२५ नोव्हें, २०१५

आमिरचे इस्लामी अंतरंग


आमिर  खान चे ग्रेट पूर्वज मौलाना जमालुद्दीन यांनी सहिष्णू अकबर बादशहा  विरुद्ध  जेहाद पुकारला होता हे कोणाला माहित आहे ? जेहाद म्हणजे काय ? अथवा देश सोडुन जाणे - हिजरत याचा इस्लामी पारिभाषिक अर्थ किती लोकांना समजतो ? इस्लाम बद्दल संपुर्ण अज्ञान बाळगणारी जमात म्हणजे हिंदु . आणि इस्लामला  दुध पाजून गोंजारणारा घटक म्हणजे पुरोगामी हिंदु . ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग या धर्माने शीख असल्याने त्यांच्याजवळ हिंदु पुरोगाम्या एव्हढी सद्गुण विकृती नाही . म्हणून त्यांनी खांन साहेबाच्या असहिष्णू परदेश वापसी वर सणसणीत गुगली टाकली.   ती गुगली टोलवण्याच्या नादात आमिरचा  त्रिफळा  अल्ला, कुराण  आणि हिजरत च्या रूपाने प्रकटला . तवलिन सिंग यांनी स्पष्टच विचारले कि इस्लामी दहशत वादाबद्दल  भारतीय असहिष्णुते इतकी काळजी वाटते का ?  त्यावर चर्चा घडली . या प्रश्नोत्तराचा अर्थ  हिंदू लोकांना कळणार नाही कारण त्याना इस्लामचा अर्थ आणि संदर्भ बिल्कुलच  समजत नाही . हिंदुत्व वाद्यात अभ्यासाची परंपरा नाही . आणि पुरोगामी अभ्यासकात इस्लामचे खोटे कौतुक करण्याची परंपरा आहे . आमिरची  भूमिका  समजून सांगायला हा लेख लिहित आहोत.  अमीर फार मोठ्या इस्लामी खानदानाचा चिराग आहे . त्याच्या घराण्याचा इतिहासही समजून घ्यावा लागणार आहे .

आमिर खानचे  केवळ त्या घराण्यात असणे   महत्वाचे नाही . तर त्यांचे विचारही  पूर्वजांशि जुळतात   ते महत्वाचे आहे . 

एकाच मुलाखतीत भारताला असहिष्णू  … इस्लामला  सहिष्णू आणि … भारत सोडण्याला वर्धिष्णू असे आमिर खान का म्हणाला ? याचा उलगडा लेख वाचल्यावर होऊ शकेल . आणि हे केवळ मुस्लिम व्होट बेंक पोलिटिक्स नव्हे - जिता जागता इस्लाम आहे .  याचीही प्रचीती येईल .
त्रिफळा : आमिरची असहिष्णुता , आझादांचा करार  आणि जमालुद्दीन चा जेहाद 


असे भारत सोडुन जायचे आवाहन आमिरच्या खानदानात अनेकांनी केलेले आहे . त्याला इस्लामी परिभाषेत हिजरत असे म्हणतात .  आमिरचे मामे आजोबा म्हणजे अबुल कलाम आझाद आणि या मामुजान चे  ग्रेट पूर्वज म्हणजे मौलवि जमालुद्दीन होय . (१)  या तिघांचे रक्ताचे थेट नाते तर आहेच शिवाय इस्लामी मेंदुच्या ताराही जुळलेल्या आहेत . आमिरची असहीष्णूता समजून घ्यायची असेल तर प्रथम मामुजान मौलाना  आझादांची हिजरत समजून घ्यावी लागेल  आणि त्या आधी  त्याचे ग्रेट पूर्वज मौलवी जमालुद्दीन यांचा जिहाद समजून घ्यावा लागेल.  तर आमिरचे ग्रेट पूर्वज मौलाना जमालुद्दीन यांनी सहिष्णू अकबरा विरुद्ध  जेहाद पुकारला होता .  (२)

या दोन पूर्वज मौलानांशी  आमिर खानचे विचार कसे जुळतात ते  पाहुया.  


जमालुद्दीन चा अकबरा विरुद्ध  जेहाद   


बादशहा अकबर हा मध्ययुगातला विचारी राजा आहे. आणी नव्या अनुभवानी.... नव्या विचारानी माणसे बदलतात.... याचे उदाहरण आहे. सुरवातीला पारंपारिक जुलमी असलेला अकबर पुढे भारतातील वेगवेगळ्या पंडितांशि चर्चा करू लागला . धार्मिक विषयांवर चर्चा करण्याचा छंद अकबराला लागला आणि त्यासाठी इबादतखाना नावाचे नवे ऑफिस अकबराने उघडले . 

शिया, सुनी, पारशी, शीख, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव असे वेगवेळ्या पंथांचे पंडित बोलावून - इबादतखान्यात अकबर त्यांच्याशी चर्चा करू लागला. येथे चार्वाकाचे अनुयायी येवून गेल्याचे नोंद आहे. या चर्चात परस्पर मतांचे मंडन , खंडन होत असे. कफिरांना कुराणचे खंडन करायचा अधिकार देणे मौलवींना पटण्याजोगे न्हवते. हळूहळू सर्वच धर्म खरे आहेत अशा भुमिकेवर अकबर येवून पोचला. शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख अकबर बादशहाच्या काळात आढळतो . हा शहाणा अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता . उत्तर आयुष्यात १५८२ साली अकबराने इस्लाम धर्म सोडून दिला आणि दिने इलाही नावाचा नवाच धर्म काढला .त्याच्या या नव धर्माला - धर्म ग्रंथच नव्हता . मौलवी / पंडित हि भानगड पण नव्हती . या नव धर्म स्थापनेवर कदाचित चार्वाक मताचा अंशत: प्रभाव असावा.  

अकबराने  हिंदुवर लावलेला झिजीया कर  रद्द करून टाकला पुढे मुस्लिम धर्मगुरूंचा ब्लास्फेमीचा अधिकार  काढून घेतला. इस्लामचे प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांवर कुणी टीका केली तर मुसलमान ते सहन करू शकत नाहीत. अशी टीका करणार्यांचा छळ करण्याचा अधिकार मुस्लिम धर्मगुरूंकडे असतो. आजही सर्व मुस्लीम देशात हा कायदा आहे. १५७९ साली अकबराने हा कायदा रद्द केला. (२)

अकबराने ब्लास्फेमीचा कायदा रद्द केल्यामुळे मौलवी चिडले. त्यांनी अकबराविरुद्ध बंड केले. कलक्त्त्याला मोठे बंड झाले. अकबराचा पाडाव झाल्याशिवाय भारतात इस्लामला भविष्य नाही असे मौलवींना वाटत होते. त्यांनी अकबराला काफर म्हणून जाहीर केले आणी अकबराविरुद्ध जिहाद पुकारला. अकबराने उलेमा आणी मौलवींचे बंड क्रूरपणे चिरडले. अनेक शेख आणी फकीर हद्दपार केले. अनेकांना कंदाहरच्या बाजारात विकले. त्यांच्या दर्गे आणी मशीदिंच्या जमिनी जप्त केल्या. राजकीय गोंधळ घातल्यास वक्फ च्या जमिनी जप्त करणारा आणी इस्लामी धर्मवेड्यांना गुलाम करून कंदाहरच्या बाजारात विकणारा, अकबर हा पहिला आणी शेवटचा भारतीय. 

 अकबर त्याच्या धर्म चिकित्सक बुद्धीमुळे आणि धर्म सहिष्णू राज्य कारभारामुळे तो सर्व धर्मीय प्रजेत लाडका होता . दिने इलाही या नव्या धर्माचा संस्थापाक  म्हणून  तो निर्वातला .  शिवाजी महाराजांनीही अकबराची स्तुती केल्याचे उल्लेख इतिहासात येतात. 

ज्यांनी अकबराविरुद्ध जिहाद केला   - अशा प्रसिद्ध मुल्ला मौलवित जमालुद्दीन हे नाव फार महत्वाचे आहे. ते मेहदवि चळवळीचे पाठीराखे होते . सय्यद नुरुद्दीन या आपल्या पूर्वजाचा वारसा ते चालवत होते . सय्यद नुरुद्दीन यांनी इस्लामी राजेरजवाड्यांनी इस्लामची मुल तत्वे सोडून भरकटू नये म्हणून हि चळवळ चालवली होती .  सय्यद नुरुद्दीन आणि जमालुद्दीन या प्रसिद्ध मौलवींच्या वंशात मौलाना आझादांचा जन्म झालेला आहे . (२) मौलाना आझाद हे अमीर खानचे मामे आजोबा होत . 


आझादांचा करार  


भारताच्या राजकारणात मुल्ला मौलाविना आणण्याचा अग्रमान मौलाना आझादांकडे जातो. १९१२ साली मौलाना आझाद यांनी 'अल हिलाल' नावाचे उर्दू साप्ताहिक  काढले आणि राजकारणात धर्म (इस्लाम ) आणला पाहिजे याचा ते जोरदार प्रचार करू लागले . (२). त्यांच्याच प्रेरणेने जमियत उलेमा हिंद नावाची उलेमांचि संघटना स्थापन झाली  आणि मौलविंनि धर्माचे आवाहन करून मुस्लिमांना उत्तेजित करायला सुरवात केली . ब्रिटिशांचे शासन आल्यामुळे भारत हा दार उल हरब (शत्रू भूमी ) बनलेला आहे . सबब ब्रिटिशांना हाकलून देऊन कुराण आणि शरियत वर आधारित राज्यव्यवस्था आली पाहिजे अशी मागणी मौलवी करू लागले. ब्रिटिशांना  विरोध करण्यासाठी या मौलविंनि कोन्ग्रेस शी हातमिळवणी केली म्हणून त्याना राष्ट्रवादी मुसलमान म्हटले जाते .  मौलाना आझादांच्या 'अल हिलाल' मध्ये अशी शिकवण दिली जात होती कि , 

"एका हातात धर्म आणि दुसर्या हातात राजकारण पाहिजे, पण कुराण मात्र दोन्हीकडे पाहिजे . (इमानवंत  हो = अल्लाहशी एकनिष्ठ ) तुम्ही अजिबातच हिंदुना घाबरू नका . फक्त अल्लाहची भीती बाळगा. तुम्ही अल्लाहने दिलेला गणवेश टाकून दिलेला आहे . तो अंगावर घाला म्हणजे सारे जग तुम्हाला घाबरू लागेल .  तुम्ही अल्लाहने पाठवलेले पृथ्वीचे शासन कर्ते आहात.   '(३)मध्ये  आझादांनी कुराणाचा सहिष्णू अर्थ लावण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला .  या अक्षम्य गुन्ह्याबद्दल मौलविंनि त्याना तीन वेळा दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा दिली . हा  काल्पनिक फतवा  कधी आमलात आणला गेला नाही . पण मुस्लिम समाजाचे राजकीय नेते होण्यासाठी काय करावे ? वा करू नये ? याची पुन: शिकवण आझादांना मिळाली. 

काफ़िरांशि संबंध ठेवण्याचे ३ इस्लामी मार्ग :

जिहाद , करार आणि हिजरत हे इस्लामनुसार काफ़िरांशि राजकीय व्यवहार करण्याचे तीन महत्वाचे मार्ग आहेत. जिहाद (प्रयत्न  / पराकाष्ठा ) प्रथम स्वत:च्या मनातल्या गैर इस्लामि वृत्तीविरुद्ध करायचा आहे . नंतर वाणी आणि लेखणीने काफ़िरांना इस्लाम मध्ये बोलवायची दावत देण्यासाठी जिहाद करायचा आहे . इतके समजावूनही काफिर मुस्लिम झाले नाहीत तर मात्र (जिहाद बा सैफ ) तलवारीचा जिहाद करावा अशी कुराणाची आज्ञा आहे . अर्थात जिहाद करण्या एव्हढी शक्ती प्राप्त होई पर्यंत काफ़िरांशि करार (मोइदा ) करून राहता येते. तेही न जमल्यास दार उल हरब (शत्रू भूमी)  ला सोडुन  . दार उल इस्लाम मध्ये स्थलांतर करावे लागते . अशाप्रकारे देश सोडुन जाण्याला हिजरत असे म्हणतात .

मौलाना आझादांच्या मते काफिर हिंदुशि करार (मोइदा ) करून भारतात रहावे. इंग्रजांविरुद्ध जिहाद करण्यासाठी मौलाना आझादांनी  हा निर्णय घेतलेला आहे . हिंदुशि केलेला हा करार हा कुराण आणि शरियत या इस्लामी कायद्यानुसारच आहे अशी आझादांचि धारणा आहे .  असगर आली इंजिनिअर  लिहितात : (४ )

" हिंदु मुसलमान यांनी एका राज्यात रहावे यासाठी , आझाद प्रेषित मुहम्मद यांनी ज्युंबरोबर केलेल्या मदिना कराराचा आधार घेत असत ."  ते प्रेषीतांचे उदाहरण असल्याने शरियतचा भाग होत होता . या मदिना करारात शरियतचे राज्य असणार होते . राज्याचे प्रमुख प्रेषितच होते. कायदे करणारे , त्यांचा अंमल करणारे व न्याय देणारे तेच होते . हे प्रेषीतांचे अधिकार मौलाना आझादांना इमामासाठी पाहिजे होते . इमामाच्या  राज्याखाली हिंदुनि रहावे असे त्यांना वाटत होते . (४,५)
जमालुद्दीनचा जिहाद आणि आझादांचा करार समजून घेतला कि आमिरची असहिष्णुता समजण्यास मदत होईल . इस्लामची जुजबी ओळख झाल्यावर आता , तवलीन सिंग आमिर खान आणि मुलाखतकार यांच्यात काय चर्चा झाली ते पाहू :आमिरचा इस्लाम वाद  : दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो !


भारतात असहिष्णुता वाढली आहे काय ? याचे उत्तर आमिर खान ने होकारार्थी दिले . बायकोचे नाव घेऊन भारत देश सोडुन जाण्याविषयी बोलला . तिचेअसहिष्णू  मत आमिरानेच सार्वजनिक केले आणि ते मान्य असल्याचेही सांगितले .  पण हि चर्चा इथे थांबत नाही . आमिरला दहशत वादाविषयी प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने दहशतवादाला कोणताच धर्म नसतो असे उत्तर दिले . इस्लामी दहशतवाद असे म्हणू नये  असे आमिरने ठासून सांगितले . मग उगीच इतरही धर्माची  नावे घेतली ! दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो असे हे लॉजिक ! पिके चित्रपटात हिंदुच्या देवाधर्माची चिकित्सा आणि चेष्टा  करणारा पुरोगामी आमिर खान इस्लाम बद्दल भलताच आस्तिक निघाला !

आमिर खान चा जन्म इस्लाम मधील अतिशय महत्वाच्या मौलविंच्या घरातला आहे . त्या सांस्कृतिक वारशातून आणि बहुश्रुत , वाचनातून त्याला इस्लाम बद्दलच्या सर्व चर्चा ठाउक आहेत. आमिरचा ब्लोग पाहिला तर त्याच्या या संबंधिच्या ज्ञानावर सहज प्रकाश पडेल. 

तवलीन सिंग यांनी हि चर्चा पुढे वाढवली , त्यांनी म्हटले 
"इस्लामला वाचवण्यात काहीहि  अर्थ नाही. प्यारिस मधील हल्लेखोरांच्या हातात कुराण होते . ते अल्लाहू अकबर ओरडत होते. भारत जितका सहिष्णू वा असहिष्णू आधी होता तितकाच आताही आहे . आमिर जर तू  (हिंदुंच्या ) असहिष्णुते बद्दल इतका संवेदनशील आहेस तर या दहशत वादी हल्ल्यांबद्दल तुझी संवेदना काय आहे ? … वहाबी इस्लामच्या वाढत्या प्रसाराबद्दल तुझे काय मत ? "

यावर उत्तर देताना खान साहेबांनी वहाबी इस्लाम बद्दल चकार शब्द काढला नाही. उलट इस्लाम किती गोंडस आणि शांततेचा धर्म आहे हे ते पटवत बसले . अशाप्रकारे  मोडरेट लोक्स  धर्माचे रक्षण करतात. आणि धर्मातून  नवे   दहशतवादी तयार होत रहातात.

हिंदुच्या असहिष्णुतेने चिंताक्रांत झालेला आमिर खान इस्लामी दहशतवादाबद्दल कशी  धर्म रक्षक भूमिका घेत होता ते वाखाणण्या जोगे होते.

तवलीन सिंग यांनी असेही सुचवून पाहिले कि गालिब चा भारतीय इस्लाम आणि वहाबी आक्रमक इस्लाम यात फरक केला पाहिजे . आमिरने हा सल्ला धुडकावुन लावला  . सारा इस्लाम निष्पाप आहे आणि इस्लाम हिंसेला परवानगी देत नाही अशीच रट शेवटपर्यंत लावली. आमिर मौलाना आझाद आणि मौलाना जमालुद्दीन यांची पेन इस्लामिक भूमिका मांडत राहिला .

कुराणात काही सुरा मक्का शहरात  अवतीर्ण झाल्या आहेत आणि काही सुरा मदिना शहरातल्या आहेत . शक्ती कमी असताना इस्लाम धर्माचे गोड बोलून रक्षण आणि शक्ती वाढली कि परधर्म निर्दालन अशी कुराणाची स्पष्ट शिकवण या वरून समजते . जामाते इस्लामीचे संस्थापक मौलाना मौदुदि आणि नास्तिक अभ्यासक नरहर कुरुंदकर यांनी या विषयावर बरेच भाष्य केलेले आहे . (७)

एकतर आमिरची भूमिका कुराणाला धरून पडत्या काळातील गोड बोलून  धर्म रक्षणाचि असेल……  किंवा तो इस्लामची चिकित्सा करायला भीत असेल .

जर तो इस्लाम बद्दल बोलायला भीत असेल आणि हिंदुच्या असहीष्णूतेबद्दल एल्गार करत असेल तर - सहिष्णू कोण ? हे आमिरनेच समजून घेतलेले बरे.

 काही कलाकार याआधी भारत सोडतो वगैरे बोलले होते पण त्यांनी कोणतीही धार्मिक वा राजकीय टिप्पणी केली नव्हती .  आमिरने ती केली .

आमिर खान च्या इंटरर्व्ह्यु मधील ४ मिनिटे (व्हिडियो )इतक्या अतिरेकी हल्ल्यांनंतरही इस्लामला हिंसक ठरवणे
चुकीचे आहे....
बर  मग..
दोन - चार घटनांवरून माझ्या देशाला तुम्ही असहिष्णू का ठरवताय ?"

याचे उत्तर  आमिर खान ला आज ना उद्या  द्यावे लागेल


अमिर खानची हिजरत 


ज्या देशात इस्लामचे भवितव्य कठिण दिसते त्या देशातून निघून जावे - हिजरत करावी  अशी इस्लामी धर्माज्ञा आहे. त्यानुसार आमिर खान ने भारत सोडुन जाण्याची भाषा केली आहे .

जमालुद्दिनचा जिहाद हरला ,  आझादांचा करार फसला आता देश सोडुन अन्यत्र जाणे (हिजरत) हि इस्लामी धर्माज्ञा आहे.  हिंदुत्व वादि पक्ष एकाहाती सत्तेत  आल्याने आमिरच्या पुर्वजांचे इस्लामिक भारताचे स्वप्न फसले आता हिजरत हा एक पर्याय तो सुचवू पाहतो आहे . खरे पाहता आमिरची भीती अनाठाई आहे . हिंदुत्व वाद्यांची  मर्यादा आत्गौरव आणि सनातनी पणा इतकीच आहे . वस्तुत: इस्लामचे पालन पोषण करण्यास (पुरो/प्रती) सर्वच हिंदु कटिबद्ध आहेत .

तरी  आमिरची हिजरत मागील  भूमिका समजून घेण्यासाठी त्यांचे  बडे  मामूजान मौलाना आझाद हिजरत विषयी काय म्हणतात ते पाहुया . ( साल १९२० खिलाफ़तच्या दरम्यान )

" शरियतच्या सर्व तरतुदी , सद्य:कालीन घटनाक्रम , मुस्लिमांचे हित आणि राजकीय साधकबाधकता या सर्वांचा विचार करून माझे समाधान झाले आहे कि , …. भारतीय मुसलमानांना भारतातून हिजरत (देशांतर ) केल्याशिवाय अन्य कोणताच पर्याय उरलेला नाही . … जे लगेच हिजरत करू शकत नाहीत त्यांनी हिजरत करणार्यांना (मुहाजीरीन ) मदत केली पाहिजे. " (६)

आमिर खान स्वत: अत्ता हिजरत करू शकत नाही हे उघड आहे ,  त्याचे आर्थिक हितसंबंध भारतात आहेत . कदाचित तो इतर इमान वंतांना तसे सुचवत असावा . खरे पाहता त्याची गरज नाही . सनातनी हिंदुत्व वादी आणि इस्लाम रक्षक हिंदु पुरोगाम्यांच्या भारत देशासारखी सुपीक जमीन इस्लामला कोठेच मिळणार नाही .

जमालुद्दिनचा जेहाद , आझादांचा करार आणि आमिर खान  ची हिजरत अशी एका माळेचे मणि ! बडे मामू  मौलाना आझाद खिलाफातीसाठी लढत इमान्वंत मुस्लिमाना हिजरत करण्याचे आवाहन करीत . त्यानुसार १९२० सालच्या आसपास १८००० इमानवंत हिजरत करून अफगाणिस्तान ला गेले होते . परंतु लगेच अफ़गाणिस्तानच्या आमिराने आपल्या सरहद्दी त्यांच्यासाठी बंद केल्या - मग हि हिजरत मोहीम थांबली. (५)

आज कोणि हिजरत करतो म्हणाला तरी हेच परिणाम दिसतील !

हज यात्रेला जाउन मुसलमान सैतानाला  दगड मारण्याचा एक विधी करत असतात . अर्थात हा विधी प्रतिकात्मक आहे . खर्या सैतानाला वाळूचे कण मारून काही उपयोग नाही --  धोंडे मारले पाहिजेत हे इमान वंतांना चांगलेच कळते . अशाच प्रकारे हि आमिरची प्रतीकात्मक हिजरत आहे . खरी खरी नाही !

तरीही इस्लामी जगतात हिजरत कि मोहिदा यावर  चर्चा सुरु झाली आहे . आजच ओवेसीने हिजरत करणार नाही म्हणून सांगितले . हि चर्चा सुरु करण्याचे श्रेय आमिर खान कडे जाते .


पवित्र हज यात्रेत सैतानाला दगड मारताना श्री आमिर खान मुसलमान जर ‘खरे’ मुसलमान बनले तर संघर्षच उरणार नाही.अशी आमिर खान ची भूमिका दिसते.   हे ‘खरे’ अमुक बनावे काय? हा प्रश्न एकदा ‘ओशों’ना विचारला गेला. ते म्हणाले “अरे भाई अगर कच्चा हिंदू और कच्चा मुसलमान इतना खतरनाक है, तो जरा सोचो! सच्चा हिंदू और सच्चा मुसलमान कितना खतरनाक होगा!!”
-------------------------------------------------------------------

ताजा कलम : संगीतकार ए आर रहमान यांनीही असहिष्णुते बद्दल भूमिका घेतली आहे .
ए आर रेहमान  यांच्या  या भूमिकेचे स्वागत . 

रहमान यांनी आमिर प्रमाणे इस्लाम धर्म रक्षण केलेले नाही तर …. रजा अकेडमि च्या धर्मांध फ़तव्यावर भाष्य केलेले आहे . संगित गैरीस्लामिक आहे . प्रेशितावरील एका चित्रपटाला रहमान ने संगित दिल्यामुळे रजा एकेडमी ने ए आर रहमान विरुद्ध फतवा काढला होता .

"आता ए आर रहमान धर्म भ्रष्ट झाला….  मुस्लिम होण्यासाठी त्याने पुन्हा कलमा पढला पाहिजे . काफिर झाल्याने लग्न रद्द ! आता शरीयत नुसार रहमान ने पुन्हा लग्नाचे विधी केले पाहिजेत असे रजा अकेडमि चे म्हणणे आहे .(८, ९ )
भिवंडितिल पोलिस हवालदार हुतात्मा जगताप आणि गांगुर्डे च्या खुनात दोषी आणि आझाद मैदानावर दंगल घडवणारी हीच ती रजा एकेडमी . ए आर रहमान ने रजा अकेडमि चा निषेध केला .

या इस्लामी फतव्या बरर्हकुम 'दिल्ली 'आणि 'युपीच्या' * कथित सेक्युलर  * मुख्यमंत्र्यांनि  रहमानचा कार्यक्रम  टाळणयाचा प्रयत्न केला  त्यांचाही उल्लेख  रहमान ने केला आहे . . यानंतर या तापल्या तव्यावर पोळी भाजत - इस्लाम मध्ये संगितसेवा जमत नसेल तर हिंदू व्हा ! असे घर वापसीचे बाष्कळ आवाहन करणार्या विश्व हिंदु परिषदेवरही ए आर रहमान टिका केली आहे .

वरील  सर्व गोष्टीना रहमान असहिष्णुता असे म्हणतो . 

धार्मिक बाबतीत टिका टिप्पणी करताना - त्या विषयाची जाण असावी आणि खरी सेक्युलर भूमिका घ्यावी हि बुद्धी ए आर रेहमान कडे आहे .पुरोगाम्याला तेव्हढि अक्कल नाही हा मुद्दा आहे . (८, ९ )

डॉ अभिराम दीक्षित 

------------------------
संदर्भ :

१) आमिरचे मावस आजोबा म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद आणि आझादांचे जिहादी पूर्वज म्हणजे मौलवी जमालुद्दीन: अमीर खान त्याच्या मामे आजोबांवर म्हणजे मौलाना आझादांवर चित्रपट बनवणार आहे , अशा बातम्या आधी येउन गेल्या आहेत .
  

२) आकलन : नरहर कुरुंदकर : मौलाना आझाद एक पुण्यस्मरण / अकबर 

३) लेखसंग्रह:  अप्रिय पण भाग २ . शेषराव मोरे  , २००८

४ ) पृष्ठ ११० , इस्लामिक स्टेट : असगर आली इंजिनिअर , विकास पब्लिकेशन,  १९९४ 

५) पृष्ठ १५६ आणि पृष्ठ १८४ , अखंड भारत का नाकारला , प्रा मोरे , राजहंस प्रकाशन , २०१२ 

६)   Page 219 , Gandhi : Pan Islamism , Imperialism and Nationalism in India , OUP , 1989

७)  जागर : नरहर कुरुंदकर , दवत उल कुरआन : मौलाना मौदुदि 

८) http://indianexpress.com/article/entertainment/entertainment-others/fatwa-against-a-r-rahman-majid-majidi-for-film-on-prophet/

९) http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/a-r-rahman-identifies-with-aamir-khan-says-he-too-faced-similar-situation/articleshow/49917936.cms


२९ टिप्पण्या:

 1. खुप छान

  ज्याच्याशि संघर्ष निर्माण होनार आहे किंवा चालु असेल.त्यांचा इतिहास अभ्यासल्या शिवाय वर्तमान व भविष्य टिकवुन ठेऊ शकतो.

  उत्तर द्याहटवा
 2. अतिशय अभ्यासपूर्ण लेख !
  मी आपला लेखाची प्रिंट आउट काढून संदर्भासाठी सुरक्षित ठेवित आहे.
  अभिनंदन !

  उत्तर द्याहटवा
 3. सुंदर विश्लेषण. एवढं ह्या देशात सहन करत असून देखील ह्या देशात असहिष्णुता कशी आली आणि कुठून ह्या विषयावर सुरुवात झाली. हा मोठा प्रश्न आहे.

  उत्तर द्याहटवा
 4. First let me state categorically that neither I, nor my wife Kiran, have any intention of leaving the country. We never did, and nor would we like to in the future. Anyone implying the opposite has either not seen my interview or is deliberately trying to distort what I have said. India is my country, I love it, I feel fortunate for being born here, and this is where I am staying.

  Secondly, I stand by everything that I have said in my interview.

  To all those people who are calling me anti-national, I would like to say that I am proud to be Indian, and I do not need anyone's permission nor endorsement for that.

  To all the people shouting obscenities at me for speaking my heart out, it saddens me to say you are only proving my point.

  To all the people who have stood by me, thank you. We have to protect what this beautiful and unique country of ours really stands for. We have to protect its integrity, diversity, inclusiveness, its many languages, its culture, its history, its tolerance, it's concept of anekantavada, it's love, sensitivity and its emotional strength.

  I would like to end my statement with a poem by Rabindranath Tagore, it's a prayer really :

  Where the mind is without fear and the head is held high,
  Where knowledge is free,
  Where the world has not been broken up into fragments,
  by narrow domestic walls,
  Where words come out from the depth of truth,
  Where tireless striving stretches its arms towards perfection,
  Where the clear stream of reason has not lost its way,
  Into the dreary desert sand of dead habit,
  Where the mind is led forward by thee,
  Into ever-widening thought and action,
  Into that heaven of freedom, my father, let my country awake.

  Jai Hind.

  Aamir Khan.

  उत्तर द्याहटवा
 5. डॉक्टर दीक्षित,

  तुमचं विवेचन आवडलं. अमीरखानाच्या वक्तव्याची चिकित्सा जिहाद-करार-हिजरत या त्रयीच्या पार्श्वभूमीवर केल्याने चर्चेस वेगळंच परिमाण प्राप्त झालं आहे. त्याबद्दल धन्यवाद! :-)

  तुम्ही उल्लेखलेल्या १९२० च्या हिजरतीवरून एक आठवलं. ती हिजरत केरळी मुस्लिमांनी केली होती. ती पार फसली. घरंदारं विकून गांधारात गेलेल्या मुस्लिमांना तिथल्या सुलतानाने लुबाडून कफल्लक केलं आणि हाकलून दिलं. हे केरळी मुस्लीम मग चुपचाप परत केरळात आले. आल्यावर त्यांनी या अपयशाची कारणं शोधायचा प्रयत्न केला. तर खापर फोडायला कोण सापडलं त्यांना? अर्थात इंग्रज सरकार. त्यास मोपल्यांचे बंड म्हणतात. पण इंग्रज सत्ताधारी होते. त्यांच्या केसालाही धक्का लावणं मुस्लिमांना जमलं नाही. मग त्यांचा सगळा राग केरळी हिंदूंवर निघाला. पुढे या मुस्लिमांनी केरळी हिंदूंवर जे भयानक अत्याचार केले ते वाचतांना जिवाचा थरकांप उडतो. :-(

  अमीरची हिजरत फसली म्हणून आत्ताही हिंदूंच्या कत्तली होतील काय? केंद्र सरकार अमीरखानाचं ऐकणारं नाही. आपण हिंदूंनी सावध राहिलेलं बरं नाहीका?

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  उत्तर द्याहटवा
 6. आमीरची वंशपरंपरा शोधून काढल्याबद्दल धन्यवाद, डॉक्टर !

  उत्तर द्याहटवा
 7. तुम्ही अकबराला सहिष्णू म्हटलंय तर याच न्यायानं तुम्ही अकबराच्या वंशावळीतल्या औरंगजेबालाही चांगलं म्हणाल का?

  उत्तर द्याहटवा
 8. छान लेख ! तुमच्या block ची लिंक लोकांना पाठवते !

  उत्तर द्याहटवा
 9. छान लेख ! तुमच्या block ची लिंक लोकांना पाठवते !

  उत्तर द्याहटवा
 10. अप्रतीम विश्लेषण ..धन्यवाद् सर ही माहिती दिल्याबद्दल..

  उत्तर द्याहटवा

 11. (1/3)
  प्रिय मित्र सुनील ,
  तुझ्या लेखात तू मला / माझ्या लेखनाला वापरलेली विशेषणे पाहून गम्मत वाटली , ती विशेषणे पुढीलप्रमाणे : अतिशय उथळ, कुतर्क, फेकू , लेखातील चालू गिरी, निर्बुध्द, मूर्ख …. इत्यादी अनेक … . त्यानंतर आम्ही अतिशय हेल्दी वैयक्तीक संबंध पाळतो अशीही पुस्ती जोडली आहेस . त्याबद्दल धन्यवाद. मी सहमत आहे . त्यामुळे अशा प्रकाची कोणतीही विशेषणे मी या उत्तरात तुला वापरणार नाही. सुरवातीला फक्त फेक्ट आणि नंतर तर्काबद्दल बोलू .
  ------------------------
  फ़्याक्ट / सत्यघटना
  ------------------------
  हिंदु बायका , पिके वगैरे लहान मुद्दे …. .आमिरची मुले धर्माने मुस्लिम आहेत हेही लक्षात ठेवावे . बाकी पिके च्या वेळी मी हिंदुत्व वाद्यांशि किती झगडलो होतो हे तुला आठवत असेलच . धर्म टिका योग्यच आहे . आणि तो आमिरचा अधिकार आहे . मुद्दा इस्लामच्या कौतुकाचा आहे . आता महत्वाच्या मुद्द्यांना हात घालू .

  १) हिजरात नाही उमरा : हज यात्रेला जाउन सैतानाला दगड मारणे हि प्रथा मूर्खपणाची आहे हे स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद . मी माझ्या लेखात या प्रथेला मुर्खपणा असे न म्हणता - प्रतिकात्मक विधी असे म्ह्टले आहे . आणि ज्याप्रमाणे सैतानाचा विधी प्रतिकात्मक आहे त्याचप्रमाणे आमिर खान ने आवाहन केलेली हिजरत - हा हि प्रतीकात्मक विधी आहे . तो खरी हिजरत करणार नाही . पण आपल्या इस्लामी भावना तो बोलून दाखवत आहे असे मी लेखात म्ह्टले आहे . त्यामुळे हज यात्रा हि हिजरत नव्हे हे मला माहित आहे . जणु काही लेखातला दोष दाखवतो आहे अशा थाटात तू हे लिहिलेले आहेस. पण ते सत्याला धरून नाही.
  ------------------------
  २) छुपे मनुवादी ! हा तुझ्या लेखातला गंभिर मुद्दा - तुझ्या फेसबुक लेखाखालील काही कोमेंट माझ्या जातीचा उद्धार करणार्या आहेत . त्यावरून या मुद्द्याचे महत्व लक्षात येते . आर्थात तू तसे मानत नाहीस हे मी जाणतो… पण या बाबतीत आपल्या दोघात काही मतभेद आहेत काय ? माझ्या लेखाची सुरवातच सहिष्णू अकबरापासून होते . अकबर हा औरंगजेबाचा आजोबा. त्यामुळे असहिष्णुता हि काय जातीशी वा घराण्याशी संबंधित नाही हे उघड आहे .आणि मला मान्यही आहे . अकबर सहिष्णू आहे - त्याविरुद्ध जिहाद करणारा जमालुद्दीन हा जिहादी आहे . जमालुद्दीन चे आमिरशी रक्ताचे थेट नाते आहे . माझे यासंबंधिचे वाक्य लेखाच्या सुरवातीलाच ब्लोल्ड अक्षरात आणि वेगळ्या रंगात लिहिलेले आहे . ते वाक्य असे : " आमिर खानचे केवळ त्या घराण्यात असणे महत्वाचे नाही . तर त्यांचे विचारही पूर्वजांशि जुळतात ते महत्वाचे आहे " मी उदारमत वादि अकबरापासून लेखाची सुरवात केलेली आहे आणि सेक्युलर ए आर रहमान वर लेख संपवलेला आहे . असे असताना मझ्यावर जातीवादाचा आरोप करणे असत्य आणि खालील कोमेंट पाहता भीषण आहे. (Continued in next comment)

  (2/3)
  ३) आमिर खान कट्टर जिहादी नाही असे तू लिहित आहेस . १००% मान्य . मी लेखात जमालुद्दीन ला जिहादी म्ह्टले आहे . आमिरला जिहादी म्हटलेलेच नाही - मोडरेट म्हटलेले आहे . । यासंबंधि माझ्या मुळ लेखातले वाक्य असे " खान साहेबांनी वहाबी इस्लाम बद्दल चकार शब्द काढला नाही. उलट इस्लाम किती गोंडस आणि शांततेचा धर्म आहे हे ते पटवत बसले . अशाप्रकारे मोडरेट लोक्स धर्माचे रक्षण करतात. आणि धर्मातून नवे दहशतवादी तयार होत रहातात." मी आमिरला जिहादी नसून मोडरेट म्हटलेले असताना - माझ्या तोंडी हे भलतेच घालून तू टिका केली आहेस आहेस. ती सत्याला धरून नाही .

  उत्तर द्याहटवा
 12. ------------------------
  ४) मौलाना आझाद हे पाकिस्तानच्या विरुद्ध होते म्हणून ते (सहिष्णू) -- त्यांना सुद्धा कट्टर इस्लामिस्ट कसे मानायचे? ! असे तू लिहिलेले आहेस - ----- मौलानांचा पाकिस्तान विरोध का ? हे महत्वाचे आहे . आझादांना सगळ्या अखंड भारतात इस्लामी सत्ता हवी होती . शिवाय मुल्ला मौलाविना राजकारणात आणायचा अग्रमान आझादांकडे जातो. मौलाना आझादांच्या स्वप्नातला अखंड भारत हा खरा इस्लामी देश झाला असता - दुबळे केंद्र , स्वतंत्र संस्थाने आणि मुस्लिम मतदारसंघाचे राजकारण यावर मौलानांचि भिस्त होती . या बद्दल आजचे मुस्लिमही आझादांना इस्लामचे हितकर्ते समजत असतात. इंडियन इस्लाम च्या ब्लोग ची लिंक शेवटी देतो - ती अवश्य वाच. बाकी फाळणी झाली नसती तर भारताची प्रगती आणि समाज सुधारणा अशक्य झाल्या असत्या . मुसलमान हि राज्यकर्ती जमात बनली असते हे डॉ आंबेडकरांचे मत तुला ठाउक आहेच.

  ५) सुफिझम आणि वहाबी इस्लाम यात तू दाखवलेला फरक अंशत: योग्य आहे . अंशत: यासाठी कि काही सुफी जिहादी सुद्धा होते . असो… यासंबंधि मी माझ्या लेखात लिहिलेली वाक्ये जशीच्या तशी पुढे पेस्ट करतो आहे . लेखात वहाबी चा उल्लेख अतिशय स्पष्ट पणे आलेला असताना तू तोच उल्लेख पुन्हा केलास जणु काही तो लेखात नाहीच !! माझ्या मुळ लेखातील वाक्ये : ' "" हिंदुच्या असहिष्णुतेने चिंताक्रांत झालेला आमिर खान इस्लामी दहशतवादाबद्दल कशी धर्म रक्षक भूमिका घेत होता ते वाखाणण्या जोगे होते.……. तवलीन सिंग यांनी असेही सुचवून पाहिले कि गालिब चा भारतीय इस्लाम आणि वहाबी आक्रमक इस्लाम यात फरक केला पाहिजे . आमिरने हा सल्ला धुडकावुन लावला . सारा इस्लाम निष्पाप आहे आणि इस्लाम हिंसेला परवानगी देत नाही अशीच रट शेवटपर्यंत लावली. आमिर मौलाना आझाद आणि मौलाना जमालुद्दीन यांची पेन इस्लामिक भूमिका मांडत राहिला "
  ------------------------
  बाकी थोडे इस्लाम विषयी , इस्लाम मध्ये इतर धर्मा बाबत जराही सहिष्णुता नाही . ज्या काही आयती तुमचा देव तुम्हाला - माझा मला वगैरे येतात …. पैगंबराच्या मक्का वास्तव्य काळातील कथित सहिष्णू आयाती - संख्या आणि शक्ती वाढली कि मदिना काळात कशा बदलत हिंसक होतात हे स्पष्ट दिसते . शक्ती कमी असताना कोणत्या आयती पाळाव्यात आणि शक्ती वाढली कि कोणत्या आयती पाळाव्यात याचे सखोल विवेचन इस्लामी पंडितांनि केलेले आहे . जमाते इस्लामी चे संस्थापक मौलाना मौदुदि यांचे दाव्तुल कुरआन हे भाष्य जरूर वाच . कुराणातील सहिष्णू आयाती काफ़िरांकडुन इस्लाम धर्म पाळण्याची परवानगी मागण्यासाठी आहे . अशी परवानगी देण्याची वेळ (शक्ती , सामर्थ्य , संख्या ) जेंव्हा प्रशितांकडे आली माक्केताल्या शेकडो मूर्ती स्वत:च्या हाताने तोडुन टाकल्या .होत्या. इस्लामी दुधारी नाही तो शक्ती सुसंगत आहे .
  ------------------------------------------------
  समारोप : मी स्वत: आमिरचा फ्यान होतो . त्यासारखे कपडे मी काल परवा पर्यंत घेत असे . लोकांनी त्यावर भरभरून प्रेम केले. पण आज लोक त्याला का शिव्या देत आहेत? पुरोगाम्यांनी लावलेल्या असहिश्णुतेच्या प्रचार व्रुक्षाचि हि फळे आहेत काय ? याचा गंभिर पणे विचार करावा . यापुढे मी हि चर्चा थांबवतो. या लेखाला माझ्या इतरही काही मित्रांनीही लाइक केले आहे . त्यांना तू मला वापरलेली ::: अतिशय उथळ, कुतर्क, फेकू , लेखातील चालू गिरी, निर्बुध्द, मूर्ख …. इत्यादी अनेक विशेषणे मान्य नसतील अशी मी आशा करतो. बाकी हिंदु धर्माचे गुणगान करणार्याला मी कधीही क्षमा करणार नाही . इस्लाम बद्दल मी तटस्थ आहे . त्यांच त्यांनी बघाव . हिंदु लोकाना धर्म मुक्त करणे हि मी माझी जवाबदारी समजतो …. पण व्होट बेंक पोलीटीक्स आणि असहिश्णुतेच्या राजकीय नाटकासाठी - कोणि इस्लामचे गुणगान आणि बरोब्बर त्याच वेळेला असहिष्णूतेचा बाजा वाजवत असेल तर --- अमेरिका , फ्रांन्स , म्यानमार इत्यादी सहिष्णू देशात काय चालू आहे ? याचा विचार व्हावा . . हिंदु , ख्रिस्ती बौद्ध बहुल सारे देश असहिष्णू वाटल्यास पाक सिरिया बांग्लादेश इत्यादी देशात किती सहिष्णुता आहे ? याचाही विचार व्हावा . इस्लामची भीती haa फोबिया नव्हे - या लेखाची लिंक खाली देतो आहे . ती अवश्य वाचावी .
  ----------------------------------------------------------------
  सर्व संदर्भ next comment
  ----------------------------------------------------------------

  उत्तर द्याहटवा
 13. सर्व संदर्भ

  1) β 'इस्लाम'ची भीती हा "फोबिया" नव्हे : http://www.esakalglobal.com/NewsDetails.aspx?NewsId=5329571237141040023&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20151116&Provider=%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%87&NewsTitle=%CE%B2%20%27%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%27%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%B9%E0%A4%BE
  ----------------------------------------------------------------
  ----------------------------------------------------------------
  2) आमिर खान वरील माझा मूळ लेख : http://drabhiram.blogspot.in/2015/11/blog-post_25.html
  ----------------------------------------------------------------
  ----------------------------------------------------------------
  ३) मौलाना आझादा संबंधि भारतीय मुस्लिमांची मते : http://indiaandislam.typepad.com/blog/2010/04/maulana-abul-kalam-azad-betrayal-of-india.html
  ----------------------------------------------------------------
  ----------------------------------------------------------------

  उत्तर द्याहटवा
 14. डॉ. दिक्षीतजी, योग्यवेळी अभ्यासपुर्ण विवेचन, सुंदर लेखाबद्यल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 15. Link bookmark करुन ठेवलेली , विसरुनच गेलेलो , आत्ता पाहिली ,संदर्भासहित अतिशय अभ्यासपुर्वक explain केलय..👍

  उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *