२३ फेब्रु, २०१६

कम्युनिस्ट समंधा शांत रहा

कम्युनिस्ट समंधा शांत रहा 

उमर खालिद चे निर्ल्लज भाषण ऐकले. लिंक पहिल्या कामेंटीत दिली आहे. सुरवातीला फार राग आला होता. हिंसक लाल चड्डिवाले जी बकवास करतात ती पाहून कोणत्याहि शहाण्या माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाइल. हा हजारोच्या संखेच्या आंदोलनाची भीती दाखवतो आहे . नन वर बलात्कार करणारी भारत माता आम्हा कम्युनिस्टांचि  नाही . कम्युनिस्ट सार्या जगाचे आहोत . पाकिस्तान हिंदुस्तान दोन्ही त्यांचे  आहेत .
मुसलमानाना खोटेनाटे दहशतवादी आणि चून चुनके आदिवासिना नक्षलवादी ठरवले जाते . उमर म्हणतो - माझ्या  बहिणीला बबलात्काराच्या धमक्या दिल्या इत्यादी भावुक अणि पर्यायाने - हिंसेला प्रवृत्त करणारी विधाने हा टोणगा निर्लज्ज थोबाडाने करतो आहे
उमर म्हणतो - मी मुसलमान अशी ओळख देत नाही कारण मुस्लिम आणि इतर शोशितांचे दमन होते आहे . पुढे  हि लाल अवलाद म्हणते कि जगभरच्या देश द्रोह्यानो एक व्हा - (Anti nationals of the world unite ). हि सरळ सरळ लाल क्रांतीची भाषा आहे .
-------------------------------------------
या आगलाव्या लाल्याने एकदाही - एकदाही अफजलच्या समर्थनाचा निषेध केलेला नाही. भारत कि बरबादी तक या घोषणांचा निषेध केलेला नाही. भारत के तुकडे हजार या घोषणेचा उल्लेखच केलेला नाहि.
-------------------------------------------रडे नेहमीचे कम्युनिस्ट लाल शोशितांवर अन्याय वगैरे - त्यामागचा राष्ट्रद्रोह आणि लाल क्रांतीची ठिणगी खर्या पुरोगाम्यांनी आणि सच्च्या आंबेडकर वाद्यांनी ओळखली तर ठीक . नाही ओळखली तरी ठीक . याच भाषणात उमर ने गांधी नेहरूंचा धिक्कार केला आहे . पण आपले कोण आणि परके कोण हे ओळखण्याची बौद्धिक पात्रता पप्पू कोन्ग्रेस कडे नाही . असो.
भाषण संपूर्ण ऐकल्यावर माझा राग पूर्णपणे निवळला - कारण उमर खालिद ने एक अतिशय महत्वपूर्ण विधान केले - वो हमसे डरते है - क्योंकि वो सोचनेवालोसे डरते है -
कडव्या हिंदुत्व वाद्यांचा "सोचना" शी काही संबंध नाही . हे मात्र उमर खरेच बोलला .
पण थांब उमर. कडवे भगवे सोडुन सुद्धा या देशात बरेच देशभक्त आहेत. राष्ट्रवादी आहेत. आमच्या घटनात्मक लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तुझ्याहून अधिक "सोचने" वाले इथे तयार होतील . तयार आहेत . त्या सार्यांना चालना दिल्याबद्दल धन्यवाद . आमची भारतमाता तुझी आभारी राहील. कारण तिचे सुपुत्र तू जागे केलेस.
उमरने त्याच्या भाषणात एक शेर उधृत केला - " हिंदुस्थान भी मेरा - और पाकिस्तान भी मेरा है - दोनो मुल्को पे अमरिका का डेरा है -
असो डेरा कोणाचाबि - आणि पाकिस्तान असो तुझा - तुला भारत मिळू देणार नाही . आई बाबा आणि साईबाबा ची शप्पथ ! -
उमर खालिद - तुला भारत गिळू देणार नाही .
तेंव्हा - कम्युनिस्ट समंधा शांत रहा !!
- सोचानेवाला - एक शांत भारतीय
Dr Abhiram Dixit
(वाटल्यास बिनधास्त शेअर करावे- परवानगीची गरज नाही )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *