२५ फेब्रु, २०१५

पिके चित्रपट चर्चा


आमिरचा पिके पाहिला

तसा बरा आहे . मनोरंजक ... उत्तम . आमिरचा अभिनय छान . अनुष्का सुंदरच ! बाकी हिरानी ने नेहमीप्रमाणे उथळ चित्रपट बनवला आहे । देव आहे कि नाही या मूळ मुद्द्याला स्पर्श न करता … अमीर बुवा बाबा यांवर लई टिका करत बसतो ….अशावेळि भक्त इतर बुवांकडे जायला तयार असतात । बाकी जगात सर्वात जास्त हानी करणार्या धर्माबद्दल सर्वात कमी भाष्य आहे आणि परमेश्वर / अल्लाहच्या अस्तित्वाला आव्हान दिलेले नाही … सिनेमा पाहून कोणतेही प्रबोधन होणार नाही . तरी मनोरंजन मात्र भरपूर होईल !

चित्रपटाचा टेक होम मेसेज आहे : देव आहे त्याने आपल्याला बनवले आहे आणि आपण त्याचे ऐकावे … बुवा बाबा रोंग नंबर आहेत . याला कोणि विज्ञाननिष्ठा वगैरे बोलू लागेल तर ते हि मनोरंजनच समजावे !
.
(बाकी हात पकडून मनातले ओळखणे , हात पडुन भाषा शिकणे वगैरे चमत्कार अमीर स्वत:च सिनुमात करत असतो)

धर्मावर टिका झालीच पाहिजे, धर्माची चिकित्सा झालीच पाहिजे त्याद्वारेच धर्मातील वाईट चालिरिती जावून धर्म स्वच्छ होत असतो...पिके वर बंदि घालून या देशाचे पाकिस्तान करायचे नाही .

बरोबर आहे हिदुत्व वाद्यांच !


 … जो तो उठतो तो हिंदूंनाच शहाणपण काय म्हणुन शिकवतो ? हिंदूच्याच सुधारणा काय म्हणुन ? अंधश्रद्धा निर्मुलन फक्त हिंदुचेच का ? विकास फक्त हिंदुचाच का ? प्रगती फक्त हिंदुचीच का ? प्रगतिपथावर फक्त हिंदूच का ? हिन्दुनाहि बहुपत्नित्वाचा , धर्माधतेचा , अस्पृश्यतेचा , मागासलेपणाचा, दारिद्र्याचा , ।वेडसर हिंदु जिहादी बनण्याचा भोळसट्पणाचा आणि गरिबिचा पुर्ण हक्क आहे ! आणि तो आम्ही हिन्दु मिळवणारच..... समजलात काय ????

चित्रपटात शंकर दाखवलेला नसून सोंग दाखवले आहे । कोकणातल्या दशावतारी सोंगाड्यांचे कार्यक्रम जरूर पहा… पिके सौम्य वाटेल … सर्वांवर बंदि घालणार … ग्रामिण भागातल्या दशाव्तारिंवर पण ?  बाकी इस्लामवर टिका आहे पण ती फार कमी आहे शेवटी लिहिणारे रायटर जोशीच ना । त्यांनी थोडीतरी हिंदु सद्गुण विकृती दाखवायला नको का !  बाकी कट्टर्पणा हा शहाणपणा असा जर समाज मनात घर करत असेल तर ते धोकादायक आहे .जरा पुराकथा वाचा … हे सगळे आक्षेप आपोआप गळून पडतील … हिंदुचे सर्व देव पुराण्कथातुन मानवी काम , क्रोध , लोभ , वासना इत्यादी घेऊन दत्त म्हणुन उभे दिसतील … या परकीय सभ्यतेच्या कल्पना हिंदुच्या धर्मात घुसडून …या नैसर्गिक श्र्धांना रिलिजन बनवायचे हे प्रयत्न आहेत

अमिर खान व शाहरूख खान ने आपल्या चित्रपटाची जाहिरात किंवा प्रमोशन करूच नये.
आमचे काहि हिंदुत्ववादी मित्र हे काम फुक्कटात करून देतात.

पिकेने काहीही खोलात चिकित्सा केलेली नाही । आणि थोडे बूट आसूड इस्लाम वरही ओढले आहेत … बाकी बुवा बा यावर हळवे होण्याचे काय कारण ? हिंदु धर्माला चीकीत्सेची गरज आहेच … काय म्हणता ? हिंदुधर्मच सांगतो माणूस कस बनायचं!! बर बर अस्पृश्यांना पशुतुल्य वागणूक झुलू लोकांच्या धर्मात असावी मग बहुतेक । आणि मनुस्मृती हा झांबियातिल ग्रंथ असावा !


ख्रिस्ती धर्म चिकित्सेचा इतिहास गेलिलिओ पासून रिचर्ड डोकिंस पर्यंत दीर्घ आहे । बाकी सर्व प्रगत युरोपीय राष्ट्रात येशूला शिव्या दिल्या तरी तो गुन्हा ठरत नाही । अगदी रांड लेक म्हटले तरी चालते । त्या प्रगत युरोपियन राश्त्रांचा राष्ट्रवाद आणि ताकद आपणास ठाउक असेलच

अमीर खान काही धार्मिक मुसलमान न्व्हे. चित्रपटात काम- संगित - नग्नता - गाणे बजावणे हे सारेच गैर इस्लामिक आहे आणि त्याबद्दल अल्ला निश्चितच आमिरला नरकात पाठवेल ! अमिरने  मरणोत्तर देहदान केलेले आहे . जन्नत मध्ये जाण्या आधी कयामतच्या दिनाची परिक्षा पास व्हावे लागते । त्यासाठी कबरीत संपुर्ण शरीर असणे इस्लाम नुसार आवश्यक आहे … म्हणुन दहन केले जात नाही आणि अवयव दान , पोस्ट मार्टेम आणि , शव विच्चेदानासाठीचे देहदान इस्लामी कठमुल्ल्यांना मंजुर नसते । बाकी काशी - प्रयाग , कूभमेळ्याला ला मीही जाउन आलो आहे आणि आई शप्पथ बिलकुलच धार्मिक नाही शुद्ध नास्तिक आहे … हज यात्रा हे धार्मिकतेचे परिमाण नव्हे


पिके चित्रपटावरील चर्चा । पुढे चालू :

चित्रपट विनोदी आणि मनोरंजक आहे . त्याला प्रबोधनाची व्हेल्यू शून्य आहे । पण त्यावर बंदी घाला हि मागणी रानटी पणाची आहे .. मागच्या पोस्ट वरील चर्चेत ........ साधारणत: इस्लामची चिकित्सा करायची हिंमत नाही का ? हिंदुचिच चिकित्सा का ? असे प्रश्न मला विचारले गेले आहेत
१) पहिला मुद्दा हिमतिचा : माझी फेसबुक टाइम लाइन किंवा ब्लोग वरील लिखाण पाहिले तर तुम्हाला इस्लामची चिकित्सा आणि टिका भरपूर प्रमाणावर आढळून येईल
२) इस्लाम स्वत:ची चिकित्सा मुस्लिम देशात करू देत नाही … याच इस्लामने पेशावर मधील शाळेत मुस्लिमांचे किती भले केले ते तुम्ही पाहिलेच आहे . ज्या धर्माची चिकित्सा आणि सुधारणा होते त्यात योग्य बदल होऊन तो विजयी होतो . दुसर्याची गटारे थोडीबहुत जरूर साफ केली पाहिजेत पण घराच्या सांडपाण्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही … नाहीतर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. हिंदु लोकांच्या हितासाठी त्यांची सुधारणा मला आवश्यक वाटते …
३) इस्लामची चिकित्सा न झाल्याने मुस्लिमांचे संघटन झाले आहे काय ? अजिबात नाही… इस्लामी वेडाचाराचे सगळ्यात जास्त बळी मुसलमानच आहेत . युरोपियन राष्ट्र ख्रिस्ती धर्माची अतिशय मुक्तपणे चिकित्सा करू देतात . त्यांची ताकद आणि संघटन कितीतरी अधिक आहे .सबब हिंदू धर्माची चिकित्सा टाळल्याने ना हिंदूचे भले होते ना त्याचे सघटन होते. चातुर्वण आणि अस्पृश्यतेचे समर्थन करून धर्मानेच हिंदू सं घटन खलास केले आहे. सबब धर्म चिकित्सा हि हिंदुंचे हित करते आणि चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक असलेल्या हिरानी आणि जोशिंना तो अधिकार नाकारणारे तुम्ही कोण ? बाकी अभिनेता हा डाय्लोग लिहित नसतो आणि (मरणोत्तर) अवयव दान करून अल्लाच्या जन्न्नत साठी काहीच बाकी न ठेवलेला अमीर कडवा धार्मिक आहे का ? याचे परिक्षण आपणच करावे . जे काम अमिरने हिंदु हितासाठी केले त्याबद्दल त्याचे आभार मानायला हवे. आणि इस्लामची चिकित्सा करून त्यांच्या उपकाराची अल्पशी परतफेड करायला हवी . असे माझे स्पष्ट मत आहे. 

 धर्मासाठी अंधश्रद्धेने एक आलेले हिंदु काई कांमाचे नाहीत … असल्या अंधश्रध्द आणि मूर्ख संघट्नेचाहि हिंदुच्या हितासाठी काही उपयोग नाही … इस्लामची धर्म चिकित्सा करण्यास तुमचे हात कोणीही बांधलेले नाहीत … आणि हिंदु धर्माची चिकित्सा थांबवू पाहणार्या संघटना हिंदुचे हित करू शकत नाहीत. 

आपण इस्लामची चिकित्सा करून आमिरचे उपकार अंशत: फेडावे… हिंदुनी धार्मिक होणे हा हिंदू संघटनेचा मार्ग नाही आणि इस्लाम प्रश्नावरचा उपायही नाही.  इस्लामची चिकित्सा मी करतो आणि केली तर काहीही फरक पडत नाही । उगीच इस्लामला भिता तुम्ही  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *