२५ डिसें, २०१३

आम्हाला शुभेच्छा नकोत !

आम्हाला शुभेच्छा नकोत ! 

आज बर्याच हिंदुत्व वाद्यांचे स्टेटस आहे : आम्हाला नाताळच्या शुभेच्छा नकोत ! परधर्माच्या शुभेच्चा आम्हीच काय म्हून घ्याव्या ? त्ये लोग आमच्या घेतात व्हय ? केक कापत सांता क्लोज च्या टोप्या घालत ३१ डिसेंबर ला दारू पिणार्या पिढिनि राष्ट्र आणि धर्म बुडवला आहे वगैरे !

मग आमच्या लाडक्या तात्यांनी लिहील कि - " आज एका मराठी वृत्तवाहिनीवर (बहुतेक झी २४ तास) एक कुणीतरी मराठी अ‍ॅन्कर बया केकची पाककृती दाखवत होती.. का तर म्हणे उद्या खिरिस्ताव लोकांचा सण नाताळ म्हणून. बरं केक करताना बाजूला ते नाताळाचं झाड.. शिवाय त्या मुलीच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी..
च्यामारी, गुढीपाडव्याला खिरिस्ताव मुली नाकी नथ, नऊवारी लुगडं वगैरे नेसून श्रीखंड, पुरणपोळ्या वगैरे कधी करतात का हो? मग साला आपणच असे लाचार का..? सर्वधर्मसमभावी आणि सेक्युलर व्हायचा मक्ता फक्त आम्हा हिंदूंकडेच आहे का..?! -- तात्या."

सर्व साधारणत: हिंदुत्व वाद्यांची हि मानसिकता असते - " आम्हीच का म्हून व्हावे सर्व धर्म संभावी ?


वस्तुत: अगदीच बोगस अर्ग्युमेंट आहे । भरपूर ख्रिस्ती आणि मुसलमानही हिंदुचे दिवाळी गणपती वगैरे सण साजरे करतात … आणि अगदी मुळाशीच जायचं झाल हिंदुत्वाचा प्रसार आणि स्वीकार भरपूर वेगाने होत असतो । आपल्यात धर्मांतराचा विधी नाही म्हणुन हे कळत नाही । गणपतीची मूर्तीपूजा करणे म्हणजे ख्रिस्ती आणि इस्लामची मुळ तत्वे चुलीत घालून हिंदुंच्या देवाला शरण जाणे आहे … तर केक खाणे हि केवळ मज्जा …. सनातन्यांच्या बालबुद्धीला झेपायच्या नाहीत या गोष्टी … आपले भीमरूपी महारुद्रा बरे


आमच्या चिरंजिवांसाठी घेतलेला नाताळचा पोशाख 

माझ्यासकट सर्व जगाने कट्टर रहावे … एकमेकांना सणांच्या शुभेच्छाहि देऊ नयेत ! हि मुळ मानसिकता आहे । आणि ह्या मानसिकतेचे ---- बाबासाहेब आंबेडकर जयंतीला नाके मुरडणारे हिंदु , गणेशभक्त सलमानला धर्मबहिष्कृत करणारे मुसलमान , प्रसाद नाकारणारे ख्रिस्ती आणि हिंदु सणांच्या शुभेच्छाही नाकारणारे नवबौद्ध … या सर्वांनाच भरपूर मनस्ताप सहन करत बसावा लागणार आहे … कितीपण उपटा … कायपण करा … एकच एक धर्म आणि संस्कृती या जगात नांदणार नाही … जग बहुविध होते आणि राहील … बाकी तुम्ही शुभेच्छा जरूर नाकारा … मला नाताळच्या नकोत , तुला दिवाळीच्या नकोत ,त्याला ईद च्या नकोत …। मुख्य म्हणजे आम्हाला शुभेच्छाच नकोत ….आम्हाला शुभेच्छा नकोत ! कारण आम्हाला कायम ठेवायचा आहे द्वेष ! आणि सततचा भयगंड ! माझा धर्म बुडेल हो !

चांगभलं ! इतक्या चिमुरड्या शुभेच्छंनि आपला धर्म बुडण्याची भीती अनेक धर्मलंडांना वाटते … वाटुद्या ! एव्हड्या तेव्हढ्या केक खाण्याने , गणपतीत नाचल्याने , बुद्ध जयंतिच्या शुभेच्छा दिल्याने तुमचे धर्म बुडण्याएव्हढे … ते फालतू असतील … तर असे फालतू धर्म बुडालेलेच बरे ! चांगभलं !

ताजा कलम : जगातले सगळेच धर्म बुडणार नाहीत कदाचित । जे जिवंत रसरशितपणे नव्या गोष्टीचे आदान प्रदान करतील - निदान ते तरी बुडणार नाहीत ! पण शुभेच्छा नाकारणारे धर्मवीर आणि त्यांचे धर्मही बुडतील । बुडाले पाहिजेत । बुडवले जातील !! तर मग कट्टर धर्म वीरहो द्या पुन्हा आवाज : आम्हाला शुभेच्छा नकोत !

२ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *