१३ एप्रि, २०१५

गोरक्षक बायाबुवांचि गंमत !

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या  अधिकृत वकिलाने (बोकड - कोंबडी आदी ) सर्वच प्राण्यांच्या हत्येवर बंदि आणण्याचा सरकार विचार करत आहे असे कोर्टाला सांगितले . हे विधान उघडच हास्यास्पद आहे .  लागलीच मुख्यमंत्र्याना सफाई द्यावी लागली . ते राजकारणी  स्पष्टीकरण होते . सद्य सरकारची  कोर्टातली  भूमिका बदलल्याची अजून तरी बातमी नाही . कदाचित कायद्याच्या  काही वाटा शोधून भविष्यात सरकार भूमिका बदलेल. पण  इतकी हास्यास्पद भूमिका सरकारच्या सुशिक्षित सुविद्य वकिलाला का घ्यावी लागली ? हा खरा प्रश्न आहे . हिंदुत्व वादि सरकार आणखी अनेक धार्मिक कायदे करू शकते - त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. भाजपा आणि  संघ परिवाराला  बुद्धीजीवी /  बुद्धिवादी /  बुद्धिमान लोक का विरोध करतात ? असाहि  प्रश्न अनेक प्रामाणिक देश भक्तांना आणि स्वयंसेवकाना अनेकदा  पडतो . त्याचेही  उत्तर याच्याशी निगडित आहे .   

मटन चिकन भक्षणावर बंदि घालायची सरकारची भूमिका असू शकत नाही . पण तशा हास्यास्पद भूमिका सरकारी वकिलाला न्यायालयात घ्याव्या लागतात. एक चूक लपवायला हजार चुका कराव्या लागतात आणि आणि अशा चुकांच्या मालिकांची किंमत हि कधीतरी मोजावी लागते . हे टाळायचे असेल तर संघ परिवाराला  त्याच्या मुलभूत आकलनात , संकल्प - ध्येय -  धोरणात प्रचंड बदल करणे आवश्यक ठरते .हास्यास्पद ठरायचे नसेल तर - न्याय,  कायदा,व्यक्ती स्वातंत्र्य 
 , समता ,   घटना आणि नैतिकतेची आधुनिक मूल्येही नव्याने समजून घ्यावी  लागणार आहेत . 


भावनांपेक्षा भूक आणि धर्मापेक्षा देश मोठा आहे. धर्म - देश-  भावना यापेक्षा माणुस महत्वाचा  हे पहिल्यांदा कळावे लागेल .त्यानंतर -  हिंदूची सांस्कृतिक  बहुविधता - वैषम्य  येते . दलित जातीना मृत गोमास खाण्याची सक्ती सनातन धर्म आणि पुरातन हिंदु  समाजानेच केली होती हे समजून घ्यावे लागेल . त्यानंतर विचार करावा लागेल की …. -  अनेक मागास जाती आजही गोमास खातात . ते हिंदु नाहीत का ? इशान्य भारत आणि दक्षिण भारतातले काही  हुच्च वर्णिय  हिंदुही गोभक्षक आहेत. त्यांचे काय ? द्रविड चळवळ त्यांचा  बफेलो नेश्नालीझाम , उत्तर भारत - काऊ बेल्ट आणि गायीच्या प्रतीकावरून असलेले सांस्कृतिक संघर्ष हंबरून रडत आहेत . गोमातेने वाचन करू नका असा फतवा काढला आहे का ? गोमाता ठराविक - भूगोलातल्या - ठराविक सामाजिक स्तरातल्या-  ठराविक हिंदुनाच  जन्म देते. समस्त हिंदुना नाही .  हे प्रथमत: समजून घेतले पाहिजे !

गोभक्षक हिंदुंचे काय ? मागास जमातींचे काय ? पारशी - झोराष्ट्रीयन, ज्यू , ख्रिस्ती , मुस्लिम  अशा भारतीय   अहिंदु लोकांचे काय ?  उदाहरणार्थ  भारत उभा करणारे एक लोक - पारशी हे आठवड्यातले अनेक दिवस  गोमासावर जगतात - क्रांतिकारी मादाम कामा , देशभक्त जे आरडी टाटा, राष्ट्रनेते दादाभाई नौरोजी, शास्त्रज्ञ होमी भाभा , उद्योगपती गोदरेज , पाकिस्तानचे दोन तुकडे करणारे फिल्ड मार्शल सेम माणेकशो - या सर्व पारशी - झोराष्ट्रीय धर्मियांचे भारत देश घडवण्यात महत्वाचे योगदान आहे  .  हे सारे पारशी मुख्यत: मुंबईत स्थाईक आहेत . त्या पारशांचा जो महत्वाचा  आहार - गोमास - त्यावर महाराष्ट्रात बंदि आणणे हा राष्ट्रवाद ? हि संस्कृती ? अल्पमती कूपमंडुकानि - आमची ती संस्कृती म्हणत ठराविक  लोकांचे संघटन करणे - देशाचे विघटन करणे - आणि धार्मिक कायदे करणे - हि राष्ट्रहत्याच आज धर्म मानली जात आहे.बाकी गरीब श्रिमंत धर्म वगैरे सोडा पण …  गाय अथवा डुक्कर अथवा गहू -तांदुळ -ज्वारी- बाजरी यापैकी कोणताही सजीव खाणे हा स्वतंत्र माणुस म्हणून आमचा मूलभूत हक्क आहे. 
जे मागास वर्गातील लोक आधी मृत गोमासाचे सेवन करत …. त्यातील काही आज खाटिक खाण्यातील मासाचे करतात . बहुतेकांची आर्थिक परीस्थिती बेताची. त्यांच्यासाठी हा मांसाहाराचा स्वस्त मार्ग .  त्यांचे मटन - प्रोटीन  महाग केले . मुठभर श्रिमंतांच्या भावनेपेक्षा गरिबांची भूक महत्वाची आहे.

म्हशी आणि बकऱ्यांचे दूधही प्यायले जाते त्यांना हिंदूची मावशी काकू आज्जी  का नाही म्हणत ? गाईच्या डोळ्यातले प्रेम बकरीत दिसत नाही ? आर्थिक  उपयुक्तता म्हशीत जास्त आहे .,,,  म्हैस  कमी चार्यात जास्त दुध देते . निदान म्हशीला  हिंदूची मावशी तरी म्हणा !  गोहत्याबंदि हि सरळ सरळ आंधळि पोथिनिष्ठा झाली . पुरातन धार्मिक कायदे हि बुद्धीहत्या आहे .  गोहत्याबंदिच्या मंद कायद्याला  विरोध बुद्धीहत्येसाठी आहे….  विरोध   होत आहे . होत राहील .
खरे पाहता या कायद्याने हिंदुत्व चळवळीचे प्रचंड नुकसान झाले आहे.समान नागरी कायदा हि भाजपाची अतिशय चांगली आणि रास्त राष्ट्रीय मागणी आहे. कोणत्याही धार्मिक आधारावर वेगळे कायदे बनवू नये . सर्व भातीय एक आहेत . कायदाही एक असला पाहिजे . मुस्लिमांचा पर्सनल लो बंद झाला पाहिजे . …….पण ……  आज गोहत्या बंदि कायद्याच्या रूपाने तथाकथित राष्ट्रीय हिंदुचा पर्सनल लो सार्या महाराष्ट्रावर लादला आहे . आता कोणत्या लोजिकने समान नागरी कायदा मागणार ? सर्व धर्म आता धार्मिक कायदे मागणार …  हि देशाच्या विघटनाकडे वाटचाल आहे.

मुस्लिम चेंबर ऑफ कोमर्सने या कायद्याचे स्वागत केले आहे. उद्या जमाते इस्लामीने केले तरी आश्चर्य वाटायला नको . हिंदुना मनुस्मृतीचा कायदा आणि आम्हाला शरियाचा मिळायला पाहिजे असे कट्टर इस्लामी  मौलाना मौदुदि  या जमातच्या संस्थापकानेच लीहिले  आहे. मनुचा दुष्ट शोषक कायदा  कायदा इस्लामच्या प्रचाराला  किती लाभधारक ठरेल याची पुर्ण जाणिव त्याना असावी ! कशाची किंमत देऊन काय मिळवत आहात ?

सांस्कृतिक मापदंड लादता येत नाहीत . लादल्यास बंड होते . बहुसांस्क्रुतिकतेचा आदर , व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे आधुनिक राज्यशास्त्रीय परिभाषा सरकारला कळू नयेत हे गंभिर प्रकरण आहे. गोरक्षणाचा गोभक्तांनि केलेला मिडियावरिल सार्वत्रिक  प्रतिवादही हास्यास्पद आहे .  जणू गाय हि खरोखरची आईच !  कायद्याच्या विरोधकांनो - तुम्ही तुमच्या आईला म्हातारपणी विकणार का ? बापाला कसायाकडे देणार का ? असे प्रश्न  गोपुत्र विचारतात .  मातृभक्त गोभक्तांचेच लॉजिक थोडे आणखी पुढे वाढवता येईल … कारण गाइस ते खरोखरचीच जेनेटिक आई समजू लागले आहेत.


ह्याना सातवीत नेउन पुन्हा विज्ञान शिकवल पाहिजे . गायीचे तूप जाळले कि ऑक्सिजन मिळतो म्हणे ! सैन्याच्या पाणबुड्यात तुपाचे बुधले ठेवणार का मग ? कि हॉस्पिटल मधले ऑक्सिजन सिलिंडर फेकून तुपाचे दिवे जाळायचे ? हिंदुच्या हजार वर्षाच्या दैन्यावस्थेला आणि पराभवाला असले मूर्ख सनातनी  गायाळ तुपाळ दिवटे  जवाबदार आहेत.गाय ज्यांची माता असेल त्यांचा बाप कोण असावा ?आई बापास वेसण घालणे जरा चमत्कारिक नाही काय ?बापास शेतकामावर जुंपणे ?…. त्याने निट काम करावे म्हणुन त्याचे वृषण हनन - हार्मोनल खच्चीकरण करणे ? हा काय प्रकार आहे ?आई बापाशी असे वागतात ? गोपुत्रांनि बापाच्या पौरुष  रक्षणासाठी  काय योजना आखली आहे ? सारेच हास्यास्पद ! 
गोहत्येचे फर्मान घटनेत आहे हा खोडसाळ प्रचार आहे. घटनेतील  कलम ४८ च्या पहिल्या वाक्यात कलमाचा  हेतू "शेती आणि पशुपालनाचा - शास्त्रीय पद्धतीने विकास"असा स्पष्ट केला आहे. शेती आणि पशुपालन हे प्रोफेशनल व्यवसाय आहेत. . 

सरकारने  गो वंश संवर्धनाची जी उपाय योजना (गोहत्याबंदि ) सुचवली आहे ती कलमाचा हेतू सिद्ध करण्यासाठी आहे का ? त्यात भाकड गायी बसतात का ? दुभती गुरे मारू नये असा कायदा महाराष्ट्रात  जुनाच आहे. गेली कित्येक वर्षे इथे  तो लागू आहे. . भाजप सरकारच्या नव्या कायद्यात भाकड गुरांचाहि समावेश होतो. बैलांचा समावेश होतो . भाकड गायी - बैल  वाचवल्याने पशुपालन आणि शेती उद्योगास लाभ होईल का  - तोटा होईल ? याचा कोर्ट विचार करते. मग फक्त गोवंशाच्या  हत्येवर बंदि का ? म्हैस हत्येवर प्रतिबंध का नाही ?  असे विचारते . त्यावर सरकारी वकिलांना हास्यास्पद उत्तरे द्यावी लागतात . वकील व्यावसायिक दृष्टीकोनातून  योग्य आहेत.  सरकारी कायदा हास्यास्पद आहे. 

हिंदुत्व हा शब्द राजकारणात पहिल्यांदा वापरणार्या विज्ञानवीर सावरकरांनी "गोरक्षक बायाबुवांचि गंमत" याच नावाचा लेख ८०  - ९० वर्षापूर्वी लिहिला होता . जवळ जवळ एक शतका नंतर सुद्धा हिंदु आणि हिंदुत्व तितकेच मागास आहे.  सावरकरांनी हा मुद्दा बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा शिकवण्यासाठी निवडला आणि त्यावर अनेक लेख लिहिले . त्यामागे अतिशय महत्व पुर्ण कारणे आहेत. आधुनिक राज्यशास्त्रातील व्यक्तीस्वातंत्र्य आणि आणी धर्मनीर्बंधाचा निर्णायक सवाल गोहत्या आंदोलना संदर्भात चर्चिला जातो . आणि हे राजकारणाचे एक महत्वाचे वळण असते . त्यातून पुढच्या दिशा ठरतात . एकदा धार्मिक कायदे सुरु झाले कि शरियत चे पाकिस्तान अथवा  स्मृतीचे विषम हिंदुराष्ट्र हा शेवट आहे.

हा कायदा आपल्या इहवादी  संविधानत  बसत  नाही. आधुनिक विचार , विज्ञान निष्ठा,  बुद्धिवाद यापैकी कशातच बसत नाही . असे कायदे सरकारला हास्यास्पद बनवणार आहेत .  बहुसंख्य समाजाची धार्मिक भावना हा कायद्याचा आधार ठरवणे हे तत्त्व बरोबर आहे का ? ...... हे तत्त्व एकदा मान्य झाले की अजून कितीही भयंकर कायदे करता येतील.गोहत्याबंदि हा जरी निरागस आणि अहिंसक कायदा असला तरी त्यामागचे तत्व पाहिले पाहिजे … उदाहरणार्थ खाप पंचायत आणि तिचे अमानुष कायदे हि हरियाणातल्या बहुसंख्यांचि धार्मिक भावना आहे . यातून ओनर किलिंग ची शेकडो प्रकरणे घडली आहेत. बहुसंख्यांचि मागणी म्हणून खापचे कायदे आणणार काय ?


सौदी अरब आणि तत्सम इस्लामी देशात रोजा या  धार्मिक उपासाला काफ़िरसुद्धा  दुपारचे जेवण उघडपणे   करू शकत नाहीत . अरब देशातल्या रोजा प्रमाणे …भारतही मेंदूची सुंता करणार काय ? समस्त सरकारी हापिसात गुरुवारी साबुदाणा खिचडी कम्पल्सरी करणार का ? दारूबंदी पण येणार का ? काय खायचे प्यायचे हे सरकार धर्मा वर ठरवणार? छानच ! गोभक्त बायाबुवांना  अजून एक योजना सुचवतो अहे. श्रौत धर्मातल्या   सनातन आयुष्य वेदानुसार -  गोमुत्राचा कडक अर्क आणि गोमयाचे ताजे मिष्टान्न ---  थेट  पौराणिक विमानतून अवकाश मार्गे --- आम्हा  पापी जीवांवर स्प्रे केल्यास  - महाराष्ट्र पापमुक्त होऊन जाइल . बाकी पोथ्या पुराणातील समस्त अभक्ष नियमानुसार -  कांदा,लसुण, मसूर यावर श्रावण महिन्यात बंदी घालायलाहि  काय हरकत आहे ?  

अशीही गोरक्षक  बायाबुवांचि सनातन गंमत शेकडो वर्षे चालू आहे , ती तशीच  चालू राहिली तर तिला गंमत नाही…  शोकांतिका म्ह्टले जाइल . 


५ टिप्पण्या:

 1. Mala mhess ani bakari suddha priy vatataat mhanun mi matan khat naahi. gaay bail na khanyache mukhya karan he ki savrna hindu madhe rahayache asel tar prachand dabab asato. Savarn vastit ghar pahije asel tar beef khane mazya aai vadilani sodun dile as maza purn vishas aahe.
  ande khanyache sodun dile(vipasanna cha course madhe mi ajun sankalp kela ki vegeterian ch rahnaar) karan tya mule mala ata me vegeterian aahe mhanun sudha mirwata yete samajat.

  उत्तर द्याहटवा
 2. महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेला गोवंश हत्याबंदी कायदा नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवला. याबद्दल न्यायला आणि राज्य सरकारचे अभिनंदन.! प्रसिद्धीच्या हव्यासापायी बीफ पार्ट्या आणि फुटकळ मोर्चे काढून तथा निलाजरे वक्तव्ये करून गोमतेचा अपमान करणाऱ्या सर्वांचे या निमित्ताने थोबाड चांगलेच फुटले असेल. तसे जे कसाई आणि गोमांस भक्षक या कायद्यामुळे मरणपंथाला लागले होते त्यांनी आता लवकरात लवकर काहीतरी दुसरी सोय बघावी...! शेतकऱ्यांनी या कायद्याचा उपयोग आर्थिक उन्नतीसाठी करावा व गोवंशामुळे आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे..! सरकारने गोवंशापासून उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून नवीन योजना हाती घ्याव्यात...!

  http://jhadajhadati.blogspot.in/2015/04/blog-post_8.html

  उत्तर द्याहटवा
 3. कोठे घेऊन जाणार देशाला (महाराष्ट्)

  उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *