२७ डिसें, २०१५

संघाची तीन मुले : नेमकी भूमिका काय आहे ?

संघाची तीन मुले : नेमकी  भूमिका काय आहे ?

हिंदु कुटुंबात कुटुंब नियोजन नको - किमान तीन मुले असली पाहिजेत  असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडुन आलेले आहे. जास्तीत जास्त किती असावीत ? याचा निर्णय मात्र उदार मनाने समाजानेच घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे !

संघ हि जगातली सर्वात मोठी सामाजिक संस्था असल्याच मी ऐकलय  . कसही असल तरी संघ हि भारतातली फार मोठी सामाजिक - राजकीय मतप्रणाली आहे यात शंका नाही . त्यांच्या मतांचे पालन करणाराही मोठा वर्ग हि आहे . त्यामुळे या मतामागाची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे .  हि मागणी संघाच्या अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वर्गानंतर - - संघाच्या सहकार्यवाहांनि घेतलेली अधिकृत भूमिका आहे . त्यामुळे हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत, धोरणात्मक  आणि गंभिर भूमिका आहे . उडत उडत केलेले विधान नव्हे .

बातमीची लिंक :

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/--/articleshow/24788881.cms

  आमचे एक पुरोगामी प्राध्यापक मित्र यास - - ब्रह्मचारी फौजेचे - लैंगिक आव्हान -- म्हणत टर उडवते झाले. या भूमिकेचे आंधळे समर्थन किंवा थिल्लर विरोध यातून मात्र काहीही साध्य होणारे नाही . एका मुलभुत प्रश्नाबद्दल यात भाष्य आणि संघाची भूमिका आलेली आहे . तो प्रश्न आहे लोकसंख्येच्या  धार्मिक प्रमाणाचा … सत्य काय आहे ?

संघाची भूमिका काय आहे ?

मुस्लिम लोकसंख्या वाढते आहे . ती इतर भारतीय धर्मांपेक्षा अधिक वेगाने वाढते आहे . असेच चालू राहिले तर काही वर्षात हा देश लोकसंख्येच्या मार्गाने मुस्लिम राष्ट्र बनेल आणि इतर भारतीय धर्म अल्पसंख्य बनतील . इथे संघाच्या अधिकृत प्रकाशनातही हिंदु अल्पसंख्य बनतील असे न म्हणता ''भारतीय  धर्म'' अल्पसंख्य बनतील असे म्हटलेले आहे .  अशाप्रकारे बहुसंख्या टिकवण्यासाठी. आणि हा देश इस्लामी बनण्यापासून वाचवण्यासाठी  कुटुंब  नियोजन धिक्कार आणि प्रजननाचा पुरस्कार करण्यात आलेला आहे.
मेकोले म्याकोले पुत्र







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *