 एक वर्षाची माफक कैद सुद्धा टाळण्याचा मोह आपल्या सहकार्याला होऊ शकतो . त्यामुळे   मी गप्प राहिलो आणि समोरच्याने गुन्हा कबूल  केला तर ? वीस वर्ष मला तुरुंगाची हवा खावी लागेल - या भीतीने तो धोका कोणीही पत्करणार नाही.  मग  मगन  आणि बबन ने कोणता निर्णय घ्यावा  ? स्वतःचा तोटा कमीत कमी  कसा करावा ? तर्कशास्त्रा नुसार गुन्हा कबूल करणे हाच सेफ गेम आहे . यात फार तर पाच वर्ष शिक्सला होईल किंवा कदाचित लगेच सुटका !

बबन आणि मगन या दोघांनीही गुन्हा कबूल केला !

हा एक अतिशय नैतिक निर्णय दोन अनैतिक दरवडे खोरानी घेतला आहे . त्यांनी बुद्धिवाद वापरला ! तर्कशास्त्र वापरले ! हे अनैतिक स्वार्थीच होता - पण त्यापायी दोघांनीही नैतिक निर्णय घेतला !

पण हे थोडे तोट्याचे आहे - शिवाय मैत्री भावनेशी अनैतिक देखील आहे ... आता थोडे पुढे जाऊ ....


खेळ मांडीयेला 


मगन आणि बबन ला पोलिसांपुढे साक्ष देण्याची एकच संधी होती . नेहमीच्या जीवनात आपल्याला सतत नैतिक निर्णय घ्यायचे असतात. समोरची व्यक्ती कशी वागेल याचा आपण सतत अंदाज घेत असतो. त्यानुसार आपले धोरण ठरवत असतो . त्यातून आपला स्वभाव बनतो . व्यक्तिमत्व बनते . म्हणजे मानवी गेम थेअरीत सातत्य आहे. वारंवारता आहे . आता एक पत्त्याचा डाव मांडूया .....

समजा तुमच्या कडे दोन रंगाचे पत्ते आहेत - सहकार्य आणि विश्वासघात

हे दोन पत्ते म्हणजे तुमचे दोन निर्णय.  हे निर्णय तुम्हाला आयुष्यात वारंवार घ्यायचे आहेत. सहकार्य आणि विश्वासघात . तुम्ही कोणता पत्ता निवडणार ? इथेही समोरचा माणूस काय खेळी खेळणार आहे ते तुम्हाला माहीत नाही .निर्णय घेणारे दोन पक्ष हे निर्णय सतत घेताना तुम्ही काही धोरणे आखू शकता

१) सतत सहकार्य
२) सतत विश्वासघात
३) जशास तसे 
४) अनियमित (रॅन्डम ) चाली खेळायच्या 
५) अचानक केलेली फसवणूक
६) पश्चात्ताप धोरण - आपण फसलेल्या माणसाने सहकार्य केल्यास त्यास पुन्हा नाही फसवायचे
७) सूडाचे धोरण - जो एकदा फसवेल त्यास सतत फसवायचे

इत्यादी ....

पण या खेळात केवळ दोन पक्षी नाहीत . अनेक आहेत . खर्या आयुष्यातील निर्णय घेताना देखील अनेक पक्ष आहेत. कोण जिंकेल ?संगणकीय प्रयोग 

रॉबर्ट अक्सेलरॉड  या अमेरिकन शास्त्रज्ञाने कॉम्पुटर प्रोग्राम वापरून हा प्रयोग केला . त्याने एकूण पंधरा शास्त्रज्ञाना यात सहभागी केले . हे सर्व गेम थेअरी मधील तज्ञ होते .  सहकार्य की  विश्वासघात ? आणि त्यांचा क्रम काय असला तर अंतिम विजय प्राप्त होईल ? पंधरा वेगवेगळी धोरणे कॉम्प्युटर ला फीड केली. सर्व धोरणांना एकमेकांशी दोनशे वेळा खेळवले. 


-----------------------------------------------------------
प्रोग्रामचे नियम : - 

दोघांनी सहकार्य केले तर दोघांना १०० मार्क
एकाने दगा केला आणि समोरच्याने सहकार्य केले - तर पराभूतला शून्य  मार्क , विजेत्याला १०० मार्क
दोघांनी दगा केला तर दोघांनाही  ५० - ५० मार्क


या १५ धोरणांनी एकदा स्वतः:शी देखील खेळायचे होते - म्हणजे १५ X   १५ = २२५ लढती 
प्रत्येकी दोनशे वेळा ४५००० लढती  झाल्या 

या इतक्या शक्यतांत ज्या धोरणाला जास्त मार्क मिळतील ते विजेते धोरण 
----------------------------------------------------------
सतत विश्वासघात करणारे या खेळात टिकू शकत नाहीत . जशास तसे वाले जिंकू लागतात . त्यांचे परस्परांशी सहकार्य निर्माण होते - आणि मग सतत विश्वास घात  करणारे अल्पसंख्य बनून हरू लागतात . कारण ते कोणाशीच सहकार्य करत नाहीत . (इतर विश्वास घात  वाल्यांशी सुद्धा नाही )

रॉबर्ट च्या संगणकीय प्रयोगात प्रयोगात जशास तसे हे धोरण जिंकले . आणि गंमत म्हणजे या पंधरा पैकी जी लबाड धोरणे होती ती शेवटच्या नंबरात आली . सज्जन धोरणे पहिल्या सात मध्ये आली .दुसरा संगणकीय प्रयोग 

एक प्रयोग करून रॉबर्ट थाबला नाही. पहिल्या प्रयोगात एक त्रुटी राहून गेली होती . इतरांची धोरणे सहभागी शास्त्रज्ञाना माहीत नव्हती . साधारणतः कोणती धोरणे जिंकतात याचाही अंदाज नव्हता. हा अंदाज आल्यावर मग पुन्हा नवी धोरणे मागवली .

 त्यातले एक प्रसिद्ध धोरण , दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा - असे उदारमत वादी - दुसर्याला सुधारायची एक संधी देणारे - पण सतत बदमाशी करणार्यांना धडा शिकवणारे असे होते

सज्जन धोरणे जिंकतात या पहिल्या निकालाच्या अंदाजाने इतर लोक सज्जन धोरणेच पाठवतील असा अंदाज बहुतेक गेम थेअरी वाल्या सहभागी शास्त्रज्ञानी केला . आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून  यावेळी आलेली बरीच धोरणे ही लबाड आणि बदमाश होती . पुन्हा दोनशे वेळा खेळ मांडीयेला .... या प्रयोगाचा निर्णय अजूनच विचित्र लागला !

फसवणार्या लबाडाची संख्या फार जास्त होती . त्यामुळे .... 

१) जशास तसे वाले बर्याच वेळेस लबाडी करू लागले - सूड वाले सूड चक्रात अडकले -  लबाडाची संख्या अजूनच वाढली

२) सज्जन धोरणे हरली .

३) दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा वाल्याचे देखील काही चालेना . त्याला सतत बहुसंख्येकडून  फसवणूक झाल्याने हरावे लागले.

आजूबाजूच्या परिस्थिती वरून आणि समाजातील इतर धोरणावरून जय / पराजय ठरत होता . 
आता जीवशास्त्रीय प्रयोग 

मानवी व्यवहार म्हणजे कॉम्प्युटर चा प्रोग्राम नाही. मानवी व्यवहार अधिक जटील आहेत. याहून अधिक धक्कादायक निष्कर्ष  हाती लागणार आहेत .... त्यानंतर आपण ट्रेनचा प्रयोग पाहणार आहोत ...

(क्रमश:)
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *