४ मे, २०१४

दोष माझ्या तुमच्यासकट आपल्या सर्वांचा आहे.

दोष माझ्या तुमच्यासकट आपल्या सर्वांचा आहे.

काही वर्षापूर्वी खैरलांजीत भोतमांगे नावाच्या दलित कुटुंबावर अत्याचार झाले होते . स्त्रियांच्या अब्रूशी खेळ आणि पाशवी हत्त्या कांड झाले होते. परवा आपल्याच महाराष्ट्रात नितीन आगे नावाचा सतरा वर्षाचा कोवळा मातंग पोरगा उच्च जातीय मुलीशी बोलला म्हणुन त्याला बडवून बुकलुन ठार करण्यात आले . 

खैरलांजीपासुन सोनाई हत्याकाण्डा पर्यंत सार्या गुन्हेगार माजोरड्यानच्या घरादारावर तेव्हाच नांगर फिरला असता तर आज हि हिम्मत झाली नसती . पुरोगामी अब्बा आणि अजाणत्या राजाच्या राष्ट्रवादी पक्षाशि सलग्न असलेली हि घमेंडी सरंजामशाही आहे . परत सांगतोय.. खैरलांजी आणि विशेषत: खर्डा प्रकरणातील सगळे आरोपी हे राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. हुच्चकुलीन मराठे आहेत . मग कारवाई कोण करणार ? त्यांनी पाळलेल्या टुक्कार ब्रिगेड बिळात लपून बसणारच …


शोषित समाजाचे प्रेम कोणाला नाही . डाव्याना नाही उजव्याना नाही आणि मधल्याना हि नाही .

आणि या अत्याचारांविरोधात रान पेटवणे हे भगव्यानाहि मानवणारे नाही .

राष्ट्र रक्षण हे भगवे सनातन ब्रह्म ब्रीदवाक्य . पण सरंजाम दारांची कायमची नोकरी पत्करलेल्या भ्याड सनातनी शेण्ड्याना हे कसे कळावे ? रक्षणाचा विचार पोषणाच्या चिंतनातुन सकस बनत जातो . पुरातन सनातन परंपरेने दु:ख आणि दैन्य मिटवण्यासाठी सामाजिक परिवर्तनाचा विचार का केला नाही ?

मग या व्यवस्थेला आपली व्यवस्था , या राज्याला पुरोगामी राज्य आणि या देशाला आपला देश का मानावा शोषीतांनी ? मला मातृभूमी नाही... असे आज कोणि पुन्हा म्हणाला तर ..तो दोष त्याचा नाही . ..दोष माझ्या तुमच्यासकट आपल्या सर्वांचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *