२७ डिसें, २०१५

संघ परिवारातील वैचारिक गोंधळ

संघ परिवारातील वैचारिक गोंधळ : राम माधव आणि देवेंद्र फडणवीस

अखंड  भारत आणि मेकोलेच्या शिक्षण पद्धतीवर या दोन महानुभावांनी आज प्रचंड हाश्य कल्लोळ  विधाने केली आहेत. प्रथम अखंड भारताची गंम्मत पाहुया !

 भारत पाकिस्तान आणि बांग्लादेश हे पुन्हा एकत्र येतील आणि मग त्यांचा अखंड भारत निर्माण होईल असे राम माधव यांना वाटते . हे सर्व युद्धाने नाही तर  लोकशाहीच्या सार्वमताने (पोप्युलर कन्सेंट ) ने शक्य होईल असेही त्यांना वाटते ! म्हणजे राम माधव म्हणतात कि भारत पाकिस्तान आणि बांग्लादेशातले नागरिक एक  राष्ट्र होऊ इच्छितात !! हा भाबडेपणा आहे कि साबणाचे फुगे आहेत  ? बांग्लादेश स्वातंत्र्य संग्राम लढून १९७१ ला भारताच्या मदतीने पाकिस्तान हून वेगळा झाला ती काय गंमत होती का ? भाषिक राष्ट्रवाद कशाशी खातात ? दार उल इस्लाम , दार उल हरब इत्यादी गोष्टी ठाउक आहेत का ?

निदान डॉ आंबेडकरांचे फ़ाळणिवरिल प्रसिद्ध पुस्तक तरी वाचले आहे का ? संघात वाचन बंदि  आहे. सगळा भर बौद्धिक नावाच्या प्रोपोगांडावर !   





बरे समजा राम माधव यांच्या कल्पनेतले अखंड भारत तयार झाले . तर त्यात (भारत + पाक + बांग्ला = अखंड भारत ) = मुस्लिम लोकसंख्या जवळ जवळ ४०% असेल ! चाळीस टक्के !!

मग संघ परिवारातील नेते जे हिंदु लोकांना प्रजनन क्षमता वाढवा - हिंदु टक्का खतरेमे - पोरे पैदा करा असे आदेश देत असतात त्याचे काय करायचे ? हिंदुना काय स्पीडने पोरे पैदा करावी लागतील ? काय विनोदी प्रकार आहे हा ? देशाच्या इतक्या महत्वाच्या मुद्द्यावर अभ्यास नसेल तर  बोलू नये.

राम माधव यांच्या कल्पना सृष्टीत उद्याचा अखंड भारत तयार झाला आहे . त्याला सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात बर का . म्हणजे काय तर हे पहा - कराचीत गोशाळा बांधल्या जात आहेत . लाहोर ला रामनवमी साजरी होत आहे. इस्लामाबादेत महाआरती सुरु आहे. बलुचीस्तानाताल्या गोसंशोधन केंद्रात गायी चे तूप जाळून ऑक्सिजन तयार करण्याचा शोध लागला आहे . संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाने ढाक्याची महानगरपालिका शिवसेनेकडून जिंकली आहे ! आता काहीही बरळायचे  म्ह्टले तर !! रावळपिंडी मधील काझीमुल्ला ब्राम्हण भोजनात सरसंघचालक स्वत:च्या हाताने तूप वाढत आहेत आणि….
 40% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारतात भाजपाचे राज्य यावच्चंद्र दिवाकरौ चालो  असे आशीर्वाद  त्या भोजनावळित मिळत आहेत !!  ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... ४०% मुस्लिम लोकसंख्येच्या अखंड भारतासाठि आग्रही  असतात... हा एक विनोदच आहे. (संदर्भ पहिल्या कोमेंटित )

हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे. 

मुस्लिम हा हिंदुपेक्षा राजकीय दृष्ट्या अधिक सजग आहे.  हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते. फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली . अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व खाडकन  उतरले. फाळणी हा गेल्या हजार वर्षातला हिंदुंचा सर्वात मोठा विजय आहे . हिंदू च्या सर्वात जास्त भाग्याची गोष्ट आहे.  गुलामी रक्तात इतकी भिनली आहे काय ? कि पुन्हा लोकशाही मार्गाने  देशाचे इस्लामिस्तान बनवू पाहत आहात ? ४० % मुस्लिम लोकसंख्येच्या च्या अखंड भारतात भाजपा सोडा कोन्ग्रेस तरी निवडुन येईल का ? असदुद्दिन ओवेसिला ( पंतप्रधान)  वजीरे आझम करायचे असेल तर अखंड भारत हा एक लोकशाही मार्ग आहे. 

---------------
---------------

दुसरे विनोदी विधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे आहे . फडणवीस साहेब म्हणतात कि देशातील १८५४ पूर्वीची शिक्षण व्यवस्था आपली मूळ शिक्षणपद्धती होती ती इंग्रजांनी मोडून काढली आणि भारतविरोधी शिक्षण पद्धती लादून इथला मूळचा विचार बिघडवला, त्यातून इथले ते सगळे टाकाऊ व पाश्चात्त्य ते सगळे चांगले हा विचार रुजवला. येथील संस्क्रुत पाठशाळा इंग्रजांच्या म्हणजे मेकोलेच्या शिक्षण पद्धतीने बंद पडल्या असा फ़डणविसांचा आक्षेप आहे . संघाच्या बौद्धिकांतुन त्याना हे "ज्ञान"  मुख्यमंत्र्यांना  मिळाले असावे . हे म्याकोलेचे भूत लवकर खांद्यावरुन उतरवलेले बरे !  (संदर्भ दुसर्या कोमेंटित )

मेकोलेने  संस्क्रुत वेदपाठशाळा बंद केल्या नाहीत . त्याला सरकारी अनुदान थांबवले. तसाही संस्क्रुत वेदपाठशाळेत किती हिंदुना प्रवेश होता ? आणि वेद घोकून देशाचे काय भले होणार होते ?  मेकोलेने या शिवाय अरबी मदरशांचेही अनुदान बंद केले होते . पुन्हा निट ऐका - मेकोलेने इस्लामी मदरशांचे सरकारी अनुदान बंद केले होते. त्याचा अर्थ समजतो का ? मदरसे आणि वेद पाठशाळा याचे महत्व कमी करून -- धार्मिक शिक्षणाचि मर्यादा ओलांडुन --- मेकोलेने भारतासाठी भविष्याची दारे उघडी केली होती . लोर्ड मेकॉले या आधुनिक भारताच्या भाग्य विधात्याला शत्रू मानणे हा कृतघ्नपणाचा  कळस आहे .






मी स्वत: मेकोलेपुत्र आहे . आणि त्याचा मला अभिमान आहे .आधुनिक वैद्यकशास्त्र शिकलो बरे आयुष्य जगू शकतो ….  नाहीतर  कुठल्यातरि  वेद्पाठशाळेत उघडाबंब अवस्थेत शेंडी ठेवून  जुनाट ऋचा घोकत बसलो असतो. बर मी एकटा मेकोलेपुत्र नाही . तुम्ही सारे वाचक मेकोलेपुत्र आहात . गांधीजी,  नेहरू , सावरकर , आगरकर , आंबेडकर , टिळक हे सारे मेकोलेपुत्रच  आहेत . ब्यारिस्टर आहेत , वकील आहेत पदवीधर आहेत . आधुनिक शिक्षणाने हि व्यक्तिमत्वे उभी राहिली आहेत. मेकोलेपुत्रांनि भारताला स्वातंत्र्य मिळवुन दिले. ब्रिटांशाच्या गुलामीचे उद्गाते वेदांती पेशवे दुसरे बाजीराव होते.  इतकेच काय खुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा मेकोलेपुत्र आहेत. वेदपाठशाळेतिल याद्निक नव्हे.

इमोशनल करायला आणि पोलिटिकली करेक्ट  म्हणून  शिवाजी महाराज यात न आणलेले बरे . नाहीतर पेशवाई आणि शिवशाहीत कायद्याच्या आणि शिक्षण व्यवस्थ्येच्या अनुषंगाने ५ - १०% सुद्धा फरक मिळणार नाहि. हे सत्यही सांगावे लागेल

 -------------------
चौदा विद्या व चौसष्ठ कला कोण शिकवत होते? भारतात जे वेद्पाठशाला सोडुन  इतर शिक्षण होते त्याचे काय ? तक्षशीला आणि नालंदा इत्यादी विद्यापीठात काय शिकवले जात होते . हृदयावर हात ठेवून ऐका . त्यापेक्षा अधिक चांगली शिक्षण व्यवस्था  लॉर्ड थॉमस बॅिबग्टन मेकॉले याने भारतात आणली .या विषयातील तज्ञ रा भा पाटणकर यांनी या विषयावर बरेच संशोधन आणि अभ्यास केला आहे .
-------------------------

रा भा पाटणकरांनि भारतातील प्राचीन आणि अर्वाचीन शिक्षण पद्धतीचा सखोल वेध घेणारे पुस्तक लिहिले आहे. अपुर्ण क्रांती असे त्या पुस्तकाचे नाव आहे.  त्यांनी भारतातील जुनी शिक्षण व्यवस्था (वेदपाठशाला सोडुन इतर ) किती मागास होती याचा योग्य वेध घेतला आहे. आणि मेकोलेच्या शिक्षण पद्धतीला अधिक आधुनिक आणि उपयुक्त करण्यासाठी काय बदल केले पाहिजे याचाही वेध घेतला आहे. संघात वाचन बंदि  असावी . नायतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानि इतके विनोदी विधान केले नसते.

------
 प्राचीन भारतात इतिहास हा विषय कोण्या राजकुमारांनि शिकला होता का ? भूगोल हा विषय राजे महाराजांनी अभ्यासला होता काय ? साध्या नकाशा या शब्दाला संस्क्रुत शब्द का मिळत नाही ? पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर डोलते असे उत्तर पेशवाईच्या अंतापर्यंत तज्ञात एकमत होते । बीजगणित भूमिती दैनंदिन हिशेबापलिकडे गेली होती काय ? उत्तर नाही असे आहे . पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र हे तर विषय नाम सुद्धा इंग्रजीतून  भाषांतरीत आहे. मेकोलेने हे सर्व विषय आणि रूपरेखा भारतात आणल्या पण या बोडसभक्तांना वेदातली काल्पनिक विमाने दिसतात . प्रत्यक्षातले ज्ञान दारिद्र्य नाही . दुर्दैव ! तथाकथित भारतीय शिक्षण पद्धतीत काही वैगुण्य असल्याशिवाय भारत गुलाम झाला का ?

"आता राहिला प्रश्न मेकॉले यांच्या नावावर खपवल्या जात असलेल्या भारत विरोधी  उताऱ्यांचा. ते साफ खोटे आहे . शुद्ध थाप . त्यातला पहिला इंग्रजी शिक्षणामागील तथाकथित कुटिल हेतूबाबतचा उतारा हा मेकॉले यांचा नाहीच. हा उतारा ३५चा, पार्लमेन्टमधल्या भाषणातला, असे सांगण्यात येते. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणाऱ्या भाषणांच्या संग्रहाला हॅन्सार्ड असे म्हणतात. त्याच्या कोणत्याही प्रतीतील कोणत्याही तारखेत हा उतारा नाही. कसा असणार? 1835 ला मेकॉले इंग्लंडमध्ये नव्हतेच. ते भारतात होते. शिवाय या मूळ इंग्रजी उताऱ्यातील विचार तर सोडाच, भाषाही त्यांची नाही. ती फारच अलीकडची आहे. तेव्हा हा उतारा बनावट आहे. मग तो कोठून आला?" बाकी आधुनिकता आणि विज्ञान यात स्वकीय परकीय वगैरे काही नसते . मदर तेरेसा अंधश्रद्ध प्रतिगामी आहे म्हणून तिचा विरोध करा - --. मदर तेरेसा आणि न्यूटन यांना एका मापात मोजू नका . विज्ञान युरोपात जन्मले ते शिकले पाहिजे . स्वातंत्र्य , समता , बंधुता आणि राष्ट्रवादाचा आधुनिक विचारही युरोपियन फ्रेंच राज्यक्रांतिचे अपत्य आहे . मी स्वत: राष्ट्रवादी आहे . इथे राहणार्या सर्व माणसांचे हित असा माझ्या राष्ट्रवादाचा आशय आहे . पण आधुनिकतेचा निषेध करत संस्कृतीचे पाढे घोकणे  हा तुमचा राष्ट्रवाद असेल तर आग लागो असल्या देशभक्तीला ! गोमातेच्या जेनेटिक वंशजांना दुसर्याला ब्राउन साहेब म्हटले कि गोमुत्र प्यायल्या एव्हढे पवित्र वाटत असले पाहिजे !

मेकोलेच्या वरील सर्व खोट्या आरोपांचा समाचार घेणारे विस्तृत अभ्यासपूर्ण पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.  डॉ. जनार्दन वाटवे , डॉ. विजय आजगावकर या लेखक द्वयीने अतिशय अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. निर्वाचन आयोग बंद करून  ते वाचले पाहिजे. ( लिंक तिसर्या कोमेंटित )

संदर्भ :


१) http://timesofindia.indiatimes.com/india/India-Pakistan-and-Bangladesh-will-reunite-to-form-Akhand-Bharat-Ram-Madhav/articleshow/50333856.cms

२) http://mumbaitarunbharat.in/Encyc/2015/12/25/%E2%80%98%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-.aspx#.Vn8P5vl96Ul
३) http://www.globalmarathi.com/20140127/4912419355158098324.htm


1 टिप्पणी:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *