८ फेब्रु, २०१६

निरंजन टकलेंचि शेळी : बें बें सावरकर

निरंजन टकलेंचि  शेळी :  बें बें सावरकर

महापुरुष हि  कल्पना मला मान्य नाही. महात्मा  गांधीजी , पंडित नेहरू किंवा नेताजी बोस प्रमाणेच सावरकर एक मनुष्य होते आणि त्यामुळे त्यांकडे चुकण्याचा - शिकण्याचा - स्वत:ला   बदलण्याचा अधिकार आहे, असे मला वाटते. हिमालया एव्हढ्या चुका करण्याचा - असा अधिकार प्रत्येक माणसाला असतो . त्यातून नवे शिकण्याचा अधिकार सुद्धा असतो . पण  नाशिक स्थित टकले  सावरकरांना माणुस समजत नाहीत  -

टकले सावरकरांना भ्याड आणि पळपुटि शेळी म्हणून  हिणवतात. शेळीला केले सिंह - सावरकर - अ ल्यांब लायनाइज्ड  असा लेख त्यांनी द वीक मध्ये   लिहिला आहे. सावरकर हा  माणुस नसून (भित्री ) शेळी होती असे टकलेने सिद्ध केले असते तर ठीकच ! पण तसे न करता त्यांनी ५००० शब्दाहून अधिक थापाच थापा मारल्या आहेत .






खोटे पुरावे , चुकीच्या तारखा,  लबाड निष्कर्ष  

टीव्हीवर बोलताना टकले  (२१/१५ / १० इत्यादी )  हजारो कागदपत्रे आर्काइव्हस मधून वाचल्याचा बाता मारतात  . वास्तवात त्यांनी  एकही मूळ पुरावा वाचलेला नाही. एकही अस्सल कागद पत्राचा संदर्भ दिलेला नाही. बाकी सोडा हो - टकल्यांनि सावरकर चरित्र सुद्धा वाचलेले नाही . टकलेंचा लेख पाच हजार शब्दाहून मोठा आहे . त्यात एकही मूळ कागद नाही . एकही नवा पुरावा नाही . अशा बेशिस्त खोटारड्याला मराठी सुशिक्षित लोक अभ्यासक समजू लागले आहेत. टकले हा भाडोत्री माणुस आहे.   सगळ्यात मोठी गंमत म्हणजे टकलेने
य दि फ़डकेंना कट्टर सावरकरवादी - स्त्रोञ्च सावरकराइट म्हटले आहे . ज्यांनी थोडे बहुत वाचन केले आहे अशी मराठी माणसे   या टाकल्यांच्या  स्त्रोञ्च विनोदावर ख्खो  ख्खो ख्खो हसतील !

निरंजन टकले स्वत:च्या (आड ) नावाबद्दल फारच सेन्सिटिव्ह आहेत. त्याला  टकल्या म्हटले की राग येतो . सावरकर माणूस नसून शेळी  आहे . परत ती सावरकर  भित्री शेळी आहे --- हे याच  ४२० केस चे मत आहे.     . ज्याला सावरकराना माणूस म्हणायचे नाही - त्याच्या आडनावाची  चिंता मी तरी करणार नाही .  बाकी त्यानी मारलेल्या थापा पाहुया …

सर्वात मोठी थाप 

सावरकर विषयक  लिहिताना गांधीजिंच्या खुनाचे  भांडवल केले पाहिजे हा फुरोगामी नियम निरंजनाने पाळला आहे . पण पुन्हा पुन्हा खोटे आणि पुरावे शून्य !   कपूर आयोगात पुरावे आहेत असे निरंजन टकलेंचे मत आहे.   . मग हा कथित शोध पत्रकार  गंमत करतो आणि त्याच्या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात म्हणतो - कि कपूर आयोग २२ मार्च १९६५ रोजी स्थापन झाला .  टकल्या खान्कून  खोटे बोलतो आहे. कपूर आयोग स्थापन झाला २१ नोव्हेबर १९६६ साली . शोध पत्रकाराने तारीख का बदलली ? या खोट्या तारखे मागचे कारण फार इंटरेस्टिंग आहे !

कपूर आयोग इंटर्नेट वर उपलब्द्ध आहे. कपूर कमिशन असे गुगल वर टाइप केले तर तो मिळेल. त्याच्या सातव्या पानाचा स्क्रीन शॉट खाली देतो आहे .




-------------------------------------------------------------------------------------------------------


टकल्याने कपूर आयोग १९६५ साली स्थापन झाला असे तद्दन खोटे त्याच्या लेखात  लिहिले आहे . टकले नामक शोध पत्रकार खोटे बोलतो -- कारण त्याला खोटे निष्कर्ष काढायचे आहेत. सावरकरांचा मृत्यू फेब्रुवारी १९६६ सालचा आहे . कपूर आयोग १९६५ साली दाखवला कि बर्याच थापा मारता येतात.

  १९६५ साली पाठक आयोग स्थापन झाला आणि जस्टिस कपूर नोव्हेंबर १९६६ साली नियुक्त झाले - असे स्वत: जस्टिस कपुरनीच त्या कपूर आयोगात लिहिले आहे. पण निरंजन टकल्यांनि  तारीख बदलली - कारण त्यांना  त्याच्या मालकांनी भाडोत्री निष्कर्ष काढण्यासाठी कामावर ठेवले आहे . जो आयोग सावरकर मेल्यानंतर काम सुरु करतो तो कपूर आयोग टक्ल्यांनि एक वर्ष अलिकडे खेचला आहे !! बिच्चारे कपूर ! वस्तुत: आधीच्या आयोगांनी पुरेसे  काम केले नाही म्हणून कपूर नियुक्त झाले होते.

या  शेळी  लेखात टकले लिहितात  


"The report, however, came too late. Savarkar died on February 26, 1966, weeks after he stopped taking food and medicines.  "
लेखकाचे उद्देश इथेच स्पष्ट होतात. रिपोर्ट उशिरा आला असे त्याला म्हणायचे आहे.
वस्तुत:  सावरकरांना फासावर चढवायची टकल्याची  संधि हुकली ती रिपोर्ट उशिरा आला म्हणून नाही . तर टकल्याने तारीख चुकवली म्हणून !

सावारकर मेल्यानंतर  जस्टिस कपूर आयोगाचे काम सुरु  झाले . हे तर लेखक  लपवतोच पुन्हा खोट्टारड्या थापाडेपणाचि मजल गाठत म्हणतो - कि , कपूर आयोगापुढे सावरकरांचे अंगरक्षक  अप्पा कासार आणि दामलेंचि साक्ष झाली आहे . आणि या साक्षितुन सावरकर गोडसे संबंध सिद्ध होतात ! खोटे बोलण्याच्या सर्व मर्यादा  त्यांनी  पार पाडल्या आहेत !! 

निरंजन समर्थक फ़ुरोगाम्यांनि  समजून घ्यावे कि  कपूर आयोगासमोर अप्पा कासार आणि दामलेंचि साक्ष झालीच नव्हती.

अजिबात नाही . 

टकल्याची हि शुद्ध थाप आहे . कपूर आयोग जो इंटर्नेट वर उपलब्ध आहे - त्यात साक्षिदारांचि लिस्ट आहे - त्यात कासार / दामले हि नावे नाहीत . खोटार्डेपणा हा निरंजन टाकल्यांच्या चारीत्र्या वरचा डार्केस्ट स्पोट होय .








इस्लाम समर्थक टकले 

टकल्यांनि  त्यांच्या लेखात एकही नवा पुरावा दिलेला नाही. शमसुद्दीन इस्लामला मात्र ठीक ठिकाणी कोट केलेले आहे - सेड इस्लाम असे टकल्याच्या लेखात  ठिकठीकाणी येते -  हा शमसुद्दिन इस्लाम कोण आहे ? या इस्लामने शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे ? ते मी सविस्तर लिहिणारच आहे .  निरंजन द पत्रकार - लिहितो कि , सावरकरांनि   फ़ाळणिला कारणीभूत ठरलेला  - दोन राष्ट्राचा सिद्धांत मांडला - आणि जिन्हांच्या मुस्लिम लीग ने तो उचलून धरला . म्हणजे हि आयडीया सावरकरांनि  जिन्हांना दिली !!  , टकल्यांचे मुळ वाक्य असे ,

"Thus, the theory of two nations, first proposed in Essentials of Hindutva, was passed as a resolution of the Mahasabha in 1937. Three years later, the All-India Muslim League, led by Jinnah, adopted the concept in its Lahore session."

निरंजन नेहमीप्रमाणे खोटे बोलतो आहे .  सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल.  परत लाल बाल पाल मधले - लाला लाजपत राय काय म्हटले होते ? हिंदु - मुस्लिम ऐक्याबद्दल ?? 

१९२४ सालच्या आधीपासून लाला लजपतराय फाळणीची बीजे रोवत आहेत. इस्लाम हा एक असहिष्णू धर्म आहे. आणि इस्लाम धर्म,  कुराण,  हदीस मध्ये हिंदुंचे हत्याकांड करावे असे स्पष्ट आदेश आहेत . असे लजपतराय म्हणतात . लाजपत राय हिंदु महासभेचे सर्वेसर्वा   आधीपासून होते - आणि हिंदू लजपत रायांच्या हत्येचा सूड घेण्याच्या केस मध्ये (सोडर्स मर्डर केस ) नास्तिक भगतसिंग हसत फाशीवर चढला . हे टकल्याला माहित असण्याचे कारण नाही .   मुळ कागद पत्रे सोडाच . इतिहासाचे पाठ्यपुस्तक सुद्धा या शोध पत्रकाराने वाचलेले नाही . लाला  लजपत राय लिहितात 


" गेले सहा महिने माझा बहुतेक वेळ मुस्लिम कायदा व मुस्लिम इतिहास यांचा अभ्यास करण्यात खर्च झाला आहे. यावरून माझे असे मत बनत चालले आहे कि - हिंदु मुस्लिम ऐक्य शक्य नाही आणि व्यावहारिक सुद्धा नाही . … मी मुस्लिम पुढार्यांवर विश्वास टाकायला  पुर्णपणे तयार आहे . पण कुराण आणि हदीस यातील आज्ञांचे काय ? "  (Ref Dr B R Ambedkar Volume 8 page 275 - 276) 

अर्थात थापेबाज टकल्याने आधी सावरकरच वाचलेले नाहीत मग हिंदु महासभेचे पूर्वसुरी लाला  लाजपत राय काय लिहितात ?  हे   कसे माहित असणार ? आणि लाजपत राय च्या हि  आधी १८८७ साली सय्यदांनि द्वि राष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती हे तरी कसे कळणार ? बाकी कुराण आणि हदीस वाचून इस्लाम तटस्थपणे समजून घ्यावा हि अपेक्षा शमसुद्दिन इस्लामच्या  शिष्य गणांकडून  करता येत नाही . 


नीच मनोवृत्ती   : लबाड   समर्थक 

सावरकरांच्या माफीवर निरंजन  बरेच तेवले आहे.   लेखानुसार सावरकर नउ वर्ष आणि दहा महिने जेल मध्ये होते . टकल्या किती दिवस जेल मध्ये होता ? आणि कोणत्या कारणासाठी ??   असो





हा शोध पत्रकार लिहितो  कि सावरकरांनी कोलु चालवलाच नाही ! निरंजन ब्रिगेडी असावा . स्वत:चेच खंडन करणारे पुरावे हा  पढतमूर्ख स्वत:च्याच लेखात देतो आहे. सावरकरांचे माफीपत्र म्हणून एक स्क्यान त्यांनी स्वत:च्या लेखात टाकला आहे . त्यात माफी तर नाहीच . भारतीय जेल मध्ये टाका - असे सावरकरांचे निवेदन दिसते . नेमक्या त्याच स्क्यान मध्ये - कोलु  चा  उल्लेख (ओइल मिल ) सावरकरांनी केला आहे .  निरंजनाने कोणत्या लॉजिकने सावरकरांनी कोलु  चालवलाच नाही असे म्ह्टले ? - ते कळायला मार्ग नाही . टक्ल्याच्याच लेखात आलेले सावरकरांचे वाक्य असे आहे  -  

" त्याच काळात मला कोइर च्या कामास जुंपले गेले माझे हात रक्त्बंबाळ झाले आणि नंतर मला तेलाच्या घाणीस (कोलु ) जुंपले गेले . येथील (अंदमानातील )  सर्वाधिक कष्ट दायक शिक्षा. " - सावरकर 




 नाशिकच्या निरंजन टकल्यांचे फ़ेकाड्पंथि लॉजिक इथेच संपत नाही . बंडल ऑफ कोण्ट्राडिक्श्न या चैकटित त्याने आणखी धमाल केली आहे . निरंजन टकले लिहितात  कि माझी जन्मठेप या पुस्तकात मात्र सावरकरांनि माफ़िपत्राचा उल्लेख केलेला नाही . हि खोटार्डेपणाचि लिमिट झाली . निरंजन टकले नि माझी जन्मठेप हे पुस्तक वाचले असते तर तसा उल्लेख अगदी स्पष्टपणे अनेकदा आला आहे हे त्याना  कळले असते. 

'आत्महत्या, भ्रम, धरपकड आणि दुसरा व तिसरा संप' या प्रकरणातील क्रॅडॉकबरोबर झालेली चर्चा पहा. प्रकरणाच्या शेवटी आहे. चौथा संप आणि शरीर स्वास्थ्याचा बिघाड यातही सविस्तर विवेचन आलेले आहे )

माझी जन्मठेप या पुस्तकात सावरकरांनी माफ़ि प्रकरण सविस्तर लीहिले आहे . पण सावरकरांच्या या पुस्तकात तसा उल्लेखच नाही असा दिव्य शोध दिवट्या निरांजनाने लावला आहे. माझी जन्मठेप मधील काही पानांचे स्क्यान : - 








 बाकी टकल्याचे अंध समर्थक त्याहून घातक आहेत. 


रत्नागिरीत सावरकरांनी हिंदुसभा हे एक समाज सुधारणा मंडळ स्थापन केले होते . त्याचा हिंदु महासभेशी काहीही संबंध नाही . थापा मारण्याच्या ओघात हिंदुसभा हे समाज सुधारणा मंडळ आणि हिंदु महासभा हा राजकीय प्ल्याटफ़ोर्म  यातला फरक लेखकाने बेमालूम दडपला आहे .  

पुढे सावरकर थेट  हिंदु महासभेत  गेलेले नाहीत आधी स्वराज्य पक्षात गेलेले आहेत , मग बर्याच काळाने लाला लाजपतराय यांच्या हिंदु महासभेत सावरकरांनी प्रवेश केला …

माफिचे उत्तरकांड  हि निरंजन निरंतर खोटेच बोलतो आहे . 

कथित माफी नंतर सावरकर सुटलेले नाहीत सावरकर  फक्त भारतातल्या जेल मध्ये हलवले गेले. आणि त्यांचे हिंदुत्व हे पुस्तक सुद्धा जेल मध्ये लिहिलेले आहे .   इथेही थाप  !

ते पुन्हा जेल मध्येच राहिले आणि नंतर रत्नागिरीत स्थान बद्धतेत राहिले. तिथेही सावरकरांच्या उद्योगात खंड पडलेला नव्हता . रात्नागीरीतली एक महत्वाची घटना टाकलेंच्या  लेखात येते . 

रत्नागिरी कालखंडात  क्रांतिकारक विनायक चव्हाण यांनी  ब्रिटीशांवर गोळ्या झाडल्या . हे चव्हाण सावरकरांचे अनुयायी होते असे टकल्याने स्वत:च्याच लेखात लिहिले आहे . परत  थोबाड  वर करून विचारतो आहे - 
कि सावरकरांनी अंदमान नंतर रत्नागिरीत  काय केले ?

थोबाड फुटले असते  

शिवसैनिक जुन्या फार्मात असते तर टकल्या विरुद्ध आंदोलन  फुटले असते. सुदैवाने सैनिक सध्या विवेकी झाले आहेत . हिंदुत्व हा शब्द १९४७ नंतर पहिल्यांदा उद्गारणार्या वडीलधार्या व्यक्तीवर  हलकट दर्जाची टिका करूनही - या खोटारड्याला फक्त वैचारिक विरोधाचा सामना करावा लागतो आहे . हि अतिशय समाधानकारक बाब आहे .  हा विवेक वाद असाच रहावा !!

पण निरंजन टकले यांकडे थोडाही विवेक नाही . धमक्या देणे , हमारी तुमरीवर येणे , लोकांना नपुंसक म्हणणे , बंदुका गोळ्या अशी भाषा वापरणे हि टकल्यांचि   वैचारिकता ! यापेक्षा अल्पशिक्षित सैनिक सभ्य आहेत .   टकल्यां सारखि भाषा वापरून मला माझे थोबाड बिघडवायचे नाही. 






सावरकरांचा बुद्धिवाद -  विज्ञान निष्ठा - जाति व्यवस्था विरोधी विचार - नास्तिक मत  याला टकल्याने त्याच्या लेखात स्थान दिलेले नाही . पण ते ठीकच…। 

कारण - टकले ने सावरकर वाचलेलेच नाहीत . सावरकर मुस्लिम लोकांस समान हक्क देऊ इच्छित होते . मुस्लिम सुधारक केमाल पाशाचे मुक्त कंठाने कौतुक करत होते .  मुस्लिमांना आधुनिक बुद्धिवादी विज्ञान निष्ठ होण्याचे आवाहन करत होते . 

हे त्यांच्या भाषणातले मुद्दे  हा शोध पत्रकार विचारात घेणार नाही … कारण तो इस्लामचा शिष्य  आहे . बाकी टकल्याने आमच्याशी वैयक्तिक भांडण घेऊन गोळ्या देण्या घेण्याची जाहीर भाषा केली आहे. 

 त्यानंतरहि त्याला मिळणारा गांधिवाद्यांचा पाठिंबा लक्षणिय आहे .  असो . 

मी आधी भारतीय  सैन्यातल्या   अधिकार्यां बरोबर काम केले आहे .  मेडिकल ऑफिसर होतो. श्रिलंकेतल्या युद्धभूमीवर वावरलो आहे . आणि हे बंदुक गोळ्या  सारे जवळून पाहिले आहे. देशाबाहेरील शत्रूकडून गोळ्या खायची आमची तयारी होती .  आणि देशाच्या आतील निरंजन टकल्या च्या समर्थका कडुन असे काही घडले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही .  











१५ टिप्पण्या:

  1. मुद्देसुद आणि जबरदस्त लिखाण. टकले याना चक्कर येईल वाचून, अर्थात लिखाण समजण्याची कुवत असल्यास.

    उत्तर द्याहटवा
  2. सडेतोड आणि आणि मुद्देसूद !!
    आता टकल्याची भूमिका काय हा प्रश्न राहील !!
    मला वाटत नाही कि तो उत्तर द्यायच्या फंदात पडेल
    शिवसेना अश्या वेळेला उभी राहायला हवी होती
    त्यांना सध्या सावरकर नकोत त्यांना मुंबई महानगरपालिका हवी

    उत्तर द्याहटवा
  3. मुद्देसुद आणि जबरदस्त लिहिलेत स्वातंत्रवीर सावरकर साहित्य वाचणे कठीण आहेच पण त्यापेक्षा स्वातंत्रवीर समजणे महाकठीण आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. अरे टकल्या जरा अभ्यास करून तरी बोलायचं ना? सावरकरांबद्दल लिहायला तू देशासाठी एक दिवस तरी तुरुंगात गेला आहेस का ते सांग ना !

    उत्तर द्याहटवा
  5. Lioniezed lamb was used as metaphor I believe and not in exact meaning of words. Though your reply looks to the point, it's more of personal attack than making a point. Rest hope Mr Takle reads and reply to it or makes an apology to close the matter.

    उत्तर द्याहटवा
  6. डॉक्टर साहेब मस्त मजा आली. असा तडका देणारा व खोटारड्या माणसाचे लेखन द वीक सारखे नियतकालिक का छापतात हा महत्वाचा प्रश्न आहे...

    उत्तर द्याहटवा
  7. Swatantya veer'Sawarkara Sarkhya'Desh bhaktabaddal'lihitana,konihi'purn mahiti,ghewun,lihawe...lihnaryane...swatachi...kuwat...Pramanikpana,Deshprem,ya goshti tapasawya.aani 'swatachya'hradayawar'Haat'thewun'vicharawe'ke'me'Sawarkara sarakhya che'nav'ghyayachya 'laykicha'aahe kay?..lekh lihine w tika karne'he'fukatchi w swast 'prasidhi 'milawanyachi'fashon'zali aahe...nidan'Rashtra purushawar'lihatana'kalji'ghyawi.

    उत्तर द्याहटवा
  8. टकल्या चा हेतू स्वतःला सुप्रसिद्ध करणे आणि द्वेष इतका लिमिटेड आहे. तो तसाच राहील.
    जाऊ दे त्याला तो काय करतो आहे हे कळत नाही.
    उपदेशोही मूर्खाणाम प्रकोपाय न शांतये।

    उत्तर द्याहटवा
  9. Taklya calling sawarkar a sheep & asking what has he done for Indian freedom . These are some of the answers for Takle. Below are some of the Savarkar's activities for the independence of India .

    Involvement in Jackson Murder Case.
    Involvement in Lord Curzon Wyllie's assassination.
    Conspiracy of using arms and explosives against the British authorities.
    Smuggling of weapons to India.
    His book on 1857 : War of Independence was sedition.
    Somehow his conspiracy got exposed and he got arrested. While he was being transported through the ship SS Morea, he escaped through the toilet window and swam to France, while dodging the bullets shot towards him!. For us Sawarkar will always remain a lion .

    उत्तर द्याहटवा
  10. एकूण एक मुद्दा खोडुन काढला आहे. मुद्देसुत लेख.

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *