५ मे, २०१६

परी

फरहान अख्तर या माझा अतिशय आवडता अभिनेता आहे - त्याच्यावर चित्रित गाण्याचे मी मराठीत भाषांतर केले आहे.
भाग मिल्खा भाग .. मधले हे गाणे आहे - घुल मिले घुल मिले लोंडा - अत्यंत भारी गाणे आहे.

(फरहान च्या गाण्याची लिंक खाली दिली आहे )

------------------
परी
------------------

काल भेटली रात्री - परी मदहोश गुलाबी
हात ओढुनि बोलो - तू धुंद शराबी चिकनी
चालतेस तू आस्ते - टाइम का खराबी करते ?
ये मिठीत येना - आता करशी का ? नखरे ?
व्हीस्की परी-ताडी - माडी बरी - परी तू पाखरे
मदहोशीचा ग्लास म्याडमे - का करशी नखरे ?
ठेवशील पाय दर्यात तर - सारा भव सागर गुलाबी
लाटा मदहोश , झिंगेल हर - एक मासोळी, मासोळी
रात्र धुंधीत शब्द खोटे - शराबी नजर धुंद डोळे
हात उत्सुक चाचपडे - अंगांग - धर्म इमान खोटे
काचे वानी तू नाजूक - श्वास घे जपुनी जपुनी
कूस वळवि जपुनी - प्यारी ती माझी बाहुली
अलगद उचलुनी तुजला - आरपार भव सागर सारा
परी बोलली मजला - मी इश्काचा काचेचा प्याला !
- अभिराम दिक्षित
(फरहान च्या गाण्याची लिंक खाली दिली आहे )
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *