१७ एप्रि, २०१४

नरेंद्र मोदि : सामान्य माणसांचा सामान्य नेता

 सामान्य माणसे 

मोदींना सामान्य माणसाने निवडून दिलेले आहे . मोदिना कोन्ग्रेस पेक्षा सात कोटि मते जास्त मिळाली आहेत . कोंग्रेस आघाडीच्या च्या दहा कोटि समोर भाजपाच्या आघाडीचा सतरा कोटींचा आकडा टरटरून फुगीर आहे. भाजपाला स्वत:ला हि अनपेक्षित असे संपूर्ण बहुमत मिळवुन देताना जुन्या वाजपेयी सरकारपेक्षा कोट्यावधि अधिक मते मोदिनी खेचून आणली आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपाची आघाडी २/३ बहुमतापासून फक्त २७ सिटान्नि दूर आहे. भाजपाचे हे कोटकल्याण कसे घडले ? असे कोट्यावधि मतदार कोणत्याहि रंगाचे नाहीत. समिक्षक विद्वानांचे जातीधर्माचे रंग इथे फिके पडले. ८१ कोटि मतदारांपैकी प्रत्यक्षात ५३ कोटींनी मतदान केले . त्यातले नोटा वाले , प्रादेशिक पक्ष वाले वगैरे बाजूला काढले तर सात कोटीचा विजय आणि सतरा कोटि मते हि आजच्या काळात दणदणित म्हणावीत अशीच आहेत . हि कोटीच्या कोटि मोदि उड्डाणे कशी घडली ? मोदि उत्तरेच्या सत्तेकडे कसे झेपावले ? कोट्यावधी सर्व सामान्य भारतीयाने मोदित काय पाहिले ?




मोदि महान नाहीत .


मोदि महान नाहीत . त्यांचा इतिहास बर्याच वेळेला चुकतो .सनावळी चुकते . समाजशास्त्र , पोस्ट मोर्ड्निझम आणि बाकीचे राज्यशास्त्र…. शिवाय त्याच्या आधुनिक परिभाषा मोदिना फारशा अवगत नाहित. त्याना साधे जातीचे राजकारणही फारसे समजत नाही. बर विकास म्हणाल तर तो थोडा बहुत आहे जरूर ........पण फारसा नेत्रदीपक वगैरे अजिबात काही नाही गुजरातेत..... . मोदिना सफाईदार इंग्लिश बोलता येत नाही . त्यांचे दिसणे जवाहरलाल नेहरु प्रमाणे राजबिंडे - रुबाबदार नाही . इंदिरा गांधी सारखा कामाचा झपाटा आणि नेत्रुत्व गुणही मोदीने अजून दाखवलेले नाहीत . . अटल बिहारी वाजपेयी प्रमाणे " झुलासाता जेठ मास । शरद चांदनी उदास । अंतर्घट रीत गया । एक बरस बीत गया । । " अशी तरल काव्य रचना मोदिना जमणे शक्य नाही . फार काय ? मनमोहन सिंग यासारखे अर्थ शास्त्राचे सखोल ज्ञानहि मोदींकडे अजिबात नाही . 



नरेंद्र मोदि हा एक अतिशय सामान्य माणुस आहे . 

मोदि विरोधक तिखट मिठ लावून सांगतात त्याप्रमाणे मोदि खाटिक नाहित. आणि समर्थक सांगतात त्याप्रमाणे जादुगार हि नाहीत . 

मोदि झोकून देऊन - घाम गाळून काम करतो . सुट्टी घेत नाही . स्वत:च्या विशिष्ट पुर्व् ग्रहा सकट सामान्य भारतीयाप्रमाणे देशावर प्रेम करतो . सामान्य माणसाप्रमाणे , मोदी मनापासून हसतो . कधी खोटे खोटे रडतो . त्याला राग येतो . मोदि द्वेष करतो . डूख धरतो. पाळत ठेवतो . सूड घेतो . मोदि बिनधास्त आहे . मोदि दिगविजयात इतर अनेक गोष्टी सहित त्यांच्या सर्व सामान्य व्यक्तिमत्वाचा मोठा सहभाग आहे. 

मोदि मुस्लिम टोपी नाकारतो . माफी - बाफी मागायला मोदि अति संवेदना शील नाहीत . मोदि विकास बोलतो . विरोधक हिंदुत्वाचे आरोप करत राहतात . माजी मनमोहन सिंग… भारतीय साधन संपत्तीवर दलित आणि अल्पसंख्य (मुस्लिमाचा ) पहिला अधिकार आहे असे म्हणाले होते. मोदिनि दलित , शोषित आणि गरीब हे शब्द कायम ठेवले परवाच्या भाषणात . पुढचा धार्मिक शब्द वगळला … मोडी खाकडु आहेत 








मोदिंचे सेक्युलर प्रचारक 

ह्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदीने एकदाही… चुकुनही …संघिष्ट वा सनातनी हिंदू , हिंदुत्व आणि हिन्दुराश्ट्राचा जयघोष केला नाही . आपल्या देशाचा कायदा आणि घटना मोदिना अशा हिंदुत्वाचा प्रचार करण्याची परवानगी देत नाही. आणि कायद्याच्या कचाट्यात न अडकण्या एव्हढे शहाणपण मोदिकडे निश्चित आहे. भारतातल्या ८५ % मतदारांना धार्मिक हाक देऊन मोदींकडे आकर्षित करण्याचे काम आमच्या सेक्युलर बांधवांनी केलेले आहे . मोदि हा हिंदुचा पक्षपाति आहे… हिंदुच्या बाजूचा आहे … हा विचार सेक्युलर माध्यमांनी पसरवला …… बदलत्या काळात । इण्टर्नेटच्या युगात …इतर देशातल्या अनेक इतर लोकांशी आणि इतर धर्मांशी संपर्क वाढत असताना भारतात देशीवाद किंवा स्वत्व वाद किंवा एत्तद्देशिय स्थानिक जाणीव हि जन्म घेणार …आणि तीला हिंदू हि आयडेण्टिटि आपोआप प्राप्त होणार हे आपण लक्षातच घेतलेले नाहि. 




विकास , राष्ट्रवाद आणि बहुजन वाद 

स्पष्ट बोलायचे झाले तर ... काही मोजके आणि सन्माननीय अपवाद वगळता …. बरेचसे पुरोगामी, बहुजन वादि , कथित समाज वादि हे हिंदुत्व वाद्या इतकेच जातीवादी आहेत . ते त्यांचे विचारवंत वगैरे मंडळी स्वजातीचे प्रेमी आहेत . अथवा भाडोत्री … किंवा तद्दन महा मूर्ख …… आणि एक बहुजन समाजातला पहिला प्रधान मंत्रीपदाचा उमेदवार घोषित करून भाजप संघाने सर्वावर मात केली आहे . आजवर भारतात १४ प्रधानमंत्री झाले . त्यातले ६ ब्राहम्ण, कायस्थ वगैरे भद्रलोक अथवा उरलेले ७ खत्री , राजपूत , ठाकूर वगैरे क्षत्रिय हुच्चवर्णिय . बिचारा एकटा देवेगौडा अपघाताचा अल्पकाळ प्रधानमंत्री पण तोही गरीब घरातला नाही तर जमीनदारच !







मोदि नावाच्या दरिद्री घरातल्या चहावाल्या ओबिसिला भाजपाने प्रधान मंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले आहे. निदान जातीची पुरोगामी गणिते इथे ढिल्ल्ली पडली आहेत . आणि सदोसदि बहुजन वाद आणि प्रतिनिधित्व आणि ओबीसी आणि इतर गोष्टी करणारे लोक मोदिला पुन्हा बहुजन वादाचेच निमित्त करून जेंव्हा झोडपू लागतात तेंव्हा त्यांवर पोट धरून सामान्य जनता हसत असते !

विकासाबद्दल बोलायचे झाले तर मोदि हा माणुस , भाजप हा पक्ष कोन्ग्रेस च्या कितीतरी पुढे आहे .असे सामान्य माणसाला वाटते. 





उदारमतवादाची सद्दी 


उदारमत वाद हा खरा नाही . असू शकत नाही . त्यामागे ढोंग आहे. फसवणूक आहे. असे सामान्य माणसाचे ( प्रामाणिक !!) मत असतेच . मोदिनी सर्व सामन्य माणसाची भूमिका मांडत उदार मतवादाची सद्दी संपवली . 

सामान्य पण शक्तिशाली मोदि 

१) आत्मौप्य , आत्म्परिक्षण आणि सहिष्णुता ह्या आपल्या जुन्या महान परंपरा आहेत असे एक मत आहे . 

२) दुसरे मत ह्या सर्व भाकड गायी निरुपयोगी असून फालतू आहेत असे आहे . 

पहिले मत गांधीचे दुसरे सावरकरांचे . असे म्हणण्याचा वैचारिक इझम संघर्ष आहे . 

मोदि आणि सर्व सामान्य भारतीय दुसर्या मताकडे झुकले आहेत हे मान्य केले पाहिजे . हा विजय माध्यमांचा नाही . प्रचाराचा आणि ब्रेण्डिग चा नाही . हा विजय सर्व सामान्य माणसाच्या बदललेल्या मताचा आहे . सर्व सामन्यांचे मत कायमच शक्तिशाली राहणार आहे . हा शाप नाही . हे भारतीय लोकशाहीचे वरदान आहे . सत्य स्वीकारून … हि मते का बदलली ? हा खरा अभ्यासाचा विषय व्हायला हवा . त्यासाठी आपापल्या पूर्वग्रहांचे चष्मे उतरवून पाहिले तर ठीक … अन्यथा …सर्व सामान्य माणसाची शक्ती ..... . लोकशाहीत सर्व सामान्य माणसाचे विचार जिंकणार आहेत . हे पहिले समजून घेतले पाहिजे . इझमचे चष्मे आणि विचारधारांच्या सद्दी संपलेल्या आहेत . इलेक्ट्रोनिक आणि सोशल मिडिया चा उदय झाला आहे . लोकशाहीला नाके मुरडून किती दिवस आत्ममग्न राहता येईल ? नवे युग सर्व सामान्य माणसाचे असेल . 


बाकी आता पुढचे काळावर सोपवू . 


पण मोदि महा विजयाचे तटस्थ विश्लेषण… समर्थक आणि विरोधक करणार का ? हा माझ्या पुढचा प्रश्न आहे . 
या निवडणुकीत धार्मिक विषय कोणि चघळले ? त्याचा कोणाला फायदा झाला ? मोदींवर तीच तीच जुनी पुराणी टिका केल्याने कोणाचा फायदा झाला ? बदलता भारत समजून घेण्यात कोण कमी पडले ? आणि का ? हा चिंतनाचा खरा विषय ! बाकी जर उदार मतवादाची सद्दी संपली तर ते खरेच चिंतनीय आहे . 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *