१ डिसें, २०१५

अंधश्रद्धेबद्दल अंधश्रद्धा

" देवाधर्माला विरोध नाही फक्त वाइट गोष्टीना आहे ". हि एक अशास्त्रीय , अतार्किक आणि पलायनवादि भूमिका आहे.

चांगल्या वाइटाचि व्याख्या हि ग्रुहितकांवर ठरत असते. आणि धार्मिक गृहितके एकदा सत्य मानली कि त्यातून बाहेर पडण्याचे कोणतेच कारण उरत नाही . बुरखा घालणे सौदी अरेबियात वाइट मानले जात नाही आणि अस्पृश्यता हा भारतात धर्माचाच भाग असतो. आता देवाधर्माला विरोधा नाही आणि वाइट गोष्टीना विरोध अशी हास्यास्पद भूमिका घेता … वर बुरखा आणि अस्पृश्यता याला धार्मिक लोक्स  योग्य मानतात - हे कसे विसरता ?
आधुनिक अर्थाची मानवता व्यक्तिस्वातंत्र्य लोकशाही इत्यादीची प्रस्थापना करायची असेल तर सर्व धर्म आणि प्रत्येक देव यांची जिनोसाइड आवश्यक आहे .. डोळस श्रद्धा असू शकतात हीच सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. देवा धर्मा सकट सर्व वाइट गोष्टीना विरोध अशी भूमिका हवी .
प्रश्न विचारायचे थांबल्याशिवाय देव मिळत नाही आणि प्राचीन धर्म चोपडीतल्या रूढी कायद्याशिवाय धर्म दिसत नाही . त्यांचे एकसमय आमुलात उन्मूलन अत्यावश्यक आहे.

यात आता एका धर्माशी लढू मग दुसर्या असा क्रम लावणे ही ष्ट्रेटिजि सुद्धा बालिश आहे. मुळात भूमिका शब्द्प्रामण्य आणि देव या विरोधात असली पाहिजे . अशाप्रकारची स्पष्ट आणि शुद्ध भूमिका घेतल्यास गर्दी जमत नाही अशी भीती काहीना वाटते . गर्दी जमवणे हाच उद्देश असेल तर हळदी कुंकु किंवा नमाजाचे कार्यक्रम ठेवावेत !

बुद्धीवादाचे नाही !!

रूढी हे बहुमत आणि सुधारणा हे अल्पमत -
हा निसर्ग नियम बदलण्यास कोणतीही ष्ट्रेटिजि कामाची नाही . वहाबी इस्लामशी लढण्यासाठी धर्माध हिंदुच्या फौजा निर्माण करणे जितके बालिश आहे . तितकेच - किंवा त्याहून अधिक पोथीनिष्ठ - पौराणिक पुरोगामी वारसा शोधण्याचा प्रयत्न करणारे ठरतात .
सनातन्याशी लढण्यासाठी जमाते इस्लामीशी युती किंवा अवैदिक परंपरातले विज्ञान शोधणे ह्या क्लुप्त्या वेदात विमाने आहेत म्हणण्या सारख्याच बालिश आहेत.
पिढ्यान पिढ्या ज्ञानाचा संचय होतो त्यामुळे भूतकाळातील लोक आपल्यापेक्षा मागास असतात हे समजून घेतले पाहिजे. सनातन्यांच्या शस्त्राने - त्यांच्या मार्गाने त्यांच्याशी कधीही लढता येत नाही . त्यांची शस्त्रे हाती घेणे म्हणजे स्वत:च सनातनी होणे होय .-----------------------------------------------------

थापा मारून अंधश्रद्धा निर्मुलन होत नसते. 

-----------------------------------------------------
चित्रलेखाच्या पहिल्या पानावर प्रा J B शिंदे काही अभंग लिहित असतात … २१ व्या शतकातल्या आधुनिक मराठीतले हे अभंग फेसबुकावर तुकोबांच्या नावे प्रसिद्ध केले जातात ! सध्या घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || असा एक अभंग तुकोबांच्या नावे फिरत आहे । या आधी अनेकदा अध्यक्ष , अंधश्रद्धा , दैनंदिनि असे आधुनिक मराठीतले शब्द असलेले अभंग तुकोबांच्या नावावर खपवलेले मी पाहिले आहेत .
-----------------------------------------------------
तुकोबा वंदनिय आहेत पण विज्ञान निष्ठ असू शकत नाहीत हे समजून घ्या !
--------------------------------------------------------

तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हि पहिली अंधश्रद्धा. तर ते समतावादी असल्याने त्यांना  विषमता वाद्यांनी मारले हि दुसरी अंधश्रद्धा. पहिली भाबडी आहे. दुसरी  जातीय .  

काही राजकीय पक्षांना (उदा शरद पवार) यांना   उपयुक्त अशी जातीय आणि धार्मिक समीकरणे बांधणार्यांना आपल्याकडे पुरोगामी म्हणून ओळखले जाते. 

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दोनहीं विधी - हे दोन वेगवेगळ्या पंथाच्या ब्राम्ह्णांकडुन करून घेतलेले ( दुप्पट )कर्मकांड आहे . पण राजकीय व्रत घेतले कि  - कि निश्चलपुरी गोसाव्याने केलेला दुसरा तांत्रिक राज्याभिषेक हे हि अंधश्रद्धा निर्मुलन वाटु लागते .

अशाप्रकारे अंधश्रद्धा निर्मुलन आणि सनातनीपणा यात आज काहीही अंतर उरलेले नाही . होय देवा धर्माला आमचा विरोध आहे . सर्व धर्म आमचे शत्रू आहेत . त्यातून मानवाची मुक्ती करणे आमचे ध्येय आहे . हे अंधश्रद्धा निर्मुलनाचे ब्रीद असले पाहिजे . 

धर्म मानवनिर्मित आहेत . ते पुरातन आहेत . पुरातन काळातील नीती आणि योग्य अयोग्यतेचे संदर्भ आता बदलले आहेत. त्यामुळे धर्म त्याज्य आहेत . हे समजून घ्यावे लागेल .

…… आणि हि नास्तिकता योग्य आहे पण ती लोकाना पटणार नाही…. म्हणुन बोलू नये हे अगदीच हास्यास्पद वाटते . लहान मुलाना इंग्लिश येत नाही मग शाळा बंद करा असा हा तर्क आहे. जे योग्य असेल ते सांगावेच लागेल. अवैदिक परंपरातले विज्ञान शोधणे,साडे तीनशे वर्षा पूर्वीच्या शिवाजी महाराजांना सेक्युलर (इहवादी ) ठरवणे आणि आमचा विरोध फक्त वाइट रूढीना आहे असे म्हणणे ह्या अंधश्रद्धा निर्मुलानातील अंधश्रद्धा आहेत . -

Dr Abhiram Dixit .


1 टिप्पणी:

 1. लेख वाचला...
  जर अंधश्रद्धा निर्मूलन समिति बाबत बोलायचे झाले तर आपल्याला समिती ची भूमिका पुन्हा एकदा समजून घ्यावी लागेल...
  दाभोलाकरांची सर्व पुस्तके आपन वाचली अस्तीलच...पण या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचा...
  दुसरं अस...
  वर मांडलेले मुद्दे केवळ अंधश्रद्धा निर्मूलन नसून ते श्रद्धा सहित देव-धर्म यांचेही निर्मूलन आहे...
  आपन हीच भूमिका ठेवून नविन संघटना काढावी आणि हे काम करावे...
  fb वर ज्यानी लेखाला सहमती दिली आहे त्यांना या 'देव-धर्म-श्रद्धा निर्मूलन संघटनेचे' कार्यकर्ते व्हाल का...अशी विचारनाही जरूर करा...

  मला आशा आहे..आपन हे काम नक्की कराल...
  या कामाला सदिच्छा...!


  उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *