२५ मार्च, २०१४

हर हर मोदि !

हर हर मोदि ! 

द्वारकेच्या कोन्ग्रेसी शंकराचार्याने मोदिविरोधात फतवा जाहीर केला आहे . हर हर मोदि म्हटल्यामुळे यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत . आणी कोन्ग्रेसी हिदूना देखील धार्मिक भावना असून त्या दुखावल्या जाऊ शकतात हे आता सिद्ध झाले . खरे तर हर हर चा अर्थ दु:ख हरण कर असा होतो आणि त्याचा धर्माशी काहीही संबध नाही . हा द्वारकेचा शंकराचार्य पहिल्यापासून कोन्ग्रेस समर्थनाच्या भूमिका घेत आला आहे . पण आता हिंदुच्या धर्म भावनेस ठेच लावल्याचे अस्त्र भाजपावर उलटल्याने आत्म परिक्षणाला चांगली संधी उपलब्ध आहे . सनातन धर्माचे पालन शंकराचार्यच करत नसल्याची नामुष्की पदरी येते कि काय ? अशी भीती धर्म प्रेमी लोकांच्या मनात उभी राहिली असणार .

मागे संघ परिवारातील एका संघटनेने कर्नाटकात चार्ली चाप्लिनच्या पुतळ्याला विरोध केला होता. एका खिरिस्तावाचा पुतळा बांधला म्हणुन त्यांच्या धर्म भावना दुखावत होत्या . बाकी सोडा पण चेप्लीनाचे सिनेमे जेव्हढे हसवत नाहीत … तेव्हढे हे भावना प्रकरण आम्हाला हसवून गेले होते. तशीच गम्मत महाराष्ट्रात शिव प्रतिष्ठान ने केली होती . हि भिडे गुरुजी संचालित जहाल हिंदुत्व वादि आणि इस्लाम विरोधी संघटना आहे . मागे जोधा अकबर म्हणुन एक सिनेमा आला होता. अकबर हा शंभर टक्के पाखंडी मुसलमान . इस्लाम वर आलेला सगळ्यात मोठा धोका म्हणजे अकबर असे कडव्या मौलवींचे मत असते . अकबराने इस्लाम सोडुन स्वत:चा नवा धर्म स्थापन केला होता आणि वटवट करणार्या मौलविना कंदाहारच्या बाजारात गुलाम म्हणुन विकले होते . अकबरावरच्या सिनेमाने खरे तर मुस्लिमांच्या भावना दुखवायला हव्या होत्या . पण झाले भलतेच ! अकबराने जोधाबाई शी केलेला निकाह हा लव्ह जिहाद आहे असे म्हणत भिडे गुरुजींच्या मावळ्यांनी सांगलीत शड्डू ठोकले होते . आंबेडकरांच्या एक संशोधनपर ग्रंथाने भावना दुखावल्या म्हणुन घातला गेलेला धुडगुस आपणास आठवत असेलच

सिनेमा , चित्र , शिल्प, काव्य , साहित्य यांनी भावना दुखावल्याचे कारण पुढे करत धुडगुस घालणे हि एकट्या मुस्लिमांची मक्तेदारी नाही . त्यात हिंदुत्व वादि , ख्रिश्चन आणि भारतीय बौद्ध सुद्धा सामील आहेत .

सध्या भाजपाकडून हिंदुच्या धार्मिक भावनांचा अधिक्षेप घडल्याने त्याविषयी बोलू . एखाद्या धर्माला किंवा देवाला उघड शिव्या देणे , नालस्ती करणे यामुळे दुखावलेल्या भावना हि एक बाब झाली . पण अतिशय सुक्ष्म पातळीवर - एखाद्या सिनामेताल्या लग्नाने , कलाकाराच्या पुतळ्याने , किंवा गणपतीच्या जरा वेगळ्या वस्त्राताल्या मूर्तीने भावना दुखावणे हास्यास्पद आहे असे विचारी लोकाना वाटत असणार . पण ज्यांच्या भावना दुखावतात त्याना ती कारणे सुक्ष्म वाटत नाहीत . अस्मितेचे राजकारण हा यामागचा मुद्दा आहे .

आपला धर्म , संकृती वगैरे महान आहेत त्या बेनरखाली राजकीय संघटन उभारायचे असेल । तर भावना दुखावण्याची कळ अतिशय स्वस्तात उपलब्ध असते . अतिशय कमी श्रमात त्यामुळे संघटन तयार होते . स्व बांधवावरील प्रेमापेक्षा - शत्रूची भीती हे संघटनेचे अधिक प्रभावी हत्यार आहे . हा खरा मुद्दा आहे .

प्रेमापेक्षा भीती हि मानवी भावना अधिक प्रबळ असल्याने भावना दुखावण्याचे नाटक सुरूच राहणार आहे . पण ती एक दुधारी तलवार आहे .

इस्लामी पाकिस्तानात धर्माला ठेच लागली म्हणुन एकमेकांचे मुडदे पाडायचे काम चालू आहे . प्रस्तावित हिंदुराष्ट्राचे भविष्य यापेक्षा वेगळे असणार आहे काय ? याचा विचार हिंदू बांधवांनी करायचा आहे . मागे मोदिनी दलिताना पुजारी करतो म्हटल्यावर सनातन प्रभात च्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या .

भाजपा ने धर्म भावना दुखावल्याचे राजकारण अनेकदा केले आहे . गुजरात ची प्रादेशिक अस्मिता दुखावल्याचा मुद्दा मोदिनीच मागच्या निवडणुकीत उचलून धरला होता . हिंदी आणि इंगजी मिडिया गुजराथी माणसाविरुद्ध प्रचार करते आहे असा तो मुद्दा होता . भीतीच्या राजकारणाने लोक पटकन जोडले जातात . धर्म बुडण्याची भीती हि त्यात शीर्ष स्थानी असते . पण हे अस्त्र दुधारी असते हे लक्षात ठेवले पाहिजे . सध्या तरि हिन्दु धर्म भवना दुखल्याचि मोदिचि तलवार मोदिनाच बाउ करते आहे ।

ताजा कलम : युरोपातील अनेक प्रगत देशात येशुविरुद्ध काहीही बोललेले चालते . आणि या फ्री कल्चर मधले ते देश राष्ट्र म्हणुन एकसंघ पणे उभे आहेत . प्रगतिपथावर आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *